03-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो , तुम्ही
या ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणता, तुम्हाला बाबांद्वारे ज्ञानाचा तिसरा नेत्र
मिळाला आहे म्हणून तुम्ही आस्तिक आहात”
प्रश्न:-
बाबांचे कोणते
टायटल धर्म स्थापकांना देऊ शकत नाही?
उत्तर:-
बाबा आहेत
सद्गुरू. कोणत्याही धर्म स्थापकाला गुरू म्हणू शकत नाही; कारण गुरू तो आहे, जो
दुःखातून सोडवून सुखामध्ये घेऊन जाईल. धर्म स्थापन करणाऱ्यांच्या मागे तर त्यांच्या
धर्माचे आत्मे वरून खाली येतात, ते कोणालाही घेऊन जात नाहीत. बाबा जेव्हा येतात
तेव्हा सर्व आत्म्यांना घरी घेऊन जातात म्हणून ते सर्वांचे सद्गुरू आहेत.
गीत:-
इस पाप की
दुनिया से...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांनी गाण्याची ओळ ऐकली. ही आहे पापी दुनिया. मुले जाणतात देखील, ही
पाप-आत्म्यांची दुनिया आहे. किती वाईट शब्द आहेत. परंतु मनुष्य हे समजू शकत नाहीत
की खरोखरच ही पाप-आत्म्यांची दुनिया आहे. जरूर कोणती तरी पुण्य-आत्म्यांची दुनिया
देखील होती, तिला म्हटले जाते - स्वर्ग. पाप आत्म्यांच्या दुनियेला म्हटले जाते -
नरक. भारतामध्येच ‘स्वर्ग’ आणि ‘नरका’ची चर्चा खूप आहे. व्यक्तीचा मृत्यू होतो तर
म्हणतात स्वर्गवासी झाला, तर यावरून सिद्ध होते की नरकवासी होते. पतित दुनियेमधून
पावन दुनियेमध्ये गेला. परंतु मनुष्यांना काहीही ठाऊक नाहीये, जे येते ते बोलून
टाकतात. यथार्थ अर्थ काहीही समजत नाहीत.
बाबा येऊन तुम्हा
मुलांना दिलासा देतात की आता थोडा धीर धरा. तुम्ही पापाच्या ओझ्याने खूप भारी झाला
आहात. आता तुम्हाला पुण्य-आत्मा बनवून अशा दुनियेमध्ये घेऊन जातो, ज्याला स्वर्ग
म्हटले जाते. तिथे ना कोणते पाप असेल, ना कोणते दुःख असेल. मुलांना दिलासा मिळाला
आहे - आज इथे आहोत, उद्या आपल्या शांतीधाम, सुखधाममध्ये जाणार. जसे आजारी व्यक्ती
थोडी बरी होण्याच्या स्थितीत असते तर डॉक्टर त्यांना दिलासा देतात - लवकरच तुम्ही
खूप बरे व्हाल. आता हा तर आहे बेहदचा दिलासा. बेहदचे बाबा म्हणतात - तुम्ही तर खूप
दुःखी, पतित झाले आहात. आता मी तुम्हा मुलांना आस्तिक बनवतो. आणि मग रचनेचा देखील
परिचय देतात. ऋषी इत्यादी तर म्हणत आले आहेत की, आम्ही रचयिता आणि रचनेला जाणत नाही.
आता त्याला कोण जाणतात? कधी आणि कोणा द्वारे जाणू शकतात, हे कोणालाही माहीत नाही.
ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला कोणी जाणतच नाहीत. बाबा म्हणतात - मी संगमयुगावर येऊन
ड्रामा अनुसार तुम्हा मुलांना सर्व प्रथम आस्तिक बनवतो, नंतर मग तुम्हाला रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे रहस्य ऐकवतो अर्थात मी तुमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडतो. तुम्हाला
ज्ञानरुपी प्रकाश मिळाला आहे. जसे स्थूल दृष्टी जाते तर मनुष्य आंधळे होतात. यावेळी
मनुष्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही आहे. मनुष्य असून त्या पित्याला आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत तर त्यांना बुद्धिहीन म्हटले जाते. गाण्यामध्ये देखील
आहे - एक आहेत - आंधळ्याची मुले आंधळी. दुसरे आहेत - सज्जे (दिव्य दृष्टी असणारे).
दाखवतात की, महाभारताचे युद्ध झाले आणि एका आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना
झाली. बाबांनी आत्म्यांना सतयुगी स्वराज्य देण्याकरिता येऊन राजयोग शिकवला होता.
आत्मे म्हणतात - ‘मी राजा आहे’, ‘मी बॅरिस्टर आहे’. तुमची आत्मा आता जाणते की, आम्ही
विश्वाचे रचयिता बाबांकडून विश्वाचे स्वराज्य प्राप्त करत आहोत. ते कशाचे रचयिता
आहेत? नवीन दुनियेचे. बाबा नवीन सृष्टी रचतात. क्रिएटर देखील आहेत तर त्यांच्यामध्ये
सर्व ज्ञान देखील आहे. जगाचा संपूर्ण इतिहास एकही कोणी जाणत नाही. कोणालाही ज्ञानाचा
तिसरा नेत्र नाही आहे. बाबांशिवाय इतर कोणीही तिसरा नेत्र देऊ शकत नाही. जगाचा
इतिहास, भूगोल, मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन... हे सर्व तुम्ही जाणता. मूलवतन आहे
आत्म्यांची सृष्टी. संन्यासी म्हणतात की, आम्ही ब्रह्ममध्ये विलीन होणार अथवा ज्योत
ज्योतीमध्ये विलीन होईल. परंतु असे काही नाही आहे. तुम्ही जाणता ब्रह्म तत्त्वामध्ये
जाऊन निवास करू. ते शांतीधाम घर आहे. ते (दुनियावाले) म्हणतात - ब्रह्मच भगवान आहे,
किती फरक आहे. ब्रह्म तर तत्त्व आहे. जसे आकाश एक तत्त्व आहे, तसे ब्रह्म हे देखील
एक तत्त्व आहे. जिथे आपण आत्मे आणि परमपिता परमात्मा निवास करतो, त्याला ‘स्वीट होम’
म्हटले जाते. ते आहे आत्म्यांचे घर. मुलांना माहीत झाले आहे, ब्रह्म महतत्त्वामध्ये
आत्मे काही विलीन होत नाहीत आणि आत्म्याचा कधीही विनाश होत नाही. आत्मा अविनाशी आहे.
हा ड्रामा देखील पूर्व-नियोजित अविनाशी आहे. या ड्रामामध्ये किती ॲक्टर्स आहेत. आता
आहे संगमयुग, जेव्हा सर्व ॲक्टर्स हजर आहेत. नाटक पूर्ण होते तेव्हा सर्व ॲक्टर्स,
क्रिएटर इत्यादी सर्व येऊन हजर होतात. यावेळी हा बेहदचा ड्रामा देखील पूर्ण होत आहे,
नंतर पुन्हा रिपीट होणार आहे. त्या हदच्या नाटकांमध्ये बदल होऊ शकतो. ड्रामा जुना
होतो. हा तर बेहदचा ड्रामा अनादि अविनाशी आहे. बाबा त्रिकालदर्शी, त्रिनेत्री
बनवतात. देवता काही त्रिकालदर्शी नसतात. ना शूद्रवर्णाचे त्रिकालदर्शी असतात.
त्रिकालदर्शी तर फक्त तुम्ही ब्राह्मणवर्णाचे आहात. जोपर्यंत ब्राह्मण बनत नाहीत
तोपर्यंत ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळू शकत नाही. तुम्ही झाडाच्या आदि-मध्य-अंताला,
सर्व धर्मांना देखील जाणता. तुम्ही देखील मास्टर नॉलेजफुल बनता. बाबा मुलांना आप
समान बनवतील ना. ज्ञानाचा सागर तर एक बाबाच आहेत, जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत.
सर्व मुलांना आस्तिक बनवून त्रिकालदर्शी बनवतात.
आता तुम्ही मुलांनी
सर्वांना हे सांगायचे आहे की, शिवबाबा आले आहेत, त्यांची आठवण करा. जे आस्तिक बनतात
ते बाबांवर अतिशय प्रेम करतात. तुमच्यावर देखील बाबांचे प्रेम आहे. ते तुम्हाला
स्वर्गाचा वारसा देतात. गायले गेले आहे की, ‘विनाश काले विपरीत-बुद्धी विनशन्ती आणि
विनाश काले प्रीत-बुद्धी विजयन्ती’. गीतेमध्ये काही-काही शब्द खरे आहेत. श्रीमद्
भगवत गीता आहे सर्वोत्तम शास्त्र. आदि सनातन देवी-देवता धर्माचे शास्त्र. हे देखील
समजावून सांगितले आहे की, मुख्य धर्मशास्त्रे चारच आहेत; बाकीच्या धर्माचे जे आहेत,
ते येतातच फक्त आपल्या धर्माची स्थापना करण्याकरिता. राजाई इत्यादीची गोष्टच नाही.
त्यांना गुरू देखील म्हणू शकत नाही. गुरूचे तर कामच आहे - परत घेऊन जाणे. इब्राहिम,
बुद्ध, क्राइस्ट इत्यादी तर येतात, आणि मग त्यांच्या पाठोपाठ त्यांची वंशावळ देखील
येते. गुरू तो, जो दुःखातून सोडवेल आणि सुखामध्ये घेऊन जाईल. ते तर केवळ धर्म
स्थापन करण्यासाठी येतात. इथे तर बऱ्याच जणांना गुरू म्हणतात. ब्रह्मा, विष्णू,
शंकर यांना देखील गुरू म्हणू शकत नाही. एक शिवबाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत.
बोलावतात देखील एका रामाला. शिवबाबांना देखील ‘राम’ म्हटले जाते. अनेक भाषा आहेत,
तर नावे देखील अनेक ठेवली आहेत. मूळ नाव आहे - शिव. त्यांना सोमनाथ देखील म्हणतात.
सोमरस पाजला अर्थात ज्ञान धन दिले. बाकी पाणी इत्यादीची तर गोष्टच नाही. तुम्हाला
सन्मुख नॉलेजफुल, ब्लिसफुल बनवत आहेत. बाबा तर ज्ञानाचा सागर आहेत. तुम्हा मुलांना
ज्ञानाच्या नद्या बनवत आहेत. सागर एक असतो. एका सागरा पासून अनेक नद्यांचा उगम होतो.
आता तुम्ही आहात - संगमावर. यावेळी ही सारी धरती रावणाचे स्थान आहे. फक्त एक लंकाच
नव्हती परंतु साऱ्या धरतीवर रावणाचे राज्य आहे. राम राज्यामध्ये फार थोडे मनुष्य
असतील. हे आता फक्त तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - मी ३
धर्मांची स्थापना करतो - ब्राह्मण, देवता, क्षत्रिय. मग वैश्य, शूद्र वर्णामध्ये
बाकीचे सर्व येऊन आपला-आपला धर्म स्थापना करतात. अनेक धर्मांचा विनाश देखील करवतात.
भारतामध्ये त्रिमूर्तीचे चित्र देखील बनवतात. परंतु त्यामध्ये ‘शिव’चे चित्रच गायब
केले आहे. शिवाच्या माध्यमातूनच हे सिद्ध होते की परमपिता परमात्मा शिव, ब्रह्मा
द्वारे स्थापना, विष्णू द्वारे पालना करतात, त्यांना करनकरावनहार म्हटले जाते. बाबा
स्वतः देखील कर्म करतात, तुम्हा मुलांना देखील शिकवतात. कर्म-अकर्म-विकर्माची गती
देखील समजावून सांगतात. रावण राज्यामध्ये तुम्ही जे कर्म करता ते विकर्म बनते.
सतयुगामध्ये जे कर्म करता ते अकर्म होते. इथे विकर्मच होते कारण रावणाचे राज्य आहे.
सतयुगामध्ये ५ विकार असतच नाहीत. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे आणि सेकंदामध्ये
समजावून सांगितली जाते. ‘ओम्’चा अर्थ ते लोक तर खूप विस्ताराने समजावून सांगतात.
बाबा म्हणतात - ‘ओम्’ अर्थात अहम् आत्मा आणि हे माझे शरीर. किती सोपे आहे. आणि
तुम्ही समजता आपण सुखधाममध्ये जात आहोत. श्रीकृष्णाच्या मंदिराला सुखधाम म्हणतात.
आहे देखील कृष्णपुरी. माता, कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी खूप मेहनत करतात. तुम्ही आता
भक्ती करत नाही. तुम्हाला ज्ञान मिळाले आहे, इतर कोणत्याही मनुष्य मात्रामध्ये हे
ज्ञान नाहीये. मी तुम्हाला पावन बनवून जातो; तर मग पतित कोण बनवतात? हे कोणीही सांगू
शकणार नाही. सर्व मेल अथवा फिमेल भक्तिणी आहेत, सीता आहेत. सर्वांची सद्गती करणारे
बाबा आहेत. सर्व रावणाच्या जेलमध्ये आहेत. हे आहेच दुःखधाम. बाबा तुम्हाला सुखधामचा
मालक बनवत आहेत. अशा बाबांना ५ हजार वर्षांनंतर फक्त तुम्हीच पाहता.
लक्ष्मी-नारायणाच्या आत्म्यांना आता नॉलेज आहे - ‘बालपणी मी हा (कृष्ण) असतो,
त्यानंतर मी मोठा होईन, अशा प्रकारे हे शरीर सोडून मग दुसरे शरीर धारण करणार.’ इतर
कोणालाही हे नॉलेज नाहीये.
बाबा म्हणतात - तुम्ही
सर्व पार्वती आहात, शिवबाबा तुम्हाला अमरकथा ऐकवत आहेत - अमर बनविण्याकरिता, अमर
लोक मध्ये घेऊन जाण्याकरिता. हा मृत्युलोक आहे. तुम्ही सर्व पार्वती अमरनाथाकडून
अमरकथा ऐकत आहात. तुम्ही खरोखरच तसे बनता; केवळ बाबांची आठवण केल्याने तुमची आत्मा
अमर बनते, जिथे दुःखाची गोष्टच नसते. जसे साप एक कात टाकून दुसरी घेतो. ही सर्व
उदाहरणे इथलीच आहेत. भ्रमरीचे उदाहरण देखील इथलेच आहे. तुम्ही ब्राह्मण काय करता?
विकारी किड्यांना बदलून देवता बनवता. गोष्ट मनुष्याचीच आहे. भ्रमरीचा तर हा एक
दृष्टांत आहे. तुम्ही ब्राह्मण मुले आता बाबांद्वारे अमरकथा ऐकत आहात, इतरांना बसून
ज्ञानाची भूँ-भूँ करता, ज्यामुळे मनुष्यापासून देवता, स्वर्गाची परी बनतील. बाकी असे
नाही की मानसरोवरमध्ये डुबकी मारल्याने कोणी परी बनतील. हे सर्व खोटे आहे. तुम्ही
खोटेच ऐकत आले आहात, आता बाबा सत्य ऐकवत आहेत. आता बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा
समजा. तुम्ही समजता निराकार परमपिता परमात्मा या मुखाद्वारे ऐकवत आहेत. आपण या
कानांद्वारे ऐकत आहोत. आत्म-अभिमानी बनायचे आहे, मग परमात्मा देखील रियलाइज करवून
देतात की, मी कोण आहे? दुसरा कोणीही असे आत्म-अभिमानी बनवू शकत नाही.
बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही असे म्हणू शकत नाही की, तुम्ही आत्म-अभिमानी बना.
शिवजयंती देखील साजरी करतात परंतु त्यांची जयंती कशी आहे, हे जाणत नाहीत. बाबा
स्वतःच येऊन समजावून सांगतात - मी साधारण वृद्ध तनामध्ये प्रवेश करतो. नाहीतर
ब्रह्मा येणार कुठून? पतित तनच पाहिजे. सूक्ष्मवतनवासी ब्रह्मामध्ये विराजमान होऊन
तर ब्राह्मण रचणार नाहीत. म्हणतात - मी पतित शरीर, पतित दुनियेमध्ये येतो. गायले
गेले आहे - ब्रह्मा द्वारे स्थापना. मग ज्यांची स्थापना करतात, जे हे ज्ञान प्राप्त
करतात ते देवता बनतात. मनुष्य ब्रह्माचे चित्र पाहून गोंधळून जातात. म्हणतात - ‘हे
तर दादांचे चित्र आहे’. प्रजापिता ब्रह्मा तर जरूर इथेच (स्थूलवतनमध्येच) असेल.
सूक्ष्मवतनमध्ये प्रजा कशी रचतील. प्रजापित्याची मुले हजारो ब्रह्माकुमार-कुमारी
आहेत. खोटे थोडेच असेल. आपण शिवबाबांकडून वारसा प्राप्त करत आहोत. तुम्हा मुलांना
समजावून सांगितले आहे - ते अव्यक्त ब्रह्मा आहेत. प्रजापिता तर साकारमध्ये पाहिजेत.
हे पतितच तर पावन बनतात. तत् त्वम्. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
आत्म-अभिमानी बनून या कानांद्वारे अमरकथा ऐकायची आहे. ज्ञानाची भूँ-भूँ करून आप
समान बनविण्याच्या सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे.
२) पित्या समान
नॉलेजफुल, ब्लिसफुल बनायचे आहे. सोमरस प्यायचा आहे आणि पाजायचा आहे.
वरदान:-
मायेच्या
विघ्नांना एखाद्या खेळा प्रमाणे अनुभव करणारे मास्टर विश्व-निर्माता भव
जसे एखाद्या
वडीलधाऱ्या व्यक्ती समोर छोटी मुले आपल्या बालसुलभ निष्काळजी वृत्तीमुळे काहीही
बोलून टाकतात किंवा एखादी अशी वेगळी कृती जरी करतात, तेव्हा वडीलधारे समजतात की ही
निरपराध, निरागस, लहान मुले आहेत. काहीही परिणाम होत नाही. तसेच तुम्ही जेव्हा
स्वतःला मास्टर विश्व-निर्माता समजाल तेव्हा मायेची विघ्ने छोट्या मुलांच्या खेळा
प्रमाणे वाटतील. माया कोणत्याही आत्म्या द्वारे समस्या, विघ्न अथवा परीक्षेचा पेपर
बनून आली तरीही तुम्ही त्याला घाबरणार नाही, परंतु त्याला निरपराध समजाल.
बोधवाक्य:-
स्नेह, शक्ती
आणि ईश्वरीय आकर्षण स्वतःमध्ये भराल तर सर्वजण सहयोगी बनतील.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
आता ज्वालामुखी बनून
आसुरी संस्कार, आसुरी स्वभाव सर्व काही भस्म करा. जसे देवींच्या यादगार रुपी
मूर्तींमध्ये दाखवतात की, ज्वाळांच्या सहाय्याने असुरांचा संहार केला. असुर कोणी
व्यक्ती नाहीत परंतु आसुरी शक्तींचा नायनाट केला. हे आता तुमच्या ज्वालास्वरूप
स्थितीचे यादगार आहे. आता अशी योगाची ज्वाळा प्रज्वलित करा, ज्यामध्ये हा कलियुगी
संसार जळून भस्म होईल.