01-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - रोज रात्रीला आपला पोतामेल काढा, डायरी ठेवा तर भीती राहील की कुठे घाटा
होऊ नये”
प्रश्न:-
कल्पा
पूर्वीवाल्या भाग्यशाली मुलांना कोणती गोष्ट लगेच टच होईल?
उत्तर:-
बाबा दररोज मुलांना ज्या आठवणीच्या युक्त्या सांगतात, त्या भाग्यशाली मुलांनाच टच
होत राहतील. ते त्याला लगेच आचरणामध्ये आणतील. बाबा म्हणतात - मुलांनो, काही वेळ
बगीच्यामध्ये जाऊन एकांतामध्ये बसा. बाबांशी गोड-गोड गोष्टी करा, आपला चार्ट ठेवा,
तर उन्नती होत राहील.
ओम शांती।
मिलेट्रीवाल्यांना सर्वप्रथम सावधान केले जाते - अटेंशन प्लीज. बाबा देखील मुलांना
म्हणतात - ‘स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करत राहता का?’ मुलांना समजावून
सांगितले जाते की, हे ज्ञान बाबा यावेळीच देऊ शकतात. बाबाच शिकवतात. भगवानुवाच आहे
ना - मूळ गोष्टच ही आहे की, भगवान कोण आहेत? कोण शिकवत आहेत? ही गोष्ट अगोदर समजून
घेण्याची आणि निश्चय करण्याची आहे. मग अतिंद्रिय सुखामध्ये देखील रहायचे आहे.
आत्म्याला खूप आनंद झाला पाहिजे. आपल्याला बेहदचे पिता मिळाले आहेत. बाबा एकदाच
येऊन भेटतात वारसा देण्यासाठी. कोणता वारसा? विश्वाच्या बादशाहीचा वारसा देतात, ५
हजार वर्षांपूर्वी प्रमाणे. हा तर पक्का निश्चय आहे - बाबा आलेले आहेत. पुन्हा सहज
राजयोग शिकवतात, शिकवावाच लागतो. बाळाला काही शिकवले जात नाही. आपोआपच मुखातून
आई-बाबा निघत राहील कारण शब्द तर ऐकत असतात ना. हे आहेत रूहानी पिता. आत्म्याला
आंतरिक गुप्त नशा असतो. आत्म्यालाच शिकायचे आहे. परमपिता परमात्मा तर नॉलेजफुल
आहेतच. ते काही कुठे शिकलेले नाहीत. त्यांच्यामध्ये नॉलेज आहेच, कशाचे नॉलेज आहे?
हे देखील तुमची आत्मा समजते. बाबांमध्ये संपूर्ण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज
आहे. कशा प्रकारे एका धर्माची स्थापना आणि अनेक धर्मांचा विनाश होतो, हे सर्व
जाणतात - म्हणून त्यांना जानीजाननहार म्हटले जाते. जानीजाननहारचा अर्थ काय आहे? हे
कोणीही बिल्कुल जाणत नाहीत. आता तुम्हा मुलांना बाबांनी सांगितले आहे की, हे स्लोगन
देखील जरूर लावा की - ‘मनुष्य असून देखील जर क्रियेटर आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताच्या ड्युरेशनला, रिपीटेशनला नाही जाणले तर काय म्हटले जाईल…’ हा
‘रिपीटेशन (पुनरावृत्ती)’ शब्द देखील खूप जरुरी आहे. दुरुस्ती तर होत राहते ना.
गीतेचे भगवान कोण… हे चित्र देखील खूप फर्स्टक्लास आहे. संपूर्ण विश्वामध्ये ही आहे
सर्वात नंबर वन चूक. परमपिता परमात्म्याला न जाणल्याकारणाने मग म्हणतात सर्व
भगवंताचीच रूपे आहेत. जसे छोट्या मुलांना विचारले जाते तू कोणाचा मुलगा आहेस? तर
म्हणेल - अमक्याचा. अमका कोणाचा मुलगा? अमक्याचा. मग म्हणतील तो आमचा मुलगा आहे.
तसेच हे देखील भगवंताला जाणत नाहीत तर म्हणतात आम्हीच भगवान आहोत. इतकी पूजा देखील
करतात परंतु समजत नाहीत. गायले जाते ब्रह्माची रात्र तर जरूर ब्राह्मण-ब्राह्मणींची
देखील रात्र असेल. या सर्व धारण करण्याच्या गोष्टी आहेत. ही धारणा त्यांनाच होईल जे
योगामध्ये राहतात. आठवणीलाच बळ म्हटले जाते. ज्ञान तर आहे सोर्स ऑफ इन्कम. आठवणीनेच
शक्ती मिळते ज्याद्वारे विकर्म विनाश होतात. तुम्हाला बुद्धीचा योग बाबांसोबत
लावायचा आहे. हे ज्ञान बाबा आताच देतात पुन्हा कधीच मिळतही नाही. बाबांशिवाय इतर
कोणीही देऊ शकत नाही. बाकी सर्व आहेत भक्ती मार्गाची शास्त्रे, कर्म-कांडाच्या
क्रिया. त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. स्पिरिच्युअल नॉलेज एका बाबांकडेच आहे आणि
ते ब्राह्मणांनाच देतात. इतर कोणाकडेही स्पिरिच्युअल नॉलेज नाही. दुनियेमध्ये किती
धर्म-मठ-पंथ आहेत, किती मते आहेत. मुलांना समजावून सांगण्यासाठी किती मेहनत घ्यावी
लागते. किती वादळे येतात. गातात देखील - ‘नईया मेरी पार लगाओ’. सर्वांची नौका (जीवनरूपी
नौका) तर पार जाऊ शकत नाही. कोणाची नौका बुडून देखील जाईल, कोणाची थांबून राहील.
२-३ वर्षे होतात, कितीतरी जणांचा पत्ताच नाहीये. कोणी तर तुकडे-तुकडे होतात. कोणी
तिथेच थांबून राहतात, यामध्ये मेहनत खूप आहे. आर्टिफिशियल योग देखील किती निघाले
आहेत. किती योग आश्रम आहेत. रूहानी योग आश्रम कुठे असू शकत नाही. बाबाच येऊन
आत्म्यांना रूहानी योग शिकवतात. बाबा म्हणतात - हा तर अतिशय सहज योग आहे. याच्या
सारखे सहज (सोपे) काहीच नाही. आत्माच शरीरामध्ये येऊन पार्ट बजावते. जास्तीतजास्त
८४ जन्म आहेत, बाकी तर कमी-कमी होत जातील. या गोष्टी देखील तुम्हा मुलांमध्ये
काहींच्याच बुद्धीमध्ये आहेत. बुद्धीमध्ये धारणा खूप मुश्किलीने होते. पहिली गोष्ट
बाबा समजावून सांगतात कुठेही जाता तर सर्वप्रथम बाबांचा परिचय द्या. बाबांचा परिचय
कसा द्यावा, यासाठी युक्ती रचली जाते. तो जेव्हा निश्चय होईल तेव्हाच समजतील बाबा
तर सत्य आहेत. जरूर बाबा सत्य गोष्टीच सांगत असतील. यामध्ये संशय येता कामा नये.
आठवणी मध्येच मेहनत आहे, यामध्ये माया अपोजिशन (विरोध) करते. वारंवार आठवण विसरायला
लावते म्हणून बाबा म्हणतात - चार्ट लिहा. म्हणजे बाबा देखील बघतील की कोण किती आठवण
करतात ते. क्वार्टर परसेंट सुद्धा (एक चतुर्थांश टक्केसुद्धा) चार्ट ठेवत नाहीत.
कोणी म्हणतात आम्ही तर संपूर्ण दिवस आठवणीमध्ये राहतो. बाबा म्हणतात - हे तर खूप
मुश्किल आहे. संपूर्ण दिवस-रात्र तर बंधनात असणाऱ्या ज्या मार खात राहतात त्या
आठवणीमध्ये राहत असतील, शिवबाबा कधी एकदा आमची या नातलगांपासून सुटका होणार? आत्मा
बोलावते आहे - बाबा, आम्ही बंधनातून कसे सुटू शकतो? जर कोणी खूप आठवणीमध्ये राहत
असेल तर बाबांना चार्ट पाठवा. डायरेक्शन मिळतात रोज रात्रीला आपला पोतामेल काढा,
डायरी ठेवा. डायरी ठेवल्याने भीती राहील, आपला घाटा तर होऊ नये. बाबा बघतील तर काय
म्हणतील - ‘इतक्या मोस्ट बिलवेड बाबांना इतकाच वेळ आठवण करतोस! लौकिक पित्याची,
पत्नीची तू आठवण करतोस, मला थोडे देखील आठवण करत नाहीस. तू आपला चार्ट लिही, तर
आपणच लाज वाटेल की, या परिस्थितीमध्ये मी पद प्राप्त करू शकणार नाही’; म्हणून बाबा
चार्टवर जोर देत आहेत. बाबांची आणि ८४ च्या चक्राची आठवण करायची आहे तर चक्रवर्ती
राजा बनाल. आप समान बनवाल तेव्हाच तर प्रजेवर राज्य कराल. हा आहेच राजयोग -
नरापासून नारायण बनण्याचा. एम ऑब्जेक्ट हे आहे. जसे आत्म्याला पाहता येत नाही, समजले
जाते. यांच्यामध्ये आत्मा आहे, हे देखील समजले जाते. या लक्ष्मी-नारायणाची जरूर
राजधानी असेल. यांनी सर्वात जास्त मेहनत केली आहे तेव्हाच स्कॉलरशिप मिळवली आहे.
जरूर यांची भरपूर प्रजा असेल. उच्च ते उच्च पद मिळविले आहे, जरूर खूप योग लावला आहे
तेव्हाच पास विद् ऑनर झाले आहेत. हे देखील कारण शोधले पाहिजे, आपला योग का लागत नाही?
धंदा इत्यादीच्या झंझटामध्ये बुद्धी खूप जाते. त्यातून वेळ काढून या बाजूला जास्त
लक्ष दिले पाहिजे. थोडा वेळ काढून बगीच्यामध्ये एकांतामध्ये बसले पाहिजे. फीमेल तर
जाऊ शकत नाहीत. त्यांना तर घर संभाळायचे आहे. पुरुषांना सोपे आहे. कल्पापूर्वी वाले
जे भाग्यशाली असतील त्यांनाच हे टच होईल. शिक्षण तर खूप चांगले आहे. बाकी
प्रत्येकाची बुद्धी आपली स्वतःची असते. कसेही करून बाबांकडून वारसा घ्यायचा आहे.
बाबा सर्व डायरेक्शन्स देत असतात. करायचे तर मुलांनाच आहे. बाबा जनरल डायरेक्शन्स
देतील. एक-एक पर्सनल येऊन सुद्धा कोणी विचारेल तर सल्ला देऊ शकतात. तीर्थावर
मोठ-मोठ्या पर्वतांवर जातात तर पंडे लोक सावध करत राहतात. खूप कष्टाने जातात. तुम्हा
मुलांना तर बाबा अतिशय सोपी युक्ती सांगतात. बाबांची आठवण करायची आहे. शरीराचे भान
नष्ट करायचे आहे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. बाबा येऊन नॉलेज देऊन निघून
जातात. आत्म्यासारखे वेगवान रॉकेट दुसरे कोणते असू शकत नाही. ते लोक चंद्र
इत्यादीवर जाण्यासाठी किती वेळ वाया घालवतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
ही सायन्सची कला देखील विनाशामध्ये मदत करते. ते आहे सायन्स, तुमचा आहे सायलेन्स.
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे - हा आहे डेड सायलेन्स. मी आत्मा शरीरा
पासून वेगळी आहे. हे शरीर जुनी जुत्ती आहे. सर्प, कासवाची उदाहरणे देखील तुमच्यासाठी
आहेत, तुम्हीच किड्यासमान मनुष्यांना भूं-भूं करून मनुष्यापासून देवता बनवता. विषय
सागरातून क्षीर सागरामध्ये घेऊन जाणे हे तुमचे काम आहे. संन्याशांना हे यज्ञ-तप
इत्यादी काहीच करायचे नाहीये. भक्ती आणि ज्ञान आहेच गृहस्थींकरिता. त्यांना तर
सतयुगामध्ये यायचेच नाहीये. त्यांना काय माहिती या गोष्टींबद्दल. अशी देखील
ड्रामामध्ये नोंद आहे या निवृत्ती मार्गवाल्यांची. ज्यांनी पूर्ण ८४ जन्म घेतले
आहेत - तेच ड्रामा अनुसार येत राहतील. यामध्ये देखील नंबरवार निघत राहतील. माया खूप
प्रबळ आहे. डोळे खूप क्रिमिनल (विकारी) आहेत. ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाल्याने डोळे
सिव्हिल (पवित्र) बनतात; मग अर्धाकल्प कधी क्रिमिनल बनणार नाहीत. हे आहेत खूप
धोकेबाज. तुम्ही जितकी बाबांची आठवण कराल तितकी कर्मेंद्रिये शितल होतील. मग २१
जन्म कर्मेंद्रियांना चंचलतेमध्ये यायचे नाहीये. तिथे कर्मेंद्रियांमध्ये चंचलता
नसते. सर्व कर्मेंद्रिये शांत सतोगुणी असतात. देह-अभिमान आल्यानेच सर्व आसुरीपणा
येतो. बाबा तुम्हाला देही-अभिमानी बनवितात. अर्ध्या कल्पासाठी तुम्हाला वारसा मिळतो.
जितकी जे मेहनत करतात, तितके उच्च पद प्राप्त करतील. मेहनत करायची आहे -
देही-अभिमानी बनण्याची, मग कर्मेंद्रिये धोका देणार नाहीत. शेवटपर्यंत युद्ध चालत
राहील. जेव्हा कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल तेव्हा ते युद्ध देखील सुरू होईल.
दिवसें-दिवस आवाज वाढत जाईल, मृत्यूला घाबरतील.
बाबा म्हणतात - हे
ज्ञान सर्वांसाठी आहे. फक्त बाबांचा परिचय द्यायचा आहे. आपण सर्व आत्मे भाऊ-भाऊ
आहोत. सर्व एका बाबांची आठवण करतात. गॉडफादर म्हणतात. फारफार तर कोणी नेचरला (प्रकृतीला)
मानणारे असतात. परंतु गॉड तर आहे ना. त्यांची आठवण करतात मुक्ती-जीवनमुक्तीसाठी.
मोक्ष तर नाही आहे. वर्ल्डच्या इतिहास-भूगोलाला रिपीट करायचे आहे. बुद्धी देखील
म्हणते जेव्हा सतयुग होते तर एक भारतच होता. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. या
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. लाखो वर्षांची गोष्ट असू शकत नाही. लाखो वर्षे
असती तर किती प्रचंड संख्या झाली असती. बाबा म्हणतात आता कलियुग पूर्ण होऊन सतयुगाची
स्थापना होत आहे. ते समजतात कलियुग तर अजून लहान आहे, इतक्या हजार वर्षांचे आयुष्य
आहे. तुम्ही मुले जाणता हे कल्प आहेच मुळी ५ हजार वर्षांचे. भारतामध्येच ही स्थापना
होत आहे. भारतच आता स्वर्ग बनत आहे. आता आपण श्रीमतावर हे राज्य स्थापन करत आहोत.
आता बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. सर्वात पहिला शब्दच हा द्या.
जोपर्यंत बाबांवर निश्चय बसणार नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहतील. कोणत्या
प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर मग समजतील - यांना काहीच माहित नाही आणि म्हणतात
भगवान आम्हाला शिकवत आहेत. त्यामुळे सर्वात आधी तर या एकाच गोष्टीवर टिकून रहा. आधी
बाबांवर निश्चय तर बसू दे की बरोबर सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत आणि ते रचयिता
आहेत. तर जरूर संगमावरच येतील. बाबा म्हणतात मी युगे-युगे येत नाही, कल्पाच्या
संगमयुगावर येतो. मी आहेच नवीन सृष्टीचा रचयिता. तर मध्येच कसा येईन. मी येतोच
जुन्या आणि नवीन दुनियेच्या मधल्या काळामध्ये. याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते.
तुम्ही पुरुषोत्तम देखील इथेच बनता. लक्ष्मी-नारायण सर्वात पुरुषोत्तम आहेत. एम
ऑब्जेक्ट किती सोपे आहे. सर्वांना सांगा ही स्थापना होत आहे. बाबांनी सांगितले आहे
‘पुरुषोत्तम’ शब्द जरूर लिहा कारण इथे तुम्ही कनिष्ठ पासून पुरुषोत्तम बनता. अशा
मुख्य गोष्टी विसरता कामा नये. आणि संवतची तारीख देखील जरूर लिहिली पाहिजे. इथे
तुमची सुरुवातीपासूनच राजाई सुरू होते, इतरांची राजाई सुरुवातीपासून होत नाही. ते
तर धर्म स्थापक येतील तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या धर्माची वृद्धी होईल. करोडो
बनतील तेव्हा कुठे राजाई सुरु होईल. तुमची तर सुरुवातीपासूनच सतयुगामध्ये राजाई
असेल. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही की सतयुगामध्ये एवढी राजाई कुठून आली.
कलियुगाच्या अंताला इतके अनेक धर्म आहेत, मग सतयुगामध्ये एक धर्म, एक राज्य कसे झाले?
किती हिरे-माणकांचे महाल आहेत. भारत असा होता ज्याला पॅराडाईज म्हटले जात होते. ५
हजार वर्षांची गोष्ट आहे. लाखो वर्षांचा हिशोब कुठून आला. लोक किती गोंधळून गेले
आहेत. आता त्यांना कोण समजावेल. ते समजतात थोडेच की आपण आसुरी राज्यामध्ये आहोत.
यांची देवतांची तर महिमा सर्व गुणसंपन्न… आहे, यांच्यामध्ये ५ विकार नाहीत कारण
देही-अभिमानी आहेत; तर बाबा म्हणतात मुख्य गोष्ट आहे आठवणीची. ८४ जन्म घेता-घेता
तुम्ही पतित बनला आहात, आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. हे ड्रामाचे चक्र आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ज्ञानाच्या
तिसऱ्या नेत्राला धारण करून आपल्या धोकेबाज डोळ्यांना सिव्हिल (पवित्र) बनवायचे आहे.
आठवणीनेच कर्मेंद्रिया शितल, सतोगुणी बनतील त्यामुळे हीच मेहनत करायची आहे.
२) धंदा इत्यादीमधून
वेळ काढून एकांतामध्ये जाऊन आठवणीमध्ये बसायचे आहे. कारण शोधायचे आहे की आपला योग
का लागत नाही. आपला चार्ट जरूर ठेवायचा आहे.
वरदान:-
सहनशक्तीद्वारे
अविनाशी आणि गोड फळ प्राप्त करणारे सर्वांचे स्नेही भव
सहन करणे काही मरणे
नाही आहे परंतु सर्वांच्या हृदयामध्ये स्नेहाने जगणे आहे. कितीही विरोधी असेल,
रावणापेक्षाही बलवान असेल, एकदा नाही १० वेळा सहन करावे लागले तरी देखील सहनशक्तीचे
फळ अविनाशी आणि गोड आहे. फक्त ही भावना ठेवू नका की मी इतके सहन केले तर यांनी
देखील थोडे फार करावे. अल्पकालीन फळाची भावना ठेवू नका. दयाभाव ठेवा - हाच सेवाभाव
आहे. सेवाभाव असणारे सर्वांच्या कमजोरींना सामावून घेतात. त्यांचा सामना करत नाहीत.
बोधवाक्य:-
जे होऊन गेले
त्याला विसरून जा, होऊन गेलेल्या गोष्टींवरून धडा घेऊन पुढच्या वेळेसाठी नेहमी सावध
रहा.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. जशी बापदादांना दया
येते, अशी तुम्ही मुले देखील मास्टर दयाळू बनून आपल्या मनसावृत्तीद्वारे, वायुमंडळा
द्वारे आत्म्यांना बाबांकडून मिळालेल्या शक्ती द्या. जेव्हा थोड्या काळामध्ये
संपूर्ण विश्वाची सेवा संपन्न करायची आहे, तत्वां सहित सर्वांना पावन बनवायचे आहे
तर मनसाद्वारे तीव्र गतीने सेवा करा, योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.