28-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- या बेहद्दच्या नाटकामध्ये हे तुम्ही आश्चर्यजनक कलाकार आहात, हे अनादि नाटक आहे, यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही"

प्रश्न:-
बुद्धिवान, दूरादेशी मुलेच कोणते गुह्य रहस्य समजू शकतात?

उत्तर:-
मुलवतन पासून संपूर्ण नाटकाच्या आदि - मध्य- अंताचे रहस्य आहे, ते दूरादेशी मुलेच समजू शकतात, बीज आणि झाडाचे संपूर्ण ज्ञान त्यांच्या बुद्धीमध्ये राहते. ते जाणतात- या बेहद्दच्या नाटकामध्ये आत्मरुपी कलाकार जो,हे शरीर रूपी कपडे घालून भूमिका बजावत आहे, त्याला सतयुगापासुन कलियुगा पर्यंत भूमिका बजावायची आहे. कोणीही कलाकार मधून परत जाऊ शकत नाही.

गीत:-
तू रात्र घालवली झोपून दिवस घालवला खाऊन....

ओम शांती।
हे गीत मुलांनी ऐकले. आता यामध्ये काही अक्षर चुकीची ही आहेत,तर काही बरोबरही आहेत. सुखामध्ये तर स्मरण केले जात नाही. दुःखाला ही जरूर यायचे आहे. दुःख आहे म्हणूनच तर बाबांना सुख देण्यासाठी यावे लागते. गोड गोड मुलांना माहित आहे, आता आम्ही सुखधाममध्ये जाण्यासाठी शिकत आहोत. शांतीधाम आणि सुखधाम. प्रथम मुक्ती नंतर असते जीवनमुक्ती. शांतीधाम घर आहे, तिथे कोणतीही भूमिका वठवली जात नाही. कलाकार घरी निघून जातात, तिथे कोणतीही भूमिका वठवत नाहीत. भूमिका रंगमंचावर वठवली जाते. हेही रंगमंच आहे. ज्याप्रमाणे हद्दचे नाटक असते त्याप्रमाणे हे बेहद चे नाटक आहे. याच्या आदी - मध्य,अंताचे रहस्य बाबां शिवाय दुसरे कोणी समजावून सांगू शकत नाही. खरेतर हे यात्रा किंवा युद्ध अक्षर फक्त समजावण्यासाठी वापरले जाते. बाकी यामध्ये युद्ध इ. काहीही नाही. यात्रा ही अक्षर आहे. बाकी तर आहे आठवण. आठवण करत- करत पावन बनून जाल. ही यात्रा पूर्ण ही इथेच होणार आहे. कुठेही जायचे नाही. मुलांना समजावले जाते पावन बनून आपल्या घरी जायचे आहे. अपवित्र तर जाऊ शकत नाही. स्वतःला आत्मा समजायचे आहे. मज आत्म्यामध्ये संपूर्ण चक्राची भूमिका आहे. आता ती भूमिका पुर्ण झाली आहे. बाबा खूप सोपी मत देतात, माझी आठवण करा. बाकी इथेच बसलेले आहात. कुठेही जाण्याची गरज नाही. बाबा येऊन सांगतात माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. कोणतेही युद्ध नाही. स्वतःला तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवायचे आहे. माये वर विजय मिळवायचा आहे. मुले जाणतात 84 चे चक्र पूर्ण होणार आहे, भारत सतोप्रधान होता. तिथे जरूर मनुष्यच असतील. जमीन थोडीच बदलणार आहे. आता तुम्ही जाणता आम्ही सतो प्रधान होतो परत तमोप्रधान बनलो, आता परत सतोप्रधान बनायचे आहे. मनुष्य बोलतातही कि येऊन आम्हाला पतीतापासून पावन बनवा. परंतु तो कोण आहे, कसा येतो, काहीच जाणत नाहीत. आता बाबांनी तुम्हाला समजदार बनवले आहे. किती उंच पद तुम्ही प्राप्त करता. इथल्या सावकारां पेक्षाही, तिथले गरीबही खूप उच्च असतात. भले कितीही मोठे मोठे राजे होते, धन खूप होते परंतु आहेत तर विकारी ना. यांच्यापेक्षा तिथली साधारण प्रजा सुद्धा खूप उच्च बनते. बाबा फरक सांगतात. रावणाची सावली पडल्याने पतित बनतात. निर्विकारी देवतांच्या समोर स्वतःला पतित समजून नतमस्तक होतात. बाबा आल्यानंतर लगेच उच्च बनवतात. सेकंदाची गोष्ट आहे. आता बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे. तुम्ही मुले दुरादेशी बनता. वरती मूलवतन पासून संपूर्ण नाटकाचे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आठवणीत आहे. ज्याप्रमाणे हदचे नाटक पाहून आल्यानंतर काय- काय पाहिले ते सांगतात ना. बुद्धीमध्ये भरलेले असते, ते वर्णन करत राहतात. आत्म्यामध्ये भरून येतात नंतर येऊन इतरांना सांगत राहतात. या आहेत बेहद च्या गोष्टी. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या बेहद नाटकाच्या आदि - मध्य- अंताचे रहस्य राहायला हवे. जे पुनरावृत्त होत राहते. त्या हदच्या नाटकामध्ये तर एक कलाकार निघून गेला तर बदल्यांमध्ये दुसरा येऊ शकतो. एखादा आजारी पडला तर त्याच्या बदली दुसऱ्याला घेतात. हे तर चैतन्य नाटक आहे, इथे जराही अदलाबदली होऊ शकत नाही. तुम्ही मुले जाणता आम्ही आत्मा आहोत. हे शरीर रुपी कपडा आहे जो परिधान करून आम्ही बहुरूपी भूमिका बजावतो. नाव, रूप, देश, चेहरा बदलत जाते. कलाकाराला आपल्या भूमिकेबद्दल माहीत असते ना. बाबा मुलांना हे चक्राचे रहस्य समजावत राहतात. सत युगापासून कलियुगाच्या अंतापर्यंत येतात-जातात, पुन्हा नव्याने भूमिका बजावतात. याचा विस्तार समजावून सांगण्यासाठी वेळ लागतो. बीजा मध्ये भले ज्ञान आहे तरीही समजावून सांगण्यासाठी वेळ तर लागतोच ना. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व बीज आणि झाडाचे रहस्य आहे, त्यातही जे चांगले बुद्धिवान आहेत, तेच समजतात की या झाडाचे बीज वरती आहे. याची उत्पत्ती, पालना आणि संहार कसा होतो, म्हणून त्रिमूर्ती ही दाखवले आहे. बाबा जे समजावून सांगतात, ते दुसरे कोणीही मनुष्य समजावून सांगू शकत नाही. जेव्हा इथे येतील तेव्हा माहित होईल म्हणून तुम्ही सर्वांना सांगता इथे येऊन समजावून घ्या. काही जण खूप कट्टर असतात तर ते म्हणतात आम्हाला काहीही ऐकायचे नाही. काही ऐकणारे ही असतात, काही लिटरेचर खरेदी करतात, काही जण घेत नाहीत. तुमची बुद्धी आता किती विशाल, दुरादेशी झालेली आहे. तिन्ही लोकांना तुम्ही जाणता, मूलवतन जाला निराकारी दुनिया असे म्हणतात. बाकी सूक्ष्म वतन चे काहीही नाही. सर्व संबंध मुल वतन आणि स्थूल वतनशी आहे. बाकी सूक्ष्मवतन तर थोड्यावेळासाठी आहे. बाकी आत्मे सर्व वरून येथे येतात भूमिका बजावण्यासाठी. हे झाड सर्व धर्मांचे नंबर वार आहे. हे आहे मनुष्यांचे झाड आणि एकदम ऍक्युरेट आहे. काहीही मागेपुढे होऊ शकत नाही. न आत्मे दुसऱ्या कोणत्या ठिकाणी बसू शकतात. आत्मे ब्रह्म महतत्वा मध्ये उभे राहतात, ज्याप्रमाणे चांदण्या आकाशामध्ये उभ्या आहेत. या चांदण्या तर लांबून छोट्या-छोट्या दिसतात. आहेत खूप मोठ्या. परंतु आत्मा तर न लहान-मोठी होते, न विनाश होतो. तुम्ही स्वर्णीम युगामध्ये जाता नंतर लोखंडाच्या युगामध्ये येता. मुले जाणतात आम्ही स्वर्णिम युगामध्ये होतो,आता लोखंडाच्या युगामध्ये आलो आहोत.काही किंमत राहिली नाही. मायेची चमक कितीही असली तरीही हे आहे रावणाचे स्वर्णीम युग, ते आहे ईश्वराचे स्वर्णिम युग.

मनुष्य म्हणतात ६-७ वर्षांमध्ये एवढे धान्य पिकेल विचारूच नका. पहा त्यांचा प्लॅन काय आहे आणि तुमचा प्लॅन काय आहे? बाबा म्हणतात माझा प्लॅन आहे जुन्या दुनियेला नवीन बनवणे. तुमचा एकच प्लॅन आहे. तुम्ही जाणता बाबांच्या श्रीमतावर आम्ही वारसा घेत आहोत. बाबा रस्ता दाखवतात, श्रीमत देतात, आठवणी मध्ये राहण्याची मत देतात.मत अक्षर तर आहे ना. संस्कृत अक्षर तर बाबा बोलत नाहीत. बाबा तर हिंदी मध्येच समजावून सांगतात. भाषातर अनेक आहेत ना. भाषांतर करणारेही असतात, जे ऐकून दुसऱ्यांना ऐकवतात. हिंदी आणि इंग्लिश तर अनेकांना माहित आहे. शिकतात ही. बाकी घरी राहणाऱ्या माता एवढ्या शिकत नाहीत.आज-काल परदेशात जाऊन इंग्रजी शिकतात नंतर इथे येऊन सुद्धा इंग्रजी बोलतात. हिंदी बोलू शकत नाहीत. घरी आल्यानंतर आईसोबत इंग्रजी मध्ये बोलू लागतात. ती बिचारी गोंधळून जाते तिला काय माहिती इंग्रजी भाषा. नंतर त्यांना तोडकी-मोडकी हिंदी शिकावी लागते. सतयुगामध्ये तर एक राज्य, एक भाषा होती, जी पुन्हा स्थापन होत आहे. प्रत्येक ५००० वर्षानंतर हे सृष्टी चक्र कसे फिरते,हे बुद्धीमध्ये राहायला पाहिजे. आता एका बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे. इथे तुम्हाला चांगला वेळ भेटतो. सकाळी स्नान इ. आटोपून बाहेर फिरण्या मध्ये खूप मजा येते, मनामध्ये हे आठवणीत ठेवा,आम्ही सर्व कलाकार आहोत. आता ही स्मृति आली आहे. आता बाबांनी आम्हाला 84च्या चक्राचे रहस्य सांगितले आहे. आम्ही सतोप्रधान होतो ही खुप खुशीची गोष्ट आहे. मनुष्य हिंडतात फिरतात, त्यांची काहीच कमाई होत नाही. तुम्ही तर खूप कमाई करता. बुद्धीमध्ये चक्रही आठवणी मध्ये राहायला पाहिजे,आणि बाबांचीही आठवण केली पाहिजे. कमाई करण्याच्या युक्त्या बाबा खूप चांगल्या चांगल्या सांगतात.जी मुले ज्ञानाचा विचार सागर मंथन करत नाहीत त्यांच्या बुद्धीमध्ये माया टकटक करत असते. त्यांनाच माया त्रस्त करते. मनामध्ये हा विचार करा, आम्ही हे चक्र कसे पूर्ण केले आहे. सतयुगामध्ये एवढे जन्म घेतले नंतर खाली उतरत आलो. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. बाबांनी सांगितले आहे- माझी आठवण करा तर सतोप्रधान बनाल. चालता-फिरता बुद्धीमध्ये आठवण ठेवा तर मायेची टकटक समाप्त होईल. तुमचा खूप- खूप फायदा होईल. भले स्त्रीपुरूष सोबत जाता. प्रत्येकाला आपले उंच पद प्राप्त करण्यासाठी मेहनत करायची आहे. एकटे जाण्यामध्ये खूपच मजा आहे. स्वतःच्याच मस्ती मध्ये मस्त रहाल. दुसरे कोणी सोबत असेल तरीही बुद्धी इकडेतिकडे जाईल. खूप सहज आहे, बगीचे इ. तर सर्वत्र आहेत, इंजिनीयर असेल तर त्याचे हे चिंतन चालत राहील की इथे पूल बनवला पाहिजे, असं केलं पाहिजे. बुद्धीमध्ये नियोजन येते. तुम्ही घरामध्ये बसलेले असाल तरीही बुद्धी तिकडे लागायला पाहिजे. ही सवय लावा तर तुमच्या मनामध्ये हेच चिंतन चालत राहील. शिकायचं ही आहे, धंदा इ. ही करायचा आहे. वृद्ध, तरुण, मुले इ. सर्वांना पावन बनायचे आहे. बाबांकडून वारसा घेण्याचा आत्म्याला हक्क आहे. मुलांनाही लहानपणीच हे बीज पडले तर खूप चांगले आहे. अध्यात्मीक विद्या दुसरे कोणी शिकवू शकणार नाहीत.

तुमची जी अध्यात्मिक विद्या आहे, ही तुम्हांला बाबाचा येऊन शिकवतात. त्या शाळांमध्ये शारीरिक ज्ञान शिकवले जाते. आणि ती आहे ग्रंथाची विद्या. ही आहे आत्मिक विद्या, जी तुम्हाला भगवान शिकवत आहे. याबद्दल कोणालाही माहित नाही. याला म्हटले जाते अध्यात्मिक ज्ञान. जे परमात्मा देऊन शिकवतो, त्यांचे दुसरे कोणते नाव ठेवू शकत नाही. इथे तर स्वतः बाबा येऊन शिकवतात. भगवानुवाच आहे ना. भगवान एकदाच यावेळी येवुन समजावत आहेत, याला आत्मज्ञान म्हटले जाते. ती ग्रंथाची विद्या वेगळी आहे. तुम्हाला माहित आहे की ज्ञान एक आहे,महाविद्यालया मधीेल, दुसरे आहे अध्यात्मिक शास्त्रांचे ज्ञान, तिसरे आहे हे आत्मज्ञान. ते भले कितीही मोठे मोठे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ( तत्त्वज्ञानी) आहेत, परंतु त्यांच्याकडे शास्त्रांच्या गोष्टी आहेत. तुमचे हे ज्ञान बिलकुल वेगळे आहे. हे अध्यात्मिक ज्ञान जो अध्यात्मिक पिता जो सर्व आत्म्यांचा पिता आहे, तोच शिकवत आहे. त्यांची महिमा आहे शांती, सुखाचा सागर.... कृष्णाची महिमा बिलकुल वेगळी आहे, गुण-अवगुण मनुष्यामध्ये असतात, जे बोलत राहतात. बाबांची महिमा हि अर्थ सहीत तुम्हीच जाणता. ते तर फक्त पोपटासारखे गात राहतात, अर्थ काहीच माहित नाही. तर मुलांना बाबा सल्ला देतात आपली प्रगती कशी करावी. पुरुषार्थ करत राहतात तर पक्के होत राहतात, मग कार्यालयामध्ये काम करत असतानाही ही ईश्वराची स्मृती राहील. मायेची स्मृती तर अर्धा कल्प चालत आली आहे, आता बाबा अर्थ सहीत समजावून सांगत आहेत. स्वतःकडे पहा- आम्ही काय होतो, आता काय बनत आहोत,नंतर बाबा आम्हाला असे देवता बनवत आहेत. हेही तुम्ही मुले क्रमवार पुरुषार्थ नुसार जाणत आहात. सुरुवातीला तर भारतातच होता. भारतामध्येच बाबा भूमिका वठण्यासाठी येतात. तुम्हीही आदी सनातन देवी-देवता धर्माचे आहात ना. तुम्हाला पवित्र बनायचे आहे, नाहीतर शेवटी याल, मग काय सुख मिळेल. भक्ती जास्त केली नसेल तर येणार नाहीत. आपल्यालाही समजेल, हे एवढे ज्ञान घेऊ शकणार नाहीत. समजू तर शकतो ना. खूप मेहनत करतात तरीही एखादाच निघतो परंतु थकायचे नाही. मेहनत करायची आहे. मेहनत केल्याशिवाय काही थोडीच मिळते. प्रजा तर बनत राहते.

बाबा मुलांना प्रगती करण्यासाठी युक्ती सांगतात- मुलांनो आपली प्रगती करायची असेल तर सकाळी - सकाळी स्नान इ. करून एकांतामध्ये जाऊन चक्कर लावा किंवा बसा. शरीर स्वास्थ्यासाठी चालणेही चांगलेच आहे. बाबांची ही आठवण राहिल आणि नाटकाचे रहस्यही बुद्धीमध्ये राहिल, किती कमाई आहे. ही आहे खरी कमाई, ती कमाई पूर्ण झाली नंतर या कमाईचे चिंतन करा. अवघड काहीच नाही. बाबांनी पाहिले आहे काही जण संपूर्ण जीवन कहाणी लिहितात- आज एवढ्या वाजता उठलो, नंतर असे केले.... समजतात पाठीमागचे लोक वाचून शिकतील. मोठ्या मोठ्या मनुष्यांची जीवन कहाणी वाचतात ना. मुलांसाठी लिहून ठेवतात नंतर मुलेही घरामध्ये अशा प्रकारे चांगल्या स्वभावाचे होतात. आता तुम्हा मुलांना पुरुषार्थ करून सतोप्रधान बनवायचे आहे. पुन्हा एकदा सतो प्रधान दुनियेचे राज्य घ्यायचे आहे. तुम्ही जाणता कल्प- कल्प आम्ही राज्य घेतो आणि नंतर गमावतो. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत. ही आहे नवी दुनिया, नव्या धर्मासाठी नवे ज्ञान, म्हणूनच गोड गोड मुलांना तरीही समजावून सांगतात- लवकर- लवकर पुरुषार्थ करा. शरीरावर भरोसा थोडाच आहे. आज-काल मरण खूप सोपे झाले आहे. तिथे अमर लोकांमध्ये असा मृत्यू कधी होत नाही, इथे तर बसल्या बसल्या कसे मरतात म्हणून आपला पुरुषार्थ करत रहा. जमा करत रहा. अच्छा!

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति माता-पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बुद्धीला ज्ञान चिंतना मध्ये व्यस्त ठेवण्याची सवय लावायची आहे. जेंव्हा ही वेळ भेटेल एकांतामध्ये जाऊन विचार सागर मंथन करायचे आहे. बाबांची आठवण करून खरी कमाई जमा करायची आहे.

2. दुरांदेशी बनून या बेहद्द च्या नाटकाला अर्थ सहीत समजून घ्यायचे आहे. सर्व कलाकारांच्या भूमिकेला साक्षी होऊन पाहायचे आहे.

वरदान:-
मास्टर ज्ञान सागर बनून बाहुल्यांचा खेळ समाप्त करणारे स्मृती सो समर्थ स्वरूप भव

ज्याप्रमाणे भक्ती मार्गामध्ये मूर्ती बनवून पूजा इ. करतात, नंतर त्यांचे विसर्जन करतात, तर त्याला तुम्ही बाहुल्यांची पूजा असे म्हणता. अशाप्रकारे तुमच्या समोरही जेव्हां एखादी निर्जीव,असार गोष्टी, ईर्षा, अनुमान, आवेश इ. येतात आणि तुम्ही त्याचा विस्तार करून अनुभव करता किंवा करवता की, हेच बरोबर आहे,तर हे ही एक प्रकारे तुम्ही त्या गोष्टी मध्ये प्राण भरता. नंतर त्यांना ज्ञानसागर बाबांच्या आठवणी द्वारे, जे झाले,ते झाले असे म्हणून, स्वप्रगतीच्या लहरीं मध्ये डुंबता परंतु यामध्ये ही वेळ वाया जातो ना, यासाठी सुरुवातीपासूनच मास्टर ज्ञानसागर बनून स्मृति सो समर्थी भवच्या वरदाना द्वारे या बाहुल्यांचा खेळ समाप्त करा.

बोधवाक्य:-
जो वेळेवर सहयोगी बनतो त्याला एकाचे पदमगुणा फळ मिळते.