01-02-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
15.12.2008 ओम शान्ति
मधुबन
“एक राज्य, एक धर्म,
लॉ आणि ऑर्डरच्या स्थापनेच्या वेळी स्वतःमध्ये परिवर्तन करून विश्व परिवर्तक बना”
आज बापदादा आपल्या
चोहो बाजूच्या राजदुलारे (अत्यंत प्रिय) मुलांना बघत आहेत. हे परमात्म प्रेम
कोटींमध्ये कोणाला प्राप्त होते. परमात्म प्रेमामध्ये बापदादांनी प्रत्येक मुलाला
तीन तख्ताचे मालक बनवले आहे. पहिले स्वराज्य अधिकाराचे भृकुटीचे तख्त, दुसरे
बापदादांचे दिल-तख्त आणि तिसरे आहे - विश्वाच्या राज्य अधिकाराचे तख्त, ही तीनही
तख्त बाबांनी आपल्या स्नेही लाडक्या मुलांना दिली आहेत. तर ही तीनही तख्त सदैव
स्मृतीमध्ये राहिल्यामुळे प्रत्येक मुलाला रुहानी नशा राहतो. तर सर्व मुले
बाबांद्वारे प्राप्त वारशाला पाहून आनंदात राहता ना! मनामध्ये आपोआपच हे गीत वाजतच
राहते - ‘वाह बाबा वाह!’ आणि ‘वाह मेरा भाग्य वाह!’ जे स्वप्नामध्ये देखील नव्हते
ते प्रॅक्टिकल जीवनामध्ये मिळाले. तख्तासोबतच बापदादांनी या संगमावर डबल ताज द्वारा
उडत्या कलेचा अनुभवी देखील बनवले आहे. तर बापदादा चोहो बाजूच्या मुलांचे हे डबल
ताजधारी स्वरूप बघत आहेत - एक प्युरिटीच्या रॉयल्टीचा ताज आहे, दुसरा सेवेच्या
जबाबदारीचा ताज आहे.
बापदादांनी आज चोहो
बाजूच्या मुलांच्या पुरुषार्थाच्या गतीला चेक केले कारण समयाच्या गतीला तर तुम्ही
सगळेच बघत आहात आणि जाणून आहात. तर बापदादा बघत होते की, जे प्रत्येकाला बाबांद्वारे
जो राज्य-भाग्याचा वारसा मिळाला आहे, आपल्या राज्याचा, भविष्य प्राप्तिचा, तर
भविष्यामध्ये जे तुम्हा सर्वांचे संस्कार नॅचरल आणि नेचर (स्वाभाविक) असतील ते
आत्तापासून दीर्घकाळाचे संस्कार अनुभव झाले पाहिजेत कारण तुम्हा सर्वांच्या नवीन
संस्कारांद्वारेच हा नवीन संसार बनत आहे. तर नवीन संसाराच्या ज्या विशेषता आहेत,
त्याला देखील अनुभव तर करत आहात ना. आपल्या राज्यामध्ये काय असेल, नशा आहे ना! मन
म्हणते ना की, आमचे राज्य, आमचा नवीन संसार आला की आला. तर बापदादा बघत होते की
नवीन संसाराच्या ज्या विशेषता आहेत त्या मुलांच्या पुरुषार्थी जीवनामध्ये कितपत
इमर्ज आहेत! जाणता तर आहात की नवीन संस्कार आणि नवीन संसाराची विशेषता काय असेल.
सर्वांच्या बुद्धीमध्ये नवीन संसाराच्या विशेषता इमर्ज आहेत ना! जाणता ना! गाता
सुद्धा, जाणता सुद्धा, पहिली विशेषता, चेक करा एक-एक विशेषता माझ्यामध्ये कुठपर्यंत
इमर्ज आहे? मुख्य विशेषता आहे - एक राज्य, तर जसे तिथे एक राज्य स्वतःच असते, दुसरे
कोणते राज्य नाही, असे आपल्या संगमातील जीवनामध्ये बघा की आपल्या जीवनामध्ये देखील
एक राज्य आहे? की कधी-कधी दुसरे राज्य देखील असते? जर चालता-चालता स्व च्या
राज्यासोबतच मायेचे देखील राज्य चालत असेल तर एक राज्याचे संस्कार असतील काय? एका
राज्यामधून दुसरे देखील राज्य तर चालत नाही ना? परमात्म्याच्या श्रीमताचे राज्य आहे
की कधी-कधी मायेचा देखील दबाव आहे? मनामध्ये मायेचे राज्य तर नसते ना? तर हे चेक करा.
या गोष्टींद्वारे आपल्या चार्टला चेक करा. आता संगमावर एका परमात्म्याचे राज्य आहे
की मायेचा देखील दबाव असतो? चेक केलेत? आत्ता लगेच चेक करा, आपला चार्ट तर बघत असता
ना. तर जर अजूनपर्यंत सुद्धा दोन राज्ये असतील तर एका राज्याचे अधिकारी कसे बनणार?
श्रीमतासोबत मायेचे मत देखील मिक्स होते काय? असेच एक धर्म, एक राज्य देखील असेल तर
एक धर्म देखील असेल. धर्म अर्थात धारणा. तर तुमची विशेष धारणा कोणती आहे? पवित्रतेची
धारणा. तर चेक करा - सदैव मन, वचन, कर्म, संबंध-संपर्कामध्ये संपूर्ण आणि सदैव
पवित्रतेची नेचर नॅचरल बनली आहे (पवित्रतेचा स्वभाव नैसर्गिक बनला आहे)? जसा तिथे
आपल्या राज्यामध्ये पवित्रतेचा स्वधर्म स्वतःच असेल, तशीच यावेळी पवित्रतेची धारणा
नॅचरल आणि नेचर बनली आहे? कारण तुम्ही जाणता की, तुमचे अनादि स्वरूप आणि आदि स्वरूप
पवित्रता आहे. तर चेक करा की एक धर्म अर्थात पवित्रता नॅचरल आहे? जे नेचर असते ते
(जो स्वभाव असतो तो) इच्छा नसताना देखील काम करतोच; कारण बरीच मुले जेव्हा रुहरिहान
करतात तेव्हा काय म्हणतात? खूप गोड-गोड गोष्टी करतात, म्हणतात - ‘इच्छा नसते, परंतु
कधी मनसा मध्ये, कधी वाचेमध्ये काही ना काही अपवित्रतेचा अंश इमर्ज होतो. खूप
जन्मांचे संस्कार आहेत ना त्यामुळे होऊन जाते’. तर एक धर्म याचा अर्थ आहे पवित्रतेची
धारणा नेचर आणि नॅचरल असावी (स्वाभाविक आणि नैसर्गिक असावी). भले वाणीमध्ये देखील
आवेश येतो, म्हणतात क्रोध नव्हता, थोडासा आवेश आला. तर आवेश काय आहे? क्रोधाचाच तर
बच्चा आहे. तर एका धर्माचे संस्कार नॅचरल केव्हा बनणार? तर चेक करा परंतु चेक
करण्यासोबतच बाबांकडून मिळालेल्या शक्तींच्या द्वारे चेंज करा. तरीही आता बापदादा
अगोदरच लक्ष वेधून घेत आहेत की, तरी सुद्धा अजूनही चेक करून चेंज करण्याचा तीव्र
पुरुषार्थ कराल तर मार्जिन आहे परंतु काही काळानंतर अचानक टू लेटचा बोर्ड लागणारच
आहे. मग म्हणू नका की, बाबांनी तर सांगितलेच नाही; त्यामुळे आता पुरुषार्थाची वेळ
तर गेली परंतु तीव्र पुरुषार्थाची वेळ अजूनही आहे; तर चेक करा परंतु फक्त चेक करायचे
नाही, सोबतच चेंज सुद्धा करा. खूप जण चेक करतात परंतु चेंज करण्याची शक्ती नाही आहे.
चेक आणि चेंज दोन्ही एकत्र झाले पाहिजे; कारण तुम्हा सर्वांचा स्वमान अथवा तुम्हा
सर्वांची महिमा काय आहे? टायटल कोणते आहे? मास्टर सर्वशक्तिवान आहे. मास्टर
सर्वशक्तिवान आहे की शक्तिवान आहे? जे म्हणतात मास्टर सर्वशक्तिवान आहे, त्यांनी
हात वर करा. (सर्वांनी हात वर केला आहे) अच्छा. तर मास्टर सर्वशक्तिवान आहात!
मुबारक असो, परंतु मास्टर सर्वशक्तिवान आणि चेंज करू शकला नाहीत तर काय म्हटले जाईल?
आपल्याच संस्काराला, स्वभावाला परिवर्तन करण्याची इच्छा असून देखील करू शकत नसाल तर
काय म्हणणार? स्वतःला विचारा - मी मास्टर शक्तिवान आहे की मास्टर सर्वशक्तिवान आहे?
मास्टर सर्वशक्तिवानने संकल्प केला की, करायचेच आहे आणि झालेलेच आहे. ‘होईल, बघूया…’
असे होत नाही. तर आता समयानुसार असा रिझल्ट असायला हवा की, जो विचार केला, तर
संकल्प आणि स्वरूप बनणे एकत्र एकाच वेळी व्हावे.
आता नवीन वर्ष,
अव्यक्त वर्ष येणारच आहे. अव्यक्त पालनेला ४० वर्षे होत आहेत. तर अव्यक्ति पालना आणि
व्यक्त रूपाच्या पालनेला ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर मग दोनही पित्यांच्या पालनेचे
रिटर्न बापदादांना देणार नाही काय! विचार करा - पालना काय आणि प्रॅक्टिकल काय आहे?
बापदादांनी बघितले आहे की, अजूनही निष्काळजीपणा आणि रॉयल आळस आहे. रॉयल आळस आहे -
‘होऊन जाईल, बनूनच जाऊ, पोहोचणारच आहोत’ आणि निष्काळजीपणा आहे - ‘करत तर आहोत’, तर
तर… ‘हे तर होणारच आहे, हे तर करायचेच आहे’, म्हणणे आणि करण्यामध्ये अंतर होऊन जाते.
बापदादा एक दृश्य पाहून मिश्किलपणे हसत असतात की, मुले काय म्हणत असतात? ‘असे
व्हायला हवे ना, हे करा ना, तर मग मी खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो’.
दुसऱ्याला बदलायची वृत्ती असते परंतु स्व परिवर्तनाची वृत्ती काही ठिकाणी कमी असते.
आता दुसऱ्याला बघणे, ही वृत्ती चेंज करा. जर बघायचेच असेल तर विशेषता बघा; ‘असे तर
होतेच, असे तर चालतेच, हे देखील तर करतात…’ ही भावना आता कमी करा. स्वतःकडे बघा,
बाबांना समोर ठेवा, बाकीचे जे कोणीही आहेत, भले महारथी आहेत, भले मधले आहेत,
आपल्यातील कोणत्या ना कोणत्या कमतरतेला पुरुषार्थाद्वारे परिवर्तन करतच आहेत;
म्हणूनच सी फादर, सी डबल फादर, ब्रह्मा बाबांना बघा, शिवबाबांना बघा. जेव्हा बाबांनी
तुम्हाला आपल्या दिलतख्तावर बसवले आहे आणि तुम्ही देखील आपल्या दिलतख्तावर बाबांना
बसवले आहे; तुमचे स्लोगन देखील आहे - सी फादर. सी सिस्टर, सी ब्रदर हे स्लोगनच नाही
आहे. काही ना काही कमतरता सर्वांमध्ये अजून राहिलेली आहे परंतु जर दुसऱ्याला बघायचे
असेल तर विशेषता बघा, ते आपल्यामधून जी कमतरता काढत आहेत, त्याला बघू नका. दुसरी
गोष्ट - तर आपल्या राज्यामध्ये, लक्षात आहे ना आपले राज्य! काल तर होते आणि उद्या
पुन्हा असणार आहे. तुमच्या बुद्धीमध्ये, दृष्टीसमोर आपले राज्य स्पष्ट आले ना. किती
वेळा राज्य केले आहे? मोजदाद केली आहे काय? अनेक वेळा राज्य केले आहे. म्हणताच क्षणी
समोर येते. आपले राज्य अधिकारी रूप आणि श्रेष्ठ राज्य, तर जसे आपल्या राज्यामध्ये
लॉ आणि ऑर्डर (कायदा आणि सुव्यवस्था) स्वतःच चालतात. सर्व नॉलेजफुल संस्कारवाले
आहेत, जाणता लॉ काय आहे, ऑर्डर काय आहे, असे आता आपल्या जीवनामध्ये बघा, बाबांच्या
ऑर्डरवर चालता का कधी मायेची देखील ऑर्डर चालते? कधी परमत, मनमत, श्रीमता शिवाय तर
चालत नाही ना? आणि लॉ काय आहे? लॉ आहे - बेफिकीर बादशहा, कोणतीही चिंता नाही कारण
सर्व प्राप्ती आहेत. त्याचप्रमाणे हेही चेक करा - संगमातील श्रेष्ठ जन्मामध्ये
देखील सर्व प्राप्ती आहेत? ज्या बाबांनी दिलेल्या आहेत, हा भगवंताचा जसा प्रसाद असतो
ना, तर प्रसादाचे किती महत्व ठेवतात. तर बाबांच्या ज्या काही प्राप्ती आहेत, तो
प्रभु प्रसाद प्राप्त आहे, प्रभु प्रसादाचे महत्व आहे? वारसा देखील आहे, अधिकार
सुद्धा आहे आणि प्रसाद देखील आहे. तर चेक करा - लॉ आणि ऑर्डर, दोन्हीमध्ये संपन्न (परिपूर्ण)
आहात?
बापदादा एक गोष्ट बघत
होते की बहुसंख्य मुलांना परिवर्तन करण्याची जी शक्ती मिळाली आहे, ती परिवर्तन शक्ती
वेळेवर कार्यामध्ये लावतील तर काहीच मेहनत नाही आहे. बघा, सर्वांना अनुभव आहे की जर
कधीही, मायेमुळे कोणत्याही प्रकारची हार होते, तर सर्व जण भाषणामध्ये सांगता, क्लास
देखील करता तर हेच सांगता की, दोन शब्द खाली पाडणारे सुद्धा आहेत आणि चढवणारे देखील
आहेत; ते दोन शब्द तुम्ही सर्व जाणता, सर्वांच्या लक्षात आले आहे. ते दोन शब्द आहेत
- ‘मी’ आणि ‘माझे’. भाषणामध्ये सांगता ना, क्लास देखील घेता ना. बापदादा क्लास
देखील ऐकतात, काय म्हणत आहेत? आता या दोन शब्दांना परिवर्तन शक्तीद्वारे परिवर्तन
करा, जेव्हा पण ‘मी’ शब्द बोलाल तर ‘मी अमकी’ किंवा ‘अमका’ किंवा ब्राह्मण तर आहे
परंतु मी कोण? बापदादांनी जे स्वमान दिले आहेत, जेव्हा पण ‘मी’ शब्द बोलाल तर
कोणत्या ना कोणत्या स्वमानासोबत बोला, म्हणजे बुद्धीमध्ये आणा. ‘मी’ शब्द बोलताच
स्वमानाची आठवण यावी. ‘माझे’ शब्द बोलाल तर बाबांची आठवण यावी. ‘माझे बाबा’, ही
नॅचरल स्मृति बनावी, हे परिवर्तन करा, बस्स. आणि दुसरी गोष्ट जास्त करून जेव्हा
संबंध-संपर्कामध्ये येता तेव्हा दोन शब्दांद्वारे माया येते, एक ‘भाव’ आणि दुसरी ‘भावना’.
तर जेव्हा पण ‘भाव’ शब्द बोलता, विचार करता तेव्हा - आत्मिक भाव; ‘भाव’ शब्द
बोलताक्षणी आत्मिक भाव आठवला पाहिजे आणि ‘भावना’ शब्दाच्या वेळी ‘शुभ भावना’ आठवली
पाहिजे. शब्दाचे अर्थ परिवर्तन करा. तुमचे टायटल काय आहे? विश्व परिवर्तक. एक विश्व
परिवर्तक, एवढे शब्द परिवर्तन करू शकत नाही काय? तर वेळेवर परिवर्तन शक्तीला यूज
करून बघा. नंतर लक्षात येते, जेव्हा वेळ निघून जाते आणि मन अस्वस्थ होते, चांगले
वाटत नाही, आपोआपच आपले मन विचार करते परंतु वेळ तर निघून गेली ना, म्हणून आता
तीव्रगतीची आवश्यकता आहे, कधी-कधी नको. असा विचार करू नका की बरेचदा तर ठीक असतो
परंतु बापदादांनी ऐकवले आहे की, अंतिम क्षणाचा काहीही भरवसा नाही. अचानकचे खेळ
होणार आहेत. बरीच मुले बाबांना देखील खूप गोड-गोड गोष्टी ऐकवतात, म्हणतात - वेळ थोडा
अजून अतिमध्ये जाईल ना, तेव्हा वैराग्य तर येईलच, तर वैराग्याच्या वेळी आपोआपच गती
तीव्र होईल. परंतु बापदादांनी सांगितले आहे की दीर्घकाळाचा पुरुषार्थ पाहिजे. जर
थोड्या काळाचा पुरुषार्थ असेल तर प्रारब्ध देखील थोड्या वेळासाठी मिळेल, पूर्ण २१
जन्मांसाठीचे प्रारब्ध बनणार नाही. बापदादांचे तीन शब्द सदैव लक्षात ठेवा - एक ‘अचानक’,
दुसरा ‘एव्हररेडी’ आणि तिसरा ‘दीर्घकाळ’. हे तिन्ही शब्द सदैव बुद्धीमध्ये ठेवा.
कधीही आणि कुठेही कोणाचाही अंतिम काळ येऊ शकतो. आत्ताचेच बघा किती ब्राह्मण शरीर
सोडत आहेत, त्यांना माहिती होते काय, म्हणून दीर्घकाळाच्या पुरुषार्थाने पूर्ण २१
जन्मांचा वारसा प्राप्त करायचाच आहे, हा तीव्र पुरुषार्थ लक्षात ठेवा. फर्स्ट नंबर,
फर्स्ट जन्म, आपल्या राज्यातील. काय विचार आहे? फर्स्ट जन्मामध्ये यायचे आहे ना! मजा
कशामध्ये असेल? फर्स्ट जन्मामध्ये की कोणत्याही जन्मामध्ये? जे समजतात की आपल्या
राज्यातील फर्स्ट जन्मामध्ये श्रीकृष्णासोबत आमचा देखील पार्ट असावा, त्यांनी हात
वर करा. (सर्वांनी हात वर केला) अच्छा, फर्स्टमध्ये पार्ट? हात बघून तर खुश झाले.
टाळी वाजवा. फर्स्ट जन्मामध्ये येणार, त्याची मुबारक आहे, परंतु… परंतु सांगू का…
नको सांगू? फर्स्ट यायचेच आहे, मग दुसरी गोष्ट कशाला सांगायची. चांगले आहे, जितके
देखील आले आहेत फर्स्ट जन्मामध्ये यायचेच आहे. टाळी तर वाजवली, फर्स्ट जन्म आणि
फर्स्ट स्टेज देखील. तर फर्स्ट स्टेज बनवायचीच आहे, हा ज्यांचा दृढ संकल्प आहे,
फास्ट जायचेच आहे, भले कोणतेही विघ्न असो परंतु विघ्न, विघ्न राहू नये,
विघ्न-विनाशकच्या समोर विजयाच्या रूपामध्ये बदलून जावे; कारण तुम्ही सर्व
विघ्न-विनाशक आहात. तुमचे टायटल काय आहे? ‘विघ्न-विनाशक’. तर विघ्न आले जरी तरी खेळ
खेळण्यासाठी येईल परंतु तुम्ही दुरूनच त्याला ओळखा, रॉयल रूपामध्ये येईल परंतु
तुम्ही विघ्न-विनाशक दुरूनच ओळखाल की, हा कसला खेळ चालू आहे, म्हणून बापदादा देखील
हेच इच्छितात की सर्व मुलांनी सोबत यावे. मागे राहू नयेत. बापदादांना मुलांशिवाय मजा
येत नाही. तर दृढतेला कधीही कमजोर करू नका. करायचेच आहे. ‘गें गें…’ करायचे नाही,
करूच, पाहूच, होऊन जाईल, तुम्ही बघाच…, या गोष्टी करू नका. दृढता सफलतेची चावी आहे,
या चावीला कधीही हरवायचे नाही. माया सुद्धा चतुर आहे ना, ती चावीला शोधून काढते,
म्हणून या चावीला व्यवस्थित सांभाळून ठेवा. अच्छा!
चोहो बाजूच्या लव्हली
आणि लक्की (लाडक्या आणि भाग्यवान) दृढ संकल्पवाल्या मुलांनी विचार केला आणि केले,
‘करू, बघू’, असे नाही, विचार केला आणि केले, सदैव स्वतःला नष्टोमोहामध्ये, फक्त
नात्याचाच मोह नाही तर आपल्या देहभान आणि देह-अभिमानाचा सुद्धा मोह नाही. अशा
नष्टोमोहा एव्हररेडी मुलांना सदैव श्रीमतामध्ये हातात हात देत, सोबत उडणाऱ्या आणि
त्याच बरोबर ब्रह्मा बाबांसोबत आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या अशा तीव्र पुरुषार्थी
उडती कला असणाऱ्या मुलांना बापदादांचे खूप-खूप आशीर्वाद आणि प्रेमपूर्वक आठवण
स्वीकार असो आणि बालक सो मालक मुलांना नमस्ते.
वरदान:-
परिवर्तन
शक्तीद्वारे सर्वांच्या धन्यवादाचे पात्र बनणारे विघ्न जीत भव
जर कोणी तुमच्यावर
अपकार केला तर तुम्ही एका सेकंदामध्ये अपकाराला उपकारामध्ये परिवर्तित करा, कोणी
आपल्या संस्कार-स्वभावाच्या रूपामध्ये परीक्षा बनून समोर आला तर तुम्ही एकाच्या
स्मृतिद्वारे अशा आत्म्याच्या प्रति देखील दयाळूपणाचे श्रेष्ठ संस्कार-स्वभाव धारण
करा, कोणी देहधारीच्या दृष्टीने समोर आला तर त्यांच्या दृष्टीला आत्मिक दृष्टीमध्ये
परिवर्तित करा, अशी परिवर्तन करण्याची युक्ती आली तर विघ्न जीत बनाल. मग
संपर्कामध्ये येणारे सर्व आत्मे तुमचे आभार मानतील.
सुविचार:-
अनुभवांचे स्वरूप बना
तर चेहऱ्यावर भाग्यशालीची झलक दिसून येईल.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.
अनेक देश, अनेक भाषा,
अनेक रूप-रंग असताना देखील सर्वांच्या हृदयामध्ये एकता दिसून यावी कारण एका पित्याची
मुले आहात. सर्व जण एकाच वृक्षाच्या फांद्या, एकाच्या श्रीमतावर चालणारे आहात.
भिन्नतेमध्ये एकता दाखविणे, बिघडलेल्याला सुधारणे, अनेकतेमध्ये एकता आणणे, ही
सर्वात मोठी सेवा आहे. हीच कमाल आहे आणि हाच सफलतेचा आधार आहे.