05-07-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
15.12.2010 ओम शान्ति
मधुबन
‘माझे’ला ‘तुझे’ मध्ये
परिवर्तन करून निश्चिंत बादशहा बना, सेकंदामध्ये व्यर्थला बिंदू लावण्याचे अभ्यासी
बनून प्रत्येक संकल्प आणि समयाला सफल करा
आज चोहो बाजूंच्या
आपल्या निश्चिंत बादशहा मुलांना पाहत आहेत. अशी निश्चिंत बादशहांची सभा आत्ताच
दिसून येते कारण आत्ताच बाबा चिंता घेऊन निश्चिंत बादशहा बनवतात म्हणूनच तुमची ही
सभा याचवेळी दिसून येते. तुम्ही सर्वजण सकाळी उठल्यापासून निश्चिंत स्थितीमध्ये
स्थित होता, खाताना-पिताना, कर्म करताना कोणतीही चिंता नाही. झोपता तेही निश्चिंत
बनून, असे बादशहा आणि तरीही निश्चिंत; उठा, झोपा, निश्चिंत, असा अनुभव करता का?
कारण तुम्हा सर्वांनी बाबांना चिंता देऊन शुद्ध नशा घेतला आहे; म्हणून तुम्ही
निश्चिंत बादशहा बनला आहात. जर चालता-चालता एखादी चिंता आली, तर ती चिंता काय बनवून
टाकते? नशा असेल तर तुमच्या मस्तकावर लाईटचे तेज चमकताना दिसून येते. जर चिंता आली
तर ओझ्याची टोपली येते. तर सांगा, तुम्हाला लाईटचे तेज आवडते की ओझ्यांची टोपली?
निश्चिंत बादशहा स्वतःलाही प्रिय वाटतात आणि जे अशा स्थितीमध्ये उडत असतात, त्यांची
ती तेजस्वी लाईट पाहून इतरांनाही किती प्रेम उत्पन्न होते म्हणून बापदादा नेहमी
मुलांना ‘निश्चिंत बादशहा’च्या स्थितीमध्ये, याच स्मृती स्वरूपामध्ये स्थित करून
ठेवत असतात, म्हणून तुम्हा लोकांचे चित्र देखील भक्त लोक डबल ताजधारी दाखवतात. एक
लाईटचा ताज आणि दुसरा विकारांवर विजय मिळवल्याचा बादशाहीचा ताज, असा डबल ताज
दाखवतात; म्हणून बापदादा प्रत्येक मुलाला नेहमी हीच शिकवण देतात की, सदैव आनंदात
राहणे खूप सोपे आहे. का सोपे आहे? फक्त हदचे ‘माझे’पण बाबांना देऊन टाका. ‘माझे’ चे
‘तुझे’ केले तर निश्चिंत बादशहा बनलात. एकाच शब्दाचा फरक आहे, ‘तुझे’ ‘माझे’. ‘तु’
आणि ‘मा’, या शब्दामध्ये केलेल्या बदलामुळे निश्चिंत बादशहा बनता. सोपे आहे ना! बनला
आहात ना निश्चिंत बादशहा? की अजूनही काही चिंता सतावत असते? कधीही जर शुद्ध नशे ऐवजी
चिंता वाटत असेल तर फरक फक्त एवढाच होतो की, ‘तुझे’ च्या ऐवजी ‘माझे’ मानल्यामुळे
चिंता निर्माण होते. तर सर्वांचा प्रॅक्टिकल रिझल्ट काय आहे? चिंता देऊन टाकली की
अधूनमधून शुद्ध नशा सोडून चिंतीत होता? चिंतीत होता की निश्चिंतच राहता? जे सदैव
निश्चिंत बादशहा होऊन राहतात त्यांनी हात वर करा. निश्चिंत बादशहा, अगदी पक्के की
कधी-कधी! निश्चिंत बादशहा, उंच हात वर करा. कधी-कधी असणारे सुद्धा आहेत. सेवेची
चिंता ती वेगळी गोष्ट आहे; परंतु ती चिंता तर इतरांना देखील निश्चिंत बनविण्याचे
साधन आहे. आपल्या संस्कारांमुळे जर चिंता उत्पन्न होत असेल तर तिला त्याच वेळी
‘माझे’च्या ऐवजी ‘तुझे’मध्ये चेंज करा. चिंता बाबांना द्या आणि शुद्ध नशा घ्या;
कारण बाबा आलेच आहेत मुलांची चिंता घेऊन शुद्ध नशा देण्यासाठी. तर चेक करा की,
माझ्यामध्ये कधी-कधी बऱ्याच काळाचा (जुना) संस्कार इमर्ज तर होत नाही ना? कारण
बापदादा काही काळापासून मुलांना हेच सांगत आहेत की, वर्तमान समयानुसार कधीही काहीही
होऊ शकते आणि कधीही होऊ शकते म्हणून प्रत्येक मुलाने स्वतःवर हे अटेन्शन द्यायचे आहे
की, एका सेकंदामध्ये बिंदू लावू इच्छित असाल तर तो लावू शकता का? समजा कोणताही
व्यर्थ संकल्प आला तर बिंदू द्वारे एका सेकंदामध्ये त्या व्यर्थला समाप्त करू शकता
का? इतका अभ्यास (इतकी तयारी) आहे का? की त्या वेळी, त्यावेळच्या परिस्थितीनुसार
पुरुषार्थ करून व्यर्थला नष्ट करण्याची गरज भासेल! लावाल बिंदू आणि लागेल क्वेश्चन
मार्क, ‘का, काय, कसे…’ त्यावेळी जर हाच विचार करत राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये
जे लक्ष्य आहे - बाबांसोबत जाणार, बाबा तर एका सेकंदात निघून जातील, कारण बिंदू
आहेत आणि सेकंद देखील बिंदू आहे आणि फुलस्टॉप देखील बिंदूच आहे. तर तुमचा देखील इतका
अभ्यास आहे का? त्यासाठी आतापासूनच या अभ्यासाचे अभ्यासी बनाल तर पित्या समान
श्रीमताचा हात हातामधे देऊन आपल्या घरी पोहोचाल; म्हणून बापदादांनी या पूर्वी देखील
सांगितले आहे की दोन गोष्टींचे अटेन्शन अंडरलाईन करा. दोन गोष्टी कोणत्या आहेत?
एक संकल्पाचा खजिना
आणि दुसरा समयाचा खजिना. खजिने तर भरपूर मिळाले आहेत, ज्ञानाचा खजिना, शक्तींचा
खजिना, योगाद्वारे ज्या काही संपन्न बनण्याच्या मुख्य युक्त्या आहेत, सर्व प्राप्त
करून दिल्या आहेत कारण हा संगमाचा समय संपूर्ण कल्पामध्ये अमूल्य आणि विशेष समय आहे,
या वेळीच जेवढी प्राप्ती करून घेऊ इच्छिता तेवढी करू शकता कारण हा एक जन्म महान (अति
श्रेष्ठ) जन्म आहे. एका जन्मामध्ये अनेक जन्मांचे प्रालब्ध बनवायचे आहे.
संगमयुगातील एक सेकंद सुद्धा वाया घालवायचा नाही. एका सेकंदाचे कनेक्शन अनेक
जन्मांशी आहे. आताचे जमा करण्याचे एक वर्ष, अनेक वर्षांची प्राप्ती करून देणारे आहे
म्हणून या वेळेची व्हॅल्यू सेकंद अथवा मिनिटच नाही, परंतु एक तास देखील अतिशय
महत्वपूर्ण आणि महान आहे, एक सेकंद देखील अतिशय महत्वपूर्ण महान आहे. आणि तुमचे
संकल्प या संगमाच्या जन्माचा विशेष आधार आहे. पहा, जो योग लावता त्याला ‘मनमनाभव’
म्हणता आणि हा आधार आहे फाउंडेशनचा. मनाचे कामच आहे संकल्प करणे, संकल्पाद्वारेच
आठवणीच्या यात्रेची अनुभूती करता. एकमेकांनाही विशेष वेगवेगळे संकल्प देऊन अभ्यास
करून घेता ना! तर सर्वांनी चेक करा - संपूर्ण दिवसभरामध्ये चालता-फिरता, कर्म करताना,
संबंधामध्ये येताना वेळेची गती अमूल्य रूपामध्ये राहिली का? कारण वेळ अमूल्य आहे.
संकल्प सर्वशक्तिवान बनवतो.
तर बापदादा
वारंवार सांगत आहेत -
‘हे बापदादांच्या लाडक्या, हृदयामध्ये वसणाऱ्या मुलांनो, आता व्यर्थ खात्याला
समाप्त करा. सफल करा. सफल करणे हीच तर खरी सफलता आहे. एक सेकंद गेला, असा विचार करू
नका. प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प सफल झाला, इतके स्वतःवर अटेन्शन ठेवायचेच आहे.
इतका वेगाने फुलस्टॉप लावण्याची चेकिंग करा. निष्काळजी बनू नका. बापदादांनी सांगितले
होते परंतु मला समजलेच नाही, वेळेचा विचारच केला नाही, वेळ इतक्या वेगाने जात आहे
आणि जाणार. आता बापदादा प्रत्येकाकडून निष्काळजीपणा घेऊ इच्छित आहेत. हे ऐकू इच्छित
नाहीत की, मी समजलो नाही, विचार केला नाही. आता वर्ष देखील नवीन येणार आहे, तर नवीन
वर्ष सुरू होण्यापूर्वी ब्राह्मण संसारातून निष्काळजीपणा सोबतच आळस, तर हा आळस
देखील वेगवेगळ्या प्रकारचा आहे, याचा देखील अभ्यास आता जे वर्ष पूर्ण होण्यामध्ये
जो वेळ उरला आहे, यामध्ये सुरू करा आणि जेव्हा नवीन वर्ष सुरू होईल तेव्हा हिंमत
ठेवून संकल्प करा आणि याला निरोप द्या. वर्षासोबत याला देखील निरोप द्या. देऊ शकता
ना! देऊ शकता का? जो देऊ शकतो त्याने हात वर करा. (सर्वांनी हात वर केला) वाह!
मुलांनो वाह! हात वर करण्याच्या बाबतीत तर बापदादांना खूप खुश करता. बापदादांनी
पाहिले आहे की बऱ्याच मुलांना हात वर करण्याचे रिटर्न करणे लक्षात राहते. आणि
काहीजण लक्षात ठेवण्यामध्ये देखील निष्काळजी बनतात. बापदादांसोबत रूहरिहान खूप छान
करतात, म्हणतात - ‘होऊन जाईल, बाबा तुम्ही बघा आता होईल, आता होईल…’ बापदादा देखील
अशा निष्काळजी मुलांचे बोलणे ऐकून हसतात, अजून काय करणार! चांगले आहे, विचार करतात
करायचे आहे; ‘करायचे आहे, करायचे आहे…’ असा खूप विचार करतात, परंतु करत आहे की नाही
हे चेकिंग करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मग काय म्हणतील! निष्काळजी बनतात.
तर बापदादांनी ऐकले
आहे - आज चोहो बाजूची मुले, जी आपापल्या देशातून, आपापल्या ठिकाणी राहून पाहत असतात
(ऑनलाईन प्रोग्राम बघत असतात), तिथे देखील चांगले दिसते आणि ऐकू देखील येते. तर
बापदादा सन्मुख येणाऱ्या मुलांना आणि आपल्या सेंटर्सवरून ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या
मुलांना हेच सांगत आहेत की, आता पुरुषार्थाला, संकल्पाला आणि संगमाच्या समयाला
अंडरलाईन करा. सर्व मुले प्रेमामध्ये तर मेजॉरिटी पास आहेत. प्रेमाच्या आधारे आपली
प्रोग्रेस चांगली करत आहेत. प्रेमामुळे, बाबांच्या प्रेमाचा प्रतिसाद मिळाल्यामुळे
पुढे देखील जात आहेत; परंतु बाबा समजतात, जसे प्रेमामध्ये अनुभवी बनून पुढे जात
आहात तसेच आठवणीच्या सब्जेक्टमध्ये, अनेक जन्मांची विकर्म विनाश करण्यावर अजून
जास्त लक्ष द्या. कशासाठी? विकर्म विनाश झाली तरच सोबत येऊ शकाल, नाहीतर पाठीमागून
याल. आणि बाबा समजावून सांगत आहेत की, प्रेमाचा प्रतिसाद हाच आहे की ज्याच्यावर
प्रेम आहे ती आत्मा जे सांगेल ते करायचेच आहे. बाबांची इच्छा आहे की, जर मुलांचे
प्रेम बाबांवर आहे तर सोबत राहावे. राजधानीमध्ये देखील ब्रह्मा बाबांसोबत
राजधानीमध्ये यावे. राजधानीमध्ये येणे अर्थात रॉयल फॅमिलीमध्ये यावे. भले तख्तावर
बसणार नाही परंतु किमान रॉयल फॅमिलीचे सदस्य तरी बना. बापदादांनी यापूर्वी देखील
सांगितले आहे - याची पारख कशी कराल! जेव्हापासून तुम्ही आला आहात, जितके तुमचे
ज्ञानाचे वय आहे, तेवढा वेळ जर तुम्ही बापदादांच्या दिलतख्तनशीन होऊन राहिलात, तर
जे जास्त वेळ दिलतख्तावर राहिले आहेत, मातीत पाऊल ठेवलेले नसेल तर ते त्या अनुसार
रॉयल फॅमिली मध्ये जवळच्या नात्यामध्ये येतील. रॉयल फॅमिलीवाले बनतील. तर प्रेम आहे,
आणि प्रेम असणारे साथ निभावण्याच्या बाबतीत मागे राहत नाहीत. जे दिलतख्तनशीन आहेत
ते द्वापर आणि कलियुगामध्ये देखील जवळच्या नात्यामध्ये राहतील. समीप राहतील म्हणून
प्रेम निभावणारे सदैव दिलतख्तनशीन राहा आणि जन्मो-जन्मीचा अधिकार घ्या, म्हणून
बापदादा प्रत्येक मुलावर प्रेम करतात. बाबांनी सर्टिफिकेट दिले आहे की प्रेमाच्या
सब्जेक्टमध्ये मेजॉरिटी पास आहेत. आता सर्व सब्जेक्टमध्ये पास व्हायचेच आहे. पास
व्हायचे आहे, पास राहायचे (समीप राहायचे) आहे.
जी मुले पहिल्यांदाच
आली आहेत त्यांनी उभे रहा. पहिल्यांदा आले आहात! अर्धा क्लास तर नवीन आहे. आले आहात,
बापदादा येणाऱ्यांचे स्वागत करत आहेत. मुबारक असो. पहिल्यांदाच येण्याबद्दल मुबारक
असो. भले लेट आला आहात, परंतु तरीही ‘टू लेट’च्या अगोदर आला आहात. आता हे अटेन्शन
ठेवा की कमी वेळामध्ये तीव्र पुरुषार्थी बनून आपले भविष्य जेवढे उज्वल करू इच्छिता
तेवढे तीव्र पुरुषार्थाद्वारे पुढे जाऊ शकता; कारण तरीही अजूनही पुरुषार्थ करण्याची
मार्जिन आहे (संधी आहे). जेवढे पुढे जाऊ इच्छिता तेवढे पुढे जाऊ शकता. बापदादा आणि
हा दैवी परिवार तुम्हाला आपल्या सोबत पुढे जाण्यासाठी व्हायब्रेशन देईल, म्हणून पुढे
जात राहा, हिंमत ठेवा. हिंमत तुमची आणि मदत बापदादा आणि परिवाराची, पुढे चला. ठीक
आहे ना! हो म्हणा, पुढे जा. अच्छा.
मधुबन निवासींसोबत
संवाद:-
मधुबनवाले तर लकी आहेत, थोडेफार संघटनला पक्के करून साथी बनवा बाकी कशातही साथी
बनवायचे नाही, यामध्ये एकमेकांना साथी बनवून पहिला नंबर मधुबनने घेतला पाहिजे.
घेणार ना! बीती सो बीती (जे झाले ते झाले), जे काही झाले, सर्वांनी पाहिले, ऐकले आणि
मधुबनवाल्यांना तर जास्त गोल्डन चान्स आहे.
मधुबनमध्ये सर्वजण आले.
तर मधुबनवाल्यांनी जर मिळून, असे नाही की पांडव भवन वेगळे आहे अथवा इतर कोणते स्थान
वेगळे आहे, नाही, मधुबन म्हणजेच सर्वजण एकच आहेत. तर मधुबनवाले असे समजतात का की,
आम्ही करणार! जे करणार त्यांनी हात वर करा. सर्वांनी हात वर केला, जे समजतात की, हे
करणे काही मोठी गोष्ट नाहीये, बापदादा आहेत, दादी आहेत, तर मोठी गोष्ट तर नाहीये.
दादी तुम्हाला काय वाटते! मधुबनवाले तर नंबर वन. चांगले आहे, बाबांनी हे करून
दाखवण्यासाठी सर्वांना सांगितले आहे परंतु मधुबन, मधुबन तर मधुबन आहे. तुम्ही
सर्वांनी व्हायब्रेशन द्या, होऊन जाईल, काही मोठी गोष्ट नाहीये. विघ्नाचे नामोनिशाण
नाही. चला, एखादी गोष्ट झाली, देवाण-घेवाण झाली, संपले. काही काळापूर्वी जेव्हा दादी
होती, तेव्हा एक वेळ सर्वांनी हा ‘हां जी’चा धडा पक्का केला होता. ‘ना’ शब्दच नाही,
‘हां जी’, खूप छान. तर मधुबन पहिल्या नंबरवर जाईल. बापदादांना मधुबनविषयी अभिमान आहे
ना! प्रत्येक झोनविषयी अभिमान आहे, मधुबन तर आत्ता समोर आले आहे परंतु बापदादा सर्व
झोनला सांगतात – ‘हां जी, गोड आत्मा’, हा धडा सर्वांचा पक्का झाला आहे. पक्का आहे
ना? बक्षीस तर मधुबनने घेतले पाहिजे. एका सेकंदामध्ये बीती को बीती (जे झाले ते झाले)
हे करू शकता! चला पुरुषार्थी आहात, आणि काही झाले जरी, परंतु जे झाले ते झाले करून
उडा. उडणारे मागचे सोडून देतात तेव्हाच तर उडतात. तर खूप छान.
आता गुजरातने काहीतरी
नवीनता करावी. बापदादांनी दिल्लीवाल्यांना देखील सांगितले की, आता नवीनता करा.
बापदादांना बातमी मिळाली, तर आता यूथने विदेश आणि देश यांनी मिळून जी सेवा आरंभ केली
आहे, त्याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो. आता तर संशोधनाला सुरूवात केली आहे, परंतु
भारत अथवा विदेश दोघेही याही पेक्षा जास्त चमत्कार करू शकतात. आता तर सुरुवात केली
आहे, परंतु दिल्लीवाल्यांनी हिंमत चांगली टिकवून ठेवली आहे. तुम्ही सुरूवात तर केली
आहे आणि आता विश्वामध्ये याचा प्रसार झाल्यामुळे विदेश आणि देश मिळून एक ब्राह्मण
परिवार बनला आहे; आणि आता विश्वा समोर विश्वाला देखील एकसंघ बनवू. सुरुवात तर झाली
आहे, आता मुस्लिम लोक देखील पुढे तर येत आहेत. परंतु आता असा मोठा प्रोग्राम बनवा
ज्यामध्ये मुख्य देशांमधून यावेत आणि विश्वामध्ये हे प्रसिद्ध व्हावे; जेणेकरून आपण
सर्व एकाच पित्याची मुले आपसामध्ये भाऊ-बहिणी आहोत, ब्रदरहुड, सिस्टरहुड आहोत हा
आवाज सर्वत्र पसरत राहावा. एकाच मंचावर, विविध ठिकाणाहून आलेल्या लोकांना एक विशेष
अनुभव व्हावा. सर्वजण प्लॅन तर बनवत आहेत. आता बेहदमध्ये जातच आहेत. सर्वांना माहीत
तर व्हावे की, ही एक गॉड फॅमिली (ईश्वरीय परिवार) आहे, हे प्रसिद्ध व्हावे. बाकी तर
सर्वजण जे कोणी येत आहात, सेवा देखील करत आहात, स्व पुरुषार्थ देखील करत आहात आणि
ईश्वरीय कार्य आहे, हे देखील दुनियेसाठी प्रसिद्ध होईल. एक फॅमिली आहे. अच्छा.
चोहो बाजूंच्या
मुलांना बापदादा आता मुबारक देत आहेत. प्रत्येक दिवशी प्रत्येक तास पुढे जाण्यासाठी
मुबारक असो. वेळ तुमची वाट पाहत आहे, तुम्ही वेळेची वाट पाहू नका. तुम्ही समयाला,
समाप्तीला जितके समीप आणू इच्छिता, तितके समाप्तीला समीप आणू शकता. वेळ आल्यावर
तयार होणे हा तुम्हा ब्राह्मणांचा संकल्प नसावा, तुम्ही समयाला समीप आणा. समय
बाबांना म्हणत आहे - आता ब्राह्मण आत्म्यांनी मज समयाला समीप आणावे. प्रकृती देखील
बाबांना म्हणत आहे - आता समाप्तीला समीप आणा. तर बापदादांनी काय उत्तर द्यावे? काय
उत्तर देऊ? ‘ती वेळ आलेली आहे’, असे सांगू का! तुमच्या वतीने हे उत्तर देऊ का? काय
उत्तर देऊ? बोला. काय उत्तर देऊ? आता समाप्तीला समीप आणणे अर्थात स्वतःला संपन्न
संपूर्ण बनविणे कारण बापदादा एकटे जाणार नाहीत, मुलांसहित जातील. तर डेट फिक्स करा.
कधीपर्यंत? काम तर दिले आहे, आता आपसामध्ये सल्लामसलत करा. बापदादांनी प्रकृतीला
काय उत्तर द्यावे? प्रकृती अत्यंत व्याकुळ झाली आहे. दुःखी आत्मे मनातून खूप
आर्ततेने हाका मारत आहेत. मनसा सेवा आता आणखी वाढवा. मनसा सेवा करत आहात परंतु सतत
वाढवत राहा, तिला अजून विस्तृत करा कारण प्रकृती आणि दुःखी आत्मे बाबांकडे येऊन,
आर्ततेने साद घालत आहेत. तर तुम्ही त्यांना थोडीतरी शांती अथवा सुखाची अनुभूती करून
द्या. त्यांना फक्त एका सेकंदाची शांती हवी आहे, थोडी शांती द्या. जसा एखादा
भुकेलेला असतो, तर त्याला वाटते की काहीही मिळू दे, थोडे तरी मिळावे; तर आता मनसा
सेवेला देखील वाढवा. वाचा सेवा तर चालूच आहे, बापदादा त्याबाबतीत खुश आहेत. अच्छा,
बापदादांनी तुम्हाला जो होमवर्क दिलेला आहे तो लक्षात ठेवा आणि इतरांनाही त्याची
आठवण करून द्या. अच्छा.
बापदादांच्या
दिलतख्तनशीन मुलांना, विश्व कल्याणाच्या कर्तव्यामध्ये सतत पुढे जाणाऱ्यांना बापदादा
दृष्टी देत मनापासून प्रेम आणि मुबारक, मुबारक... देत आहेत. प्रत्येक बच्चा दूर
बसून देखील सन्मुख असल्याचा अनुभव करत आहे आणि बापदादा सर्व मुलांना हृदयामध्ये
सामावून घेत सर्व मुलांना नमस्ते, नमस्ते करत आहेत.
वरदान:-
स्नेह आणि
शक्ती रूपाच्या बॅलन्स द्वारे सेवा करणारे सफलतामूर्त भव
जसे एका डोळ्यामध्ये
बाबांचा स्नेह आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये बाबांद्वारे मिळालेले कर्तव्य (सेवा) सदैव
स्मृतीमध्ये राहते. असे स्नेही-मूर्त असण्यासोबतच आता शक्ती-रूप सुद्धा बना.
स्नेहासोबतच शब्दांमध्ये असे जौहर असावे (ताकद असावी) ज्यामुळे कोणाचेही हृदय
विदीर्ण करेल. जसे आई मुलांना कोणत्याही शब्दांमध्ये शिकवण देते तरी आईच्या
स्नेहामुळे ते शब्द कठोर अथवा कटू वाटत नाहीत. तसेच ज्ञानाच्या ज्या देखील सत्य
गोष्टी आहेत त्या स्पष्ट शब्दांमध्ये सांगा - परंतु शब्दांमध्ये स्नेह सामावलेला
असावा तेव्हाच सफलतामूर्त बनाल.
सुविचार:-
सर्वशक्तिमान बाबांना
साथी बनवा तर पश्चात्ताप होण्यापासून मुक्त व्हाल.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
जशी सूर्याची किरणे
पसरतात, तशीच मास्टर सर्वशक्तिवानच्या स्टेजवर शक्तींची आणि विशेषता रुपी किरणे चोहो
बाजूंना पसरत असल्याचा अनुभव करा, यासाठी “मी मास्टर सर्वशक्तिवान, विघ्न-विनाशक
आत्मा आहे”, या उच्च स्वमानाच्या स्मृतीच्या सीटवर स्थित होऊन योगाला ज्वाला रूप
बनवा तेव्हा मग कोणतेही विघ्न तुमच्या समोर सुद्धा येऊ शकणार नाही.