05-02-2019-Marathi

लाडक्या मुलांनो, बाबा आले आहेत काट्यांना फूल बनविण्यासाठी. बाबांचे प्रेम काट्यांवरही आहे आणि फुलांवरही आहे. बाबा काट्यांनाच फूल बनविण्याची मेहनत करतात.

Q- जी मुले ज्ञान धारण करतात त्यांची लक्षणे कोणती?

A- ज्ञान धारण केलेली मुले कमाल करून दाखवितात. ती स्वतःचे व इतरांचे कल्याण केल्याशिवाय राहू शकत नाहीत. निश्चय पक्का झाला की ती मुले नष्टमोहा बनून आध्यात्मिक सेवा करू लागतात. त्यांची अवस्था एकरस व स्थिर राहते. ती कोणतेच काम बेसावधपणे करीत नाहीत, कुणाला दुःख देत नाहीत तर अवगुणरूपी काटे काढून टाकत राहतात.

D- १) या विनाशी शरीरात मन गुंतवायचे नाही. मोहजीत बनायचे आहे. प्रतिज्ञा करायची आहे की कुणीही शरीराचा त्याग केला तरी आम्ही कधीच रडणार नाही. २) बाबांसारखे मधुर बनायचे आहे. सर्वांना सुख द्यायचे आहे, कुणालाही दुःख द्यायचे नाही. काट्यांना फूल बनविण्याची ( विकारी आत्म्यांना ज्ञान देऊन निर्विकारी बनण्यास मदत २) बाबांसारखे मधुर बनायचे आहे. सर्वांना सुख द्यायचे आहे, कुणालाही दुःख द्यायचे नाही. काट्यांना फूल बनविण्याची ( विकारी आत्म्यांना ज्ञान देऊन निर्विकारी बनण्यास मदत करण्याची ) सेवा करायची आहे. आपले व इतरांचे कल्याण करायचे आहे.

V- देहभानापासून अलिप्त राहून परमात्म-प्रेमाचा अनुभव घेणारे कमल-आसनधारी (दुनियेत राहूनही प्रभावमुक्त) बना. ----------------कमल-आसन म्हणजे ब्राह्मण आत्म्यांच्या श्रेष्ठ स्थितीची निशाणी आहे. असे कमल-आसनधारी आत्मे देहभानापासून आपसूकच दूर असतात, शरीराचे भान त्यांना आकर्षित करत नाही. जसे ब्रह्माबाबा हिंडताफिरतानाही सदैव देवदूत वा देवता स्वरूपाच्या स्मृतित राहिले तशी स्वाभाविक देहीअभिमानी स्थिती सदाकाल राहणे याला म्हणतात देहभानापासून अलिप्त. असेच आत्मे परमात्मप्रिय बनतात.

S- आपल्यातील सर्व गुण वा विशेषता प्रभु-प्रसाद असतात, त्यांना ' माझे ' मानणे हा देहअभिमानच आहे.