04-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - आता या घाणेरड्या दुनियेला आग लागणार आहे त्यामुळे शरीरासहित ज्याला तुम्ही माझे-माझे म्हणता त्याला विसरून जायचे आहे, यामध्ये मन गुंतवायचे नाही

प्रश्न:-
बाबा तुम्हाला या दुःखधामाचा तिरस्कार करण्याची प्रेरणा का देतात?

उत्तर:-
कारण तुम्हाला आता शांतीधाम-सुखधामला जायचे आहे. या घाणेरड्या दुनियेमध्ये आता रहायचेच नाहीये. तुम्ही जाणता, आत्मा शरीरापासून विलग होऊन घरी जाईल, त्यामुळे या शरीराला कशाला बघायचे. कोणाच्याही नावा-रूपाकडे देखील बुद्धी जाऊ नये. घाणेरडे विचार जरी आले तरीही पद भ्रष्ट होईल.

ओम शांती।
शिवबाबा आपल्या मुलांसोबत, आत्म्यांसोबत बोलतात. आत्माच ऐकते. स्वतःला आत्मा निश्चय करायचा आहे. निश्चय करून मग हे समजावून सांगायचे आहे की, बेहदचे बाबा आलेले आहेत, सर्वांना घेऊन जाण्यासाठी. दुःखाच्या बंधनातून सोडवून सुखाच्या संबंधामध्ये घेऊन जातात. संबंध सुखाला, बंधन दुःखाला म्हटले जाते. आता इथल्या कुठल्याही नाव-रूप इत्यादीमध्ये मन गुंतवू नका. आपल्या घरी जाण्यासाठी तयारी करायची आहे. बेहदचे बाबा आलेले आहेत, सर्व आत्म्यांना घेऊन जाण्यासाठी त्यामुळे इथे कोणातही मन गुंतू द्यायचे नाही. ही सर्व इथली घाणेरडी बंधने आहेत. तुम्ही समजता आपण आता पवित्र बनलो आहोत तर आमच्या देहाला कोणीही घाणेरड्या विचारांनी हात लावू नये. ते विचारच निघून जातात. पवित्र बनल्याशिवाय परत घरी तर जाऊ शकत नाही. जर सुधरले नाही, तर शिक्षा भोगावी लागेल. या समयी सर्व आत्मे बिघडलेले आहेत. शरीरासोबत घाणेरडे काम करतात. घाणेरड्या देहधारींवर मन जडले आहे. बाबा येऊन म्हणतात - हे सर्व घाणेरडे विचार सोडून द्या. आत्म्याला शरीरापासून विलग होऊन घरी जायचे आहे. ही तर खूपच विकृत घाणेरडी दुनिया आहे, या दुनियेमध्ये तर आता आम्हाला रहायचे नाहीये. कुणाला पहावेसे सुद्धा वाटत नाही. आता तर बाबा आले आहेत स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. बाबा म्हणतात - मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. पवित्र बनण्यासाठी बाबांची आठवण करा. कुठल्याही देहधारीमध्ये मन गुंतवू नका. मोह पूर्णतः नष्ट झाला पाहिजे. पती-पत्नीचे एकमेकांवर खूप प्रेम असते. एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. आता तर स्वतःला आत्मा भाऊ-भाऊ समजायचे आहे. घाणेरडे विचार राहता कामा नयेत. बाबा समजावून सांगत आहेत - आता हे वेश्यालय आहे. विकारांमुळेच तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःख मिळाले आहे. बाबा या जुन्या दुनियेविषयी खूपच तिरस्कार उत्पन्न करतात. आता तुम्ही जहाजामध्ये बसले आहात परत जाण्यासाठी. आत्मा समजते की, आता मी बाबांकडे परत जात आहे. या सर्व जुन्या दुनियेविषयी वैराग्य आले आहे. या घाणेरड्या दुनियेमध्ये, नरक वेश्यालयामध्ये आम्हाला रहायचे नाही आहे. तर मग विकारासाठी घाणेरडे विचार येणे अतिशय वाईट आहे. पद सुद्धा भ्रष्ट होईल. बाबा म्हणतात - मी तुम्हाला गुल-गुल दुनियेमध्ये (फुलांच्या दुनिये मध्ये), सुखधाममध्ये घेऊन जाण्याकरीता आलो आहे. मी तुम्हाला या वेश्यालयामधून बाहेर काढून शिवालयामध्ये घेऊन जाणार, तर आता बुद्धीचा योग नवीन दुनियेमध्ये असायला हवा. किती आनंद झाला पाहिजे. बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत, हे बेहदचे सृष्टी चक्र कसे फिरते, ते तर बुद्धीमध्ये आहेच. सृष्टी चक्राला जाणल्याने अर्थात स्वदर्शन चक्रधारी बनल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. जर देहधारीसोबत बुद्धियोग लावाल तर पद भ्रष्ट होईल. कोणतेही देहाचे नाते आठवता कामा नये. ही तर दुःखाची दुनिया आहे, यामध्ये सर्व दुःखच देणारे आहेत.

बाबा घाणेरड्या दुनियेमधून सर्वांना घेऊन जातात, त्यामुळे आता बुद्धीयोग आपल्या घरासोबत (शांतीधाम मध्ये) लावायचा आहे. मनुष्य भक्ती करतात - मुक्तीमध्ये जाण्यासाठी. तुम्ही देखील म्हणता - आम्हा आत्म्यांना इथे रहायचे नाहीये. आम्ही हे घाणेरडे शरीर सोडून आपल्या घरी जाणार, ही तर पुरानी जुत्ती (जुने शरीर) आहे. बाबांची आठवण करता-करता मग हे शरीर सुटून जाईल. अंतकाळी एका बाबांव्यतिरिक्त इतर दुसरी कोणतीही गोष्ट आठवू नये. हे शरीर देखील इथेच सोडायचे आहे. शरीर गेले तर सर्व काही गेले. देहासहित जे काही आहे, ज्याला तुम्ही माझे-माझे म्हणता ते सर्व विसरून जायचे आहे. या घाणेरड्या दुनियेला आग लागणार आहे, त्यामुळे यामध्ये आता मन गुंतवायचे नाहीये. बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो, मी तुमच्यासाठी स्वर्गाची स्थापना करत आहे. तिथे तुम्हीच जाऊन राहणार. आता तुमचे मुख त्या बाजूला आहे. बाबांची, घराची आणि स्वर्गाची आठवण करायची आहे. दु:ख धामचा आता तिरस्कार वाटतो. या शरीरांचा तिरस्कार वाटतो. लग्न करण्याची तरी काय आवश्यकता आहे. लग्न केल्याने मग मन शरीरामध्ये गुंतत जाते. बाबा म्हणतात - या जुन्या शरीरांसोबत जरा देखील स्नेह ठेवू नका. हे आहेच वेश्यालय. सर्व पतितच पतित आहेत. रावण राज्य आहे. इथे कोणातही मन गुंतवायचे नाही, एका बाबांशिवाय. बाबांची जर आठवण केली नाहीत तर जन्म-जन्मानंतरीची पापे भस्म होणार नाहीत. मग शिक्षा सुद्धा खूप कठोर आहे. पद सुद्धा भ्रष्ट होईल. तर मग का नाही या कलियुगी बंधनाला सोडून द्यावे. बाबा सर्वांकरीता ही बेहदची गोष्ट समजावून सांगतात. जेव्हा संन्यासी रजोप्रधान होते तेव्हा दुनिया इतकी घाणेरडी नव्हती. जंगलामध्ये राहत होते. सर्वांना आकर्षित करत होते. मनुष्य तिथे जाऊन त्यांचे भोजन देऊन येत होते. निडर होऊन राहत होते. तुम्हाला सुद्धा निडर बनायचे आहे, यासाठी बुद्धी खूप विशाल पाहिजे. बाबांकडे जेव्हा येतात, तेव्हा मुलांना आनंद वाटतो. आम्ही बेहदच्या बाबांकडून सुखधामचा वारसा घेतो. इथे तर किती दुःख आहे. कितीतरी गलिच्छ आजार इत्यादी होत राहतात. बाबा तर गॅरंटी देतात - मी तुम्हाला तिथे घेऊन जातो, जिथे दुःख, आजार इत्यादीचे नाव सुद्धा नाही. अर्ध्या कल्पासाठी तुम्हाला हेल्दी (निरोगी) बनवतात. इथे जर कोणावरही मन जडले तर खूप शिक्षा भोगावी लागेल.

तुम्ही समजावून सांगू शकता, ते (दुनियावाले) म्हणतात - ३ मिनिटे सायलेन्स (शांती). त्यांना सांगा, फक्त सायलेन्स ने काय होणार. ही तर बाबांची आठवण करायची आहे, ज्यामुळे विकर्म विनाश होतील. शांतीचे वरदान देणारे तर बाबा आहेत. त्यांची आठवण केल्याशिवाय शांती मिळणार कशी? त्यांची आठवण कराल तेव्हाच वारसा मिळणार. टीचर्सनीच हे धडे शिकवायचे आहेत. खंबीरपणे उभे रहा, तर कोणीही तुम्हाला काहीही बोलणार नाही. बाबांचे बनले आहात तर पोटासाठी तर मिळेलच, शरीर निर्वाहासाठी देखील भरपूर मिळेल. जसे वेदांती बच्ची आहे, तिने परीक्षा दिली, त्यामध्ये एक पॉईंट होता - गीतेचा भगवान कोण? तिने परमपिता परमात्मा शिव, असे लिहिले तर तिला नापास करून टाकले. आणि ज्यांनी श्रीकृष्णाचे नाव लिहिले होते, त्यांना पास केले. मुलीने सत्य सांगितले परंतु, त्यांना हे माहित नसल्यामुळे त्यांनी तिला नापास केले. मग तिला त्यांच्याशी वाद घालावा लागला की, मी तर हे खरे तेच लिहिले होते. गीतेचे भगवान आहेतच निराकार परमपिता परमात्मा. देहधारी श्रीकृष्ण तर असू शकत नाही. परंतु मुलीची ही रूहानी सेवा करण्याची इच्छा होती, तर लौकिक शिक्षण सोडून दिले.

तुम्ही जाणता, आता बाबांची आठवण करत-करत आपल्या या शरीराला देखील सोडून शांतीच्या दुनियेमध्ये जायचे आहे. आठवण केल्याने हेल्थ-वेल्थ (आरोग्य आणि संपत्ती) दोन्ही मिळते. भारतामध्येच शांती आणि समृद्धी होती ना. अशा गोष्टी तुम्ही कुमारींनी बसून समजावून सांगाल तर तुम्हाला कोणीही नाव ठेवणार नाही. जर तुमच्याशी कोणी सामना करत असेल तर तुम्ही कायदेशीर लढा द्या, मोठ-मोठ्या ऑफिसर्सकडे जा. काय करतील? असे नाही की, तुम्ही उपाशी पोटी मराल. केळ्या बरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा चपाती खाऊ शकता. मनुष्य पोटासाठी किती पापे करतात. बाबा येऊन सर्वांना पाप-आत्म्या पासून पुण्य-आत्मा बनवतात. यामध्ये पाप करण्याची, खोटं बोलण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला तर तीन चतुर्थांश सुख मिळते, बाकी एक चतुर्थांश दुःख भोगता. आता बाबा म्हणतात - गोड मुलांनो, माझी आठवण करा तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतील. दुसरा कोणताही उपाय नाही. भक्तिमार्गामध्ये तर खूप धक्के खाता. शिवची पूजा तर घरामध्ये सुद्धा करू शकतात परंतु तरीही बाहेर मंदिरामध्ये जरूर जातात. इथे तर तुम्हाला बाबा मिळाले आहेत. तुम्हाला चित्र (शिवलींग) ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही. बाबांना तुम्ही जाणता. ते आपले बेहदचे पिता आहेत, मुलांना स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देत आहेत. तुम्ही येता बाबांकडून वारसा घेण्यासाठी. इथे कुठली शास्त्र इत्यादी शिकण्याची गरज नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे. बाबा, बस्स आम्ही आलो की आलो. तुम्हाला घर सोडून किती काळ झाला आहे? सुखधामला सोडून ६३ जन्म झाले आहेत. आता बाबा म्हणतात - शांतीधाम, सुखधाममध्ये चला. या दुःख धामला विसरून जा. शांतीधाम, सुखधामची आठवण करा आणि हि काही अवघड गोष्ट नाहीये. शिवबाबांना कोणतेही शास्त्र वगैरे शिकण्याची गरज नाही. हे ब्रह्मा बाबा शिकलेले आहेत. तुम्हाला आता शिवबाबा शिकवत आहेत. हे ब्रह्मा सुद्धा शिकवू शकतात. परंतु तुम्ही नेहमी शिवबाबा शिकवतात असेच समजा. त्यांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. हे (ब्रह्मा बाबा) माध्यम आहेत.

आता बाबा म्हणतात - वेळ खूप कमी आहे, जास्त नाहीये. असा विचार करू नका की जे नशिबात असेल, ते मिळेल. शाळेमध्ये अभ्यास करण्याचा पुरूषार्थ करतात ना. असे थोडेच म्हणता की, जे नशिबात असेल इथे जर अभ्यास केला नाही तर तिथे (सतयुगामध्ये) जन्म-जन्मांतर चाकरी करत राहतील. राजाई मिळू शकणार नाही. अगदीच नाही तर शेवटी डोक्यावर मुकुट ठेवतील, ते सुद्धा त्रेतामध्ये. मुख्य गोष्ट आहे - पवित्र बनून इतरांना बनविणे, सत्यनारायणाची सत्य कथा ऐकविणे, आहे खूप सोपे. दोन पिता आहेत, हदच्या पित्याकडून हदचा वारसा मिळतो, बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. बेहदच्या बाबांची आठवण कराल तर असे देवता बनाल. परंतु मग त्यामध्ये सुद्धा उच्च पद प्राप्त करायचे आहे. पद प्राप्त करण्यासाठी किती मारामारी करतात. शेवटी बॉम्ब्सची सुद्धा एकमेकांना मदत करतील. हे इतके सगळे धर्म थोडेच होते. आणि नंतर राहणार सुद्धा नाहीत. तुम्ही राज्य करणारे आहात तर स्वतःवर दया करा ना - कमीत कमी उच्चपद तरी प्राप्त करा. मुली आठ आणे सुद्धा देतात - आमची एक वीट लावा. सुदाम्याचे उदाहरण ऐकले आहे ना. मुठभर तांदळाच्या बदल्यात महाल मिळाला. गरिबाजवळ आहेतच आठ आणे तर मग ते, तेच देतील ना. म्हणतात - बाबा, आम्ही गरीब आहोत. आता तुम्ही मुले सच्ची कमाई करत आहात. इथे सर्वांची आहे खोटी कमाई. दान-पुण्य इत्यादी जे करतात, ते पाप आत्म्यांनाच करतात. तर पुण्या ऐवजी पाप होते. पैसा देणाऱ्यावर सुद्धा पाप चढते. असे करता-करता सगळेच पाप-आत्मा बनतात. पुण्य-आत्मे असतातच सतयुगामध्ये. ती आहे पुण्य आत्म्यांची दुनिया. ती तर बाबाच बनवतील. पाप-आत्मा रावण बनवतो, घाणेरडे बनतात. आता बाबा म्हणतात - कुकर्म करू नका. नवीन दुनियेमध्ये घाण नसते. नावच आहे स्वर्ग मग काय, स्वर्ग, म्हटल्यावरच तोंडाला पाणी सुटते. देवता होऊन गेले आहेत तेव्हाच तर यादगार (मूर्ती रुपामध्ये) आहेत. आत्मा अविनाशी आहे. किती ढिगानी ॲक्टर्स आहेत. कुठेतरी बसले असणार, जिथून पार्ट बजावण्यासाठी येतात. आता कलियुगामध्ये किती प्रचंड मनुष्य आहेत. देवी-देवतांचे राज्य नाही आहे. कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे. एका धर्माची आता पुन्हा स्थापना होत आहे, बाकी सर्व नष्ट होतील. तुम्ही जेव्हा स्वर्गामध्ये होता तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता. चित्रांमध्ये रामाला धनुष्यबाण दाखवला आहे. तिथे (सतयुगामध्ये) धनुष्यबाण इत्यादीचा तर प्रश्नच नाही. हे देखील कळते, ज्यांनी जी सेवा कल्पापूर्वी केली आहे, तीच आता करत आहेत. जे भरपूर सेवा करतात ते बाबांना देखील अत्यंत प्रिय वाटतात. लौकिक पित्याची मुले सुद्धा जी चांगल्या रीतीने अभ्यास करतात, त्यांच्यावर पित्याचे प्रेम जास्त असते. जे फक्त भांडत राहतात आणि आयते बसून खातात त्यांच्यावर थोडेच प्रेम करतील, सेवा करणारेच खूप प्रिय वाटतात.

एक कहाणी आहे - दोन बोके भांडले आणि लोणी मात्र कृष्णाने खाऊन टाकले. संपूर्ण विश्वाची बादशाही रुपी लोणी तुम्हाला मिळते. तर आता चूक करायची नाही. घाणेरडे बनायचे नाही. याच्यामागे राजाई गमावू नका. बाबांकडून सूचना मिळत असते, आठवण केली नाहीत तर पापांचे ओझे वाढत जाईल, मग खूप शिक्षा भोगावी लागेल. धाय मोकलून रडाल. २१ जन्मांची बादशाही मिळते. यामध्ये जर नापास झालात, तर खूप रडाल. बाबा म्हणतात - ना माहेरची, ना सासरची आठवण करायची आहे. भविष्यातील नवीन घराचीच आठवण करायची आहे.

बाबा समजावून सांगत आहेत - कोणालाही पाहून मोहित व्हायचे नाही. फूल बनायचे आहे. देवता फूल होते, कलियुगामध्ये काटे होते. आता तुम्ही संगमावर फूल बनत आहात. कोणालाही दुःख द्यायचे नाही. इथे असे बनाल तेव्हा सतयुगामध्ये जाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अंत समयी एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणाचीही आठवण येऊ नये त्यासाठी या दुनियेमध्ये कोणामध्येही मन गुंतवायचे नाही. घाणेरड्या शरीरांवर प्रेम करायचे नाही. कलियुगी बंधने तोडून टाकायची आहेत.

२) विशाल बुद्धी बनून निडर बनायचे आहे. पुण्य-आत्मा बनण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पाप आता करायचे नाही. पोटासाठी म्हणून खोटे बोलायचे नाही. मूठभर तांदूळ सफल करून खरी-खरी कमाई जमा करायची आहे, स्वतःवर दया करायची आहे.

वरदान:-
परमात्म प्रेमाने स्वतःला किंवा विश्वाला निर्विघ्न बनविणारे तपस्वीमूर्त भव

एका परमात्म्याच्या प्रेमामध्ये राहणे हीच तपस्या आहे. या तपस्येचे बळच स्वतःला आणि विश्वाला सदैव निर्विघ्न बनवू शकते. निर्विघ्न राहणे आणि निर्विघ्न बनविणे हीच तुमची खरी सेवा आहे, जी अनेक प्रकारच्या विघ्नांमधून सर्व आत्म्यांना मुक्त करते. अशी सेवाधारी मुलेच तपस्येच्या आधारावर बाबांकडून जीवनमुक्तीचे वरदान घेऊन इतरांना देण्यासाठी निमित्त बनतात.

बोधवाक्य:-
विखुरलेल्या स्नेहाला समेटून एका बाबांसोबतच स्नेह ठेवा तर मेहनती पासून मुक्त व्हाल.