02-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - कधीही थकून आठवणीची यात्रा सोडायची नाही, नेहमी देही-अभिमानी राहण्याचा प्रयत्न करा, बाबांचे प्रेम आकर्षून घेण्यासाठी किंवा स्वीट बनण्यासाठी आठवणीमध्ये रहा”

प्रश्न:-
१६ कला संपूर्ण अथवा परफेक्ट बनण्यासाठी कोणता पुरुषार्थ जरूर करायचा आहे?

उत्तर:-
जितके शक्य असेल स्वतःला आत्मा समजा. प्रेमाचा सागर बाबांची आठवण करा तर परफेक्ट (परिपूर्ण) बनाल. ज्ञान खूप सोपे आहे परंतु १६ कला संपूर्ण बनण्यासाठी आठवणीद्वारे आत्म्याला परफेक्ट बनवायचे आहे. आत्मा समजल्याने गोड बनाल. सगळ्या कटकटी समाप्त होतील.

गीत:-
तू प्यार का सागर है…

ओम शांती।
प्रेमाचा सागर आपल्या मुलांना देखील असा प्रेमाचा सागर बनवितात. मुलांचे एम ऑब्जेक्टच आहे की, आपण असे लक्ष्मी-नारायण बनावे. यांच्यावर सर्वजण किती प्रेम करतात. मुले जाणतात - बाबा आम्हाला यांच्यासारखे गोड बनवतात. गोड इथेच बनायचे आहे आणि बनाल आठवणीने. भारताचा योग गायला गेला आहे, ही आहे आठवण. या आठवणीनेच तुम्ही यांच्यासारखे विश्वाचे मालक बनता. हीच मेहनत मुलांना करायची आहे. तुम्ही या घमेंडीमध्ये येऊ नका की आम्हाला खूप ज्ञान आहे. मूळ गोष्ट आहे - आठवण. आठवणच प्रेम देते. खूप गोड, खूप प्रेमळ बनू इच्छिता, उच्च पद प्राप्त करु इच्छिता तर मेहनत करा. नाहीतर खूप पश्चाताप करावा लागेल कारण खूप मुले आहेत ज्यांना आठवणीमध्ये राहणे जमत नाही, थकून जातात तर मग सोडून देतात. एक तर देही-अभिमानी बनण्यासाठी खूप प्रयत्न करा. नाहीतर खूप कमी पद मिळवाल. तितकेसे स्वीट कधी बनणार नाही. फार थोडी मुले आहेत जी आकर्षित करतात कारण आठवणीमध्ये राहतात. फक्त बाबांचीच आठवण पाहिजे. जितके आठवणीमध्ये रहाल तितके खूप गोड बनाल. या लक्ष्मी-नारायणाने देखील आधीच्या जन्मामध्ये खूप आठवण केली आहे. आठवणीने स्वीट बनले आहेत. सतयुगाचे सूर्यवंशी पहिल्या नंबरमध्ये आहेत, चंद्रवंशी सेकंड नंबर झाले. हे लक्ष्मी-नारायण खूप प्रिय वाटतात. या लक्ष्मी-नारायणाची फीचर्स आणि राम-सीतेच्या फीचर्समध्ये खूप फरक आहे. या लक्ष्मी-नारायणावर कधी कोणता कलंक लावलेला नाही. श्रीकृष्णावर चुकीने कलंक लावले आहेत, राम-सीतेवर देखील लावले आहेत.

बाबा म्हणतात - खूप गोड तेव्हा बनाल जेव्हा स्वतःला ‘आपण आत्मा आहोत’ असे समजाल. आत्मा समजून बाबांची आठवण करण्यामध्ये खूप मजा आहे. जितकी आठवण कराल तितके सतोप्रधान, १६ कला संपूर्ण बनाल. १४ कला तरी देखील डिफेक्टेड (दोषपूर्ण) झाले मग अजूनच डिफेक्ट (दूषित) होत जाते. १६ कला परफेक्ट (परिपूर्ण) बनायचे आहे. नंतर अगदी सोपे आहे. कोणीही शिकतील. ८४ जन्म कल्प-कल्प घेत आले आहेत. आता परत तर कोणी जाऊ शकत नाही, जोपर्यंत पूर्ण पवित्र बनत नाहीत. नाहीतर सजा भोगाव्या लागतात. बाबा वारंवार समजावून सांगतात, सर्वप्रथम जितकी होईल तितकी ही एक गोष्ट पक्की करा की, ‘मी आत्मा आहे’. आपण आत्मे जेव्हा आपल्या घरामध्ये राहतो तेव्हा आपण सतोप्रधान असतो नंतर मग इथे जन्म घेतो. कोणी किती जन्म घेतात, कोणी किती. शेवटी तमोप्रधान बनतात. दुनियेचा तो आदर कमी होत जातो. नवीन घर असते तर त्यामध्ये किती सुख वाटते. मग डिफेक्टेड होते, कला कमी होत जातात. जर तुम्हा मुलांची इच्छा असेल की परफेक्ट दुनियेमध्ये जावे तर परफेक्ट बनायचे आहे. फक्त नॉलेजला परफेक्ट म्हटले जात नाही. आत्म्याला परफेक्ट बनायचे आहे. जितके शक्य असेल तितका प्रयत्न करा - ‘मी आत्मा आहे, बाबांचा मुलगा आहे’. आतून खूप आनंद वाटला पाहिजे. मनुष्य स्वतःला देहधारी समजून खुश होतात. मी अमक्याचा मुलगा आहे… हा आहे अल्पकालीन नशा. आता तुम्हा मुलांना पूर्णत: बाबांसोबत बुद्धी योग लावायचा आहे, यामध्ये गोंधळून जायचे नाही. भले परदेशात कुठेही जा परंतु फक्त एक गोष्ट पक्की करा, की बाबांची आठवण करायची आहे. बाबा प्रेमाचे सागर आहेत. ही महिमा काही कोणत्या मनुष्याची नाही. आत्मा आपल्या पित्याची महिमा करते. सर्व आत्मे आपसामध्ये भाऊ-भाऊ आहेत. सर्वांचे पिता एक आहेत. बाबा सर्वांना म्हणतात - मुलांनो, तुम्ही सतोप्रधान होता, ते आता तमोप्रधान बनला आहात. तमोप्रधान बनल्यामुळे तुम्ही दुःखी बनला आहात. आता मज आत्म्याला परमात्मा बाबा म्हणतात तुम्ही आधी परफेक्ट होता. सर्व आत्मे तिथे (स्वर्गामध्ये) परफेक्टच आहेत. भले पार्ट वेगवेगळा आहे, परंतु परफेक्ट तर आहेत ना. पवित्रतेशिवाय तर तिथे कोणी जाऊ शकत नाहीत. सुखधाममध्ये तुम्हाला सुख देखील आहे तर शांती देखील आहे, म्हणून तुमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. अथाह सुख असते. विचार करा आपण काय बनतो. स्वर्गाचे मालक बनतो. तो आहे हिऱ्यासमान जन्म. आता तर कवडी समान आहे. आता बाबा आठवणीमध्ये राहण्याचा इशारा देतात. तुम्ही बोलावताच की आम्हाला येऊन पतितापासून पावन बनवा. सतयुगामध्ये आहेत संपूर्ण निर्विकारी. राम-सीतेला देखील संपूर्ण म्हणणार नाही. ते सेकंड ग्रेडमध्ये गेले. आठवणीच्या यात्रेमध्ये पास झाले नाहीत. नॉलेजमध्ये भले कितीही हुशार असतील, कधीही बाबांना गोड वाटणार नाहीत. आठवणीमध्ये रहाल तेव्हाच गोड बनाल. मग बाबा देखील तुम्हाला गोड वाटतील. अभ्यास तर अगदी कॉमन आहे, पवित्र बनायचे आहे, आठवणीमध्ये रहायचे आहे. हे व्यवस्थित नोट करा मग हा जो कुठे-कुठे संघर्ष होतो, अहंकार येतो, ते कधीही होणार नाही - आठवणीच्या यात्रेमध्ये राहिल्याने. मूळ गोष्ट आहे - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. दुनियेमध्ये मनुष्य किती भांडण-तंटे करतात. जीवनच जसे की विष समान बनवतात. हे शब्द सतयुगामध्ये असणार नाहीत. पुढे चालून इथे तर मनुष्यांचे जीवन अजूनच विष समान होत जाईल. हा आहेच विषय सागर. सगळे रौरव नरकामध्ये पडले आहेत, खूप घाण आहे. दिवसेंदिवस घाणीची वृद्धी होत राहते. याला म्हटलेच जाते - डर्टी वर्ल्ड. एकमेकांना दुःखच देत राहतात कारण देह-अभिमानाचे भूत आहे. काम विकाराचे भूत आहे. बाबा म्हणतात या भूतांना पळवून लावा. ही भुतेच तुमचे तोंड काळे करतात. काम चितेवर बसून काळे बनतात तेव्हा बाबा म्हणतात - पुन्हा मी येऊन ज्ञान-अमृताची वर्षा करतो. आता तुम्ही काय बनता! तिथे तर हिऱ्यांचे महाल असतात, सर्व प्रकारचे वैभव असते. इथे तर सर्व गोष्टी भेसळयुक्त आहेत. गाईंचे खाणे बघा, सर्व सत्व काढून घेऊन बाकीचे खायला देतात. गाईंना खाणे देखील चांगले मिळत नाही. श्रीकृष्णाच्या गाई बघा कशा फर्स्टक्लास दाखवतात. सतयुगामध्ये अशा काही गाई असतात, काही विचारू नका. बघितल्यावरच प्रसन्न वाटते. इथे तर प्रत्येक वस्तूमधून इसेन्स (सार) काढून टाकतात. ही खूप छी-छी घाणेरडी दुनिया आहे. तुम्हाला यामध्ये मन गुंतवायचे नाहीये. बाबा म्हणतात - तुम्ही किती विकारी बनले आहात. युद्धामध्ये कसे एकमेकांना मारत राहतात. अणुबॉम्ब्स बनविणाऱ्यांचा देखील किती मान आहे, त्याने सर्वांचा विनाश होतो. बाबा बसून सांगतात - आजची माणसे काय आहेत, उद्या काय होतील. आता तुम्ही आहात मध्यभागी. ‘संग तारे कुसंग बोरे’. तुम्ही पुरुषोत्तम बनण्यासाठी बाबांचा हात पकडता. कोणी पोहायला शिकतो तर शिकविणाऱ्याचा हात पकडावा लागतो ना. नाहीतर गुदमरून जाईल, यामध्ये देखील हात पकडायचा आहे. नाहीतर माया ओढून नेते. तुम्ही या साऱ्या विश्वाला स्वर्ग बनविता. स्वतःला त्या नशेमध्ये आणले पाहिजे. आपण श्रीमतावर आपली राजाई स्थापन करत आहोत. सर्व मनुष्य मात्र दान तर करतातच. फकीरांना देतात. तीर्थ यात्रेवर पंडे लोकांना दान देतात, मुठभर तांदुळ तरी जरूर दान करतील. हे सर्व भक्तिमार्गामध्ये चालत येते. आता बाबा आपल्याला डबल दानी बनवितात. बाबा म्हणतात - तीन पावले पृथ्वीवर तुम्हीही ईश्वरीय युनिव्हर्सिटी, ईश्वरीय हॉस्पिटल उघडा ज्यामध्ये मनुष्य २१ जन्मांकरिता येऊन आरोग्य प्राप्त करतील. इथे तर कसले-कसले रोग होतात. रोगराई मध्ये किती दुर्गंधी पसरते. हॉस्पिटलमध्ये बघाल तर किळस वाटते. कर्मभोग किती आहे. या सर्व दु:खांमधून सुटका करण्यासाठी बाबा म्हणतात - फक्त आठवण करा अजून कोणताही त्रास तुम्हाला देत नाही. बाबा जाणतात मुलांनी खूप त्रास बघितला आहे. विकारी मनुष्यांचा चेहराच बदलतो. एकदम जसे की प्रेत बनतात. जसे दारुडा दारू शिवाय राहू शकत नाही. दारूमुळे खूप नशा चढतो परंतु अल्पकाळासाठी. यामुळे विकारी मनुष्यांचे आयुष्य देखील किती कमी होते. निर्विकारी देवतांचे सरासरी आयुर्मान १२५-१५० वर्षांचे असते. एव्हर हेल्दी बनाल तर आयुष्य देखील वाढेल ना. निरोगी काया होते. बाबांना अविनाशी सर्जन देखील म्हटले जाते. ‘ज्ञान इंजेक्शन सद्गुरु दिया अज्ञान अंधेर विनाश’. बाबांना जाणतच नाहीत म्हणून ‘अज्ञान अंधार’ म्हटले जाते, भारतवासीयांचीच गोष्ट आहे. क्राइस्टला तर जाणतात अमक्या संवत मध्ये आला. त्यांची पूर्ण लिस्ट आहे. कसे नंबरवार पोप गादीवर बसतात. एक भारतच आहे जो कोणाची बायोग्राफी जाणत नाही. बोलवतात देखील - ‘हे दु:खहर्ता सुखकर्ता परमात्मा, हे माता-पिता…’ अच्छा, मात-पित्याची बायोग्राफी तरी सांगा. काहीच माहिती नाही.

तुम्ही जाणता - हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. आपण आता पुरुषोत्तम बनत आहोत तर लक्षपूर्वक शिकले पाहिजे. लोकलाज, कुळाच्या मर्यादा यामध्ये देखील खूप अडकून राहतात. या बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) तर कोणाचीही पर्वा केली नाही. किती शिव्या इत्यादी खाल्ल्या, ना मनामध्ये ना चित्तामध्ये. रस्त्याने चालता-चालता ब्राह्मण फसला. बाबांनी ब्राह्मण बनविले तर शिव्या खाऊ लागले. सर्व पंचायत होती एका बाजूला, दादा दुसऱ्या बाजूला. सर्व सिंधी पंचायत म्हणत होती की, ‘हे काय करत आहात!’ अरे, गीतेमध्ये भगवानुवाच आहे ना - काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त केल्याने विश्वाचे मालक बनाल. हे तर गीतेतील शब्द आहेत. माझ्याकडून देखील कोणीतरी बोलवून घेत आहे की, काम विकाराला जिंकल्याने तुम्ही जगतजीत बनाल. या लक्ष्मी-नारायणाने देखील विजय प्राप्त केला आहे ना. यामध्ये युद्ध इत्यादीची कोणती गोष्ट नाही. तुम्हाला स्वर्गाची बादशाही देण्यासाठी आलो आहे. आता पवित्र बना आणि बाबांची आठवण करा. पत्नी म्हणते - मी पावन बनणार, पती म्हणतो - मी बनणार नाही. एक हंस एक बगळा होतो. बाबा येऊन ज्ञान-रत्न टिपणारा हंस बनवितात. परंतु एक बनतो, दुसरा बनत नाही तर भांडण होते. सुरुवातीला तर खूप ताकद होती. आता इतकी हिंमत कोणामध्येच नाहीये. भले म्हणतात आम्ही वारसदार आहोत, परंतु वारसदार बनण्याची गोष्टच वेगळी आहे. सुरुवातीला तर कमालच झाली होती. मोठ-मोठ्या घरातील एका झटक्यात सोडून आले वारसा घेण्यासाठी, तर ते लायक बनले. सर्वप्रथम येणाऱ्यांनी तर कमाल केली. आता असे कोणी विरळेच निघतील. लोकलाज खूप आहे. सुरुवातीला जे आले त्यांनी खूप हिंमत दाखवली. आता कोणी इतके साहस दाखवणे - फार मुश्कील आहे. हां, गरीब ठेवू शकतात. माळेचा मणी बनायचे असेल तर पुरुषार्थ करावा लागेल. माळ तर खूप मोठी आहे. आठची देखील आहे, १०८ ची देखील आहे, तर १६,१०८ ची देखील आहे. बाबा स्वतः सांगतात भरपूर मेहनत करा, स्वतःला आत्मा समजा. परंतु मुले खरे काय ते सांगत नाहीत. जे स्वतःला चांगले-चांगले समजतात, त्यांच्याकडून देखील विकर्म होतात. भले ज्ञानी तू आत्मा आहेत. समजावून चांगले सांगतात परंतु योग नाही आहे, हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत. आठवणीतच राहत नाहीत त्यामुळे हृदयामध्ये स्थान देखील मिळवू शकत नाहीत. आठवणीलाच आठवण मिळते ना. सुरुवातीला एका झटक्यात वारी गेले (आत्मसमर्पण केले.) आता असे वारी जाणे काही मावशीचे घर नाहीये (इतके सोपे नाही). मुख्य गोष्ट आहे - आठवण, तेव्हाच आनंदाचा पारा चढेल. जितक्या कला कमी होत गेल्या तितके दुःख वाढत गेले. आता पुन्हा जितक्या कला वाढतील तितका आनंदाचा पारा चढेल. शेवटी तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील. खूप आठवण करणाऱ्यांना काय पद मिळते. शेवटी खूप साक्षात्कार होतील. जेव्हा विनाश होईल तेव्हा तुम्ही स्वर्गाच्या साक्षात्काराचा हलवा खाल. बाबा वारंवार समजावून सांगतात - आठवणीला वाढवा. कोणाला थोडेसे समजावून सांगितले की एवढ्याने बाबा खुश होत नाहीत. एका पंडिताची देखील कथा आहे ना. म्हणाला - ‘राम-राम म्हटल्याने सागर पार व्हाल’. यातून हेच दाखवतात - निश्चयामध्येच विजय आहे. बाबांविषयी संशय आल्याने विनशन्ती होतात. बाबांच्या आठवणीने पापे नष्ट होतात, रात्रं-दिवस प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मग कर्मेंद्रियांची चंचलता बंद होईल. यामध्ये खूप मेहनत आहे. असे बरेच आहेत ज्यांचा आठवणीचा अजिबात चार्ट नाहीये. म्हणजे जणू फाउंडेशनच नाही आहे. जितके शक्य होईल कसेही करून आठवण करायची आहे तेव्हाच सतोप्रधान, १६ कला बनाल. पवित्रतेसोबत आठवणीची यात्रा देखील पाहिजे. पवित्र राहण्यानेच आठवणीमध्ये राहू शकाल. हा पॉईंट चांगल्या रीतीने धारण करा. बाबा किती निरंहकारी आहेत. पुढे चालून सर्व तुमच्या पायावर लोटांगण घालतील. म्हणतील - खरोखर या माता स्वर्गाचे दार उघडतात. आठवणीचे जौहर (ताकद) अजून कमी आहे. कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्यामध्येच मेहनत आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या पतित छी-छी दुःखदायी दुनियेवर प्रेम करायचे नाही. एका बाबांचा हात पकडून यातून पार जायचे आहे.

२) माळेचा मणी बनण्यासाठी खूप हिंमत ठेवून पुरुषार्थ करायचा आहे. ज्ञान-रत्न टिपणारा हंस बनायचे आहे. कोणतीही विकर्म करायची नाहीत.

वरदान:-
‘निमित्त भाव’ याद्वारे सेवेमध्ये सफलता प्राप्त करणारे श्रेष्ठ सेवाधारी भव

निमित्त भाव - सेवेमध्ये स्वतःच सफलता मिळवून देतो. निमित्त भाव नाही तर सफलता नाही. श्रेष्ठ सेवाधारी अर्थात प्रत्येक पाऊल बाबांच्या पावलावर ठेवणारा. प्रत्येक पाऊल श्रेष्ठ मतावर श्रेष्ठ बनविणारे. जितके सेवेमधून, स्व मधून व्यर्थ समाप्त होते तितकेच समर्थ बनतात आणि समर्थ आत्मा प्रत्येक पावला मध्ये सफलता प्राप्त करते. श्रेष्ठ सेवाधारी तो आहे जो स्वतः देखील सदैव उमंग-उत्साहामध्ये राहील आणि इतरांना देखील उमंग-उत्साह देईल.

बोधवाक्य:-
ईश्वरीय सेवेमध्ये स्वतःला ऑफर करा तर आफरीन (प्रशंसा) मिळत राहील.

अव्यक्त इशारे - सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना:- हा परमात्म प्रेमाचा धागा दूरदूरहून खेचून आणतो. हे असे सुखदायी प्रेम आहे की जर या प्रेमामध्ये एक सेकंद जरी हरवून गेलात तरी अनेक दुःख विसरून जाल आणि कायमसाठी सुखाच्या झुल्यामध्ये झोके घेऊ लागाल. बाबांचे तुम्हा मुलांवर इतके प्रेम आहे की ते तुमच्या जीवनातील सुख-शांतीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. बाबा केवळ सुखच देत नाहीत परंतु सुखाच्या भांडाराचे मालक बनवतात.