01-02-2019-Marathi

लाडक्या मुलांनो, तुमचे मोहपाश आता तुटायला हवेत कारण या साऱ्या दुनियेचा आता विनाश होणार आहे. या जुन्या दुनियेतील कुठल्याही गोष्टीत आता रुचि ठेवू नका.

Q- ज्या मुलांना ईश्वरीय नशा चढलेली असते त्यांना काय बिरुद द्यावे? कोणत्या मुलांना अशी नशा चढते?

A- आध्यात्मिक नशेत राहाणाऱ्या मुलांना म्हटले जाते-- 'मस्त कलंदर'. तेच मुकुटधारी बनतात, त्यांनाच राज्यपदाची नशा राहाते. त्यांच्या बुद्धित राहाते की आता आम्ही फकीर असलो तरी अमीर बनणार आहोत. रुद्रमालेत गुंफले जाणाऱ्यांना कैफ चढतो. ज्यांना पक्का निश्चय असतो की आता आपल्याला घरी ( परमधामात ) जायचे आहे आणि लवकरच नवीन दुनियेत (सत्ययुगात ) यायचे आहे, त्यांनाच नशा राहाते.

D- १) सदैव याच नशेत राहायचे आहे की आपण ज्ञानसागराचे वारसदार ( मास्टर ज्ञानसागर ) आहोत, स्वतःमध्ये शक्ती भरून जणू चुंबक बनायचे आहे, आध्यात्मिक पैगंबर व्हायचे आहे. २) सद्गुरू अशा बाबांचे नाव बदनाम होईल असे कोणतेही कर्म करायचे नाही, काहीही झाले तरी कधीही रडायचे नाही.

V- ज्ञानाबरोबरच अंगी असलेले गुणही प्रगट करून सर्वगुणसंपन्न असे गुणमूर्त बना. --------------प्रत्येकामध्ये ज्ञान पुष्कळ आहे परंतु आता आवश्यकता आहे गुण प्रगट करण्याची म्हणून विशेष कर्म करून दाखवून गुणदाता बना. संकल्प करा की मला सदैव गुणमूर्त बनून सर्वांना गुणमूर्त बनविण्याच्या कर्तव्यात तत्पर राहायचे आहे. यामुळे व्यर्थ बघायला, व्यर्थ ऐकायला किंवा व्यर्थ करायला फुरसतच मिळणार नाही. यामुळे स्वतःमधील व इतरांमधील कमजोरी सहज समाप्त होतील. यात प्रत्येकाने स्वतःला निमित्त प्रथम क्रमांकाचे समजून सर्वगुणसंपन्न होण्याचे व इतरांनाही तसे करण्याचे उदाहरणमूर्त व्हावे.

S- विचारांद्वारे योगदान, वाणीद्वारे ज्ञानदान आणि वर्तनाद्वारे गुणदान करा.