03-08-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   28.03.2006  ओम शान्ति   मधुबन


विश्वातील आत्म्यांना दुःखातून सोडविण्याकरिता मनसा सेवेला वाढवा, संपन्न आणि संपूर्ण बना


आज सर्व खजिन्यांचे मालक बापदादा आपल्या चोहो बाजूंच्या सर्व खजिन्यांनी संपन्न मुलांना पाहत आहेत. बापदादांनी प्रत्येक मुलाला सर्व खजिन्यांचा मालक बनवले आहे. देणारा एकच आहे आणि सर्वांना सर्व खजिने एक सारखे दिले आहेत. कोणाला कमी, कोणाला जास्त दिलेले नाहीत. असे का? बाबा अखूट खजिन्याचे मालक आहेत. बेहदचा खजिना आहे म्हणून प्रत्येक मूल अखूट खजिन्याचा मालक आहे. बापदादांनी सर्व मुलांना एकसमान आणि एकसारखा खजिना दिला आहे. परंतु धारण करणाऱ्यांमध्ये कोणी सर्व खजिने धारण करणारे आहेत आणि कोणी यथा शक्ती धारण करणारे आहेत. कोणी नंबर वन आहेत आणि कोणी नंबरवार आहेत. ज्यांनी जितके पण धारण केले आहे त्यांच्या चेहऱ्यावरून, डोळ्यांवरून खजिन्यांचा नशा स्पष्ट दिसून येतो. खजिन्यांनी भरपूर आत्मा चेहऱ्यावरून, डोळ्यांवरून भरपूर (संपन्न) दिसून येते. जसे स्थूल खजिना प्राप्त करणाऱ्या आत्म्याच्या वर्तनातून, चेहऱ्यावरून समजून येते, तर हा अविनाशी खजिन्यांचा नशा, आनंद स्पष्ट दिसून येतो. संपन्नतेचा नशा निश्चिंत बादशहा बनवितो. जिथे ईश्वरीय नशा आहे तिथे फिकीर (चिंता) असूच शकत नाही, निश्चिंत बादशहा, बेगमपुरचा बादशहा (चिंता रहित राज्याचा सम्राट) बनतात. तर तुम्ही सर्व ईश्वरीय संपन्नतेच्या खजिन्यावाले निश्चिंत बादशहा आहात ना! बेगमपुरचे बादशाह आहात. कोणती चिंता आहे काय? कोणते दुःख आहे? काय होणार, कसे होणार याची देखील चिंता नाही. त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित राहणारे तुम्ही जाणता की जे होत आहे ते सर्व चांगले, जे होणार आहे ते अजूनच चांगले. असे का? सर्वशक्तिवान बाबांचे सोबती आहात, सोबत राहणारे आहात. प्रत्येकाला नशा आहे, अभिमान आहे की बापदादा सदैव आमच्या हृदयामध्ये राहतात आणि आम्ही सदैव बाबांच्या दिलतख्तावर राहतो. तर असा नशा आहे ना! जे दिलतख्तनशीन आहेत त्याच्या संकल्पातच काय परंतु स्वप्नामध्ये देखील दुःखाची लाट, ओरखडा सुद्धा येऊ शकत नाही. का? सर्व खजिन्यांनी भरपूर आहेत, जी वस्तू भरपूर असते ती कधीही डचमळत नाही.

तर चोहो बाजूंच्या मुलांची संपन्नता बघत होतो, बापदादांनी प्रत्येकाचे जमेचे खाते चेक केले. खजिना तर अखुट मिळाला आहे परंतु जो मिळाला आहे त्या खजिन्याला कार्यामध्ये लावून संपवला आहे की मिळालेल्या खजिन्याला कार्यामध्ये देखील लावले आहे आणि वाढवला देखील आहे? प्रत्येकाच्या खात्यामध्ये किती प्रमाणात जमा आहे? कारण हा खजिना फक्त या वेळेसाठीच नाही आहे, हा खजिना भविष्यामध्ये देखील सोबत येणार आहे. जमा झालेलेच सोबत जाईल. तर पर्सेंटेज बघत होते. काय पाहिले? सेवा तर सर्व मुले यथा योग अथवा यथा शक्ती करत आहेत परंतु सेवेचे फळ जमा होणे, त्यामध्ये अंतर पडते. बऱ्याच मुलांचे जमेचे खाते बघितले, सेवा खूप करतात परंतु सेवा करण्याचे फळ जमा झाले की नाही, त्याची निशाणी काय असेल? सेवा कोणतीही असेल भले मनसा, भले वाचा, भले कर्मणा तिन्हीमध्ये १०० टक्के मार्क्स असतात. तिन्हीमध्ये १०० आहेत. सेवा तर केली परंतु जर सेवा करते वेळी आणि सेवेच्या नंतर स्वतः आपल्या मनामध्ये, स्वतःबद्दल संतुष्ट आहेत आणि त्याच सोबत ज्यांची सेवा केली, जे सेवेमध्ये सोबती बनतात किंवा सेवा करणाऱ्याला बघतात, ऐकतात ते देखील संतुष्ट आहेत तर समजा जमा झाले. स्वतःची संतुष्टता आहे, परंतु सर्वांची संतुष्टता नसेल तर जमेचे पर्सेंटेज कमी होते.

यथार्थ सेवेची विधी या पूर्वी देखील सांगितली आहे - तीन गोष्टी विधी पूर्वक असतील तर जमा आहे, ते सांगितले आहे - एक निमित्त भाव, दुसरा निर्मान भावना, तिसरा निर्मल स्वभाव, निर्मल वाणी. भाव, भावना आणि स्वभाव, बोल जर या तीनही गोष्टींपैकी एक गोष्ट जरी कमी असेल, एक आहे दोन नसतील, दोन आहेत एक नसेल तर ती कमजोरी जमेचे परसेंटेज कमी करते. तर चारही सब्जेक्टमध्ये आपणच आपल्याला चेक करा - काय चारही सब्जेक्टमध्ये माझे खाते जमा झाले आहे? का? बापदादांनी पाहिले की बऱ्याच जणांच्या चार गोष्टी ज्या ऐकवल्या, भाव, भावना... त्या प्रमाणे कितीतरी मुलांचा सेवा समाचार भरपूर आहे परंतु जमेचे खाते कमी आहे.

प्रत्येक खजिन्याला चेक करा - ज्ञानाचा खजिना अर्थात जो काही संकल्प, कर्म केले ते नॉलेजफुल होऊन केले? साधारण तर नाही झाले? योग अर्थात सर्व शक्तींचा खजिना भरपूर असावा. तर चेक करा प्रत्येक दिवसाच्या दिनचर्येमध्ये समयानुसार ज्या शक्तीची आवश्यकता आहे, त्याच वेळी ती शक्ती ऑर्डरमध्ये राहिली? मास्टर सर्वशक्तिवान चा अर्थच आहे - मालक. असे तर नाही वेळ निघून गेल्यानंतर शक्ती विषयी विचारच करत राहिले. जर वेळेवर ऑर्डर केल्यावर शक्ती इमर्ज होत नसेल, एकाही शक्तीला जर ऑर्डरप्रमाणे चालवू शकत नसाल तर निर्विघ्न राज्याचे अधिकारी कसे बनणार? तर शक्तींचा खजिना किती जमा आहे? जे वेळेवर कार्यामध्ये लावतात, ते जमा होते. चेक करत जात आहात का की माझे खाते कसे आहे? कारण बापदादांना सर्व मुलांवर अति प्रेम आहे, बापदादा हेच इच्छितात की सर्व मुलांचे जमेचे खाते भरपूर असावे. धारणेमध्ये देखील भरपूर, धारणेची निशाणी आहे - प्रत्येक कर्म गुण संपन्न असेल. ज्यावेळी ज्या गुणाची आवश्यकता आहे तो गुण चेहऱ्यामध्ये, वर्तनामध्ये इमर्ज रूपामध्ये दिसून यावा. जर कोणत्याही गुणाची कमी असेल, समजा सरळपणा या गुणाची कर्म करतेवेळी आवश्यकता आहे, मधुरतेची आवश्यकता आहे, भले बोल मध्ये, भले कर्मामध्ये जर सरळपणा, मधुरता याऐवजी थोडा जरी आवेश किंवा थकव्यामुळे बोल मधुर नसतील, चेहरा मधुर नसेल, सिरीयस असेल तर मग गुणसंपन्न तर म्हणणार नाही ना! कशीही परिस्थिती असेल परंतु माझा जो गुण आहे, तो माझा गुण इमर्ज झाला पाहीजे. आता शॉर्टमध्ये ऐकवत आहे.

असेच सेवेमध्ये देखील - सेवेमध्ये सेवाधारीचे सर्वांत चांगले लक्षण आहे - स्वतः देखील सदैव हलका, लाइट आणि आनंदी दिसून यावा. सेवेचे फळ आहे आनंद. जर सेवा करत असताना आनंद गायब होत असेल तर सेवेच्या खात्यात जमा होत नाही. सेवा केली, वेळ लावला, मेहनत केली तर थोड्या प्रमाणात ते जमा होईल, वाया जाणार नाही. परंतु जितक्या प्रमाणामध्ये जमा व्हायला हवे तितके होत नाही. याचप्रमाणे संबंध-संपर्काची निशाणी - आशीर्वादांची प्राप्ती व्हावी. ज्याच्या पण संबंध-संपर्कामध्ये याल त्यांच्या मनातून तुमच्या प्रति आशीर्वाद निघावेत - खूप छान, बाहेरून नाही, अंतःकरणापासून निघावेत. अंतःकरणातून आशीर्वाद निघावेत आणि जर आशीर्वाद मिळत असतील, तर आशीर्वाद मिळणे हे पुरुषार्थाचे खूप सोपे साधन आहे. भाषण करू नका, चला मनसा सेवा सुद्धा इतकी पॉवरफुल नाहीये. कोणते नवीन प्लॅन बनवायला येत नाहीत, काही हरकत नाही. सर्वात सहज पुरुषार्थाचे साधन आहे आशीर्वाद घ्या, आशीर्वाद द्या. असे बापदादा कितीतरी मुलांच्या मनाचे संकल्प रीड करतात. अनेक मुले समयानुसार, परिस्थितीनुसार म्हणतात की, जर कोणी खराब काम करत असेल तर त्याला आशीर्वाद कसे देऊ शकतो? त्याच्यावर तर क्रोध येतो ना, आशीर्वाद कसे देणार! मग क्रोधाची मुले-बाळे देखील खूप आहेत. परंतु त्याने खराब काम केले, तो खराब आहे तुम्ही बरोबर समजला की हा खराब आहे. हा निर्णय तर चांगला केला, समजले चांगले झाले परंतु एक असते समजणे, दुसरे असते त्याची खराब कामे, खराब गोष्टींना आपल्या मनामध्ये सामावून घेणे (मनामध्ये धरून ठेवणे). समजणे आणि सामावून घेणे यामध्ये फरक आहे. जर तुम्ही हुशार आहात, तर काय हुशार व्यक्ति कोणती खराब वस्तू आपल्या जवळ ठेवेल! परंतु तो खराब आहे, हे तुम्ही मनामध्ये सामावून घेतले अर्थात खराब वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवली, जपून ठेवली. समजणे वेगळी गोष्ट आहे, सामावून घेणे (मनात धरून ठेवणे) वेगळी गोष्ट आहे. हुशार बनणे तर योग्य आहे, परंतु सामावून घेऊ नका. ‘हा तर असाच आहे’, हे सामावून घेतले. असे समजून व्यवहारामध्ये येणे, हे काही शहाणपण नाहीये. तर बापदादांनी चेक केले, आता वेळ अशी समीप येणार नाहीये, तुम्हाला ती घेऊन यायची आहे. बरेचजण विचारतात थोडासा इशारा तर द्या ना - १० वर्षे लागतील, २० वर्षे लागतील, किती वेळ लागेल!

तर बाबा मुलांना प्रश्न विचारत आहेत, बाबांना तर खूप प्रश्न विचारता ना, तर आज बाबा मुलांना प्रश्न विचारत आहेत - वेळेला समीप आणणारे कोण आहेत? ड्रामा आहे परंतु निमित्त कोण आहेत? तुमचे एक गाणे देखील आहे, ‘किसके रोके रुका है सवेरा’. आहे ना गाणे? तर सवेरा (सकाळ) आणणारे कोण आहेत? विनाशकारी तर व्याकुळ झाले आहेत की, विनाश करा, विनाश करा… परंतु नव निर्माण करणारे इतके रेडी आहेत? जर जुने नष्ट झाले, नवीन निर्माण झाले नाही तर काय होईल? म्हणून बापदादांनी आता बाबांऐवजी टिचरचे रूप धारण केले आहे. होमवर्क दिला आहे ना? होमवर्क कोण देते? टीचर. शेवटी आहे सद्गुरूचा पार्ट. तर आपणच आपल्याला विचारा संपन्न आणि संपूर्ण स्टेज कितपत बनली आहे? काय आवाजापासून पार जाणे किंवा आवाजामध्ये येणे, दोन्हीही समान आहे? जसे आवाजामध्ये येणे जेव्हा हवे तेव्हा सहज आहे, तसेच आवाजापासून पार जाणे (सायलेन्समध्ये जाणे) जेव्हा हवे, जसे हवे तसे आहे? सेकंदामध्ये आवाजामध्ये येऊ शकता, सेकंदामध्ये आवाजाच्या पार जाल - इतकी प्रॅक्टिस आहे? जसे शरीराद्वारे जेव्हा हवे, जिथे हवे तिथे ये-जा करू शकता ना. असे मन-बुद्धीद्वारे जेव्हा हवे, जिथे हवे तिथे ये-जा करू शकता? कारण शेवटी पास मार्क्स त्यांना मिळतील ज्यांना सेकंदामध्ये जे हवे, जसे हवे, जी ऑर्डर करू इच्छितात त्यामध्ये सफल होतील. वैज्ञानिक सुद्धा हाच प्रयत्न करत आहेत, सोपे सुद्धा असावे आणि कमी वेळेमध्ये सुद्धा व्हावे. तर अशी स्थिती आहे? काय मिनिटांपर्यंत आला आहात, सेकंदापर्यंत आला आहात, कुठे पर्यंत पोहोचला आहात? जसे लाइट हाऊस माइट हाऊस सेकंदामध्ये ऑन करताच आपली लाईट पसरवतात, असे तुम्ही सेकंदामध्ये लाइट हाऊस बनून चोहो बाजूला लाइट पसरवू शकता? हे स्थूल डोळे एका स्थानावर बसून दूर पर्यंत पाहू शकतात ना! आपली दृष्टी दूरपर्यंत जाऊ शकते ना! असे तुम्ही तिसऱ्या नेत्राद्वारे एका स्थानावर बसून चोहो बाजूला वरदाता, विधाता बनून नजरेने निहाल करू शकता का? स्वतःला सर्व गोष्टींमध्ये चेक करत आहात? तिसरा नेत्र इतका क्लीन आणि क्लियर आहे? सर्व गोष्टींमध्ये जर थोडीशी जरी कमजोरी असेल, तर त्याचे कारण या पूर्वी सुद्धा ऐकवले आहे की, हा हदचा लगाव “मी आणि माझे” आहे. जसे ‘मी’साठी स्पष्ट केले होते - होमवर्क सुद्धा दिला होता. दोन ‘मी’ला समाप्त करून एक ‘मी’ ठेवायचा आहे. सर्वांनी हा होमवर्क केला? जे या होमवर्कमध्ये यशस्वी झाले त्यांनी हात वर करा. बापदादांनी सर्वांना बघितले. हिंमत ठेवा, घाबरू नका हात वर करा. चांगले आहे मुबारक मिळेल. फार थोडे आहेत. या सर्वांचे हात टी.व्ही. वर दाखवा. खूप थोड्याजणांनी हात वर केला आहे. आता काय करूया? सर्वांना स्वतःवर हसू देखील येत आहे.

अच्छा - दुसरा होमवर्क होता - क्रोधाला सोडायचे आहे, हे तर सोपे आहे ना! तर क्रोधाला कोणी सोडले आहे? इतक्या दिवसांमध्ये क्रोध केलेला नाही? (यामध्ये बऱ्याच जणांनी हात वर केला) यामध्ये थोडे जास्त आहेत, ज्यांनी क्रोध केलेला नाही, तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना देखील विचारणार. ज्यांनी हात वर केला त्यांनी उभे रहा. छान खूप आहेत. क्रोध केलेला नाही ना? संकल्पामध्ये, मनामध्ये क्रोध आला? चला, तरीही मुबारक असो, जरी मनामध्ये आला मुखाने नाही केला तरीही मुबारक आहे. खूप छान.

तर तुम्हीच रिझल्टच्या हिशोबाने बघा - काय स्थापनेचे कार्य, स्वतःला संपन्न बनवणे आणि सर्व आत्म्यांना मुक्तीचा वारसा देणे, हे संपन्न झाले आहे? स्वतःला जीवनमुक्ती स्वरूप बनवणे आणि सर्व आत्म्यांना मुक्तीचा वारसा देणे - हे आहे स्थापना करणाऱ्या आत्म्यांचे श्रेष्ठ कर्म. तर बापदादा म्हणूनच विचारत आहेत की सर्व बंधनातून मुक्त, जीवनमुक्तच्या स्टेजवर संगमामध्येच पोहोचायचे आहे की सतयुगामध्ये पोहोचायचे आहे? संगमयुगामध्ये संपन्न व्हायचे आहे की तिथे सुद्धा राजयोग करून शिकायचे आहे? संपन्न तर इथेच बनायचे आहे ना? संपूर्ण देखील इथेच बनायचे आहे. संगमयुगाच्या समयाचा देखील सर्वांत मोठ्यात मोठा खजिना आहे. तर ‘किसके रोके रुका है सवेरा’ (कोणामुळे सकाळ व्हायची थांबली आहे), सांगा बरं.

तर बापदादा काय इच्छितात? कारण बाबांच्या आशेचे दीपक मुलेच आहेत. तर आपले खाते चांगल्या रीतीने चेक करा. पुष्कळ मुलांना तर पाहिले कितीतरी मुले तर मौजीराम (खाऊन-पिऊन मजेत राहणारे) आहेत, मजेत चालत आहेत. जे झाले ते चांगले. आता तर मजा करूया, सतयुगामध्ये कोणी पाहिले आहे, कोणाला माहीत आहे. तर जमेच्या खात्यामध्ये असे मौजीलाल म्हणा, मौजीराम म्हणा, अशीही मुले बघितली. मजा करा. दुसऱ्यांना सुद्धा म्हणतात - ‘अरे काय करायचे आहे, मजा करा. खा, प्या मजा करा’. करा मजा, बाबा देखील म्हणतात - मजा करा. जर थोड्यामध्ये राजी (समाधानी) राहणार असाल तर थोड्यामध्ये समाधानी राहा. विनाशी साधनांची मजा अल्पकाळाची असते. कायमच्या मजेला (सुखाला) सोडून जर अल्पकालीन साधनांच्या मजेमध्ये राहू इच्छिता तर बापदादा काय म्हणणार? इशारा देतील अजून काय करणार? कोणी हिऱ्यांच्या खाणीवर जाईल आणि दोन हिरे घेऊन खुश होईल त्याला काय म्हणणार? तर असे बनू नका. अतींद्रिय सुखाच्या मौजेच्या झोपाळ्यामध्ये झोके घ्या. अविनाशी प्राप्तींच्या झोपाळ्यामध्ये मजेने झोके घ्या. ड्रामामध्ये बघा, मायेचा पार्ट देखील विचित्र आहे. याच वेळी अशी साधने निघाली आहेत, जी अगोदर नव्हतीच मुळी. परंतु साधनांशिवाय ज्यांनी साधना केली, सेवा केली ती देखील एक्झाम्पल समोर आहेत ना! तेव्हा ही साधने होती काय? परंतु सेवा किती झाली? क्वालिटी तर निघाली ना! आदि रत्न तर तयार झाले ना! हे साधनांचे आकर्षण आहे. साधनांना यूज करणे चुकीचे म्हणत नाही परंतु साधनेला विसरून साधनांमध्ये गढून जाणे, याला बापदादा रॉंग म्हणत आहेत. साधन जीवनाच्या उडत्या कलेचे साधन नाहीये, आधार नाहीये. साधना आधार आहे. जर साधने ऐवजी साधनांना आधार बनवाल तर रिझल्ट काय असेल? साधने विनाशी आहेत, रिझल्ट काय? साधना अविनाशी आहे, त्याची रिझल्ट काय असेल? अच्छा.

चोहो बाजूंच्या मुलांची पुरुषार्थ आणि प्रेमाची समाचार पत्र बापदादांना मिळाली आहेत, बापदादा मुलांचा उमंग-उत्साह पाहून ‘हे करणार, ते करणार…’ हा समाचार ऐकून खुश होतात. आता फक्त जी हिंमत ठेवली आहे, उमंग-उत्साह ठेवला आहे, त्याला पुन्हा-पुन्हा अटेंशन देऊन प्रॅक्टिकल मध्ये आणा. हेच सर्व मुलांप्रति बापदादांचे हृदयापासून आशीर्वाद आहेत आणि सर्व चोहो बाजूंचे संकल्प, बोल आणि कर्मामध्ये, संबंध-संपर्कामध्ये संपन्न बनणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना सदैव स्वदर्शन करणाऱ्या, स्वदर्शन चक्रधारी मुलांना, सदैव दृढ संकल्पाद्वारे मायाजीत बनून बाबांसमोर स्वतःला प्रत्यक्ष करणाऱ्या आणि विश्वासमोर बाबांना प्रत्यक्ष करणाऱ्या सेवाभावी, नॉलेजफुल, सक्सेसफुल मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि हृदयापासून पद्म-पद्मपटीने आशीर्वाद असो, नमस्ते असो. नमस्ते.

वरदान:-
खऱ्या आणि शुद्ध अंतःकरणाच्या आधारे नंबरवन घेणारे दिलाराम पसंत भव

दिलाराम बाबांना शुद्ध अंतःकरणावाली मुलेच पसंत आहेत. दुनियेची बुद्धी जरी नसली परंतु खरे साफ मन असेल तर नंबरवन घेणार कारण बुद्धी तर बाबा इतकी मोठी देतात ज्याद्वारे रचयित्याला जाणल्यामुळे रचनेच्या आदि, मध्य, अंताच्या नॉलेजला जाणता. तर खऱ्या आणि स्वच्छ मनाच्या आधारानेच नंबर बनतात, सेवेच्या आधारे नाही. सच्च्या मनाने केलेल्या सेवेचा प्रभाव हृदयापर्यंत पोहोचतो. बुद्धिमत्ता असणारे नाव कमावतात आणि हृदयवाले आशीर्वाद कमावतात.

सुविचार:-
सर्वांप्रती शुभ चिंतन आणि शुभकामना ठेवणे हाच खरा परोपकार आहे.

अव्यक्त इशारे - सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना:-

जी मुले परमात्म प्रेमामध्ये सदैव लवलीन, हरवलेली राहतात त्यांची झलक आणि फलक (तेज आणि नशा), अनुभूतीची किरणे इतकी शक्तीशाली असतात की कोणतीही समस्या जवळ येणे तर दूर परंतु डोळे वर करून पाहू देखील शकत नाही. त्यांना कधीही कोणत्याही प्रकारची मेहनत करावी लागत नाही.