02-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, बाबा
आले आहेत तुम्हाला अशी श्रेष्ठ कर्म शिकविण्याकरिता, ज्याद्वारे तुम्ही २१
जन्मांच्या बादशाहीचा वारसा घेऊ शकाल, अटल अखंड राज्याचे मालक बनू शकाल”
प्रश्न:-
गृहस्थी आणि
संन्यासी यांच्या कोणत्या एका सिद्धांतामध्ये फार मोठा फरक आहे?
उत्तर:-
गृहस्थींचा
सिद्धांत आहे (म्हणणे आहे) की, भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येणार जरूर; आणि
संन्याशांचा सिद्धांत आहे की, ‘ब्रह्म’ची आठवण करत-करत ब्रह्ममध्ये विलीन होऊन जाऊ.
आता बाबा समजावून सांगत आहेत - ब्रह्ममध्ये कोणीही विलीन होत नाही. आत्मा अमर आहे
ती विलीन कशी होईल. भगवान जरी आले तरी जरूर टीचर बनून शिकवण देतील. प्रेरणेद्वारे
तर ज्ञान देणार नाहीत ना.
गीत:-
तुम्हें पाके
हमने...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांनी (आत्मिक मुलांनी) हे गाणे ऐकले. हे रुहानी मुलेच म्हणतात की, ‘बाबा’. मुले
जाणतात - हे बेहदचे बाबा, बेहदचे सुख देणारे आहेत, अर्थात ते सर्वांचे पिता आहेत,
त्यांची सर्व बेहदची मुले, आत्मे आठवण करतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आठवण
करतात परंतु त्यांना हे ठाऊक नाहीये की आपल्याला त्या परमपिता परमात्म्याकडून कोणती
बादशाही घ्यायची आहे. तुम्ही जाणता बाबा आपल्याला जी सतयुगी विश्वाची बादशाही देतात
ती अटल, अखंड, अडोल आहे. ती आमची बादशाही २१ जन्म कायम राहते. संपूर्ण विश्वावर आमचे
राज्य असते, ज्याला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, लुटू शकत नाही. आमचे राज्य अडोल
आहे कारण तिथे एकच धर्म असतो, द्वैत नसते. ते आहे अद्वैत राज्य. मुले जेव्हा गाणे
ऐकतात तेव्हा आपल्या राजाईचा नशा बुद्धीमध्ये असला पाहिजे. अशा प्रकारची गाणी
घरामध्ये असायला हवीत, ज्यामुळे बाबांची आणि वारशाची त्वरित आठवण येते. बाबांच्या
आठवणीची मस्ती असणारी गाणी असली पाहिजेत. तुमचे सर्व आहे गुप्त. मोठ्या व्यक्तींचा
तर खूप थाट-माट असतो (दिखावा असतो), तुमच्यामध्ये असा कोणताही बाह्य दिखावा नाही.
तुम्ही पाहता की, ज्यांच्यामध्ये बाबांनी प्रवेश केला आहे त्यांच्यामध्ये देखील
कोणत्याही दिखाव्याची गोष्ट नाहीये. कपडे इत्यादी सर्व तसेच साधारण आहेत. तुम्ही
बुद्धीने समजता की, आम्हाला हे राज्य-भाग्य देण्यासाठी बाबांनी यांच्यामध्ये प्रवेश
केला आहे. मुले हे देखील जाणतात की संपूर्ण सृष्टीमध्ये या वेळी जे काही
मनुष्यमात्र आहेत, सर्व देह-अभिमानामध्ये येऊन अनराइटियस (अधर्मीपणाचे) काम करतात,
म्हणून निर्बुद्ध म्हटले जाते. सर्वांच्या बुद्धीला कुलूप लागलेले आहे. तुम्ही किती
हुशार होता, विश्वाचे मालक होता. आता मायेने अगदी निर्बुध्द बनवले आहे, जे काहीच
कामाचे राहिला नाही आहात. बाबांकडे जाण्यासाठी यज्ञ-तप खूप करतात परंतु मिळत काहीच
नाही. असेच धक्के खात राहतात. कोणीही परमात्म्याला जाणत नाहीत, सर्वव्यापी म्हणतात,
हे देखील किती चुकीचे आहे. बुद्धीमध्ये ‘पिता’ शब्द येत नाही. भले काहीजण म्हणतात
सुद्धा, परंतु ते देखील म्हणण्यापुरते. जर परमपिता
काय चीज आहे ते समजले तर मग बुद्धी एकदम उजळून निघेल. बाबा स्वर्गाचा वारसा देतात,
ते आहेत हेवनली गॉड फादर; तर मग आपण कलियुगी नरकामध्ये का पडून आहोत! आता आपण
मुक्ती-जीवनमुक्ती कशी प्राप्त करू शकतो, हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. आता
तुम्हाला समज मिळाली आहे. बाबांनी आपल्याला ही आठवण करून दिली आहे, जेव्हा नवीन
दुनिया, नवीन भारत होता तेव्हा आपले राज्य होते. एकच मत, एकच भाषा, एकच
महाराजा-महाराणी होते. सतयुगामध्ये म्हटले जाते - महाराजा-महाराणी, त्रेतामध्ये
राजा-राणी म्हटले जाते. त्यानंतर द्वापरमध्ये वाममार्ग सुरू होतो, तर मग
प्रत्येकाच्या कर्मांवर अवलंबून आहे. कर्मानुसार एक शरीर सोडून दुसरे घेतात. आता
बाबा म्हणतात - मी तुम्हाला असे कर्म शिकवतो ज्यामुळे २१ जन्म बादशाहीच प्राप्त करत
रहाल. भले तिथे देखील हदचे पिता मिळतात परंतु तिथे हे ज्ञान नसते की, हा राजाईचा
वारसा बेहदच्या बाबांनी दिलेला आहे.
नंतर द्वापरपासून रावण राज्य सुरू होते तेव्हा विकारी नाते होते. मग जसे कर्म तसे
फळ मिळते, देवता वाम मार्गामध्ये जातात. मग सतयुगाचे सर्व वैभव नष्ट होते. मग
कर्मांच्या अनुसार जन्म घेतात. भारतामध्ये पूज्य राजे होते तसेच पुजारी राजे देखील
होते. सतयुगामध्ये राजा-राणी आणि प्रजा सर्व पूज्य असतात. मग जेव्हा द्वापरमध्ये
भक्ती सुरू होते तेव्हा यथा राजा-राणी तथा प्रजा पुजारी बनते. मोठे राजे जे
सूर्यवंशी होते तेच पुजारी बनतात नंतर मग वैश्यवंशी बनतात. आता तुम्ही व्हाइसलेस
बनता (निर्विकारी बनता). त्याचे प्रारब्ध मग २१ जन्म चालते आणि मग भक्तीमार्ग सुरू
होतो. जे-जे पूज्य देवी-देवता होऊन गेले आहेत, त्यांची मंदिरे बनवून त्यांची पूजा
करतात. हे फक्त भारतातच होते. ही ८४ जन्मांची कहाणी जी बाबा ऐकवत आहेत, ती देखील
भारतवासीयांसाठीच आहे. इतर धर्माचे तर येतातच मागाहून, त्यानंतर मग वृद्धी होत-होत
असंख्य होतात. वेगवेगळ्या देवी-देवतांचे विविध रीती-रिवाज होते, ते भारतातील गुरूंचे
नाहीत. अर्ध्याकल्पानंतर रावणराज्य सुरू झाल्याने सर्व रीती-रिवाजच बदलून जातात; मग
पूज्यपासून पुजारी बनतात. पूजा देखील अगोदर अव्यभिचारी एका शिवाची करतात. त्यांची
मंदिरे बांधतात, नंतर लक्ष्मी-नारायणाची बनवतील. एकाने लक्ष्मी-नारायणाचे मंदिर
बनवले तर दुसरा देखील बनवेल. नंतर मग राम-सीतेचे मंदिर बनवायला लागतील, आणि आता
कलियुगामध्ये पाहा गणेश, हनुमान, चंडिका देवी इत्यादी-इत्यादी अनेक देवींची चित्रे
(मुर्त्या) बनवत राहतात. भक्तिमार्गासाठी सामुग्री देखील पाहिजे ना. ज्याप्रमाणे
बीज किती छोटे असते आणि झाड किती मोठे असते; तसा भक्तीचा विस्तार होत जातो. असंख्य
शास्त्रे तयार केली जातात. आता बाबा मुलांना म्हणतात - ही भक्तिमार्गाची सर्व
सामुग्री नष्ट होणार आहे. आता मज पित्याची आठवण करा. भक्तीचा प्रभाव देखील खूप आहे
ना. किती सुंदरता आहे. नाचणे-गाणे, भजन-कीर्तन इत्यादी, किती खर्च करतात.
आता बाबा म्हणतात - मज पित्याची आणि वारशाची आठवण करा. आदि सनातन धर्माची आठवण करा.
तुम्ही जन्म-जन्मांतर अनेक प्रकारची भक्ती करत आला आहात. गृहस्थ धर्माचेच भक्ती सुरू
करतात. संन्याशांना काही भक्ती करायची नाहीये, यज्ञ-तप, दान-पुण्य, तीर्थ इत्यादी
करणे हे सर्व गृहस्थींचे काम आहे, संन्याशांचे नाही. ते आहेतच निवृत्ती मार्गवाले.
त्यांच्यासाठी नियम आहे - घरदार सोडून जंगलामध्ये जाऊन राहणे आणि ब्रह्म तत्वाचे
स्मरण करणे. ते आहेतच तत्व-ज्ञानी, ब्रह्म-ज्ञानी. तत्वाला अथवा ‘ब्रह्म’लाच ईश्वर
म्हणतात. जसे भारतवासी मूळचे आहेत आदि सनातन देवी-देवता धर्माचे. परंतु
हिंदुस्तानमध्ये राहतात तर आपला धर्म हिंदू समजले आहेत. तसेच संन्यासी देखील
आत्म्यांच्या राहण्याचे स्थान - ‘ब्रह्मतत्वा’ला परमात्मा समजतात. ब्रह्म अथवा
तत्वाचीच आठवण करतात. वास्तविक संन्यासी जेव्हा सतोप्रधान असतात तेव्हा जंगलामध्ये
जाऊन राहतात, शांतीमध्ये राहतात. असे नाही की त्यांना ब्रह्ममध्ये जाऊन विलीन
व्हायचे आहे. बाबा म्हणतात - हे त्यांचे मिथ्या ज्ञान आहे. असे विलीन तर कोणीही होऊ
शकत नाही. आत्मा तर अविनाशी आहे ना, ती कशी लीन होऊ शकते. भक्तिमार्गामध्ये किती
डोकेफोड करत राहतात. मग म्हणतात - ‘भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कधीतरी येऊन
भेटेल’. आता कोण राईट? ते म्हणतात, ‘ब्रह्म’ सोबत योग लावून ब्रह्ममध्ये विलीन होऊ.
गृहस्थी वाले म्हणतात की, भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येईल. पतितांना पावन
बनवेल. असे नाही की वरून प्रेरणेद्वारेच शिकवतील. टीचर घरी बसून प्रेरणा करेल का!
‘प्रेरणा’ शब्दच नाहीये. प्रेरणेने कोणतेही काम होत नाही. जरी ‘शंकराच्या प्रेरणेने
विनाश’, असे म्हटले जाते परंतु खरेतर हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. त्यांना ही मुसळे
(मिसाईल्स) इत्यादी बनवायचीच आहेत. प्रेरणेची गोष्टच नाही. मनुष्य तर म्हणतात की
सर्वकाही भगवंताच्या प्रेरणेने होते किंवा असे म्हणतात की, शंकराचा तिसरा नेत्र
उघडल्याने प्रलय झाला. या सर्व कथा आहेत, काहीही अर्थ समजत नाहीत. कोणाच्याही
मंदिरामध्ये जातील तेव्हा म्हणतील - ‘अच्युतम् केशवम्…’ अर्थ काहीही समजत नाहीत.
कोणीही आपल्या पूर्वजांची (महापुरुषांची) महिमा जाणत नाहीत. धर्म स्थापकांना गुरू
म्हणतात. वास्तविक त्यांना गुरू म्हणणे चुकीचे आहे. क्राईस्ट काही गुरू थोडेच आहेत.
ते तर फक्त धर्म स्थापन करतात. गुरू त्याला म्हटले जाते जो सद्गती करेल. ते (धर्म
स्थापक) तर धर्म स्थापन करण्यासाठी येतात. त्यांच्या मागे त्यांची वंशावळी येते.
सद्गती काही कोणाची करत नाहीत. तर त्यांना गुरू कसे म्हणणार. गुरू तर एकच आहेत,
ज्यांना सर्वांचे सद्गती दाता म्हटले जाते. ईश्वर पिताच येऊन सर्वांची सद्गती करतात.
मुक्ती-जीवनमुक्ती देतात. त्यांची आठवण केल्याविना कोणीही सुटू शकत नाही. मनुष्य,
‘हे भगवान’, ‘हे ईश्वर’ असे म्हणून एका बाबांचीच आठवण करतात कारण ते आहेत सर्वांचे
सद्गती दाता. बाबा समजावून सांगत आहेत की, ही सारी रचना आहे. रचयिता बाबा मीच आहे -
सर्वांना सुख देणारे, वारसा देणारे एक बाबाच आहेत. भाऊ-भावाला वारसा देऊ शकत नाही.
वारसा नेहमी पित्याकडून मिळतो. मी सर्व बेहदच्या मुलांना बेहदचा वारसा देतो म्हणूनच
माझी आठवण करतात - हे परमात्मा क्षमा करा. समजत काहीच नाहीत.
बाबा म्हणतात - मी काही यांच्या बोलावण्यावरून येत नाही. हे तर ड्रामामध्ये ठरलेले
आहे. ड्रामामध्ये माझ्या येण्याचा पार्ट देखील नोंदलेला आहे. अनेक धर्मांचा विनाश,
एका धर्माची स्थापना अथवा कलियुगाचा विनाश, सतयुगाची स्थापना करायची असते. मी आपल्या
ठरलेल्या वेळी आपोआप येतो. हा भक्तिमार्गाचा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. आता
जेव्हा भक्तिमार्गाचा पार्ट पूर्ण झाला आहे तेव्हा मी आलो आहे. बाबा, कल्पापूर्वी
देखील तुम्ही ब्रह्माच्या तनामध्ये आला होता. हे ज्ञान आता तुम्हाला मिळत आहे. नंतर
कधीही मिळणार नाही. हे आहे ज्ञान, ती आहे भक्ती. ज्ञानाचे प्रारब्ध आहे चढती कला.
म्हटले जाते - सेकंदामध्ये जीवनमुक्ती. राजा जनकाला सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळाली
होती ना, परंतु फक्त एका जनकानेच जीवनमुक्ती प्राप्त केली का? जीवनमुक्ती तर
सर्वांना मिळते ना. संपूर्ण विश्वाला मिळते. ‘सद्गती’ अथवा ‘जीवनमुक्ती’ एकच शब्द
आहे. जीवनमुक्ती अर्थात जीवनाला या रावण राज्यामधून मुक्त करतात. बाबा जाणतात
मुलांची किती दुर्गती झाली आहे, अतिशय दुःखी झाले आहेत, त्यांची मग सद्गती होणार आहे.
आधी मुक्ती मध्ये जाऊन नंतर मग जीवनमुक्तीमध्ये येतील. शांतीधाम मधून मग सुखधाममध्ये
येतील. हे चक्राचे रहस्य बाबांनी समजावून सांगितले आहे. बाबा म्हणतात - या वेळी
सृष्टीचे संपूर्ण झाड जडजडीभूत, तमोप्रधान झाले आहे म्हणून कोणीही स्वतःला आदि
सनातन देवी-देवता धर्माचा समजत नाही. आदि सनातन देवी-देवता धर्माचे होते कारण देवता
पवित्र होते. आपण अपवित्र पतित, स्वतःला देवता कसे म्हणवून घेऊ शकतो? म्हणून
सांगितले जाते - या विकारांना सोडत जा. हे विकार इत्यादी अर्ध्याकल्पापासूनचे आहेत.
आता एका जन्मामध्ये यांना सोडणे, यासाठी मेहनत करावी लागते. मेहनती शिवाय थोडेच
विश्वाचे मालक बनाल. बाबांची आठवण कराल तेव्हाच तुम्ही स्वतःला राजाईचा तिलक द्याल
अर्थात राजाईचे अधिकारी बनाल. जितकी चांगल्या प्रकारे आठवण कराल, श्रीमतावर चालाल
तर तुम्ही राजांचाही राजा बनाल. शिकवणारे टीचर तर आले आहेत शिकवायला. ही शाळा आहेच
मुळी मनुष्यापासून देवता बनण्याची. नरापासून नारायण बनण्याची कथा ऐकवतात. ही कथा
किती प्रसिद्ध आहे. याला अमर कथा, सत्य नारायणाची कथा, तिजरीची कथा असेही म्हणतात.
पाहा, किती छान गाणे आहे. बाबा आम्हाला विश्वाचा मालक बनवतात, जो मालकीपणा कोणी लूटू
शकत नाही. कोणताही भूकंप इत्यादी होणार नाही. तिथे विघ्नाची कोणती गोष्टच नसते. असे
अटल, अखंड, पवित्रता, सुख-शांतीचे राज्य तुम्ही आता प्राप्त करत आहात.
कल्पापूर्वीप्रमाणे दर ५ हजार वर्षांनंतर भारत स्वर्ग बनतो. तुम्ही जाणता आपणच सो
देवता होतो आणि मग ८४ जन्म घेता-घेता शेवटी मग असे बनतो. पुन्हा आम्हीच सो देवता
बनणार. याला म्हटले जाते स्वदर्शन चक्रधारी. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपणच
आपल्याला राजाईचा तिलक देण्यासाठी आठवण करण्याची मेहनत करायची आहे. सर्व विकारांना
सोडून द्यायचे आहे.
२) ब्रह्मा बाबांसारखे
साधारण आणि गुप्त राहायचे आहे. बाह्य थाटमाट इत्यादी करायचा नाही. आपल्या भविष्य
राजाईच्या नशेमध्ये राहायचे आहे.
वरदान:-
आपल्या चंचल
वृत्तीला परिवर्तित करून सतोप्रधान वायुमंडळ बनविणारे जबाबदार श्रेष्ठ आत्मा भव
जी मुले आपल्या चंचल
वृत्तीला परिवर्तित करतात तेच सतोप्रधान वायुमंडळ बनवू शकतात कारण वृत्तीने
वायुमंडळ बनते. वृत्ती चंचल तेव्हा होते जेव्हा वृत्तीमध्ये एवढ्या मोठ्या कार्याची
स्मृती राहत नाही. जेव्हा एखादे अति चंचल मूल बिझी असताना देखील चंचलता सोडत नाही
तेव्हा त्याला बांधून ठेवतात. तसेच जर ज्ञान-योगमध्ये बिझी असून देखील वृत्ती चंचल
असेल तर एका बाबांसोबत सर्व नात्यांच्या बंधनामध्ये वृत्तीला बांधून ठेवा म्हणजे मग
सहजच चंचलता नाहीशी होईल.
बोधवाक्य:-
निष्काळजीपणाच्या लाटेला नष्ट करण्याचे साधन आहे - बेहदचे वैराग्य.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
दातापणाचे संस्कार
इमर्ज करून मनसाद्वारे पुण्याचे खाते जमा करा, वाणीद्वारे कमजोर आत्म्यांना
आनंदामध्ये, निराश असणाऱ्यांना शानच्या स्मृतीमध्ये आणि हताश आत्म्यांना
उमंग-उत्साहामध्ये आणा, संबंध-संपर्काद्वारे आत्म्याला आपल्या श्रेष्ठ संगतीचा रंग
अनुभव करवा तेव्हा मग पुण्याचे खाते जमा होत जाईल.