04-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, या
बेहदच्या ड्रामामध्ये हीरो हीरोइनचा पार्ट तुमचा आहे, बाबांचा नाही, बाबांच्याकडे
फक्त पतितांना पावन बनविण्याची कला आहे”
प्रश्न:-
ब्रह्माचे
चित्र बघून जे शंका उत्पन्न करतात (प्रश्न विचारतात), त्यांना कोणते रहस्य समजावून
सांगायचे आहे?
उत्तर:-
त्यांना
समजावून सांगा की, ही आदि सो अंत वाली आत्मा आहे. जो पहिला राजकुमार श्रीकृष्ण आहे,
त्याच्याच शेवटच्या जन्मामध्ये बाबा येतात. हे पतित शरीर आहे (ब्रह्माचे शरीर पतित
आहे), यांनाच पावन बनायचे आहे. हे (ब्रह्मा) काही भगवान नाहीत. भगवान तर
एव्हर-प्युअर (सदा पावन) आहेत. त्यांनी यांच्या देहाचा आधार घेतला आहे.
गीत:-
मुखड़ा देख ले
प्राणी…
ओम शांती।
बाबांनी
मुलांना समजावून सांगितले आहे की शांतीसाठी कुठे बाहेर दारो-दार धक्के खायचे नाहीत.
जसे हठयोगी संन्यासी समजतात की, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून शांती मिळू शकत नाही,
शांती जंगलात मिळते. परंतु बाबा म्हणतात की, शांती तिथे देखील मिळू शकत नाही.
यावरून एक कहाणी अथवा दृष्टांत ऐकवतात की, राणीच्या गळ्यात हार होता आणि बाहेर शोधत
होती... तशी शांती तर तुमच्या गळ्यात घातलेलीच आहे, बाहेर कुठे शोधत आहात. बाबा
येऊन समजावून सांगत आहेत - मुलांनो, तुम्हा आत्म्यांचा स्वधर्म आहेच शांत. हे शरीर
तर तुमची कर्मेंद्रिये आहेत, ज्याच्या द्वारे तुम्हाला पार्ट बजावावा लागतो. आत्मा
तर अविनाशी आहे. आत्मा काही लहान-मोठी होत नाही, ना तिचा विनाश होतो. हो, आत्मा
पतित बनते, तिलाच पावन बनायचे असते. आत्म्याला पहिले बालकाचे शरीर मिळते, मग युवा,
वृद्ध होते. आत्मा तर आहेच मुळी एकरस. सर्वप्रथम तर आत्म्याला जाणून घ्यायचे असते.
मी आत्माच बॅरिस्टर इत्यादी बनतो. याला म्हटले जाते - आत्म-अभिमानी भव. बाबा
समजावून सांगत आहेत - मुलांनो, तुम्ही देह-अभिमानी बनला आहात म्हणून स्वतःला शरीर
समजता, हे विसरून जाता की मी आत्मा आहे, हे माझे शरीर आहे. तर स्वतःला रियलाइज
करायचे आहे. ८४ जन्म देखील आत्माच घेते. आता बाबांनी समजावून सांगितले आहे जे
ब्राह्मण बनले आहेत तेच मग देवता बनणारे आहेत. असे देखील नाही की सर्व जण ८४ जन्म
घेतात. कोणी पहिले येतील, कोणी ५०-१०० वर्षानंतर देखील येत रहातील. कोणाचे ८०-८२,
तर कोणाचे किती जन्म असतील. मनुष्य तर ८४ लाख जन्म म्हणतात, यामुळे देखील समाधान
होत नाही, मग म्हणतात कणा-कणात भगवान आहे. आता भगवान म्हणतात की, मी कोणा
मनुष्याच्या शरीरामध्ये देखील नाही, तर मग मी पशूमध्ये, दगडा-मातीमध्ये कणा-कणामध्ये
कसा असेन बरे! बाबांनी समजावून सांगितले आहे नंबर वन असणारेच लास्ट नंबरमध्ये
तमोप्रधान बनतात. मी स्वतः सांगत आहे की, मी अनेक जन्मांतील अंतिम जन्मामध्ये
साधारण शरीरामध्ये प्रवेश करतो. ज्याने पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत तोच जरूर पतित
असेल. पावन तर असू शकत नाही. बाबा स्वतः म्हणतात पहिल्या नंबरला श्रीकृष्ण आहे,
पहिला राजकुमार; तो श्री नारायण तर नंतर, जेव्हा मोठा होतो तेव्हा बनतो. ती देखील (जन्मल्यापासून
नारायण बनेपर्यंतची) २०-२५ वर्षे कमी होतात. त्याचे (नारायणाचे) देखील पूर्ण ८४
जन्म म्हणणार नाही. नंबर वन श्रीकृष्ण आहे. भले तोच मग स्वयंवरानंतर नारायण बनतो.
परंतु हिशोब तर मुलांना करायचा आहे ना. ५ हजार वर्षात पूर्ण ८४ जन्म केवळ
श्रीकृष्णाचेच म्हणणार. तर बाबा बसून समजावून सांगत आहेत - मी कल्प-कल्प त्याच
तनामध्ये येतो, ज्याचा आदि पासून अंतापर्यंत पार्ट आहे. दुसऱ्या कोणातही येऊ शकत
नाही. हिशोब आहे ना. ब्रह्माच पहिला नंबर आहे. मी बाकी कोणामध्ये कसा येऊ शकेन.
तुम्हाला खूप लोक विचारतात की फक्त एकट्या ब्रह्मामध्येच का येतात! परंतु हा हिशोब
आहे ना. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. गायले देखील आहे ब्रह्मा द्वारे स्थापना
करतात. विष्णू अथवा शंकराद्वारे स्थापना करत नाहीत. हे कोणा दुसऱ्याचे काम नाहीये.
मनुष्य रचता आणि रचना यांना जाणत नाहीत. हे देखील ड्रामामध्ये आधीच लिहिलेले आहे.
‘बनी बनाई बन रही… चिंता ताकी कीजिए…’ ही आत्ताची गोष्ट आहे, जे घडणार असते (विधिलिखित
असते) तेच होते. ते बदलू शकत नाही. आज जे काही होते ते पुन्हा ५ हजार वर्षांनंतर
होईल. बाबांनी सांगितले देखील होते - कोणतीही अशी गोष्ट दिसली तर सांगा - ही काही
नवी गोष्ट नाहीये, ५ हजार वर्षांपूर्वी देखील झाली होती; असे स्पष्टपणे लिहा. मग भले
ते येऊन विचारू देत, लिहिण्यास काही हरकत नाही. हे युद्ध पूर्वी देखील झाले होते,
नथिंग न्यू. महाभारताचे युद्ध ५ हजार वर्षांपूर्वी देखील झाले होते. ख्रिश्चनांनी
भारतामध्ये येऊन राज्य हिसकावले, नथिंग न्यू. पुन्हा कल्पानंतर देखील असेच होईल. हा
जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होत राहतो. आता पुन्हा आदि सनातन देवी-देवता धर्माची
स्थापना होत आहे. ज्यांचे ८४ जन्म पूर्ण झाले आहेत तेच पहिल्या नंबरमध्ये
लक्ष्मी-नारायण बनतील. ही सर्व रहस्ये बाबाच बसून सांगतात. बाबा म्हणतात - मी
मनुष्यसृष्टीचा बीजरूप आहे, याला उलटे झाड म्हटले जाते. या कल्पवृक्षाचे आयुष्य ५
हजार वर्षे आहे. स्वस्तिकामध्ये चारही भाग एक-सारखे दिसतील. युगे देखील एकसारखी
आहेत, त्याच्यामध्ये फरक पडत नाही.
बाबा म्हणतात की, बघा
तर खरे दुनियेमध्ये तर काय-काय होत आहे. कोणी चंद्रावर जातात, कोणी आगीतून चालतात,
कोणी पाण्यावर चालायला शिकतात. हे सर्व फालतू आहे, याच्यामुळे काहीही फायदा नाही.
याने मनुष्य पावन बनून मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये काही जाऊ शकत नाहीत. काहीही केले तरी
घरी परत जाऊ शकत नाहीत. आत्मे आपले घर आणि बाबांचे घर विसरले आहेत. आत्मा स्वतःलाच
विसरून देह-अभिमानी बनली आहे. मग मंदिरांमध्ये जाऊन महिमा गातात - ‘तुम्ही सर्वगुण
संपन्न आम्ही नीच पापी आहोत’. स्वतःची निंदा करतात. बाबा काही कधी पुजारी बनत नाहीत.
अच्छा, मग दुसऱ्या नंबरवर म्हणतात शंकर देखील एव्हर-पूज्य आहे. तो देखील पुजारी बनत
नाही. त्याचा पार्टच इथे नाहीये. या स्टेजवर ब्रह्मा आणि विष्णूचा पार्ट आहे.
ब्रह्मा आणि विष्णूचा काय-काय पार्ट आहे, हे दुनियेमध्ये कोणालाही माहीत नाही.
‘त्रिमूर्ती ब्रह्मा’, असे म्हणतात, अर्थ काहीही समजत नाहीत. असे देखील गातात -
ब्रह्माद्वारे स्थापना; परंतु ती कोण करतात त्यांचे चित्र सुद्धा नाहीये. तोंडाने
म्हणतात परंतु ते कुठे आहेत? शिव काय गोष्ट आहे, ते देखील जाणत नाहीत. आत्म्यासाठी
म्हणतात - ‘भ्रकुटी के बीच चमकता है अजब सितारा…’ मी आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी
आहे. किती शरीरे घेतात, काहीच माहीत नाही. मनुष्य किती दुःखी आहेत, टाहो फोडून ओरडत
राहतात - ओ गॉडफादर. जेव्हापासून दुःख सुरू झाले आहे तेव्हापासून हाका मारत आले
आहेत. हे देखील सांगितले गेले आहे भारतामध्ये जेव्हा रावण राज्य सुरू होते तेव्हा
असे नाही की इतर धर्मांमध्ये देखील रावण राज्य झाले. नाही, त्यांना तर आपल्या
ठरलेल्या वेळी सतो, रजो, तमोमध्ये यायचेच आहे. ही सर्व कहाणी भारतावर आहे. ते (इतर
धर्म) तर बाय-प्लॉट आहेत (उप-कथा आहेत). बाबा मधल्या काळातच येतात. भारत जेव्हा
तमोप्रधान बनतो तेव्हा मग सर्व झाड तमोप्रधान बनते. त्यांना देखील सुख-दुःख भोगायचे
आहे. झाडातून नवीन-नवीन पाने येतात, ती खूप सुंदर असतात. नवीन असणाऱ्यांना मग सतो,
रजो, तमोमध्ये जरूर यायचे आहे. शेवटी जे येतात त्यांचा मान कमी असतो. एका जन्मामध्ये
देखील सतो, रजो, तमो मधून जाऊ शकतात, परंतु त्यांची काही किंमत नसते. किंमत तर
त्यांची असते जे हीरो-हीरोइनचा पार्ट बजावतात. असे म्हणणार नाही की, बाबाच
हीरो-हीरोइनचा पार्ट बजावतात. बाबांसाठी म्हणू शकत नाही. ते तर येऊन पतितांना पावन
बनवतात. ते स्वतः पतित बनत नाहीत. तुम्ही पतितापासून पावन बनण्यासाठी मेहनत करता.
श्रीमतानुसार राजयोगाद्वारेच राज्य घेतले होते. आता तुम्ही पुन्हा घेत आहात. बाबा
म्हणतात - मी काही राज्य करत नाही, तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. आता दुनियेमध्ये
मनुष्य म्हणतात तर खूप; भगवानुवाच - मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. परंतु त्याचा
अर्थ ना स्वतः समजतात, ना इतर कोणाला समजावून सांगू शकतात. भगवानुवाच आहे तर जरूर
भगवान आले होते तेव्हाच तर म्हणाले असतील ना ‘हे मुलांनो’; भारतातच शिव जयंती,
शिवरात्री साजरी करतात. बाबा येतात देखील भारत खंडामध्ये. भारतच अविनाशी खंड आहे.
त्याची महिमा खूप जबरदस्त आहे. जशी बाबांची महिमा अपरंपार आहे तशी भारताची महिमा
देखील अपरंपार आहे. भारतातच परमपिता परमात्मा येऊन सर्व मनुष्य मात्रांची सद्गती
करतात. सर्वांना सुख देतात. त्यांचे जन्मस्थान भारत आहे. भारतच प्राचीन देश आहे.
भगवान राजयोग शिकविण्यासाठी भारतामध्येच आले होते. परंतु श्रीकृष्णाला भगवान
म्हटल्यामुळे त्यांची महिमाच राहिली नाही. भगवान तर एकच आहे, त्यांनाच सद्गुरु
म्हटले जाते. बाकी गुरु तर भरपूर आहेत. कोणा धंदा शिकविणाऱ्याला देखील गुरू म्हणतात.
आजकाल तर सर्वांना अवतार मानतात. काहीही समजत नाहीत. जेव्हा एकदम पतित बनतात तेव्हा
हाका मारतात - ‘बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा’.
बाबाच येऊन खरी-खरी
अमर कथा ऐकवतात. आता तुमच्या बुद्धीत आहे की, आपण ८४ जन्मांमध्ये कसे येतो. पहिला
चांगला जन्म नंतर मग खाली उतरत येणार. दुनियेची देखील उतरती कला होते. मनुष्यांची
बुद्धी सतो, रजो, तमो बनते. सतयुगापासून मग थोडी-थोडी उतरती कला सुरू होते. ‘चढती
कला तेरे भाने सर्व का भला’. सर्वांचे सद्गती दाता तर एक बाबा आहेत ना. ते गुरु लोक
तर फक्त शास्त्र ऐकवतात. ऐकत-ऐकत खाली घसरतच आले आहेत. बेहदचे बाबा येऊन मुलांना
विचारत आहेत - ‘मी तुम्हाला इतके श्रीमंत बनवून गेलो, इतके हिरे-माणकांचे महाल देऊन
गेलो, ते सर्व कुठे गेले?’ लौकिक पिता जेव्हा मुलांना धन देतात परंतु मुले ते धन
बरबाद करतात तेव्हा वडील बोलावून विचारतात की, तू इतका पैसा कुठे बरबाद केलास?
मुलांकडे पैसे असल्यावर खूप उडवतात. वडील धर्मात्मा असतात आणि मुले परदेशात जाऊन
लाखो रुपये उडवून येतात; वडील काहीच करू शकत नाहीत. वडील सोडचिठ्ठी सुद्धा देऊ शकत
नाहीत कारण आजोबांची मिळकत आहे. परंतु आतून जळफळत राहतात. वडिलांच्या मृत्यू नंतर
काही-काही तर अशी घाण मुले असतात की, १२ महिन्यात सर्व संपत्ती उडवून टाकतात. त्या
आहेत हदच्या गोष्टी. ही आहे बेहदची गोष्ट. बेहदचे बाबा म्हणतात - तुम्ही किती धनवान
होता, विश्वाचे मालक होता. मग गरीब का बनला आहात? इतक्या संपत्तीचे काय केले?
मुलांनाच बाबा विचारतात - भारताला इतके श्रीमंत बनवले, सर्व धन कुठे गेले? मग बाबाच
बसून समजावून सांगतात. भक्तिमार्गामध्ये किती खर्च करतात. शास्त्रे इत्यादी साठी
किती खर्च करतात. डोके पण टेकत आले, कपाळ देखील झिजले. पैसे इत्यादी सर्व काही
घालवून बसले, हा आहे ड्रामा. मी तुम्हाला श्रीमंत बनवतो. रावण तुम्हाला गरीब बनवतो.
बाबा, भारतवासीयांनाच समजावून सांगतील ना. भारतच सोन्याची चिडिया होता, इतके धन होते,
जे दुसऱ्या धर्माचे लोक येऊन लुटून घेऊन गेले. विचार तर करा - भारत काय होता! हा
देखील ड्रामा बनलेला आहे. भारतच स्वर्ग, भारतच नरक. आता आहे नरक; म्हणून बाबांनी
शिडीचे चित्र असे बनवले आहे जेणेकरून कोणीही समजेल की, आपण पतित आहोत. छोट्या-छोट्या
मुलांना देखील चित्रांवर समजावून सांगितले जाते ना. नकाशा शिवाय मुलांना कसे समजेल?
बाबाच येऊन पतितापासून पावन बनण्याची सोपी युक्ती सांगतात. सोप्यात सोपी देखील आहे
तर अवघडात अवघड देखील आहे. सतयुगामध्ये देही-अभिमानी असतात. आत्मा समजते - आता शरीर
वृद्ध झाले आहे, हे जुने वस्त्र सोडून नवीन घ्यायचे आहे. जणू साक्षात्कार होतो - आता
जाऊन बाळ बनायचे आहे, जुने चामडे (शरीर) सोडून देतात. इथे (या दुनियेमध्ये) कोणी
मेले तर रडतात सुद्धा. बँड बाजा देखील घेऊन जातात. सतयुगामध्ये तर आनंदाने एक शरीर
सोडून दुसरे घेतात, तेव्हा मोठ्या थाटात आनंद साजरा करतात. इथे किती दुःख करतात.
कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात स्वर्गात गेला! याचा अर्थ नरकात होता ना! आता तुम्ही
पुरुषार्थ करत आहात - स्वर्गवासी बनण्याकरिता. बाबा तुम्हाला स्वर्गवासी बनवतात.
बाबा येतातच जीवनमुक्ती देण्याकरिता. रावणाच्या बंधनातून सोडवून जीवनमुक्त करतात.
बाबा म्हणतात - मी कल्पापूर्वीप्रमाणे येऊन राजयोग शिकवतो. कल्प-कल्प ब्रह्माच्याच
तनामध्ये येतो. तुम्हाला ब्राह्मण जरूर बनायचे आहे. यज्ञात ब्राह्मण तर जरूर
पाहिजेत ना. हा आहे - ‘राजस्व अश्वमेध अविनाशी ज्ञान यज्ञ’. या रथाला (देहाला)
स्वाहा करायचे आहे. अश्व या रथाला म्हटले जाते. राजस्व, स्वराज्यासाठी हे सर्व अश्व
(शरीरे) यामध्ये स्वाहा होणार आहेत. आत्मा काही स्वाहा होणार नाही. आत्मे कर्मांचा
हिशोब चुकता करून निघून जातील. मग पुन्हा नव्याने सर्वांचा पार्ट सुरू होईल. याला
म्हटले जाते इतिहास-भूगोल रिपीट होणे. बाबा येतातच नवीन दुनिया स्थापन करून जुनी
दुनिया नष्ट करण्यासाठी! हे एकच महाभारत युद्ध आहे, जे शास्त्रांमध्ये गायले गेले
आहे. तर समजावून सांगितले पाहिजे - या युद्धामुळे हे स्वर्गाचे दरवाजे उघडतात,
त्यामुळे याचे शास्त्रांमध्ये गायन आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) घडून
गेलेल्या गोष्टींचे कधीही चिंतन करायचे नाही. जी गोष्ट होऊन गेली, नथिंग न्यू समजून
विसरून जायची आहे.
२) या राजस्व अश्वमेध
यज्ञामध्ये आपले तन-मन-धन सर्व स्वाहा करून सफल करायचे आहे. या अंतिम जन्मामध्ये
संपूर्ण पावन बनण्याची मेहनत करायची आहे.
वरदान:-
श्रेष्ठ वृत्ती
द्वारे प्रवृत्तीला प्रगतीचे साधन बनविणारे सदा सामर्थ्यवान भव
प्रवृत्तीमध्ये पहिले
वृत्तीने पवित्र अथवा अपवित्र बनता. जर वृत्तीला सदैव एका बाबांसोबत जोडाल, ‘एक बाबा
दूसरा ना कोणी’, अशी उच्च वृत्ती राहिली तर प्रवृत्ती प्रगतीचे साधन बनेल. वृत्ती
उच्च आणि श्रेष्ठ असेल तर चंचल होऊ शकत नाही. अशा श्रेष्ठ वृत्तीद्वारे प्रगती
करत-करत सहजच गती-सद्गती प्राप्त कराल. आणि मग सर्व कंप्लेंट कम्प्लीट होतील (तक्रारी
बंद होतील).
बोधवाक्य:-
पवित्रता जर
स्वप्न मात्र देखील हलवत असेल तर याचा अर्थ - निश्चयाचे फाउंडेशन कच्चे आहे.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
जेव्हा तुम्ही चमकणारे
तारे - सूर्य-चंद्रा समान आपल्या संपूर्ण स्टेजवर अथवा मास्टर दातापणाच्या स्टेजवर
स्थित व्हाल तेव्हा भटकणारे आत्मे, शोधणारे आत्मे परवान्यांसारखे स्वतःच प्राप्त
करण्यासाठी, भेटण्यासाठी जलद गतीने तुमच्याकडे येतील; आणि तुम्हा सर्वांना एका
सेकंदामध्ये बाबांद्वारे मुक्ती-जीवनमुक्तीचे अधिकार मिळवून देण्याची सेवा तीव्र
गतीने करावी लागेल.