06-02-2019-Marathi

लाडक्या मुलांनो, आता अशरीरी बनून घरी जायचे आहे म्हणून कुणाशीही संपर्क ठेवताना ' या आत्म्याशी माझे भावा-भावाचे नाते आहे ' हे लक्षात ठेवा. देहीअभिमानी बनण्याची मेहनत करा.

Q- भविष्यकाळात राज्यपदाचा तिलक प्राप्त करण्याचा आधार कोणता बरे?

A- अध्ययन. प्रत्येकाला अध्ययन करूनच राज्यपदाचा तिलक घ्यायचा आहे. बाबांचे आहे शिकविण्याचे कर्तव्य, यात आशीर्वादाचा संबंध नाही. पूर्ण निश्चय असेल तर श्रीमतावर चालत राहा, हलगर्जीपणा करू नका. जर आपसातील मतभेदामुळे अध्ययन सोडलेत तर नापास व्हाल म्हणून बाबा म्हणतात -- लेकरांनो, स्वतःवर दया करा, आशीर्वाद मागत फिरू नका, अध्ययनाकडे लक्ष द्या.

D- १) प्रवृत्तीमार्गात राहून आपसात चढाओढ (रेस) करायची आहे परंतु काही कारणाने जोडीदार मागे पडला तर त्याच्यासाठी खोळंबून राहायचे नाही. राजतिलक घेण्यासाठी स्वतःला लायक बनवायचे आहे.२) मोठ्या धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करायची आहे कारण शिवबाबा जी ज्ञानरत्ने देतात त्यानेच तुम्ही धनवान बनणार आहात. तुमची सर्व कोठारेही संपन्न होतील.

V- सर्व पदार्थांच्या आसक्तिपासून अलिप्त, अनासक्त, प्रकृतिजीत बना. ---------------जर कुठलाही पदार्थ कर्मेंद्रियांना विचलित करीत असेल म्हणजेच त्याविषयी आसक्ती निर्माण होत असेल तर त्यापासून अलिप्त होता येणार नाही. इच्छा हे आसक्तिचेच रूप आहे. अनेकजण म्हणतात की इच्छा नाही पण आवडते ( अच्छा लगता है ) -- ही देखील सूक्ष्म आसक्तीच आहे. बारकाईने आत्मपरीक्षण करा की हे पदार्थ अर्थात अल्पकालीन सुखसाधने मला आकर्षित करतात का? संसारातील या सर्व साधनांपासून अनासक्त म्हणजेच अलिप्त बनाल तेव्हा प्रकृतिजीत बनाल.

S- " माझे माझे " करण्याच्या भानगडीत न पडता अमर्याद विश्वाचा विचार करा म्हणजे म्हटले जाईल विश्वकल्याणकारी.