04-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला किंग ऑफ फ्लॉवर बनविण्याकरिता, त्यामुळे
विकारांची कोणतीही दुर्गंधी असता कामा नये”
प्रश्न:-
विकारांच्या
अंशाला समाप्त करण्यासाठी कोणता पुरुषार्थ करायचा आहे?
उत्तर:-
निरंतर अंतर्मुखी राहण्याचा पुरुषार्थ करा. अंतर्मुखी अर्थात सेकंदामध्ये
शरीरापासून डिटॅच करणे. या दुनियेविषयीची शुद्धच हरपून जाणे. एका सेकंदामध्ये वर
जाणे आणि येणे. या अभ्यासाद्वारे विकारांचा अंश समाप्त होईल. कर्म करत असताना
मध्ये-मध्ये अंतर्मुखी बना, असे वाटावे जसे एकदम सन्नाटा झाला आहे. कोणतीही चुळबुळ
नको. ही सृष्टी जणू काही अस्तित्वातच नाही आहे.
ओम शांती।
इथे प्रत्येकाला बसवले जाते की अशरीरी होऊन बाबांच्या आठवणीमध्ये बसा आणि त्याचसोबत
हे जे सृष्टीचक्र आहे त्याची देखील आठवण करा. मनुष्य ८४ च्या चक्राला समजत नाहीत.
आणि समजणारही नाहीत. जे ८४ चे चक्र फिरतात तेच समजण्यासाठी येतील. तुम्हाला याचीच
आठवण केली पाहिजे, यालाच स्वदर्शन चक्र म्हटले जाते, ज्याद्वारे आसुरी विचार नष्ट
होतील. असे नाही की कोणते असूर बसले आहेत ज्यांचा गळा कापेल. मनुष्य स्वदर्शन
चक्राचा देखील अर्थ समजत नाहीत. हे ज्ञान तुम्हा मुलांना इथेच मिळते. कमलपुष्प समान
गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र बना. भगवानुवाच आहे ना. हा एक जन्म पवित्र
बनल्याने भविष्य २१ जन्म तुम्ही पवित्र दुनियेचे मालक बनाल. सतयुगाला म्हटले जाते
शिवालय. कलियुग आहे वेश्यालय. ही दुनिया परिवर्तित होते. भारताचीच गोष्ट आहे.
इतरांच्या गोष्टीमध्ये जाताच कामा नये. म्हणतील जनावरांचे काय होईल? इतर धर्मांचे
काय होईल? बोला, अगोदर आपल्या विषयी तर समजून घ्या, नंतर इतरांच्या गोष्टी.
भारतवासीच आपल्या धर्माला विसरून दुःखी झाले आहेत. भारतामध्येच बोलावतात - ‘तुम
मात-पिता…’ विदेशामध्ये असे ‘मात-पिता’ शब्द बोलत नाहीत. ते फक्त ‘गॉड फादर’
म्हणतात. बरोबर भारतामध्येच भरभरून सुख होते, भारत स्वर्ग होता - हे देखील तुम्ही
जाणता. बाबा येऊन काट्यांना फूल बनवतात. बाबांना बागवान म्हटले जाते. बोलावतात -
‘येऊन काट्यांना फूल बनवा’. बाबा फुलांचा बगीचा बनवितात. आणि माया मग काट्यांचे
जंगल बनविते. मनुष्य तर म्हणतात - ‘ईश्वरा तुझी माया खूप प्रबळ आहे’. ना ईश्वराला
ओळखत, ना मायेला ओळखतात. कोणीतरी एक शब्द सांगितला बस्स तोच रिपीट करत राहतात. अर्थ
काहीच नाही. तुम्ही मुले समजता हा ड्रामाचा खेळ आहे - रामराज्याचा आणि रावण राज्याचा.
राम राज्यामध्ये सुख, रावण राज्यामध्ये दुःख आहे. इथलीच गोष्ट आहे. ही काही प्रभूची
माया नाही आहे. माया म्हटलेच जाते ५ विकारांना, ज्याला रावण म्हटले जाते. बाकी
मनुष्य तर पुनर्जन्म घेऊन ८४ च्या फेऱ्यामध्ये येतात. सतोगुणीपासून तमोप्रधान
होणारच आहे. यावेळी सर्व विकारातून जन्म घेतात म्हणून विकारी म्हटले जाते. नाव
देखील आहे विशश दुनिया आणि मग व्हाईसलेस दुनिया अर्थात जुन्या दुनिये पासून नवीन कशी
बनते, ही तर समजून घेण्याची कॉमन गोष्ट आहे. न्यू वर्ल्डमध्ये पहिले हेवन होता. मुले
जाणतात स्वर्गाची स्थापना करणारे परमपिता परमात्मा आहेत, त्यामध्ये भरभरून सुख
मिळाले आहे. ज्ञानाने दिवस, भक्तीने रात्र कशी होते - हे देखील कोणी समजत नाहीत.
म्हणतील - ब्रह्मा तथा ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मणांचा दिवस मग त्याच ब्राह्मणांची
रात्र. दिवस आणि रात्र इथेच होतो, हे कोणीही समजत नाहीत. प्रजापिता ब्रह्माची रात्र,
तर जरूर त्यांच्या ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मणांची देखील रात्र असेल. अर्धा कल्प
दिवस, अर्धा कल्प रात्र.
आता बाबा आले आहेत
निर्विकारी दुनिया बनविण्याकरिता. बाबा म्हणतात - मुलांनो, काम विकार महाशत्रू आहे,
त्यावर विजय प्राप्त करायचा आहे. संपूर्ण निर्विकारी पवित्र बनायचे आहे. अपवित्र
झाल्याने तुम्ही खूप पापे केली आहेत. ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया. पाप जरूर शरीरा
द्वारेच कराल, तेव्हाच पाप-आत्मा बनाल. देवतांच्या पवित्र दुनियेमध्ये पाप असत नाही.
इथे तुम्ही श्रीमताद्वारे श्रेष्ठ पुण्य आत्मा बनत आहात. श्री श्री १०८ ची माळा आहे.
वरती आहे फूल, त्यांना म्हटले जाते - शिव. ते आहे निराकारी फूल. मग साकारमध्ये
मेल-फिमेल आहेत, त्यांची माळा बनलेली आहे. शिवबाबांद्वारे हे पुजनिय स्मरण
करण्यालायक बनता. तुम्ही मुले जाणता - बाबा आपल्याला विजयी माळेचा मणी बनवतात. आपण
विश्वावर विजय प्राप्त करत आहोत आठवणीच्या बळाने, आठवणीनेच विकर्म विनाश होतील. मग
तुम्ही सतोप्रधान बनाल. ते लोक तर न समजताच म्हणतात - ‘प्रभू, तुझी माया प्रबळ आहे’.
जर कोणाकडे धन असेल तर म्हणतील यांच्याकडे माया खूप आहे. खरे पाहता माया ५ विकारांना
म्हटले जाते, ज्याला रावण देखील म्हटले जाते. त्यांनी मग रावणाचे दहा तोंडाचे चित्र
बनवले आहे. आता चित्र आहे तर समजावून सांगितले जाते. जसे अंगदसाठी देखील असे
दाखवतात की, त्याला रावणाने हलविले परंतु हलवू शकला नाही. दृष्टांत बनवले आहेत. बाकी
अशी कोणती गोष्ट नाहीये. बाबा म्हणतात माया तुम्हाला कितीही हलवेल परंतु तुम्ही
स्थिर राहा. रावण, हनुमान, अंगद इत्यादी हे सर्व दृष्टांत बनविलेले आहेत, ज्याचा
अर्थ तुम्ही मुलेच जाणता. भ्रामरीचा देखील दृष्टांत आहे. भ्रामरी आणि ब्राह्मणी राशी
जुळते. तुम्ही विष्ठेतील किड्यांना ज्ञान-योगाची भू-भू करून पतितापासून पावन बनविता.
बाबांची आठवण करा तर सतोप्रधान बनाल. कासवाचा देखील दृष्टांत आहे. इंद्रियांना
समेटून अंतर्मुखी होऊन बसतात. तुम्हाला देखील बाबा म्हणतात भले कर्म करा नंतर
अंतर्मुख व्हा (आत वळा). जणू काही ही सृष्टीच अस्तित्वात नाही. चुळबुळ बंद होते.
भक्तिमार्गामध्ये बाह्यमुखी बनतात. गीत गाणे, हे करणे, किती आवाज, किती खर्च होतो.
किती जत्रा भरतात. बाबा म्हणतात - हे सर्व सोडून अंतर्मुखी बना. जणू काही ही सृष्टी
अस्तित्वातच नाही. स्वतःला पहा आपण लायक बनलो आहोत? कोणता विकार तर सतावत नाही ना?
आपण बाबांची आठवण करतो का? बाबा, जे विश्वाचा मालक बनवितात, अशा बाबांची तर
रात्रं-दिवस आठवण केली पाहिजे. मी आत्मा आहे, ते माझे बाबा आहेत. हे आतल्या-आत घोळत
रहावे - आपण आता नवीन दुनियेची फुले बनत आहोत. रुईचे किंवा तगराचे फूल बनायचे नाहीये.
आपल्याला तर एकदम किंग ऑफ फ्लॉवर एकदम सुगंधी फूल बनायचे आहे. कोणती दुर्गंधी राहू
नये. वाईट विचार निघून गेले पाहिजेत. कोसळवून टाकण्यासाठी मायेची वादळे खूप येतील.
कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करायचे नाही. अशा प्रकारे स्वतःला पक्के करायचे
आहे. स्वतःला सुधारायचे आहे. कोणत्याही देहधारीची मला आठवण येता कामा नये. बाबा
म्हणतात - स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, शरीर निर्वाह अर्थ कर्म देखील भले करा.
त्यातूनही वेळ काढू शकता. जेवताना देखील बाबांची महिमा करत राहा. बाबांची आठवण करून
खाल्ल्याने भोजन देखील पवित्र होते. जेव्हा बाबांची निरंतर आठवण कराल तेव्हा
आठवणीनेच अनेक जन्मांतील पापे नष्ट होतील आणि तुम्ही सतोप्रधान बनाल. बघायचे आहे
किती खरे सोने बनलो आहे? आज किती तास आठवणीमध्ये राहिलो? काल ३ तास आठवणीमध्ये
राहिलो, आज २ तास रहा - हा तर आज घाटा झाला. उतरणे आणि चढणे होत राहील. यात्रेला
जातात तर कुठे चढाव, कुठे उतार असतात. तुमची अवस्था देखील वर-खाली होत राहील. आपले
खाते बघायचे आहे. मुख्य आहे आठवणीची यात्रा.
भगवानुवाच आहे तर
जरूर मुलांनाच शिकवतील. साऱ्या दुनियेला कसे शिकवतील. आता भगवान कोणाला म्हणावे?
कृष्ण तर शरीरधारी आहे. भगवान तर निराकार परमपिता परमात्म्याला म्हटले जाते. बाबा
स्वतः म्हणतात - मी साधारण शरीरामध्ये प्रवेश करतो. ब्रह्माचे देखील वृध्द शरीर
गायले गेले आहे. पांढरी दाढी तर वृद्धाचीच असते ना. पाहिजे देखील जरूर अनुभवी रथ.
छोट्या रथामध्ये थोडेच प्रवेश करतील. स्वतःच म्हणतात मला कोणी जाणत नाही. ते आहेत
गॉड फादर किंवा सुप्रीम सोल. तुम्ही देखील १०० टक्के पवित्र होता. आता १०० टक्के
अपवित्र बनला आहात. सतयुगामध्ये १०० टक्के प्युरीटी होती तर पीस आणि प्रॉस्पेरिटी (शांती
आणि समृद्धी) देखील होती. मुख्य आहे प्युरीटी. पाहता देखील प्युरीटी असणाऱ्यां समोर
माथा टेकतात, त्यांची महिमा गातात. संन्याशांसमोर असे कधी म्हणणार नाहीत की,
‘तुम्ही सर्व गुण संपन्न… आम्ही पापी नीच आहोत’. देवतांच्या समोर असे म्हणतात.
बाबांनी समजावून सांगितले आहे - कुमारीला सर्वजण पाया पडून नमस्कार करतात आणि मग
लग्न करते तर तीच सर्वांच्या पाया पडून नमस्कार करते कारण विकारी बनते ना. आता बाबा
म्हणतात तुम्ही निर्विकारी बनाल तर अर्धा कल्प निर्विकारी रहाल. आता ५ विकारांचे
राज्यच नष्ट होत आहे. हा आहे मृत्यूलोक, तो आहे अमरलोक. आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा
नेत्र मिळतो. बाबाच देतात. तिलक देखील मस्तकावर लावतात. आता आपल्याला ज्ञान मिळत आहे,
कशासाठी? तुम्ही स्वतःच स्वतःला राज तिलक द्या. जसे बॅरिस्टरी शिकतात तर शिकून
स्वतःच स्वतःला बॅरिस्टरीचा तिलक देतात. शिकाल तर तिलक मिळेल. आशीर्वादाने थोडाच
मिळेल. मग तर सर्वांवरच टीचर कृपा करेल, सर्वच पास होतील. मुलांनी स्वतःच स्वतःला
राज तिलक द्यायचा आहे. बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील आणि चक्राची आठवण
केल्याने चक्रवर्ती महाराजा बनाल. बाबा म्हणतात - तुम्हाला राजांचाही राजा बनवितो.
देवी-देवता डबल मुकुटधारी बनतात. पतित राजे देखील त्यांची पूजा करतात. तुम्हाला
पुजारी राजांपेक्षाही श्रेष्ठ बनवतात. जे खूप दान-पुण्य करतात तर ते राजांच्या पोटी
जन्म घेतात कारण चांगली कर्म केली आहेत. आता इथे तुम्हाला अविनाशी ज्ञान-धन मिळाले
आहे, ते धारण करून मग दान करायचे आहे. हे सोर्स ऑफ इन्कम आहे. टीचर देखील शिक्षणाचे
दान करतात. ते शिक्षण आहे अल्प काळासाठी. विदेशातून शिकून येतात, येताच हार्ट फेल
होतात तर शिक्षणच खलास होते. विनाशी झाले ना. सगळीच मेहनत फुकट गेली. तुमची मेहनत
अशी वाया जाऊ शकत नाही. तुम्ही जितके चांगले शिकाल तितके २१ जन्म तुमचे शिक्षण कायम
राहील. तिथे अकाली मृत्यू होत नाही. हे शिक्षण सोबत घेऊन जाल.
आता जसे बाबा
कल्याणकारी आहेत तसेच तुम्हा मुलांना देखील कल्याणकारी बनायचे आहे. सर्वांना रस्ता
सांगायचा आहे. बाबा मत तर खूप चांगले देतात. एकच गोष्ट समजावून सांगा की
सर्वश्रेष्ठ शिरोमणी श्रीमद् भगवद् गीतेची इतकी महिमा का आहे? भगवंताचेच श्रेष्ठ मत
आहे. आता भगवान कोणाला म्हणता येईल? भगवान तर एकच आहेत. ते आहेत निराकार, सर्व
आत्म्यांचे पिता, म्हणून आपसामध्ये भाऊ-भाऊ म्हणतात; मग जेव्हा ब्रह्मा द्वारे नवीन
सृष्टी रचतात तर बहिण-भाऊ होतात. यावेळी तुम्ही भाऊ-बहीणी आहात तर पवित्र रहावे
लागेल. ही आहे युक्ती. क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) एकदम निघून जावी. काळजी घ्यायची
आहे, आपले डोळे कुठे मतवाले तर बनले नाहीत ना? बाजारामध्ये फुटाणे पाहून मनात इच्छा
तर निर्माण झाली नाही ना? अशी इच्छा अनेकांची होते, मग खातात देखील. ब्राह्मणी आहे,
कोणत्या भावासोबत जाते तर भाई विचारतो फुटाणे खाणार, एकदा खाल्ल्याने पाप थोडेच
लागेल! जे ज्ञानामध्ये कच्चे आहेत ते लगेच खातात. यावर शास्त्रांमध्ये देखील
दृष्टांत आहे. या कहाण्या बसून बनवल्या आहेत. बाकी सर्व आहेत या वेळच्या गोष्टी.
तुम्ही सर्व सीता
आहात. तुम्हाला बाबा म्हणतात - एक बाबांची आठवण करा तर पापे नष्ट होतील. बाकी आणखी
कोणत्या गोष्टीच नाहीत. आता तुम्ही समजता रावण काही असा मनुष्य नाहीये. ही तर
विकारांची प्रवेशता होते तर रावण संप्रदाय म्हटले जाते. जसे कोणी-कोणी असे काम
करतात तर म्हटले जाते - तू तर असूर आहेस. वागणूक आसुरी आहे. विकारी मुलाला म्हणतील
- तू कुळ कलंकीत करतोस. हे मग बेहदचे बाबा म्हणतात - तुम्हाला मी काळ्या पासून गोरा
बनवत आहे आणि तुम्ही पुन्हा काळे तोंड करता. प्रतिज्ञा करून मग विकारी बनता. काळ्या
पेक्षाही काळे बनतात, म्हणून पत्थर-बुद्धी म्हटले जाते. आता पुन्हा तुम्ही
पारस-बुद्धी बनता. तुमची चढती कला होते. बाबांना ओळखले आणि विश्वाचे मालक बनले.
संशय घेण्याचा प्रश्नच येऊ शकत नाही. बाबा आहेत हेवनली गॉडफादर. तर जरूर मुलांकरिता
सौगातमध्ये हेवन घेऊन येतील. शिव जयंती देखील साजरी करतात - काय करत असतील? व्रत
इत्यादी ठेवत असतील. वास्तविक व्रत ठेवले पाहिजे विकारांचे. विकारांमध्ये जायचे नाही.
यांच्यामुळेच तुम्ही आदि-मध्य-अंत दुःख भोगले आहे. आता हा एक जन्म पवित्र बना.
जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे. तुम्ही बघा भारतामध्ये ९ लाख बाकी राहतील, आणि
मग शांती होईल. इतर धर्मच राहणार नाहीत ज्यामुळे टाळी वाजेल. एका धर्माची स्थापना
बाकी अनेक धर्म विनाश होतील, अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अविनाशी
ज्ञान धन स्वतःमध्ये धारण करून मग दान करायचे आहे. अभ्यासाने स्वतःच स्वतःला
राज-तिलक द्यायचा आहे. जसे बाबा कल्याणकारी आहेत तसे कल्याणकारी बनायचे आहे.
२) खाण्या-पिण्याचे
पूर्णपणे पथ्य ठेवायचे आहे. कधीही डोळे धोका देऊ नये याची काळजी घ्यायची आहे.
स्वतःला सुधारायचे आहे. कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करायचे नाही.
वरदान:-
मन्सा
शक्तीच्या अनुभवाद्वारे विशाल कार्यामध्ये सदा सहयोगी भव
प्रकृतीला, तमोगुणी
आत्म्यांच्या व्हायब्रेशनला परिवर्तन करणे किंवा खूने नाहेक वायुमंडळामध्ये,
व्हायब्रेशनमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवणे, अन्य आत्म्यांना सहयोग देणे, नवीन
सृष्टीमध्ये, नव्या रचनेचा योगबळाद्वारे प्रारंभ करणे - या सर्व विशाल कार्यासाठी
मन्सा शक्तीची आवश्यकता आहे. मन्सा शक्तीद्वारेच आपला शेवट आनंददायी होईल. मन्सा
शक्ती अर्थात श्रेष्ठ संकल्प शक्ती, एकाशीच लाईन क्लिअर - आता याचे अनुभवी बना
तेव्हा बेहदच्या कार्यामध्ये सहयोगी बनून बेहद विश्वाचे राज्य अधिकारी बनाल.
बोधवाक्य:-
निर्भयता आणि
नम्रता हे योगी आणि ज्ञानी आत्म्याचे स्वरूप आहे.
अव्यक्त इशारे -
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना:-
परमात्म प्रेम आनंदमयी
झोपाळा आहे, या सुखदाई झोपाळ्यामध्ये झोके घेत सदैव परमात्म प्रेमामध्ये लवलीन रहा
तर कधीही कोणती परिस्थिती किंवा मायेची अशांती येऊ शकणार नाही. परमात्म-प्रेम अखंड
आहे, अटळ आहे, इतके आहे जे सर्वांना प्राप्त होऊ शकते परंतु परमात्मा-प्रेम प्राप्त
करण्याची विधी आहे - न्यारे बनणे. जितके न्यारे बनाल तितका परमात्म प्रेमाचा अधिकार
प्राप्त होईल.