03-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, नावा-रूपापासून न्यारी अशी कोणतीही वस्तू नसते. आत्म्याला किंवा परमात्म्याला देखील नावा-रूपापासून न्यारा म्हणता येणार नाही. त्यांच्यामध्ये देखील अविनाशी पार्ट नोंदलेला आहे”

प्रश्न:-
शिवबाबांना ‘भोलेनाथ’ असे म्हणून आठवण करतात, त्यांना ‘भोळा’ का म्हटले आहे?

उत्तर:-
कारण बाबाच अहिल्यांचा, गणिकांचा, कुब्जांचा उद्धार करतात. त्यांना विश्वाच्या राजाईचा वारसा देतात. मनुष्य तर बाबांसाठी म्हणतात की, दुःख देखील तेच देतात आणि सुख देखील तेच देतात; परंतु बाबा म्हणतात - मी तर तुम्हा मुलांकरिता सुखाचे राज्य स्थापन करतो. मला दुःख हर्ता, सुख कर्ता म्हटले गेले आहे. विचार करा, मी पिता, आपल्या मुलांना दुःख कसे बरे देऊ शकतो?

गीत:-
दूर देश का रहने वाला...

ओम शांती।
रुहानी मुलांनी गाणे ऐकले अर्थात आत्म्यांनी या शरीराच्या कानरूपी कर्मेंद्रिया द्वारे गाणे ऐकले - दूर देशातून प्रवासी आला आहे. तुम्ही सर्व प्रवासी आहात ना. जे सर्व मनुष्य मात्र आत्मे आहेत, ते सर्व प्रवासी आहेत. आत्म्यांचे इथे कोणतेही घर नाही. आत्मा निराकार आहे. निराकारी दुनियेमध्ये राहणारे निराकारी आत्मे आहेत. त्याला निराकारी आत्म्यांचे ‘घर’, ‘देश’ किंवा ‘लोक’ म्हटले जाते. याला जीव आत्म्यांचा देश म्हटले जाते. तो आहे आत्म्यांचा देश, नंतर जेव्हा आत्मे इथे येऊन शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा निराकारचे साकार बनतात. असे नाही, की आत्म्याला कोणतेही रूप नाही आहे. रूप देखील जरूर आहे आणि नाव देखील आहे. इतकी छोटीशी आत्मा या शरीराद्वारे किती मोठा पार्ट बजावते. प्रत्येक आत्म्यामध्ये पार्ट बजावण्याचे किती मोठे रेकॉर्डिंग भरलेले आहे. एकदाच रेकॉर्डिंग भरले जाते, मग कितीही वेळा रिपीट करा, तरीही तेच चालेल. तसेच या शरीरामध्ये आत्मा रेकॉर्डर प्रमाणे आहे, त्यामध्ये ८४ जन्मांचा संपूर्ण पार्ट भरलेला आहे. जशी आत्मा निराकार आहे, तसे बाबा देखील निराकार आहेत. काही-काही शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे की, ते नावा-रूपापासून न्यारे आहेत. परंतु नावा-रूपापासून न्यारी अशी कोणतीही वस्तू असत नाही. आकाश देखील पोलार (पोकळ) आहे, म्हणजे नाव-रूप तर आहे ना. नावा शिवाय कोणतीही वस्तू नसते. मनुष्य समजतात की परमपिता नावा-रूपापासून न्यारे आहेत. जर नावच नसेल, तर रूप देखील नाही आणि देशही नाही. मग तर काहीच असू शकत नाही. बोलावतात देखील - दूर देशातील राहणारे परमपिता परमात्मा. आता दूर देशामध्ये आत्मे राहतात, हा साकार देश आहे, यामध्ये दोन राज्ये चालतात - राम राज्य आणि रावण राज्य. अर्धाकल्प आहे रामराज्य आणि अर्धाकल्प आहे रावण राज्य. मुलांना समजावून सांगितले गेले आहे की, सतयुगा पासून ईश्वरीय राज्य सुरू होते, रामराज्य स्थापन करणारे परमपिता परमात्मा आहेत. ते कधीही रावण राज्य स्थापन करू शकत नाहीत. पिता मुलांकरिता कधी दुःखाचे राज्य थोडेच बनवतील. म्हणतात - ईश्वरच सुख-दुःख देतात. बाबा म्हणतात - मी मुलांना दुःख कसे देऊ शकतो! माझे नावच आहे - ‘दुःख हर्ता, सुख कर्ता’. ही तर मनुष्यांची चूक आहे. ईश्वर कधीही दुःख देणार नाहीत. यावेळी आहेच दुःख धाम. अर्धा कल्प रावण राज्यामध्ये दुःखच मिळते. सुखाचा अंश देखील नाही. सुखधामा मध्ये कधीही दुःख नसते. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत. आता तुम्ही संगमावर आहात. या दुनियेला काही कोणी नवीन दुनिया म्हणणार नाही. नवीन दुनियेचे नावच आहे - स्वर्ग. तीच नंतर जुनी दुनिया बनते. नवीन वस्तू जेव्हा जुनी आणि खराब दिसू लागते, तेव्हा जुनी वस्तू नष्ट केली जाते. मनुष्य विषालाच (विकारालाच) सुख समजतात. गायले देखील जाते - ‘अमृत छोड विष काहे को खाए’. ग्रंथामध्ये गुरुनानकांचे देखील शब्द आहेत. ‘अशंख मूरख अंध घोर, अशंख चोर हराम खोर, असंख अमर कार जाहि जोर…’ बाबांची महिमा गातात - तुम्ही येऊन जे कराल, त्याने कल्याणच होईल. नाहीतर रावण राज्यामध्ये मनुष्य वाईट कर्मच करतील. बाबाच येऊन मूत पलीती कपडे धुतात (पतित आत्म्याला स्वच्छ करतात). ग्रंथामध्ये खूप काही लिहिलेले आहे. सिंधी लोक ग्रंथ ठेवतात. आता हे काही शीख धर्माचे नाहीत. हे तर आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहेत. शिखांचे गुरुनानक आहेत, त्यांना दाढी आणि लांब केस होते. तर सर्व शिखांना देखील दाढी आणि लांब केस असले पाहिजेत. आजकाल तर दाढी ठेवत नाहीत. खूप फॅशनेबल बनले आहेत. नाहीतर फॉलो केले पाहिजे ना. जर म्हणता की, आम्ही गुरु नानकांचे फॉलोअर्स आहोत, तर गुरुनानकांना फॉलो केले पाहिजे ना. तुम्हा मुलांना आता कळले आहे की, गुरुनानकांना ५०० वर्षे झाली मग ते पुन्हा केव्हा येतील? तुम्ही लगेच सांगाल. कोणालाही विचारा - ‘हे तर सांगा की, गुरुनानक पुन्हा केव्हा येतील’? तर म्हणतील, ‘त्यांची आत्मा ज्योत ज्योतीमध्ये विलीन झाली, मग येणार कसे?’ तुम्ही म्हणाल - आज पासून ४५०० वर्षा नंतर गुरुनानक पुन्हा येतील. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण जगाचा इतिहास-भूगोल फिरत असतो. बुद्ध, क्राइस्ट इत्यादी सर्वांविषयी सांगाल की, या वेळी तमोप्रधान आहेत, कब्रदाखल आहेत. याला कयामतचा (महाविनाशाचा) वेळ म्हटले जाते. सर्व मनुष्यमात्र जणू मरून पडले आहेत. सर्वांची ज्योत जणू विझलेली आहे. बाबा येतात सर्वांना जागे करण्यासाठी. जी मुले काम-चितेवर बसून भस्म झाली आहेत, त्यांना अमृत वर्षेने जागे करून सोबत घेऊन जातील. मायेने काम-चितेवर बसवून कब्रदाखल केले आहे. झोपी गेले आहेत. आता बाबा अमृत पाजत आहेत. ‘अमृतसर’ नाव यामुळेच ठेवले आहे. बाबा येऊन अमृत पाजतात. आता कुठे ज्ञान-अमृत आणि कुठे पाण्याची गोष्ट! शीख लोकांचा मोठा उत्सवाचा दिवस असतो, तेव्हा खूप धूमधडाक्याने तलाव साफ स्वच्छ करतात, माती काढून टाकतात, म्हणून नावच ठेवले आहे - अमृतसर. अमृताचा तलाव. आता गुरुनानक साहेब काही ज्ञानाचे सागर नाहीत, त्यांनी देखील बाबांची महिमा केली आहे. स्वतः म्हणतात - ‘एकोंकार, सतनाम, ते सदैव सत्य बोलणारे आहेत’. सत्यनारायणाची कथा आहे ना. सिंध प्रदेशातील लोक बाहेर जातात, तेव्हा सत्य नारायणाची कथा करवून घेतात. समजतात की सत्यनारायणाची कथा केल्याने सुरक्षितपणे पार जाऊ. अमरकथा, तीजरीची कथा भक्तिमार्गामध्ये किती कथा ऐकत आले आहेत. म्हणतात - शंकराने पार्वतीला कथा ऐकवली. ते तर सूक्ष्मवतनमध्ये राहणारे मग तिथे कोणती कथा ऐकवली? या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. वास्तविक तुम्हाला अमरकथा ऐकवून अमर लोकमध्ये घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. मृत्युलोक मधून अमरलोक मध्ये मी घेऊन जातो. बाकी सूक्ष्मवतन मध्ये पार्वतीने कोणता गुन्हा केला होता, की तिथे जाऊन तिला कथा ऐकवतील. आता तुम्हाला समजते आहे की, आपण नरापासून नारायण आणि नारीपासून लक्ष्मी बनत आहोत. ही आहे अमर लोकामध्ये जाण्याची खरी सत्यनारायणाची कथा, तीजरीची कथा. तुम्हा आत्म्यांना आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे.

बाबा समजावून सांगत आहेत - तुम्हीच गुल-गुल पूज्य होता, मग ८४ जन्मानंतर तुम्हीच पुजारी बनला आहात; म्हणूनच गायले गेले आहे - ‘आपेही पूज्य आपेही पुजारी’. बाबा म्हणतात - मी तर सदैव पूज्य आहे. मी येऊन तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनवतो. म्हणतात - ‘हे राम, येऊन आम्हाला पावन बनवा’. सर्व भक्त बोलावतात. आत्माच बोलावते ना - ‘हे पतित-पावन’. आता तुम्ही समजता की, गीता काही श्रीकृष्णाने ऐकवलेली नाही, पावन बनविणारे एकच परमपिता परमात्मा आहेत. केवळ एक राम. तर बाबा समजावून सांगत आहेत की ओपिनियन घेत राहा की ईश्वर सर्वव्यापी नाहीये. गीतेचा भगवान शिव आहे, श्रीकृष्ण नाही. सर्व प्रथम हे विचारा की, भगवान कोणाला म्हटले जाते - निराकाराला की साकारला? श्रीकृष्ण तर साकार आहे, शिव निराकार आहेत. ते फक्त या शरीराचा आधार घेतात. बाकी मातेच्या गर्भातून जन्म घेत नाहीत. सर्वात पहिली गर्भामध्ये येणारी श्रीकृष्णाची आत्मा आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर देखील सूक्ष्म शरीरधारी आहेत. शिवबाबांना काही शरीर नाहीये. हे या लोकमध्ये स्थूल शरीर असते. बाबांची महिमा आहे - ‘पतित-पावन, सर्वांचे सद्गति दाता, सर्वांचे लिबरेटर, दुःख हर्ता, सुख कर्ता’. अच्छा, सुख कुठे असू शकते? सुख मिळेल दुसऱ्या जन्मामध्ये, जेव्हा रावणाची दुनिया नष्ट होऊन स्वर्गाची स्थापना होईल. अच्छा, लिबरेट कोणापासून करतात? रावणाच्या दुःखा पासून. हे तर दुःखधाम आहे ना. अच्छा, नंतर गाइड देखील बनतात. ही शरीरे तर इथेच नष्ट होतात. बाकी आत्म्यांना घेऊन जातात. सर्वांना दुःखातून सोडवून, पवित्र बनवून घरी घेऊन जातात. मनुष्य जेव्हा विवाह करून येतात, तेव्हा पुढे पती असतो आणि मागे वधू असते आणि मागे वरात असते. आता तुमची माळ देखील अशीच आहे. वरती शिवबाबा फूल आहेत; सर्व प्रथम फुलाला नमस्कार करतील. मग युगलमणी ब्रह्मा-सरस्वती, नंतर तुम्ही आहात, जी बाबांची मदतगार मुले आहात. फूल शिवबाबांच्या आठवणीद्वारेच सूर्यवंशी विष्णूची माळा बनली आहे. ब्रह्मा-सरस्वती सो लक्ष्मी-नारायण बनतात. देवता, क्षत्रिय... मग शूद्रा पासून ब्राह्मण बनून हे नॉलेज घेऊन लक्ष्मी-नारायण बनतात. ही माळा त्यांचीच बनलेली आहे. हे ब्रह्मा-सरस्वतीच राजा-राणी बनतील. त्यांनी मेहनत केली आहे, म्हणून त्यांची पूजा होते. माळा काय चीज आहे, हे कोणालाही माहीत नाही. अशीच माळा जपत राहतात. १६१०८ ची देखील माळा असते. मोठमोठ्या मंदिरांमध्ये ठेवली जाते. मग कोणी कुठून ओढेल, कोणी कुठून. बाबा मुंबईमध्ये लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात जात होते. जाऊन माळा जपत असत, ‘राम-राम’, असा जप करत असत. फूल, शिवबाबा आहेत ना. फुलालाच राम-राम म्हणतात आणि मग संपूर्ण माळेवर मस्तक टेकवतात. ज्ञान तर काहीच नाहीये. पाद्री लोक देखील हातामध्ये माळा पकडून जप करत राहतात. त्यांना विचारा की, ‘तुम्ही कोणाची माळ जपत असता?’ तर म्हणतील - ‘क्राइस्टच्या आठवणीमध्ये माळ जपतो’. त्यांचे मोठे पोप पाद्री असतात तर ती मग त्या पोप लोकांची माळा असेल. त्या सर्वांची चित्रे आहेत. पोप लोकांचा किती मान आहे. त्यांना स्वतःलाच माहीत नाहीये की क्राइस्टची आत्मा आता कुठे आहे! तुम्ही जाणता की, क्राइस्टची आत्मा देखील आता बेगर रूपामध्ये आहे. तुम्ही देखील आता बेगर टू प्रिन्स बनत आहात. भारतच प्रिन्स होता, आता बेगर (गरीब) आहे आणि पुन्हा प्रिन्स बनतो. बनविणारे एक रुहानी बाबा आहेत. बेगर पासून प्रिन्स बनता. प्रिन्स-प्रिन्सेसचे एक कॉलेज देखील आहे, जिथे प्रिन्स-प्रिन्सेस जाऊन शिक्षण घेतात. तुम्ही इथे शिकून २१ जन्मां करिता स्वर्गामध्ये प्रिन्स-प्रिन्सेस बनता. नॉलेजद्वारे तुम्ही मनुष्यापासून देवता बनता.

आता तुम्ही समजता, जो श्रीकृष्ण सतयुगाचा प्रिन्स होता तो ८४ जन्मानंतर बेगर बनला आहे. ५ हजार वर्षांपूर्वी देवी-देवता किती श्रीमंत होते. आता तेच कंगाल, गरीब बनले आहेत. या गोष्टी फक्त तुम्हीच ऐकू शकता. भगवानुवाच - ते सर्वांचे फादर आहेत. तुम्ही गॉड फादर कडून ऐकता. गीतेमध्ये फक्त हीच चूक केली आहे की ‘शिव भगवानुवाच’ ऐवजी ‘श्रीकृष्ण भगवानुवाच’ असे नाव टाकले आहे; म्हणून गायले जाते - खोटी दुनिया. या वेळी संपूर्ण दुनिया काट्यांचे जंगल बनले आहे. मुंबईमध्ये बाबुलनाथचे मंदिर आहे. बाबा येऊन या काट्यांना फूल बनवतात. सर्व जण एकमेकांना काटा टोचतात अर्थात काम-कटारी चालवतात, म्हणून याला काट्यांचे जंगल म्हटले जाते. सतयुगाला गार्डन ऑफ अल्लाह म्हटले जाते. तीच फुले, काटे बनतात आणि पुन्हा काट्यांपासून फुले बनतात. सतयुगामध्ये कधीही रावणाला जाळत नाहीत. रावण भारताचा जुना शत्रू आहे. तुमची लढाई रावणाशी आहे, ज्याने अर्धाकल्प दुःख दिले आहे. सरतेशेवटी मोठी लढाई देखील होईल. खराखुरा दसरा होणार आहे. रावण राज्यच नष्ट होईल आणि तुम्हाला पुन्हा सोन्याचे महाल मिळतील. आता तुम्ही रावणावर विजय प्राप्त करून स्वर्गाचे मालक बनता. बाबा संपूर्ण विश्वाचे राज्य-भाग्य देतात म्हणून त्यांना ‘शिव भोला भंडारी’ म्हणतात. गणिका, अहिल्या, कुब्जा सर्वांना बाबा विश्वाचे मालक बनवतात. किती भोळे आहेत. येतात देखील पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये. बाकी जे स्वर्गाच्या लायक नाहीत, ते विकार सोडू शकत नाहीत. बाबा म्हणतात - मुलांनो, आता या अंतिम जन्मामध्ये तुम्ही पावन बना. हे विकार तर पॉयझन आहेत, जे तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःखी करतात. तुम्ही या एका अंतिम जन्मामध्ये या विकारांना सोडू शकत नाही काय? मी तुम्हाला अमृत पाजून अमर बनवतो. तरी देखील तुम्ही पवित्र बनत नाही. विकारांशिवाय, सिगारेट शिवाय, दारू शिवाय राहू शकत नाही. मी बेहदचा पिता तुम्हाला सांगत आहे की, ‘तुम्ही एक जन्म पवित्र बना, तर मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवेन’.

तुम्ही जाणता की, बाबा आलेलेच आहेत संपूर्ण दुनियेला दुःखा पासून मुक्त करून सुखधाम, शांतीधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. आता सर्व धर्मांचा विनाश होईल. एक आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. ग्रंथामध्ये देखील परमपिता परमात्म्याला अकालमूर्त म्हटले आहे. बाबा आहेत - महाकाल. तो काळ तर एखाद दुसऱ्याला घेऊन जाईल, मी तर सर्व आत्म्यांना घेऊन जाईन, म्हणून मला ‘महाकाल’ म्हटले जाते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या अंतिम जन्मामध्ये ज्ञान-अमृत पिऊन अमर बनायचे आहे. स्वतःला स्वर्गामध्ये जाण्याच्या लायक बनवायचे आहे. वाईट सवयींना सोडून द्यायचे आहे.

२) आता शिक्षण घेऊन २१ जन्मांकरिता स्वर्गामध्ये प्रिन्स-प्रिन्सेस बनायचे आहे. खरीखुरी सत्यनारायणाची कथा ऐकून नरापासून नारायण बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
कमी शब्दांद्वारे ज्ञानाच्या सर्व रहस्यांना स्पष्ट करणारे यथार्थ आणि शक्तिशाली भव

कोणतीही वस्तू जितकी अधिक शक्तिशाली असते, तितकी तिची क्वांटिटी कमी असते. त्याच प्रमाणे जेव्हा तुम्ही आपल्या निर्वाण स्थितीमध्ये स्थित होऊन वाणीमध्ये याल, तेव्हा शब्द कमी असतील परंतु यथार्थ आणि शक्तिशाली असतील. एका शब्दामध्ये हजारो शब्दांचे रहस्य सामावलेले असेल, ज्यामुळे व्यर्थ वाणी आपोआप समाप्त होईल. ज्ञानाची सर्व रहस्ये एका शब्दातून स्पष्ट करू शकाल, आणि विस्तार समाप्त होईल.

बोधवाक्य:-
हृदयापासून ‘बाबा’ म्हणणे अर्थात आनंद आणि शक्तीची प्राप्ती करणे.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

दात्याची मुले, सर्वांना देण्याच्या भावनेने भरपूर बना. कधीही असा संकल्प करू नका की, असे झाले तर मी देखील असे करेन, अशी परिस्थिती असेल, असे वातावरण असेल तेव्हा मी हे करेन. ‘दाता’पणाचे संस्कार असणाऱ्याला सर्व बाजूंनी आपोआप सहयोग प्राप्त होतो (मदत मिळते); त्यामुळे मास्टर दाता इतरांकडून घेण्याची भावना ठेवू शकत नाहीत.