01-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांना तुम्ही मुलेच प्रिय आहात, बाबा तुम्हालाच सुधारण्यासाठी श्रीमत देतात, सदैव ईश्वरीय मतावर चालून स्वतःला पवित्र बनवा”

प्रश्न:-
विश्वामध्ये शांतीची स्थापना केव्हा आणि कोणत्या विधीने होते?

उत्तर:-
तुम्ही जाणता की विश्वामध्ये शांती तर महाभारत लढाईच्या नंतरच होते. परंतु त्यासाठी तुम्हाला अगोदरपासूनच तयार व्हायचे आहे. आपली कर्मातीत अवस्था बनवण्यासाठी मेहनत करायची आहे. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताच्या ज्ञानाचे चिंतन करून बाबांच्या आठवणीने संपूर्ण पावन बनायचे आहे तेव्हा या सृष्टीचे परिवर्तन होईल.

गीत:-
आज अन्धेरे में है इंसान…

ओम शांती।
हे गाणे आहे भक्तिमार्गासाठी गायलेले. म्हणतात - आम्ही अंधारामध्ये आहोत, आता ज्ञानाचा तिसरा नेत्र द्या. ज्ञान मागतात ज्ञान सागराकडून. बाकी आहे अज्ञान. म्हटले जाते - कलियुगामध्ये सर्व अज्ञानाच्या आसुरी झोपेमध्ये झोपलेले कुंभकर्ण आहेत. बाबा म्हणतात - ज्ञान तर खूपच सिंपल (सोपे) आहे. भक्तिमार्गामध्ये किती वेद-शास्त्र इत्यादी शिकतात, हठयोग करतात, गुरु इत्यादी करतात. आता त्या सर्वांना सोडावे लागते कारण की ते कधीही राजयोग शिकवू शकणार नाहीत. बाबाच तर राजाई देतील. मनुष्य, मनुष्याला देऊ शकत नाही. परंतु त्यासाठीच संन्यासी म्हणतात कागविष्ठा समान सुख आहे कारण स्वतःच घरदार सोडून पळून जातात. हे ज्ञान ज्ञानसागर बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. हा राजयोग भगवानच शिकवतात. मनुष्य, मनुष्याला पावन बनवू शकत नाही. पतित-पावन एक बाबाच आहेत. मनुष्य भक्तिमार्गामध्ये किती अडकलेले आहेत. जन्म-जन्मांतरापासून भक्ती करत आले आहेत. स्नान करण्यासाठी जातात. असे देखील नाही फक्त गंगेमध्ये स्नान करतात. जिथे कुठे पाण्याचा तलाव इत्यादी बघतील तर त्याला देखील पतित-पावन समजतात. इथे देखील गोमुख आहे. झऱ्यातून पाणी येते. जसे विहिरीमध्ये पाणी येते तर त्याला पतित-पावनी गंगा थोडेच म्हणता येणार. मनुष्य समजतात हे देखील तीर्थस्थान आहे. पुष्कळ मनुष्य भावनेने तिथे जाऊन स्नान इत्यादी करतात. तुम्हा मुलांना आता ज्ञान मिळाले आहे. तुम्ही सांगितले तरी देखील मानत नाहीत. स्वतःचा देह-अहंकार खूप आहे. आम्ही इतकी शास्त्रे वाचली आहेत...! बाबा म्हणतात - हे सर्व वाचलेले विसरून जा. आता या सर्व गोष्टीं विषयी लोकांना कसे माहिती होईल म्हणून बाबा म्हणतात असे-असे पॉईंट लिहून एरोप्लेनमधून खाली टाका. जसे आजकाल म्हणतात - विश्वामध्ये शांती कशी होईल? कोणी मत दिले (चांगला सल्ला दिला) तर त्यांना बक्षीस मिळते. आता ते शांतीची स्थापना तर करू शकत नाहीत. शांती आहे कुठे? खोटे बक्षीस देत राहतात.

आता तुम्ही जाणता की विश्वामध्ये शांती तर होते लढाईच्या नंतर. ही लढाई तर कोणत्याही वेळी लागू शकते. अशी तयारी आहे. फक्त तुम्हा मुलांचाच अवकाश आहे. जेव्हा तुम्ही मुले कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल, यामध्येच मेहनत आहे. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा आणि गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बना आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताच्या ज्ञानाचे चिंतन करत रहा. तुम्ही लिहू देखील शकता - ड्रामा अनुसार कल्पापूर्वीप्रमाणे विश्वामध्ये शांती स्थापित होईल. तुम्ही हे देखील समजावून सांगू शकता की विश्वामध्ये शांती तर सतयुगामध्येच असते. इथे जरूर अशांती राहील. परंतु असे बरेच आहेत जे तुमच्या गोष्टींवर विश्वास करत नाहीत कारण त्यांना स्वर्गामध्ये यायचेच नाही आहे त्यामुळे श्रीमतावर चालणार नाहीत. इथे देखील बरेच आहेत जे श्रीमतानुसार पवित्र राहू शकत नाहीत. उच्च ते उच्च भगवंताचे तुम्हाला मत मिळते आहे. कोणाचे वर्तन चांगले नसते तर म्हणतात ना - तुम्हाला ईश्वर सु-बुद्धी देवो. आता तुम्हाला ईश्वरीय मतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात - ६३ जन्म तुम्ही विषय सागरामध्ये गोते खाल्ले आहेत. मुलांशी बोलतात. मुलांनाच बाबा सुधारतील ना. साऱ्या दुनियेला कसे सुधारणार. बाहेरील लोकांसाठी बाबा म्हणतील मुलांकडून समजून घ्या. बाबा बाहेरील लोकांशी बोलू शकत नाहीत. बाबांना मुलेच प्रिय वाटतात. सावत्र मुले थोडीच प्रिय वाटतील. लौकिक पिता देखील सपूत मुलांनाच धन देतात. सगळीच मुले एक सारखी तर असणार नाहीत. बाबा सुद्धा म्हणतात जे माझे बनतात, त्यांनाच मी वारसा देतो. जे माझे बनत नाहीत, ते पचवू शकणार नाहीत. श्रीमतावर चालू शकणार नाहीत. ते आहेत भक्त. बाबांनी (ब्रह्मा) पुष्कळ बघितले आहेत. कोणी मोठा संन्यासी येतो तर त्यांचे अनेक फॉलोअर्स असतात. फंड (वर्गणी) गोळा करतात. आपल्या-आपल्या कुवतीनुसार फंड देतात. इथे बाबा काही असे म्हणणार नाहीत - फंड गोळा करा. नाही, इथे तर जे बीज पेराल त्याचे फळ २१ जन्म प्राप्त कराल. मनुष्य दान करतात तर समजतात आम्ही ईश्वर अर्थ करतो. ईश्वर समर्पणम् म्हणतात नाहीतर मग म्हणतील श्रीकृष्ण समर्पणम्. श्रीकृष्णाचे नाव का घेतात? कारण गीतेचा भगवान समजतात. श्री राधे अर्पणम् असे कधी म्हणणार नाहीत. ईश्वर किंवा श्रीकृष्ण अर्पणम् म्हणतात. जाणतात फळ देणारा ईश्वरच आहे. कोणी श्रीमंताघरी जन्म घेतात तर म्हणतात ना, आधीच्या जन्मामध्ये खूप दान-पुण्य केले आहे तेव्हा असा बनला आहे. राजा देखील बनू शकतात. परंतु ते आहे अल्पकाळाचे कागविष्ठा समान सुख. राजांना देखील संन्यासी लोक संन्यास घेण्यास भाग पाडतात तेव्हा त्यांना म्हणतात - स्त्री तर सर्पिण आहे; परंतु द्रौपदीने तर धावा केला आहे - दुःशासन मला विवस्त्र करत आहे. आता सुद्धा अबला किती हाका मारतात - आमची लाज राखा. बाबा हे आम्हाला खूप मारतात. म्हणतात, विष दे नाहीतर खून करेन. बाबा या बंधनातून सोडवा. बाबा म्हणतात - बंधने तर नष्ट होणारच आहेत मग २१ जन्म कधीही विवस्त्र होणार नाही. तिथे विकार असत नाही. या मृत्युलोक मध्ये हा अंतिम जन्म आहे. ही आहेच विशश वर्ल्ड (विकारी दुनिया).

दुसरी गोष्ट, बाबा समजावून सांगतात की, यावेळी मनुष्य किती बेसमज बनले आहेत. जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तर म्हणतात - स्वर्गवासी झाला. परंतु स्वर्ग आहे कुठे. हा तर नरक आहे. स्वर्गवासी झाला तर जरूर नरकामध्ये होता. परंतु कोणाला सरळ म्हटले - तुम्ही नरकवासी आहात तर रागाने भडकतील. अशा लोकांना तर तुम्ही लिहिले पाहिजे. अमका स्वर्गवासी झाला तर त्याचा अर्थ तुम्ही नरकवासी आहात ना. आम्ही तुम्हाला अशी युक्ती सांगतो ज्यामुळे तुम्ही खरे-खरे स्वर्गामध्ये जाल. ही जुनी दुनिया तर आता नष्ट होणार आहे. वर्तमानपत्रामध्ये टाका की, या युद्धा नंतर ५००० वर्षांपूर्वीप्रमाणे विश्वामध्ये शांती होणार आहे. तिथे एकच आदि सनातन देवी-देवता धर्म होता. ते लोक मग म्हणतात - तिथे देखील कंस, जरासंध इत्यादी असुर होते, त्रेतामध्ये रावण होता. आता त्यांच्यासमोर डोके कोण आपटेल. ज्ञान आणि भक्तिमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. इतकी सोपी गोष्ट देखील मुश्किलीने कोणाच्या बुद्धीमध्ये बसते. तर अशा प्रकारची स्लोगन्स बनवली पाहिजेत. या युद्धा नंतर विश्वामध्ये शांती होणार आहे ड्रामा अनुसार. कल्प-कल्प विश्वामध्ये शांती असते आणि मग कलियुग अंतामध्ये अशांती असते. सतयुगामध्येच शांती असते. हे देखील तुम्ही लिहू शकता, गीतेमध्ये चूक केल्यामुळेच भारताचे हे हाल झाले आहेत. पूर्ण ८४ जन्म घेणाऱ्या श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. श्री नारायणाचे देखील घातलेले नाही. त्यांचे तरी देखील ८४ जन्मांमधील काही दिवस कमी म्हणणार ना. श्रीकृष्णाचे पूर्ण ८४ जन्म असतात. शिवबाबा येतात मुलांना हिऱ्यासमान बनविण्याकरिता तर त्यांच्यासाठी मग डब्बी देखील अशी सोन्याची पाहिजे, ज्यामध्ये बाबा येऊन प्रवेश करतील. आता हे (ब्रह्मा बाबा) सोन्याचे कसे बनणार तर लगेच त्यांना साक्षात्कार घडवला - ‘तू तर विश्वाचा मालक बनतोस. आता मामेकम् (मज एकाची) आठवण कर, पवित्र बन, तर लगेच पवित्र बनू लागला’. पवित्र बनल्याशिवाय काही ज्ञानाची धारणा होऊ शकत नाही. वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे भांडे पाहिजे. हे ज्ञान तर आहे परमपिता परमात्म्याचे. याला धारण करण्यासाठी देखील सोन्याचे भांडे पाहिजे. पवित्र पाहिजे, तेव्हा धारणा होईल. पवित्रतेची प्रतिज्ञा करून मग खाली कोसळतात (पतन होते) तर योगाची यात्राच संपून जाते. ज्ञान देखील नष्ट होते. कोणालाही सांगू शकत नाहीत - भगवानुवाच, काम विकार महाशत्रु आहे. त्याचा तिर लागणार नाही. ते मग कुक्कड ज्ञानी (दुसऱ्यांना जागे करून स्वतः अज्ञान निद्रेमध्ये झोपी जाणारे) बनतात. कोणताही विकार नसावा. रोज पोतामेल ठेवा. जसे बाबा सर्वशक्तिमान आहेत तशी माया देखील सर्वशक्तिमान आहे. अर्धे कल्प रावणाचे राज्य चालते. याच्यावर बाबांशिवाय कोणीही विजय मिळवून देऊ शकत नाही. ड्रामा अनुसार रावण राज्य देखील होणारच आहे. भारताच्याच जय आणि पराजयावर हा ड्रामा बनलेला आहे. बाबा हे तुम्हा मुलांनाच समजावून सांगतात. मुख्य आहे पवित्र बनण्याची गोष्ट. बाबा म्हणतात- ‘मी येतोच पतितांना पावन बनविण्याकरिता’. बाकी शास्त्रांमध्ये पांडव आणि कौरवांचे युद्ध, जुगार इत्यादी दाखवले आहे. अशी गोष्ट असू कशी शकते. राजयोगाचे शिक्षण असे असते काय? युद्धाच्या मैदानावर गीता पाठशाळा असते काय? कुठे जन्म-मरण रहित शिवबाबा, कुठे पूर्ण ८४ जन्म घेणारा श्रीकृष्ण. त्यांच्याच अंतिम जन्मामध्ये बाबा येऊन प्रवेश करतात. किती क्लिअर आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये रहात असताना पवित्र देखील बनायचे आहे. संन्यासी तर म्हणतात - दोघे एकत्र राहून पवित्र राहू शकत नाहीत. तुम्ही बोला - ‘तुम्हाला तर कोणती प्राप्ति नाहीये, तर कसे राहणार’. इथे तर विश्वाची बादशाही मिळते. बाबा म्हणतात - ‘माझ्यासाठी कुळाची लाज राखा’. शिवबाबा म्हणतात - ‘यांच्या दाढीची लाज राखा. हा एक अंतिम जन्म पवित्र रहा तर स्वर्गाचे मालक बनाल’. आपल्यासाठीच मेहनत करता. दुसरे कोणी स्वर्गामध्ये येऊ शकत नाही. ही तुमची राजधानी स्थापन होत आहे. यामध्ये सर्व प्रकारचे हवेत ना. तिथे वजीर (मंत्री) तर नसतात. राजांना सल्ल्याची गरजच नाही. पतित राजांना देखील एक वजीर असतो. इथे तर पहा किती मिनिस्टर्स आहेत. आपसामध्ये भांडत राहतात. बाबा सर्व त्रासातून सोडवतात. ३ हजार वर्षे मग कोणतेही युद्ध होणार नाही. जेल इत्यादी असणार नाही. कोर्ट इत्यादी काहीच असणार नाही. तिथे तर सुखच सुख आहे. याच्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. मृत्यू डोक्यावर उभा आहे. आठवणीच्या यात्रेद्वारे विकर्माजीत बनायचे आहे. तुम्हीच मेसेंजर्स आहात जे सर्वांना बाबांचा मेसेज देता की, मनमनाभव. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानाची धारणा करण्यासाठी पवित्र बनून बुद्धिरूपी भांड्याला स्वच्छ बनवायचे आहे. फक्त कुक्कड ज्ञानी बनायचे नाही.

२) डायरेक्ट बाबांसमोर आपले सर्व काही अर्पण करून श्रीमतावर चालून २१ जन्मांसाठी राजाई पद घ्यायचे आहे.

वरदान:-
प्रत्येक शक्तिला कार्यामध्ये लावून वृद्धी करणारे श्रेष्ठ धनवान आणि बुद्धिवान भव

बुद्धिवान मुले प्रत्येक शक्तिला कार्यामध्ये लावण्याची विधी जाणतात. जे जितक्या शक्तींना कार्यामध्ये लावतात तितक्या त्यांच्या शक्तींची वृद्धी होते. तर असे ईश्वरीय बजेट बनवा जे विश्वातील प्रत्येक आत्मा तुमच्या द्वारे काही ना काही प्राप्ति करून तुमचे गुणगान करतील. सर्वांना काही ना काही द्यायचेच आहे. भले मुक्ती द्या किंवा जीवनमुक्ती द्या. ईश्वरीय बजेट बनवून सर्व शक्तींची बचत करून जमा करा आणि जमा झालेल्या शक्तींद्वारे सर्व आत्म्यांना भिकारी पणापासून, दुःख अशांती पासून मुक्त करा.

बोधवाक्य:-
शुद्ध संकल्पांना आपल्या जीवनाचा अनमोल खजिना बनवा तर मालामाल बनाल.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्य - “आता विकर्म बनविण्याची कॉम्पिटिशन (स्पर्धा) करायची नाही”

सर्वप्रथम तर आपल्याकडे हे एम जरूर ठेवायचे आहे की, ‘मला कोणत्याही परिस्थितीत आपल्या विकारांना वश करायचे आहे’, तेव्हाच ईश्वरीय सुख-शांतीमध्ये राहू शकता. आपला मुख्य पुरुषार्थ आहे स्वतः शांतीमध्ये राहून इतरांना शांतीमध्ये आणणे, यामध्ये सहनशक्ति जरूर पाहिजे. सर्व आपल्यावर अवलंबून आहे; असे नाही कोणी काही म्हटले तर अशांतीमध्ये आले पाहीजे, नाही. ज्ञानाचा पहिला गुण आहे - सहनशक्ति धारण करणे. बघा अज्ञान काळामध्ये म्हणतात - भले कोणी कितीही शिव्या देवो, असे समजा की मला कुठे लागली? भले ज्यांने शिवी दिली तो स्वतः तर अशांतीमध्ये आला, त्यांचा हिशोब आपला बनला. परंतु आम्ही देखील अशांतीमध्ये आलो, काही बोललो तर मग ते आपले विकर्म बनेल, तर विकर्म बनविण्याची कॉम्पिटिशन करायची नाहीये. आपल्याला तर विकर्मांना भस्म करायचे आहे, ना की बनवायचे आहे, अशी विकर्म तर जन्म-जन्मांतर बनवत आलो आणि दुःख सहन करत आलो. आता तर नॉलेज मिळत आहे तर या ५ विकारांना जिंका. विकारांचा देखील मोठा विस्तार आहे, खूप सूक्ष्म रीतीने येतात. कधी ईर्ष्या येते तर विचार करतात याने असे केले तर मी का नाही करायचे? ही फार मोठी चूक आहे. आपल्याला तर अभूल (निर्दोष) बनायचे आहे. जर कोणी काही म्हटले तर असे समजा ही देखील माझी परीक्षा आहे, माझ्यामध्ये कितपत सहनशक्ति आहे? जर कोणी म्हटले - मी खूप सहन केले, आणि एकदा जरी जोश आला तर शेवटी फेल झाला. ज्याने म्हटले त्याने आपले स्वतःचे बिघडवले परंतु आपल्याला तर बनवायचे आहे, ना की बिघडवायचे आहे त्यामुळे चांगला पुरुषार्थ करून जन्म-जन्मांतरासाठी चांगले प्रारब्ध बनवायचे आहे. बाकी जे विकारांच्या वश आहेत तर जणू त्यांच्यामध्ये भूत प्रवेश आहे, भुतांची भाषाच अशी निघते, परंतु जी दैवी सोल्स आहेत, त्यांची भाषा दैवीच निघेल. तर स्वतःला दैवी बनवायचे आहे ना की आसुरी. अच्छा. ओम् शांती.

अव्यक्त इशारे - सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना:-

परमात्म प्रेमाचे अनुभवी बना तर याच अनुभवाद्वारे सहजयोगी बनून उडत रहाल. परमात्म-प्रेम उडण्याचे साधन आहे. उडणारे कधी धरणीच्या आकर्षणामध्ये येऊ शकत नाहीत. मायेचे कितीही आकर्षित रूप असेल परंतु ते आकर्षण उडती कला असणाऱ्यां पर्यंत पोहोचू शकत नाही.