03-02-2019-Marathi

पद्मापद्म भाग्यवंताची लक्षणे

V- देवदूत स्वरूपाच्या स्मृतिद्वारे बाबांच्या छत्रछायेचा अनुभव करणारे विघ्नजीत बना. --------------अमृतवेळेला उठल्याबरोबर स्मृतित आणा की मी देवदूत आहे. ब्रह्माबाबांना हीच मनपसंत भेट दिलीत तर रोज अमृतवेळेला बापदादा प्रेमाने तुम्हाला बाहुपाशात घेतील आणि त्याने तुम्ही अनुभवाल की बाबांच्या बाहुंमध्ये तुम्ही अतीन्द्रिय सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत आहात. जे देवदूत स्वरूपाच्या स्मृतित राहातील त्यांच्यापुढे कोणतीही परिस्थिती वा विघ्न आले तरी बाबा त्यांची छत्रछाया बनतील. तेव्हा आता बाबांची छत्रछाया व प्रेम यांचा अनुभव घेत विघ्नजीत बना.

S- सुखस्वरूप आत्मा स्वस्थितीच्या आधारे परिस्थितीवर सहजपणे विजय मिळवितो.