05-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांच्या श्रीमताद्वारे तुम्ही मनुष्यापासून देवता बनता, गीतेचे ज्ञान आणि राजयोग तुम्हाला संपूर्ण पावन बनवतात”

प्रश्न:-
सतयुगामध्ये प्रत्येक गोष्ट चांगल्यात चांगली सतोप्रधान असते, असे का?

उत्तर:-
कारण तिथे मनुष्य सतोप्रधान असतात, जेव्हा मनुष्य चांगले असतात तर सामुग्री देखील चांगली असते आणि मनुष्य वाईट असतात तेव्हा सामुग्री देखील नुकसानकारक असते. सतोप्रधान सृष्टीमध्ये कोणतीही वस्तू अप्राप्त नसते, काहीही कुठूनही मागवावे लागत नाही.

ओम शांती।
बाबा या शरीराद्वारे समजावून सांगतात. याला जीव म्हटले जाते, याच्यामध्ये आत्मा देखील आहे आणि तुम्ही मुले जाणता परमपिता परमात्मा देखील यांच्यामध्ये (ब्रह्माबाबांच्या तनामध्ये) आहेत. तर सर्वप्रथम हेच पक्के झाले पाहिजे म्हणून यांना दादा देखील म्हणतात. हा तर मुलांना निश्चय आहे. याच निश्चयामध्ये रममाण व्हायचे आहे. बरोबर बाबांनी ज्यांच्यामध्ये पधरामणी केली आहे अथवा अवतार घेतला आहे त्यांच्यासाठी बाबा स्वतः म्हणतात की, मी यांच्या अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये सुद्धा अंतामध्ये येतो. मुलांना समजावून सांगितले गेले आहे हे ‘सर्वशास्त्रशिरोमणी गीते’चे ज्ञान आहे. श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहे उच्च ते उच्च भगवंताचे. ज्यांच्या श्रीमताद्वारे तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. तुम्ही भ्रष्ट मनुष्यापासून श्रेष्ठ देवता बनता. तुम्ही येताच यासाठी. बाबा स्वतः देखील म्हणतात - मी येतो तुम्हाला श्रेष्ठाचारी, निर्विकारी मत असणारे देवी-देवता बनविण्याकरिता. मनुष्यापासून देवता बनण्याचा अर्थ देखील समजून घ्यायचा आहे. विकारी मनुष्यापासून निर्विकारी देवता बनविण्यासाठी येतात. सतयुगामध्ये मनुष्य राहतात परंतु दैवी गुणवाले. आता कलियुगामध्ये आहेत आसुरी गुणवाले. आहे सारी मनुष्य सृष्टीच, परंतु ते आहेत ईश्वरीय-बुद्धी, हे आहेत आसुरी-बुद्धी. तिथे ज्ञान, इथे भक्ती. ज्ञान आणि भक्ती वेगवेगळे आहेत ना. भक्तीची पुस्तके किती आणि ज्ञानाची पुस्तके किती आहेत. ज्ञान-सागर बाबा आहेत. त्यांचे पुस्तक देखील एकच तर असले पाहिजे. जे पण धर्म स्थापन करतात, त्यांचे एकच पुस्तक असले पाहिजे. त्याला धार्मिक बुक म्हटले जाते. पहिले धार्मिक बुक आहे - गीता. श्रीमद् भगवत गीता. हे देखील मुले जाणतात - पहिला आहेच आदि सनातन देवी-देवता धर्म, हिंदू धर्म नाही. मनुष्य समजतात गीतेद्वारे हिंदू धर्म स्थापन झाला आणि गीता गायली आहे श्रीकृष्णाने. कोणाला विचारले तर म्हणतील परंपरेने ही श्रीकृष्णाने गायली आहे. कोणत्याही शास्त्रामध्ये ‘शिव भगवानुवाच’ नाहीये. श्रीमद् श्रीकृष्ण भगवानुवाच लिहिले आहे, ज्यांनी गीता वाचली असेल त्यांना सहजच लक्षात येईल. आता तुम्ही समजता याच गीता ज्ञानाद्वारे मनुष्यापासून देवता बनले आहेत, जे ज्ञान बाबा आता तुम्हाला देत आहेत. राजयोग शिकवत आहेत. पवित्रता देखील शिकवत आहेत. काम विकार महाशत्रू आहे, याच्यामुळेच तुम्ही हार खाल्ली आहे. आता पुन्हा त्यावर विजय प्राप्त करण्यासाठी तुम्ही जगतजीत अर्थात विश्वाचा मालक बनता. हे तर खूप सोपे आहे. बेहदचे बाबा बसून यांच्याद्वारे तुम्हाला शिकवत आहेत. ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता. आणि हे (ब्रह्मा बाबा) आहेत मनुष्यांचे बेहदचे पिता. नावच आहे प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही कोणालाही विचारले ब्रह्माच्या पित्याचे नाव सांगा, तर गोंधळून जातील. ब्रह्मा-विष्णू-शंकर आहेत क्रिएशन (रचना). या तिघांचा कोणी तरी पिता तर असेल ना. तुम्ही दाखवता या तिघांचे पिता आहेत निराकार शिव. ब्रह्मा-विष्णू-शंकराला सूक्ष्मवतनचे देवता असल्याचे दाखवतात. त्यांच्यावर आहेत शिव. मुले जाणतात - शिवबाबांची मुले जे पण आत्मे आहेत त्यांना आपले शरीर तर असेल. ते तर सदैव निराकार परमपिता परमात्मा आहेत. मुलांना माहित झाले आहे निराकार परमपिता परमात्म्याची आपण मुले आहोत. आत्मा शरीराद्वारे बोलते - ‘परमपिता परमात्मा’. किती सोप्या गोष्टी आहेत. याला म्हटले जाते अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही). शिकवतात कोण? गीतेचे ज्ञान कोणी ऐकवले? निराकार बाबांनी. त्यांच्यावर कोणता मुकुट इत्यादी नाहीये. ते ज्ञानाचा सागर, बीजरूप, चैतन्य आहेत. तुम्ही देखील चैतन्य आत्मे आहात ना! सर्व झाडाच्या आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणता. भले तुम्ही माळी नाही आहात परंतु समजू शकता की, कसे बीज पेरले जाते आणि त्यातून झाड रुजून येते. ते तर आहे जड झाड, हे आहे चैतन्य. तुमच्या आत्म्यामध्ये ज्ञान आहे, आणखी कोणाच्याही आत्म्याला हे ज्ञान नाहीये. बाबा चैतन्य मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. तर झाड देखील मनुष्यांचेच असणार. ही आहे चैतन्य रचना. बीज आणि रचनेमध्ये फरक तर आहे ना! आंब्याचे बीज लावल्याने आंब्याचे झाड येते, आणि मग झाड किती मोठे होते. त्याचप्रमाणे मनुष्याच्या बीजापासून मनुष्य किती फलदायी बनतात (जन्माला येतात). जड बीजामध्ये कोणतेही ज्ञान नाहीये. हे तर चैतन्य बीजरूप आहेत. त्यांच्यामध्ये साऱ्या सृष्टी रुपी झाडाचे ज्ञान आहे की कशी उत्पत्ती, पालना आणि नंतर विनाश होतो. हे प्रचंड मोठे झाड नष्ट होऊन मग पुन्हा दुसरे झाड कसे उभे राहते! हे सर्व गुप्त आहे. तुम्हाला ज्ञान देखील गुप्तपणे मिळते. बाबा देखील गुप्तपणे आले आहेत. तुम्ही जाणता हे कलम लागत आहे. आता तर सर्व पतित बनले आहेत. उत्तम बीजामधून सर्वात पहिल्या नंबरचे जे पान निघते ते कोण होते? सतयुगाचे पहिले पान तर श्रीकृष्णालाच म्हणणार ना, लक्ष्मी-नारायणाला नाही. नवीन पान लहान असते, नंतर मोठे होते. तर या बीजाची किती महिमा आहे. हे तर चैतन्य आहेत ना. आणि मग पाने देखील निघतात. त्यांची महिमा तर होतेच. आता तुम्ही देवी-देवता बनत आहात. दैवी गुण धारण करत आहात. मूळ गोष्टच ही आहे की आपल्याला दैवी गुण धारण करायचे आहेत, यांच्यासारखे बनायचे आहे. चित्र देखील आहे. ही चित्रे जर नसती तर बुद्धीमध्ये ज्ञानच आले नसते. ही चित्रे खूप उपयोगाला येतात. भक्तिमार्गामध्ये या चित्रांची देखील पूजा होते आणि ज्ञानमार्गामध्ये या चित्रांद्वारे तुम्हाला ज्ञान मिळते की असे बनायचे आहे. भक्तिमार्गामध्ये असे समजत नाहीत की, आपल्याला असे बनायचे आहे. भक्तिमार्गामध्ये किती मंदिरे बनवतात. सर्वात जास्त मंदिरे कोणाची असतील? जरूर शिवबाबांचीच असतील जे बीजरूप आहेत. मग त्यांच्या नंतर पहिल्या रचनेची मंदिरे असतील. पहिली रचना हे लक्ष्मी-नारायण आहेत. शिवबाबांच्या नंतर त्यांची पूजा सर्वात जास्त होते. माता तर ज्ञान देतात, त्यांची पूजा होत नाही. त्या तर शिकवतात ना. बाबा तुम्हाला शिकवतात. तुम्ही कोणाची पूजा करत नाही. शिकविणाऱ्याची आता पूजा करू शकत नाही. तुम्ही शिकून जेव्हा परत अशिक्षित बनाल तेव्हा मग पूजा होईल. तुम्ही सो देवी-देवता बनत आहात. तुम्हीच जाणता जे आपल्याला असे बनवतात त्यांची पूजा होईल आणि मग आपली पूजा नंबरवार होईल. मग घसरत-घसरत पाच तत्वांची देखील पूजा करू लागतात. शरीर पाच तत्वांचे आहे ना. पाच तत्वांची पूजा करा अथवा शरीराची करा, एकच होते. हे तर ज्ञान बुद्धीमध्ये आहे. हे लक्ष्मी-नारायण साऱ्या विश्वाचे मालक होते. या देवी-देवतांचे राज्य नवीन सृष्टीवर होते. परंतु केव्हा होते? हे जाणत नाहीत, लाखो वर्षे म्हणतात. आता लाखो वर्षांची गोष्ट तर कधी कोणाच्या बुद्धीमध्ये राहू शकणार नाही. आता तुम्हाला आठवते आहे की, आपण आजपासून ५००० वर्षांपूर्वी आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो. देवी-देवता धर्माचे मग इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत. हिंदू धर्म म्हणू शकत नाही. परंतु पतित असल्याकारणाने स्वतःला देवी-देवता म्हणणे शोभतही नाही. अपवित्र असणाऱ्याला देवी-देवता म्हणू शकत नाही. मनुष्य पवित्र देवींची पूजा करतात तर जरूर स्वतः अपवित्र आहेत म्हणून पवित्र असणाऱ्यांसमोर नतमस्तक व्हावे लागते. भारतामध्ये खास कन्यांना नमन करतात. कुमारांना कधी नमन करत नाहीत. फीमेलना (स्त्रियांना) नमन करतात. मेलना (पुरुषांना) नमन का करत नाहीत? कारण यावेळी ज्ञान देखील पहिले मातांना मिळते. बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतात. हे देखील समजता बरोबर ही ज्ञानाची मोठी नदी आहे. ज्ञान नदी देखील आहे आणि पुरुष देखील आहेत. ही आहे सर्वात मोठी नदी. ब्रह्मपुत्रा नदी आहे सर्वात मोठी नदी, जी कलकत्त्याकडे सागराला जाऊन मिळते. मेळा देखील तिथेच भरतो. परंतु त्यांना हे ठाऊक नाही आहे की हा आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा आहे. ती तर आहे पाण्याची नदी, जिचे नाव ब्रह्मपुत्रा ठेवले आहे. त्यांनी मग ब्रह्म ईश्वराला म्हटलेले आहे म्हणून ब्रह्मपुत्राला खूप पावन समजतात. मोठी नदी आहे तर पवित्र देखील असेल. वास्तविक पतित-पावन गंगेला नाही, ब्रह्मपुत्रेला म्हटले पाहिजे. मेळा देखील यांचा लागतो. हा देखील सागर आणि ब्रह्मा नदीचा मेळा आहे. ब्रह्मा द्वारे ॲडॉप्शन कसे होते - या गूढ गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत, ज्या प्रायः लोप होतात. ही तर अगदी सोपी गोष्ट आहे ना.

भगवानुवाच, मी तुम्हाला राजयोग शिकवतो, मग ही दुनियाच नष्ट होईल. शास्त्र इत्यादी काहीच राहणार नाही. पुन्हा भक्तीमार्गामध्ये ही शास्त्रे अस्तित्वात येतील. ज्ञान मार्गामध्ये शास्त्रे नसतात. मनुष्य समजतात ही शास्त्रे परंपरेने चालत येतात. ज्ञान तर काहीच नाहीये. कल्पाचा कालावधीच लाखो वर्षे सांगितला आहे, म्हणून परंपरा म्हणतात. याला म्हटले जाते - अज्ञान अंधार. आता तुम्हा मुलांना हे बेहदचे शिक्षण मिळत आहे, ज्यामुळे तुम्ही आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगू शकता. तुम्हाला या देवी-देवतांच्या इतिहास-भूगोला विषयी पूर्ण माहिती आहे. हे पवित्र प्रवृत्ती मार्गवाले पूज्य होते. आता पुजारी पतित बनले आहेत. सतयुगामध्ये आहे पवित्र प्रवृत्ती मार्ग, इथे कलियुगामध्ये आहे अपवित्र प्रवृत्ती मार्ग. त्यानंतर मग निवृत्ती मार्ग असतो. हे देखील ड्रामामध्ये आहे. त्याला संन्यास धर्म म्हटले जाते. घरादाराचा संन्यास करून जंगलामध्ये निघून जातात. तो आहे हदचा संन्यास. राहतात तर या जुन्या दुनियेमध्येच ना. आता तुम्ही समजता आपण संगमयुगावर आहोत आणि नंतर नवीन दुनियेमध्ये जाणार. तुम्हाला तिथी, तारीख, सेकंदासहित सर्व काही माहिती आहे. ते लोक तर कल्पाची आयुच लाखो वर्षे म्हणतात, याचा (५ हजार वर्षांचा) पूर्ण हिशोब काढू शकता. लाखो वर्षांच्या गोष्टी तर कोणाला आठवणार देखील नाहीत. आता तुम्ही समजता बाबा कोण आहेत, कसे येतात, कोणते कार्य करतात? तुम्ही सर्वांच्या ऑक्युपेशनला, जन्म-पत्रिकेला जाणता. बाकी झाडाची पाने तर असंख्य आहेत. त्याची मोजदाद थोडीच करू शकतो. या बेहद सृष्टी रुपी झाडाची किती पाने आहेत? ५००० वर्षांमध्ये इतके करोड आहेत. तर लाखो वर्षांमध्ये किती अगणित मनुष्य होतील. भक्तिमार्गामध्ये दाखवतात - लिहिलेले आहे सतयुग इतक्या वर्षांचे आहे, त्रेता इतक्या वर्षांचे, द्वापर इतक्या वर्षांचे आहे. तर बाबा बसून तुम्हा मुलांना हे सर्व रहस्य समजावून सांगतात. आंब्याच्या बीजाला पाहिल्याने आंब्याचे झाड समोर येईल ना! आता मनुष्य सृष्टीचे बीजरूप तुमच्या समोर आहे. तुम्हाला बसून झाडाचे रहस्य समजावून सांगतात कारण चैतन्य आहेत. म्हणतात - आपले हे उलटे झाड आहे. तुम्ही समजावून सांगू शकता जे पण या दुनियेमध्ये आहे, जड अथवा चैतन्य, हुबेहूब रिपीट करतील. आता किती वृद्धी होत आहे. सतयुगामध्ये इतके असू शकत नाहीत. असे म्हणतात की, अमकी वस्तू ऑस्ट्रेलियामधून आली, जपानमधून आली. सतयुगामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, इत्यादी देश थोडेच होते. ड्रामा अनुसार तिथल्या वस्तू इथे येतात. आधी अमेरिकेवरून गहू वगैरे येत होते. सतयुगामध्ये असे कुठून येतील थोडेच. तिथे तर आहेच एक धर्म, सर्व गोष्टी मुबलक असतात. इथे धर्मांची वृद्धी होत राहते, तर त्यासोबत सर्व वस्तूंची कमतरता होत जाते. सतयुगामध्ये कुठून मागवत नाहीत. आता तर बघा कुठून-कुठून मागवत असतात! मनुष्यांची नंतर वृद्धी होत गेली, सतयुग मध्ये कोणतीही वस्तू अप्राप्त नसते. तिथली प्रत्येक गोष्ट सतोप्रधान अतिशय उत्तम असते. मनुष्यच सतोप्रधान आहेत. मनुष्य चांगले आहेत त्यामुळे सामुग्री देखील चांगली असते. मनुष्य वाईट असतात तेव्हा सामुग्री देखील नुकसानकारक असते.

विज्ञानाची मुख्य गोष्ट आहे अणूबॉम्ब्स, ज्यामुळे इतका मोठा विनाश होतो. कसे बनवत असतील! बनवणाऱ्या आत्म्यामध्ये आधीपासूनच ड्रामा अनुसार ज्ञान असेल. जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्यामध्ये ते ज्ञान जागृत होते, ज्यांच्यामध्ये सेन्स (ज्ञान) असेल तेच काम करतील आणि दुसऱ्यांना शिकवतील. कल्प-कल्प जो पार्ट बजावला आहे तोच बजावला जात राहतो. आता तुम्ही किती नॉलेजफूल बनता, यापेक्षा जास्त नॉलेज असत नाही. तुम्ही या नॉलेजद्वारे देवता बनता. यापेक्षा श्रेष्ठ नॉलेज कोणतेच नाहीये. ते आहे मायेचे नॉलेज, ज्यामुळे विनाश होतो. ते लोक (वैज्ञानिक) चंद्रावर जातात, शोध घेतात. तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये. हा सर्व मायेचा पॉम्प (भपका) आहे. खूप दिखावा करतात, अति खोलात जातात. बुद्धीला खूप आव्हान देतात. काही कमाल (अद्भुत) करून दाखवावे. खूप चमत्कार केल्यामुळे मग नुकसान होते. काय-काय बनवत राहतात. बनवणारे जाणतात याच्याद्वारे विनाश होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) गुप्त ज्ञानाचे मनन करून हर्षित रहायचे आहे. देवतांच्या चित्रांना समोर पाहून, त्यांना नमन वंदन करण्याऐवजी त्यांच्यासारखे बनण्यासाठी दैवी गुण धारण करायचे आहेत.

२) सृष्टीचे बीजरूप बाबा आणि त्यांची चैतन्य रचना यांना समजून घेऊन नॉलेजफुल बनायचे आहे, या नॉलेजपेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही नॉलेज असू शकत नाही, याच नशेमध्ये राहायचे आहे.

वरदान:-
“एक बाबा दुसरा न कोई” या पाठाच्या स्मृतीद्वारे एकरस स्थिती बनविणारी श्रेष्ठ आत्मा भव

“एक बाबा दुसरा न कोई” हा पाठ निरंतर लक्षात राहिला तर स्थिती एकरस बनेल; कारण नॉलेज तर सर्व मिळाले आहे, अनेक पॉईंट्स आहेत, परंतु पॉईंट्स असताना पॉईंट रूपामध्ये रहाल - ही आहे त्यावेळची कमाल ज्यावेळी कोणी खाली खेचत असेल. कधी कोणती गोष्ट खाली खेचेल, कधी कोणती व्यक्ती, कधी कोणती वस्तू, कधी वायुमंडळ… हे तर होणारच. परंतु सेकेंदामध्ये हा सर्व विस्तार समाप्त होऊन एकरस स्थिती रहावी - तेव्हा म्हणणार ‘श्रेष्ठ आत्मा भव’चे वरदानी

बोधवाक्य:-
नॉलेजची शक्ती धारण करा तर विघ्न वार करण्याऐवजी हार खातील.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.

आता तुम्ही सर्वजण असे मुक्त बनून मुक्तिदाता बना ज्यामुळे सर्व आत्मे, प्रकृती, भक्त मुक्त होतील. आता ब्रह्मा बाबा याच एका गोष्टीमध्ये डेट कॉन्शस आहेत की, माझा प्रत्येक मुलगा केव्हा जीवन-मुक्त बनेल? असे समजू नका की अंताला जीवनमुक्त बनू, नाही. दीर्घकाळापासूनचा जीवनमुक्त स्थितीचा अभ्यास, दीर्घकाळ जीवनमुक्त राज्य भाग्याचा अधिकारी बनवेल.