02-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या ड्रामामध्ये महा विनाशाची महत्वाची नोंद आहे, तुम्हाला विनाशाच्या अगोदर कर्मातीत बनायचे आहे”

प्रश्न:-
बाबांच्या कोणत्या शब्दांचे आकर्षण सन्मुख असल्यावर जास्त प्रमाणात होते?

उत्तर:-
जेव्हा बाबा म्हणतात - ‘तुम्ही माझी मुले आहात’, तर या शब्दांचे आकर्षण सन्मुख असताना जास्त वाटते. सन्मुख ऐकल्यामुळे खूप चांगले वाटते. मधुबन सर्व मुलांना आकर्षित करते कारण इथे आहे ईश्वरीय परिवार. इथे ब्राह्मणांचे संघटन आहे. ब्राह्मण आपापसात ज्ञानाचीच देवाणघेवाण करतात.

गीत:-
हमारे तीर्थ न्यारे है…

ओम शांती।
मुले जाणतात की, आपण अविनाशी यात्रेवर अथवा रूहानी यात्रेला जात आहोत, ज्या यात्रेवरून आम्ही पुन्हा मृत्यूलोकमध्ये परत येणार नाही. मनुष्य तर ही गोष्ट जाणतच नाहीत की, अशी देखील कोणती यात्रा असते, जिथून कधी परत यावे लागत नाही. तुम्हा लक्की स्टार्सना (भाग्यवान ताऱ्यांना) आत्ता समजले आहे. हे पक्के लक्षात ठेवायचे आहे. आपण आत्मे पार्ट बजावत आहोत. त्या (या दुनियेतील) नाटकामध्ये असे म्हणणार नाहीत की, मी आत्म्याने हे वस्त्र परिधान करून पार्ट बजावला, आता परत घरी जात आहे. ते तर स्वतःला शरीरच समजतात. इथे तुम्हा मुलांना ज्ञान आहे - आपण आत्मा आहोत, हा शरीररुपी कपडा सोडून मग जाऊन दुसरे घेणार. हे ८४ जन्मांचे जुने कपडे आहेत. हे सोडून नव्या दुनियेत पुन्हा नवीन कपडे (नवीन शरीरे) घेणार. या लक्ष्मी-नारायणाने नवीन कपडे परिधान केले आहेत ना! तुमच्याच राज्यातील आहेत तुम्ही देखील जाऊन असे नवीन दैवी कपडे (नवीन पवित्र शरीरे) धारण कराल. इथे तर म्हणतात - मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाहीं’. बाबाच मग असे गुणवान बनवितात. बाबा म्हणतात, माझा देखील पार्ट आहे, तर मी येऊन तुम्हाला वाईसलेस (निर्विकारी) बनवतो. इथे हे आहे जीवनबंध धाम; रावण राज्य आहे. हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आपण पतितापासून पावन आणि पुन्हा पावनपासून पतित कसे बनतो. तुम्ही मुले जाणता - कलियुग आहे अंध:कार. रावणराज्याचा आता अंत आहे, रामराज्याची आता सुरुवात होणार आहे. आता आहे संगम. कल्पाच्या संगमयुगावर बाबांनाच यावे लागते. दुनियावाले देखील आता हे समजत आहेत की आता विनाशाची वेळ आहे आणि स्थापने-अर्थ भगवान कुठे तरी गुप्त वेषामध्ये आहेत
. आता गुप्त वेषामध्ये तर तुम्ही आत्मे देखील आहात. आत्मा वेगळी आहे, शरीर वेगळे आहे. हा मानवी चोला (ब्रह्मा बाबांचे तन) गुप्त वेष आहे. बाबांना देखील यांच्यामध्येच यायचे आहे. तुमच्या शरीराला नावे दिली जातात, त्यांना (शिवबाबांना) तर शरीर नाहीये. तुम्ही देखील आत्मा आहात, ते देखील आत्मा आहेत. आत्म्याचे आता आत्म्यावर प्रेम जडले आहे. गातात देखील - ‘इतर सर्वांची संगत सोडून तुमची संगत धरू. जसे तुम्ही मोहजीत आहात, तसे आम्ही देखील बनू’. बाबा खूप मोहजीत आहेत. किती असंख्य मुले आहेत, जी काम-चितेवर बसून जळून गेली आहेत. परमपिता परमात्मा येतातच मुळी जुन्या दुनियेचा विनाश करून घेण्यासाठी, तर मग मोह कसा असेल. पतितांचा जेव्हा विनाश होईल तेव्हाच तर शांतीचे राज्य स्थापन होईल. यावेळी सुख तर कोणालाच नाहीये. सगळे तमोप्रधान दुःखी बनले आहेत. ही आहेच पतित दुनिया. शिवबाबाच येऊन स्वर्गाची स्थापना करतात, ज्याचे नाव शिवालय पडले आहे. शिवबाबांनी देवतांचे राज्य स्थापन केले. ते आहे चैतन्य शिवालय आणि ते शिवालय ज्याच्यामध्ये शिवाचे चित्र (शिवलिंग) आहे ते तर जड आहे.

आता तुम्ही समजता की, खरोखर लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते. पूज्य होते, आता पुन्हा पूज्य बनत आहेत. तुम्हाला आता ज्ञान आहे. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्यासमोर डोके टेकणार नाही. तुम्ही तर त्यांच्या राज्यामध्ये चैतन्य मध्ये जाता. जाणता आपण देवता होतो, आता नाही आहोत. जे पूर्वी होऊन गेले आहेत त्यांची चित्रे बनवतात. लक्ष्मी-नारायणची मंदिरे सर्वात जास्त बिर्ला बनवतात. तर त्यांची सुध्दा सेवा केली पाहिजे - ‘तुम्ही ही जी लक्ष्मी-नारायणची मंदिरे बनवता, आम्ही तुम्हाला यांच्या ८४ जन्मांची कहाणी सांगतो’. युक्तीने ही सौगात (लक्ष्मी-नारायणाचे चित्र भेटवस्तू) म्हणून दिली पाहिजे. बाबा सेवेच्या युक्त्या तर सांगतात. मातांनी जाऊन सांगावे - ‘तुम्ही त्यांची मंदिरे तर बनवता परंतु त्यांच्या जीवन कहाणीला काही जाणत नाही. ती आम्ही जाणतो आणि समजावून सांगू देखील शकतो’. समजावून सांगणारी अतिशय रसाळपणे बोलणारी पाहिजे. बाबा देखील बसून समजावून सांगतात ना. बाबा म्हणतात - जर सुट्टी मिळत नसेल तर घरी बसून आठवण करा. हे तर जाणता आपण शिवबाबाची संतान आहोत. मुरली तर मिळतेच. असे नाही की इथे आल्यानेच आठवणीची यात्रा चांगली होईल, घरी बसून आठवण केल्याने आठवणीची यात्रा कमी होईल. ढग येतात रिफ्रेश होण्यासाठी (ताजे-तवाने होण्यासाठी). तुम्ही देखील येता, ताजे-तवाने होण्यासाठी. बाबांकडे सन्मुख जावे. आत्म्याला ज्ञान आहे, सन्मुख ऐकल्यावर चांगले वाटते. गोष्ट तर तीच आहे, बघता - शिवबाबा बसून मुलांना कसे समजावून सांगतात. “मुलांनो तुम्ही माझे आहात”, तुम्ही ८४ जन्मांचा पार्ट बजावला आहे. तुम्ही जन्म-मरणामध्ये येता, मी येत नाही, मी पुनर्जन्म घेत नाही. मी अजन्मा देखील नाहीये. येतो, परंतु वृध्द तनामध्ये प्रवेश करतो. तुम्ही आत्मे छोट्या बाळाच्या शरीरामध्ये प्रवेश करता, मी मात्र परमधामहून खाली पार्ट बजावण्याकरिता येतो. मी विकारीच्या गर्भामध्ये येत नाही. मला म्हणता - ‘त्वमेव माताश्च, पिता…’ माझे कोणी आई-वडील असू शकत नाहीत. मी शरीराचा फक्त आधार घेऊन पार्ट बजावतो. तुम्ही मला दुःख दूर करून सुख देण्याकरिता बोलावता. आता सन्मुख आलो आहे, आत्म्यांशी बोलत आहे. इथे तर सर्व ब्राह्मणच आहेत. तुम्ही बाहेर जाता तर हंस आणि बगळे होऊन जाता, इथे मधुबनमध्ये तुम्हाला संगतच ब्राह्मणांची आहे. आपसामध्ये ज्ञानाच्या गोष्टीच करतील. आम्ही आमचे राज्य स्थापन करत आहोत.

बाबा आलेले आहेत, बाबांची आठवण करण्याची ही युक्ती एकमेकांना सांगत रहा. भोजन करताना देखील एकमेकांना इशारा देत रहा की, बाबांची आठवण करा. खूप मोठे संघटन आहे ना. तिथे तर तुमच्या सोबत विकारी राहतात तर त्यांचे आकर्षण होते. इथे तर कोणाविषयीचे आकर्षण नसते. योद्धे, योध्यांसोबत राहतात. तुमचे हे कुटुंब आहे. बुद्धीमध्ये हेच राहते - जे कोणी भेटेल त्याला बाबांचा परिचय द्यावा की भगवंताची आठवण करत रहा. दोन पिता आहेत ना. लौकिक पिता असताना देखील भगवंताची आठवण करता ना. ते लौकिक पिता आहेत. लौकिक पित्याला गॉडफादर म्हणणार नाही. हे आहेत पारलौकिक पिता, जरूर गॉड फादरकडून वारसा मिळत असेल. अशा प्रकारे भुं-भूं करत रहा. तुम्ही ब्राह्मण आहात ना. संन्याशी देखील भुं-भूं करतात ना. या दुनियेतील सुख काग-विष्ठा समान आहे, किती दुःख आहे. ते तर आहेत हठयोगी, निवृत्ती मार्गवाले, त्यांचा धर्मच वेगळा आहे. तुम्ही जाणता सतयुगामध्ये आपण किती सुखी, पवित्र असतो. भारत पवित्र प्रवृत्ती मार्गवाला होता. देवी-देवतांचे राज्य होते. जे पवित्र होते तेच पतित बनले आहेत. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या’ आणि मग म्हणतात - परमात्मा सर्वव्यापी आहे. आम्ही जाऊन ज्योती-ज्योत मध्ये विलीन होणार. पुनर्जन्माला देखील मानत नाहीत. अनेक मते आहेत ना. दिवसेंदिवस वृद्धी होत राहते. हे देखील सांगायचे आहे की, संन्याशांची वृद्धी कशी होते. नंग्या संन्याशांची देखील वृद्धी होते, ज्याचा जो धर्म आहे, त्यामधेच राहिल्याने मग अंत मति सो गति होते. ज्याचा जे जास्त अभ्यास करतात, जसे कोणी शास्त्र इत्यादी वाचतात तर अंत मति सो गति, मग बालपणातच शास्त्र तोंडपाठ होतात. आता बाबा म्हणतात - ‘मी अमुक आहे’, ‘मी हा आहे’, या सर्व देह-अभिमानाच्या गोष्टी सोडून द्या. स्वतःला अशरीरी आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. या शरीराला दिसत असताना देखील बघू नका. देहा सहित देहाची जी नाती इत्यादी आहेत ती सर्व सोडून. स्वतःला आत्मा निश्चय करा, परमात्म्याची आठवण करा. याला खूप वेळ लागतो. माया आठवण करू देत नाही. नाही तर वानप्रस्थी साठी खूप सोपे आहे. बाबा स्वतः म्हणतात आता तुम्हां लहान-थोर सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. एका बाजूला विनाश देखील होत राहील, दुसऱ्या बाजूला जन्म देखील घेत राहतील. पुनर्जन्म घ्यायचा असेल तर येतील. मुले देखील जन्माला येतील. आणि मग विनाश देखील होईल. हे तर तुम्ही जाणता - कोणी गर्भामध्ये असतील, कोणी कुठे, सर्व नष्ट होतील. सर्व आपला हिशोब चुकता करून परत जातील. हिशोब जर शिल्लक राहिला असेल तर चांगलीच शिक्षा भोगावी लागेल. मग तो देखील हलका होईल. असे नाही की योगामध्ये देखील रहा आणि पाप देखील करत रहा. बरीच मुले एकीकडे चार्ट सुद्धा लिहितात आणि मग म्हणतात मायेने तोंड काळे करून टाकले. मायेने हरवले तर कच्चा होता म्हणणार ना. तर बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्ही असेच समजा की आपण थोडे दिवस इथे आहोत, मग निघून जाऊ. या सर्वांचा विनाश होत आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. आपला चार्ट बघत रहा - मी किती जणांना मार्ग सांगतो आणि पुरुषार्थ करवून घेतो. तन-मन-धनाने रूहानी सेवेमध्ये मदतगार बनावे लागते. म्हणतात - मनाला अमन (शांत) करू शकत नाही. आत्मा तर आहेच शांत. मी आत्मा आपल्या परमधाममध्ये जाऊन बसणार. दुनियेचा कुठलाही संकल्प येणार नाही. असे नाही की डोळे बंद करून अनकॉन्शस (बेशुद्ध) व्हायचे आहे. असे बरेचजण शिकतात देखील. दहा-पंधरा दिवस अनकॉन्शस सुद्धा होतात. हा अभ्यास करतात आणि मग इतक्या वेळानंतर जागे होतात. जसे टाईम बॉम्ब्स असतात त्यांचा देखील टाईम असतो, हे इतक्या तासानंतर फुटतील.

तुम्हा मुलांना माहीत आहे - आपण योग लावत आहोत. जेव्हा तमोप्रधान कचरा निघून जाईल आम्ही सतोप्रधान बनू तेव्हा मग या शरीराला सोडून देणार. आपण आता योगाच्या (आठवणीच्या) यात्रेवर आहोत. वेळ मिळाला आहे, नंतर मग हे शरीर सोडायचेच आहे, त्यानंतर सर्व काही नष्ट होईल. वेळ लिहून ठेवलेली आहे, शेवटी मग मच्छरांसदृश्य शरीर सोडतील. विनाश होईल, तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल आणि मग विनाश सुरू होईल. विनाशाचे दृश्य अत्यंत भयानक आहे. ही ड्रामामध्ये महत्वाची नोंद आहे.

तुम्ही जाणता आपली अवस्था एक रस असेल. सदैव आनंदाने नाचत रहाल. ही दुनिया तर नष्ट होणारच आहे. जाणतात की, कल्प-कल्प संगमयुग असते तेव्हा विनाश होतो. केवळ बॉम्ब्स नाहीत, परंतु नैसर्गिक आपत्ती देखील मदत करतात. तर मुलांच्या बुद्धीमध्ये राहिले पाहिजे - आता आपल्याला जायचे आहे. जितकी बाबांची आठवण कराल तेवढी विकर्म विनाश होतील, उच्च पद प्राप्त कराल. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. प्रयत्न केला पाहिजे. कन्या ती जी माहेरचा आणि सासरचा उद्धार करेल. तर चॅरिटी बिगिन्स ॲट होम झाले ना. सदैव सेवेमध्ये गुंतून राहिले पाहिजे. तुम्ही बोला - ‘शिवबाबा म्हणतात, माझी आठवण कराल तर वारसा मिळेल’. सरळ गोष्ट आहे. मज ‘अल्फ’ची आठवण कराल तर स्वर्गाचा वारसा तुमचा आहे. तुम्ही विश्वाचे मालक बनाल. आता वारसा मिळवायचा असेल तर माझी आठवण करा. हा संदेश देणे मुलांचे कर्तव्य आहे. या पूर्वी देखील दिला होता. सांगायचे आहे - विनाश समोर उभा आहे. कलियुगानंतर सतयुग येईल. बाबाच येऊन वारसा देतात. रावण नरकवासी बनवतो. बाबा येऊन स्वर्गवासी बनवतात. ही कहाणी भारताची आहे. भारतवासीयांना तयार करायचे आहे. पहिले शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन हे ज्ञान समजावून सांगायचे आहे. हे बाबा नवीन सृष्टी रचणारे आहेत. ते म्हणत आहेत - माझी आठवण करा तर तुमची विकर्मे विनाश होतील. हे निराकार बाबा आलेले आहेत. ब्रह्माद्वारे स्वर्गाची स्थापना करत आहेत. आता बाबांची आणि वारशाची आठवण करा. ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. आता आम्ही तुम्हाला सांगतो, तर आता मानणे न मानणे, तुमची मर्जी. गोष्टी तर खूप चांगल्या आहेत. बाबाच दुःख-हर्ता, सुख-कर्ता आहेत. थोडक्यात सांगितले आणि हा निघाला. हाच तुमचा धंदा आहे. मेहनत तर काहीच नाहीये. फक्त तोंडाने बोलायचे आहे - ‘बाबा म्हणतात, माझी आठवण करा. देही-अभिमानी बना’. शिवाच्या पुजाऱ्यांकडे जा मग लक्ष्मी-नारायणाच्या पुजाऱ्यांकडे जा. त्यांना या लक्ष्मी-नारायणाची जीवन कहाणी ऐकवा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) तन, मन, धनाने रूहानी सेवेमध्ये मदतगार बनायचे आहे. सर्वांना ‘अल्फ’चा परिचय देऊन वारशाचा अधिकारी बनवायचे आहे. विनाशाच्या आधी कर्मातीत बनण्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे.

२) पित्या समान मोहजीत बनायचे आहे. आत्म्याचे आत्म्यावर जे प्रेम जडले आहे ते काढून एका बाबांवर प्रेम करायचे आहे.

वरदान:-
सर्वशक्तिमान सोबत असल्याच्या स्मृती द्वारे समस्यांना दूर पळवून लावणारे परमात्म प्रेमी भव

जी मुले परमात्म प्रेमी आहेत ती प्रेमीला सदैव आपल्या सोबत ठेवतात त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होत नाही. ज्यांच्या सोबत स्वयं सर्वशक्तीमान बाबा आहेत त्यांच्या पुढे समस्या टिकू शकत नाही. समस्या उत्पन्न झाली की तिला तिथेच संपवून टाका म्हणजे तिची वाढ होणार नाही. आता समस्यांचा बर्थ कंट्रोल करा. नेहमी हे लक्षात ठेवा की, संपूर्णतेला समीप आणायचे आहे आणि समस्यांना दूर पळवून लावायचे आहे.

बोधवाक्य:-
प्रिय बनण्याचा पुरुषार्थ नको, न्यारे बनण्याचा पुरुषार्थ करा म्हणजे मग आपोआपच प्रिय बनाल.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

वेळोवेळी अनेक प्रकारची विघ्ने येतात, काही चांगले अनन्य विद्यार्थी मायेच्या वशिभूत होऊन अँटी होतात (विरोधात जातात) आणि सेवेमध्ये व्यत्यय आणतात. अशा वेळी तुम्ही घाबरत तर नाही ना! एक असते त्यांच्या प्रति कल्याणाच्या भावनेतून दया बाळगणे, परंतु त्यामुळे अस्वस्थ होणे अथवा व्यर्थ संकल्प चालविणे, हे आहे डगमगणे. जे प्रत्येक आत्म्याच्या पार्टला साक्षी-दृष्टा स्थितीमध्ये राहून बघतात, ते अचल, अडोल, एकरस राहतात.