30-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो , तुम्हाला आत्मिक पंडे (मार्गदर्शक) बनुन सर्व धर्म वाल्यांना शांतीधाम आणि सुखधाम चा रस्ता सांगायचा आहे तुम्ही आहात खरे पंडे "

प्रश्न:-
बाबांच्या आठवणीने कोणत्या मुलांना पूर्ण बळ प्राप्त होते?

उत्तर:-
जे आठवणीच्या सोबत बाबांशी पूर्ण इमानदारीने राहतात, काहीही लपवत नाहीत, सत्य पित्या सोबत सत्य राहतात, कोणतेही पाप करत नाहीत, त्यांनाच आठवणीने बळ (शक्ति) प्राप्त होते. काही मुले चुका करत राहतात, नंतर म्हणतात क्षमा करा, बाबा म्हणतात क्षमा मिळत नाही. प्रत्येक कर्माचा हिशेब आहे.

गीत:-
आमचे तीर्थ वेगळे आहेत.....

ओम शांती।
मुलांनी हे गीत ऐकले, मुलांच्या ज्ञानाचे पॉईंट्स पाहण्यासाठी की कशाप्रकारे अर्थ काढतात, तर अशा प्रकारची गीते शोधून नंतर एका-एका चा अर्थ काढायला पाहिजे कारण या गीतांनाही सूव्यवस्थित केले जाते ना. बाबांनी समजावले आहे काही अशी चांगली गीते आहेत जर एखादा चिंताग्रस्त होऊन बसला असेल तर त्याला खुशी मध्ये आणण्यासाठी ही गीते खूप मदत करतात. ही खुप कामाची गोष्ट आहे. गीत ऐकल्याने पटकन स्मृती येईल. तुम्ही मुले जाणता खरोखर आम्ही या पृथ्वीतलावरचे नशीबवान तारे आहोत. आमचे हे तीर्थ भक्तिमार्गा पेक्षा खूप वेगळे आहेत. तुम्ही आहात पांडव सेना. त्या तिर्थांवर असते पंडितांची सेना.प्रत्येक समूहाचा वेगळा-वेगळा पंडा (मार्गदर्शक) असतो जो सोबत घेऊन जातो. त्यांच्याजवळ सर्वांचे खाते असते.ते विचारतात कोणत्या कुळाचे आहात? प्रत्येक जण आपल्या कुळ वाल्यांना घेतात. किती पंडे घेऊन जातात. तुम्हीही आत्मिक पंडे आहात.तुमचे नावच आहे पांडव सेना. पांडवांची राजधानी नाही. पांडव पण्ड्यांनां म्हटलं जातं. बाबाही बेहद चा पंडा आहे.मार्गदर्शकाला पंडा म्हटले जाते. पंडे तिर्थांवर घेऊन जातात. पुजारी लोकांना माहित असते हे पंडे यात्रींना घेऊन आले आहेत. ज्ञान मार्गामध्ये ही तुम्ही पंडे बनता.इथे कुठेही घेऊन जाण्याची गरज नाही. घरी बसल्या बसल्या ही तुम्ही कोणालाही रस्ता सांगू शकता नंतर ज्याला सांगता तोही पंडा बनतो. एक दुसऱ्याला रस्ता सांगायचा आहे-मनमनाभव. तुमच्या मध्ये ही बरेच जण असतील ज्यांनी तीर्थयात्रा केल्या असतील. बुद्धीमध्ये येत असेल- बद्रीनाथ, अमरनाथला कसे जायचे असते. पंड्यांनाही माहित असते,तुम्ही आहात आत्मिक पंडे. हे तुम्ही विसरू नका की आम्ही पुरुषोत्तम संगमयुगी आहोत. तुम्हां मुलांच्या बुद्धीमध्ये एकच गोष्ट आहे की आम्ही मुक्ती जीवनमुक्ती'चे पंडे आहोत. असे नाही की स्वर्गाचे कुणी वेगळे पंडे आहेत, मुक्तीचे वेगळे आहेत. तुम्हाला हा निश्चय आहे, आम्ही मुक्तीधाम मध्ये जाऊन नंतर नव्या दुनियेमध्ये येणार आहोत. तुम्ही क्रमवार पुरुषार्थ नुसार पंडे आहात. पंडे ही अनेक प्रकारचे असतात. तुम्ही सर्वोच्च पंडे आहात, सर्वांना पवित्रतेचा रस्ता सांगत आहात. सर्वांना पवित्र राहायचे आहे. दृष्टी बदलून जाते. तुम्ही प्रतिज्ञा केली आहे की आम्ही एका शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करणार नाही. बाबा आम्ही तुमचीच आठवण करू. तुमचे बनल्याने आमची जीवन रुपी नाव पार होते. भविष्यामध्ये तर सुखच सुख आहे. बाबा आम्हाला सुखाच्या संबंधांमध्ये घेऊन जात आहे. इथे तर दुःखच दुःख आहे. सुखही कावळ्याच्या विष्ठे प्रमाणे आहे. तुम्ही नव्या दुनियेसाठी शिकत आहात. तुम्ही जाणता मुक्तिधाम मध्ये जाऊन नंतर येथे येणार आहोत. घरी तर नक्की जाणार आहोत.ही योगबळाची यात्रा आहे. शांतीधाम ची आठवण आणि बाबांची ही आठवण करायची आहे. बाबांसोबत इमानदारीने राहायचे आहे. बाबा म्हणतात असे नाही की तुमच्या मनात काय आहे,ते मी ओळखतो, नाही.तुम्ही जसे वागतात त्यावरून बाबा सांगतात,पुरुषार्थ करवतात. बाकी तुम्ही कोणती अवज्ञा किंवा पाप करता तर विचारले जाते- काही पाप तर नाही केले? बाबांनी समजावले आहे डोळे खूप धोका देतात. हेही सांगायला हवे की बाबा आज डोळ्यांनी खूप धोका दिला.इथे तर भीती असते, घरामध्ये गेल्यानंतर माझी बुद्धी भटकते. बाबा ही माझी सर्वात मोठी चूक आहे, क्षमा करा. बाबा म्हणतात क्षमा करण्याची गोष्ट इथे नाही, ते तर दुनियेतील मनुष्य करतात. कुणी थप्पड मारली, माफी मागितली, काम संपले. अशी माफी मागायला वेळ थोडीच लागतो. वाईट कर्म करत राहायचं आणि म्हणायचं मला माफ करा- असे थोडेच चालू शकते. इथे तर सर्व जमा होत राहते. कोणतेही चुकीचे उलट-सुलट कर्म करता, ते सर्व जमा होत राहते, ज्याचे चांगले वाईट फळ नक्की मिळते. क्षमा मिळू शकत नाही. जो जसे करतो तसेच फळ मिळते.

बाबा नेहमी समजावत राहतात, एक तर म्हणतात काम महाशत्रू आहे, हा तुम्हाला आदि- मध्य- अंत दुःख देतो. बाबांना म्हटले जाते पतित-पावन,पतित विकारांमध्ये जाणार्याला म्हटले जाते.बाबा समजावून सांगतात, इथून बाहेर गेल्यानंतर नियमानुसार राहू शकत नाही तर मग उंच पद प्राप्त करू शकत नाहीत. बाबा समाचार ऐकतात ना. इथे तर खूप चांगले-चांगले म्हणत राहतात, नंतर बाहेर गेल्यानंतर धारणा होत नाही. सतयुगामध्ये तर विकाराच्या गोष्टीच नाहीत. आता तर भारताचे हे हाल आहेत. तिथे तर मोठ्या मोठ्या महलामध्ये राहतात, खूप सुख आहे. बाबा मुलांजवळ सर्व विचारपूस करतात, बाबांना समाचार तर द्यायचा आहे ना. काहीजण तर खोटेही बोलतात. विचार करायला पाहिजे -आम्ही किती खोटे बोलतो? यांच्याशी तर खोटे बोलायला नाही पाहिजे. बाबा तर सत्य बनवणारा आहे. तिथे खोटे नसते. नाव निशाणही नसते. इथे परत खर्याचे नाव निशाण नाही.फरक तर राहतो ना. बाबा म्हणतात हे काट्यांचे जंगल आहे. परंतु स्वतःला काटा थोडेच समजतात. बाबा म्हणतात काम विकारांमध्ये जाणे हा सर्वात मोठा काटा आहे, यामुळेच तुम्ही दुःखी झाले आहात. बाबा आता तुम्हाला भरपूर सुख देण्यासाठी आले आहेत. तुम्ही जाणता खरोखर भरपूर सुख होते. सतयुगाला सुखधाम म्हटले जाते. तिथे आजार इ. नसतात. हॉस्पिटल, तुरुंग इ नसतात. सतयुगामध्ये दुःखाचे नावही नाही. त्रेता मध्ये दोन कला कमी झाल्यामुळे थोडेसे दुःख होते, तरीही त्याला स्वर्ग म्हटले जाते. बाबा म्हणतात तुम्ही मुलांनी भरपूर अतींद्रिय सुखामध्ये राहायला पाहिजे. शिकविणाऱ्या चीही आठवण करायची आहे, भगवान आमचा शिक्षक आहे, शिक्षकांची तर सर्वजण आठवण करतात. इथे राहणाऱ्या मुलांसाठी तर खूप सोपे आहे. इथे कोणतेही बंधन नाही.एकदम बंधनमुक्त आहेत. सुरुवातीला भट्टी बनली तर बंधन मुक्त झाले. चिंता फक्त सेवेची आहे.सेवा कशी वाढवायची? बाबा खूप समजावत राहतात. बाबांजवळ येतात, महिना-दीड महिना खूप उत्साह मध्ये राहतात नंतर थंड पडतात. सेवाकेंद्रावर येत नाहीत. अच्छा, मग काय करायला पाहिजे? लिहून विचारू शकता- का येत नाहीत? आम्हाला वाटते कदाचित मायने तुमच्यावर वार केला आहे किंवा कुणाच्या तरी संगा मध्ये फसले आहात किंवा काहीतरी विकर्म केले आहे, घसरले आहात. तरीही उठायला तर पाहिजे ना. पुरुषार्थ करायला पाहिजे. मन राखावे लागते.तुम्ही पत्र लिहू शकता. अनेकांना लाज वाटते तर मग गायब होतात. इथेही येऊन जातात, नंतर समाचार मिळतो घरी बसले.असे म्हणतात माझे मन उडाले आहे. काहीजण पत्रामध्ये लिहितात- तुमचे ज्ञान तर खूप चांगले आहे परंतु आम्ही पवित्र राहू शकत नाही,म्हणून सोडून दिले. माझ्या मध्ये एवढी ताकत नाही,फक्त लिहितात. विकार पहा कसे घसरवतात. येथे हातही उचलतात की आम्ही सुर्यवंशी नारायण बनू. हे ज्ञान आहे नरापासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनण्याचे. बाबा म्हणतात गुळ जाणे गुळाची पिशवी जाणे. ही बाबांची पिशवी( ब्रह्मा बाबा) आहे ना. हे चांगल्या प्रकारे विचारतात, यांच्याकडे समाचारही येतात, शिवबाबा तर म्हणतात मी शिकवणारा आहे, जे चांगल्याप्रकारे शिकतील ते नवाब बनतील.बाबा म्हणतात दृष्टीला खूप बदलायचे आहे. पावलो-पावली खबरदारी घ्यायची आहे. आठवणी मुळेच पावलो-पावली पदम आहेत.अनेक मुले नापास होतात. सेवा करणारे पंडे सुद्धा नापास होतात. तुम्ही जोपर्यंत यात्रेवर आहात, पवित्र राहतात. काहींना तर एवढी आवड असते यात्रेला जातानाही ही दारू इ. सोबत घेऊन जातात, लपवून ठेवतात. मोठ-मोठी माणसे त्या शिवाय राहू शकत नाहीत. आता ते तीर्थ काय कामाचे राहतील. लढणारे ही खूप दारू पितात. दारू पिऊन जातात आणि विमाना सहित जहाजावर पडतात.जहाजही नष्ट होते तर स्वतःही नष्ट होतात. आता तुम्हाला ज्ञान अमृत मिळत आहे. बाकी मुख्य गोष्ट आहे आठवणीची. ज्याद्वारे तुम्ही २१ जन्मासाठी सदैव निरोगी, सदैव धनवान बनता. बाबांनी सांगितले होते असेही लिहा 21 जन्मासाठी सदैव धनवान, निरोगी कसे बनु शकता ते येऊन समजावून घ्या. भारतवासी जाणतात खरोखर भारतामध्ये मोठे आयुष्य होते. स्वर्गामध्ये कधी कुणी आजारी पडत नाहीत. स्वर्गामध्ये देवतांचे आयुष्य दिडशे वर्षांचे होते,सोळाकला संपूर्ण होते.काहीजण म्हणतात,असे कसे होऊ शकते?त्यांना सांगा, तिथे पाच विकारच नसतात. तिथेही जर हे विकार असते तर, मग रामराज्य कसे असले असते. देवता जेव्हां वाम मार्गामध्ये जातात तेंव्हाचे चित्रही तुम्ही पाहिले आहेत. खूप खराब चित्र असतात. बाबा म्हणतात मी जे पाहिले आहे,ते सांगत आहे. शिव बाबा म्हणतात मी तर फक्त ज्ञान देतो. शिवबाबा ज्ञानाच्या गोष्टी ऐकवतात, ब्रह्मा आपल्या अनुभवाच्या गोष्टी सांगत राहतात. दोघेजण आहेत ना. ब्रह्मा पण आपला अनुभव सांगत राहतात. प्रत्येकाला आपले जीवन माहित असते. तुम्ही जाणता अर्धा कल्प पाप करत आलो आहे. तिथे मग कोणतेही पाप करणार नाही. इथे कोणीही पावन नाही.

तुम्ही मुले जाणता आता प्रत्यक्षात भागवत चालू आहे. भगवान बसून मुलांना ज्ञान सांगत आहेत. वास्तवामध्ये एकच गीता असायला हवी. बाकी शिव बाबांची जीवन कहाणी काय लिहिणार. हेही तुम्ही जाणत आहात. कोणतेही पुस्तक इ. काहीही राहणार नाही. कारण की विनाश समोर उभा आहे नंतर हे पुरुषार्थाचे ज्ञानही नष्ट होऊन जाईल. नंतर प्रारब्ध सुरू होते. ज्याप्रमाणे नाटकामध्ये जी भूमिका झाली, रीळ फिरत जाते पुन्हा नव्याने प्रारब्ध सुरू होईल. एवढ्या सर्व आत्म्या मध्ये आप-आपली भुमिका नाटकांमध्ये नोंदलेली आहे. या गोष्टी समजणाऱ्यांना समजतील. हेे बेहद चे नाटक आहे.तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला बेहदच्या नाटकाच्या आदि -मध्य-अंताचे रहस्य सांगत आहोत.ती आहे निराकारी दुनिया, ही आहे साकारी दुनिया. आम्ही तुम्हाला संपूर्ण रहस्य समजावत आहे. चक्र कशाप्रकारे फिरते, हे समजावल्यानंतर त्यांना खूप आनंद होईल.असे समजू नका की कोणीही ऐकत नाही. प्रजा खूप बनणार आहे. सेवा करत असताना, नाराज होऊ नका. तुम्ही समजावत रहा. व्यापाऱ्यांच्या जवळ ग्राहक तर खूप येतात,या आम्ही तुम्हाला बेहद चा सौदा देतो. भारतामध्ये या देवतांचे राज्य होते ते नंतर कुठे गेले? कशाप्रकारे 84 जन्म घेतले, आम्ही तुम्हाला समजावतो. भगवानुवाच, तुम्ही आपल्या जन्मांनां जाणत नाही. सेवा खूप करू शकता. जेंव्हा वेळ मिळतो,तेव्हा विश्वाचा इतिहास-भूगोल समजावून सांगा. बाबा शिवाय कोणी समजावू शकत नाही. या तुम्हाला रचता आणि रचनेचे रहस्य समजावतो.आता तुमचा हा शेवटचा जन्म आहे. भविष्यासाठी आत्ता कमाई करा. बाबा समजावतात ना- मुलांनो, तुम्ही अशी-अशी सेवा करा. तुमचे ग्राहक या गोष्टी ऐकून खूप खूश होतील. तुमच्या पुढे नतमस्तक होतील. धन्यवाद मानतील. व्यापारी लोक तर अजूनही जास्त सेवा करू शकतात. व्यापारी लोक धार्मिक कार्यासाठी पैसे बाजूला ठेवतात. तुम्ही तर मोठे धर्मात्मा आहात.बाबा येऊन तुमची झोळी अविनाशी ज्ञान रत्नाने भरतात. अनेक प्रकारचे विचार बाबा सांगतात, असे-असे करा,संदेश देत रहा,थकू नका. अनेकांचे कल्याण करा.आपल्या दृष्टीला स्वच्छ ठेवा.क्रोध पण करू नका.युक्तीने चालायचे आहे.बाबा अनेक प्रकारच्या युक्त्या समजावत राहतात. दुकानदारांसाठी तर खूप सहज आहे. तोही सौदा, हाही सौदा.ते म्हणतील हा तर खूप चांगला सौदा आहे.लगेच ग्राहकांची गर्दी होईल.असे म्हणतील अशा प्रकारचा सौदा देणाऱ्या महापुरुषाला तर खूप मदत करायला पाहिजे.त्यांना सांगा हा तुमचा शेवटचा जन्म आहे, तुम्ही नंतर मनुष्यापासून देवता बनू शकता. जे जेवढे करतील तेवढे मिळवतील. स्वतःला तपासून पहा- मी दृष्टी द्वारे वाईट काम तर नाही केले? स्त्रीकडे लक्ष तर नाही गेले? लाज वाटल्यानंतर सोडून देतील. विश्वाचे मालक बनणे कमी गोष्ट आहे का? जेवढा जुना भक्त असेल तो खूप खुश होईल.थोडी भक्ती केली असेल तर तो कमी खूश होईल. हा सुद्धा हिशोब आहे समजण्याचा. बुद्धी म्हणते आता आम्ही घरी जाऊ नंतर परत नव्या दुनियेमध्ये नवीन कपडा घालून भूमिका बजावू. हे शरीर सोडल्यानंतर आमच्या मुखामध्ये सोन्याचा चमचा असेल. अच्छा!

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. दृष्टीने कोणतेही वाईट काम करायचे नाही, प्रथम आपल्या दृष्टीला बदलायचे आहे. पावलो-पावली सावधानी ठेवून पद्मा ची कमाई जमा करायची आहे.

2. जेंव्हा पण वेळ भेटतो तेंव्हा बेहद चा सौदा करायचा आहे, सेवेमध्ये नाराज व्हायचे नाही, सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे,थकायचे नाही.

वरदान:-
प्रेमाच्या कुशीमध्ये आंतरिक सुख व सर्व शक्तींचा अनुभव करणारे यथार्थ पुरुषार्थी भव

जो यथार्थ पुरुषार्थी आहे तो कधी मेहनत किंवा थकल्या चा अनुभव करत नाही, सदैव प्रेमामध्ये मस्त राहतो. ते संकल्पा मध्येही ही समर्पित असल्यामुळे अनुभव करतात की आम्हाला बापदादा चालवत आहेत, मेहनतीच्या पायांनी नाही तर प्रेमाच्या कुशीमध्ये चालत आहोत, प्रेमाच्या कुशीमध्ये सर्व प्राप्तींची अनुभूती झाल्यामुळे ते चालत नाहीत परंतु सदैव खुशी मध्ये, आंतरिक सुखामध्ये, सर्व शक्तींच्या अनुभवामध्ये उडत राहतात.

बोधवाक्य:-
निश्चय रुपी पाया पक्का असेल तर श्रेष्ठ जीवनाचा अनुभव स्वतः होतो.