02-02-2019-Marathi

लाडक्या मुलांनो, विदेही बनून बाबांची आठवण करा, स्वधर्मात ( शांतिच्या ) टिकून राहा म्हणजे ताकद मिळेल, खुशी व आरोग्य लाभेल, बॕटरी भरत राहील.

Q- वैश्विक नाटकातील ( ड्रामातील ) कोणती नोंद जाणत असल्याने तुम्ही मुले सदैव स्थिर राहाता?

A- तुम्ही जाणता की हे जे बाँब्स बनविलेले आहेत ते सोडले जाणारच आहेत.विनाश झाल्यावरच आपली नवीन दुनिया येईल. ही ड्रामातील अनादि नोंद आहे, मरायचे तर सर्वांनाच आहे. तुम्हाला खुशी आहे की आपण हे जीर्ण शरीर सोडून राजघराण्यात जन्म घेऊ. तुम्ही ड्रामाकडे साक्षी होऊन बघता, यात घबराटीची वा रडण्याची जरूरी नाही.

D- १) ज्ञानयोगाच्या कैफात राहायचे आहे, अंतःकरण स्वच्छ ठेवायचे आहे. व्यर्थ चिंतनात वेळ दवडायचा नाही.२) आपण सर्व आत्मे आपसात भाऊ-भाऊ आहोत, आता सर्वांना घरी परतायचे आहे-- हा अभ्यास पक्का करायचा आहे. विदेही बनून शांतिच्या स्वधर्मात स्थित राहून बाबांची आठवण करायची आहे.

V- अकल्याणाचे विचार समाप्त करून अपकारीवरही उपकार करणारे ज्ञानी आत्मा बना. ----------------कुणी रोज तुमची निंदा केली, अकल्याण केले, शिवीगाळ केली तरीही त्याच्याविषयी मनात घृणाभाव यायला नको कारण अपकारीवरही उपकार-- हे ज्ञानी आत्म्याचे कर्तव्य आहे. तुम्हा मुलांनी परमपित्याला ६३ जन्म शिवीगाळ केलीत तरीही त्याने कल्याणकारी दृष्टिच ठेवली तशीच तुम्हीसुद्धा ठेवा.ज्ञानी आत्मा याचा अर्थच आहे की सर्वांप्रति कल्याणाची भावना, अकल्याणाचा विचारही नाही.

S- 'मनमनाभव ' च्या स्थितीत स्थित राहा म्हणजे इतरांच्या मनातील भाव जाणू शकाल.