31.07.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,ही आश्चर्यकारक पाठशाळा आहे ज्यामध्ये तुम्ही शिकणारे आत्मे दिसत नाहीत,शिकवणारे पण दिसत नाहीत,ही आहे नवी गोष्ट"

प्रश्न:-

या पाठ शाळेमध्ये तुम्हाला मुख्य शिकवण कोणती भेटते, जी इतर कोणत्याही पाठ शाळेमध्ये दिली जात नाही?

उत्तर:-

येथे बाबा मुलांना शिकवतात- मुलांनो,आपल्या कर्म इंद्रियांना ताब्यात ठेवा, कधी कोणत्या बहिणीवर वाईट नजर जायला नको. तुम्ही आत्मा रूपामध्ये भाऊ-भाऊ आहात. आणि प्रजापिता ब्रह्मा ची मुलं भाऊ-बहिण आहात. तुमच्या मनामध्ये वाईट विचार कधीही यायला नको.अशाप्रकारची शिकवण या युनिव्हर्सिटी (विश्वविद्यालय) शिवाय कुठेही दिली जात नाही.

गीत:-

दूर देशाचा राहणारा....

ओम शांत:- न दूर देशामध्ये राहणारी आत्मा दिसू शकते न दूर देशामध्ये राहणारा परमात्मा दिसू शकतो. एकच परमात्मा आणि आत्मा आहे,जो या डोळ्यांनी दिसू शकत नाही. इतर सर्व वस्तू दिसू शकतात.हे समजते की आम्ही आत्मा आहोत. हे मनुष्य समजतात की आत्मा वेगळी आहे, शरीर वेगळे आहे.आत्मा दूर देशांमधून येऊन शरीरामध्ये प्रवेश करते.तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजत आहात. मी आत्मा कशी दूर देशांमधून येते.आत्माही दिसत नाही, शिकवणारे परमात्मा पिता पण दिसत नाहीत.असे तर कधी कोणत्या सत्संगामध्ये किंवा शास्त्रांमध्ये ऐकले नाही. न कधी ऐकले, न कधी पाहिले.आता तुम्ही जाणता आम्ही आत्मे दिसत नाही.आत्म्यालाच शिकायचे आहे.आत्माच सर्व काही करते. ही नवीन गोष्ट आहे ना, जे दुसरे कोणी समजावू शकत नाही. परमपिता परमात्मा जो ज्ञानाचा सागर आहे,तोही दिसत नाही.निराकार शिकवणार कसा? आत्माही शरीरामध्ये येते ना.अश्याच प्रकारे परमपिता परमात्मा बाबाही भाग्यशाली रथ किंवा भागीरथा मध्ये येतात. या रथालाही स्वतःची आत्मा आहे. तोही आपल्या आत्म्याला पाहू शकत नाही. बाबा या रथाच्या आधारे मुलांना येऊन शिकवतात. आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर घेते. आत्म्याला ओळखू शकतो,पाहू शकत नाही. तो बाबा पाहू शकत नाही,तो तुम्हाला शिकवत आहे. ही आहे बिल्कुल नवी गोष्ट. बाबा म्हणतात मी सुद्धा नाटकाच्या नियोजनानुसार आपल्या वेळेवरती येऊन शरीर धारण करतो. नाहीतर तुम्हा गोड-गोड मुलांना दुःखापासून कसे सोडवू. आता तुम्ही मुले जागे झाले आहात. दुनियेतील सर्व मनुष्य अज्ञान निद्रेमध्ये आहेत. जेंव्हा तुमच्या जवळ येतील तेंव्हाच ब्राह्मण बनतील. इतर सत्संगामध्ये कोणीही जाऊन बसू शकते. इथे असे कोणी येऊ शकत नाही कारण ही पाठशाळा आहे ना. विधी महाविद्यालया मध्ये तुम्ही जाऊन बसलात, तर तुम्हाला काहीही समजणार नाही. ही आहे बिलकुल नवी गोष्ट.शिकवणारा ही दिसत नाही.शिकणारे ही दिसत नाहीत.आत्मा मनामध्ये ऐकते आणि धारण करते. मनामध्ये निश्चय होत जातो. ही गोष्ट तर एकदम बरोबर आहे. परमात्मा आणि आत्मा दोघेही दिसत नाहीत.बुद्धीने समजले जाते-मी आत्मा आहे. काहीजण तर हे मानत नाहीत, म्हणतात प्रकृती आहे,नंतर त्याचे वर्णनही करत राहतात.अनेक मत आहेत ना. तुम्हा मुलांना या ज्ञानामध्ये व्यस्त राहायचे आहे.ज्या कर्मेंद्रिया धोका देतात,त्यांना वश करायचे आहे. मुख्य डोळे आहेत जे सर्वकाही पाहतात. डोळ्यांनी मुलाला पाहतात तर म्हणतात हा माझा मुलगा आहे. नाहीतर कसे समजणार! काही जन्मताच अंध असतात तर त्यांना समजावून सांगतात,हा तुझा भाऊ आहे,पाहू शकत नाही. बुद्धीने समजतात.खरेतर काही अंध सूरदास असतील तर ते ज्ञान चांगल्याप्रकारे घेऊ शकतात, कारण धोका देणारे डोळे त्यांना नाहीत.जरी दुसरे काही काम ते करू शकत नाहीत,परंतु ज्ञान चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. स्त्रीलाही पाहू शकत नाहीत. दुसऱ्यांना पाहिले तर बुद्धी जाते. तिला पकडू शकतात. दिसतच नसेल तर पकडणार कसे? तर बाबा म्हणतात कर्मेन्द्रियांना पक्के बनवा. गुन्हा अर्थात वाईट दृष्टीने कोणत्याही बहिणीकडे पाहायचे नाही. तुम्ही भाऊ-बहीण आहात ना. वाईट दृष्टीचा जराही विचार यायला नको.जरी आज-काल कलियुग आहे, भाऊ-बहीण ही खराब होतात परंतु कायद्यानुसार भाऊ-बहिणी मध्ये वाईट विचार येत नाहीत.

आम्ही एका बाबांची मुले आहोत. बाबा मत देत आहेत-तुम्ही ब्रह्मा कुमार-कुमारी आहात तर हे ज्ञान पक्के व्हायला पाहिजे की आम्ही भाऊ-बहीण आहोत. आम्ही आत्मे भगवानची मुले भाऊ-भाऊ आहोत नंतर शरीरामध्ये प्रजापिता ब्रह्मा द्वारा भाऊ-बहीण बनतो कारण दत्तक होतो ना.वाईट दृष्टी जाऊ शकत नाही. हे पक्के-पक्के समजा-मी आत्मा आहे. बाबा आम्हाला शिकवतात, मी आत्मा या शरीराद्वारे शिकते.या कर्मेंद्रिया आहेत. मी आत्मा यांच्यापासून वेगळी आहे, या कर्मेंद्रिया द्वारे मी कर्म करत आहे. मी कर्मेंद्रिया थोडीच आहे. मी यांच्यापासून वेगळी आत्मा आहे. हे शरीर घेऊन अभिनय करत आहे,तेही अलौकिक. दुसरे कोणी मनुष्य हा अभिनय करत नाहीत.तुम्ही करत आहात. घडी-घडी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. तेच आमचै शिक्षक,गुरू पण आहे.ते साकार पिता-शिक्षक-गुरु वेगळेवेगळे असतात. हे निराकारी एकच पिता-शिक्षक- गुरु आहेत. इथे मुलांना आता नवे शिक्षण मिळत आहे.पिता- शिक्षक-गुरु तिन्ही निराकार आहेत. आम्हीसुद्धा निराकार आत्मा शिकत आहोत तरच समजले जाईल आत्मा-परमात्मा वेगळे राहिले खूप काळ.येथेच भेट होते. जेंव्हा की बाबांना येऊन पावन बनवावे लागते. मूलवतन मध्ये आत्मे जाऊन भेटतील. तिथे तर कोणता खेळ नाही, ते तर आहे आपले घर. तिथे सर्व आत्मे राहतात. शेवटी सर्व आत्मे तिथे जातात. आत्मे जे अभिनय करण्यासाठी येतात,ते मधून परत जाऊ शकत नाहीत,शेवटपर्यंत अभिनय करायचा आहे. पुनर्जन्म घेत राहायचा आहे, कारण की सर्वजणांनी यावे. सतोप्रधान पासुन सतो-रजो-तमो मध्ये यावे. नंतर शेवटी नाटक पूर्ण होते तेंव्हा तमोप्रधान पासून सतो प्रधान बनायचे आहे. बाबा सर्व गोष्टी ठीक समजावत आहेत ना. ज्ञानमार्ग आहे सत्य. सत्यम शिवम सुंदरम म्हटले आहे ना. खरे बोलणारे एक पिताच आहेत. या संगमयुगावर पुरुषार्थी बनण्यासाठी हा एकच सत्याचा संग असतो. बाबा जेंव्हा येतात, मुलांना भेटतात,त्यालाच सत्संग असे म्हटले जाते.बाकी सर्व आहे कुसंग.गायनही आहे- सत्याचा संग तारतो कुसंग बुडवतो.... कुसंग आहे रावणाचा. बाबा तर म्हणतात मी तुम्हाला पलीकडे घेऊन जातो. मग तुम्हाला बुडवतो कोण? तमोप्रधान कसे बनलात,तेही सांगावे लागते. समोर माया दुश्मन आहे. शिवबाबा मित्र आहे. त्यांना पतींचा ही पती असे म्हटले जाते. ही महिमा काही रावणाची नाही. फक्त म्हणतात रावण आहे,बस दुसरे काही नाही. रावणाला का जाळतात? तिथेही तुम्ही खूप सेवा करू शकता.कोणत्याही मनुष्याला माहित नाही की रावण कोण आहे?केंव्हा येतो,का जाळतात?अंधश्रद्धा आहे ना. तुम्हा मुलांना समजावून सांगण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे ते अधिकाराने शास्त्र ऐकवतात ना. ऐकणारे ही चांगले दंग होतात.पैसे देत राहतात. संस्कृत शिकवा,गीता शिकवा. यासाठीही खूप पैसे देतात. बाबा समजावतात तुम्ही किती वेळ आणि पैसा वाया घालवला आहे. तुमच्याजवळ जे या ब्राह्मण कुळाचे असतील, तेच येत राहतील म्हणून तुम्ही प्रदर्शनी इ. करत असता. येथील फुल असेल तर नक्की येईल. हे झाड वृध्दी होत जाते. बाबांनी एक ब्रह्मा चे बीज लावले,त्याद्वारे ब्राह्मण कुळ तयार झाले.एका पासून किती वाढतात. सुरुवातीला घरामधील, नंतर मित्र संबंधी आजूबाजूचे यायला लागले. नंतर ऐकता-ऐकता किती यायला लागले. असे समजतात हा पण सत्संग आहे. परंतु यामध्ये आहे पवित्रतेची मेहनत, ज्यामुळे भांडण झाले. आताही होतात म्हणून निंदा करतात.असे म्हणतात पळवून नेत होते,पटरानी बनवत होते. पटरानी तर स्वर्गामध्ये बनणार आहात ना. नक्की इथे पवित्र बनवले असेल. तुम्ही सर्वांना सांगता- हे महाराजा महाराणी बनण्यासाठी ज्ञान आहे. नरापासून नारायण बनण्याची ही खरी-खरी कथा आहे.तुम्ही ही खऱ्या भगवंता कडून ऐकत आहात. या लक्ष्मी नारायणाला कोणी भगवान-भगवती म्हणू शकत नाही. परंतु पुजारी लोक जेवढे श्रीकृष्णाच्या चित्राला मानतात, तेवढे नारायणाच्या चित्राला मानत नाहीत. कृष्णाचे खूप चित्र खरेदी करतात. कृष्णाचा एवढा मान का आहे? कारण की लहान मुलगा आहे ना. महात्मा पेक्षाही मुलांना उच्च समजले जाते कारण की महात्मा तर घरदार इ. सर्व बनवून,नंतर सोडून जातात. काही बालब्रह्मचारी ही असतात.परंतु त्यांना काम क्रोध काय आहे हे माहीत असते. लहान मुलांना माहित नसते म्हणून त्यांना महात्म्या पेक्षाही उच्च समजले जाते म्हणून कृष्णाला जास्त मान देतात. कृष्णाला पाहून खूप खुश होतात. भारताचा लॉर्ड कृष्णा आहे. मुलीही श्रीकृष्णावर खूप प्रेम करतात. याच्यासारखा पती मिळावा,याच्यासारखा मुलगा मिळावा. कृष्णा मध्ये आकर्षण खूप आहे. सतोप्रधान आहे ना. बाबा सांगत राहतात, जेवढी आठवण कराल तेवढे तमोप्रधान पासून तमो रजो सतो मध्ये येत जाल आणि खुशी होईल. सुरुवातीला तुम्ही सतोप्रधान होते तर खूप खुश होते नंतर कला कमी होत जातात. तुम्ही जेवढी आठवण कराल तर सुखाची तेवढीच जाणीव होत जाईल आणि तुम्ही पुढे जात रहाल.तमो पासून रजो सतो मध्ये येत जाल तर ताकत,खुशी,धारणा वाढत जातील. यावेळी तुमची चढती कला आहे.शिख लोकही गातात, तुझ्यामुळे सर्वांचे भले होते. तुम्ही जाणता आता आमची आठवणी द्वारे चढती कला होत आहे.जेवढी आठवण कराल तेवढी उच्च चढती कला होईल. संपूर्ण बनायचे आहे ना.चंद्राची रेष राहते,नंतर कला वाढत- वाढत संपूर्ण बनतो.तुमचेही असेच आहे.चंद्राला ग्रहण लागते तेव्हा म्हणतात, दे दान तर सुटेल ग्रहण. तुम्ही पटकन पाच विकारांचे दान देऊ शकत नाही. डोळेही किती धोका देतात. समजतही नाही की आमची वाईट दृष्टी जात आहे. जेंव्हा कि आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी बनलो, तर भाऊ-बहीण झालो.नंतर जर इच्छा झाली यांना हात लावू,तर ते बंधुत्वाचे प्रेम निघून स्त्रीपणाचे वाईट प्रेम होते.काहींचे मन खात राहते आम्ही बाबांचे बनलो आहोत,तर आम्हाला कुणीही वाईट दृष्टीनी हात लावू शकत नाही. नंतर म्हणतात बाबा हे आम्हाला हात लावतात,आम्हाला चांगले वाटत नाही. नंतर बाबा मुरली चालवतात-असे केल्याने तुमची अवस्था ठीक राहणार नाही.भले मुरली खूप चांगली ऐकवतात, अनेकांना समजावतात परंतु अवस्था नाही. वाईट दृष्टी होते. एवढी खराब दुनिया आहे.मुले समजतात ध्येय खूप मोठे आहे. बाबांच्या आठवणीमध्ये समजदारी ने राहायचे आहे. आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आहोत. आमचा संबंध आत्मिक आहे,रक्ताचा संबंध नाही.तसे पाहिले तर सर्वजण रक्तापासून जन्माला येतात, सतयुगामध्ये ही रक्ताचा संबंध असतो परंतु ते शरीर योगबळा द्वारे मिळते. म्हणतात विकारा शिवाय मुले कशी जन्माला येतील! बाबा म्हणतात ती आहेच निर्विकारी दुनिया, तिथे विकारच नसतात. तिथेही जर विकारी झाले तर तिथेही रावण राज्य होईल. मग तिथे आणि इथे काय फरक राहिला! या समजण्याच्या गोष्टी आहेत. वाईट दृष्टी निघून जाण्यासाठी खूप मेहनत लागते. कॉलेजमध्ये मुले मुली एकत्र शिकतात,तर अनेकांची वाईट नजर जाते. मुलांना समजवायचे आहे आम्ही ईश्वराची मुले आहोत तर आपसा मध्ये भाऊ-बहीण झालो. मग वाईट दृष्टी का ठेवता. सर्वजण म्हणतात ही आम्ही ईश्वराची मुले आहोत.आत्मे तर आहेत निराकारी संतान. नंतर बाबा रचना करतील,तर नक्की साकारी ब्राह्मणांची रचना करतील. प्रजापिता ब्रह्मा तर साकार असेल ना.ते दत्तक घेणे आहे. मनुष्याच्या बुद्धी मध्ये हे बिलकुल येत नाही की प्रजापिता ब्रह्मा द्वारे सृष्टीची रचना कशाप्रकारे केली?

तुम्ही प्रजापिता ब्रह्मा ची मुले ब्रह्माकुमार-कुमारी भाऊ-बहीण आहात. दृष्टीवर खूप लक्ष द्यायला पाहिजे. यामध्ये अनेकांना अडचण येते. उच्चपद प्राप्त करायचे आहे तर मेहनत करावी लागेल. बाबा म्हणतात पवित्र बना. यांचेही काहीजण ऐकतात, काहीजण ऐकत नाहीत.खूप मेहनत आहे. मेहनत केल्याशिवाय उच्च कसे बनाल? मुलांना खबरदार राहायचे आहे. भाऊ-बहिणीचा अर्थच आहे एका पित्याची मुले, मग वाईट दृष्टी का जायला पाहिजे. मुले समजतात बाबा बरोबर सांगत आहेत- आमची वाईट नजर जाते. स्त्रीची ही जाते,तर पुरुषाची ही जाते. ध्येय आहे ना. ज्ञान तर खूप सांगतात परंतु वागण्यामध्ये ही पवित्रता असायला हवी म्हणून बाबा सांगतात सर्वात जास्त धोका देणारे हे डोळे आहेत. जीभ सुद्धा तेंव्हाच वळवळ करते जेंव्हा डोळ्यांनी चांगली वस्तु पाहतात,तेव्हाच इच्छा होते हे खायला पाहिजे,म्हणून कर्मेंद्रियांवर विजय प्राप्त करायचा आहे. अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. पवित्र राहायचे आहे. वाईट दृष्टी,वाईट विचार समाप्त करण्यासाठी स्वतःला या कर्मेंद्रिया पासून वेगळी आत्मा समजायचे आहे.
  2. आपसामध्ये फक्त आत्मिक संबंध ठेवायचे आहेत.आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाया घालवायचा नाही.संग दोषापासून स्वतःचा खूप-खूप सांभाळ करायचा आहे.

वरदान:-

ब्रह्म-मुहूर्ताच्या वेळेला वरदान घेणारे आणि दान देणारे बाप समान वरदानी महादानी भव

ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेला विशेष ब्रह्मलोक निवासी बाबा ज्ञान सूर्याचा प्रकाश आणि शक्तींची किरणे मुलांना वरदान रुपामध्ये देतात.त्याच सोबत ब्रह्मा बाबा भाग्यविधाताच्या रूपामध्ये भाग्य रुपी अमृत वाटतात,तर फक्त बुद्धी रुपी कलश अमृत धारण करण्यास योग्य असायला हवा. कोणत्याही प्रकारचे विघ्न किंवा अडथळा यायला नको,तर संपूर्ण दिवसभरासाठी श्रेष्ठ स्थिती किंवा कर्माचा मुहूर्त काढू शकता कारण की अमृत वेळेचे वातावरणच वृत्तीला बदलणारे असते म्हणून त्यावेळी वरदान घेत असताना दान द्या,अर्थात वरदानी आणि महादानी बना.

बोधवाक्य:-

क्रोधी चे काम आहे क्रोध करणे आणि तुमचे काम आहे प्रेम देणे.

||| ओम शांती |||

ओम शांती