02-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, रावणाच्या मतावर कोणतेही विकर्म करू नका, पतितांना पावन बनण्याचा मार्ग सांगा”

प्रश्न:-
हुशार सेवाभावी मुले कोणता पुरुषार्थ करत असताना कोणत्या एका श्रीमतावर जरूर लक्ष ठेवतील?

उत्तर:-
सेवाभावी मुले उच्च पद प्राप्त करण्यासाठी निरंतर आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करत असताना सदैव या श्रीमतावर लक्ष ठेवतील की, आपल्याला निमित्त बनून अनेक आत्म्यांचे कल्याण करायचे आहे. जे अनेकांचे कल्याण करतात, त्यांचे कल्याण आपोआपच होते.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ...

ओम शांती।
मुलांच्या बुद्धीमध्ये आता नवीन दुनिया आणि जुनी दुनिया दोन्ही आहेत कारण मुले जाणतात की आता जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे आणि नवीन दुनिया बाबाच रचतात. मुले जाणतात की, ‘शिव’ ची जयंती देखील साजरी करतात, ‘रात्र’ देखील साजरी करतात. या दोन्ही शब्दांचा अर्थ दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. शिव जयंती अर्थात ‘शिव’चा जन्म. आता मनुष्याचा जन्म तर साजरा करतात, परंतु ‘शिव’चा जन्म तर होतच नाही. समजत नाहीत की ते जन्म कसा घेतात. श्रीकृष्णा विषयी तर गायले गेले आहे की, त्यांचा जन्म झाला. शिव जयंती विषयी कोणतेही वर्णनच नाहीये. गायले देखील गेले आहे की, परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करतात. ते काय वर सूक्ष्मवतन मध्ये बसून कोणाला प्रेरणा देतात का? असे तर होऊ शकत नाही. आठवण तर पतित-पावन बाबांचीच करतात. जेव्हा बाबा स्वतः येऊन समजावून सांगतील तेव्हाच मनुष्यांच्या बुद्धीमध्ये बसेल. हे ड्रामामध्ये असल्यामुळे, बाबांना संगमावरच यायचे आहे. तुम्ही मुले जाणता की बाबा आलेले आहेत, परंतु अजून पर्यंत क्वचितच कोणी असे समजतात, हे अभिप्रायमध्ये कोणीही लिहित नाही की, ‘खरोखर परमात्मा, ब्रह्मा द्वारे भारताला पुन्हा श्रेष्ठाचारी, सतयुगी दुनिया बनवत आहेत’. यथार्थ रीतीने कोणीही हे समजत नाहीत की, बाबा आलेले आहेत. स्वर्गाच्या राजाईचा वारसा देत आहेत. राजयोग शिकवत आहेत. हजारोंच्या संख्येने येतात, मग त्यापैकी काही टिकून राहतात, त्यामधून देखील येता-येता कमी होत जाते. किती तमोप्रधान-बुद्धी बनले आहेत, जे इतकी सोपी गोष्ट सुद्धा समजू शकत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. हा योग-अग्नी आहे, ज्याद्वारे तुम्ही सतोप्रधान बनाल. कोणतेही विकर्म करू नका. विकर्म करायला लावणारा आहे - रावण, त्याच्या मतावर चालू नका. कोणालाही दुःख देऊ नका. बाबा आले आहेत पतितांना पावन बनविण्याकरिता. बाबा म्हणतात - तुमचा देखील हाच धंदा आहे. दिवस-रात्र हेच चिंतन करा की, आपण पतितांना पावन बनण्याचा मार्ग कसा सांगावा! मार्ग खूप सोपा आहे. योगबला द्वारेच आपण सतोप्रधान बनणार आहोत. हे आहे अविनाशी सर्जनचे औषध. हा काही मंत्र इत्यादी नाहीये. ही तर फक्त बाबांची आठवण करायची आहे. बाबा किती क्लिअर करून समजावून सांगतात. कल्प-कल्प हेच समजावून सांगितले होते. गायले देखील जाते ज्ञान, भक्ती, वैराग्य. वैराग्य कशाचे? या जुन्या छी-छी दुनियेचे. जुन्या दुनियेमध्ये एकदम पाप-आत्मे बनले आहेत. म्हणतात देखील - ‘पतित-पावन, लिबरेटर या’. कशापासून लिबरेट करायचे आहे? दुःखा पासून, रावणराज्या पासून. रावणाला इंग्रजीमध्ये ईव्हिल (सैतान) म्हणतात. तर म्हणतात की, सैतानाच्या राज्यातून मुक्त करून आम्हाला घरी घेऊन जा. आमचे गाईड बनून सोबत घेऊन जा. जसे कोणी जेल मधून सोडवून, खूप प्रेमाने घरी घेऊन जातात. बेहदचे बाबा सर्व मुलांना खात्री देतात की, मी तुमची जेलमधून सुटका करण्यासाठी आलो आहे. मेळे, प्रदर्शनीमध्ये देखील हे मॉडेलच्या रूपामध्ये दाखवले गेले आहे. सर्व कसे जेलमध्ये अडकून पडले आहेत, तरी देखील मनुष्य काही समजतात थोडेच आहेत. बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून सांगून विश्वाचा मालक बनवतात. म्हणतात - माझी आठवण करा, तर तुमची पापे नष्ट होतील. तुम्ही सतयुगाचे मालक बनाल. किती सोपे आहे. कोणत्याही धर्मातील व्यक्ती हे समजू शकेल. सांगितले पाहिजे की, अमुक धर्माची स्थापना केव्हा होते! शेवटी सर्व आत्मे आपल्या-आपल्या सेक्शनमध्ये निघून जातील. मग देवी-देवता धर्म सुरू होईल. ‘ब्रह्मा द्वारे स्थापना’, असे लिहिलेले आहे. त्रिमूर्तीचे चित्र नंबरवन चित्र आहे. त्रिमूर्ती आणि गोळा या चित्रांवरून अगदी क्लिअर समजावून सांगितले जाऊ शकते. हे देखील समजावून सांगितले आहे - एक आहे शांतीधाम, दुसरे आहे सुखधाम आणि हे आहे दुःखधाम. या दुःखधामापासून वैराग्य पाहिजे. आता भक्तीची रात्र पूर्ण झाली आहे, सतयुग-त्रेताचा दिवस सुरू होत आहे.

बाबा म्हणतात - आता जुनी दुनिया नष्ट होणार आहे म्हणून तिच्या पासून वैराग्य पाहिजे. ते (दुनियावाल्यांचे) आहे हदचे वैराग्य, हे आहे बेहदचे वैराग्य. ते संन्यासी इत्यादी काही नवीन दुनिया रचत नाहीत, क्रिएटर तर बाबा आहेत ना. त्यांना म्हटले जाते - हेवनली गॉडफादर, हेवनची स्थापना करणारे. दुसरे कोणीही नाही. हे शिक्षण सतयुगी राजधानी प्राप्त करण्यासाठी आहे. ज्ञान-सागर येऊन ज्ञान देतात. ज्ञान-सागर, पतित-पावन त्यांनाच म्हटले जाते. नॉलेज कशाचे? काय बॅरिस्टर किंवा सर्जनचे नॉलेज देतात का? परमात्म्याला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे नॉलेज सामावलेले आहे - बॅरिस्टरी, इंजिनिअरिंग इत्यादी सर्वांचे मूळ सार आहे - गॉडली नॉलेज. ते भौतिक नॉलेज शिकणे, इंजिनिअर इत्यादी बनणे ही काही मोठी गोष्ट नाहीये. हे तर तुम्ही जाणता की, सतयुगी नवीन दुनियेच्या ज्या रुढी-परंपरा असतील, त्याच तिथे चालतील. जसे आपण कल्पापूर्वी महाल इत्यादी बनवले होते, तसेच पुन्हा रिपीट करु, त्यालाच सतयुग म्हटले जाते. तिथल्या रीति-रिवाजाविषयी मनुष्य जाणत नाहीत. तिथे हिरे-माणकांचे महाल कसे बनतात. त्यांचे गायनच आहे - १६ कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी. जो रीति-रिवाज असेल त्यानुसार राजाई चालेल. ते ड्रामामध्ये नोंदलेले आहे, आत्मे आपला पार्ट बजावतील. घरे कशी बनवतील, कसे राहतील. हे सर्व नोंदलेले आहे. जसे या जुन्या दुनियेचे चालते तसे त्या दुनियेचे चालेल. इथे आहेत असुर, तिथे आहेत देवता. शास्त्रांमध्ये या गोष्टी काहीही नाहीत. ज्ञान आणि भक्ती, गात देखील राहतात - ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. ब्रह्माचेच नाव घेतात, विष्णूचे नाही. ब्रह्माच विष्णू बनतात. ब्रह्मा-सरस्वतीच विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायण आहेत; म्हणून बाबांनी समजावून सांगितले आहे की, लक्ष्मी-नारायणच ८४ जन्मा नंतर हे बनतात. राजयोगाची तपस्या इथेच करतात, सूक्ष्मवतनमध्ये नाही. यज्ञ इत्यादी देखील इथेच रचला जातो. बाबा समजावून सांगत आहेत - हा अंतिम यज्ञ आहे, यानंतर सतयुग-त्रेतामध्ये कोणताही यज्ञ होत नाही. विविध प्रकारचे यज्ञ रचतात, पाऊस पडला नाही तर यज्ञ रचतील. कोणतेही संकट कोसळले तर यज्ञ रचतात, समजतात की यज्ञामुळे दुःख टळेल. हा तर सर्वांत मोठा यज्ञ आहे, ज्या ज्ञान-यज्ञामुळे संपूर्ण सृष्टीचे दुःख दूर होते. हा आहे - ‘राजस्व अश्वमेध अविनाशी ज्ञान यज्ञ’. सगळे यामध्ये स्वाहा होतील. किती चांगल्या रीतीने समजावून सांगितले जाते.

दिल्लीमध्ये मंडप बनवून मेळा केला आहे, हे देखील चांगले आहे. मंडप बनविण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. या हॉलसाठी इतके हैराण व्हावे लागते, त्यापेक्षा आपला मंडप घ्या. छोट्या-छोट्या गावांसाठी छोटा मंडप सुद्धा बनवा. गाव इत्यादीमध्ये वीज नसेल, तर दिवसा देखील प्रदर्शनी होऊ शकते. आपलेच सामान असावे, भाड्याने कशाला घ्यायचे! प्रदर्शनीच्या कमिटीला बाबा डायरेक्शन देत आहेत. वॉटरप्रूफ मंडप बनवा. भले पाऊस पडो, काही हरकत नाही. बाबा जेव्हा दिल्लीला गेले होते तेव्हा थंडीमध्ये देखील मंडपामध्ये जाऊन भाषण करत होते. थंडीसाठी तर सर्वांकडे गरम कपडे असतात. प्रदर्शनीसाठी कितीही मंडप बनवू शकता. कोणी विघ्न आणू नये, म्हणून इन्शुरन्स करून घ्या.

सेवा तर करायचीच आहे ना. समजावून सांगायचे देखील आहे, बाबांचा पूर्ण परिचय द्यायचा आहे. आता तर आपण बाबांसोबत आहोत. ज्ञान-सागर बाबांकडून आपल्याला ज्ञान मिळत आहे. सतयुगामध्ये ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. बाबा म्हणतात - मी सद्गतीकरिता आलो आहे नंतर रावणामुळे दुर्गती होते. सद्गती दाता तर एक बाबाच आहेत. किती क्लिअर करून सांगितले जाते. परंतु स्वतः समजत नाहीत फक्त म्हणतात - हे मनुष्यांसाठी खूप चांगले आहे. बाकी स्वतः समजून घेतील, तर त्यासाठी मात्र सवड नाही. मोठ-मोठ्या लोकांना देखील जाऊन किती समजावून सांगतात. फक्त एवढे समजा की बाबा श्रेष्ठाचारी दुनिया कशी बनवतात. श्रेष्ठाचारी बनविणे हे बाबांचे काम आहे, म्हणूनच तर बाबांना बोलावतात. गात राहतात - ‘दुःख दूर करा, सुख द्या’. हे देखील समजतात की, बाबा येतील तेव्हा आम्ही बलिहार जाणार. श्रीमतावर अचूक चालणार. तरी देखील बाबांच्या श्रीमतावर चालत नाहीत. मनुष्यांना तर हे देखील ठाऊक नाहीये की, भगवान काय चीज आहे. सर्वव्यापी म्हणतात. अरे, पतित-पावन भगवान तर एकच आहेत ना. ते सर्वव्यापी कसे असतील? मग तर सर्वांनाच भगवान म्हटले जाईल. भगवान काही लहान-मोठा थोडाच असतो. प्रदर्शनीमध्ये हे देखील दाखवले आहे - कोणी मांस खातात, कोणी भांडतात... हे सर्व भगवान करतात काय? त्या वेळी मनुष्य खुश होऊन निघून जातात, बाहेर गेले आणि मग तिथले तिथेच राहिले. फक्त प्रजा बनते. राजा बनण्यासाठी किती डोकेफोड करतात. राजा बनण्यासाठी सर्वजण हात वर करतात, आणि मग ५-७ दिवसांनी बघाल तर ते नसतातच. माया किती जबरदस्त आहे, लगेच अडकवून टाकते. राजधानी स्थापन करणे किती अवघड आहे. धर्माची स्थापना करण्यामध्ये इतकी अडचण नाहीये. तिथे काही असुरांची विघ्न थोडीच येतात. इथे मुले म्हणतात की, ‘आम्ही लग्नच करणार नाही’; तर वडील म्हणतात - ‘तुला लग्न तर करावेच लागेल, लग्नाशिवाय दुनिया कशी चालणार’. अरे, लग्न न करणे तर चांगले आहे ना. लग्न केले नाहीत तर मुले देखील होणार नाहीत. बर्थ कंट्रोल (जन्मदर कमी) होईल. बाबा समजावून सांगतात - आता जो करेल तो प्राप्त करेल. पुढे चालून खूप लवकर-लवकर बाबांचे बनतील.

तुम्ही मुले जाणता - कल्पापूर्वी जशी स्थापना झाली होती तशीच होईल. जो दिवस गेला तो कल्पापूर्वी प्रमाणेच गेला, रात्री झोपताना, विचार चालतो - आज संपूर्ण दिवस जे काही झाले ते ड्रामा अनुसार झाले, मग उद्या जे काही होणार असेल ते ड्रामा अनुसारच होईल. तुमच्या शिवाय इतर कोणालाही हे ठाऊक नाही आहे की हा ड्रामा आहे. त्याचा आदि-मध्य-अंत काय आहे! काहीच ठाऊक नाहीये. तुम्हाला माहीत आहे - तुम्ही पुरुषार्थ करता, बाकीचे सर्व तर घोर अंधारामध्ये आहेत. जो काही पार्ट चालतो तो ड्रामा अनुसारच चालतो. आज इथे बसलेले आहात आणि उद्या आजारी पडता, तर ते देखील म्हणाल - ड्रामा अनुसार भोग भोगायचाच आहे. कल्प-कल्प असेच होईल. बुद्धीमध्ये ड्रामा असल्यामुळे कोणतीही चिंता वाटत नाही. विघ्न येतात, कामामध्ये उशीर होतो - तर समजता की कल्प-कल्प असा उशीर झाला असेल. तशी चिन्हे दिसून येत आहेत. उच्च पद प्राप्त करण्यासाठी भरपूर पुरुषार्थ करायचा आहे. पाहायचे आहे की, आपण वर चढत आहोत का? बाबांची सेवा करतो आहोत की एकाच जागी उभे आहोत? आपण कोणाचे कल्याण करतो आहोत का? अनेकांचे कल्याण कराल तर आपले देखील कल्याण होईल. परीक्षा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मग सर्व माहीत होईल की, आपण हे-हे पद प्राप्त करणार आहोत. ही कल्प-कल्पांतराची बाजी आहे. शेवटी मग खूप पश्चात्ताप कराल की आपण इतका वेळ पुरुषार्थ का केला नाही? बाबांच्या श्रीमतावर का चाललो नाही? बाबा फक्त एवढेच सांगतात - मनमनाभव, बस्स. किती प्रेमाने सांगतात - मुलांनो, माझी आठवण करा. इतरांना देखील मार्ग सांगण्याची सेवा करा. पुरुषार्थ करून उच्च पद का प्राप्त करू नये! त्यांनाच हुशार सेवाभावी मुले म्हटले जाईल. शिकविणारे देखील समजतात की हे श्रीमतावर चालत नाहीत, कोणाचे कल्याण करत नाहीत तर जरूर त्यांना पद देखील कमी दर्जाचे मिळेल. जितका अनेकांना मार्ग सांगाल, तितके उच्च पद प्राप्त कराल. स्वतःसाठी सेवा करायची आहे, जो करेल तो प्राप्त करेल. तर हा पुरुषार्थ केला पाहिजे की आपण अशी सेवा का करू नये. जिथे प्रदर्शनी असते तिथे काही जण ऑफिसमधून अर्धादिवस सुट्टी घेऊन देखील जाऊन सेवा करतात. काही जण तर पूर्ण दिवस सुट्टी घेऊन सेवा करतात. बाबा म्हणतात - मुला-बाळांसाठी काही हवे असेल तर पाठवून द्या. शरीर निर्वाह मग हजार रुपयांत करा किंवा १० रुपयांत करा. कोणाकडे खूप पैसे असतात तर लाखो रुपये देखील खर्च होतात. बाबा तर म्हणतात - भले तुम्ही गवत कापत असाल, फक्त बाबांची आठवण करा तर तुम्ही २१ जन्मांकरिता स्वर्गाचे मालक बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सर्वप्रकारच्या चिंतेपासून मुक्त होण्यासाठी ड्रामाला यथार्थ रीतीने बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. जे काही घडून गेले ते कल्पा पूर्वीप्रमाणेच झाले.

२) रात्रं-दिवस हेच चिंतन करायचे आहे की आपण पतितांना पावन बनण्याचा मार्ग कसा सांगावा! श्रीमतानुसार स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करायचे आहे.

वरदान:-
विश्व-परिवर्तनाच्या श्रेष्ठ कार्याची जबाबदारी निभावत असताना डबल लाइट राहणारे आधारमूर्त भव

जे आधारमूर्त असतात त्यांच्यावरच संपूर्ण जबाबदारी असते. आता तुम्ही ज्या रूपामध्ये, जिथे पण पाऊल उचलाल त्यानुसार अनेक आत्मे तुम्हाला फॉलो करतील, ही जबाबदारी आहे. परंतु ही जबाबदारी अवस्थेला बनविण्यासाठी खूप मदत करते कारण यामुळे अनेक आत्म्यांचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे जबाबदारी हलकी होते, ही जबाबदारी थकवा दूर करणारी आहे.

बोधवाक्य:-
मन आणि बुद्धी या दोन्हींचा बॅलन्स ठेवून सेवा केल्याने सफलता मिळते.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

स्वतःचे सर्व खजिने इतर आत्म्यांप्रती दान करणे - हेच परोपकार करणे आहे. असे परोपकारी, स्वतःला सर्व खजिन्यांनी संपन्न बेगमपुरचे बादशहा असल्याचा अनुभव करतील. त्यांच्या संकल्पामध्ये देखील दुःखाचे संस्कार इमर्ज होऊ शकत नाहीत. जिथे सेवा आहे, तिथे कोणाचे कमजोर संस्कार न पाहता, त्यांच्या प्रती दयेची दृष्टी ठेवून, अपकारींवर देखील उपकार करा.