07-02-2019-Marathi

लाडक्या मुलांनो, पावन बनण्यासाठी पहिला शक्तिशाली मार्ग आहे बाबांची आठवण करणे आणि दुसरा मार्ग आहे शिक्षा भोगणे. तुम्हाला आता बाबांच्या आठवणीच्या बळावर पावन बनून श्रेष्ठ पद प्राप्त करायचे आहे.

Q- बाबा आहेत आत्मिक शल्यविशारद (सर्जन), ते तुम्हाला कोणता धीर देतात?

A- जसा दुनियेतील सर्जन रोग्याला धीर देतो की तुझा आजार आता ठीक होईल, तसाच आत्मिक सर्जनही तुम्हा मुलांना धीर देतो -- " मुलांनो, मायेच्या आजाराला घाबरू नका. मी दिलेल्या औषधाने प्रथम आतील आजार उफाळून येतील, अज्ञानकाळात मनात न आलेले विचार आता मनाला भंडावून सोडतील परंतु तुम्हाला सर्वकाही सहन करायचे आहे. थोडी मेहनत कराल तर सुखाचे दिवस आलेच म्हणून समजा. "

D- १) स्वतःमध्ये दैवी गुण धारण करायचे आहेत. आत दडलेले वाईट संस्कार, क्रोध वगैरे सवयी हे सर्व सोडायचे आहे. विकर्माजीत बनायचे असल्याने आता कोणतेच विकर्म करायचे नाही. २) हिऱ्याप्रमाणे श्रेष्ठ बनण्यासाठी ज्ञानरूपी अमृत प्यायचे व पाजायचे आहे. कामविकारावर संपूर्ण विजय मिळवायचा आहे. स्वतःला सतोप्रधान बनवायचे आहे. योगबलाने सर्व जुने हिशेब चुकते करायचे आहेत.

V- सहजयोगाच्या साधनेद्वारा साधनांवर विजय प्राप्त करणारे प्रयोगी आत्मा बना. ----------------साधने उपलब्ध असताना, त्यांचा वापर करताना योगयुक्त स्थिती डळमळीत होऊ देऊ नये. योगी बनूनच साधनांचा वापर करणे ही असते अलिप्तता. साधनांचा वापर निमित्तमात्र व अनासक्त होऊन करा. कसलीही इच्छा मनात असेल तर ती महान बनण्यात अडसर ठरेल. मेहनत करण्यातच वेळ खर्च होईल. तुम्ही साधनेत राहण्याचा प्रयत्न कराल पण साधने तुम्हाला आकर्षित करतील. यासाठी प्रयोगी आत्मा बनून साधनेद्वारा साधनांवर म्हणजेच प्रकृतीवर विजय मिळवा.

S- स्वतः संतुष्ट राहून, इतर सर्वांनाही संतुष्ट करणे यालाच म्हणतात संतुष्टमणी बनणे.