02-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमचा वायदा आहे की, ‘जेव्हा तुम्ही याल तेव्हा आम्ही वारी जाऊ (बलिहार जाऊ)’, आता बाबा आले आहेत - तुम्हाला केलेल्या वायद्याची आठवण करून देण्याकरिता”

प्रश्न:-
कोणत्या एका मुख्य विशेषतेमुळे फक्त देवतांनाच आपण ‘पूज्य’ म्हणू शकतो?

उत्तर:-
देवतांचीच विशेषता आहे जे कधीही कोणाची आठवण करत नाहीत. ना बाबांची आठवण करत, ना कोणाच्या चित्रांची आठवण करतात, म्हणून त्यांना पूज्य म्हणणार. तिथे सुखच सुख असते म्हणून कोणाची आठवण करण्याची गरज नाही. आता तुम्ही एका बाबांच्या आठवणीने असे पूज्य, पावन बनला आहात जे मग आठवण करण्याची गरजच राहत नाही.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुले… आता ‘रुहानी आत्मा’ असे तर म्हणणार नाही. रुह अथवा आत्मा एकच गोष्ट आहे. रुहानी मुलांप्रती बाबा समजावून सांगत आहेत. पूर्वी कधीही आत्म्यांना परमपिता परमात्म्याने ज्ञान दिले नाहीये. बाबा स्वतः म्हणतात - मी एकदाच कल्पाच्या पुरुषोत्तम संगमयुगावर येतो. असे इतर कोणी म्हणू शकत नाही - साऱ्या कल्पामध्ये संगमयुगाशिवाय, बाबा स्वतः कधीच येत नाहीत. बाबा संगमावरच येतात जेव्हा भक्ती पूर्ण होते आणि बाबा पुन्हा मुलांना बसून ज्ञान देतात. स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. हे कित्येक मुलांना खूप कठीण वाटते. आहे खूप सोपे परंतु बुद्धीमध्ये ठीक रीत्या बसत नाही. तर बाबा घडोघडी समजावून सांगत राहतात. समजावून सांगून सुद्धा समजत नाहीत. शाळेमध्ये शिक्षक बारा महिने शिकवतात तरी देखील कोणी नापास होतात. हे बेहदचे पिता देखील दररोज मुलांना शिकवतात. तरीही कोणाला धारणा होते, कोणी विसरून जातात. मुख्य गोष्ट तर हीच सांगितली जाते की, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. बाबाच म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, इतर कोणीही मनुष्यमात्र कधी असे म्हणू शकणार नाहीत. बाबा म्हणतात - मी एकदाच येतो. कल्पानंतर मग संगमावर एकदाच तुम्हा मुलांनाच समजावून सांगतो. तुम्हीच हे ज्ञान प्राप्त करता. दुसरे कोणी हे ज्ञान घेतही नाहीत. प्रजापिता ब्रह्माची तुम्ही मुखवंशावळी ब्राह्मण या ज्ञानाला समजता. जाणता कल्पापूर्वी देखील बाबांनी या संगमावर हे ज्ञान ऐकवले होते. तुम्हा ब्राह्मणांचाच पार्ट आहे, या वर्णांमध्ये फिरायचे तर जरूर आहे. इतर धर्माचे या वर्णांमध्ये येतही नाहीत, भारतवासीच या वर्णांमध्ये येतात. ब्राह्मण देखील भारतवासीच बनतात, म्हणून बाबांना भारतामध्ये यावे लागते. तुम्ही आहात प्रजापिता ब्रह्माची मुखवंशावळी ब्राह्मण. ब्राह्मणांच्या नंतर मग आहेत देवता आणि क्षत्रिय. क्षत्रिय कोणी बनत नाहीत. तुम्हाला तर ब्राह्मण बनवतात मग तुम्ही देवता बनता. तेच मग हळूहळू कला कमी होते तर त्यांना क्षत्रिय म्हणतात. क्षत्रिय ऑटोमॅटिकली बनायचे आहे. बाबा तर येऊन ब्राह्मण बनवतात मग ब्राह्मणा पासून देवता मग तेच क्षत्रिय बनतात. तीनही धर्म एक बाबाच आता स्थापन करतात. असे नाही की सतयुग-त्रेतामध्ये पुन्हा येतात. मनुष्य न समजल्या कारणाने म्हणतात की, सतयुग-त्रेतामध्ये देखील येतात. बाबा म्हणतात - मी युगे-युगे (प्रत्येक युगानंतर) येत नाही, मी येतोच एकदा, कल्पाच्या संगमावर. तुम्हाला मीच ब्राह्मण बनवतो - प्रजापिता ब्रह्माद्वारे. मी तर परमधाम मधून येतो. अच्छा, ब्रह्मा कुठून येतात? ब्रह्मा तर ८४ जन्म घेतात, मी घेत नाही. ब्रह्मा-सरस्वती तेच मग विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायण बनतात, तेच ८४ जन्म घेतात मग त्यांच्या अनेक जन्मांच्या अंतिम जन्माच्या अंताला मी प्रवेश करून यांना ब्रह्मा बनवतो. यांचे ब्रह्मा हे नाव मी ठेवतो. हे काही त्यांचे स्वतःचे नाव नाहीये. मुलाचा जन्म होतो तेव्हा बारसे करतात, जन्मदिवस साजरा करतात; यांचे जन्मपत्रिकेतील नाव तर लेखराज होते. ते नाव तर बालपणी दिले गेले होते. आता नाव बदलले आहे जेव्हा यांच्यामध्ये संगमावर बाबांनी प्रवेश केला आहे. ते देखील नाव तेव्हाच बदलतात जेव्हा हे वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहेत. ते संन्यासी तर घरदार सोडून निघून जातात तेव्हा नाव बदलतात. हे तर घरामध्येच राहतात, यांचे नाव ब्रह्मा ठेवले, कारण ब्राह्मण हवेत ना. तुम्हाला आपले बनवून पवित्र ब्राह्मण बनवतात. पवित्र बनवले जाते. असे नाही की तुम्ही जन्मत:च पवित्र आहात. तुम्हाला पवित्र बनण्याची शिकवण मिळते. कसे पवित्र बनावे? ही आहे मुख्य गोष्ट.

तुम्ही जाणता की भक्तीमार्गामध्ये एकही पूज्य असू शकत नाही. मनुष्य गुरु इत्यादींसमोर डोके टेकतात कारण घरदार सोडून पवित्र बनतात, बाकी त्यांना काही पूज्य म्हणणार नाही. पूज्य तो जो कोणाचीही आठवण करत नाही. संन्यासी लोक ब्रह्म तत्वाची आठवण करतात ना, प्रार्थना करतात. सतयुगामध्ये कोणाचीही आठवण करत नाहीत. आता बाबा म्हणतात - तुम्हाला आठवण करायची आहे एकाची. ती तर आहे भक्ती. तुमची आत्मा देखील गुप्त आहे. आत्म्याला यथार्थ रित्या कोणीही जाणत नाहीत. सतयुग-त्रेतामध्ये देखील शरीरधारी आपल्या नावाने पार्ट बजावतात. नावाशिवाय तर पार्टधारी असू शकत नाही. कुठेही असो शरीराला नाव जरूर दिले जाते. नावाशिवाय पार्ट कसा बजावणार. तर बाबांनी समजावून सांगितले आहे की, भक्तिमार्गामध्ये गातात - तुम्ही याल तर आम्ही तुम्हालाच आपले बनवू, दुसरे कोणीही नाही. ‘आम्ही तुमचेच बनू’, हे आत्मा म्हणते. भक्तिमार्गामध्ये जे कोणी देहधारी आहेत ज्यांची नावे ठेवली जातात, त्यांची आम्ही पूजा करणार नाही. जेव्हा तुम्ही याल तर तुमच्यावरच कुर्बान जाऊ. केव्हा येतील, हे देखील जाणत नाहीत. अनेक देहधाऱ्यांची, नामधाऱ्यांची पूजा करत राहतात. जेव्हा अर्धे कल्प भक्ती पूर्ण होते तेव्हा बाबा येतात. बाबा म्हणतात - तुम्ही जन्म-जन्मांतर म्हणत आले आहात की, आम्ही तुमच्या शिवाय इतर कोणाचीही आठवण करणार नाही. स्वतःच्या देहाची सुद्धा आठवण करणार नाही. परंतु मला जाणतच नाहीत तर आठवण कशी करणार. आता बाबा मुलांना बसून समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा’. बाबाच पतित-पावन आहेत, त्यांची आठवण केल्याने तुम्ही पावन सतोप्रधान बनाल. सतयुग-त्रेतामध्ये भक्ती असत नाही. तुम्ही कोणाचीच आठवण करत नाही. ना बाबांची, ना चित्रांची. तिथे तर सुखच सुख असते. बाबांनी समजावून सांगितले आहे - जितके तुम्ही जवळ येत जाल, कर्मातीत अवस्था होत जाईल. सतयुगामध्ये नवीन दुनियेमध्ये, नवीन घरामध्ये खूप आनंद देखील असतो मग २५ टक्के जुने होते तर जसा स्वर्गच विसरायला होतो. तर बाबा म्हणतात - तुम्ही गात होता - तुमचेच बनणार, तुमचेच ऐकणार. तर जरूर तुम्ही परमात्म्यालाच म्हणता ना. आत्मा परमात्मा पित्यासाठी म्हणते. आत्मा सूक्ष्म बिंदू आहे, तिला बघण्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. आत्म्याचे ध्यान करू शकणार नाही. ‘मी आत्मा इतका छोटा बिंदू आहे’, असे समजून आठवण करणे यामध्ये मेहनत आहे. आत्म्याच्या साक्षात्काराचा प्रयत्न करत नाहीत, परमात्म्यासाठी प्रयत्न करतात; ज्यांच्याबद्दल ऐकले आहे की, ते हजार सूर्यांपेक्षाही तेजोमय आहेत. कोणाला साक्षात्कार झाला तर म्हणतात - अतिशय तेजोमय होता, कारण तेच ऐकलेले आहे. ज्याची नवधा भक्ती करतील, बघतील सुद्धा तेच. नाहीतर विश्वासच बसणार नाही. बाबा म्हणतात - आत्म्यालाच पाहिले नाही आहे तर परमात्म्याला कसे बघणार. आत्म्याला बघूच कसे शकतात, इतर सर्वांच्या शरीराची तर चित्रे आहेत, नावे आहेत, आत्मा आहे बिंदू, अतिसूक्ष्म आहे, तिला कसे बघणार. प्रयत्न खूप करतात, परंतु या डोळ्यांनी बघू शकत नाहीत. आत्म्याला ज्ञानाचे अव्यक्त डोळे मिळतात.

आता तुम्ही जाणता आपण आत्मा किती सूक्ष्म आहोत. मज आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे, जो मला रिपीट करायचा आहे. बाबांचे श्रीमत मिळते श्रेष्ठ बनण्याकरिता, तर त्यावर चालले पाहिजे. तुम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत. खाणे-पिणे देखील रॉयल असायला हवे, वर्तन अतिशय रॉयल पाहिजे. तुम्ही देवता बनता. देवता स्वतः पूज्य आहेत, ते कधी कोणाची पूजा करत नाहीत. ते तर डबल मुकुटधारी आहेत ना. ते कधी कोणाची पूजा करत नाहीत, तर पूज्य झाले ना. सतयुगामध्ये कोणाची पूजा करण्याची गरजच नाही. बाकी हो, एकमेकांचा रिगार्ड (आदर) जरूर ठेवतात. असा प्रणाम करणे, याला रिगार्ड म्हटले जाते. असे नाही मनात त्यांची आठवण करायची आहे. रिगार्ड तर द्यायचाच आहे. जसे प्रेसिडेंट आहेत, सर्व रिगार्ड ठेवतात. जाणतात हे उच्च पदाधिकारी आहेत. नमस्कार थोडाच करायचा आहे. तर बाबा समजावून सांगतात - हा ज्ञान मार्ग अगदीच वेगळी गोष्ट आहे, यामध्ये फक्त स्वतःला आत्मा समजायचे आहे जे तुम्ही विसरला आहात. शरीराच्या नावाची आठवण केली आहे. काम तर जरूर नावानेच करायचे आहे. नावाशिवाय कोणाला बोलवणार तरी कसे. भले तुम्ही शरीरधारी बनून पार्ट बजावता परंतु बुद्धीने शिवबाबांची आठवण करायची आहे. श्रीकृष्णाचे भक्त समजतात की, आपल्याला तर श्रीकृष्णाचीच आठवण करायची आहे. बस्स, जिथे बघतो - कृष्णच कृष्ण आहे. मी सुद्धा कृष्ण - तुम्ही सुद्धा कृष्ण. अरे तुमचे नाव वेगळे, त्यांचे नाव वेगळे… सर्व कृष्णच कृष्ण कसे असू शकतात. सर्वांचे नाव कृष्ण थोडीच असते, जे येते ते बोलत राहतात. आता बाबा म्हणतात - भक्तिमार्गाच्या सर्व चित्र इत्यादींना विसरून एका बाबांची आठवण करा. चित्रांना काही तुम्ही पतित-पावन म्हणत नाही, हनुमान इत्यादी पतित-पावन थोडाच आहे. अनेक चित्रे आहेत, कोणीही पतित-पावन नाहीये. कोणतीही देवी इत्यादी ज्यांना शरीर आहे त्यांना पतित-पावन म्हणणार नाही. ६-८ भुजावाल्या देवी इत्यादी बनवतात, सर्व स्वतःच्या बुद्धीने. हे आहेत कोण, ते काही जाणत नाहीत. ही पतित-पावन पित्याची संतान मदतगार आहेत, हे कोणालाच ठाऊक नाही आहे. तुमचे रूप तर हे साधारणच आहे. ही शरीरे तर नष्ट होतील. असे नाही की तुमची चित्रे इत्यादी राहतील. हे सर्व नष्ट होऊन जाईल. वास्तविक देवी तुम्ही आहात. नाव देखील घेतले जाते - सीता-देवी, अमकी देवी. राम-देवता कधी म्हणणार नाही. अमकी देवी किंवा ‘श्रीमती’ म्हणतात, ते देखील चुकीचे ठरते. आता पावन बनण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. तुम्ही म्हणता देखील - पतितापासून पावन बनवा. असे म्हणत नाही की, लक्ष्मी-नारायण बनवा. पतितापासून पावन देखील बाबाच बनवतात. नरापासून नारायण देखील तेच बनवतात. ते लोक पतित-पावन, निराकाराला म्हणतात. आणि सत्यनारायणाची कथा ऐकवणारे मग दुसरेच दाखवले आहेत. असे तर म्हणत नाहीत की, बाबा, सत्यनारायणाची कथा ऐकवून अमर बनवा, नरापासून नारायण बनवा. फक्त म्हणतात - येऊन पावन बनवा. बाबाच सत्यनारायणाची कथा ऐकवून पावन बनवतात. तुम्ही मग इतरांना सत्यकथा ऐकवता. इतर कोणीही समजू शकणार नाही. तुम्हीच जाणता. भले तुमच्या घरी, मित्र, नातलग, भाऊ इत्यादी आहेत परंतु ते देखील समजत नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वतःला श्रेष्ठ बनविण्यासाठी बाबांचे जे श्रीमत मिळत आहे, त्यावर चालायचे आहे, दैवी गुण धारण करायचे आहेत. खाणे-पिणे, वर्तन सर्व रॉयल ठेवायचे आहे.

२) एकमेकांची आठवण करायची नाही, परंतु रिगार्ड जरूर द्यायचा आहे. पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आणि करवून घ्यायचा आहे.

वरदान:-
नीरस वातावरणामध्ये आनंदाची झलक अनुभव करविणारे एव्हर-हॅप्पी भव

एव्हर हॅप्पी अर्थात कायम आनंदी राहण्याचे वरदान ज्या मुलांना प्राप्त आहे ते दुःखाची लहर उत्पन्न करणाऱ्या वातावरणामध्ये, निरस वातावरणामध्ये, अप्राप्तीचा अनुभव करविणाऱ्या वातावरणामध्ये नेहमी आनंदात राहतील आणि आपल्या आनंदाच्या झलकेने दुःख आणि उदासीनतेच्या वातावरणाला असे परिवर्तित करतील जसा सूर्य अंधाराला परिवर्तित करतो. अंधारामध्ये प्रकाश करणे, अशांतीमध्ये शांती आणणे, नीरस वातावरणामध्ये आनंदाची झलक आणणे याला म्हटले जाते एव्हर हॅप्पी. वर्तमान समयी याच सेवेची आवश्यकता आहे.

बोधवाक्य:-
अशरीरी तो आहे ज्याला शरीराचे कोणतेही आकर्षण स्वतःकडे आकर्षित करत नाही.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.

कर्मातीतचा अर्थ असा नाही की, कर्मापासून अतीत व्हा. कर्मापासून न्यारे नाही, कर्माच्या बंधनामध्ये अडकण्यापासून न्यारे (दूर), याला म्हणतात - कर्मातीत. ‘कर्मयोगाची’ स्थिती ‘कर्मातीत’ स्थितीचा अनुभव करविते. ही कर्मयोगी स्थिती अति प्यारी आणि न्यारी (खुप सुंदर आणि अद्वितीय) स्थिती आहे, या स्थितीमध्ये कोणते कितीही मोठे मेहनतीचे काम असले तरीही असे वाटेल जसे काम करत नाही आहोत परंतु खेळत आहोत.