04-01-2019-Marathi

लाडक्या मुलांनो, अंतर्मुखी होऊन आपल्या कल्याणाचाच विचार करा, हिंडताफिरतानाही एकांतात विचारसागरमंथन करा, स्वतःलाच विचारत राहा की मी सदैव हर्षित राहतो का?

Q- दयाळू अशा बाबांच्या मुलांनी स्वतःवर कोणती दया दाखवायला हवी?

A- बाबांना अनुकंपा वाटते की माझी मुले काट्यापासून फूल बनावीत म्हणून बाबा मुलांना फुलासारखे बनविण्याची मेहनत घेतात. मुलांनाही अशीच अनुकंपा स्वतःबद्दल वाटायला हवी की आम्ही बाबांना बोलावतो-- " हे पतितपावना ये, आम्हाला फुलासारखे बनव " , मग आता ते आले आहेत तर आम्ही फूल बनणार नाही का? दयाभाव निर्माण झाला तर मुले देहीअभिमानी राहतील आणि बाबांचे ज्ञान धारण करतील.

D- १) सदैव स्मृतित ठेवायचे आहे की आपण असीम परमपित्याचे विद्यार्थी आहोत. परमात्मा स्वतः आपल्याला शिकवीत आहे म्हणून उत्तम रीतीने शिकूनबाबांचे नाव मोठे करायचे आहे. आपले वर्तन उत्तम ठेवायचे आहे. २) बाबांसारखे दयाळू बनून काट्यापासून फूल बनायचे व तसेच इतरांनाही बनवायचे आहे. अंतर्मुखी बनून आपल्या व इतरांच्या कल्याणाचेच चिंतन करायचे आहे.

V- विकाररूपी सर्पांना आपल्या गळ्यातील हार बनविणारे शंकरासारखे तपस्वीमूर्त बना. --------------जे पाच विकार लोकांसाठी विषारी सापाप्रमाणे असतात ते साप तुम्हा योगी वा प्रयोगी आत्म्याच्या गळ्यातील जणू हार बनतात. तुम्हा ब्राह्मणांच्या व ब्रह्माबाबांच्या अशरीरी तपस्वी शंकर स्वरूपाच्या या स्मृतिचिन्हाची आजही पूजा होते. दुसरे म्हणजे हे सर्प खुशीने नाचण्याचे स्टेज बनतात. विकारांना ताब्यात ठेवल्याची ही स्थिती स्टेजच्या प्रतीकाने दर्शविली जाते. जेव्हा विकारांवर अशा प्रकारे विजय मिळविता येईल तेव्हा म्हटले जाईल तपस्वीमूर्त प्रयोगी आत्मा.

S- जे सुस्वभावी व शांतचित्त असतात त्यांच्यावर क्रोधाचे भूत वार करू शकत नाही.