29-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- प्रथम सर्वांना बाबांचा सत्य परिचय देऊन गीतेचा भगवान सिद्ध करा, नंतर तुमचे नाव प्रसिद्धीस येईल. "

प्रश्न:-
तुम्ही मुलांनी चार युगामध्ये चक्र लावलेले आहे, त्याची परंपरा भक्ती मार्गामध्ये चालत आली आहे, ती-कोणती?

उत्तर:-
तुम्ही चारीही युगामध्ये चक्र लावले आहे,ते नंतर सर्व ग्रंथ, चित्र इत्यादींना गाडीमध्ये ठेवून चारही बाजूंनी परिक्रमा लावतात. नंतर घरामध्ये आणून झोपवतात. तुम्ही ब्राह्मण, देवता, क्षत्रिय.... बनता. या चक्राच्या बदली त्यांनी परिक्रमा देणे सुरू केले आहे. ही सुद्धा परंपरा आहे.
 

ओम शांती।
आत्मिक पिता बसून आत्मिक मुलांना समजावत आहे, जेंव्हा कुणाला समजावून सांगत असता तेंव्हा प्रथम हे स्पष्ट करा की, पिता एक आहे, विचारायचे नाही की पिता एक आहे का अनेक आहेत. असे तर मग अनेक आहेत,असे म्हणतील. त्यांना सांगायचे आहे पिता रचनाकार एकच आहे. तो सर्व आत्म्यांचा पिता आहे. सुरूवातीला असेही म्हणायचे नाही की तो बिंदू आहे, नाहीतर गोंधळून जातील. सुरुवातीला तर हे चांगल्या प्रकारे समजावून सांगा की दोन पिता आहेत- लौकिक आणि पारलौकिक. लौकिक तर प्रत्येकाला असतो. परंतु त्याला कोणी खुदा कुणी गॉड असे म्हणतात. आहे एकच. सर्वजण एकाचीच आठवण करतात. प्रथम हा पक्का निश्चय करावयाचा आहे कि, पिता स्वर्गाची स्थापना करणारे आहेत. ते इथे येतो स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी येतात, ज्याला शिवजयंती असेही म्हटले जाते. तुम्ही मुले जाणता, स्वर्गाचा रचता भारतामध्येच स्वर्गाची रचना रचतो, ज्यामध्ये देवी-देवतांचे राज्य असते. तर सुरुवातीला बाबांचा परिचय द्यायचा आहे,त्यांचे नाव आहे शिव. गीतेमध्ये भगवानुवाच आहे ना. प्रथम तर हा निश्चय करून लिहून घ्यायला पाहिजे. गीतेमध्ये आहे भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग शिकवतो अर्थात नरापासून नारायण बनवतो. हे कोण बनवू शकते? नक्की समजावून सांगायला पाहिजे. भगवान कोण आहे नंतर हे ही समजवायला हवे. सतयुगांमध्ये पहिल्या नंबर ला जे लक्ष्मी नारायण आहेत, नक्की ते 84 जन्म घेत असतील. नंतर पाठीमागून इतर धर्म वाले येतात. त्यांचे एवढे जन्म होऊ शकत नाहीत. प्रथम येणाऱ्यांचे 84 जन्म होतात. सतयुगामध्ये तर काहीच शिकत नाहीत. नक्कीच संगमयुगावर शिकले असतील. तर सुरुवातीला बाबांचा परिचय द्यायचा आहे. ज्याप्रमाणे आत्मा दिसू शकत नाही, समजू शकतो, त्याप्रमाणे परमात्म्याला ही पाहू शकत नाही. बुद्धी द्वारे समजू शकतो तो आम्हा आत्म्यांचा पिता आहे. त्यांना परम आत्मा म्हटले जाते. तो सदैव पावन आहे. त्यांना येऊन पतित दुनियेला पावन बनवावे लागते. तर प्रथम पिता एक आहे, हे सिद्ध करून सांगितल्याने गीतेचा भगवान कृष्ण नाही, हेही सिद्ध होईल. तुम्हा मुलांना सिद्ध करून सांगायचे आहे. एक बाबांनाच सत्य म्हटले जाते. बाकी कर्मकांड किंवा तीर्थ इ. च्या गोष्टी सर्व भक्तीच्या शास्त्रांमध्ये आहेत. ज्ञानामध्ये तर याचे काहीही वर्णन नाही. इथे कोणतेही शास्त्र नाही. बाबा येऊन सर्व रहस्य समजावत आहेत. प्रथम तुम्ही मुले या गोष्टीवर विजय मिळवाल की भगवान एक निराकार आहे, न कि साकार. परम पिता परमात्मा शिव भगवान उवाच, ज्ञानाचा सागर सर्वांचा पिता तो आहे. श्रीकृष्ण तर सर्वांचा पिता होऊ शकत नाही, तो कोणालाही असे म्हणू शकत नाही की देहाचे सर्वधर्म सोडून माझी आठवण करा. खूप सोपी गोष्ट आहे. परंतु मनुष्य शास्त्र इ. वाचून, भक्तीमध्ये पक्के झालेले आहेत. आज-काल शास्त्र इत्यादींना गाडीमध्ये ठेवून परिक्रमा लावतात. चित्रांना(मूर्तींना), ग्रंथांना ही परिक्रमा दाखवून नंतर घरी आणून झोपवतात. आता तुम्ही मुले जाणता आम्ही देवता पासून क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतो, हे चक्र पूर्ण करतो. चक्राच्या बदली ते परिक्रमा दाखवून घरामध्ये नेऊन ठेवतात. त्यांचा एक ठरलेला दिवस असतो, त्यादिवशी परिक्रमा लावतात. तर सुरुवातीला हे सिद्ध करून सांगायचे आहे की श्रीकृष्ण भगवानुवाच नाही परंतु शिवभगवानुवाच आहे. शिव पुनर्जन्म रहित आहे. ते नक्की येतात, परंतु त्यांचा दिव्य जन्म आहे. भागीरथा वर येऊन सवार होतात. पतितानां येऊन पावन बनवतात. रचता आणि रचनेच्या आदि- मध्य - अंताचे रहस्य समजावतात, जे ज्ञान इतर कोणालाही माहित नाही. बाबांना स्वतः येऊन स्वतःचा परिचय द्यायचा आहे. मुख्य गोष्ट आहे बाबांच्या परिचयाची. तोच गीतेचा भगवान आहे, हे तुम्ही सिद्ध करून सांगितल्यानंतरच तुमचे नाव प्रसिद्धीस येईल. तर अशा प्रकारचे पर्चे बनवुन त्यामध्ये चित्र इ. लावून नंतर विमानातून खाली टाकायला पाहिजे. बाबा मुख्य- मुख्य गोष्टी समजावून सांगत राहतात. तुम्ही मुख्य एका गोष्टी मध्ये जिंकले तर बस,तुम्ही जिंकले. याद्वारे तुमचे नाव प्रसिद्धीस येईल, यामध्ये कोणीही टकटक करणार नाही. या खूप स्पष्ट गोष्टी आहेत. बाबा म्हणतात मी सर्वव्यापी कसा असू शकतो. मी तर येऊन मुलांना ज्ञान सांगतो. बोलावतात ही- येऊन पावन बनवा.रचता आणि रचनेचे ज्ञान सांगा. महिमा बाबांची वेगळी, कृष्णाची वेगळी आहे. असे नाही शिवबाबा येऊन कृष्ण किंवा नारायण बनतात, 84 जन्मांमध्ये येतात!नाही. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी समजावून सांगण्यासाठी असायला पाहिजेत. मुख्य आहे गीता. भगवानुवाच आहे, तर नक्की भगवानाचे मुख पाहिजे ना. भगवान तर आहे निराकार. आत्मा मुखा शिवाय कशी बोलणार. तेव्हाच म्हणतात मी साधारण शरीराचा आधार घेतो. जे प्रथम लक्ष्मीनारायण बनतात ते 84 जन्म घेत-घेत शेवटी येतात नंतर त्यांच्याच शरीराचा मी आधार घेतो. कृष्णाच्या अनेक जन्मांच्या शेवटी येतो. अशाप्रकारे विचार सागर मंथन करा की कसे कोणाला समजवायचे. एकाच गोष्टीमुळे तुमचे नाव प्रसिद्धीस येईल. रचता पिता कोण आहे हे सर्वांना माहीत होईल. नंतर तुमच्याजवळ अनेकजण येतील. तुम्हाला बोलतील की इथे येऊन भाषण करा म्हणून सुरुवातीला अल्फ (परमात्म्याचा) परिचय सिद्ध करून समजावा. तुम्ही मुले जाणता - बाबांकडून आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत. बाबा प्रत्येक ५ हजार वर्षानंतर भारतामध्येच भाग्यशाली रथामध्ये येतात. हा आहे सौभाग्यशाली रथ, ज्या रथामध्ये भगवान येऊन बसतात. कमी गोष्ट आहे का. भगवान यांच्या मध्ये बसून मुलांना समजावून सांगतात कि मी खूप जन्मांच्या अंता मध्ये यांच्या मध्ये प्रवेश करतो. श्रीकृष्णाच्या आत्म्याचा रथ आहे ना. तो स्वतः कृष्ण तर नाही आहे. अनेक जन्मांच्या शेवटचा आहे. प्रत्येक जन्मामध्ये चेहरा काम इ. बदलत राहते. अनेक जन्मांच्या अंता मध्ये ज्यांच्या मध्ये प्रवेश करतो तेच नंतर कृष्ण बनतात. संगम युगामध्ये येतात. आम्हीही बाबांचे बनुन बाबांकडून वारसा घेतो. बाबा शिकवुन सोबत घेऊन जातात दुसरी कोणतीही त्रासाची गोष्ट नाही. बाबा फक्त म्हणतात माझी आठवण करा, तर हे चांगल्या प्रकारे विचार करायला पाहिजे की कसे-कसे लिहावे. ही खूप मोठी चूक आहे ज्या मुळेच भारत अयोग्य, अधर्मी, कंगाल बनला आहे. बाबा पुन्हा येऊन राजयोग शिकवत आहेत. भारताला योग्य, सधन बनवतात. संपूर्ण दुनियेला योग्य बनवतात. त्यावेळी संपूर्ण विश्वाचे मालक तुम्हीच असता. म्हणतात ना - तुम्हाला खूप मोठे आयुष्य आणि समृद्धी मिळो. बाबा असा आशीर्वाद देत नाहीत की सदैव जिवंत राहा. हे साधू लोक म्हणतात-अमर रहा. तुम्ही मुले समजता अमर तर नक्की अमरपुरी मध्येच राहणार. मग मृत्यू लोकांमध्ये अमर कसे म्हणू शकतो. तर मुले जेव्हा मीटिंग इ. करतात तेव्हा बाबांकडून विचार घेतात. बाबा अगोदरच विचार देतात सर्वांनी आपापला विचार लिहून पाठवा नंतर खुशाल एकत्रही या. विचार तर मुरली मध्ये लिहिल्यानंतर सर्वांजवळ पोहोचू शकतो.२-३ हजार खर्च वाचेल. या २-३ हजारा मधे तर दोन तीन सेंटर खोलू शकता. चित्र इ. घेऊन, गावागावांमध्ये जायला पाहिजेत.

तुम्हा मुलांना सूक्ष्मवतन च्या गोष्टींमध्ये जास्त रुची नसायला पाहिजे. ब्रह्मा, विष्णू शंकराचे चित्र आहे तर यावर थोडे समजावले जाते. यांची मधे थोडीसी भूमिका आहे. तुम्ही जाता, भेटता बाकी दुसरे काहीही नाही म्हणून यामध्ये जास्ती रुची घेतली जात नाही. इथे आत्म्याला बोलवले जाते, त्यांना दाखवतात. काही जण येऊन रडतात ही. काहीजण प्रेमाने भेटतात. काहींचे दुःखाचे अश्रू वाहतात. ही सर्व नाटकांमध्ये भूमिका आहे, ज्याला चर्चा म्हणू शकतो. ते लोक तर ब्राह्मणांमध्ये एखाद्या आत्म्याला बोलवतात नंतर त्याला कपडे वगैरे घालतात. आता त्याचे पूर्वीचे शरीर तर नष्ट झाले, बाकी कपडे घालणार कोण? तुमच्याजवळ ती परंपरा नाही. रडण्याची तर गोष्टच नाही. तर उच्च ते उच्च बनायचे आहे, ते कसे बनायचे. नक्की मध्ये संगम युग आहे जेंव्हा तुम्ही पवित्र बनता. तुम्ही एक गोष्ट सिद्ध केली तर ते म्हणतील हे तर एकदम बरोबर बोलत आहेत. भगवान कधी खोटे थोडीच सांगू शकतो. नंतर अनेकांना आवडायला लागेल, खूप जण येतील. वेळेवर मुलांना सर्व मुद्दे भेटत राहतात. शेवटी काय काय होणार आहे, तेही तुम्ही पहाल, लढाई लागेल, बॉम पडतील. सुरूवातीला बाहेरच्या देशांचा विनाश होईल. इथे तर रक्ताच्या नद्या वाहणार आहेत नंतर दुधा तुपाच्या नद्या वाहतील. प्रथम विदेशातून धूर निघेल. तिथे भीती पण खूप आहे. किती मोठे-मोठे बॉम्स बनवतात. त्या मध्ये काय-काय टाकतात, एका दमात शहर नष्ट करून टाकतात. हेही सांगायचे आहे, कुणी स्वर्गाचे राज्य स्थापन केले. स्वर्गाची स्थापना करणारा पिता नक्की संगमयुगा वरच येतो. तुम्ही जाणत आहात आता संगमयुग आहे. तुम्हाला मुख्य गोष्ट समजावली जाते बाबांची आठवण करा, ज्याद्वारे तुमचे पाप नष्ट होतील. भगवान जेंव्हा आले होते, तेंव्हा त्यांनी सांगितले होते माझीच आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल. मुक्तिधाम मध्ये जाल. नंतर सुरुवातीपासून चक्र पुनरावृत्त होईल. देवता, इस्लाम, बौद्धि..... तुम्हा विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये हे सर्व ज्ञान असायला पाहिजे. खुशी राहते, आम्ही किती कमाई करत आहे, ही अमरकथा अमर बाबा तुम्हाला सांगत आहेत. तुमची अनेक नावे ठेवली आहेत. मुख्य प्रथम देवता नंतर सर्वांची वृद्धी होत-होत झाड वाढत जाते. अनेकानेक धर्म, अनेक मते होऊन जातात. हा एक धर्म एका श्रीमता द्वारे स्थापन होत आहे. दोन मतांची (द्वेत) गोष्ट नाही. हे आत्मिक अज्ञान आत्मिक पिता बसून समजावत आहेत. तुम्ही मुलांनी खुशी मध्ये राहायला पाहिजे. तुम्ही जाणत आहात बाबा आम्हाला शिकवत आहेत. तुम्ही अनुभवांनी सांगता तर हा शुद्ध अहंकार असायला पाहिजे की आम्हाला भगवान शिकवत आहे अजून काय पाहिजे! जेंव्हा की आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत, तर खुशी का राहत नाही? कुठे निश्चया मध्ये संशय तर येत नाही?पित्यामध्ये संशय यायला नको. माया संशयया मध्ये आणून विसरायला लावते. बाबांनी समजावले आहे माया डोळ्यांच्या द्वारे खूप धोका देते. चांगली वस्तु पाहिल्यानंतर मनामध्ये सतत वाटत राहते की, ती खावी. डोळ्यांनी पाहिल्यानंतर क्रोध येतो नंतर मारतात. पाहिलेच नाही तर मारणार कसे. डोळ्यांनी पाहतात तेंव्हाच लोभ, मोह होतो. मुख्य धोका देणारे डोळे आहेत. यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवायला पाहिजे. आत्म्याला ज्ञान मिळाले तर मग अपराधीपणा सुटून जातो. असेही नाही डोळे काढून टाकायचे आहेत. तुम्हाला तर वाईट दृष्टीला चांगली दृष्टी बनवायचे आहे. अच्छा!

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. सदैव याच नशे किंवा खुशी मध्ये राहायचे आहे की आम्हाला भगवान शिकवत आहे. कोणत्याही गोष्टी मध्ये संशय बुद्धी व्हायचे नाही. शुद्ध अहंकार ठेवायचा आहे.

2. सूक्ष्मवतन च्या गोष्टींमध्ये जास्त रुची ठेवायची नाही. आत्म्याला सतोप्रधान बनवण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. आपसा मध्ये विचार करून सर्वांना बाबांची खरी ओळख करून द्यायची आहे.

वरदान:-
संगम युगाच्या महत्वाला जाणून एकाचा अनेकवेळा मोबदला प्राप्त करणारे सर्व प्राप्ती संपन्न भव

संगम युगावर बापदादांचे वचन आहे- एक द्या लाख घ्या. ज्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ वेळ, सर्वश्रेष्ठ जन्म, सर्वश्रेष्ठ पदवी या वेळेतील आहेत, त्याप्रमाणे सर्व प्राप्तीचा अनुभव आत्ताच होतो. आत्ता एकाचे फक्त लाख गुणा भेटत नाही परंतु जेव्हा वाटेल ,जसे वाटेल बाबा सेवाधारी रूपामध्ये बांधलेला आहे. एकाचा अनेक वेळा मोबदला मिळून जातो कारण की वर्तमान वेळेत वरदाता तुमचा आहे. जेंव्हा बीज तुमच्या हातामध्ये आहे तर,जे पाहिजे ते सेकंदामध्ये घेऊन सर्व प्राप्तीनी संपन्न बनू शकता.

बोधवाक्य:-
कोणतीही परिस्थिती असेल, परिस्थिती निघून जावो परंतु खुशी जायला नको