04-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - संगमावर तुम्हाला नवीन आणि निराळे नॉलेज मिळत आहे, तुम्ही जाणता आपण सर्व
आत्मे ॲक्टर्स आहोत, एकाचा पार्ट दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही”
प्रश्न:-
मायेवर विजय
प्राप्त करण्यासाठी तुम्हा रुहानी योद्ध्यांना (क्षत्रियांना) कोणती युक्ती मिळाली
आहे?
उत्तर:-
हे रुहानी क्षत्रिय, तुम्ही सदैव श्रीमतावर चालत रहा. आत्म-अभिमानी बनून बाबांची
आठवण करा, रोज पहाटे लवकर उठून आठवणीमध्ये राहण्याची सवय लावा तेव्हा मायेवर विजय
प्राप्त कराल. उलट्या-सुलट्या संकल्पांपासून वाचाल. आठवणीची गोड युक्ती मायाजीत
बनवेल.
गीत:-
जिसका साथी है
भगवान...
ओम शांती।
ही मनुष्यांनी बनविलेली गाणी आहेत. यांचा अर्थ कोणीही काहीच जाणत नाही. भक्त लोक
गाणी, भजन इत्यादी गातात, महिमा करतात परंतु जाणत काहीच नाहीत. महिमा खूप करतात.
तुम्हा मुलांना काही महिमा करायची गरज नाही. मुले पित्याची कधी महिमा करत नाहीत.
पिता जाणतो ही माझी मुले आहेत. मुले जाणतात हे आमचे पिता आहेत. ही आता बेहदची गोष्ट
आहे. तरीही सर्वजण बेहदच्या पित्याची आठवण करतात. अजून पर्यंत देखील आठवण करत
राहतात. भगवंताला म्हणतात - ओ बाबा, त्यांचे नाव शिवबाबा आहे. जसे आपण आत्मे आहोत
तसे शिवबाबा आहेत. ते आहेत परम-आत्मा, ज्यांना सुप्रीम म्हटले जाते, त्यांची आपण
संतान आहोत. त्यांना सुप्रीम सोल (परम-आत्मा) म्हटले जाते. त्यांचे निवासस्थान कुठे
आहे? परमधाम मध्ये. सर्व आत्मे तिथे राहतात. आत्मेच ॲक्टर्स आहेत. तुम्ही जाणता
ड्रामामध्ये ॲक्टर्स क्रमवार असतात. प्रत्येकाच्या पार्ट अनुसार तेवढा पगार मिळतो.
सर्व आत्मे जे तिथे राहतात, सर्व पार्टधारी आहेत, परंतु सर्वांना नंबरवार पार्ट
मिळाला आहे. रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत की, आत्म्यांमध्ये कशाप्रकारे
अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. सर्व आत्म्यांचा पार्ट एक सारखा असू शकत नाही.
सर्वांमध्ये एक सारखी ताकद नाहीये. तुम्ही जाणता की सर्वात चांगला पार्ट त्यांचा आहे
जे प्रथम शिवाच्या रुद्र माळेमध्ये आहेत. ड्रामामध्ये जे खूप चांगले-चांगले ॲक्टर्स
असतात त्यांची किती महिमा होते. फक्त त्यांना पाहण्यासाठी देखील लोक जातात. तर हा
बेहदचा ड्रामा आहे. या बेहदच्या ड्रामामध्ये देखील श्रेष्ठ एक बाबाच आहेत. उच्च ते
उच्च ॲक्टर, क्रियेटर, डायरेक्टर असेही म्हणू शकतो; ते (या दुनियेतील) सर्व आहेत
हदचे ॲक्टर्स, डायरेक्टर्स इत्यादी. त्यांना आपला छोटा पार्ट मिळालेला आहे. आत्मा
पार्ट बजावते परंतु देह-अभिमानामुळे म्हणतात की, मनुष्याचा असा पार्ट आहे. बाबा
म्हणतात - सारा पार्ट आत्म्याचा आहे. आत्म-अभिमानी बनावे लागते. बाबांनी समजावून
सांगितले आहे की, सतयुगामध्ये आत्म-अभिमानी असतात. बाबांना जाणत नाहीत. इथे
कलियुगामध्ये तर आत्म-अभिमानी सुद्धा नाहीत आणि बाबांना सुद्धा जाणत नाहीत. आता
तुम्ही आत्म-अभिमानी बनत आहात. बाबांना देखील जाणता.
तुम्हा ब्राह्मणांना
वेगळे ज्ञान मिळत आहे. तुम्ही आत्म्याला जाणले आहे की आपण सर्व आत्मे ॲक्टर्स आहोत.
सर्वांना पार्ट मिळालेला आहे, जो एकाचा दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. तो सारा पार्ट
आत्म्यामध्ये आहे. तसे पाहीले तर जो ड्रामा बनवतात तो देखील पार्ट आत्माच धारण करते.
चांगला पार्ट देखील आत्माच करते. आत्माच म्हणते - मी गव्हर्नर आहे, अमका आहे. परंतु
आत्म-अभिमानी बनत नाहीत. सतयुगामध्ये समजतील की मी आत्मा आहे. एक शरीर सोडून दुसरे
घ्यायचे आहे. तिथे परमात्म्याला कोणीही जाणत नाहीत यावेळी तुम्ही सर्व काही जाणता.
शुद्रांपेक्षा आणि देवतांपेक्षाही तुम्ही ब्राह्मण उत्तम आहात. एवढे भरपूर ब्राह्मण
कुठून येतील, जे बनतील. प्रदर्शनीमध्ये लाखो येतात. ज्यांना चांगल्या प्रकारे समजले,
ज्ञान ऐकले ते प्रजा बनले. एका-एका राजाची प्रजा भरपूर असते. तुम्ही खूप प्रजा बनवत
आहात. प्रदर्शनी, प्रोजेक्टरद्वारे समजून काहीजण चांगले देखील बनतील. शिकतील, योग
लावतील. ते आता निघत जातील. प्रजा देखील निघेल नंतर मग श्रीमंत, राजा-राणी, गरीब
इत्यादी सर्व निघतील. राजकुमार-राजकुमारी पुष्कळ असतात. सतयुगापासून त्रेतापर्यंत
राजकुमार-राजकुमारी बनणार आहेत. फक्त ८ किंवा १०८ तर असणार नाहीत. परंतु आता सर्व
बनत आहेत. तुम्ही सेवा करत राहता. हे देखील नथिंग न्यू. तुम्ही काही कार्यक्रम
केलात, ही देखील नवीन गोष्ट नाही. अनेकदा केला आहे पुन्हा संगमावर हाच धंदा कराल
आणखी काय कराल! बाबा येतील पतितांना पावन बनविण्याकरिता. याला म्हटले जाते -
दुनियेचा इतिहास-भूगोल. प्रत्येक गोष्टीमध्ये नंबरवार तर असतेच. तुमच्यामध्ये जे
चांगले भाषण करतात तर सर्वजण म्हणतील की, यांनी खूप चांगले भाषण केले. दुसऱ्याचे
ऐकले तरी देखील म्हणतील की, पहिले जे होते ते चांगले समजावून सांगत होते. तिसरा मग
त्याच्यापेक्षाही चांगला हुशार असेल तर म्हणतील की, हे तर त्यांच्यापेक्षाही हुशार
आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थ करावा लागतो की आपण त्यांच्यापेक्षा पुढे कसे
जावे. जे हुशार असतात ते भाषण करण्यासाठी लगेच हात वरती करतील. तुम्ही सर्व
पुरुषार्थी आहात, पुढे जाऊन तुम्ही मेल ट्रेन बनाल (सर्वांपर्यंत वेगाने संदेश
पोहोचवणारे बनाल). ज्याप्रमाणे मम्मा मेल ट्रेन होती ना. बाबांविषयी (ब्रह्मा
बाबांविषयी) तर समजू शकणार नाही कारण दोघे एकत्र आहेत. तुम्ही समजू शकणार नाही की
कोण सांगत आहे. तुम्ही नेहमी समजा की शिवबाबा सांगत आहेत. बाबा आणि दादा दोघेही
जाणतात परंतु ते अंतर्यामी आहेत. बाहेरून म्हणतात हे तर खूप हुशार आहेत. बाबा देखील
महिमा ऐकून खुश होतात. लौकिक पित्याचा देखील एखादा मुलगा चांगल्या प्रकारे शिकून
उच्चपद प्राप्त करतो तेव्हा पिता समजतो की हा मुलगा चांगले नाव कमावेल. तसे हे
देखील समजतात की, अमका मुलगा या रुहानी सेवेमध्ये हुशार आहे. मुख्य तर भाषण आहे,
कोणाला बाबांचा संदेश देणे, समजावून सांगणे. बाबांनी उदाहरण देखील सांगितले होते
की, एकाला ५ मुले होती तर कोणी तरी विचारले की तुम्हाला किती मुले आहेत? तर म्हणाला
की दोन मुले आहेत. तर ते म्हणाले तुम्हाला तर ५ मुले आहेत! तर म्हणाला सपूत (लायक)
मुले दोन आहेत. इथे देखील असे आहेत. मुले तर पुष्कळ आहेत. बाबा म्हणतील की, ही
डॉक्टर निर्मला मुलगी खूप चांगली आहे. खूप प्रेमाने लौकिक पित्याला समजावून सेंटर
खोलले आहे. ही भारताची सेवा आहे. तुम्ही भारताला स्वर्ग बनवत आहात. या भारताला
रावणाने नरक बनवला आहे. एक सीता काही कैदेमध्ये नव्हती परंतु तुम्ही सर्व सीता
रावणाच्या कैदेमध्ये होता. बाकी शास्त्रांमध्ये सर्व दंतकथा आहेत. हा भक्तिमार्ग
देखील ड्रामामध्ये आहे. तुम्ही जाणता सतयुगापासून जे काही होऊन गेले आहे ते पुन्हा
रिपीट होणार. आपेही पूज्य आपेही पुजारी बनतात. बाबा म्हणतात - मला येऊन पुजारी
पासून पूज्य बनवायचे आहे. पहिले तुम्हाला गोल्डन एज्ड (सतयुगी) बनायचे आहे नंतर मग
आयर्न एज्ड (कलियुगी) बनायचे आहे. सतयुगामध्ये सूर्यवंशी लक्ष्मी-नारायणाचे राज्य
होते. रामराज्य तर चंद्रवंशी होते.
यावेळी तुम्ही सर्व
रुहानी क्षत्रिय (आत्मिक योद्धे) आहात. युद्धाच्या मैदानामध्ये येणाऱ्याला क्षत्रिय
म्हटले जाते. तुम्ही आहात रुहानी क्षत्रिय. बाकी ते आहेत देहधारी क्षत्रिय. त्यांना
म्हटले जाते बाहुबळाने युद्ध करणे. सुरुवातीला हातांनी मल्लयुद्ध करत असत. आपसामध्ये
युद्ध करत होते आणि मग विजय मिळवत होते. आता तर पहा बॉम्ब्स इत्यादी बनवले आहेत.
तुम्ही देखील क्षत्रिय आहात, ते देखील क्षत्रिय आहेत. तुम्ही श्रीमतावर चालून
मायेवर विजय प्राप्त करता. तुम्ही आहात रुहानी क्षत्रिय. आत्मेच या शरीराच्या
कर्मेंद्रियांद्वारे सर्व काही करत आहेत. बाबा येऊन आत्म्याला शिकवत आहेत - ‘बाळा,
माझी आठवण केल्याने तुला माया खाणार नाही. तुझी विकर्म विनाश होतील आणि तुला
उलटे-सुलटे संकल्प येणार नाहीत’. बाबांची आठवण केल्याने आनंद देखील होईल म्हणूनच
बाबा म्हणतात की, पहाटे उठून अभ्यास करा - ‘बाबा, तुम्ही किती गोड आहात’. आत्मा
म्हणते - बाबा. बाबांनी परिचय दिला आहे - मी तुमचा पिता आहे, तुम्हाला सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताचे ज्ञान सांगण्यासाठी आलो आहे. हे मनुष्य सृष्टीचे उलटे झाड आहे. ही
विविध धर्मांची मनुष्य सृष्टी आहे, याला म्हटले जाते - विराट लीला. बाबांनी समजावून
सांगितले आहे की, या मनुष्यरुपी झाडाचे मी बीजरूप आहे. माझी आठवण करतात. कोणी
कोणत्या झाडाचा (धर्माचा) आहे, कोणी कोणत्या झाडाचा आहे. नंतर नंबरवार निघतात. हा
ड्रामा पूर्वनियोजित आहे. एक म्हण आहे की, अमक्याने धर्मसंस्थापक पैगंबरला पाठवले.
परंतु तिथून कोणी पाठवत नाही. हे ड्रामा अनुसार रिपीट होते. हे एकच आहेत जे धर्म आणि
राजधानी स्थापन करत आहेत. हे दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. आता आहे संगम. विनाशाची
ज्वाळा प्रज्वलित होणार आहे. हा आहे शिवबाबांचा ज्ञान यज्ञ. त्यांनी रुद्र नाव ठेवले
आहे. प्रजापिता ब्रह्मा द्वारे तुम्ही ब्राह्मण जन्माला आला आहात. तुम्ही उच्च
झालात ना. नंतर इतर जाती उदयास येतात. खरे पाहता सर्व ब्रह्माची मुले आहात.
ब्रह्माला म्हटले जाते ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. सिजरा (वंशवृक्ष) आहे, सर्वप्रथम
ब्रह्मा उच्च नंतर वंशावळी उदयास येते. म्हणतात - भगवान सृष्टी कशी रचतात. रचायची
तर आहे. जेव्हा सर्व पतित होतात तेव्हा त्यांना बोलावतात. तेच येऊन दुःखी सृष्टीला
सुखी बनवतात म्हणूनच बोलावतात - ‘बाबा, दु:ख-हर्ता, सुख-कर्ता या’. नाव ठेवले आहे -
हरिद्वार. हरिद्वार अर्थात हरीचे द्वार. तिथे गंगा वाहते. समजतात - गंगेमध्ये स्नान
केल्याने आपण हरीच्या द्वारी निघून जाऊ. परंतु हरीचे द्वार आहे कुठे? ते मग कृष्णाला
म्हणतात. हरीचे द्वार तर शिवबाबा आहेत. दु:ख-हर्ता, सुख-कर्ता. प्रथम तुम्हाला
आपल्या घरी जायचे आहे. तुम्हा मुलांना आपल्या पित्याविषयी आणि घराविषयी आता माहित
झाले आहे. बाबांची गादी थोडी उच्च आहे. फूल वरती आहे नंतर युगल-मणी त्याच्या खाली.
नंतर आहे वैजयंती माळा सो विष्णूची माळा. विष्णूच्या गळ्यातील हार तेच मग
विष्णुपुरीमध्ये राज्य करतात. ब्राह्मणांची माळा नाहीये कारण वारंवार तुटून पडतात.
बाबा म्हणतात की, नंबरवार तर आहेत ना. आज ठीक आहेत उद्या वादळ येते, ग्रहचारी
आल्यामुळे थंड पडतात. बाबा म्हणतात की, माझे बनन्ती, आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती,
ध्यानामध्ये जावन्ती, माळेमध्ये पिरवन्ती… आणि मग एकदम भागन्ती, चांडाळ बनन्ती. तर
मग माळा कशी बनेल? तर बाबा म्हणतात की, ब्राह्मणांची माळा बनत नाही. भक्त माळेमध्ये
मुख्य स्त्रियांमध्ये आहे मीरा आणि पुरुषांमध्ये नारद. संगमावर बाबाच येऊन
मुक्ती-जीवनमुक्ती देतात. मुले समजतात की आम्हीच स्वर्गाचे मालक होतो. आता नरकामध्ये
आहोत. बाबा म्हणतात की नरकाला लाथ मारा, तुमची स्वर्गाची बादशाही घ्या, जी रावणाने
हिसकावून घेतली आहे. हे तर बाबाच येऊन सांगतात. ते या सर्व शास्त्र, तीर्थ
इत्यादींना जाणतात. बीजरूप आहेत ना. ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर… हे आत्मा म्हणत
आहे.
बाबा समजावून सांगतात
की, हे लक्ष्मी-नारायण सतयुगाचे मालक होते. त्यांच्या अगोदर काय होते? जरूर
कलियुगाचा अंत असेल तर संगमयुग झाले असेल, तर आता पुन्हा स्वर्ग बनत आहे. बाबांना
स्वर्गाचा रचयिता म्हटले जाते, स्वर्ग स्थापन करणारा. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे
मालक होते. यांना वारसा कुठून मिळाला? स्वर्गाचे रचता बाबांकडून. हा बाबांचाच वारसा
आहे. तुम्ही कोणालाही विचारू शकता की, ‘या लक्ष्मी-नारायणाला सतयुगाची राजधानी होती.
त्यांनी ती कशी घेतली?’ कोणीही सांगू शकणार नाही. हे दादा (ब्रह्मा बाबा) देखील
म्हणतात की, मी जाणत नव्हतो. पूजा करत होतो परंतु जाणत नव्हतो. आता बाबांनी समजावून
सांगितले आहे - हे संगमयुगावर राजयोग शिकत आहेत. गीतेमध्येच राजयोगाचे वर्णन आहे.
गीते व्यतिरिक्त इतर कोणत्याही शास्त्रामध्ये राजयोगाची गोष्ट नाहीये. बाबा म्हणतात
की, मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. भगवंतानेच येऊन नरापासून नारायण बनण्याचे
ज्ञान दिले आहे. भारताचे मुख्य शास्त्र आहे गीता. गीता केव्हा रचली गेली, हे कोणीही
जाणत नाही. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प संगमावर येतो. ज्यांना राज्य दिले होते ते
राज्य गमावून आता तमोप्रधान दु:खी बनले आहेत. रावणाचे राज्य आहे. साऱ्या भारताचीच
कहाणी आहे. भारत आहे ऑलराउंड (पूर्ण कल्पाचे चक्र लावणारा) बाकीचे सगळे तर नंतर
येतात. बाबा म्हणतात की, तुम्हाला ८४ जन्मांचे रहस्य सांगतो. हे भारतवासीयांनो, ५
हजार वर्षांपूर्वी तुम्ही देवी-देवता होता, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही! बाबा
येतात अंत काळामध्ये. सुरूवातीला आले तर आदि-अंताचे नॉलेज कसे सांगतील! सृष्टीची
वृद्धीच झालेली नाही तर सांगणार तरी कसे? तिथे तर ज्ञानाची गरजच नाही. बाबा आता
संगमावरच ज्ञान देतात. नॉलेजफुल (ज्ञानसंपन्न) आहेत ना. जरूर नॉलेज सांगण्याकरिता
अंतामध्येच यावे लागेल. सुरुवातीलाच तुम्हाला काय सांगणार! या समजून घेण्याच्या
गोष्टी आहेत. भगवानुवाच की, ‘मी तुम्हाला राजयोग शिकवत आहे’. ही युनिव्हर्सिटी आहे
पांडव गव्हर्मेंटची. आता आहे संगम - यादव, कौरव आणि पांडव; त्या लोकांनी सेना दाखवली
आहे. बाबा समजावून सांगत आहेत - यादव-कौरव विनाशकाले विपरीत-बुद्धि. एकमेकांना
शिव्या देत राहतात. बाबांवर प्रेम नाहीये. म्हणतात की, कुत्रा-मांजर सर्वांमध्ये
परमात्मा आहे. बाकी पांडवांची प्रीत-बुद्धी होती. पांडवांचा साथी स्वयं परमात्मा
होता. पांडव अर्थात रुहानी पंडे. ते आहेत देहधारी पंडे, तुम्ही आहात रुहानी पंडे.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
आत्म-अभिमानी बनून या बेहदच्या नाटकामध्ये हिरोचा पार्ट बजावायचा आहे. प्रत्येक ॲक्टरचा
पार्ट आपला-आपला आहे त्यामुळे कोणाच्याही पार्टशी इर्षे पोटी स्पर्धा करायची नाही.
२) पहाटे लवकर उठून
आपणच आपल्याशी गोष्टी करायच्या आहेत, अभ्यास करायचा आहे - मी या शरीराच्या
कर्मेन्द्रियांपासून वेगळी आहे, बाबा तुम्ही किती गोड आहात, तुम्ही आम्हाला
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देत आहात.
वरदान:-
बाबांच्या
संस्कारांना आपला निजी संस्कार (मूळ संस्कार) बनविणारे व्यर्थ आणि जुन्या
संस्कारांपासून मुक्त भव
कोणताही व्यर्थ
संकल्प अथवा जुने संस्कार देह-अभिमानाशी संबंधित आहेत, आत्मिक स्वरूपाचे संस्कार
बाप समान असतील. जसे बाबा सदैव विश्व कल्याणकारी, परोपकारी, दयाळू, वरदाता… आहेत,
तसे आपले संस्कार नॅचरल बनावेत. संस्कार बनणे अर्थात संकल्प, बोल आणि कर्मामध्ये
आपोआप त्यानुसार चालणे. जीवनामध्ये संस्कार एक चावी आहे ज्याद्वारे स्वतः चालत
राहतात आणि मग मेहनत करण्याची गरज राहत नाही.
बोधवाक्य:-
आत्मिक
स्थितीमध्ये स्थित राहून आपल्या रथाद्वारे (शरीराद्वारे) कार्य करवून घेणारेच खरे
पुरुषार्थी आहेत.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.
जसे बाबांनी तुम्हा
सर्वांना कानाकोपऱ्यातून शोधून काढले आहे. अनेक वृक्षांच्या फांद्या आता एकच चंदनाचा
वृक्ष बनला आहे. लोक म्हणतात - दोन-चार माता देखील एकत्र सोबत राहू शकत नाहीत आणि
तुम्ही माता साऱ्या विश्वामध्ये एकता स्थापन करण्याच्या निमित्त आहात, हीच तुमची
आपसातील एकता बाबांची प्रत्यक्षता करेल.