03-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पावलो-पावली श्रीमतावर चालत रहा, हे ब्रह्माचे मत आहे की शिवबाबांचे आहे, यामध्ये गोंधळून जाऊ नका”

प्रश्न:-
चांगली बुद्धी असणारी मुले कोणती एक गूढ गोष्ट सहजपणे समजू शकतात?

उत्तर:-
ब्रह्माबाबा सांगत आहेत की शिवबाबा - ही गोष्ट चांगली बुद्धी असणारेच सहजपणे समजतील. कोणी तर यामध्येच गोंधळून जातात. बाबा म्हणतात - मुलांनो, बापदादा दोघेही एकत्र आहेत. तुम्ही गोंधळून जाऊ नका. श्रीमत समजून चालत रहा. ब्रह्माच्या मतासाठी देखील शिवबाबा जबाबदार आहेत.

ओम शांती।
रुहानी बाबा मुलांना समजावून सांगत आहेत, तुम्ही समजता आपण ब्राह्मणच रूहानी बाबांना ओळखतो. दुनियेमध्ये कोणीही मनुष्य मात्र रूहानी पिता, ज्यांना गॉड फादर किंवा परमपिता परमात्मा म्हटले जाते, त्यांना जाणत नाहीत. ते रूहानी पिता जेव्हा येतील, तेव्हाच रूहानी मुलांना ओळख देतील. हे नॉलेज ना सृष्टीच्या सुरुवातीला असते आणि ना सृष्टीच्या शेवटी असते. आता तुम्हाला नॉलेज मिळाले आहे, हे आहे सृष्टीच्या अंत आणि आदि यांच्या मधील संगमयुग. या संगमयुगाला देखील कोणीही जाणत नाहीत तर बाबांना तरी कसे जाणू शकतील. म्हणतात - ‘हे पतित-पावन या, येऊन पावन बनवा’; परंतु हेच ठाऊक नाहीये की, पतित-पावन कोण आहेत आणि ते केव्हा येतील. बाबा म्हणतात - मी जो आहे, जसा आहे, मला कोणीही जाणत नाहीत. जेव्हा मी येऊन ओळख देईन तेव्हाच मला जाणतील. मी माझा आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा परिचय संगमयुगावर एकदाच येऊन देतो. कल्पा नंतर पुन्हा येतो. तुम्हाला जे सांगत आहे ते नंतर मग प्राय: लोप होते. सतयुगापासून कलियुगाच्या अंतापर्यंत कोणीही मनुष्य मात्र मज परमपिता परमात्म्याला ओळखत नाहीत. ना ब्रह्मा-विष्णू-शंकराला जाणतात. मला मनुष्यच बोलावतात. ब्रह्मा-विष्णू-शंकर थोडेच बोलावतात. मनुष्य दुःखी होतात तेव्हा बोलावतात. सूक्ष्मवतनची तर गोष्टच नाही. रूहानी बाबा येऊन आपल्या रूहानी मुलांना अर्थात आत्म्यांना बसून सांगत आहेत. अच्छा, रुहानी पित्याचे नाव काय आहे? ज्यांना ‘बाबा’ म्हटले जाते, जरूर काही नाव तर असले पाहिजे. बरोबर नाव एकच गायले जाते - शिव. हे प्रसिद्ध आहे परंतु लोकांनी अनेक नावे ठेवली आहेत. भक्तीमार्गामध्ये आपल्याच बुद्धीने हे लिंगाचे रूप बनवले आहे. तरी देखील नाव ‘शिव’च आहे. बाबा म्हणतात - मी एकदाच येतो. येऊन मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा देतो. मनुष्य भले नाव घेतात, मुक्तिधाम, निर्वाणधाम, परंतु जाणत काहीच नाहीत. ना बाबांना जाणतात, ना देवतांना. हे कोणालाही माहित नाहीये की, बाबा भारतामध्ये येऊन कशी राजधानी स्थापन करतात. शास्त्रांमध्ये देखील अशी कोणती गोष्ट नाहीये की, परमपिता परमात्मा कसे येऊन आदि सनातन देवी-देवतांच्या धर्माची स्थापना करतात. असे नाही सतयुगामध्ये देवतांना ज्ञान होते, जे नष्ट झाले आहे. नाही, जर देवतांमध्ये देखील हे ज्ञान असते तर परंपरेने चालत आले असते. इस्लामी, बौद्ध इत्यादी जे आहेत त्यांचे ज्ञान परंपरेने चालत येते. सर्वजण जाणतात की, हे ज्ञान प्राय: लोप होते. मी जेव्हा येतो तर जे आत्मे पतित बनून राज्य गमावून बसले आहेत त्यांनाच येऊन पुन्हा पावन बनवतो. भारतामध्ये राज्य होते ते कसे गमावले आहे, ते देखील कोणाला माहित नाही आहे म्हणून बाबा म्हणतात - मुलांची बुद्धी किती तुच्छ बनली आहे. मी मुलांना हे ज्ञान देऊन प्रारब्ध देतो आणि मग सर्वजण विसरून जातात. बाबा कसे आले, कसे मुलांना शिक्षण दिले, हे सर्व विसरून जातात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. मुलांना विचार सागर मंथन करण्यासाठी खुप चांगली बुद्धी पाहिजे.

बाबा म्हणतात - ही जी शास्त्रे इत्यादी तुम्ही वाचत आला आहात ही सतयुग-त्रेतामध्ये वाचत नव्हते. तिथे ही शास्त्रेच नव्हती. तुम्ही हे नॉलेज विसरून जाता मग गीता इत्यादी शास्त्र कुठून आले? ज्यांनी गीता ऐकून हे पद प्राप्त केले आहे तेच जाणत नाहीत तर मग इतर कसे जाणू शकतील. देवता देखील जाणू शकत नाहीत. आपण मनुष्यापासून देवता कसे बनलो. तो पुरुषार्थाचा पार्टच बंद झाला. तुमचे प्रारब्ध सुरू झाले. तिथे हे नॉलेज कसे असू शकते. बाबा समजावून सांगत आहेत - हे नॉलेज तुम्हाला पुन्हा मिळत आहे, कल्पापूर्वी प्रमाणे. तुम्हाला राजयोग शिकवून प्रारब्ध दिले जाते. मग तिथे तर दुर्गती (अधोगतीच) नाही. त्यामुळे ज्ञानाचा प्रश्न देखील उत्पन्न होत नाही. ज्ञान आहेच मुळी सद्गती मिळविण्यासाठी. ते देणारे एक बाबाच आहेत. सद्गती आणि दुर्गती हे शब्द इथूनच निघाले आहेत. सद्गतीला भारतवासीच प्राप्त करतात. समजतात हेवनली गॉड फादरने हेवन रचला होता. कधी रचला, हे काहीच माहित नाही. शास्त्रांमध्ये लाखो वर्षे लिहिली आहेत. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्हाला पुन्हा हे नॉलेज देत आहे पुन्हा हे नॉलेज नष्ट होते तेव्हा मग भक्तीमार्ग सुरू होतो. अर्धा कल्प आहे - ज्ञान, अर्धा कल्प आहे - भक्ती. हे देखील कोणी जाणत नाहीत. कलियुगाचा कालावधीच लाखो वर्षे दिला आहे. तर माहित कसे होईल. ५ हजार वर्षांची गोष्ट देखील विसरले आहेत. तर लाखो वर्षांची गोष्ट कशी समजू शकतील. काहीच समजत नाहीत. बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. कल्पाचा कालावधी ५ हजार वर्षांचा आहे. युगेच ४ आहेत. चौघांचाही समान कालावधी १२५० वर्षे आहे. ब्राह्मणांचे हे छोटेसे युग आहे. त्या युगांपेक्षा खूप छोटे आहे. तर बाबा विविध प्रकारे, नवीन-नवीन पॉईंट्स सोप्या पद्धतीने मुलांना समजावून सांगत राहतात. धारणा तुम्हाला करायची आहे. मेहनत तुम्हाला करायची आहे. ड्रामा अनुसार जे सांगत आलो आहे तो पार्ट चालत आला आहे. जे सांगायचे होते तेच आज सांगत आहे. इमर्ज होत राहते. तुम्ही ऐकत जाता. तुम्हालाच धारण करायचे आणि करवून घ्यायचे आहे. मला तर धारण करायचे नाही आहे. तुम्हाला सांगतो, धारण करवून घेतो. मज आत्म्यामध्ये पतितांना पावन बनविण्याचा पार्ट आहे. जे कल्पापूर्वी सांगितले होते तेच निघत राहते. मला आधीपासून ठाऊक नसते की, काय ऐकवणार आहे. भले यांची आत्मा विचार सागर मंथन करत असेल. हे (ब्रह्मा बाबा) विचार सागर मंथन करून ऐकवतात की बाबा ऐकवतात - या खूप गूढ गोष्टी आहेत, यामध्ये खूप चांगली बुद्धी पाहिजे. जे सेवेमध्ये तत्पर असतील त्यांचेच विचार सागर मंथन चालत असेल.

वास्तविक कन्या बंधनमुक्त असतात. त्यांनी या रुहानी शिक्षणाला लागले पाहिजे, बंधन तर कोणते नाही आहे. कुमारी चांगल्या पद्धतीने शिकू शकतात, त्यांनाच शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. त्यांनी कमाई करण्याची गरज नाही. कुमारी जर चांगल्या रितीने हे नॉलेज समजून घेतील तर सर्वात चांगले आहे. हुशार असेल तर बस्स, या रुहानी कमाई मध्ये गुंतेल. बऱ्याचजणी तर आवडीने लौकिक शिक्षण शिकत राहतात. सांगितले जाते - याने काहीच फायदा नाही. तुम्ही हे रुहानी शिक्षण शिकून सेवेला लागा. ते शिक्षण तर काही कामाचे नाही आहे. शिकून निघून जातात गृहस्थ व्यवहारामध्ये. गृहस्थी माता बनतात. कन्यांनी तर या नॉलेजमध्ये व्यस्त झाले पाहिजे. पावलो-पावली श्रीमतावर चालून धारणा करण्यामध्ये गुंतून गेले पाहिजे. मम्मा सुरुवातीपासून आली आणि मग या शिक्षणाला लागली, कितीतरी कुमारी तर गायब झाल्या. कुमारींना चांगला चान्स आहे. श्रीमतावर चालल्या तर एकदम फर्स्टक्लास होतील. हे श्रीमत आहे की ब्रह्मा बाबांचे मत आहे यामध्येच गोंधळून जातात. तरी देखील हा बाबांचा रथ आहे ना. यांच्याकडून काही चूक झाली, तुम्ही श्रीमतावर चालत राहिलात तर ते स्वतःच ठीक करतील. श्रीमत मिळेल देखील यांच्याद्वारे. नेहमी असेच समजले पाहिजे श्रीमत मिळते आहे, मग काहीही झाले - जबाबदार स्वतः बाबा आहेत. यांच्याकडून (ब्रह्मा बाबांकडून) काही झाले, तर बाबा म्हणतात मी जबाबदार आहे. ड्रामामध्ये हे रहस्य नोंदलेले आहे. यांना देखील सुधारू शकतात. तरी देखील पिता आहेत ना. बापदादा दोघेही एकत्र आहेत तर गोंधळून जातात; विचार करतात - माहिती नाही शिवबाबा सांगत आहेत की ब्रह्मा बाबा सांगत आहेत. जर समजले की शिवबाबाच मत देत आहेत तर कधीही डळमळणार नाहीत. शिवबाबा जे समजावून सांगतात ते योग्यच आहे. तुम्ही म्हणता - बाबा, तुम्हीच आमचे पिता-टीचर-गुरु आहात. तर श्रीमतावर चालले पाहिजे ना. जे सांगतील त्याप्रमाणे चाला. नेहमी समजा शिवबाबा सांगत आहेत - ते आहेत कल्याणकारी, यांची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर आहे. त्यांचा रथ आहे ना. गोंधळून का जाता, माहिती नाही हे ब्रह्मा बाबांचे मत आहे की शिवबाबांचे? तुम्ही का नाही समजत की शिवबाबाच सांगत आहेत. श्रीमत जे सांगते ते करत रहा. दुसऱ्याच्या मतावर तुम्ही येताच का? श्रीमतावर चालल्यामुळे कधी भरकटणार नाही. परंतु चालू शकत नाहीत, गोंधळून जातात. बाबा म्हणतात - तुम्ही श्रीमतावर विश्वास ठेवा तर मी जबाबदार आहे. तुम्ही विश्वासच ठेवत नाही तर मग मी देखील जबाबदार नाही. नेहमी समजा श्रीमतावर चालायचे आहे. ते जे सांगतील, भले प्रेम करा, भले मारा... हे त्यांच्यासाठी गायन आहे. यामध्ये लाथ इत्यादी मारण्याचा तर प्रश्नच नाही. परंतु कोणाचा विश्वास बसणेच खूप अवघड आहे. पूर्ण विश्वास बसला तर कर्मातीत अवस्था होईल. परंतु ती अवस्था यायला देखील वेळ पाहिजे. ती होईल शेवटी, यामध्ये खूप दृढ विश्वास पाहिजे. शिवबाबांकडून तर कोणतीही चूक होऊ शकत नाही, यांच्याकडून होऊ शकते. हे दोघे एकत्र आहेत (शिवबाबा आणि ब्रह्माबाबा). परंतु तुम्हाला विश्वास सुद्धा ठेवायचा आहे - शिवबाबा समजावून सांगत आहेत, त्यावर आपल्याला चालायला हवे. तर बाबांचे श्रीमत समजून चालत रहा. तर उलटे सुद्धा सुलटे होऊन जाईल. कधीकधी गैरसमज देखील होतो. शिवबाबा आणि ब्रह्माबाबांच्या मुरलीला सुद्धा खूप चांगल्या रितीने समजून घ्यायचे आहे. बाबांनी सांगितले की यांनी सांगितले. असे नाही की ब्रह्मा बाबा बोलतच नाहीत. परंतु बाबांनी सांगितले आहे - ठीक आहे, असे समजा हे ब्रह्मा बाबा काहीही जाणत नाहीत, शिवबाबाच सर्व काही ऐकवतात. शिवबाबांच्या रथाला स्नान घालतो, शिवबाबांच्या भंडाऱ्याची सेवा करतो - हे लक्षात राहिले तरी सुद्धा खूप चांगले आहे. शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहून काहीही केले तर सर्वांपेक्षा पुढे जाऊ शकता. मुख्य गोष्ट आहेच शिवबाबांच्या आठवणीची. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही). बाकी आहे विस्तार.

बाबा जे समजावून सांगतात त्यावर लक्ष द्यायचे आहे. बाबाच पतित-पावन, ज्ञानाचा सागर आहेत ना. तेच येऊन पतित शूद्रांना ब्राह्मण बनवतात. ब्राह्मणांनाच पावन बनवतात, शूद्रांना पावन बनवत नाहीत, या सर्व गोष्टी कोणत्या भागवत इत्यादीमध्ये नाही आहेत. थोडे-थोडे शब्द आहेत. लोकांना तर हे सुद्धा ठाऊक नाही आहे की राधा-कृष्णच लक्ष्मी-नारायण आहेत. गोंधळून जातात. देवता तर आहेतच सूर्यवंशी-चंद्रवंशी. लक्ष्मी-नारायणाची डिनायस्टी (घराणे), राम-सीतेची डिनायस्टी. बाबा म्हणतात - ‘भारतवासी गोड मुलांनो आठवा - लाखो वर्षांची तर गोष्टच नाही आहे. कालचीच गोष्ट आहे. तुम्हाला राज्य दिले होते. इतके अथाह धन-दौलत दिली’. बाबांनी साऱ्या विश्वाचा तुम्हाला मालक बनवले, इतर कोणते खंड नव्हते, तर तुम्हाला काय झाले! विद्वान, आचार्य, पंडित कोणी सुद्धा या गोष्टींना जाणत नाहीत. बाबाच म्हणतात - ‘अरे भारतवासीयांनो, तुम्हाला राज्य-भाग्य दिले होते ना’. तुम्ही देखील म्हणाल, शिवबाबा म्हणतात - इतके तुम्हाला धन दिले तर तुम्ही कुठे गमावलेत! बाबांचा वारसा किती जबरदस्त आहे. बाबाच विचारतात ना की बाबा निघून गेल्यावर मित्र-संबंधी विचारतात. बाबांनी तुम्हाला इतके धन दिले सगळे कुठे घालवलेत! हे तर बेहदचे बाबा आहेत. बाबांनी कौडीपासून हिऱ्यासारखे बनवले. इतके राज्य दिले मग धन गेले कुठे? तुम्ही काय उत्तर द्याल? कोणाच्याही लक्षात येत नाही आहे. तुम्हाला समजते, बाबा विचारतात ठीक आहे - एवढे गरीब कसे बनलात! आधी सर्व काही सतोप्रधान होते आणि मग कला कमी होत गेली तर सर्व काही कमी होत गेले. सतयुगामध्ये तर सतोप्रधान होते, लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. राधे-कृष्णापेक्षा लक्ष्मी-नारायणाचे नाव जास्त प्रसिद्ध आहे. लक्ष्मी-नारायणा विषयी काही निंदात्मक गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत बाकी सर्वांच्या बाबतीत निंदात्मक गोष्टी लिहिलेल्या आहेत. लक्ष्मी-नारायणाच्या राज्यात कोणी दैत्य इत्यादी असल्याचे सांगत नाहीत. तर या गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. बाबा ज्ञान-धनाने झोळी भरत आहेत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, या मायेपासून सावध रहा’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) समजूतदार बनून खऱ्या सेवेमध्ये लागायचे आहे. जबाबदार एक बाबा आहेत त्यामुळे श्रीमतावर संशय घ्यायचा नाही. निश्चयामध्ये अडोल (दृढ) रहायचे आहे.

२) विचार सागर मंथन करून बाबांच्या प्रत्येक स्पष्टीकरणावर लक्ष द्यायचे आहे. स्वतः ज्ञानाला धारण करून इतरांना सांगायचे आहे.

वरदान:-
आपल्या अनादि-आदि खऱ्या रूपाला रियलाईज करणारे संपूर्ण पवित्र भव आत्म्याच्या अनादि आणि आदि दोन्ही काळाचे खरे स्वरूप पवित्रता आहे. अपवित्रता कृत्रिम आहे, शूद्रांची देणगी आहे. शूद्रांची वस्तू ब्राह्मण वापरू शकत नाहीत त्यामुळे फक्त हाच संकल्प करा की अनादि-आदि रियल रूपामध्ये मी पवित्र आत्मा आहे, कोणालाही बघाल तर त्याच्या खऱ्या रूपाला बघा, खऱ्याला रियलाईज करा, तर संपूर्ण पवित्र बनून फर्स्ट क्लास किंवा एअरकंडिशनच्या तिकिटाचे अधिकारी बनाल.

बोधवाक्य:-
परमात्म आशीर्वादांनी आपली झोळी भरपूर करा म्हणजे मग माया तुमच्याजवळ येऊ शकणार नाही.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. बहुसंख्य मुलांनी आता लोखंडाच्या बेड्या तर तोडल्या आहेत परंतु अति सूक्ष्म आणि रॉयल धागे अजूनही बांधलेले आहेत. बरेचजण आपली पर्सनॅलिटी (व्यक्तिमत्व) उत्तम असल्याचे समजणारे आहेत, स्वतःमध्ये चांगले गुण काही नाही आहेत परंतु त्यांना असे वाटते की, आपण खूप चांगले आहोत, आपण खूप प्रगती करत पुढे जात आहोत. हे जीवनबंधाचे धागे बऱ्याच जणांमध्ये आहेत, बापदादा आता या धाग्यांपासून देखील मुक्त, जीवनमुक्त पाहू इच्छितात.