02-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही डबल अहिंसक रुहानी सेना आहात तुम्हाला श्रीमतावर आपली दैवी
राजधानी स्थापन करायची आहे”
प्रश्न:-
तुम्ही रुहानी
सेवाधारी (आत्मिक सेवाधारी) मुले सर्वांना कोणत्या गोष्टीची चेतावणी देता?
उत्तर:-
तुम्ही सर्वांना चेतावणी देता की ही तीच महाभारत लढाईची वेळ आहे, आता ही जुनी दुनिया
विनाश होणार आहे, बाबा नवीन दुनियेची स्थापना करत आहेत. विनाशानंतर मग जयजयकार होईल.
तुम्हाला आपसात मिळून चर्चा केली पाहिजे की, सर्वांना विनाशा पूर्वी बाबांचा परिचय
कसा मिळेल.
गीत:-
तूने रात
गँवाई सो के…
ओम शांती।
बाबा समजावून सांगत आहेत उच्च ते उच्च आहेत भगवान मग त्यांना उच्च ते उच्च कमांडर
इन चीफ इत्यादी सुद्धा म्हणा कारण तुम्ही सेना आहात ना. तुमचा सुप्रीम कमांडर कोण
आहे? हे देखील जाणता दोन सेना आहेत - ती आहे भौतिक, तुम्ही आहात रुहानी. ते हदचे,
तुम्ही बेहदचे. तुमच्यामध्ये कमांडर्स सुद्धा आहेत, जनरल सुद्धा आहेत, लेफ्टनंट
सुद्धा आहेत. मुले जाणतात - आपण श्रीमतावर राजधानी स्थापन करत आहोत. युद्ध इत्यादीची
तर कोणती गोष्टच नाही. आपण साऱ्या विश्वावर पुन्हा एकदा श्रीमतावर आपले दैवी राज्य
स्थापन करत आहोत. कल्प-कल्प आमचा हा पार्ट बजावला जातो. या सर्व आहेत बेहदच्या
गोष्टी. त्या युद्धांमध्ये अशा गोष्टी असत नाहीत. उच्च ते उच्च बाबा आहेत. त्यांना
जादूगार, रत्नागर, ज्ञानाचा सागर देखील म्हणतात. बाबांची महिमा अपरंपार आहे.
तुम्हाला बुद्धीने फक्त बाबांची आठवण करायची आहे. माया आठवण विसरायला लावते. तुम्ही
आहात डबल अहिंसक रुहानी सेना. तुम्हाला हेच विचार येतात की आम्ही आमचे राज्य कसे
स्थापन करू. ड्रामा जरूर करवेल. पुरुषार्थ तर करायला हवा ना. जी चांगली-चांगली मुले
आहेत, आपसात चर्चा करायला हवी. मायेशी युद्ध तर तुमचे शेवटपर्यंत चालत राहील. हे
देखील जाणता महाभारत लढाई होणार आहे जरूर. नाहीतर जुन्या दुनियेचा विनाश कसा होणार.
बाबा आम्हाला श्रीमत देत आहेत. आम्हा मुलांना पुन्हा आपले राज्य-भाग्य स्थापन करायचे
आहे. या जुन्या दुनियेचा विनाश होऊन पुन्हा भारतामध्ये जयजयकार होणार आहे,
ज्याच्यासाठी तुम्ही निमित्त बनले आहात. तर आपसामध्ये भेटायला हवे की कशा प्रकारे
आपण सेवा करावी. सर्वांना बाबांचा संदेश ऐकवावा की आता या जुन्या दुनियेचा विनाश
होणार आहे. बाबा नवीन दुनियेची स्थापना करत आहेत. लौकिक पिता सुद्धा नवीन घर बनवतात
तर मुलांना आनंद होतो. ती आहे हदची गोष्ट, ही आहे साऱ्या विश्वाची गोष्ट. नवीन
दुनियेला सतयुग, जुन्या दुनियेला कलियुग म्हटले जाते. आता जुनी दुनिया आहे तर हे
माहित असायला हवे की, बाबा कधी आणि कसे येऊन नवीन दुनिया स्थापन करतात. तुमच्यामध्ये
नंबरवार पुरुषार्थानुसार जाणतात. सर्वात मोठे आहेत बाबा, नंतर बाकीचे नंबरवार महारथी,
घोडेस्वार, प्यादे आहेत. कमांडर, कॅप्टन हे तर केवळ उदाहरणा दाखल समजावून सांगितले
जाते. तर मुलांना आपसामध्ये भेटून चर्चा करून ठरवायला हवे की सर्वांना बाबांचा
परिचय कसा द्यावा, ही आहे रुहानी सेवा. आपण आपल्या भाऊ-बहिणींना चेतावणी कशी देता
येईल की बाबा नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी आले आहेत. जुन्या दुनियेचा विनाश देखील
समोर उभा आहे. ही तीच महाभारत लढाई आहे. मनुष्य तर हे देखील समजत नाहीत की महाभारत
लढाई नंतर मग काय!
तुम्ही आता फील करता
की आता आपण संगमावर पुरुषोत्तम बनत आहोत. आता बाबा आले आहेत पुरुषोत्तम बनविण्यासाठी,
यामध्ये युद्ध इत्यादीची कोणती गोष्टच नाही. बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो,
पतित दुनियेमध्ये एकही पावन असू शकत नाही आणि पावन दुनियेमध्ये मग एकही पतित असू
शकत नाही. इतकी छोटीशी गोष्ट सुद्धा कोणी समजत नाहीत. तुम्हा मुलांना सर्व चित्रे
इत्यादींचे सार समजावून सांगितले जाते. भक्तीमार्गामध्ये मनुष्य जप-तप, दान-पुण्य
इत्यादी जे काही करतात, त्याने अल्पकाळासाठी काग विष्ठा समान सुखाची प्राप्ती होते.
परंतु जेव्हा कोणी इथे येऊन समजून घेईल तेव्हा या गोष्टी बुद्धीमध्ये येतील. हे
आहेच भक्तीचे राज्य. ज्ञान रिंचक मात्र सुद्धा नाही. जसे पतित दुनियेमध्ये एकही
पावन नाही, तसे ज्ञान देखील एका शिवाय इतर कोणातही नाही. वेद-शास्त्र इत्यादी सर्व
भक्ती मार्गाची आहेत, शिडी उतरायचीच आहे. आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात, यामध्ये
नंबरवार सेना आहे. मुख्य-मुख्य जे कमांडर, कॅप्टन, जनरल इत्यादी आहेत, त्यांनी
आपसात भेटून चर्चा करायला हवी की, आपण बाबांचा संदेश कसा देऊ शकतो. मुलांना समजावून
सांगितले गेले आहे - मेसेंजर, पैगंबर अथवा गुरु एकच असतो. बाकी सर्व आहेत
भक्तीमार्गाचे. संगमयुगी केवळ तुम्ही आहात. हे लक्ष्मी-नारायण एम ऑब्जेक्ट एकदम
एक्यूरेट आहे. भक्तीमार्गामध्ये सत्यनारायणाची कथा, तिजरीची कथा, अमर कथा बसून
ऐकवतात. आता बाबा तुम्हाला खरी सत्यनारायणाची कथा ऐकवत आहेत. भक्तिमार्गामध्ये
भूतकाळातील गोष्टी, आणि जे होऊन गेले आहेत त्यांची नंतर मंदिरे इत्यादी बनवतात. जसे
शिवबाबा आता तुम्हाला शिकवत आहेत मग भक्तिमार्गामध्ये यादगार बनवतील. सतयुगामध्ये
शिव अथवा लक्ष्मी-नारायण इत्यादी कोणाचेही चित्र नसते. ज्ञान एकदम वेगळे आहे, भक्ती
वेगळी आहे. हे देखील तुम्ही जाणता म्हणून बाबांनी सांगितले आहे - हिअर नो इव्हील,
टॉक नो इव्हील…
तुम्हा मुलांना आता
किती आनंद होतो, नवीन दुनिया स्थापन होत आहे. सुखधामच्या स्थापना अर्थ बाबा आम्हाला
पुन्हा डायरेक्शन देत आहेत, त्यामध्ये देखील नंबर वन डायरेक्शन देतात - पावन बना.
पतित तर सगळेच आहेत ना. तर जी चांगली-चांगली मुले आहेत त्यांनी आपसामध्ये भेटून
चर्चा करायला हवी की सेवेची कशी वृद्धी करू शकतो, गरिबांना कशा पद्धतीने संदेश देऊ
शकतो, बाबा तर कल्पापूर्वी प्रमाणे आले आहेत. म्हणतात स्वतःला आत्मा समजून मज
पित्याची आठवण करा. राजधानी जरूर स्थापन होणार आहे. समजतील जरूर. जे देवी-देवता
धर्माचे नाहीत त्यांना समजणार नाही. विनाश काले ईश्वराशी विपरीत-बुद्धी आहेत ना.
तुम्ही मुले जाणता आमचा धनी (मालक) आहे, त्यामुळे तुम्हाला ना विकारामध्ये जायचे आहे,
ना भांडण-तंटे करायचे आहेत. तुमचा ब्राह्मण धर्म खूप श्रेष्ठ आहे. ते शूद्र धर्माचे,
तुम्ही ब्राह्मण धर्माचे. तुम्ही शेंडी ते चरण (तुम्ही उच्च ते नीच). शेंडीच्या वर
आहेत उच्च ते उच्च भगवान निराकार. शेंडी (ब्राह्मण) आणि शिवबाबा यांना या डोळ्यांनी
दिसून येत नसल्या कारणाने विराट रूपामध्ये दाखवत नाहीत. फक्त म्हणतात देवता,
क्षत्रिय, वैश्य, शूद्र. जे देवता बनतात तेच पुन्हा पुनर्जन्म घेऊन क्षत्रिय, वैश्य,
शूद्र बनतात. विराट रूपाचा देखील अर्थ कोणी जाणत नाही. आता तुम्ही समजता तर करेक्ट
चित्र बनवायचे आहे. शिवबाबा देखील दाखवले आहेत आणि ब्राह्मण सुद्धा दाखवले आहेत,
तुम्हाला आता सर्वांना हा मेसेज द्यायचा आहे की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
करा. तुमचे काम आहे मेसेज देणे. जसे बाबांची महिमा अपरंपार आहे, तशी भारताची देखील
खूप महिमा आहे. हे सुद्धा ७ दिवस कोणी ऐकेल तेव्हा बुद्धीमध्ये बसेल. म्हणतात फुरसत
नाही. अरे, अर्धा कल्प बोलावत आला आहात, आता ते प्रॅक्टिकलमध्ये आलेले आहेत. बाबांना
यायचेच आहे अंतिम वेळी. हे देखील तुम्ही ब्राह्मण जाणता नंबरवार पुरुषार्थानुसार.
शिक्षण सुरु केले आणि निश्चय झाला. माशूक आलेला आहे, ज्याला आम्ही बोलावत होतो,
जरूर कोणत्या शरीरामध्ये आला असणार. त्यांना काही आपले शरीर तर नाहीये. बाबा
म्हणतात - मी यांच्यामध्ये (ब्रह्माबाबांमध्ये) प्रवेश करून तुम्हा मुलांना
सृष्टीचक्राचे, रचयिता आणि रचनेचे नॉलेज देतो. हे इतर कोणीही जाणत नाही. हे शिक्षण
आहे. खूप सोपे करून समजावून सांगतात. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला किती श्रीमंत
बनवतो. कल्प-कल्प तुमच्यासारखा पवित्र आणि सुखी कुणीच नाही’. तुम्ही मुले यावेळी
सर्वांना ज्ञान देता. बाबा तुम्हाला रत्नांचे दान देतात, तुम्ही इतरांना देता.
भारताला स्वर्ग बनवता. तुम्ही आपल्याच तन-मन-धनाने श्रीमतानुसार भारताला स्वर्ग
बनवत आहात. किती श्रेष्ठ कार्य आहे. तुम्ही गुप्त सेना आहात, मात्र कोणालाही माहीत
नाहीये. तुम्ही जाणता आपण विश्वाची बादशाही घेत आहोत, श्रीमताद्वारे श्रेष्ठ बनतो.
आता बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. श्रीकृष्ण काही असे म्हणू शकणार
नाही, तो तर प्रिन्स होता. तुम्ही प्रिन्स बनता ना. सतयुग-त्रेतामध्ये पवित्र
प्रवृत्ती मार्ग आहे. अपवित्र राजे पवित्र राजा-राणी लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात.
पवित्र प्रवृत्तीवाल्यांचे राज्य चालते नंतर येतो अपवित्र प्रवृत्ती मार्ग.
अर्धा-अर्धा आहे ना. दिवस आणि रात्र. लाखों वर्षांची गोष्ट असती तर अर्धे-अर्धे काही
होऊ शकणार नाही. लाखो वर्षे असतील तर मग हिंदू जे वास्तविक देवता धर्माचे आहेत
त्यांची संख्या खूप जास्त असायला हवी होती. अगणित असले पाहिजेत. आता तर जनगणना
करतात ना. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे, तरीही पुन्हा होणार. मृत्यू समोर उभा आहे.
ही तीच महाभारत लढाई आहे. तर आपसामध्ये भेटून सेवेचे प्लॅन बनवायचे आहेत. सेवा करतही
राहतात. नवीन-नवीन चित्रे तयार करतात, प्रदर्शनी सुद्धा करतात. अच्छा, अजून काय करता
येईल? अच्छा, रुहानी म्युझियम बनवा. स्वतः बघून जातील तर मग इतरांनाही पाठवतील.
गरीब अथवा श्रीमंत धर्माऊ तर काढतात ना. श्रीमंत जास्त काढतात, यामध्ये देखील असे
आहेत. कोणी एक हजार काढतील, कोणी कमी. कोणी तर दोन रुपये सुद्धा पाठवून देतात.
म्हणतात - एका रुपयाची वीट लावा. एक रुपया २१ जन्मांसाठी जमा करा. हे आहे गुप्त.
गरिबाचा १ रुपया श्रीमंताच्या एक हजाराच्या बरोबरीचा होतो. गरिबाकडे आहेच मुळी थोडे
तर काय करू शकतील. हिशोब आहे ना. व्यापारी लोक धर्माऊ काढतात, मग आता काय करायला हवे.
बाबांना मदत द्यायची आहे. बाबा मग रिटर्नमध्ये २१ जन्मांसाठी देतात. बाबा येऊन
गरिबांना मदत करतात. आता तर ही दुनियाच राहणार नाही. सर्व मातीमध्ये मिसळून जाईल.
हे देखील जाणता - कल्पापूर्वीप्रमाणे स्थापना जरूर होणार आहे. निराकार बाबा म्हणतात
- ‘मुलांनो, देहाच्या सर्व धर्मांचा त्याग करून, एका बाबांची आठवण करा’. ही
ब्रह्माची देखील रचना आहे ना. ब्रह्मा कोणाचा मुलगा, कोणी क्रियेट केला.
ब्रह्मा-विष्णू-शंकराला कसे क्रिएट करतात, हे देखील कोणी जाणत नाही. बाबा येऊन सत्य
गोष्ट समजावून सांगतात. ब्रह्मा देखील जरूर मनुष्य सृष्टीमध्येच असणार. ब्रह्माची
वंशावळ गायली गेली आहे. भगवान, मनुष्य सृष्टीची रचना कशी रचतात, हे कोणीही जाणत नाही.
ब्रह्मा तर इथेच असला पाहिजे ना. बाबा म्हणतात - ज्याच्यामध्ये मी प्रवेश केला आहे,
हा देखील खूप जन्मानंतरचा अंतिम जन्म आहे. याने पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत. ब्रह्मा
काही क्रिएटर नाहीये. क्रिएटर तर एक निराकारच आहे. आत्मे देखील निराकार आहेत. ते तर
अनादि आहेत. कोणी क्रिएट केलेले नाही मग ब्रह्मा कुठून आला. बाबा म्हणतात - मी
याच्यामध्ये प्रवेश करून नाव बदलले. तुम्हा ब्राह्मणांची देखील नावे बदलली. तुम्ही
आहात राजऋषी, सुरुवातीला संन्यास करून एकत्र राहू लागलात तर नावे बदलली. मग पाहीले
की, माया खाऊन टाकत आहे तर मग माळा बनवणे, नावे ठेवणे सोडून दिले.
आजकाल दुनियेमध्ये
प्रत्येक गोष्टीमध्ये फसवणूक खूप आहे. दुधामध्ये सुद्धा फसवणूक करतात. खरी वस्तू तर
मिळतच नाही. पित्याच्या बाबतीतही फसवतात. स्वतःलाच भगवान म्हणवून घेऊ लागतात. आता
तुम्ही मुले जाणता आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे. तुमच्यामध्ये देखील नंबरवार
पुरुषार्थानुसार आहेत. बाबा जाणतात - कोण कसा अभ्यास करतात आणि मग इतरांना शिकवतात,
काय पद प्राप्त करतील. निश्चय आहे आम्ही बाबांद्वारे वर्ल्डचे क्राऊन प्रिन्स बनत
आहोत. तर तसा पुरुषार्थ करून दाखवायचा आहे. आम्ही क्राऊन प्रिन्स बनलो. मग ८४ चे
चक्र फिरलो आता पुन्हा बनत आहोत. हा आहे नरक, यामध्ये काहीही राहिलेले नाही. पुन्हा
बाबा येऊन भंडारा भरपूर करून काल कंटक दूर करतात. तुम्ही सर्वांना विचारा इथे भंडारा
भरपूर करण्यासाठी आला आहात ना. अमरपुरीमध्ये काळ येऊ शकत नाही. बाबा येतातच भंडारा
भरपूर करून काल कंटक दूर करण्यासाठी. ते आहे अमरलोक, हे आहे मृत्युलोक. अशा गोड-गोड
गोष्टी ऐकायच्या आहेत आणि ऐकवायच्या आहेत. फालतू गोष्टी नकोत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबा
विश्वाचा मालक बनण्याचे शिक्षण शिकविण्याकरिता आले आहेत त्यामुळे कधीही असे म्हणू
नका की, आम्हाला फुरसत नाही. श्रीमतावर तन-मन-धनाने भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा
करायची आहे.
२) आपसात खूप गोड-गोड
ज्ञानाच्या गोष्टी ऐकायच्या आहेत आणि ऐकवायाच्या आहेत. बाबांचे हे डायरेक्शन सदैव
लक्षात राहावे - हिअर नो इव्हील, टॉक नो इव्हील…
वरदान:-
हदच्या सर्व
कामनांवर विजय प्राप्त करणारे कामजीत जगतजीत भव
काम विकाराचा अंश
सर्व हदच्या कामना आहेत. कामना एक आहे वस्तूंची, दुसरी आहे व्यक्तीद्वारे हदच्या
प्राप्तीची, तिसरी आहे नाती निभावण्यामध्ये, चौथी आहे सेवेच्या भावनेमध्ये हदच्या
कामनेचा भाव. कोणत्याही व्यक्ती अथवा वस्तू प्रति विशेष आकर्षण असणे - इच्छा नाहीये
परंतु हे आवडते, हा देखील काम विकाराचा अंश आहे. जेव्हा हा सूक्ष्म अंश सुद्धा
नाहीसा होईल तेव्हा म्हटले जाईल - कामजीत जगतजीत.
बोधवाक्य:-
अंतःकरणापासूनच्या भावनेने दिलाराम बाबांचे आशीर्वाद घेण्याचे अधिकारी बना.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
मन जे स्वतः एक
सूक्ष्म शक्ती आहे, ते कंट्रोलमध्ये असावे अर्थात मनाने ऑर्डर प्रमाणे कार्य करावे
तेव्हा पास विद ऑनर किंवा राज्य अधिकारी बनाल. संकल्प शक्तीला जमा करण्याकरिता जो
विचार करता तेच करा, स्टॉप म्हटले तर संकल्प स्टॉप व्हावा, सेवेचा विचार केला तर
सेवेमध्ये लागावे. परमधामचा विचार केला तर परमधाममध्ये पोहोचावे. अशी कंट्रोलिंग
पॉवर वाढवा.