05-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला आता नावा-रूपाच्या रोगापासून वाचायचे आहे, उलटे खाते बनवायचे नाही, एका बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे”

प्रश्न:-
भाग्यवान मुले कोणत्या मुख्य पुरुषार्थाने स्वतःचे भाग्य बनवतात?

उत्तर:-
भाग्यवान मुले सर्वांना सुख देण्याचा पुरुषार्थ करतात. मनसा-वाचा-कर्मणा कोणालाही दुःख देत नाहीत. शीतल होऊन चालतात तर भाग्य बनते. तुमचे हे स्टुडंट लाइफ आहे, तुम्हाला आता दुःख सहन करावे लागणार नाही, अपार आनंदामध्ये रहायचे आहे.

गीत:-
तुम्हीं हो माता-पिता…

ओम शांती।
सर्व मुले मुरली ऐकतात, जिथेपण मुरली जाते, सर्वजण जाणतात की ज्याची महिमा गायली जाते ते काही साकार नाही आहेत, निराकाराची महिमा आहे. निराकार साकारद्वारे आता सन्मुख मुरली ऐकवत आहेत. आपण असेही म्हणू की, आता आपण आत्मे त्यांना बघत आहोत! आत्मा अति सूक्ष्म आहे, या डोळ्यांनी पाहता येत नाही. भक्तीमार्गामध्ये देखील जाणतात की आपण आत्मे सूक्ष्म आहोत. परंतु पूर्ण रहस्य बुद्धीमध्ये नाहीये की आत्मा काय आहे, परमात्म्याची आठवण करतात परंतु ते कोण आहेत! हे दुनिया जाणत नाही. तुम्ही देखील जाणत नव्हता. आता तुम्हा मुलांना हा निश्चय आहे की हे कोणी लौकिक टीचर किंवा नातलग सुद्धा नाहीत. जसे सृष्टीमध्ये इतर सामान्य मनुष्य आहेत तसे हे दादा (ब्रह्मा बाबा) देखील होते. तुम्ही जेव्हा महिमा गात होतात - ‘त्वमेव माताश्च पिता…’ तर असे समजत होता की वर आहेत. आता बाबा म्हणतात - ‘मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे, मी तोच याच्यामध्ये आहे’. पूर्वी तर खूप प्रेमाने महिमा गात होते, भय देखील वाटत असे. आता तर ते इथे या शरीरामध्ये आले आहेत. जे निराकार होते ते आता साकारमध्ये आले आहेत. ते बसून मुलांना शिकवत आहेत. दुनिया जाणत नाही की ते काय शिकवत आहेत. ते तर गीतेचा भगवान श्रीकृष्णाला समजतात. म्हणतात - ते राजयोग शिकवतात. अच्छा, तर मग बाबा काय करतात? भले गात होता - ‘तुम मात-पिता’ परंतु त्यांच्याकडून काय आणि कधी मिळते, हे काहीच जाणत नाहीत. गीता ऐकत होते तर असे समजत होते श्रीकृष्णाद्वारे राजयोग शिकलो होतो तर मग ते कधी येऊन शिकवणार. ते सुद्धा लक्षात येत असेल. यावेळी ही तीच महाभारत लढाई आहे तर ज़रूर श्रीकृष्णाचा काळ असेल. जरूर तोच इतिहास-भूगोल रिपीट झाला पाहिजे. दिन-प्रतिदिन समजत जातील. जरूर गीतेचा भगवान असला पाहिजे. खरोखर महाभारत लढाई दिसून येत आहे. जरूर या दुनियेचा अंत होणार. असे दाखवतात पांडव पर्वतावर निघून गेले. तर त्यांच्या बुद्धीमध्ये हे येत असेल, खरोखर विनाश तर समोर उभा आहे. आता श्रीकृष्ण आहे कुठे? जोपर्यंत तुमच्याकडून ऐकत नाहीत की गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही, शिव आहेत तोपर्यंत शोधत राहतील. तुमच्या बुद्धीमध्ये तर ही गोष्ट पक्की आहे. हे तुम्ही कधीही विसरू शकत नाही. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता की, गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही, शिव आहेत. दुनियेमध्ये तर असे तुम्हा मुलांशिवाय इतर कोणीही म्हणणार नाहीत. आता गीतेचे भगवान राजयोग शिकवत होते तर यावरून सिद्ध होते की नरापासून नारायण बनवत होते. या लक्ष्मी-नारायणाचे स्वर्गामध्ये राज्य होते ना. आता तर तो स्वर्ग सुद्धा नाही आहे, तर नारायण सुद्धा नाही आहे, देवता देखील नाहीत. चित्र आहेत ज्यामुळे समजतात की हे होऊन गेले होते. आता तुम्ही समजता यांना किती वर्षे झाली? तुम्हाला निश्चित माहिती आहे, आज पासून ५००० वर्षांपूर्वी यांचे राज्य होते. आता तर आहे अंत. युद्ध देखील समोर उभे आहे. तुम्ही जाणता बाबा आम्हाला शिकवत आहेत. सर्व सेंटर्सवर शिकतात देखील आणि शिकवतात देखील. शिकवण्याची युक्ती खूप चांगली आहे. चित्रांवरून खूप चांगले स्पष्टीकरण मिळू शकेल. मुख्य गोष्ट आहे गीतेचे भगवान शिव की श्रीकृष्ण? फरक तर खूप आहे ना. सद्गतीदाता स्वर्गाची स्थापना करणारे अथवा पुन्हा आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करणारा शिव का श्रीकृष्ण? मुख्य आहेच या तीन गोष्टींवरचा निर्णय. यावरच बाबा जोर देतात. भले अभिप्राय लिहून देतात की, हे खूप चांगले आहे परंतु याने काहीच फायदा नाही. तुमची जी मुख्य गोष्ट आहे त्यावर जोर द्यायचा आहे. तुमचा विजय देखील त्यातच आहे. तुम्ही सिद्ध करून सांगता भगवान एकच असतो. असे नाही की गीता ऐकवणारे सुद्धा भगवान झाले. भगवंताने या राजयोग आणि ज्ञानाद्वारे देवी-देवता धर्माची स्थापना केली.

बाबा समजावून सांगतात - मुलांवर मायेचा वार होत राहतो, अजून पर्यंत कर्मातीत अवस्थेला कोणी प्राप्त केलेले नाही. पुरुषार्थ करत-करत अंतामध्ये तुम्ही एका बाबांच्या आठवणीमध्ये सदैव हर्षित रहाल. कोणतीही निराशा येणार नाही. आता तर डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे. ते आठवणीनेच उतरेल. बाबांनी पुरुषार्थाच्या खूप युक्त्या सांगितल्या आहेत. आठवणीद्वारेच पापे नष्ट होतील. असे बरेच बुद्धू आहेत जे आठवणीमध्ये न राहिल्या कारणाने मग नाव-रूप इत्यादीमध्ये अडकून पडतात. हर्षितमुख होऊन कोणाला ज्ञान समजावून सांगतील, हे देखील अवघड आहे. आज कोणाला समजावून सांगतील आणि उद्या मग घुसमट झाली की आनंद नाहीसा होतो. समजले पाहिजे हा मायेचा वार होत आहे त्यामुळे पुरुषार्थ करून बाबांची आठवण करायची आहे. बाकी रडायचे, ओरडायचे किंवा व्यथित व्हायचे नाही. समजले पाहिजे माया जोडे मारते म्हणून पुरुषार्थ करून बाबांची आठवण करायची आहे. बाबांच्या आठवणीने खूप आनंद होईल. मुखातून लगेच वाणी निघेल. पतित-पावन बाबा म्हणतात - माझी आठवण करा. असा तर एकही मनुष्य नाही ज्याला रचता बाबांचा परिचय असेल. मनुष्य आहे आणि बाबांना जाणत नाही तर पशू पेक्षाही वाईट झाला. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातले आहे तर मग बाबांची आठवण कशी करणार! हीच मोठी चूक आहे, जी तुम्हाला समजावून सांगायची आहे. गीतेचे भगवान शिवबाबा आहेत, तेच वारसा देतात. मुक्ती-जीवनमुक्ती दाता ते आहेत, इतर धर्मवाल्यांच्या बुद्धीला पटत नाही. ते तर हिशोब चुकता करून परत निघून जातील. शेवटी थोडासा परिचय मिळाला तरीही आपल्या धर्मामध्ये जातील. तुम्हाला बाबा समजावून सांगतात तुम्ही देवता होता, आता पुन्हा बाबांची आठवण केल्याने तुम्ही देवता बनाल. विकर्म विनाश होतील. तरीसुद्धा उलटे-सुलटे धंदे करतात. बाबांना लिहितात - आज माझी अवस्था निराशाजनक आहे, बाबांची आठवण केली नाही. आठवण केली नाहीत तर जरूर निराश होणारच. ही आहेच मुडद्यांची दुनिया. सगळे मरून पडले आहेत. तुम्ही बाबांचे बनले आहात तर बाबांचा आदेश आहे - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. हे शरीर तर जुने तमोप्रधान आहे. शेवटपर्यंत काही ना काही होत राहील. जोपर्यंत बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करत नाही, तोपर्यंत माया हलवत राहील, कोणालाही सोडणार नाही. तपासत राहिले पाहिजे की माया कसे हैराण करते. आम्हाला भगवान शिकवत आहेत, हे आपण का विसरावे? आत्मा म्हणते - आमचे प्राणाहूनही प्रिय ते बाबाच आहेत. मग अशा बाबांना तुम्ही का विसरता! बाबा धन देतात, दान करण्यासाठी. प्रदर्शनी-मेळ्यामध्ये तुम्ही खूपजणांना दान करू शकता. आपणहून आवडीने धाव घेतली पाहिजे. आता तर बाबांना प्रोत्साहित करावे लागते की, जाऊन समजावून सांगा. त्यांच्यामध्ये सुद्धा ज्ञानाची चांगली माहिती असणारा पाहिजे. देह-अभिमानी असणाऱ्याचा तीर लागणार नाही. तलवारी देखील अनेक प्रकारच्या असतात ना. तुमची देखील योगाची तलवार खूप धारदार पाहिजे. सेवेचा उल्हास पाहिजे. जाऊन अनेकांचे कल्याण करावे. बाबांची आठवण करण्याची अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे जेणेकरून शेवटी बाबांशिवाय आणखी कोणाचीही आठवण येऊ नये, तेव्हाच तुम्ही राजाई पद प्राप्त कराल. अंतकाळामध्ये जे अल्फची (बाबांची) आठवण करतील आणि मग नारायणाची आठवण करतील. बाबा आणि नारायण (वारसा) याचीच आठवण करायची आहे. परंतु माया काही कमी नाहीये. कच्चे तर एकदम भारी होतात. उलट्या कर्मांचे खाते तेव्हा बनते जेव्हा कोणाच्या नावा-रूपामध्ये अडकून पडतात. एकमेकांना प्रायव्हेट चिठ्ठ्या लिहितात. देहधारींवर प्रेम जडते तेव्हा मग उलट्या कर्मांचे खाते बनते. बाबांकडे समाचार येतात. उलटे-सुलटे काम करून मग म्हणतात - बाबा, होऊन गेले! अरे, खाते तर उलटे झाले ना! हे शरीर तर पतित आहे, त्याची तुम्ही का आठवण करता. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर नेहमी आनंदी रहाल. आज आनंदात आहेत, उद्या मग परत मरून पडतात. जन्म-जन्मांतर नावा-रूपामध्ये अडकत येतात ना. स्वर्गामध्ये हा नावा-रूपाचा रोग असत नाही. तिथे तर मोहजीत कुटुंब असते. जाणतात आपण आत्मे आहोत, शरीर नाही. ती आहेच आत्म-अभिमानी दुनिया. ही आहे देह-अभिमानी दुनिया. मग अर्धे कल्प तुम्ही देही-अभिमानी बनता. आता बाबा म्हणतात - देह-अभिमान सोडा. देही-अभिमानी झाल्यामुळे खूप गोड, शीतल बनाल. असे फार थोडे आहेत, पुरुषार्थ करवून घेत राहतात की, बाबांची आठवण विसरू नका. बाबा आदेश देतात - ‘माझी आठवण करा, चार्ट ठेवा’. परंतु माया चार्ट सुद्धा ठेवू देत नाही. अशा गोड बाबांची तर किती आठवण केली पाहिजे. हे तर पतींचेही पती, पित्यांचाही पिता आहेत ना. बाबांची आठवण करून इतरांना देखील आप समान बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, यामध्ये खूप चांगली रुची ठेवली पाहिजे. सेवाभावी मुलांची तर बाबा नोकरी पासून सुटका करतात. परिस्थिती पाहून म्हणतील आता या धंद्याला लाग. एम ऑब्जेक्ट तर समोर उभे आहे. भक्तिमार्गामध्ये देखील चित्रांच्या समोर आठवणीमध्ये बसतात ना. तुम्हाला तर फक्त आत्मा समजून परमात्मा बाबांची आठवण करायची आहे. विचित्र बनून विचित्र बाबांची आठवण करायची आहे. ही मेहनत आहे. विश्वाचा मालक बनणे, काही मावशीचे घर नाहीये. बाबा म्हणतात - मी विश्वाचा मालक बनत नाही, तुम्हाला बनवतो. किती डोकेफोड करावी लागते. सपूत मुलांना तर आपणहून चिंता लागून राहिल की, सुट्टी घेऊनसुद्धा सेवेला लागले पाहिजे. बऱ्याच मुलांना बंधने देखील आहेत, आणि मोहसुद्धा असतो. बाबा म्हणतात - तुमचे सर्व रोग बाहेर पडतील. तुम्ही बाबांची आठवण करत रहा. माया तुम्हाला हटवण्याचा प्रयत्न करेल. आठवणच मुख्य आहे, रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान मिळाले, बाकी आणखी काय पाहिजे! भाग्यवान मुले सर्वांना सुख देण्याचा पुरुषार्थ करतात, मनसा, वाचा, कर्मणा कोणाला दुःख देत नाहीत, शितल बनून चालतात तर भाग्य बनत जाते. जर कोणी समजत नसेल तर असे समजले जाते यांच्या भाग्यातच नाहीये. ज्यांच्या भाग्यामध्ये आहे ते चांगल्या रीतीने ऐकतात. अनुभव देखील ऐकवतात ना - काय-काय करत होतो. आता माहित झाले आहे, जे काही केले त्यामुळे दुर्गतीच झाली. सद्गती तेव्हा प्राप्त होईल जेव्हा बाबांची आठवण करणार. खूप मुश्किलीने कोणी १ तास, १/२ तास आठवण करत असतील. नाहीतर मग घुसमटत राहतात. बाबा म्हणतात - अर्धा कल्प गुदमरले आहात आता बाबा मिळाले आहेत, स्टूडंट लाईफ (विद्यार्थी जीवन) आहे तर आनंद झाला पाहिजे ना. परंतु बाबांना वारंवार विसरून जातात.

बाबा म्हणतात - तुम्ही कर्मयोगी आहात. तो काम-धंदा इत्यादी तर करायचाच आहे. झोप सुद्धा कमी घेणे चांगले आहे. आठवणीने कमाई होईल, खुशी देखील राहील. आठवणीमध्ये बसणे जरुरी आहे. दिवसा फुरसत मिळत नाही म्हणून रात्रीचा वेळ काढला पाहिजे. आठवणीमुळे खूप आनंद होईल. कोणाला बंधन असेल तर म्हणू शकतात की, आम्हाला तर बाबांकडून वारसा घ्यायचा आहे, यामध्ये आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. फक्त गव्हर्मेंटला जाऊन समजावून सांगा की, विनाश समोर उभा आहे, बाबा म्हणतात माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. आणि हा अंतिम जन्म तर पवित्र रहायचे आहे म्हणून आम्ही पवित्र बनतो. परंतु हे तेच म्हणू शकतात ज्यांना ज्ञानाची मस्ती (नशा) असेल. असे नाही की इथे येऊन मग देह-धारीची आठवण करत राहील. देह-अभिमानामध्ये येऊन भांडण-तंटे करणे जणूकाही क्रोधाचे भूत बनतात. बाबा क्रोध करणाऱ्यांकडे कधी बघतही नाहीत. सेवा करणाऱ्यांवर प्रेम असते. देह-अभिमानाचे वर्तन दिसून येते. गुल-गुल तेव्हा बनाल जेव्हा बाबांची आठवण कराल. मूळ गोष्टच ही आहे. एकमेकांना बघत असूनही बाबांची आठवण करायची आहे. सेवेमध्ये तर हड्डी-हड्डी दिली पाहिजे. ब्राह्मणांना आपसामध्ये क्षीर-खंड झाले पाहिजे. खारट पाणी व्हायचे नाही. समज नसल्यामुळे एकमेकांविषयी तिरस्कार, बाबांचा देखील तिरस्कार करत राहतात. असे काय पद प्राप्त करतील! तुम्हाला साक्षात्कार होतील मग त्यावेळी आठवेल की, ही आपण चूक केली. बाबा मग म्हणतात भाग्यामध्येच नाहीये तर काय करू शकतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) निर्बंधन होण्याकरिता ज्ञानाची मस्ती असावी. देह-अभिमानाचे वर्तन असू नये. आपसामध्ये खारट पाणी होण्याचे संस्कार नसावेत. देहधारींवर प्रेम असेल तर बंधनमुक्त होऊ शकत नाही.

२) कर्मयोगी बनून रहायचे आहे, आठवणीमध्ये बसणे जरूरी आहे. आत्म-अभिमानी बनवून खूप गोड आणि शितल बनवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. सेवेमध्ये हड्डी-हड्डी द्यायची आहे.

वरदान:-
श्रीमताने मनमताच्या आणि जनमताच्या भेसळीला समाप्त करणारे सच्चे स्व-कल्याणी भव

बाबांनी मुलांना सर्व खजिने स्व-कल्याण आणि विश्व कल्याणासाठी दिले आहेत परंतु त्याला व्यर्थ जागी वापरणे, अकल्याणाच्या कार्यामध्ये लावणे, श्रीमतामध्ये मनमत आणि जनमताची भेसळ करणे - हे अमानत मे खयानत (विश्वासघात) आहे. आता या विश्वासघाताला आणि भेसळीला नाहीसे करून रूहानियतला आणि दयाळूपणाला धारण करा. स्वतःवर आणि सर्वांवर दया करून स्व-कल्याणी बना. स्वतःला बघा, बाबांना बघा, बाकीच्यांना पाहू नका.

बोधवाक्य:-
सदैव हर्षित तेच राहू शकतात जे कुठेही आकर्षित होत नाहीत.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रूपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना” ‘बाबा आणि मी’ - कंबाइंड आहोत, करावनहार बाबा आणि करण्याच्या निमित्त मी आत्मा आहे - याला म्हणतात ‘असोच’ अर्थात एकाची आठवण. शुभ-चिंतनामध्ये राहणाऱ्यांना कधीही चिंता नसते. जसे बाबा आणि तुम्ही कंबाइंड आहात, शरीर आणि आत्मा कंबाइंड आहे, तुमचे भविष्य स्वरूप कंबाइंड आहे, अशी स्व-सेवा आणि सर्वांची सेवा कंबाइंड होईल तेव्हा मेहनत कमी आणि सफलता जास्त मिळेल.