03-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आहात खरे-खरे परवाने जे आता शमेवर फिदा होता (समर्पित होता), या समर्पित होण्याचेच यादगार ही दिवाळी आहे”

प्रश्न:-
बाबांनी आपल्या मुलांना कोणता समाचार ऐकविला आहे?

उत्तर:-
बाबांनी ऐकविले आहे - तुम्ही आत्मे निर्वाणधामहून कसे येता आणि मी कसा येतो. मी कोण आहे, काय करतो, कसे राम राज्य स्थापन करतो, कसे तुम्हा मुलांना रावणावर विजय प्राप्त करवून देतो. आता तुम्ही मुले या सर्व गोष्टींना जाणता. तुमची ज्योत जागृत झाली आहे.

गीत:-
तुम्हीं हो माता पिता…

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी हे गाणे ऐकले. आत्म्यांनी या भौतिक कर्मेंद्रियांद्वारे गाणे ऐकले. गाण्यामध्ये सुरुवातीला तर अगदी बरोबर होते. नंतर मग भक्तीचे शब्द होते - तुमच्या ‘चरणाची धूळ आहोत’. आता मुले चरणांची धूळ थोडीच असतात. हे चुकीचे आहे. बाबा मुलांना बरोबर शब्द सांगत आहेत. बाबा येतात देखील तिथून जिथून मुले येतात, ते आहे निर्वाणधाम. मुलांना सर्वांच्या येण्याचा समाचार तर ऐकवला. माझाही ऐकविला की मी कसा येतो, येऊन काय करतो. रामराज्य स्थापन करण्याच्या हेतूने रावणावर विजय प्राप्त करवून देतात. मुले जाणतात - रामराज्य आणि रावण राज्य याच पृथ्वीवर म्हणता येईल. आता तुम्ही विश्वाचे मालक बनता. धरती, आकाश, सूर्य इत्यादी सर्व तुमच्या हातामध्ये येते. तर म्हणता येईल रावण राज्य संपूर्ण विश्वावर आणि राम राज्य देखील संपूर्ण विश्वावर आहे. रावण राज्यामध्ये किती करोडो आहेत, राम राज्यामध्ये फार थोडे असतात मग हळू-हळू वृद्धी होत जाते. रावण राज्यामध्ये पुष्कळ वृद्धी होते कारण मनुष्य विकारी बनतात. राम राज्यामध्ये आहेत निर्विकारी. मनुष्यांचीच कहाणी आहे. तर राम देखील बेहदचा मालक, रावण देखील बेहदचा मालक आहे. आता किती असंख्य धर्म आहेत. गायले आहे अनेक धर्मांचा विनाश. बाबांनी झाडा विषयी देखील समजावून सांगितले आहे.

आता दसरा साजरा करतात, रावणाला जाळतात. हे आहे हदचे जाळणे. तुमची तर आहे बेहदची गोष्ट. रावणाला देखील फक्त भारतवासीच जाळतात, विदेशामध्ये देखील जिथे-जिथे जास्त भारतवासी असतील तिथे देखील जाळतील. तो आहे हदचा दसरा. दाखवतात की, लंकेमध्ये रावण राज्य करत होता, सीतेला चोरून लंकेमध्ये घेऊन गेला. या झाल्या हदच्या गोष्टी. आता बाबा म्हणतात साऱ्या विश्वावर रावणाचे राज्य आहे. आता रामराज्य नाही आहे. रामराज्य अर्थात ईश्वराने स्थापन केलेले राज्य. सतयुगाला म्हटले जाते रामराज्य. माळा जपतात, ‘रघुपति राघव राजाराम’ म्हणतात परंतु राजारामचा जप करत नाहीत, जे साऱ्या विश्वाची सेवा करतात, त्यांची माळा जपतात.

भारतवासी दसऱ्यानंतर मग दिवाळी साजरी करतात. दिवाळी का साजरी करतात? कारण देवतांचा राज्याभिषेक होतो. कोरोनेशनला (राज्याभिषेकाच्या दिवशी) खूप दिवे इत्यादी पेटवतात. एक तर ताजपोशी (राज्याभिषेक) आणि दुसरे म्हटले जाते घरा-घरामध्ये दिव्यांच्या माळा. प्रत्येक आत्म्याची ज्योत जागृत होते. आता सर्व आत्म्यांची ज्योत विझलेली आहे. आयरन एज्ड आहे अर्थात अंध:कार आहे. अंध:कार अर्थात भक्ती मार्ग. भक्ती करता-करता ज्योत मंद होत जाते. बाकी ती दिव्यांची माळा तर आर्टिफिशियल (कृत्रिम) आहे. असे नाही की कोरोनेशन होते तेव्हा आतिशबाजी करतात. दीपावलीला तर लक्ष्मीचे आवाहन करतात. पूजा करतात. हा उत्सव आहे भक्तिमार्गामधला. जो कोणी राजा तख्तावर बसतो तर त्यांचा कोरोनेशन डे (राज्याभिषेक दिवस) धुमधडाक्यात साजरा केला जातो. हे सर्व आहे हदचे. आता तर बेहदचा विनाश, खरा-खरा दसरा होणार आहे. बाबा आले आहेत सर्वांची ज्योत जागृत करण्यासाठी. मनुष्य समजतात आमची ज्योत मोठ्या ज्योतीमध्ये विलीन होईल. ब्रह्म समाजाच्या मंदिरामध्ये सदैव ज्योत तेवत असते. समजतात जसे परवाने ज्योतीवर फेरी मारून फिदा होतात तसे आमची देखील आत्मा आता मोठ्या ज्योतीमध्ये विलीन होईल. यावर दृष्टांत बनवला आहे. आता तुम्ही आहात अर्ध्याकल्पाचे आशिक. तुम्ही येऊन एका माशुकवर फिदा झाले आहात, जळून जाण्याची तर गोष्टच नाही. जसे ते आशिक-माशुक असतात तर ते एकमेकांचे आशिक बनतात. इथे ते एकच माशुक आहेत, बाकी सर्व आहेत आशिक. आशिक त्या माशुकची भक्ती मार्गामध्ये आठवण करत राहतात. माशुक, तुम्ही या तर आम्ही तुमच्यावर बलीहार जाऊ. तुमच्या शिवाय आम्ही कोणाचीही आठवण करणार नाही. हे तुमचे शारीरिक प्रेम नाही आहे. त्या आशिक-माशुकचे शारीरिक प्रेम असते. बस्स, एकमेकांना बघत राहतात, बघूनच जसे तृप्त होतात. इथे तर एक माशुक बाकी सर्व आहेत आशिक. सर्व बाबांची आठवण करतात. भले मग कोणी निसर्ग देवता इत्यादीला देखील मानतात. तरी देखील ‘ओ गॉड’, ‘हे भगवान’ मुखातून जरूर निघते. सर्वजण त्यांना बोलावतात, आमचे दुःख दूर करा. भक्तीमार्गामध्ये तर भरपूर आशिक-माशूक असतात. कोणी कोणाचा आशिक, कोणी कोणाचा आशिक. हनुमानाचे किती आशिक असतील? सर्वजण आपल्या-आपल्या माशूकची मूर्ती बनवून मग आपसामध्ये एकत्र येऊन त्यांची पूजा करत बसतात. पूजा करून मग माशुकला विसर्जित करतात. अर्थ काहीच निघत नाही. इथे तशी गोष्ट नाहीये. हे तुमचे माशुक एव्हर गोरे (सदा पावन) आहेत, कधी सावळे (अपवित्र) बनत नाहीत. बाबा प्रवासी येऊन सर्वांना गोरे (पावन) बनवतात. तुम्ही देखील प्रवासी आहात ना. दूर देशातून येऊन इथे पार्ट बजावता. तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजतात. आता तुम्ही त्रिकालदर्शी बनला आहात. रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणता तर तुम्ही झालात - ‘त्रिकालदर्शी ब्रह्माकुमार-कुमारी’. जसे जगद्गुरु इत्यादीचे देखील टायटल (उपाधी) मिळते ना. तुम्हाला हे टायटल (ही उपाधी) मिळते. तुम्हाला सर्वात सुंदर उपाधी मिळते - ‘स्वदर्शन चक्रधारी’. तुम्ही ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी आहात की शिवबाबा देखील आहेत? (शिवबाबा देखील आहेत) हो, कारण स्वदर्शन चक्रधारी आत्मा शरीरा सोबत असते ना. बाबा देखील यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येऊन समजावून सांगतात. शिवबाबा जर स्वदर्शन चक्रधारी नसते तर तुम्हाला कसे बनवू शकले असते. ते सर्वात सुप्रीम उच्च ते उच्च आत्मा आहेत. देहाला थोडेच म्हटले जाते. ते सुप्रीम बाबाच येऊन तुम्हाला सुप्रीम बनवतात. स्वदर्शन चक्रधारी आत्म्यांशिवाय दुसरे कोणीही बनू शकणार नाही. कोणते आत्मे? जे ब्राह्मण धर्मामध्ये आहेत. जेव्हा शूद्र धर्मामध्ये होते, तेव्हा जाणत नव्हते. आता बाबांद्वारे तुम्ही जाणले आहे. किती छान-छान गोष्टी आहेत. तुम्हीच ऐकता आणि खुश होता. बाहेरचे हे ऐकतील तर आश्चर्यचकित होतील, ओहो, हे तर खूप श्रेष्ठ ज्ञान आहे. अच्छा, तुम्ही देखील असे स्वदर्शन चक्रधारी बना तर मग चक्रवर्ती राजा विश्वाचे मालक बनाल. इथून बाहेर गेले आणि खलास. माया इतकी बहाद्दूर आहे, इथले इथेच राहिले. ज्याप्रमाणे गर्भामध्ये बाळ वायदा करून (वचन देऊन) बाहेर पडते तरी देखील तिथले तिथेच राहून जाते. तुम्ही प्रदर्शनी इत्यादीमध्ये समजावून सांगता, ते खूप मस्त, खूप छान करतात. नॉलेज खूप चांगले आहे, मी असा पुरुषार्थ करेन, असे करेन…’ आणि बस्स बाहेर गेला आणि तिथले तिथेच राहिले. परंतु तरी देखील काही ना काही परिणाम राहतो. असे नाही की ते पुन्हा येणार नाहीत. झाडाची वृद्धी होत जाईल. वृद्धीला प्राप्त होईल तेव्हा मग सर्वांना आकर्षित करेल. आता तर हा आहे रौरव नरक. गरुड पुराणामध्ये देखील अशा प्रकारच्या रोमांचक गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या मनुष्यांना ऐकवतात जेणेकरून थोडी भीती राहील. त्यातूनच ही गोष्ट निघाली आहे की मनुष्य सर्प, विंचू इत्यादी बनतात. बाबा म्हणतात - मी तुम्हाला विषय वैतरणी नदीमधून बाहेर काढून क्षीरसागरामध्ये पाठवतो. खरे तर तुम्ही शांतीधामचे निवासी होता. नंतर सुखधाममध्ये पार्ट बजावण्याकरिता आलात. आता पुन्हा आपण जात आहोत शांतीधाम आणि सुखधामला. या धामची तर आठवण कराल ना. गातात देखील - ‘तुम मात-पिता…’ ते भरभरून सुख तर असतेच सतयुगामध्ये. आता हे संगम. इथे अखेरीला त्राही-त्राही करतील कारण दुःख अति होते. मग सतयुगामध्ये अति सुख असेल. अति सुख आणि अति दुःख याचा हा खेळ बनलेला आहे. विष्णू अवतार देखील दाखवतात. लक्ष्मी-नारायणाचा जोडा जसा वरून अवतरीत होतो. आता वरून शरीरधारी कोणी येतात थोडेच. वरून येते तर प्रत्येक आत्मा आहे. परंतु ईश्वराचे अवतरण अतिशय विचित्र आहे, तेच येऊन भारताला स्वर्ग बनवतात. त्यांचा उत्सव शिवजयंतीच्या रूपात साजरा करतात. जर हे माहीत असते की, परमपिता परमात्मा शिवच मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा देतात तर मग साऱ्या विश्वामध्ये गॉडफादरचा उत्सव साजरा केला असता. बेहदच्या बाबांचे यादगार तेव्हा साजरे करतील जेव्हा समजतील की शिवबाबाच लिबरेटर, गाईड आहेत. त्यांचा जन्मच मुळी भारतामध्ये होतो. शिवजयंती देखील भारतामध्येच साजरी करतात. परंतु पूर्ण ओळख नाहीये त्यामुळे हॉलिडे देखील देत नाहीत. जे पिता सर्वांची सद्गती करणारे आहेत, त्यांची जन्म-भूमी जिथे येऊन अलौकिक कर्तव्य पार पाडतात, त्यांचा जन्मदिवस आणि तीर्थयात्रा तर मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे. तुमचे यादगार मंदिर देखील इथेच आहे. परंतु कोणाला माहित नाही आहे की शिवबाबाच येऊन लिबरेटर, गाईड बनतात. म्हणतात तर सर्वच की सर्व दुःखातून सोडवून सुखधाममध्ये घेऊन चला, परंतु समजत नाहीत. भारत अतिशय उच्च ते उच्च खंड आहे. भारताची महिमा अपरमअपार गायली गेली आहे. तिथेच शिवबाबांचा जन्म होतो, त्यांना कोणी मानत नाहीत. स्टॅम्प (पोस्टाचे तिकीट) बनवत नाहीत. बाकीच्यांचे तर खूप बनवत असतात. आता कसे काय समजावून सांगावे जेणेकरून यांच्या महत्वाविषयी सर्वांना ठाऊक होईल. परदेशामध्ये देखील संन्यासी इत्यादी जाऊन भारताचा प्राचीन योग शिकवतात, जेव्हा तुम्ही या राजयोगा विषयी सांगाल तेव्हा तुमचे नाव खूप प्रसिद्ध होईल. बोला, राजयोग कोणी शिकवला होता, हे कोणालाही माहित नाही आहे. कृष्णाने देखील हठयोग शिकवलेला नाहीये. हा हठयोग आहे संन्याशांचा. जे खूप चांगले सुशिक्षित आहेत जे स्वतःला फिलॉसॉफर (तत्वज्ञानी) म्हणवतात, ते या गोष्टींना समजून घेतील आणि स्वतःला सुधारतील; म्हणतील - आम्ही देखील शास्त्र वाचली आहेत, परंतु आता जे बाबा ऐकवत आहेत ते राईट आहे. बाकी सर्व आहे रॉंग. तर हे देखील समजतील की खरोखर, मोठ्यात मोठे तीर्थस्थान हे आहे, जिथे बाबा येतात. तुम्ही मुले जाणता याला म्हटले जाते - धर्म भूमी. इथे जितके धर्मात्मा राहतात तितके इतर कुठेही नाहीत. तुम्ही किती दान-पुण्य करता. बाबांना जाणून तन-मन-धन सर्व या सेवेमध्ये लावता. बाबा सर्वांना लिबरेट करतात. सर्वांना दुःखातून सोडवतात. बाकीचे धर्म स्थापक काही दुःखातून सोडवत नाहीत. ते तर येतातच यांच्या मागाहून. नंबरवार सर्वजण पार्ट बजावण्यासाठी येतात. पार्ट बजावता-बजावता तमोप्रधान बनतात. मग बाबा येऊन सतोप्रधान बनवतात. तर हा भारत किती मोठे तीर्थ आहे. भारत सर्वात नंबर वन श्रेष्ठ भूमी आहे. बाबा म्हणतात - माझी ही जन्मभूमी आहे मी येऊन सर्वांची सद्गती करतो. भारताला स्वर्ग बनवतो.

तुम्ही जाणता बाबा स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी आले आहेत. अशा बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा. तुम्हाला पाहून इतरही असे कर्म करतील. यालाच म्हटले जाते - अलौकिक दिव्य कर्म. असे समजू नका कोणालाच कळणार नाही. असे देखील निघतील जे तुमची ही चित्रे देखील घेऊन जातील. चांगली-चांगली चित्रे बनली तर आग-बोटीमध्ये भरून घेऊन जातील. आगबोट जिथे-जिथे थांबते तिथे ही चित्रे लावतील. तुमची खूप सेवा होणार आहे. असेही खूप उदार, हुंडी भरणारे सांवलशाह (मोठ्या मनाचे राजा) देखील निघतील जे अशी कामे करण्यासाठी सुरुवात करतील. जेणेकरून सर्वांना माहीत होईल की हे कोण आहेत जे या जुन्या दुनियेला बदलून नवीन दुनिया स्थापन करत आहेत. तुमची देखील आधी तुच्छ-बुद्धी होती, आता तुम्ही किती स्वच्छ बुद्धी बनला आहात. जाणता आपण या ज्ञान आणि योग बलाद्वारे विश्वाला स्वर्ग बनवतो. बाकीचे सर्व मुक्तिधाम मध्ये निघून जातील. तुम्हाला देखील ऑथॉरिटी बनायचे आहे. बेहदच्या बाबांची मुले आहात ना. शक्ती मिळते आठवणी द्वारे. बाबांना ‘वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी’ म्हटले जाते. सर्व वेद-शास्त्रांचे सार सांगतात. तर मुलांना सेवेचा किती उमंग राहिला पाहिजे. मुखावाटे ज्ञान रत्नांशिवाय दुसरे काहीही निघू नये. तुम्ही प्रत्येक जण रूप-बसंत आहात. तुम्ही बघता सारी दुनिया सब्ज (समृद्ध) बनते. सर्व काही नवीन, तिथे दुःखाचे नावही नसते. पाच तत्त्वे देखील तुमच्या सेवेमध्ये हजर राहतात. आता ती तत्वे डिससर्विस करत आहेत कारण मनुष्य लायक नाही आहे. बाबा आता लायक बनवत आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रूप-बसंत बनून मुखावाटे सदैव ज्ञानरत्नेच काढायची आहेत. सेवेच्या उमंगामध्ये रहायचे आहे. आठवणीमध्ये राहणे आणि सर्वांना बाबांची आठवण करून देणे - हेच दिव्य अलौकिक कार्य करायचे आहे.

२) खरा-खुरा आशिक बनून एका माशूकवर फिदा व्हायचे आहे अर्थात बलीहार जायचे आहे, तेव्हाच खरी दिवाळी होईल.

वरदान:-
विश्व महाराजनची पदवी प्राप्त करणारे सर्व शक्तींच्या स्टॉक ने संपन्न भव

जे विश्व महाराजनची पदवी प्राप्त करणारे आत्मे आहेत त्यांचा पुरुषार्थ केवळ स्वतः प्रति असणार नाही. आपल्या जीवनामध्ये येणारी विघ्ने किंवा परीक्षांना पास करणे - हे तर खूप कॉमन आहे परंतु जे विश्व महाजन बनणारे आत्मे आहेत त्यांच्याकडे आतापासूनच सर्व शक्तींचा स्टॉक भरपूर असेल. त्यांचा प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प दुसऱ्यांप्रति असेल. तन-मन-धन समय श्वास सर्व विश्व कल्याणामध्ये सफल होत राहील.

बोधवाक्य:-
एक जरी कमजोरी असेल तर ती अनेक विशेषतांना संपवून टाकते त्यामुळे कमजोरींना तलाक द्या (सोडचिठ्ठी द्या).

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. आपली शुभ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ वृत्ती, श्रेष्ठ व्हायब्रेशन द्वारे कोणत्याही स्थानावर राहून मनसा द्वारे अनेक आत्म्यांची सेवा करू शकता. याची विधी आहे - लाईट हाऊस, माइट हाऊस बनणे. यामध्ये स्थूल साधन, चान्स अथवा वेळेचा प्रश्नच राहत नाही. फक्त लाईट-माईटने संपन्न बनण्याची आवश्यकता आहे.