04-10-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
31.12.2011 ओम शान्ति
मधुबन
नवीन वर्षामध्ये
‘तीव्र पुरुषार्थी भव’च्या वरदानाद्वारे आपल्या चेहऱ्यामधून फरिश्ता रूप दाखवा,
लाइट माइट स्वरूप ज्वालामुखी योगाने व्यर्थला जाळून टाका, दुःखी-अशांत आत्म्यांना
शक्तींचे दान द्या
आज ब्राह्मण परिवाराचे
रचयिता आपल्या चोहो बाजूच्या परिवाराला पाहत आहेत. आहे छोटासा परिवार, छोटासा संसार
आहे परंतु खूप प्रिय आहे, कारण कोटींमध्ये कोणी आहेत. का प्रिय आहेत? कारण बाबांना
ओळखले आहे. बाबांच्या वारशाचे अधिकारी बनले आहेत. तर जसे बाबा प्रिय आहेत तसा हा
ब्राह्मण परिवार देखील प्रिय आहे. बापदादांनी जन्मताच प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये
भाग्याच्या ताऱ्याला चमकवले आहे (भाग्य उजळले आहे) म्हणून हा छोटासा संसार अति
प्रिय आहे. तुम्ही देखील सर्व आपले इतके स्वमान जाणता ना! बापदादा देखील एका-एका
मुलाला पाहून आनंदित होतात आणि कोणते गाणे गातात? ‘वाह बच्चे वाह!’
आज तर सर्व जण या
श्रेष्ठ दिवशी बाबांना भेटण्यासाठी आले आहेत. आजचा दिवस आहे संगमाचा दिवस. विदाई (निरोप)
देखील आहे आणि बधाई (शुभेच्छा) देखील आहे. तसेही संगमाचे महत्व आहे. जिथे पण सागर
आणि नदीचा संगम होतो त्याचे खूप महत्व असते. तर आजच्या दिवसाचे देखील महत्व खूप
गायन योग्य आहे. जुने वर्ष समाप्त आणि नवीन वर्षाचा आरंभ होणार आहे. आजच्या दिवशी
सर्वांच्या मनामध्ये पुढे येणाऱ्या वर्षासाठी किती उमंग आहे! प्रत्येकाने आपापल्या
मनामध्ये प्लॅन बनवला आहे की, काय सोडायचे आहे आणि काय बनायचे आहे! दोन्ही प्लॅन
बनवले आहेत? बनवले आहेत? ज्यांनी येणाऱ्या वर्षासाठी आपला पुढे जाण्याचा, तीव्र
पुरुषार्थाचा प्लॅन बनवला आहे, त्यांनी हात वर करा. बनवला आहे! मुबारक असो, कारण
सर्व जाणतात की बापदादा प्रत्येक मुलासाठी काय इच्छितात. बापदादा प्रत्येक मुलासाठी
हीच शुभ भावना ठेवतात की प्रत्येक बच्चा पित्यासमान संपन्न आणि संपूर्ण बनावा. आता
तर वेळ देखील साथ देत आहे. तर प्रत्येकाने आपल्या मनामध्ये स्वतःसाठी नवीन प्लॅन
बनवला आहे ना! काही सोडायचे आहे आणि थोडे पुढे जायचे आहे. तर सोडायचे काय आहे?
बापदादांनी पाहिले की जुना संसार आणि जुनी नाती सोडण्याच्या बाबतीत सर्वांचे
पुरुषार्थावर अटेन्शन देखील आहे. एक गोष्ट जी सोडू इच्छितात परंतु आतापर्यंत
बापदादांनी पाहिले की जुने संस्कार ते सोडण्यासाठी थोडी मेहनत करावी लागत आहे. तर
बापदादा हेच इच्छित आहेत की या नवीन वर्षामध्ये प्रत्येक मुलाने आपल्या जुन्या
संस्कारांचा ‘संस्कार’ करावा (दहन करावे). तुम्ही सर्व जण याच संकल्पाला पूर्ण करू
इच्छिता ना! कारण जुना संस्कार ज्याला तुम्ही लोक म्हणता - ‘माझे नेचर आहे, भाव
नाहीये परंतु नेचर आहे’. तर हे नेचर (स्वभाव) या ब्राह्मण जन्मातील नाहीये परंतु
जुने आहे. तर त्या जुन्या संस्काराला अथवा नेचरला आजच्या दिवशी सोडण्याचा संकल्प करू
शकता का? प्रत्येक जण स्वतःला तर जाणतो, तर आज वर्षाच्या निरोपासोबतच त्या जुन्या
संस्काराला सोडण्याचा दृढ संकल्प करू शकता का? करू शकता? इच्छा देखील आहे, असे नाही
की इच्छा नाही, परंतु तरीही वारंवार पुरुषार्थामध्ये तीव्रता आणण्यामध्ये हेच ते
संस्कार आहेत जे वेगवेगळ्या रूपामध्ये विघ्न आणतात. तर बापदादा हेच इच्छित आहेत की
वर्षाला निरोप देण्यासोबत आजच्या दिवशी त्याला देखील निरोप देऊन टाका. यासाठी तयार
आहात? जे तयार आहेत त्यांनी हात वर करा. यासाठी काय कराल? स्वतःसाठी काही प्लॅनचा
देखील विचार केला आहे का? यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे दृढ संकल्प. संकल्प आहे
की, हे झाले पाहिजे परंतु संकल्पामध्ये तीव्रता पाहिजे. जसे ब्राह्मण बनताच तुम्ही
ही प्रतिज्ञा केलीत की, कोणतेही अशुद्ध भोजन स्वीकार करायचे नाही. तर बापदादांनी
पाहिले की यामध्ये दृढ संकल्पाद्वारे मेजॉरिटी पास आहेत. जसे शरीरासाठी अशुद्ध
भोजनाचा त्याग करण्याचा संकल्प केला आणि प्रॅक्टिकल करत आहात, तसेच मनासाठी हा दृढ
संकल्प करायचा आहे की कधीही, कोणाच्याही बाबतीत, कोणत्याही परिस्थितीनुसार कोणताही
व्यर्थ संकल्प न करता सदैव प्रत्येक आत्म्याप्रति शुभ भावना, शुभ कामना ठेवायचीच आहे.
मनाचे भोजन आहे - ‘संकल्प’; तर जसा शरीरासाठी दृढ संकल्प मेजॉरिटींनी केला आहे,
तसेच मग मनासाठी तुम्ही व्यर्थ संकल्प, अशुद्ध भावना नष्ट करू शकत नाही काय?
प्रत्येक आत्म्याप्रति मनापासूनचे प्रेम आणि सहयोग आपल्या मनामध्ये ठेवू शकत नाही?
तर आज बापदादा या
जुन्या वर्षासोबत या वृत्ती आणि दृष्टीला प्रत्येक मुलाकडून निरोप दिला जावा असे
इच्छित आहेत. असा दृढ संकल्प करू शकता का? करू शकता? बोला, माता, टीचर्स, सर्व भाऊ
देखील इच्छा आहे ना. हो हात वर करा. उद्यापासून कोणत्याही आत्म्याप्रति जर काहीही
व्यर्थ आहे, व्यर्थ भावना अथवा व्यर्थ भाव, त्याचा आज समाप्ती समारंभ साजरा करू
इच्छित आहेत. बोला, टीचर्स सर्व तयार आहात? टीचर दोन्ही हात वर करा. करा. अच्छा.
ज्यांनी हात वर केलेला नाही, त्यांनी हात वर करा. ज्यांनी हात वर केला नाही त्यांनी
थोडेसे उठून उभे राहा. ठीक आहे! जे पुरुषार्थ करतील परंतु दृढ संकल्प करणार नाहीत,
असे कोणी आहेत? जे उभे आहेत ते लक्ष्य आणि पुरुषार्थ करायला तयार आहेत तर त्यांनी
हात वर करा; कारण वेळेचे अटेन्शन ठेवून हा विचार करा की, सर्वांना या संगमयुगाच्या
काळामध्ये भविष्यासाठी दीर्घकाळपर्यंत सफलता प्राप्त करायची आहे. २१ जन्मांचा वारसा
घ्यायचा आहे. तर कुठे हा एक जन्म आणि कुठे २१ जन्म! तर या एका जन्मामध्ये देखील
दीर्घकाळ आपला पुरुषार्थ तीव्र करावा लागेल तेव्हाच दीर्घकाळासाठी जी प्राप्ती
करायची आहे, ती करू शकाल. बाबांवर प्रेम आहे ना तर सोबत राहायचे आहे ना! जवळ राहायचे
आहे ना! ब्रह्मा बाबांचे साथी बनून राज्य अधिकारी बनायचे आहे ना! तर आता देखील एवढा
वेळ पित्यासमान तर बनावे लागेल. ब्रह्मा बाबांचे प्रत्येक मुलावर किती प्रेम आहे,
ते तर जाणताच. प्रत्येक जण म्हणतो - बाबांचे जेवढे माझ्यावर प्रेम आहे तेवढे कोणावर
नाही, माझ्यावर जास्त प्रेम आहे. तर हे प्रेम, बाप-दादा दोघांचेही प्रेम या
जन्मामध्येच अनुभव करत आहात. आणि ज्याच्यावर प्रेम असते त्याची गोष्ट कधीही टाळली
जात नाही. तर ब्रह्मा बाबांवर सर्वांचे प्रेम आहे, किती प्रेम आहे? खूप प्रेम आहे.
भले दाखवू जरी शकत नसाल परंतु बाबा जाणतात की प्रेम सर्व मुलांचे आहे, नंबरवार आहे
परंतु प्रेम आहे, यामध्ये बापदादा देखील सर्व मुलांना सर्टिफिकेट देतात की, प्रेम
आहे. प्रेम तर आहे परंतु बाबांनी पाहिले की कधी-कधी मुले खोडकर बनतात, तर बाबा त्या
वेळी काय करतात? ते सर्व पाहून बाबा मग विशेष शक्ती देत राहतात, कारण बाबा हेच
इच्छित आहेत की प्रत्येक मूल हे ‘राजा बच्चा’ आहे, दुनियेमध्ये जे लाडके मूल असते
त्याला, राजा बेटा म्हणतात. राजा नसतो परंतु म्हणतात - राजा बेटा; परंतु तुम्ही
सर्व बापदादांचे आता देखील राजा बेटा आहात आणि भविष्यामध्ये देखील राजा बेटा आहात.
आता स्वमान आहे, स्वराज्य आहे. आता आत्म्याचे राज्य सर्व कर्मेंद्रियांवर आहे. तर
‘स्वराज्यधारी’ आता आहात आणि ‘विश्व-राज्यधारी’ भविष्यामध्ये आहात. तर राजा बेटा
आहात ना! आहात तर मान हलवा.
तर बापदादा आज
अमृतवेळेला चोहो बाजूला, भले मग विदेश असो वा देश, चोहो बाजूला फेरी मारायला गेले.
तर काय पाहिले? अमृतवेलेला योगामध्ये बसणारे मेजॉरिटी आहेत परंतु प्रेमाने बसतात,
बापदादांशी गोष्टी देखील करतात, आत्मिक स्मृतीमध्ये देखील बसतात, बापदादांकडून शक्ती
देखील घेतात; परंतु आता बापदादांना येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नवीनता हवी आहे कारण
आता दिवसेंदिवस वेळ नाजूक येणारच आहे. तर अशा वेळी आता ज्वालामुखी योग पाहिजे. त्या
ज्वालामुखी योगाची गरज आता आवश्यक आहे. ज्वालामुखी योग अर्थात लाइट माइट स्वरूप
शक्तिशाली, कारण समयानुसार आता दुःख, अशांती, हलचल वाढणारच आहे, त्यामुळे आपल्या
दुःखी,
त्रासलेल्या
आत्म्यांना विशेष ज्वालामुखी योग द्वारा
शक्ती देण्याची गरज
भासेल. दुःख, अशांतीच्या बदल्यात कोणती ना कोणती शक्ती, शांती आपल्या मनसा
सेवेद्वारे द्यावी लागेल. जो तुम्ही या वेळेचा टॉपिक ठेवला आहे - ‘एक परिवार’,
त्याच्यानुसार जेव्हा एक परिवार आहे, तर अशांत आत्म्यांना थोडीतरी ओंजळ द्याल;
म्हणून बापदादा पुढील वर्ष जे आले की आले त्याच्यासाठी विशेष लक्ष वेधून घेत आहेत
की आता ज्वालामुखी योगाची गरज आहे. ज्वालामुखी योगाद्वारेच जे काही संस्कार राहिलेले
आहेत ते देखील भस्म होणार आहेत.
आता तुमच्या ॲडव्हान्स
पार्टीच्या साथीदारांना तुम्हा सर्वांकडून हेच हवे
आहे की आता समाप्तीच्या वेळेला समोर आणा. आता रिटर्न जर्नी (परतीचा प्रवास) लक्षात
ठेवा. तुमची दीदी आठवण करून देत आहे की, ‘माझ्या नेहमी हे लक्षात राहायचे की, “अब
घर जाना है”, “आता घरी जायचे आहे”. तुमची दादी हीच आठवण करून देत आहे की जसे मला
लक्षात राहिले आता संपन्न बनायचे आहे, संपूर्ण बनायचे आहे, ध्यास लागून राहिला होता.
तर आज विशेष अमृतवेलेला वतनमध्ये बापदादांसोबत मिलन साजरे करताना सांगत होत्या की,
आता आमच्याकडून, ज्या पण दादी गेल्या आहेत त्या सर्व मिळून म्हणत होत्या की, आता
ज्वालामुखी योगाची खूप आवश्यकता आहे; भले मग इतरांना शक्ती देण्यासाठी असो, अथवा
आपल्या ब्राह्मण परिवाराला संपन्न बनविण्यासाठी असो. आता वेळेला समीप आणणारे तुम्ही
निमित्त आहात म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये काय कराल? विशेष काय कराल? एकमेकांचे
स्नेही सहयोगी बनून प्रत्येक सेंटर, सेवास्थानावर ज्वालामुखी योगाचे व्हायब्रेशन आणि
कर्मामध्ये एकमेकांचे स्नेही सहयोगी बनून, प्रत्येकाच्या बाबतीत अटेन्शन ठेवून जी
काही कमी आहे त्यामध्ये सहयोग द्या. मनसा द्वारे अन्य आत्म्यांची सेवा करा आणि
आपल्या सहयोगाद्वारे ब्राह्मण साथीदारांची विशेष सेवा करा, तेव्हाच आम्हा लोकांच्या
मनातील इच्छा पूर्ण होईल.
तर आज वतनमध्ये ॲडव्हान्स
पार्टी पुढील वर्षासाठी तुम्हा सर्वांना आठवण देखील करून देत होती आणि आपल्या
मनातील इच्छा देखील सांगत होती. तर बोला, बापदादांचा संकल्प तर ऐकलातच परंतु सोबत
आपल्या दादींच्या पुढील वर्षासाठी शुभ भावना देखील ऐकल्या ना! बापदादा तर सर्व
मुलांना मग भले कोणी कमजोर आहे, अथवा तीव्र पुरुषार्थी आहे सर्वांना तीन मुबारक देत
आहेत - एक - नव जीवनाची मुबारक, दुसरी - नव वर्षाची मुबारक आणि तिसरी - नव
दुनियेमध्ये सोबती बनून येण्याची मुबारक.
बापदादांनी हे देखील
सांगितले आहे की, सर्वांनी आपल्या मनात स्वतःसाठी वेळ निश्चित करा की कधीपर्यंत
स्वतःला पित्यासमान बनवाल. मनातल्यामनात स्वतःसाठी निश्चित करा. तर निश्चित करणे
येते ना? बापदादा तर आज प्रत्येक मुलाला पाहून हेच वरदान देत आहेत की, पुढील
वर्षामध्ये प्रत्येक बच्चा तीव्र पुरुषार्थी भव. अमृतवेलेला जेव्हा आठवणीमध्ये (योगमध्ये)
बसता आणि जेव्हा उठण्याची वेळ होते त्यावेळी बापदादांचे हे वरदान आपल्या मनामध्ये
लक्षात ठेवा - ‘तीव्र पुरुषार्थी भव’. जसे बापदादांनी दोन गोष्टी अगोदरच लक्षात
आणून दिल्या आहेत कारण संगमची वेळ अचानक समाप्त होणार आहे. तर, एक - समय आणि दुसरा
- संकल्प, दोघांवर प्रत्येक क्षणी अटेन्शन. बापदादांची प्रत्येक मुला प्रति अशीही
शुभ भावना आहे की, या वर्षामध्ये प्रत्येक बच्चा काय बनावा? काय बनणार? जो कोणी
तुमच्या चेहऱ्याकडे पाहील तुमच्या चेहऱ्यामधून फरिश्ता रूप दिसून यावे. अमकी आहे,
अमका आहे, नाही. फरिश्त्याचा अनुभव व्हावा, यासाठी ज्वालामुखी योग, अजिबात व्यर्थ
नको. लाईट आणि माइट स्वरूप योगाद्वारे व्यर्थला जाळून टाका. ज्याला पण पाहावे तो
समर्थ फरिश्ता दिसून यावा, कारण बाबांची सिकीलधी मुले तर आहात ना. बाबांनी तुम्हाला
विविध ठिकाणाहून खास निवडून आपले बनवले आहे. तर लक्ष्य ठेवा - ‘मी ब्राह्मण सो
फरिश्ता आहे’. तर अमृतवेलेला आपल्या दिनचर्येमध्ये हे लक्षात ठेवा की, ‘मी ब्राह्मण
सो फरिश्ता आहे’. चालते-फिरते फरिश्ता रूप, फरिश्ता स्वरूप तर चांगले वाटते ना!
ब्रह्मा बाबा फरिश्ता बनले, फॉलो फादर.
तर या वर्षाचे वरदान
जे दिले तीव्र पुरुषार्थी, साधारण पुरुषार्थ नाही, साधारण पुरुषार्थ असेल तर ते
राज्याचे साथीदार बनणार नाहीत. आणि बाबांची हीच इच्छा आहे की जितकेपण बापदादांची
मुरली अध्ययन करणारे गॉडली स्टुडंट आहेत, ते सर्वच्या सर्व काय बनतील? फरिश्ता.
सर्व ओझे दूर होईल. कोणत्याही संस्काराचे ओझे संपून जाईल. तर या वर्षाचा होमवर्क
काय आहे? फरिश्ता स्वरूपामध्ये राहायचे आहे, यालाच म्हटले जाते - तीव्र पुरुषार्थ.
आता प्रत्येक सेंटर, प्रत्येक आठवड्यात, प्रत्येक स्टुडंटचा रिझल्ट पाहावा की,
तीव्र पुरुषार्थी होते? जर कोणतीही गोष्ट आली, त्यासाठी सहयोगी बनून, प्रेमाने
त्यांना धीर द्या आणि आपल्या सेंटरला, स्टुडंटला तीव्र पुरुषार्थी बनवा, प्रत्येक
आठवड्यामध्ये रिझल्ट पाहावा, कारण येणारा काळ हादरवून टाकणारा आहे.
तर आजच्या संगमाच्या
दिवशी विदाई आणि बधाईच्या दिवशी चोहो बाजूच्या, जिथे पण जी मुले बसली आहेत, बापदादा
पाहत आहेत, कसे सर्व विज्ञानाच्या साधनांद्वारे पाहत देखील आहेत आणि बघून किती खूश
होत आहेत. तर चोहो बाजूच्या मुलांना बापदादा विशेष वरदान देत आहेत “सदा संतुष्टमणि
भव”. संतुष्ट राहा आणि संतुष्ट करा. अच्छा.
आता सर्व दादींनी
मिळून एखादा नवीन प्लॅन बनवा. (जानकी दादी म्हणाल्या - “बाबा, जानेवारी महिन्याचे
खूप महत्व आहे. जानेवारी महिन्यामध्ये जर सर्वांनी मिळून पुरुषार्थ केला, सेवेचा असा
एखादा प्लॅन बनवला जावा ज्यामुळे सर्वांच्या हृदयापासून निघेल की, ‘माझे बाबा’, अशी
माझी भावना आहे.”)
बापदादांना नवीन
वर्षामध्ये नवीनता हवी आहे, तेच संस्कार नको आहेत. प्रत्येक बच्चा पित्यासमान दिसून
यावा. फॉलो ब्रह्मा बाबा. परिस्थिती, गोष्टी सर्व काही ब्रह्माबाबांसमोर आले परंतु
फरिश्ता बनले. तर फरिश्ता बनायचेच आहे, हा दृढ संकल्प प्रत्येकाने स्वतःशी करावा;
कारण स्वतः स्वतःशी कराल तर लक्ष राहील. मला बनायचे आहे, बस्स. आणि तुमच्या बनण्याने
नॅचरल व्हायब्रेशन पसरेल. तर आता कोणते लक्ष्य ठेवले? फरिश्ता बनायचेच आहे, बोला.
पक्के आहे ना! अच्छा. सर्वांना बापदादांचे खूप-खूप अंतःकरणापासून प्रेम आणि मुबारक
असो.
वरदान:-
सर्व खाती आणि
नाती एका बाबांसोबत ठेवणारे डबल लाईट फरिश्ता भव
डबल लाईट फरिश्ता
बनण्यासाठी देहाच्या भानापासून देखील दूर राहा कारण देहाचे भान म्हणजे माती आहे, जर
याचे देखील ओझे असेल तर भारीपणा आहे. फरिश्ता अर्थात आपल्या देहाशी सुद्धा नाते नाही.
बाबांनी दिलेले शरीर देखील बाबांना देऊन टाकले. आपली वस्तू दुसऱ्याला दिली तर आपले
नाते संपले. सर्व हिसाब-किताब, सर्व देवाण-घेवाण बाबांसोबत बाकी सर्व जुनी खाती आणि
नाती संपली - असे संपूर्ण बेगरच डबल लाईट फरिश्ते आहेत.
सुविचार:-
आपल्या विशेषतांना
प्रयोगामध्ये आणा म्हणजे मग प्रत्येक पावलावर प्रगतीचा अनुभव कराल.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
कोणत्याही
आत्म्याकडून काही घेऊन मगच देऊ, अशी इच्छा नसावी. संकल्पामध्ये देखील असे येऊ नये
की, ‘याने करावे तेव्हा मी करेन, हा बदलला तर मी बदलेन, ‘थोडे त्याने बदलावे, थोडा
मी बदलेन…’ जो भिकाऱ्याला देखील मालामाल करतो, अपकारीवर देखील उपकार करतो तोच
परोपकाराच्या भावनेने संपन्न असतो.