03-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, या
जुन्या दुनियेचा आता अंत निकट आला आहे, त्यामुळे संगमयुगावर तुम्हाला भविष्यकालीन
राज्य-पदासाठी लायक बनायचे आहे”
प्रश्न:-
मुलांमध्ये असा
कोणता छंद असावा ज्यामुळे गद्दीनशीन बनू शकतात (सिंहासनावर आरूढ होऊ शकतात)?
उत्तर:-
ऑलराऊंड सेवा
करण्याचा छंद असावा तेव्हाच ते गद्दीनशीन बनू शकतात, जे ऑलराऊंड सेवा करून अनेकांना
सुख देतात त्यांना त्याचा उजूरा (प्रतिफळ) देखील मिळतो. मुलांना नेहमी प्रत्येक
सेवेमध्ये हजर राहिले पाहिजे. असे हुशार बना जेणेकरून माता-पित्याचा शो कराल.
मम्मा-बाबा असे म्हणता तर त्यांच्यासारखे बनून दाखवा.
गीत:-
इस पाप की
दुनिया से…
ओम शांती।
फक्त गोड-गोड
ब्रह्माकुमार-कुमारीच हे जाणतात की, पापाची दुनिया आणि पुण्याची दुनिया कशाला म्हटले
जाते. पतित दुनिया कशाला म्हटले जाते आणि पावन दुनिया कशाला म्हटले जाते. भले
मनुष्य म्हणतात की, ‘हे पतित दुनियेला पावन बनविणारे या’, परंतु जाणत नाहीत. हे
देखील आत्माच म्हणते - ‘हे पतित-पावन…’ सर्व मनुष्य मात्र बोलावत राहतात. परंतु हे
कोणालाच माहित नाही आहे की पावन दुनिया कशाला म्हटले जाते, ती कधी आणि कशी स्थापन
होईल. आता तुम्ही नॉलेजफुल बाबांचे बनला आहात, त्यामुळे नॉलेजफुल ज्ञान-सागर बाबांना
फक्त तुम्हीच जाणता. बाकी कोणीही जरा सुद्धा जाणत नाहीत की, पावन दुनिया पुन्हा
पतित कशी बनते. पतित दुनिया मग पुन्हा पावन कशी बनते. पतित दुनियेमध्ये कोण राहतात
आणि पावन दुनियेमध्ये कोण राहतात. या सर्व गोष्टी आता तुम्हीच जाणता. पावन दुनिया
सतयुगाला म्हटले जाते. जरूर पावन दुनिया भारतामध्ये सुद्धा एकच तर आदि सनातन
देवी-देवता धर्माचे राज्य होते, त्यासाठी भारत सर्वात प्राचीन देश म्हणून गायला जातो.
आता तुम्ही समजता आम्हाला पुन्हा पावन दुनियेमध्ये जाण्यासाठी पतित-पावन बाबा
युक्त्या सांगत आहेत. बाबा म्हणतात - एका सेकंदामध्ये युक्ती सांगतो. बाबा येतातच
नवीन दुनियेचे राज्य भाग्य देण्याकरिता. हा आहे बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा.
बाबाच येऊन राजयोग शिकवतात. आपण राजयोग शिकत आहोत. बाबा म्हणतात - तुम्हीच
सतोप्रधान होता, आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. आदि सनातन देवी-देवता धर्म होता,
हिंदू धर्म नव्हता. भारतातच सर्वप्रथम देवी-देवता धर्म होता. मग जरूर पुनर्जन्म घेत
आले असतील. जसे ख्रिश्चन लोक देखील पुनर्जन्म घेत वृद्धीला प्राप्त होतात. बौद्धांचा
धर्म स्थापन करणारे बुद्ध, ते झाले धर्म स्थापक. एका बुद्धापासून किती असंख्य बौद्धी
तयार झाले. क्राईस्ट एक होता. आता पहा किती ख्रिश्चन झाले आहेत. सर्व धर्मांचे असेच
चालत आले आहे. तसेही जेव्हा आदि सनातन देवी-देवता धर्म होता तेव्हा हे बाकीचे कोणीही
नव्हते. इतरांच्या धर्माविषयी तर जाणतात. ख्रिश्चन धर्म क्राईस्टने स्थापन केला,
इस्लाम धर्म इब्राहिमने स्थापन केला. अच्छा, सतयुगामध्ये जो आदि सनातन देवी-देवता
धर्म होता तो कोणी स्थापन केला? सतयुगामध्ये देवी-देवतांची राजधानी चालली आहे ना.
तर जरूर कोणीतरी राज्य स्थापन केले आहे. सतयुगामध्ये देवी-देवता धर्म होता, तो आता
बाबा स्थापन करत आहेत, त्यासाठी बाबांना संगमयुगावर यावेच लागते. आता सर्व मनुष्य
मात्र पतित दुनियेमध्ये बसले आहेत. जुन्या दुनियेमध्ये करोडो मनुष्य आहेत. नवीन
दुनियेमध्ये काही इतके मनुष्य असू शकणार नाहीत. तिथे एकच धर्म होता. इस्लामी, बौद्धी,
ख्रिश्चन इत्यादी कोणीही नव्हते. तो देवता धर्म आता प्राय: लोप झाला आहे. तो
भगवंताने कसा स्थापन केला होता, हे कोणीही जाणत नाही. देवता धर्म हे नावच विसरून
गेले आहेत, हिंदू धर्म म्हणतात.
आता बाबा समजावून
सांगत आहेत की, मी येतोच तेव्हा जेव्हा जुन्या दुनियेला बदलायचे असते. आता या जुन्या
दुनियेचा अंतिम काळ आहे. हे फक्त तुम्ही ब्राह्मणच जाणता. या महाभारी लढाईनेच जुन्या
दुनियेचा शेवट झाला होता. गीतेमध्ये दाखवतात - सगळे नष्ट झाले. कोणीही राहिले नाही.
पाच पांडव वाचले, ते देखील पहाडांवर वितळून मेले. परंतु असे काही होत नाही. ही तर
बाबा स्थापन करत आहेत. प्रलय अथवा जलमय दुनिया काही होत नाही. बाबांना बोलावतात -
‘हे पतित-पावन या, आमचे दुःख हरण करून सुख द्या’; कारण आता रावण राज्य आहे.
रामराज्य हवे आहे याचा अर्थ जरूर रावण राज्य आहे ना. बाबा समजावून सांगत आहेत - आता
रामराज्याची स्थापना, रावण राज्याचा विनाश होतो. मी जी युक्ती शिकवतो, आणि जे
शिकतात तेच जाऊन नवीन दुनियेमध्ये राज्य करतात. तिथे (सतयुगामध्ये) तुम्हाला हे
ज्ञान अजिबात राहणार नाही. आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण नॉलेज आहे. ज्यांच्या
बुद्धीमध्ये आहे ते इतरांना समजावून सांगतात. नंबरवार तर आहेत ना. सेवाभावी
मुलांच्या बुद्धीमध्ये सारे ज्ञान टपकत राहते. जरूर सतयुगामध्ये सर्वप्रथम
देवी-देवता धर्माचे होते. हे देखील तुम्हीच जाणता. बाबा, सर्वप्रथम प्रजापिता
ब्रह्मा द्वारा ब्राह्मणांनाच रचतात. हा ज्ञान-यज्ञ आहे ना, तर जरूर ब्राह्मण
संप्रदायच हवा. ब्राह्मण संप्रदाय जरूर संगमावरच असेल. आसुरी संप्रदाय आहे -
कलियुगामध्ये, दैवी संप्रदाय आहे - सतयुगामध्ये. तर जरूर संगमावरच दैवी संप्रदायाची
स्थापना होईल. जेव्हा बाजोली खेळतात (कोलांट्याउड्यांचा खेळ खेळतात) तेव्हा पाय आणि
डोके एकत्र येतात. तुम्ही ब्राह्मण आहात याची पुन्हा आठवण होते. विराट रूपाचे चित्र
देखील जरुरी आहे, याचे स्पष्टीकरण अतिशय सुंदर आहे. म्हणतात देखील - बाबा मी आम्ही
तुमची ६ महिन्यांची मुले आहोत. ४ दिवसांची मुले आहोत. कोणी म्हणतात - मी एक दिवसाचे
बाळ आहे अर्थात आजच बाबांचा बनलो आहे. मुखवंशावळी बनलो आहे. जे जिवंतपणी बाबांचे
बनतात तर ते म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुमचे आहोत’. छोटे मूल तर असे म्हणू शकणार नाही.
हे ज्ञान आहे मोठ्यांकरिता. म्हणतात - बाबा मी तुमचा छोटा बच्चा आहे. छोट्या मुलांना
चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगणे सोपे असते. दिवसेंदिवस ज्ञान स्पष्ट करून
सांगण्याच्या पद्धतींमध्ये वाढ होत जाते. ही चित्रांची युक्ती ड्रामा प्लॅन अनुसार
५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे निघाली आहे. यामध्ये कोणीही हा प्रश्न उपस्थित करू शकत
नाही की, ही चित्रांची युक्ती सुरुवातीला का काढली नाही आताच का काढली? ड्रामा
अनुसार जी युक्ती जेव्हा वापरात येणार असेल तेव्हा येईल. स्कूलमध्ये जसे
अभ्यासक्रमाचे वेगवेगळे टप्पे असतात. असे थोडेच होते की, सुरुवातीलाच कोणी थेट
अंतिम परीक्षा पास करतील. सुरुवातीला फक्त ‘अ, ब…’, ही वर्णमाला शिकवली जाते ना. हे
तर बाबांचा बच्चा बनताच क्षणी बाबा स्वर्गाची बादशाही देतात. पित्याला, ‘बाबा’
म्हटल्यानंतर मग विश्वास डगमगतो थोडाच. इथे (ज्ञानामध्ये) मात्र ‘बाबा-बाबा’ म्हणत
असून मग विश्वास डगमगतो. तुम्ही जाणता हे तर बेहदचे बाबा आहेत. तुम्ही बेहदच्या
बाबांकडून बेहदचा वारसा घेत आहात तर त्यांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात
- बाकी सर्व गोष्टींना सोडून माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा. चालता-फिरता ही
आठवण राहिल्याने आनंद देखील होत राहील. परंतु ही आठवण टिकत का नाही? तुमची तर गॅरंटी
आहे - ‘बाबा, आम्ही जेव्हा तुमचे बनू तेव्हा आमची इतर कोणातही आसक्ती राहणार नाही.
आम्ही तुमच्याच मतावर चालू’. बाबा देखील म्हणतात - श्रीमतावर न चालल्याने चुका होत
राहतील. श्रीमतावर चालल्याने आनंदाचा पारा चढेल. आत्म्याला अतींद्रीय सुख मिळते
तेव्हा किती आनंद होतो. आत्मा जाणते परमपिता परमात्म्याने आम्हाला राज्य-भाग्य दिले
होते, जे ८४ जन्म घेता-घेता गमावले आहे; आता पुन्हा बाबा ते देत आहेत. तर अपार आनंद
झाला पाहिजे ना. आंतरिक खुशी दिसून तर येते ना. या लक्ष्मी-नारायणाच्या चेहऱ्यावरुन
दिसून येते ना. भले अज्ञान काळामध्ये काहीजण खूप चांगले आनंदात असतात. त्यांचे
बोलणे-चालणे देखील खूप चांगले असतात.
मनुष्य सृष्टीमध्ये
सर्वात उच्च पोझिशन कोणाची आहे? असे तर सर्वात उच्च आहेत - शिव परमात्मा, ज्यांना
सर्वजण ‘फादर’ असे म्हणून बोलावतात. परंतु त्यांच्या ऑक्युपेशनला (जीवन चरित्राला)
जाणत नाहीत. जेव्हा बाबा येतील, तेव्हाच येऊन आपला परिचय देतील. आता तुम्ही मुले
जाणता - आम्हाला बाबांकडून वैकुंठाची राजाई मिळत आहे. आनंद झाला पाहिजे ना. आम्ही
नरापासून नारायण बनत आहोत. कोणी भले हात वर करतात परंतु काहीही समजत नाहीत. ज्यांना
निश्चय असतो तर त्यांना ही खुशी असते की आता आम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता
आम्ही बाबांच्या मतावर चालून विश्वाचे मालक बनत आहोत. या शिक्षणाचा नशा किती असला
पाहिजे. प्रेसिडेंट, गव्हर्नर इत्यादींना नशा तर आहे ना. मोठमोठ्या व्यक्ती त्यांना
भेटण्यासाठी येतात. पोझिशन जाणल्या शिवाय कधी कोणी कोणाला भेटत नाहीत. बाबा देखील
कधी भेटत नाहीत. बाबांच्या पोझिशनला फक्त तुम्ही मुलेच जाणता, ते देखील नंबरवार
पुरुषार्थानुसार जाणता. भले ब्रह्माकुमार म्हटले जातात, परंतु बुद्धीमध्ये हे राहत
नाही की आपण शिवबाबांची संतान आहोत. त्यांच्याकडून आपण स्वर्गाचा वारसा घेत आहोत.
ना बाबांची आठवण करू शकत, ना वारशाची आठवण करू शकत. आठवण राहिली तर आतून आनंद देखील
होत राहील ना.
जसे कन्येचे लग्न
करतात तेव्हा तिला गुप्त दान दिले जाते. पेटी बंद करून चावी हातात देतात. बाबा
देखील तुम्हाला विश्वाच्या बादशाहीची चावी हातात देत आहेत. तुम्ही नवीन सतयुगी
विश्वाचे उद्घाटन करता. सतयुगामध्ये देखील तुम्हीच जाल. बाबा तुम्हाला लायक बनवत
आहेत. जोपर्यंत बाबा ज्ञान देत नाहीत, पवित्र बनत नाहीत, तोपर्यंत भक्त काही
स्वर्गामध्ये जाण्यालायक बनू शकत नाहीत; म्हणून नारदाचे उदाहरण आहे. भले भक्त तर
खूप चांगले-चांगले आहेत परंतु आत्मा तर पतित आहे ना. जन्म-जन्मांतर ते पतित बनत आले
आहेत, जोपर्यंत बाबा भेटत नाहीत तोपर्यंत स्वर्गामध्ये जाऊ शकत नाहीत. तुम्हाला
बाबांनी ब्रह्माद्वारे ॲडॉप्ट केले आहे, जे तुम्ही नवीन दुनियेमध्ये जाऊन राज्य
कराल. बाकीचे कोणीही राजाई स्थापन करत नाहीत, आणि ना त्याविषयी कोणाला ठाऊक आहे.
बाबाच संगमयुगावर येऊन भविष्य २१ जन्मांची राजाई स्थापन करत आहेत. या बाबांना कोणीही
जाणत नाहीत.
आता तुम्ही मुले समजता
खरोखर ५ हजार वर्षांपूर्वी भगवान आले होते, गीतेचे ज्ञान ऐकवले होते, ज्याद्वारे
मनुष्यापासून देवता बनले होते. गीता आहेच मुळी आदि सनातन देवी-देवता धर्माचे
शास्त्र. सतयुगामध्ये तर कोणती शास्त्रे इत्यादी असत नाहीत. बाबा म्हणतात - मी
संगमयुगावरच येतो. पुन्हा येऊन सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतो, तेच
देवी-देवता बनतात, आणि मग ८४ चे चक्र फिरून जेव्हा अंताला येतात तेव्हा मी येऊन
पुन्हा त्यांनाच हे ज्ञान समजावून सांगतो. अधेमधे कधीही मी येत सुद्धा नाही. असे
थोडेच आहे की, क्राईस्ट मध्येच कधीही येईल, आणि जे काही धर्म स्थापन करतात ते या
जुन्या दुनियेसाठीच करतात. मी येतोच संगमावर नवीन दुनिया स्थापन करण्याकरिता.
क्राईस्टची आत्मा येऊन प्रवेश करून आपला धर्म स्थापन करते. हे बाबा तर राजाई स्थापन
करतात.
हे कोणालाच ठाऊक नाही
आहे की या लक्ष्मी-नारायणाची राजाई कधी आणि कोणी स्थापन केली. हे तर
लक्ष्मी-नारायणाची मंदिरे इत्यादी बांधतात त्यांना विचारले पाहिजे. तुम्ही सभेमध्ये
देखील विचारू शकता. हे रहस्य तुमच्याच बुद्धीमध्ये आहे. बाबा, कल्प-कल्प ब्रह्मा
द्वारा स्थापना करतात, हे इतर कोणीही जाणू शकत नाही. शब्द देखील आहे, परंतु यथार्थ
रीतीने कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. काही मुलांवर ग्रहचारी देखील बसते.
देह-अभिमान आहे पहिल्या नंबरची ग्रहचारी. बाबा म्हणतात - मुलांनो, देही-अभिमानी भव.
हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र आणि शिडीचे चित्र समजावून सांगण्यासाठी खूप चांगले आहे.
अनेकांचे याने कल्याण होऊ शकते. परंतु ड्रामामध्ये कदाचित अजून वेळ आहे म्हणून
राजधानी स्थापन होण्यामध्ये विघ्न पडतात. बाबा स्वतः म्हणतात खूप विघ्न पडतात. माया
खूप शक्तिशाली आहे. माझ्या मुलांना लगेच नाकाला, कानाला पकडते. याला म्हटले जाते -
राहूची ग्रहचारी. भारतामध्ये खास यावेळी सर्वांवर विकार रुपी राहूची ग्रहचारी बसलेली
आहे. तुम्ही सेकंदामध्ये सिद्ध करू शकता की, हाच भारत पावन हिऱ्या समान होता. आता
विकारी कवडी समान बनला आहे, पुन्हा हिऱ्या समान बनणार आहे. सारी कहाणी भारताचीच आहे.
बाबा येऊन हिरे समान बनवतात. तरी देखील किती प्रकारची विघ्ने पडतात. देह-अभिमानाचे
तर खूप मोठे विघ्न पडते. लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर देखील कोणाला समजावून सांगणे
खूप सोपे आहे. मुलांना सेवेची आवड असली पाहिजे. सेवा देखील विविध प्रकारची आहे ना.
अनेकांना सुख देतात तर त्याचा उजूरा (प्रतिफळ) देखील भरपूर मिळतो, कोणी ऑलराऊंड
हड्डी सेवा करतात. आनंद झाला पाहिजे की, आपल्याला ऑलराऊंड बनायचे आहे. बाबा आम्ही
सेवेसाठी हजर आहोत. रुहानी सेवा करणारी चांगली मुले भोजन आपल्या हाताने बनवतात.
तुम्हाला माहित आहे की, मुले देखील इतकी हुशार होतात जे सिंहासन घेतात. इथे तर घर
सांभाळणाऱ्या माता आहेत. आता मातांना, कुमारींना या सेवेसाठी उभे राहिले पाहिजे.
मम्मासारखी सेवा करून दाखवली पाहिजे. शो केला पाहिजे. बाकी फक्त ‘मम्मा-मम्मा’
केल्याने फायदा तो काय! त्यांच्यासारखे बनले पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
देह-अभिमानाची ग्रहचारीच विघ्न रूप बनते, त्यामुळे जितके शक्य होईल तितके
देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
२) आपले शिक्षण आणि
सतयुगी पदाच्या पोझिशनच्या आनंदामध्ये अथवा नशेमध्ये राहायचे आहे, श्रीमतावर चालायचे
आहे. कोणतीही चूक करायची नाही.
वरदान:-
रूहानी
एक्सरसाइज आणि सेल्फ कंट्रोल द्वारा महीनतेचा अनुभव करणारे फरिश्ता भव
बुद्धीची महीनता आणि
हलकेपणा ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी आहे. महीनताच महानता आहे. परंतु त्याच्यासाठी
दररोज अमृतवेलेला अशरीरीपणाची रूहानी एक्सरसाइज करा आणि व्यर्थ संकल्पांच्या भोजनाचा
उपवास करा. उपवासासाठी सेल्फ कंट्रोल असावा. ज्यावेळी जे संकल्प रुपी भोजन स्वीकार
करायचे असेल त्यावेळी तेच करा. व्यर्थ संकल्पांचे एक्स्ट्रा भोजन करू नका तेव्हाच
बुद्धी महीन बनून फरिश्ता स्वरूपाच्या ध्येयाला प्राप्त करू शकाल.
बोधवाक्य:-
महान आत्मा ते
आहेत, जे प्रत्येक सेकंद, प्रत्येक पाऊल ॲक्युरेट श्रीमतावर चालतात.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
विशेषपणे आपल्या मनसा
अर्थात संकल्पशक्ती द्वारे, वाणीच्या शक्तीद्वारे, आपल्या संगतीच्या रंगाद्वारे,
नात्यातील प्रेमा द्वारे, आनंदाच्या अखुट खजिन्या द्वारे अखंड दान करत राहा - हेच
परोपकार करणे आहे. कोणतीही आत्मा संपर्कामध्ये आली तर ती आनंदाच्या खजिन्याने
संपन्न होऊन जावी, असे अखंड दानी बना.