03-05-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.01.2010 ओम शान्ति
मधुबन
ब्रह्मा बाबांसमान
नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनण्यासाठी, मनाचे टाइम-टेबल बनवून कर्म करत कर्मयोगी
अशरीरी बनण्याचा अभ्यास करा
आज चोहो बाजूंच्या
मुलांमध्ये विशेष स्नेह भरून राहिला आहे. आजच्या दिवसाला म्हणतातच ‘स्मृती दिवस’.
बापदादांनी अमृतवेले पासून चोहो बाजूला पाहिले, मग ते देशामध्ये असो, वा परदेशामध्ये
सर्व मुलांच्या हृदयामध्ये बाबांच्या स्नेहाचे चित्र दिसून आले. आणि बाबांच्या
हृदयामध्ये देखील प्रत्येक मुलाच्या स्नेहाचे चित्र सामावलेले होते. आजच्या दिवसाला
विशेष स्नेहाचा, स्मृतीचा दिवस म्हणता. बापदादांनी अमृतवेलेच्याही आधी मुलांच्या
वतीने अनेक स्नेहाच्या मोत्यांच्या माळा पाहिल्या. प्रत्येक मुलाच्या मनामध्ये
ऑटोमॅटिक हे गाणे वाजत आहे - “मेरा बाबा, ब्रह्मा बाबा, मीठा बाबा” आणि बापदादांच्या
हृदयामध्ये हे गाणे वाजत आहे - “मीठे बच्चे, प्यारे बच्चे” आज प्रत्येकाच्या
मनामध्ये इतर शक्तिंव्यतिरिक्त स्नेहाची शक्ती जास्त प्रमाणात व्यापून राहिली आहे.
हा परमात्म स्नेह, ईश्वरीय स्नेहाचा फक्त संगमयुगावरच अनुभव होतो. हा परमात्म स्नेह
अनुभवी असणारेच जाणतात, जो प्रत्येक मुलाला सहजयोगी बनवतो. बापदादांनी पाहिले की,
सर्व मुलांमध्ये स्नेहाचा अनुभव खूपच खोलवर व्यापून राहिला आहे. तुम्हा सर्वांच्या
जन्माचा आधार स्नेह आहे. असे कोणतेही मूल दिसत नाही, भले बाकीच्या शक्ती कमी देखील
असतील परंतु बाबांचा स्नेह किंवा निमित्त बनलेल्या विशेष आत्म्यांच्या स्नेहाचा
अनुभव मेजॉरिटी सर्वांच्या हृदयामध्ये, चेहऱ्यावर दिसून येतो. आता तुम्हा सर्वांना
आज विशेष इथपर्यंत कोणी पोहोचवले? कोणत्या विमानाने आलात? ट्रेनमधून आलात की
विमानाने आलात? सर्वांच्या चेहऱ्यावर स्नेह व्यापून राहिला आहे, तर स्नेहाच्या
प्लेनने पोहोचला आहात ना. काहीही करावे लागले परंतु तरीही स्नेहाच्या प्लेन मधून
सर्वजण पोहोचला आहात.
आजच्या दिवसाला स्मृती
दिवस म्हटले जाते परंतु स्मृती दिवसाच्या सोबतच समर्थी दिवस सुद्धा म्हटले जाते.
आजच्या दिवसाला ताजपोशीचा (राज्याभिषेकाचा) दिवस देखील म्हटले जाते कारण आजच्या
दिवशी बापदादांनी विशेषतः ब्रह्मा बाबांनी निमित्त बनलेल्या महावीर मुलांना विश्व
सेवेचा मुकुट घातला. ब्रह्मा बाबा स्वतः अव्यक्त झाले आणि मुलांना विश्व सेवेच्या
स्मृतीचा तिलक लावला. मुलांना करनहार बनवले आणि स्वतः करावनहार बनले. आपल्या सारखे
फरिश्ता रूपाचे वरदान देऊन लाईटचा मुकुट घातला आणि बापदादांनी मुकुट आणि तिलक चे जे
वरदान दिले, त्या अनुसार मुलांचे कर्तव्य पाहून खुश आहेत. मुलांनी सेवेचे वरदान
कृतीमध्ये आणले, हे पाहून बापदादा खुश आहेत. आतापर्यंत जो पार्ट बजावला आहे आणि पुढे
देखील बजावायचा आहे, त्यासाठी ब्रह्मा बाबा विशेष पद्मगुणा मुबारक देत आहेत. वाह
मुलांनो वाह! परदेशात देखील चक्कर मारली तेव्हा काय पाहिले? प्रत्येक मूल स्नेहा
मध्ये सामावलेले आहे, तर बाबांकडून समर्थी (शक्ती) प्राप्त झाल्या आहेत कारण हा
दिवस विशेष स्नेहातून समर्थीचे (शक्तींचे) वरदान प्राप्त करण्याचा दिवस आहे.
बापदादांनी पाहिले की काही मुले अतिशय चांगल्या रीतीने आठवणीच्या धूनमध्ये,
सेवेमध्ये मग्न आहेत. अमृतवेला अतिशय चांगल्या रीतीने अनुभव करतात. अशरीरीपणाचाही
अनुभव करतात परंतु जेव्हा कर्मयोगी बनण्याची वेळ येते तेव्हा दोन्ही कामे योगीचे
देखील आणि कर्मणाचे देखील, दोन्ही कामे एकत्रित करण्यामध्ये फरक पडतो. पुरुषार्थ
करतात की, कर्म आणि योगाचा बॅलन्स राहावा, परंतु जसा अमृतवेलेला शक्तिशाली अवस्थेचा
अनुभव करतात, तसा कर्मामध्ये फरक पडतो, मेहनत करावी लागते आणि बापदादांनी सर्व
मुलांना सांगितले आहे की विश्वाचा विनाश अचानक होणार आहे, जर पूर्ण दिवस अटेन्शनच्या
ऐवजी, कोणत्याही धारणेच्या कमतरतेमुळे कर्मयोगीच्या स्टेजमध्ये फरक पडत असेल; तर
विश्वाच्या विनाशाची डेट तर बापदादा अनाऊन्स करणार नाहीत परंतु आपले जीवन कधी
संपणार आहे, हे माहित आहे का? कोणाला माहित आहे का की माझा मृत्यू अमुक तारखेला
होणार आहे, माहित आहे का? त्यांनी हात वर करा. अचानक काहीही होऊ शकते, एखादे
प्रकृतीचे कारण बनते तेव्हा कित्येकांचा मृत्यू एकाच वेळी होतो. तर विश्वाच्या
विनाशाच्या डेटच्या संकल्पाने निष्काळजी बनू नका. तुमच्या जगदंबाचे (मम्माचे)
स्लोगन होते - तर कधीही ‘केव्हा’ असे म्हणू नका, तर ‘आत्ता’ म्हणा. उद्या काहीही
झाले तरी मला एव्हररेडी राहायचेच आहे. तर एवढी तयारी सर्वांच्या लक्षात आहे का?
आपल्या कर्मांचा हिशोब चुकता केला आहे का? चारही सब्जेक्ट ज्ञान, योग, सेवा आणि
धारणा, चारही बाजूंनी, चारही विषयांमध्ये एवढी तयारी आहे का? पूर्णतः बेहदच्या
वैराग्याचा अनुभव चेक केला आहे का? आपल्या मनामध्ये हे चेक केले आहे का की, आम्ही
एव्हररेडी आहोत? नष्टोमोहा स्मृती स्वरूप कारण ब्रह्मा बाबांनी देखील स्वतःला
पुरुषार्थ करून असे बनवले जे अनुभवी मुलांनी पाहिले. कोणत्याही बाजूने असे वातावरण
नव्हते, ना कोणत्या हिशोबाचे कारण होते, अचानक अशरीरी बनण्याच्या अभ्यासाने अशरीरी
बनून उडून गेले. कोणाला वाटले होते का की ब्रह्मा बाबा जाणार आहेत? परंतु नष्टोमोहा,
मुलांच्या हातात हात असताना कुठे कोणती आसक्ती राहिली का? ते फरिश्ता बनले. मुलांना
फरिश्ता बनविण्याचा तिलक लावून गेले. याचे कारण म्हणजे बराच काळ अशरीरी होऊन
राहण्याचा अभ्यास होता. बरीच अनुभवी मुले जी सोबत राहिली आहेत त्यांनी अनुभव केला
आहे की, कर्म करता-करता एकदम अशरीरी बनून जात असत. तर हे जे कर्मयोगामध्ये अंतर पडते,
त्याचे कारण कर्म करताना स्मृतीमध्ये हे इमर्ज असत नाही की, ‘मी आत्मा आहे’, हे तर
सर्वजण जाणतातच, परंतु मी आत्मा, कोणती आत्मा आहे? मी ‘करावनहार’ आत्मा आहे आणि ही
कर्मेंद्रिये ‘करनहार’ आहेत; हा करावनहारचा स्वमान कर्म करताना स्मृती स्वरूपामध्ये
राहावा, भले कर्मेंद्रियांद्वारे कर्म करायचे आहे परंतु मी करावनहार आहे, मालक आहे,
या सीटवर जर सेट असाल तर कोणतीही कर्मेंद्रिये ऑर्डरमध्ये राहतील. सीटवर सेट
असल्याशिवाय कोणी कोणाचे ऐकत नाही. तर करावनहार आत्मा आहे, ही कर्मेंद्रिये करनहार
आहेत, करावनहार नाहीत.
जसा ब्रह्मा बाबांचा
अनुभव ऐकला की, ब्रह्मा बाबांनी सुरुवातीला हा अभ्यास केला होता की ते दररोज
दिवसाच्या समाप्तीच्या वेळी या कर्मेंद्रियांचा राज दरबार भरवत असत. जुन्या मुलांनी
ती डायरी पाहिली असेल, तर रोज दरबार भरवत होते आणि करावनहार मालक बनून प्रत्येक
कर्मेंद्रियांचा समाचार घेत होते, देत होते. सुरुवातीपासूनच एवढे लक्ष ब्रह्मा
बाबांनी सुद्धा दिले, तर तुम्हालाही करावनहार मालक समजून कर्मेंद्रियांकडून कर्म
करून घ्यायचे आहे, कारण आत्मा राजा आहे आणि ही कर्मेंद्रिये सोबती आहेत. त्यामुळे
हे चेक करायला हवे की आजच्या दिवशी विशेषतः मन-बुद्धी-संस्कार, स्वभाव, म्हणा
संस्कार म्हणा यांची काय स्थिती राहिली? आणि त्वरित चेक केल्याने कर्मेंद्रियांना
याचे अटेंशन राहते की आपला राजा आमची खबर घेणार आहे, म्हणून आत्मा राजाने ‘करनहार’
कर्मेंद्रियांना ‘करावनहार’ बनून चेक करावे. नाहीतर असे दिसून आले आहे की, कित्येक
मुले असे म्हणतात की आम्ही कर्मेंद्रियांना ऑर्डर करतो परंतु तरीही चूक होते.
पुरुषार्थ करतो परंतु काही-काही संस्कार किंवा स्वभाव ऑर्डरमध्ये राहत नाहीत. त्याचे
कारण या आपल्या स्वमानाच्या सीटवर सेट राहत नाहीत. सीटवर बसल्याशिवाय कितीही ऑर्डर
द्या तरी ऑर्डर पाळणारे ती पाळत नाहीत. म्हणून कर्म करताना आपल्या करावनहार
मालकपणाच्या सीटवर सेट राहा. कित्येक मुले बापदादांशी हे देखील रूहरिहान करताना
म्हणतात की, बाबा, तुम्ही आम्हाला सर्वशक्तिवान बनवले, शक्तिवानच नाही तर
सर्वशक्तिवानचे वरदान प्रत्येक मुलाला ब्राह्मण जन्म घेताच दिले आहे, आठवते का
आपल्या जन्माचे वरदान! प्रत्येक मुलाला बाबांनी ‘मास्टर सर्वशक्तिवान भव’ हे वरदान
दिले आहे. कोणी वरदान दिले? ऑलमाइटी ऑथॉरिटीने. परंतु तक्रार करतात की ज्या वेळी जी
शक्ती हवी असते, ती येत नाही. ऑर्डर पाळत नाही. असे का? जर ऑलमाइटी ऑथॉरिटीने दिलेले
वरदान आहे, त्यांच्यापेक्षा मोठे कोणीच नाही. तर वरदानाच्या स्थितीमध्ये स्थित
राहून जर ऑर्डर द्याल, तर असे होऊच शकत नाही की तुम्ही ऑर्डर कराल आणि शक्ती ती
पाळणार नाही. एक तर आत्मा मालक आहे, सर्वशक्तिवानचे वरदान मिळालेले आहे, त्या
स्वरूपामध्ये स्थित होऊन, मी मालक आहे, हे माझे वरदान आहे, या दोन्ही स्वरूपाच्या
स्मृतीमध्ये राहून ऑर्डर द्या. शक्ती तुमचे ऐकणार नाही हे असंभव आहे, कारण वरदान आणि
बाबांच्या प्रॉपर्टीचा अधिकार आहे. संगमयुगावर तुम्हा सर्वांना सर्वशक्तिवानचे
टायटल मिळाले आहे, फक्त तुम्ही त्या स्थितीमध्ये स्थित राहत नाही, ‘सदा’ राहत नाही.
‘कधी-कधी’ होते. हा ‘कधी-कधी’ शब्द आपल्या ब्राह्मण डिक्शनरीमधून काढून टाका.
‘आत्ताच्या आत्ता हजर’. तुम्ही म्हणता ना की, बाबा, आम्ही तुमची आठवण करतो तेव्हा
तुम्ही हजर होता. आहे असा अनुभव? हात वर करा. अनुभव आहे? आता पहा, हात तर वर करत
आहात. बाबा हजर होतात, हजूर हाजिर होतो, तर या शक्ती काय आहेत? या शक्ती देखील
तुम्हाला बाबांच्या प्रॉपर्टीमध्ये मिळाल्या आहेत. तर मग मालक बनून ऑर्डर करा. मालक
बनून ऑर्डर करत नाही, शक्ती हरवून जाते ना, मग त्याच स्थितीत राहून ऑर्डर करता, तर
जर मालकच नाही आहात तर ऑर्डर का पाळावी!
बापदादांना आता काय
हवे आहे? माहीत आहे ना! बाबांची आता हीच इच्छा आहे की, माझ्या प्रत्येक मुलाने कर्म
करताना देखील राजा बच्चा बनून, स्वराज्य अधिकारी बनून राहावे, स्वराज्याच्या सीटला
सोडू नये. तर राजा पूर्ण दिवस राजाच असतो ना! की कधी राजा असतो आणि कधी नसतो?
सिंहासनावर बसणे किंवा न बसणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु घरात राहूनही, मी राजा आहे,
हे तर विसरत नाही. तर कर्मयोगी आणि अमृतवेलेचा यथार्थ योग, शक्तिशाली स्थिती यामध्ये
फरक पडता कामा नये. डबल काम आहे परंतु तुम्ही कोण आहात? तुम्ही तर विश्वाचे
परिवर्तक आहात, विश्व कल्याणकारी आहात, म्हणूनच बाबांची हीच इच्छा आहे की
चालता-फिरता राजेपणा विसरू नका, आपली सीट सोडू नका. सीट शिवाय कोणीही ऑर्डर मानत
नाही. आजकाल पहा, सीटसाठी लोकं किती काय करतात? आपला हक्क मिळवण्यासाठी किती
प्रयत्न करतात. आपला हक्क कोणीही सोडू इच्छित नाही. मग तुम्ही आपला परमात्म हक्क -
‘मी कोण!’ प्रत्येक वेळी जे काम करता, ते काम करताना देखील आपल्या मनाचे टाइम-टेबल
बनवून ठेवा की, हे काम करताना माझ्या मनाचा स्वमान कोणता असावा? आजच्या दिवशी मी
कोणते ध्येय ठेवणार आहे? प्रत्येक कामाच्या वेळी जी काही आपल्या स्वमानाची लिस्ट आहे,
भले वेगवेगळे टाइम-टेबल बनवा; जसे स्थूल कामाचे टाइम-टेबल निश्चित करता, तसे मनाचे
टाइम-टेबल निश्चित करा. माहीत तर असते की या वेळी हे काम करायचे आहे, त्यासोबत कोणता
स्वमान ठेवायचा? मालकपणाचा अधिकार कोणत्या स्वमानाच्या रूपामध्ये ठेवायचा आहे, असे
मनाचे टाइम-टेबल बनवा. टाइम-टेबल बनवता येते ना! मातांना येते का? मातांनी स्वतःचा
प्रोग्राम स्वतःच बनवा. समजा, जेवण बनवायचे आहे, त्या वेळी कोणता स्वमान आपल्या
बुद्धीत इमर्ज ठेवायचा आहे? स्वमानाची खूप मोठी माळ आहे. एवढी मोठी माळ आहे जे
स्वमान मोजत जा आणि माळेमध्ये मग्न व्हा. तर आता दीर्घकाळाचा अभ्यास पाहिजे.
काही-काही मुले म्हणतात - ‘अजून तर काही विनाशाचे चिन्ह दिसत नाहीये. अजून डेट तर
निश्चित नाहीये, मग करू, होऊन जाईल, हा निष्काळजीपणा आहे. संदेश देण्यातही विश्व
कल्याणकारी आहात, तर बरीच मुले असे समजतात की अजून भरपूर वेळ आहे, पुढे जाऊन संदेश
देऊ, परंतु नाही. ज्यांना तुम्ही उशिरा संदेश द्याल, ते देखील तुमची तक्रार करतील.
कोणती तक्रार करतील? तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितले? सांगितले असते तर आम्ही
देखील काहीतरी केले असते, आता तुम्ही अगदी शेवटी सांगितलेत. मग आम्ही तर फक्त ओळखून
‘अहो प्रभू, तुझी लीला अगाध आहे’, एवढेच म्हणू शकणार. पद काही मिळवू शकणार नाहीत.
असे का? सहयोग देखील दीर्घ काळ पाहिजे. तुम्ही सर्व वारसदार बनला आहात ना! जे
समजतात की आपण वारसदार आहोत, त्यांनी हात वर करा. वारसदार आहात? छान. वारसदार आहात
तर तुम्हाला पूर्ण वारसा मिळवायचा आहे की थोडा? सर्वजण म्हणतील - पूर्ण वारसा
मिळवायचा आहे. तर पूर्ण वारसा आहे - पूर्ण २१ जन्म, आदि पासून अंतापर्यंत रॉयल प्रजा
नाही, तर रॉयल फॅमिलीमध्ये येणे. राजाच्या फॅमिलीमध्ये येणे. सिंहासनावर तर एकच
बसणार ना, युगल बसणार. परंतु जेव्हा पण तिथली सभा भरते, तेव्हा रॉयल फॅमिलीतील
विशेष निमित्त आत्मे असतात ते मुकुटधारी बनून बसतात. मुकुटाशिवाय बसत नाहीत. आणि
प्रत्येक कार्यामध्ये सल्ला, मत देणारे, असे नाही की तो फक्त राज्य करेल, एकत्र
सर्वांच्या सल्ल्यानेच करतात म्हणून जर संपूर्ण वारसा घ्यायचा असेल, तर पहिल्या
जन्मापासून ते अंतापर्यंत २१ जन्म पूर्ण, अर्धे सुद्धा नाही. मध्येच तर जायचे नाहीये,
अकाली मृत्यू तर होणार नाहीये. तर पूर्ण वारसा घ्यायचा आहे की थोडक्यात खुश व्हायचे
आहे? तुमची मातेश्वरी जगत अंबा सदैव हेच लक्ष्य ठेवत असे की बापदादांनी जे श्रीमत
दिले मग ते मनसा असो, वाचा असो अथवा कर्मणा असो, जे काही श्रीमत दिले आहे, ते
आपल्याला करायचेच आहे. असा पूर्ण वारसा घेणाऱ्यांनी हेच लक्ष्य बुद्धीमध्ये ठेवा की
अचानक, एव्हररेडी आणि दीर्घकाळ, हे तिन्ही शब्द एकत्र लक्षात ठेवा म्हणून बापदादांचे
सर्व आशेच्या दीपक मुलांप्रती हेच वरदान आहे की, सदैव हे तिन्ही शब्द लक्षात ठेवून
सर्वांनी आशेचे दीपक बनल्याचे प्रत्यक्ष प्रमाण दाखवा. अच्छा.
परदेशातील मुले देखील
मनसा सेवेद्वारे सहयोगी आहेत ना! बापदादांनी पाहिले की वृद्धी सर्व धर्मांमध्ये होत
आहे, एकच धर्म नाही, फक्त हिंदू नाही, परंतु मुस्लिम, बुद्धिस्ट, ख्रिश्चन असे
सर्वच धर्म हळू-हळू अध्यात्मिकतेमध्ये रुची घेत आहेत. पूर्वी पहा, ब्रह्माकुमारींचे
नाव ऐकून घाबरायचे, म्हणायचे - ‘या अशा विनाश-विनाश काय म्हणत आहेत’. आणि आता काय
म्हणतात? आता म्हणतात, सांगा विनाश कधी होईल? कसा होईल आणि आम्ही काय करावे?
त्यामुळे होणार तर आहेच, ही तर गॅरंटी आहे. तुम्हा सर्वांना गॅरंटी आहे ना मग ते
विदेशी असोत किंवा भारतीय, गॅरंटी आहे ना! बापदादांनी फक्त जो इशारा दिला आहे की,
पुरुषार्थ तीव्र गतीने करा. पुरुषार्थ नाही, पुरुषार्थाची वेळ निघून गेली, आता
तीव्र पुरुषार्थाची वेळ आहे. आणि ‘कधी-कधी’ यावर थांबू नका, आत्ता. आता करायचे आहे,
आता बनायचे आहे. तर होणारच आहे. अच्छा.
चोहो बाजूंच्या तीव्र
पुरुषार्थी, सदैव उमंग-उत्साहाने पुढे पाऊल टाकणाऱ्या मुलांना बापदादा स्मृती दिनाची
प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. बापदादांच्या हृदयामध्ये प्रत्येक मूल सामावलेले आहे आणि
प्रत्येक मुलाच्या हृदयामध्ये बाबा सामावलेले आहेत, बाबांच्या हृदयामध्ये मूल
सामावलेले आहे, तर मुबारक असो, मुबारक असो आणि मुबारक सोबत नमस्ते देखील.
वरदान:-
पॉवरफुल स्थिती
द्वारे रचनेच्या सर्व आकर्षणांपासून दूर राहणारे मास्टर रचयिता भव
जेव्हा मास्टर रचयिता,
मास्टर नॉलेजफुलच्या पॉवरफुल स्थितीमध्ये अथवा नशेमध्ये स्थित रहाल तेव्हाच रचनेच्या
सर्व आकर्षणांपासून दूर राहू शकाल. कारण आता रचना आणखीनच वेगवेगळे रंग-ढंग आणि रूपे
रचेल; त्यामुळे आता बालिश चुका, निष्काळजीपणाच्या चुका, आळशीपणाच्या चुका,
बेफिकीरपणाच्या चुका ज्या राहिलेल्या आहेत - त्यांना विसरून आपले पॉवरफुल,
शक्ति-स्वरूप, शस्त्रधारी स्वरूप आणि सदैव जागती ज्योत या स्वरूपाला प्रत्यक्ष करा
तेव्हा म्हणणार मास्टर रचयिता.
सुविचार:-
मनाच्या स्थितीमध्ये
इतके हार्ड (मजबूत) बना की कोणतीही परिस्थिती त्या स्थितीला वितळवू शकणार नाही.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
कोणत्याही
वातावरणामध्ये, वायुमंडळामध्ये रहा परंतु स्थिती सदैव अचल-अडोल एकरस असावी. कधी
निमित्त बनलेले काही सल्ला देतात, तर त्याने कन्फ्युज होऊ नका (गोंधळून जाऊ नका),
कारण जे निमित्त बनले आहेत ते अनुभवी झाले आहेत. जरी त्यांचे एखादे डायरेक्शन
स्पष्ट नसेल, तरीही हलचलमध्ये येऊ नका. धैर्याने म्हणा की, ‘हे समजून घेण्याचा
प्रयत्न करेन’, तेव्हाच स्थिती एकरस, अचल आणि अडोल राहील.