04-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला आता बाबांकडून दिव्यदृष्टी मिळाली आहे, त्या दिव्यदृष्टीनेच
तुम्ही आत्म्याला आणि परमात्म्याला पाहू शकता”
प्रश्न:-
ड्रामाचे कोणते
रहस्य जाणणारे असा एक कोणता सल्ला कोणालाही देणार नाहीत?
उत्तर:-
जे जाणतात की, ड्रामामध्ये जे काही पूर्वी घडून गेले आहे त्याची पुन्हा ॲक्युरेट
पुनरावृत्ती होईल, ते कधी कोणालाही भक्ती सोडण्याचा सल्ला देणार नाहीत. जेव्हा
त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान चांगल्या प्रकारे पक्के होईल आणि समजतील की, ‘आपण आत्मा
आहोत, आपल्याला बेहदच्या बाबांकडून वारसा घ्यायचा आहे’. जेव्हा बेहदच्या बाबांची
ओळख होईल तेव्हा हदच्या गोष्टी आपोआपच बंद होतील.
ओम शांती।
आपल्या आत्म्याच्या स्वधर्मा मध्ये बसले आहात? रूहानी बाबा रूहानी मुलांना विचारत
आहेत, कारण हे तर मुले जाणतात की, एकच बेहदचे बाबा आहेत, ज्यांना रूह (आत्मा)
म्हणतात. फक्त त्यांना ‘सुप्रीम’ म्हटले जाते. ‘सुप्रीम रुह’ अथवा ‘परम आत्मा’
म्हणतात. परमात्मा आहे जरूर, असे म्हणणार नाही की, परमात्माच नाहीये. परम आत्मा
अर्थात परमात्मा. हे देखील समजावून सांगितले गेले आहे, गोंधळून जाता कामा नये, कारण
५ हजार वर्षांपूर्वी देखील तुम्ही हे ज्ञान ऐकले होते. आत्माच ऐकते ना? आत्मा अतिशय
छोटी, सूक्ष्म आहे. इतकी सूक्ष्म आहे की या डोळ्यांनी बघता येत नाही. असा कोणी
मनुष्य नसेल, ज्याने आत्म्याला या डोळ्यांनी पाहिले असेल. आत्मा दिसू शकते, परंतु
दिव्यदृष्टी द्वारे. ते देखील ड्रामा प्लॅन अनुसार. अच्छा , समजा कोणाला आत्म्याचा
साक्षात्कार झाला, जशा इतर गोष्टी दिसतात. भक्तीमार्गामध्ये देखील काही साक्षात्कार
होतो तो या डोळ्यांनीच होतो. ती दिव्यदृष्टी मिळते ज्याद्वारे चैतन्यमध्ये (प्रत्यक्षात)
बघतात. आत्म्याला ज्ञानचक्षू मिळतो ज्याच्याद्वारे पाहू शकतात, परंतु ध्यानामध्ये.
भक्तीमार्गामध्ये खूप भक्ती केल्यावर साक्षात्कार होतो. जसा मीरेला साक्षात्कार झाला,
डान्स करत असे. वैकुंठ तर नव्हता. पाचशे-सहाशे वर्षे झाली असतील. त्या वेळी वैकुंठ
थोडाच होता? जे भूतकाळामध्ये झाले आहे ते दिव्य दृष्टीने बघितले जाते. जेव्हा खूप
भक्ती करता-करता एकदम भक्तिमय होतात तेव्हा दर्शन होते परंतु त्याच्यामुळे मुक्ती
मिळत नाही. मुक्ती-जीवनमुक्तीचा मार्ग भक्ती पेक्षा एकदम वेगळा आहे. भारतामध्ये किती
असंख्य मंदिरे आहेत. शिवाचे लिंग ठेवतात, मोठे लिंग देखील ठेवतात, छोटे देखील
ठेवतात. आता हे तर मुले जाणतात जशी आत्मा आहे, तसे परमपिता परमात्मा आहेत. सर्वांचा
आकार एकसारखाच आहे. जसे बाबा तशी मुले. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. आत्मे या
शरीरामध्ये येतात पार्ट बजावण्यासाठी, या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. या काही
भक्ती मार्गातल्या दंतकथा नाहीत. ज्ञान मार्गातील गोष्टी फक्त एक बाबाच समजावून
सांगतात. सर्वप्रथम हे समजावून सांगणारे बेहदचे बाबा तर निराकारच आहेत, त्यांनाच
पूर्ण रीतीने कोणीही समजू शकत नाहीत. म्हणतात - ते तर सर्वव्यापी आहेत. हे काही
बरोबर नाही. बाबांना बोलावतात, खूप प्रेमाने बोलावतात. म्हणतात - ‘बाबा, तुम्ही
जेव्हा याल तेव्हा आम्ही तुमच्यावर वारी जाऊ (बलिहार जाऊ). माझे तर एक तुम्ही, दुसरे
कोणीही नाही’. तर जरूर त्यांची आठवण करावी लागेल. ते स्वतः म्हणतात - ‘माझ्या
मुलांनो’. आत्म्यांशीच बोलतात. याला रूहानी नॉलेज म्हटले जाते. गायले देखील जाते -
‘आत्मा और परमात्मा अलग रहे बहुकाल…’ हा देखील हिशोब सांगितला आहे. खूप काळापासून
तुम्ही आत्मे वेगळे राहता, तेच आता तुम्ही यावेळी बाबांकडे पुन्हा आपला राजयोग
शिकण्यासाठी आला आहात. हा शिक्षक सेवक आहे. टीचर नेहमी ओबिडियंट सर्व्हेंट (आज्ञाधारक
सेवक) असतात. बाबा देखील म्हणतात - ‘मी तर सर्व मुलांचा सेवक आहे’. तुम्ही किती
अधिकाराने बोलावता - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. सर्व आहेत भक्तीणी.
म्हणतात - ‘हे भगवान या, आम्हाला पुन्हा पावन बनवा’. पावन दुनिया स्वर्गाला, पतित
दुनिया नरकाला म्हटले जाते. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हे कॉलेज अथवा
गॉड फादरली युनिव्हर्सिटी आहे. याचे एम ऑब्जेक्ट आहे - मनुष्यापासून देवता बनणे.
मुले निश्चय करतात - आम्हाला असे (लक्ष्मी-नारायण) बनायचे आहे. ज्याला निश्चयच नसेल
तो शाळेमध्ये बसेल का? एम ऑब्जेक्ट तर बुद्धीमध्ये आहे. आम्हाला बॅरिस्टर किंवा
डॉक्टर बनायचे असेल तर शिकावे लागेल ना. निश्चय नसेल ते येणारच नाहीत. तुम्हाला
निश्चय आहे, आम्ही मनुष्यापासून देवता, नरापासून नारायण बनत आहोत. ही नरापासून
नारायण बनण्याची खरी-खरी सत्य कथा आहे. खरे तर हे आहे शिक्षण परंतु याला कथा का
म्हणतात? कारण ही ५ हजार वर्षांपूर्वी देखील ऐकली होती. होऊन गेली आहे. होऊन
गेलेल्या गोष्टीला कथा म्हटले जाते. हे आहे नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण. मुले
मनातून समजतात नवीन दुनियेमध्ये देवता, जुन्या दुनियेमध्ये मनुष्य राहतात.
देवतांमध्ये जे गुण आहेत ते मनुष्यांमध्ये नाहीत, म्हणून त्यांना देवता म्हटले जाते.
मनुष्य देवतांना नमन करतात. म्हणतात - ‘तुम्ही सर्वगुण संपन्न… आहात’, मग स्वतःसाठी
म्हणतात - ‘आम्ही नीच, पापी आहोत’. मनुष्यच म्हणतात, देवतांना तर म्हणणार नाहीत.
देवता सतयुगामध्ये होते, कलियुगामध्ये काही असू शकत नाहीत. परंतु आजकाल तर सर्वांना
‘श्री-श्री’ म्हणतात. श्री अर्थात श्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ तर भगवंतच बनवू शकतात.
श्रेष्ठ देवता सतयुगामध्ये होत्या, या वेळी कोणताही मनुष्य श्रेष्ठ नाही आहे. तुम्ही
मुले आता बेहदचा संन्यास करता. तुम्ही जाणता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे, म्हणून
या सर्वांपासून वैराग्य आहे. ते तर आहेत हठयोगी संन्यासी. घरदार सोडून बाहेर पडले
आणि मग येऊन बंगले बांधून बसले आहेत. नाहीतर झोपडीसाठी काही खर्च थोडाच करावा लागतो,
अजिबात नाही. एकांतासाठी झोपडीमध्ये बसायचे असते, बंगल्यांमध्ये नाही. बाबांची
देखील झोपडी बनवलेली आहे. झोपडीमध्ये सर्व सुख आहे. आता तुम्हा मुलांना पुरुषार्थ
करून मनुष्यापासून देवता बनायचे आहे. तुम्ही जाणता ड्रामामध्ये जे काही घडून गेले
आहे त्याची पुन्हा ॲक्युरेटपणे पुनरावृत्ती होईल, म्हणून कोणालाही असा सल्ला द्यायचा
नाही की, भक्ती सोडा. जेव्हा बुद्धीमध्ये ज्ञान समजू लागेल तेव्हा समजतील की, आपण
आत्मा आहोत, आपल्याला आता तर बेहदच्या बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बेहदच्या
बाबांची जेव्हा ओळख होते तेव्हा मग हदच्या गोष्टी संपून जातात. बाबा म्हणतात -
गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त बुद्धीचा योग बाबांशी लावायचा आहे. शरीर
निर्वाहासाठी सर्व कर्म देखील करायचे आहे, जसे भक्तीमध्ये देखील काहीजण खूप नवधा
भक्ती करतात. नियमाने दररोज जाऊन दर्शन करतात. देहधारींकडे जाणे, ती सर्व आहे भौतिक
यात्रा. भक्तीमार्गामध्ये किती खस्ता खाव्या लागतात. इथे कुठलाही त्रास नाही. जेव्हा
कोणी येतात तेव्हा समजावून सांगण्यासाठी बसवले जाते. बाकी आठवणीसाठी काही एका जागी
बसायचे नाही आहे. भक्तिमार्गामध्ये कोणी श्रीकृष्णाचा भक्त असतो तर असे नाही की तो
चालता-फिरता श्रीकृष्णाची आठवण करू शकत नाही; म्हणून जे शिकले-सवरलेले मनुष्य असतात
ते म्हणतात - श्रीकृष्णाची मूर्ती तर घरात ठेवलेली असते मग तुम्ही मंदिरांमध्ये का
जाता. श्रीकृष्णाच्या (चित्राची) मूर्तीची पूजा तुम्ही कुठेही करा. अच्छा, चित्र नका
ठेऊ, आठवण करत रहा. एखादी वस्तू पाहिली की मग ती लक्षात राहते. तुम्हाला देखील हेच
सांगतात, शिवबाबांची तुम्ही घर बसल्या आठवण करू शकत नाही काय? ही तर आहे नवीन गोष्ट.
शिवबाबांना कोणीही जाणत नाहीत. नाव, रूप, देश, काळाला सुद्धा जाणत नाहीत, म्हणतात
सर्वव्यापी आहे. आत्म्याला तर परमात्मा म्हटले जाऊ शकत नाही. आत्म्याला बाबांची
आठवण येते. परंतु बाबांना जाणत नाहीत तर ७ दिवस समजावून सांगावे लागेल. नंतर मग
विस्ताराने देखील पॉईंट्स समजावून सांगितले जातात. बाबा ज्ञानाचा सागर आहेत ना. किती
काळापासून ऐकत आला आहात कारण नॉलेज आहे ना. तुम्ही समजता, आपल्याला मनुष्यापासून
देवता बनण्याचे नॉलेज मिळत आहे. बाबा म्हणतात - तुम्हाला नवीन-नवीन गूढ गोष्टी ऐकवतो
तुम्हाला मुरली मिळत नाही तर तुम्ही किती ओरडता. बाबा म्हणतात - तुम्ही बाबांची तर
आठवण करा. मुरली वाचता आणि मग विसरून जाता. सर्वात आधी तर याची आठवण करायची आहे की,
मी आत्मा आहे, इतका छोटा बिंदू आहे. आत्म्याला देखील जाणून घ्यायचे आहे. म्हणतात
की, ‘यांच्या आत्म्याने जाऊन दुसऱ्या मध्ये प्रवेश केला’. आपण आत्मेच जन्म घेत-घेत
आता पतित, अपवित्र बनलो आहोत. अगोदर तुम्ही पवित्र गृहस्थ धर्मामध्ये होता.
लक्ष्मी-नारायण दोघेही पवित्र होते. मग दोघेही अपवित्र बनले, पुन्हा मग दोघेही
पवित्र बनतात; तर काय अपवित्रचे पवित्र बनले? की पवित्र जन्म घेतला? बाबा बसून
समजावून सांगत आहेत की, तुम्ही कसे पवित्र होता. मग वाममार्गामध्ये गेल्याने
अपवित्र बनला आहात. पुजारीला अपवित्र, पूज्यला पवित्र म्हणणार. संपूर्ण जगाचा
इतिहास-भूगोल तुमच्या बुद्धीमध्ये आहे. कोण-कोण राज्य करत होते? कसे त्यांना राज्य
मिळाले, हे तुम्ही जाणता, इतर असा कोणीही नाही जो जाणत असेल. तुमच्याकडे देखील
पूर्वी हे नॉलेज, रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नव्हते, जणू नास्तिक होता,
जाणत नव्हता. नास्तिक बनल्याने किती दुःखी बनता. आता तुम्ही आला आहात हे देवता
बनण्यासाठी. तिथे किती सुख असेल. दैवी गुण देखील इथेच धारण करायचे आहेत. प्रजापिता
ब्रह्माची संतान भाऊ-बहीणी झालात ना. क्रिमिनल दृष्टी (विकारी दृष्टी) जाता कामा नये,
यामध्येच मेहनत आहे. डोळे अतिशय क्रिमिनल (विकारी) आहेत. सर्व अवयवांमध्ये सर्वात
जास्त विकारी आहेत डोळे. अर्धा कल्प विकारी, अर्धा कल्प निर्विकारी असतात.
सतयुगामध्ये विकारी असत नाहीत. डोळे विकारी असतात तेव्हा असुर म्हटले जाते. बाबा
स्वतः म्हणतात - ‘मी पतित दुनियेमध्ये येतो’. जे पतित बनले आहेत, त्यांनाच पावन
बनायचे आहे. मनुष्य तर म्हणतात - हे स्वतःला भगवान म्हणवून घेतात. कल्पवृक्षाच्या
झाडामध्ये बघा एकदम तमोप्रधान दुनियेच्या शेवटी उभे आहेत, तेच मग तपस्या करत आहेत.
सतयुगापासून लक्ष्मी-नारायणाची डिनायस्टी (घराणे) चालते. संवत देखील या
लक्ष्मी-नारायणापासून मोजले जाईल; म्हणून बाबा म्हणतात - चित्रामध्ये
लक्ष्मी-नारायणाचे राज्य दाखवता तर त्यामध्ये लिहा - ‘यांच्या १२५० वर्षानंतर त्रेता’.
शास्त्रांमध्ये मग लाखो वर्षे लिहिली आहेत. रात्रं-दिवसाचा फरक झाला ना. ब्रह्माची
रात्र अर्धा कल्प, ब्रह्माचा दिवस अर्धा कल्प - या गोष्टी बाबाच समजावून सांगतात.
तरीही पुन्हा म्हणतात - ‘गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा.
त्यांची आठवण करता-करता तुम्ही पावन बनाल, मग अंत मति सो गति होईल. बाबा असे म्हणत
नाहीत की, इथे बसून रहा. सेवाभावी मुलांना तर बसूही देणार नाहीत. सेंटर्स, म्युझियम
इत्यादी उघडत राहतात. कित्येकांना निमंत्रण वाटतात की, येऊन गॉडली बर्थ राईट
विश्वाची बादशाही घ्या. तुम्ही बाबांची संतान आहात. बाबा आहेत स्वर्गाचे रचयिता तर
तुम्हाला देखील स्वर्गाचा वारसा मिळाला पाहिजे. बाबा म्हणतात - मी एकदाच स्वर्गाची
स्थापना करण्यासाठी येतो. एकच दुनिया आहे जिचे चक्र फिरत राहते. लोकांची तर अनेक मते,
अनेक गोष्टी आहेत. मत-मतांतरे किती आहेत, याला म्हटले जाते अद्वैत मत. झाड किती मोठे
आहे. किती शाखा-उपशाखा निघतात. किती धर्मांचा विस्तार होत आहे; पहिले तर एक मत, एक
राज्य होते. साऱ्या विश्वावर यांचे राज्य होते. हे देखील आता तुम्हाला माहित झाले
आहे. आपणच साऱ्या विश्वाचे मालक होतो. मग ८४ जन्म भोगून गरीब बनलो आहोत. आता तुम्ही
काळावर विजय प्राप्त करता, तिथे कधीही अकाली मृत्यू होत नाही. इथे तर बघा
बसल्या-बसल्या मृत्यूमुखी पडतात. चारही बाजूने मृत्यूच मृत्यू आहे. तिथे असे होत
नाही, पूर्ण आयुष्यभर जीवन जगतात. भारतामध्ये प्युरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी (पवित्रता,
शांती, समृद्धी) होती. सरासरी १५० वर्षे आयुष्य असते, आता किती कमी आयुष्य असते.
ईश्वराने तुम्हाला
योग शिकवला तर तुम्हाला योगेश्वर म्हणतात. तिथे थोडेच असे म्हणतील. यावेळी तुम्ही
योगेश्वर आहात, तुम्हाला ईश्वर राजयोग शिकवत आहेत. मग राज-राजेश्वर बनायचे आहे. आता
तुम्ही ज्ञानेश्वर आहात नंतर मग राजेश्वर अर्थात राजांचाही राजा बनाल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) डोळ्यांना
सिव्हिल (शुद्ध) बनविण्याची मेहनत करायची आहे. बुद्धीमध्ये हे कायम लक्षात रहावे
की, आपण प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ-बहिणी आहोत, विकारी दृष्टी ठेवू शकत नाही.
२) उदरनिर्वाहासाठी
कर्म करत असताना बुध्दीचा योग एका बाबांशी लावायचा आहे, हदच्या सर्व गोष्टी सोडून
बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे. बेहदचे संन्यासी बनायचे आहे.
वरदान:-
‘बाबा’,
शब्दाच्या स्मृती द्वारे कारणाला निवारणामध्ये परिवर्तन करणारे सदैव अचल-अडोल भव
कोणतीही परिस्थिती जी
भले गोंधळ उडवणारी असेल परंतु ‘बाबा’ म्हटले आणि अचल बनले. जेव्हा परिस्थितींच्या
चिंतनामध्ये जाता तेव्हा परिस्थिती अवघड वाटू लागते. जर कारणाऐवजी निवारणामध्ये जाल
तर कारणच निवारण बनेल कारण मास्टर सर्वशक्तिमान ब्राह्मणांसमोर तर कोणतीही परिस्थिती
मुंगी एवढी सुद्धा नसते. फक्त ‘काय झाले, का झाले’ हा विचार करण्याऐवजी, जे झाले
त्यातच कल्याण सामावलेले आहे, सेवा सामावलेली आहे… भले रूप परिस्थितीचे असेल परंतु
सामावलेली सेवा आहे - या दृष्टीने पहाल तर सदैव अचल-अडोल रहाल.
बोधवाक्य:-
एका बाबांच्या
प्रभावामध्ये राहणारे कोणत्याही आत्म्याच्या प्रभावामध्ये येऊ शकत नाहीत.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. कर्मातीत स्थितीला प्राप्त करण्याकरिता
कायम साक्षी होऊन कार्य करा. साक्षी अर्थात सदैव अलिप्त आणि सुंदर स्थितीमध्ये
राहून कर्म करणारी अलौकिक आत्मा आहे, अलौकिक अनुभूती करणारी, अलौकिक जीवन, श्रेष्ठ
जीवन असणारी आत्मा आहे - हा नशा रहावा. कर्म करताना हाच अभ्यास वाढवत रहा तर
कर्मातीत स्थितीला प्राप्त कराल.