26-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, जसे तुम्हा आत्म्यांना हे शरीर रुपी सिंहासन मिळाले आहे, तसे बाबा पण दादांच्या सिंहासन घर, विराजमान आहेत, त्यांना स्वत:चे सिंहासन नाही...!!

प्रश्न:-
ज्या मुलांना ईश्वरी संतान आहे याची आठवण राहते, त्यांची निशाणी कोणती?

उत्तर:-
त्यांचे खरे प्रेम एक बाबा बरोबर असते. ईश्वरीय संतान कधी पण लढणार भांडणार नाहीत. त्यांची कुदृष्टी कधी पण जात नाही. जेव्हा ब्रह्माकुमार कुमारी म्हणजे बहिण भाऊ बनले, तर वाईट दृष्टी जावू शकत नाही.

गीत:-
सोडून घ्या आकाश सिंहासन.

ओम शांती।
आता मुले जाणतात कि, बाबांनी आकाश सिंहासन सोडून, आता दादाच्या तनाला आपले सिंहासन बनवले आहे. आत्म्याचे सिंहासन आहे, ते महत्त्व, जेथे तुम्ही आत्मे शरीराशिवाय राहत होता. जसे आकाशात तारे उभे आहेत ना, तसे तुम्ही आत्मे पण फार छोटे छोटे तेथे राहत होता. आत्म्याला दिव्य दृष्टी शिवाय पाहू शकत नाही. तुम्हा मुलांना आता हे ज्ञान आहे, जसे तारा किती लहान आहे, तसे आत्मा पण बिंदू सारखी आहे. आता बाबांनी तर सिंहासन सोडून दिले आहे. बाबा सांगतात की, तुम्ही आत्मे पणा सिंहासन सोडून येथे या शरीराला आपले सिंहासन बनविता. मला पण जरुर शरीर पाहिजे. मला बोलावतात जुन्या दुनियेमध्ये. गीत आहे ना, दूर देशातील राहणारा---तुम्ही आत्मे जेथे राहता, तो आहे तुम्हा आत्म्यांचा आणि देशातील राहणारा----तुम्ही आत्मे जेथे राहता, तो आहे तुम्हा आत्म्यांचा आणि बाबांचा देश. नंतर तुम्ही स्वर्गात जाता. स्वर्गामध्ये त्यांची गरज नाही. ते तर दु:ख व सुखापासून अलीप्त आहेत ना. तुम्ही तर सुखामध्ये येता, तर दु:खामध्ये पण येता.

आता तुम्ही जाणता कि आम्ही ब्रह्माकुमार कुमारी बहीण भाऊ आहोत. एक दोघांमध्ये कुदृष्टीचा विचार पण आला नाही पाहिजे. येथे तर तुम्ही बाबाच्या समोर बसले आहात, आपसात बहिण-भाऊ आहात. पवित्र राहण्याची युक्ती पहा कशी आहे. या गोष्टी कोणत्या शास्त्रामध्ये नाहीत. सर्वांचा बाबा एक आहे. तर सर्व मुले झाली ना. मुलांनी आपसात लढले भांडले नाही पाहिजे. यावेळी तुम्ही जाणता की आम्ही ईश्वरीय संतान आहोत. अगोदर आसुरी संतान होतो, नंतर आता संगमयुगावर ईश्वरीय संतान बनलो आहोत, मग सतयुगामध्ये देवी संतान बनू. या चक्राची मुलांनी माहिती झाली आहे. तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी आहात. मग कधी कुदृष्टी जाणार नाही. सतयुगामध्ये कुदृष्टी असत नाही. कुदृष्टी रावण राज्यांमध्ये होते. तुम्हा मुलांना एका बाबाशिवाय आणखीन कोणाची आठवण आली नाही पाहिजे. सर्वांत जास्त एका बाबांवर प्रेम करावे. माझे तर एक शिवबाबा दुसरे कोणी नाही. बाबा म्हणतात की, आता तुम्हाला शिवालयामध्ये जायचे आहे. शिवबाबा स्वर्गाची स्थापन करत आहेत. आर्धाकल्प रावणराज्य चालले आहे, त्यामुळे दुर्गती प्राप्त झाली. रावण कोण आहे, त्यांना जाळतात का, हे पण कोणी जाणत नाही. शिवबाबांना पण ओळखत नाहीत. जसे देवींना समजावतात, पुजा करुन बुडवितात, शिवबाबाला पण मातीचे लिंग बनवून पुजा इ. करुन मग माती, मातीत मिसळतात, तसे रावणाला पण बनवून मग जाळतात. समजत काहीच नाहीत. म्हणतात पण कि आता रावणराज्य आहे, रामराज्य स्थापन होत आहे. गांधी पण रामराज्य इच्छित होते, मग त्यांचा अर्थ रावणराज्य आहे ना. जी मुले या रावण राज्यामध्ये कामचितेवर बसून जळाली आहेत, बाबा येऊन परत त्यांचेवर ज्ञानवर्षा करत आहेत, सर्वांचे कल्याण करत आहेत. जसे सुकुलेल्या जमीनीवर पाऊस पडल्याने गवत तयार होते. तुमच्या वर पण ज्ञानवर्षा न झाल्याने किती कंगाल बनले आहात. आता परत ज्ञानवर्षा होत आहे, ज्याद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनाल. जरी तुम्ही मुले गृहस्थ व्यवहारामध्ये राहता, परंतू आतून फार खुशी झाली पाहिजे. जसे काही गरीबांची मुले शिकतात, आणि ते शिकून बॅरिस्टर इ. बनतात. ते पण मोठ मोठ्या बरोबर बसतात, खातात पितात. भिलणीची गोष्ट पण शास्त्रामध्ये आहे ना.

तुम्ही मुले जाणता की, ज्यांनी सर्वांत जास्त भक्ती केली आहे, तेच सर्वांत जास्त ज्ञान येऊन घेतात. सर्वांत जास्ती सुरुवाती पासून तर भक्ती आम्ही केली आहे, नंतर आम्हालाच बाबा स्वर्गामध्ये पहिल्या प्रथम पाठवितात. सतयुग यथार्थ गोष्ट. बरोबर आम्हीच ते पुज्य होतो परत तेच पुजारी बनलो. खाली उतरत जात आहेत. मुलांना सारे ज्ञान समजावले झाले यावेळी, दुनिया नास्तिक आहे, बाबाला ओळखत नाहीत. नेती नेती म्हणत आहेत. पुढे चालून हे सन्यासी इ. सर्व येथून, आस्तिक बनतील. कोणी एक सन्यासी आला तरी पण त्यांचेवर सर्व विश्वास थोडेच ठेवतील. म्हणतील यांचेवर बी.के. चा जादू लागला आहे. त्यांच्या शिष्याला गादी वर बसवून त्याला काढून टाकतील. असे फार सन्यासी तुमच्या जवळ आले आहेत, नंतर निघून जातील हे आहे फार आश्चर्यकारक नाटक तुम्ही मुलांनी सुरुवातीपासून शेवटापर्यंत सर्व जाणले आहे. तुमच्या मध्ये नंबरवार पुरुषार्थानूसार धारणा करतात. बाबाजवळ सारे ज्ञान आहे, तुमचे जवळ पण असले पाहिजे. दिवसेंदिवस किती सेंटर उघडत राहत आहेत. मुलांना फार दयाळू बनायचे आहे. बाबा म्हणतात स्वत:वर पण दयावान बना. बेरहमी बनू नका. स्वत:वर दया करावयाची आहे. कशी? ते पण सांगत आहेत. बाबांची आठवण करुन पतितापासून पावन बनायचे आहे. नंतर कधी पतित बनण्याचा पुरुषार्थ करावयाची नाही. दृष्टी फार चांगली पाहिजे. आम्ही ब्राह्मण ईश्वरीय संतान आहोत. ईश्वराने आम्हाला दत्तक घेतले आहे. आम्हाला ब्राह्मण पासून देवता बनायचे आहे. अगोदर सुक्ष्मवतनवासी फरिश्ता बनायचे आहे. सुक्ष्मवतनचे रहस्य पण मुलांना समजावले आहे. येथे आहे बोलणे, सुक्ष्मवतन मध्ये हावभाव, मुलवतनमध्ये आहे, शांती. सुक्ष्मवतन आहे फरिश्ता, त्यांचे जसे सावली सारखे शरीर असते ना. आत्म्याला शरीर मिळत नाही. तर भटकत राहते, त्याला भुत म्हटले जाते. त्याला या डोळ्याने पाहू शकता. हे मग आहेत सुक्ष्मवतनवासी फरिश्ते. यासर्व गोष्टी फार समजण्यायोग्य आहेत. मुलवतन, सुक्ष्मवतन, स्थुलवतन यांचे तुम्हाला ज्ञान आहे. चालता-फिरता बुध्दीमध्ये हे सारे ज्ञान राहिले पाहिजे. आम्ही मुल मुलवतनचे रहिवासी आहोत. आता आम्ही तेथे जावू सुक्ष्मवतनमध्ये बाबा सुक्ष्मवतन या वेळीच निर्माण करत आहेत. अगोदर सुक्ष्म नंतर स्थुल पाहिजे. कुदृष्टी जात असेल तर उंच पद मिळणार नाही. आता तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी झाले आहेत. नंतर घरी गेल्यावर विसरुन जावू नका. तुम्ही संगदोष मध्ये येऊन विसरुन जाता. तुम्ही हंस ईश्वरीय संतान आहात. तुमची कोणाबरोबर पण आंतरीक रग नसली पाहिजे. जर ओढ असेल तर त्याला मोहाचे माकडीन म्हणावे.

तुमचा धंदाच आहे, सर्वांना पावन बनविणे. तुम्ही आहात विश्वाला स्वर्ग बनविणारे. कोठे ती रावणाची आसुरी संतान, कोठे तुम्ही ईश्वरीय संतान. तुम्हा मुलांना आपली अवस्था एकरस बनविण्यासाठी, सर्व काही पाहून जसे कि पाहिलेच नाही असा अभ्यास करावयाचा आहे. यामध्ये बुध्दीला एकरस ठेवणे हिम्मतची गोष्ट आहे. संपूर्ण होण्यासाठी मेहनत लागते. संपूर्ण बनण्यासाठी वेळ लागतो. जेव्हा कर्मातीत अवस्था होईल, तेव्हा ती दृष्टी बनेल. तो पर्यंत काही ना काही ओढ राहते. यामाध्ये फार उपराम झाले पाहिजे. लाइन स्पष्ट पाहिजे. पाहून जसे की तुम्ही पाहतच नाही, असा अभ्यास ज्याचा असेल तेच उंच पद प्राप्त करतील. आता ती अवस्था थोडीच आहे. सन्यासी या गोष्टीला तर समजतच नाहीत. येथे तर फार मेहनत करावी लागते. तुम्ही जाणता कि, आम्ही पण या जुन्या दुनियेचा सन्यास करुन, बसलो आहे. बस, आत्म्याला तर आता गोड शांतीधाम मध्ये जायचे आहे. आणखीन कोणाच्या बुध्दीमध्ये नाही. जेवढे तुमच्या बुध्दीत आहे. तुम्ही जाणता की आता परत जायचे आहे. शिव भगवानूवाच आहे की, ते पतित पावन, मुक्तीदाता, मार्गदर्शक आहेत. कृष्ण काही मार्गदर्शक नाहीत. यावेळी तुम्ही पण सर्वांना रस्ता दाखविणे शिकत आहात, त्यामुळे तुमचे नाव पांडव ठेवले आहे. तुम्ही पांडवाची सेना आहात. आता तुम्ही आत्मअभिमानी बनले आहात. जाणले आहे की, आता परत जायचे आहे. हे जुने शरीर आहे. सापाचे उदाहरण, भ्रमरीचे उदाहरण, हे सर्व आहे, तुमचे यावेळेचे. तुम्ही आता प्रत्यक्षात आहात. ते तर हा धंदा करु शकत नाहीत. तुम्ही जाणता की हे कब्रीस्तान आहे, आता परत परिस्थान बनणार आहे.

तुमच्यासाठी सर्व दिवस भाग्यवान आहेत. तुमही मुले सदैव भाग्यवान आहात. गुरुवारच्या दिवशी मुलांना शाळेमध्ये बसवितात. हा रिवाज चालत आला आहे. तुम्हाला आता वृक्षपती शिकवत आहेत. ही ब्रहस्पतीची दशा तुमची जन्मोजन्मी चालते. ही आहे बेहदची दशा. भक्ती मार्गामध्ये हदची दशा चालते, आता आहे बेहदची दशा. तर पूर्ण रितीने मेहनत केली पाहिजे. लक्ष्मी नारायण कोणी एकतर नाहीत ना. त्यांची तर राजधानी आहे ना. जरुर अनेक राज्य करत असतील. लक्ष्मी नारायणाच्या सुर्यवंशी घराण्याचे राज्य चालत आहे, या गोष्टी पण तुमच्या बुध्दीमध्ये आहेत. तुम्हा मुलांना हा पण साक्षात्कार झाला आहे की, कसा राजतिलक देतात. सुर्यवंशी मग चंद्रवंशी नी, कसे राज्य देतात. मातपिता मुलांचे पाय धुवून राजतिलक देतात, राज्यभाग्य देतात. हे साक्षात्कार इ. सर्व नाटकामध्ये नोंदलेले आहेत. यामध्ये तुम्हा मुलांना गोंधळून जाण्याची गरज नाही. तुम्ही बाबाची आठवण करा, स्वदर्शन चक्रधारी बना आणि दुसऱ्यांना बनवा. तुम्ही आहात स्वदर्शन चक्रधारी खरे ब्राह्मण, शास्त्रांमध्ये स्वदर्शन चक्राने किती हिंसा दाखविली आहे. आता बाबा तुम्हाला खरी गाता सांगत आहेत. हे तर पाठ केले पाहिजे. किती सोपे आहे. तुमचा सारा संबंध आहेच गीतेबरोबर. गीतेमध्ये ज्ञान पण आहे तर योग पण आहे. तुम्ही पण एकच पुस्तक बनविले पाहिजे. योगाचे पुस्तक वेगळे का बनविले पाहिजे. परंतू आजकाल योगाची प्रसिध्दी फार आहे, त्यामुळे नाव ठेवतात कारण मनुष्य येऊन समजतील. शेवटी ते पण समजतील कि योग एका बाबा बरोबरच लावायचा आहे. जे ऐकतील ते आपल्या धर्मामध्ये येऊन उंच पद प्राप्त करतील. अच्छा. शुभरात्री.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. स्वत:वर स्वत:च दया करावयाची आहे, आपली दृष्टी फार चांगली पवित्र ठेवायची आहे. ईश्वराने मनुष्यापासून देवता बनविण्यासाठी दत्तक घेतले आहे, त्यामुळे पतित बनण्याचा कधी विचार पण करु नये.

2. संपूर्ण कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी उपराम राहण्याचा अभ्यास करावयाचा आहे. या दुनियेमध्ये सर्व काही पाहून पण पाहायचे नाही. या अभ्यासानेच अवस्था एकरस बनावयाची आहे.

वरदान:-
श्रेष्ठ, पालनेच्या विधीद्वारे वृध्दी करणारे सर्वांच्या अभिनंदनाचे पात्र भव

संगमयुग अभिनंदनाद्वारे वृध्दी प्राप्त करावयाचे युग आहे. बाबाची, परिवाराची अभिनंदनाद्वारेच तुम्हा मुलांची पालना होत आहे. अभिनंदनाद्वारेच नाचत, गात, पालना होऊन, उडत जात आहात. ही पालना पण आश्चर्यकारक आहे. तर तुम्ही मुले पण मोठ्या मनाने, दयेच्या भावनेने दाता बनून प्रत्येक जन एक दोघांना फार चांगले, फार चांगले म्हणून धन्यवाद देत राहा, हीच पालनेची श्रेष्ठ विधी आहे. या विधीद्वारे सर्वांची पालना करत राहा, तर अभिनंदनाचे पात्र बनाल.

बोधवाक्य:-
आपला स्वभाव सरळ बनविणे, हेच समाधान स्वरुप बनण्याची सहज विधी आहे.


मातेश्वरी जींचे अनमोल महावाक्य

आर्धाकल्प ज्ञान ब्रह्माचा दिवस, आणि आर्धाकल्प भक्ती मार्ग ब्रह्माची रात्र आर्धाकल्प आहे. ब्रह्माचा दिवस, आर्धाकल्प आहे ब्रह्माची रात्र, आता रात्र संपून सकाळ होणार आहे. आता परमात्मा येऊन आधार संपवून प्रकाशाची सुरुवात करत आहेत. ज्ञान आहे प्रकाश, भक्ती आहे आंधार, गीतामध्ये पण म्हणतात की या पापाच्या दुनियेपासून दूर कोठे घेउन चला, मनाला चैन जिथे मिळेल. ही आहे बैचेन दुनिया, जिथे चैन नाही. मुक्ती मध्ये ना चैन आहे, ना बैचेनी. सतयुग त्रेता आहे चैनीची दुनिया, ज्या सुखधामाला सर्व आठवण करत आहेत. तर आता तुम्ही चैनीच्या दुनियेमध्ये जात आहात, तेथे कोणी अपवित्र आत्मा जावू शकत नाही. ते अंत काळात धर्मराजाचे दंडे खावून, कर्म बंधनापासून मुक्त बनून, शुध्द संस्कार घेऊन जातात. कारण तेथे ना अशुध्द संस्कार असतात, ना पापाचे. जेव्हा आत्मा आपल्या खऱ्या पित्याला विसरते, तर हा भूल भुल भुलैयाचा जो अनादी खेळ हार जीतचा बनलेला आहे, त्यामध्ये आपल्या या सर्वशक्तीवान परमात्माद्वारे शक्ती घेऊन विकारांच्या वर विजय प्राप्त करुन 21 जन्मांसाठी राज्य भाग्य प्राप्त करत आहात. अच्छा.