03-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - या बेहदच्या नाटकामध्ये तुम्ही अद्भुत ॲक्टर आहात, हे अनादि नाटक आहे,
याच्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही”
प्रश्न:-
बुद्धिवान
दूरदर्शी मुलेच कोणत्या गूढ रहस्याला समजू शकतात?
उत्तर:-
मूलवतनपासून संपूर्ण ड्रामाच्या आदि-मध्य-अंताचे जे गूढ रहस्य आहे ते दूरदर्शी
मुलेच समजू शकतात, बीज आणि झाडाचे सर्व ज्ञान त्यांच्या बुद्धीमध्ये असते. ती
जाणतात - या बेहदच्या नाटकामध्ये आत्मा रुपी ॲक्टर जी हे वस्त्र धारण करून पार्ट
बजावत आहे, तिला सतयुगापासून कलियुगापर्यंत पार्ट बजावायचा आहे. कोणीही ॲक्टर मधूनच
परत जाऊ शकत नाही.
गीत:-
तूने रात
गँवाई...
ओम शांती।
हे गाणे मुलांनी ऐकले. आता यामध्ये काही शब्द बरोबर सुद्धा आहेत, तर चुकीचे सुद्धा
आहेत. सुखामध्ये काही आठवण केली जात नाही. दुःख सुद्धा यायचे आहे जरूर. दुःख असते
तेव्हाच तर सुख देण्यासाठी बाबांना यावे लागते. गोड-गोड मुलांना माहीत आहे, आता
आम्ही सुखधामसाठी शिकत आहोत. शांतीधाम आणि सुखधाम. अगोदर मुक्ती नंतर मग जीवनमुक्ती
होते. शांतीधाम घर आहे, तिथे काही कोणता पार्ट बजावला जात नाही. ॲक्टर्स घरी निघून
जातात, तिथे कोणी पार्ट बजावत नाहीत. पार्ट स्टेजवर बजावला जातो. हे देखील स्टेज आहे.
जसे हदचे नाटक असते तसे हे बेहदचे नाटक आहे. याच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य
बाबांव्यतिरिक्त इतर कुणीही समजावून सांगू शकत नाही. खरे तर हा ‘यात्रा’ किंवा
‘युद्ध’ शब्द फक्त समजावून सांगण्यासाठी उपयोगात आणतात. बाकी याच्यामध्ये युद्ध
इत्यादी काही नाहीये. ‘यात्रा’ तर एक शब्द आहे, बाकी तर आहे आठवण. आठवण करता-करता
पावन बनाल. ही यात्रा पूर्ण देखील इथेच होईल. कुठे जायचे नाहीये. मुलांना सांगितले
जाते पावन बनून आपल्या घरी जायचे आहे. अपवित्र तर जाऊ शकत नाहीत. स्वतःला आत्मा
समजायचे आहे. मज आत्म्यामध्ये संपूर्ण चक्राचा (८४ जन्मांच्या चक्राचा) पार्ट आहे.
आता तो पार्ट पूर्ण झाला आहे. बाबा अगदी सोपा सल्ला देतात, माझी आठवण करा. बाकी
बसलेले तर इथेच आहात, कुठे जात नाही. बाबा येऊन म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही
पावन बनाल. युद्ध काही नाहीये. स्वतःला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनवायचे आहे.
मायेवर विजय प्राप्त करायचा आहे. मुले जाणतात ८४ चे चक्र पूर्ण होणार आहे, भारत
सतोप्रधान होता. तिथे जरूर मनुष्यच असतील. जमीन थोडीच बदलेल. आता तुम्ही जाणता आपण
सतोप्रधान होतो मग तमोप्रधान बनलो आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. मनुष्य
बोलावतात देखील की येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा. परंतु ते कोण आहेत, कसे
येतात, काहीही जाणत नाहीत. आता बाबांनी तुम्हाला हुशार बनवले आहे. तुम्ही किती
श्रेष्ठ पद प्राप्त करता. इथल्या श्रीमंतांपेक्षाही तिथले गरीब खूप श्रेष्ठ आहेत.
भले कितीही मोठ-मोठे राजे होते, खूप संपत्ती होती, परंतु आहेत तर विकारी ना.
यांच्यापेक्षा तिथली सामान्य प्रजा देखील खूप श्रेष्ठ बनते. बाबा फरक सांगत आहेत.
रावणाची सावली पडल्यामुळे पतित बनतात. निर्विकारी देवतांच्या समोर स्वतःला पतित
म्हणवून जाऊन डोके टेकतात. बाबा जेव्हा इथे येतात तेव्हा लगेचच तुम्हाला उच्चतम
स्थितीमध्ये नेतात. सेकंदाची गोष्ट आहे. आता बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे.
तुम्ही मुले दूरदर्शी बनता. वरती मूलवतनपासून सर्व ड्रामाचे चक्र तुमच्या
बुद्धीमध्ये आहे. जसे हदचे नाटक बघून मग आल्यावर काय-काय बघितले ते ऐकवतात ना.
बुद्धीमध्ये भरलेले असते, ज्याचे वर्णन करतात. आत्म्यामध्ये भरून येतात आणि मग येऊन
सांगून टाकतात. या मग आहेत बेहदच्या गोष्टी. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या बेहद
ड्रामाच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य असले पाहिजे. जे रिपीट होत राहते. त्या हदच्या
नाटकामध्ये तर एक ॲक्टर निघून गेला तर त्याच्याऐवजी दुसरा येऊ शकतो. कोणी आजारी पडला
तर त्याच्याऐवजी मग दुसऱ्याला घेतात. हा तर जिवंत ड्रामा आहे, याच्यामध्ये जरा
सुद्धा अदला-बदली होऊ शकत नाही. तुम्ही मुले जाणता आपण आत्मे आहोत. हे शरीररुपी
वस्त्र आहे, जे घालून आपण बहुरूपी पार्ट बजावतो. नाव, रूप, देश, फिचर्स बदलत जातात.
ॲक्टर्सना आपल्या ॲक्ट विषयी तर माहीत असते ना. बाबा मुलांना हे चक्राचे रहस्य तर
सांगत राहतात. सतयुगापासून कलियुगापर्यंत येता आणि मग जाता पुन्हा नव्याने येऊन
पार्ट बजावता. याला सविस्तरपणे समजावून सांगण्यासाठी वेळ लागतो. बीजामध्ये भले
ज्ञान आहे तरी सुद्धा समजावून सांगण्यासाठी वेळ तर लागतो ना. तुमच्या बुद्धीमध्ये
बीज आणि झाडाचे संपूर्ण रहस्य आहे; ते देखील जे चांगले बुद्धिवान आहेत, त्यांनाच
समजते की याचे बीज वरती आहे. याची उत्पत्ती, पालना आणि संहार कसा होतो, त्यासाठी
त्रिमूर्ती देखील दाखवला आहे. हे जे स्पष्टीकरण बाबा देतात ते दुसरा कोणताही मनुष्य
देऊ शकणार नाही. जेव्हा इथे येईल तेव्हा समजेल म्हणून तुम्ही सर्वांना सांगता की,
इथे येऊन समजून घ्या. काहीजण तर खूप कट्टर असतात तर म्हणतात - आम्हाला काहीही ऐकायचे
नाहीये. तरीही मग कोणी ऐकतात, कोणी लिटरेचर (साहित्य) घेतात, कोणी घेत नाहीत. आता
तुमची बुद्धी किती विशाल, दूरदर्शी बनली आहे. तिन्ही लोक विषयी तुम्ही जाणता.
मूलवतन ज्याला निराकारी दुनिया म्हटले जाते. बाकी सूक्ष्मवतनचा काहीही संबंध नाही.
सर्व संबंध आहे मूलवतन आणि स्थूलवतनशी. बाकी सूक्ष्मवतन तर थोड्या काळासाठी आहे.
बाकी आत्मे तर सर्व वरून इथे येतात पार्ट बजावण्यासाठी. सर्व धर्मांचे हे झाड
नंबरवार आहे. हे मनुष्यांचे झाड आहे आणि एकदम अचूक आहे. काहीही पुढे-मागे होऊ शकत
नाही. ना आत्मे दुसऱ्या कोणत्या जागी बसू शकत. आत्मे ब्रह्ममह्तत्वामध्ये उभे असतात,
जसे आकाशामध्ये तारे उभे आहेत. हे तारे तर दुरून खूप छोटे-छोटे दिसून येतात परंतु
आहेत तर मोठे. तथापि आत्मा काही लहान अथवा मोठी होत नाही, आणि तिचा कधीही विनाश होत
नाही. तुम्ही गोल्डन एजमध्ये (सुवर्णयुगामध्ये) जाता आणि मग आयर्न एजमध्ये (लोहयुगामध्ये)
येता. मुले जाणतात - आपण गोल्डन एजमध्ये होतो, आता आयर्न एजमध्ये आलो आहोत. काहीच
किंमत राहिलेली नाहीये. भले मायेची चमक कितीही आहे परंतु हे आहे रावणाचे गोल्डन एज,
ते आहे ईश्वरीय गोल्डन एज.
लोक म्हणत रहातात ६-७
वर्षांमध्ये इतके धान्य पिकेल की काही विचारू नका. बघा, त्यांचा प्लॅन काय आहे आणि
तुम्हा मुलांचा प्लॅन काय आहे? बाबा म्हणतात - माझा प्लॅन आहे जुन्याला नवीन बनविणे.
तुमचा एकच प्लॅन आहे. तुम्ही जाणता की बाबांच्या श्रीमताद्वारे आपण आपला वारसा घेत
आहोत. बाबा मार्ग दाखवतात, श्रीमत देतात, आठवणीमध्ये राहण्याचे मत देतात. ‘मत’ शब्द
तर आहे ना. बाबा संस्कृत शब्द तर बोलत नाहीत. बाबा तर हिंदीमध्येच समजावून सांगत
राहतात. भाषा तर अनेक आहेत ना. दुभाषी देखील असतात जे ऐकून मग त्याचे भाषांतर
ऐकवतात. हिंदी आणि इंग्रजी तर खूपजण जाणतात. शिकतात. बाकी घरी रहाणाऱ्या माता इतक्या
शिकलेल्या नाहीत. आज-काल परदेशामध्ये इंग्रजी शिकतात तर मग इथे येऊन देखील इंग्रजी
बोलत राहतात. हिंदी बोलूच शकत नाहीत. घरी येतात तेव्हा आईशी देखील इंग्रजीमध्ये बोलू
लागतात. ती बिचारी गोंधळून जाते मला इंग्रजी काय कळते. मग तिला मोडकी-तोडकी हिंदी
शिकावी लागते. सतयुगामध्ये तर एक राज्य एक भाषा होती, जे आता पुन्हा स्थापन करत
आहेत. दर ५ हजार वर्षांनंतर हे सृष्टीचक्र कसे फिरते ते बुद्धीमध्ये राहिले पाहिजे.
आता एका बाबांच्याच आठवणीमध्ये रहायचे आहे. इथे तुम्हाला मोकळा वेळ चांगला मिळतो.
सकाळी आंघोळ इत्यादी करून बाहेर हिंडण्या फिरण्यामध्ये खूप मजा येते. आतमध्ये हीच
आठवण रहावी की, आपण सर्व ॲक्टर्स आहोत. ही देखील आता स्मृती आली आहे. बाबांनी
आम्हाला ८४ च्या चक्राचे रहस्य सांगितले आहे. आम्ही सतोप्रधान होतो ही खूप आनंदाची
गोष्ट आहे. मनुष्य भक्तीमध्ये भटकत-शोधत राहतात, त्यांची काहीच कमाई होत नाही.
तुम्ही तर खूप कमाई करता. बुद्धीमध्ये चक्र सुद्धा लक्षात रहावे आणि मग बाबांची
आठवण देखील करत रहा. कमाई करण्याच्या युक्त्या बाबा खूप चांगल्या-चांगल्या सांगतात.
जी मुले ज्ञानाचे विचार सागर मंथन करत नाहीत त्यांच्या बुद्धीमध्ये माया कटकट करत
राहते. त्यांनाच माया त्रास देते. मनामध्ये हा विचार करा की आपण हे चक्र कसे फिरलो
आहोत. सतयुगामध्ये इतके जन्म घेतले मग खाली उतरत आलो. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे
आहे. बाबांनी सांगितले आहे - माझी आठवण करा तर सतोप्रधान बनाल. चालता-फिरता
बुद्धीमध्ये आठवण रहावी तर मायेची कटकट बंद होईल. तुमचा खूप-खूप फायदा होईल. भले
पती-पत्नी एकत्र जाता. प्रत्येकाला आपले उच्च पद प्राप्त करण्यासाठी आपापली मेहनत
करायची आहे. एकट्याने जाण्यात तर खूपच मजा आहे. आपल्याच धूनमध्ये रहाल. दुसरा कोणी
सोबत असेल तरीही बुद्धी इकडे-तिकडे जाईल. आहे अगदी सोपे, बगीचे इत्यादी तर सर्व जागी
आहेत, इंजिनीयर असेल तर त्याचे हेच चिंतन चालत राहील की, इथे पूल बनवायचा आहे, हे
करायचे आहे. बुद्धीमध्ये प्लॅनच येतो. तुम्ही सुद्धा घरी बसा परंतु तरीही बुद्धी
तिकडेच लागून रहावी. ही सवय लावा तर तुमच्या आतमध्ये हेच चिंतन चालत राहील. शिकायचे
देखील आहे कामधंदा इत्यादी देखील करायचा आहे. वृद्ध, तरुण, मुले, इत्यादी सर्वांना
पावन बनवायचे आहे. आत्म्याला बाबांकडून वारसा घेण्याचा हक्क आहे. मुलांमध्ये देखील
लहानपणातच हे बीज पडले तर फार चांगले. अध्यात्मिक विद्या इतर कोणीही शिकवू शकत नाही.
तुमची ही जी
अध्यात्मिक विद्या आहे ही तुम्हाला बाबाच येऊन शिकवतात. त्या शाळांमध्ये मिळते
भौतिक विद्या; आणि ती आहे शास्त्रांविषयीची विद्या. ही मग आहे रुहानी विद्या, जी
तुम्हाला भगवान शिकवतात. याविषयी कोणालाच माहीत नाहीये. याला म्हटलेच जाते
स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक ज्ञान). जे आत्मा येऊन शिकवतात, त्यांचे दुसरे
कोणतेही नाव ठेवले जाऊ शकत नाही. हे तर स्वतः बाबा येऊन शिकवतात. भगवानुवाच आहे ना.
भगवान एकदाच येऊन यावेळी हे ज्ञान समजावून सांगतात, याला रुहानी नॉलेज म्हटले जाते.
ती शास्त्रांची विद्या वेगळी आहे. तुम्हाला माहीत आहे की, ज्ञान एक आहे भौतिक कॉलेज
इत्यादींचे, दुसरी आहे अध्यात्मिक शास्त्रांची विद्या, तिसरे आहे हे रुहानी नॉलेज.
ते भले किती मोठे-मोठे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी. एच. डी.) आहेत परंतु त्यांच्याकडे
देखील शास्त्रांच्याच गोष्टी (ज्ञान) आहेत. तुमचे हे नॉलेज एकदम वेगळे आहे. जे
स्पिरिच्युअल बाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत तेच हे स्पिरिच्युअल नॉलेज शिकवतात.
त्यांची महिमा आहे शांती, सुखाचा सागर… कृष्णाची महिमा एकदम वेगळी आहे, गुण-अवगुण
मनुष्यांमध्ये असतात, जे बोलत राहतात. बाबांच्या महिमेला देखील यथार्थ रीतीने
तुम्हीच जाणता. ते तर फक्त पोपटासारखे गात राहतात, अर्थ काहीच जाणत नाहीत. तर
मुलांना बाबा आपली उन्नती कशी करायची त्यासाठी मत देतात. पुरुषार्थ करत राहिलात तर
मग पक्के होत जाईल, मग ऑफिसमध्ये काम करताना देखील याची आठवण येईल, ईश्वराची आठवण
राहील. मायेची स्मृति तर अर्धे कल्प चालली आहे, आता बाबा बसून यथार्थ रीतीने
समजावून सांगत आहेत. स्वतःला बघा - आपण कोण होतो, आता काय बनलो आहोत! बाबा मग
आम्हाला असे देवता बनवतात. हे देखील तुम्ही मुलेच नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता.
सर्वात पहिला भारतच होता. बाबा देखील भारतातच पार्ट बजावण्यासाठी येतात. तुम्ही
देखील आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहात ना. तुम्हाला पवित्र बनायचे आहे, नाही तर
उशिरा याल, मग सुख काय मिळणार. जास्त भक्ती केली नसेल तर येणार नाहीत. समजून येईल
की, हा इतकी तयारी करणारा नाही आहे. समजू तर शकतो ना. खूप मेहनत करतात तरी देखील
कोणी विरळेच निघतात परंतु थकायचे नाही. मेहनत तर करायची आहे. मेहनती शिवाय काही
मिळते थोडेच? प्रजा तर बनत राहते.
बाबा मुलांना उन्नती
करण्यासाठी युक्ती सांगत आहेत - ‘मुलांनो, स्वतःची उन्नती करायची असेल तर पहाटे
आंघोळ इत्यादी करून एकांतामध्ये जाऊन फेरी मारा किंवा बसा. आरोग्यासाठी पायी फिरणे
देखील चांगले आहे. बाबा देखील आठवतील आणि ड्रामाचे रहस्य देखील बुद्धीमध्ये राहील,
किती कमाई आहे! ही आहे खरी कमाई, ती (लौकिक) कमाई पूर्ण झाली की मग या कमाईबद्दल
विचार करा. अवघड काहीच नाहीये. बाबांनी बघितलेले आहे - आपली सर्व जीवन कहाणी
लिहितात - आज इतके वाजता उठलो, मग हे केले… समजतात की नंतर येणारे त्यांची ही जीवन
कहाणी वाचून शिकतील. मोठ-मोठ्या व्यक्तींची जीवन कहाणी वाचतात ना. मुलांसाठी
लिहितात मग घरामध्ये देखील मुले घरी अशी चांगल्या स्वभावाची बनतात. आता तुम्हां
मुलांना पुरुषार्थ करून सतोप्रधान बनायचे आहे. सतोप्रधान दुनियेचे राज्य पुन्हा
मिळवायचे आहे. तुम्ही जाणता - आम्ही कल्प-कल्प राज्य मिळवतो आणि मग गमावतो. तुमच्या
बुद्धीमध्ये हे सर्व आहे. ही आहे नवी दुनिया, नव्या धर्मासाठी नवे ज्ञान आहे,
म्हणून गोड-गोड मुलांना तरी देखील समजावून सांगतात लवकर-लवकर पुरुषार्थ करा. शरीराचा
भरोसा थोडाच आहे. आजकाल मृत्यू फार सोपा झाला आहे. तिथे अमरलोकमध्ये असा मृत्यू कधी
होत नाही, इथे तर बसल्या-बसल्या मरून जातात त्यामुळे आपला पुरुषार्थ करत रहा. जमा
करत रहा. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बुद्धीला
ज्ञानचिंतनामध्ये बिझी ठेवण्याची सवय लावायची आहे. जेव्हापण वेळ मिळेल तेव्हा
एकांतामध्ये जाऊन विचार सागर मंथन करायचे आहे. बाबांची आठवण करून खरी कमाई जमा
करायची आहे.
२) दूरदर्शी बनून या
बेहदच्या नाटकाला यथार्थ रीतीने समजून घ्यायचे आहे. सर्व पार्टधारींच्या पार्टला
साक्षी होऊन बघायचे आहे.
वरदान:-
मधुरतेच्या
वरदानाद्वारे सदैव पुढे जाणारी श्रेष्ठ आत्मा भव
मधुरता एक अशी विशेष
धारणा आहे जी कडू धरणीला देखील गोड बनवते. कोणालाही दोन क्षण गोड दृष्टी द्या, गोड
शब्द बोला तर कोणत्याही आत्म्याला कायमसाठी भरपूर कराल. तुमची दोन क्षणांची गोड
दृष्टी आणि बोल त्या आत्म्याची सृष्टी बदलून टाकेल. तुमचे दोन गोड शब्द देखील
त्यांना कायमसाठी बदलण्याचे निमित्त बनतील; म्हणून मधुरतेचे वरदान सदैव सोबत ठेवा.
सदैव गोड रहा आणि सर्वांना गोड बनवा.
बोधवाक्य:-
प्रत्येक
परिस्थितीमध्ये राजी रहा (संतुष्ट रहा) तर रहस्यमय बनाल.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:- जेव्हा बाकी सर्व संकल्प
शांत होतात, बस्स, एक बाबा आणि तुम्ही - या मिलनाच्या अनुभूतीचा संकल्प असतो तेव्हा
संकल्प-शक्ती जमा होते आणि योग शक्तिशाली होतो, यासाठी सामावून घेण्याची शक्ती किंवा
समेटण्याची शक्ती धारण करा. संकल्पांवर पूर्ण ब्रेक लागावा, ढिला नाही. जर एका
सेकंदाऐवजी जास्त वेळ लागत असेल तर सामावून घेण्याची शक्ती कमजोर आहे.