01-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, मायेला घाबरू नका, भले कितीही विसरायला लावण्याचा प्रयत्न करेल, परंतु थकू नका, अमृतवेलेला उठून आठवणीमध्ये राहण्याचा पुरेपूर पुरुषार्थ करा”

प्रश्न:-
पुरुषार्थामध्ये पुढचा नंबर कोणती मुले घेतात?

उत्तर:-
जी मुले बाबांवर पूर्णपणे बळी चढतात अर्थात कुर्बान होतात, तेच सर्वांच्या पुढे जातात. बाबांवर मुले कुर्बान जातात आणि मुलांवर बाबा कुर्बान जातात. तुम्ही आपला कखपणा (व्यर्थ गोष्टी), जुने तन-मन-धन बाबांना देता आणि बाबा तुम्हाला विश्वाची बादशाही देतात म्हणून त्यांना गरीब निवाज म्हटले जाते. गरीब भारतालाच दान देण्यासाठी बाबा आले आहेत.

गीत:-
नयनहीन को राह दिखाओ...

ओम शांती।
गोड-गोड, अती गोड, असेच म्हणतील ना! बेहदचे बाबा आणि बेहदचे प्रेम आहे. म्हणतात - गोड सिकिलध्या मुलांनी गाणे ऐकले. मार्ग एक बाबाच दाखवतात. भक्तीमध्ये देखील मार्ग दाखविणारा कोणीही नाही. तिथल्या तिथेच ठेचकाळत राहतात. आता भले मार्ग जरी मिळाला आहे तरी देखील माया बाबांसोबत बुद्धियोग लावू देत नाही. समजतात देखील एका बाबांची आठवण केल्यामुळे आपली सर्व दुःखे दूर होतील, काळजीचे काही कारण राहणार नाही, तरी देखील विसरून जातात. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मज पतित-पावन बाबांची आठवण करा. बाबा ज्ञानाचा सागर आहेत ना. तेच गीता ज्ञान-दाता आहेत. स्वर्गाची बादशाही अथवा सद्गती देतात. श्रीकृष्णाला ज्ञानाचा सागर म्हणू शकत नाही. सागर एकच असतो. या धरतीच्या चोहो बाजूंनी सागरच सागर आहे. पूर्ण सागर एकच आहे. मग त्याची वाटणी केली गेली आहे. तुम्ही विश्वाचे मालक बनता तेव्हा पूर्ण सागर, धरतीचे मालक तुम्हीच बनता. असे कोणी म्हणू शकत नाही की, हा भाग आमचा आहे. आमच्या हद्दीच्या आत येऊ नका. इथे तर सागराचे देखील तुकडे-तुकडे केले आहेत. तुम्ही समजता पूर्ण विश्वच भारत होता, ज्याचे तुम्ही मालक होता. गाणे देखील आहे - ‘बाबा तुमच्याकडून आम्ही विश्वाची बादशाही घेतो, जी कोणी हिसकावून घेऊ शकत नाही’. इथे बघा पाण्यावरून देखील भांडणे आहेत. एकमेकांना पाणी देण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात. तुम्हा मुलांना कल्पापूर्वीप्रमाणे पूर्ण विश्वाचे राज्य मिळत आहे. बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे. ज्ञान-दाता, परमपिता परमात्माच आहेत. या वेळी येऊन ज्ञान देतात. सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाला देखील हे ज्ञान असणार नाही. हां, असे म्हणू की पूर्वजन्मा मध्ये ज्ञान घेऊन असे बनले आहेत. तुम्हीच तर होता. तुम्ही म्हणता - बाबा तुम्ही तेच आहात. तुम्ही आम्हाला विश्वाचा मालक बनवले होते. बाबा म्हणतात - माझ्या श्रीमतामध्ये काही फापटपसारा नाहीये. त्या (दुनियेतील) शिक्षणामध्ये केवढा मोठा फापटपसारा आणि अवाजवी प्रमाणात अभ्यासक्रम असतो. हे तर खूप सोपे आहे. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणून घेऊन इतरांना सांगत राहता की, ८४ जन्मांचे चक्र आपण कसे पूर्ण केले आहे. आता परत बाबांकडे जायचे आहे. बाबांनी हे देखील सांगितले आहे - मायेची वादळे तर खूप येतील, त्यांना घाबरू नका. सकाळी उठून तुम्ही योगमध्ये बसाल आणि तुमची बुद्धी दुसऱ्याच विचारांमध्ये भटकत राहील. दोन मिनिटे सुद्धा आठवण राहणार नाही. बाबा म्हणतात, थकू नका. ठीक आहे, एक मिनिट आठवण राहिली, मग उद्या पुन्हा बसा, परवा बसा. आतून हे जरूर पक्के करा की, मला बाबांची आठवण करायचीच आहे. जर कोणी विकारात जात असेल तर मग खूप वादळे येतील. पवित्रताच मुख्य आहे. आज ही दुनिया पतित वेश्यालय आहे. उद्या पावन शिवालय असेल. जाणता की हे जुने शरीर आहे. बाबांची आठवण करत राहिलात तर कोणत्याही वेळी शरीर सुटले तर स्वर्गात येण्यालायक बनाल. बाबांकडून काही ना काही ज्ञान तर ऐकले आहे ना. असे देखील आहेत जे इथून भागन्ती झाले आहेत तरी देखील येऊन आपला वारसा घेत आहेत. हे देखील समजावून सांगितले आहे - ‘अंत मती सो गति होईल’. समजा कोणी शरीर सोडले, ज्ञानाचे संस्कार घेऊन जातात, त्यामुळे बालपणापासूनच त्यांची या बाजूला (ज्ञानाकडेच) ओढ असेल. भले शरीर छोटे आहे, बोलू शकत नाहीत परंतु ओढ असेल. बालपणापासूनच चांगले संस्कार असतील. सुखदायी बनतील. आत्म्यालाच बाबा शिकवतात ना. जसे बाबा सैनिकांचे उदाहरण देतात. संस्कार घेऊन जातात त्यामुळे पुन्हा पुढच्या जन्मी सुद्धा सैन्यात भरती होतात. जसे शास्त्र शिकणारे संस्कार घेऊन जातात, तर लहानपणीच शास्त्रे तोंडपाठ होतात. त्यांची महिमा देखील होते. तर इथून जे जातात त्यांची बालपणातच महिमा होते. आत्माच ज्ञान धारण करते ना. शिल्लक राहिलेला कर्मांचा हिशोब चुकता करावा लागतो. स्वर्गामध्ये तर येतील ना. बाबांकडे येऊन वालेकुम सलाम करतील. प्रजा तर भरपूर बनेल. बाबांकडून वारसा तर घेतील. शेवटी म्हटले आहे ना - ‘अहो प्रभू तेरी लीला…’

आता तुम्ही समजता अहो बाबा तुमची लीला ड्रामा प्लॅनअनुसार अशी आहे. बाबा, तुमची ॲक्ट सर्व मनुष्यमात्रां पेक्षा वेगळी आहे. जे बाबांची चांगली सेवा करतात त्यांना मग इनाम देखील खूप चांगले मिळते. विजय माळेमध्ये ओवले जातात. हे आहे रूहानी ज्ञान (आत्मिक ज्ञान), जे रूह बाबा, आत्म्यांना देतात. सर्व मनुष्य तर शरीरांचीच आठवण करतील;

म्हणतील - शिवानंद, गंगेश्वरानंद... इत्यादी हे ज्ञान देतात. इथे तर म्हणाल - निराकार शिवबाबा ज्ञान देत आहेत. मी सर्वश्रेष्ठ आहे. मज आत्म्याचे नाव आहे - ‘शिव’. शिव परमात्माय नमः म्हणतात. मग ब्रह्मा-विष्णू-शंकराला म्हणतील - देवताय नमः, हे देवता देखील रचना आहेत. त्यांच्याकडून काही वारसा मिळू शकत नाही. तुम्ही आपसात भाऊ-भाऊ आहात. भावाची आठवण केल्याने काही वारसा मिळणार नाही. हा (ब्रह्मा दादा) देखील तुमचा भाऊ आहे, स्टुडंट आहे ना. शिकत आहे, यांच्याकडून वारसा मिळणार नाही. हे स्वतःच वारसा घेत आहेत - शिवबाबांकडून. सर्वात पहिले हे (ब्रह्मा बाबा) ऐकतात. ब्रह्मा बाबा बोलले - ‘बाबांना म्हणतो - बाबा, मी तर तुमचा सर्वात पहिला मुलगा आहे. तुमच्याकडून मी कल्प-कल्प वारसा घेतो. कल्प-कल्प तुमचा रथ बनतो’. ब्रह्मा शिवबाबांचा रथ आहे. ब्रह्मा द्वारे विष्णुपुरीची स्थापना. तुम्ही ब्राह्मण देखील मदतगार आहात, नंतर मग तुम्ही मालक बनाल. आता तुम्ही जाणता आम्ही ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे बाबांकडून राज्य-भाग्य घेत आहोत, ज्यांनी कल्पापूर्वी राज्य-भाग्य घेतले आहे, तेच येतील. प्रत्येकाच्या पुरुषार्थावरून समजते - कोण महाराजा-महाराणी बनतील, कोण प्रजा बनतील. शेवटी तुम्हाला सर्व साक्षात्कार होईल. सर्व आधार पुरुषार्थावर आहे. कुर्बान देखील जायचे आहे. बाबा म्हणतात - मी गरीब-निवाज (दीनानाथ) आहे. तुम्ही गरीबच माझ्यावर कुर्बान जाता. दान नेहमी गरिबांनाच दिले जाते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती कॉलेज उभारते, ते काही गरीबांना दिलेले दान नसते किंवा ते काही ईश्वराच्या नावाने केलेले कार्य नसते, परंतु दान तर करतात ना. कॉलेज उघडतात तर त्यांना त्याचे फळ मिळते ते म्हणजे, दुसऱ्या जन्मामध्ये ते उच्च शिक्षण प्राप्त करतात. हा आशीर्वाद मिळतो. भारतातच सर्वात जास्त दान-पुण्य केले जाते. यावेळी तर जास्त दान केले जाते. तुम्ही बाबांना दान करता. बाबा तुम्हाला दान करतात. तुमचे अवगुण घेऊन तुम्हाला विश्वाची बादशाही देतात. या वेळी तुम्ही तन-मन-धन सर्व बाबांना दान देता. ते लोक तर मृत्यूपूर्वी आपले विल (मृत्युपत्र) करून जातात. अमुक आश्रमाला द्या किंवा हे आर्य समाजाने घ्यावे. खरे तर दान गरीबांना द्यायचे असते, जे भुकेलेले असतात. आता भारत गरीब आहे ना. स्वर्गामध्ये भारत किती धनवान असतो. तुम्ही जाणता - तिथे जितके धन-धान्य इत्यादी तुमच्याकडे असते तितके इतर कोणाकडेच असू शकत नाही. तिथे तर पैशांची गरजच नसते. मूठभर तांदूळ दान करतात, तर रिटर्नमध्ये २१ जन्मांसाठी महाल मिळतात. जहागिरी देखील मिळेल. आता तत्व देखील तमोप्रधान असल्याकारणाने दुःख देतात, तिथे तत्व सतोप्रधान असतात. तुम्ही जाणता सतयुगामध्ये कोण-कोण येणार. मग द्वापरमध्ये अमके-अमके येतील. कलियुगाच्या अंताला छोट्या-छोट्या फांद्या मठ-पंथ इत्यादी येत राहतात ना. आता तुमच्या बुद्धीमध्ये झाड, ड्रामा इत्यादीचे नॉलेज आहे. बाबांच्या पार्टला देखील तुम्ही जाणता. महाभारत लढाईमध्ये दाखवतात की, ५ पांडव वाचले. अच्छा, त्यानंतर मग काय झाले? जरूर, जे राजयोग शिकले तेच जाऊन राज्य करतील ना. पूर्वी तुम्ही देखील काहीही जाणत नव्हता. बाबा (ब्रह्मा बाबा) देखील गीता इत्यादी वाचत होते. नारायणाची भक्ती करत होते. गीतेवर देखील खूप प्रेम होते. ट्रेनमधून जात असत तेव्हा देखील गीता वाचत असत. आता बघतात की, काहीच समजले नव्हते, जणू डब्बी मध्ये खपरी. भक्तिमार्गामध्ये जे काही करत आले, परंतु उद्धार तर झाला नाही. दुनियेमध्ये किती भांडणे चालू आहेत. इथे देखील सगळेच काही पवित्र तर बनू शकत नाहीत, म्हणून भांडणे होतात. बाबांकडे शरण घेतात देखील आणि मग म्हणतात आजार उलटेल जरूर. मुले इत्यादींची आठवण येईल, याबाबतीत नष्टोमोहा बनावे लागेल. असे समजायचे आहे की आपण मेलो. बाबांचे बनलो जणू या दुनियेपासून मेलो. म्हणजे मग शरीराचे भान राहत नाही. बाबा म्हणतात - देहासहित जी काही नाती आहेत त्यांना विसरायचे आहे. या दुनियेमध्ये जे काही बघता ते जणू काही अस्तित्वातच नाही, असे समजा. हे जुने शरीर देखील सोडायचे आहे. आपल्याला आता घरी जायचे आहे. घरी जाऊन मग परत येऊन नवीन सुंदर शरीर घेणार. आता श्याम आहोत, नंतर सुंदर बनणार. भारत आता श्याम (पतित) आहे नंतर सुंदर (पावन) बनेल. आता भारत काट्यांचे जंगल आहे. सर्व एकमेकांना त्रास देत राहतात. क्षुल्लक गोष्टीवरून संतापतात तर शिवीगाळ करू लागतात. तुम्हा मुलांना घरामध्ये देखील खूप गोड बनून राहायचे आहे. नाहीतर लोक म्हणतील याने तर ५ विकारांचे दान दिले आहे आणि मग क्रोध का करत आहेत. कदाचित क्रोध दानामध्ये दिलेला नाहीये. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, झोळीमध्ये ५ विकार दानामध्ये द्या तेव्हाच तुमचे ग्रहण सुटेल. चंद्राला ग्रहण लागते ना. तुम्ही देखील आता संपूर्ण बनत आहात, तर बाबा म्हणतात - हे विकार दानामध्ये द्या. तुम्हाला स्वर्गाची बादशाही मिळत आहे. आत्म्याला बाबांकडून वारसा मिळतो. आत्मा म्हणते, या जुन्या दुनियेमध्ये फार थोडा वेळ बाकी आहे, तर बाकी सर्व काम सोडून द्यायचे आहे. कोणतेही विचार सोडून दिले पाहिजेत. बाबा जाणतात, अनेक प्रकारचे विचार येतील. धंद्याचे विचार येतील. भक्तिमार्गामध्ये भक्ती करतेवेळी ग्राहक, काम-धंदा आठवतो तेव्हा मग स्वतःला चिमटा काढतात. मी नारायणाच्या आठवणीमध्ये बसलो आहे तर मग या गोष्टींची आठवण का आली! तर इथे देखील असेच होते. जेव्हा या रुहानी सेवेमध्ये चांगल्या प्रकारे व्यस्त होतात तेव्हा मग सांगितले जाते - ‘ठीक आहे, तो काम-धंदा सोडून द्या’. बाबांच्या सेवेमध्ये लागा. म्हणतात ना - सोडाल तर सुटेल. देह-अभिमान सोडत जा. फक्त बाबांची आठवण करा तेव्हाच ‘बंदर’ से ‘मंदिर’ लायक बनाल. भ्रामरीचे, कासवाचे सर्वांची उदाहरणे बाबा देतात जी नंतर भक्तिमार्गामध्ये ते लोक दृष्टांत म्हणून देतात. आता तुम्ही जाणता किडे कोण आहेत. तुम्ही ब्राह्मणी आहात. तुम्ही भू-भू करता. हा दृष्टांत आताचा आहे. ते लोक हे सांगू शकणार नाहीत. सण-उत्सव इत्यादी सर्व या वेळचे आहेत. सतयुग, त्रेतामध्ये काही सण-उत्सव नसतात. हे सर्व आहेत भक्तिमार्गाचे.

आता बघा श्रीकृष्ण जयंती होती. श्रीकृष्णाची मातीची मूर्ती बनवून तिची पूजा केली आणि मग नेऊन विसर्जित केली. आता तुम्ही समजता हे काय करत आहेत. ही आहे अंधश्रद्धा. तुम्ही कोणाला सांगाल तरी त्यांना समजणार नाही. एखाद्याला आजार इत्यादी झाला तर म्हणतील - बघ, तू श्रीकृष्णाची पूजा सोडून दिलीस म्हणून तुझी ही हालत झाली आहे. असे बरेच जण आश्चर्यवत सुनन्ती, कथन्ती, भागन्ती होतात, म्हणून ब्राह्मणांची माळ बनू शकत नाही. उच्च ते उच्च हे ब्राह्मण कुलभूषण आहेत. परंतु त्यांची माळा बनू शकत नाही. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की ही शिवबाबांची माळ आहे; नंतर मग आम्ही सतयुगामध्ये जाऊन नंबरवार विष्णूच्या माळेचे मणी बनणार. तुमचा एक-एक शब्द असा आहे जो कोणीही समजू शकत नाही. बाबा शिकवत राहतात. वृद्धी होत राहते. प्रदर्शनीमध्ये कित्ती येतात. म्हणतात देखील - आम्ही देखील येणार येऊन समजून घेणार आणि मग घरी गेले आणि संपले. तिथले तिथेच राहिले. म्हणतात - ईश्वराला भेटण्याचा मार्ग खूप चांगला सांगतात. परंतु आपण त्यावर चालावे, वारसा घ्यावा, हे काही बुद्धीमध्ये येत नाही. ब्रह्माकुमारी खूप चांगली सेवा करत आहेत. बस्स, अरे तुम्ही देखील येऊन समजून घ्या ना. भौतिक सेवा करत राहता. आता ही रूहानी सेवा करा. सोसायटीची सेवा तर सर्व मनुष्य करत असतात. फुकटचे तर कोणी सेवा करत नाहीत. नाहीतर खातील कुठून. आता तुम्ही मुले खूप चांगली सेवा करत आहात. तुम्हाला भारताबद्दल खूप दया वाटते. आपला भारत काय होता आणि मग रावणाने कशी अवस्था केली आहे. आता आपण बाबांच्या श्रीमतावर चालून जरूर वारसा घेणार.

आता तुम्ही जाणता आपण आहोत संगमयुगी, बाकी सर्व आहेत कलियुगी. आपण पार पलीकडे जात आहोत. जे चांगल्या रीतीने बाबांच्या आठवणीमध्ये राहतील ते असे बसल्या-बसल्या आठवण करत-करत शरीर सोडतील. बस्स, त्यानंतर मग आत्मा परत येणार नाही. बसल्या-बसल्या बाबांच्या आठवणीमध्ये गेला. इथे हठयोग इत्यादीची कोणती गोष्ट नाही. जसे तुम्ही बघता की, ते ध्यानामध्ये बसल्या-बसल्या शरीर सोडतात, तसेच तुम्ही बसल्या-बसल्या हे शरीर सोडाल. सूक्ष्मवतन मध्ये जाऊन मग बाबांकडे निघून जाल. जे आठवणीच्या यात्रेसाठी खूप मेहनत घेतील ते असे शरीर सोडतील. साक्षात्कार होतो. जसे सुरुवातीला तुम्हाला खूप साक्षात्कार झाले, तसे शेवटी देखील तुम्ही खूप साक्षात्कार बघाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मंदिर लायक बनण्यासाठी देह-अभिमान सोडून द्यायचा आहे. रुहानी सेवेमध्ये लागायचे आहे.

२) आता घरी जाण्याची वेळ आहे त्यामुळे जो काही कर्मांचा हिशोब आहे, कामधंद्याचे विचार आहेत, त्या सर्वांना काढून टाकायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्याची मेहनत करायची आहे.

वरदान:-
सत्संगाद्वारे रुहानी रंग लावणारे सदा हर्षित आणि डबल लाईट भव

जी मुले बाबांना मनापासून खरा साथीदार बनवतात त्यांना संगतीचा रुहानी रंग सदैव लागलेला राहतो. बुद्धी द्वारा सत् पिता, सत् शिक्षक आणि सद्गुरुची संगत करणे हाच सत्संग आहे. जे या सत्संगामध्ये राहतात ते सदैव हर्षित आणि डबल लाईट राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे ओझे असल्याचा अनुभव होत नाही. ते असा अनुभव करतात की, जणू काही आपण भरपूर आहोत, आनंदाची खाण माझ्यासोबत आहे, जे काही बाबांचे आहे ते सर्व माझे झाले आहे.

बोधवाक्य:-
आपल्या गोड शब्दांनी आणि उमंग-उत्साहाच्या सहयोगाने दिल शिकस्त निराश असणाऱ्याला शक्तिवान बनवा.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

परोपकाराच्या भावनेने संपन्न बनण्याकरिता प्रत्येक आत्म्याच्या गुणांनाच पहा. कोणाची कमजोरी अथवा अवगुण दिसत असताना देखील आपल्या शुभ भावनेद्वारे, सहयोगाच्या कामने द्वारे त्या आत्म्याला देखील गुणवान बनण्याच्या शक्तीचे दान द्या. आपल्या वेळेला, सुखांना, नाव, मान, शान, सर्व प्राप्तींच्या इच्छेला कुर्बान करा, घेण्याच्या इच्छेला सोडून देणारे महादानी बना, तेव्हाच म्हणणार परोपकाराच्या भावनेने संपन्न.