05-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत या वेश्यालयाला शिवालय बनविण्यासाठी. तुमचे कर्तव्य आहे - वेश्यांना सुद्धा ईश्वरीय संदेश देऊन त्यांचे देखील कल्याण करणे”

प्रश्न:-
कोणती मुले आपले खूप मोठे नुकसान करतात?

उत्तर:-
जे कोणत्याही कारणाने मुरली (अभ्यास) मिस करतात, ते स्वतःचे खूप मोठे नुकसान करतात. बरीच मुले तर आपसात रागावल्यामुळे क्लासलाच येत नाहीत. काही ना काही बहाणा करून घरीच झोपून राहतात, असे करून ते स्वतःचेच नुकसान करतात कारण बाबा तर रोज कोणत्या ना कोणत्या नवीन युक्त्या सांगत राहतात, जर ऐकलेच नाही तर अंमलात तरी कसे आणणार.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुले हे तर जाणतात की, आता आपण विश्वाचे मालक बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. भले माया देखील विसरायला लावते. काही जणांना तर पूर्ण दिवसभर विसरायला लावते. कधी आठवणच करत नाहीत ज्यामुळे आनंदही होईल. आपल्याला भगवान शिकवत आहेत हे देखील विसरून जातात. विसरल्यामुळे मग काही सेवा देखील करू शकत नाहीत. रात्री बाबांनी सांगितले होते - अधम ते अधम ज्या वेश्या आहेत त्यांची सेवा करायला हवी. वेश्यांसाठी तुम्ही घोषणा करा की, ‘तुम्ही बाबांच्या या ज्ञानाला धारण केल्याने स्वर्गाच्या विश्वाची महाराणी बनू शकता, श्रीमंत लोक बनू शकणार नाहीत’. जे जाणतात, शिकले सवरलेले आहेत ते यांना (वेश्यांना) ज्ञान देण्यासाठी काही प्रबंध करतील, तर बिचाऱ्या खूप खुश होतील कारण त्या सुद्धा अबला आहेत, त्यांना तुम्ही समजावून सांगू शकता. युक्त्या तर बाबा अनेक सांगत राहतात. बोला, तुम्हीच उच्च ते उच्च, नीच ते नीच बनल्या आहात. तुमच्या नावानेच भारत वेश्यालय बनला आहे. मग तुम्ही हा पुरुषार्थ केल्याने शिवालयामध्ये जाऊ शकता. तुम्ही आता पैशांसाठी किती खराब काम करता. आता हे सोडा. असे समजावून सांगितल्याने त्या खूप खुश होतील. तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. ही तर चांगली गोष्ट आहे ना. गरिबांचा आहेच ईश्वर. पैशांसाठी खूप खराब काम करतात. त्यांचा जसा धंदा चालतो. आता मुले म्हणतात - सेवेची वृद्धी कशी करता येईल याकरिता आम्ही युक्त्या शोधून काढू. काही मुले कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चिडतात सुद्धा. अभ्यासच सोडून देतात. हे समजत नाहीत की, मी जर शिकलो नाही तर माझेच नुकसान करून घेईन. चिडून घरात बसतात, म्हणतात - अमकी असे म्हणाली, असे बोलली म्हणून मी येत नाही. आठवड्यातून एकदा मुश्किलीने येतात. बाबा तर मुरल्यांमध्ये कधी कोणते मत तर कधी कोणते मत देत राहतात. मुरली ऐकली तर पाहिजे ना. क्लासमध्ये जेव्हा येणार तेव्हा ऐकणार. असे तर बरेच आहेत, काहीतरी कारण काढून बहाणा करून झोपून राहतील. ठीक आहे, आज जात नाही. अरे, बाबा असे चांगले-चांगले पॉईंट्स ऐकवतात. सेवा कराल तर उच्च पद सुद्धा मिळवाल. हा तर आहे अभ्यास. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इत्यादी ठिकाणी शास्त्र खूप वाचतात. दुसरे काही काम नसेल बस्स शास्त्र कंठस्थ करून सत्संग सुरु करतात. त्यांच्याकडे उद्देश्य इत्यादी तर काहीच नाहीये. या शिक्षणाने तर सर्वांचा बेडा पार होतो. तर तुम्हा मुलांना अशा प्रकारच्या अधम असणाऱ्यांची (नीच काम करणाऱ्यांची) सेवा करायची आहे. श्रीमंत लोक जेव्हा बघतील इथे अशी चांगली माणसे येतात तर त्यांना येण्याचे मन होणार नाही. देह-अभिमान आहे ना. त्यांना लाज वाटेल. अच्छा, तर त्यांची एक वेगळी शाळा उघडा. ते (लौकिक) शिक्षण तर आहे पाई-पैशांचे, शरीर निर्वाह अर्थ. हे तर आहे २१ जन्मांसाठी. कित्येकांचे कल्याण होईल. जास्त करून माता देखील विचारतात की बाबा घरामध्ये गीता पाठशाळा उघडू? त्यांना ईश्वरीय सेवेची हौस असते. पुरुष लोक तर इकडे-तिकडे क्लब इत्यादी ठिकाणी फिरत राहतात. श्रीमंतांसाठी तर हाच स्वर्ग आहे. किती फॅशन इत्यादी करत राहतात. परंतु देवतांचे नैसर्गिक सौंदर्य बघा कसे आहे. किती फरक आहे. तसे इथे तुम्हाला खरे ऐकवले जाते तर किती थोडे येतात, ते देखील गरीब. त्या दिशेने लगेच जातील. तिथे देखील शृंगार इत्यादी करून जातात. गुरु लोक लग्न देखील लावून देतात. इथे कोणाचे लग्न लावून जरी दिले जाते तरी ते देखील वाचविण्यासाठी. काम-चितेवर चढण्यापासून वाचावेत. ज्ञान-चितेवर बसून पदम भाग्यशाली बनावेत. आई-वडिलांना म्हणतात हा बर्बादीचा धंदा सोडून चला स्वर्गात. तर म्हणतात काय करणार, हे दुनियावाले आमच्यावर चिडतील की कुळाचे नाव बदनाम करतात. लग्न करून न देणे हे नियमा विरुद्ध आहे. लोक लाज, कुळाची मर्यादा सोडत नाहीत. भक्तीमार्गामध्ये गातात - ‘मेरा तो एक, दुसरा ना कोई’. मीरेची सुद्धा गाणी आहेत. महिलांमध्ये नंबर एक भक्तिण मीरा आहे, पुरुषांमध्ये नारद गायला गेला आहे. नारदाची सुद्धा गोष्ट आहे ना. तुम्हाला कोणी नवीन व्यक्ती म्हणेल - ‘मी लक्ष्मीला वरू शकतो.’ तर बोला, ‘स्वतःला बघा लायक आहात? पवित्र सर्वगुण संपन्न… आहात?’ ही तर विकारी पतित दुनिया आहे. बाबा आले आहेत त्यातून काढून पावन बनविण्यासाठी. पावन बना तेव्हाच तर लक्ष्मीला वरण्या लायक बनू शकाल. इथे बाबांकडे येतात, प्रतिज्ञा करतात आणि मग घरी जाऊन विकारात जातात. अशा प्रकारचे समाचार येतात. बाबा म्हणतात - अशा व्यक्तींना जी ब्राह्मणी घेऊन येते तिच्यावर देखील परिणाम होतो. इंद्र सभेची गोष्ट सुद्धा आहे ना. तर घेऊन येणाऱ्याला सुद्धा शिक्षा होते. बाबा ब्राह्मणींना कायम म्हणतात - कच्चे असणाऱ्यांना घेऊन येऊ नका. तुमची अवस्था देखील खाली येईल कारण नियमबाह्य घेऊन आलात. वास्तविक ब्राह्मणी बनणे आहे खूप सोपे. १०-१५ दिवसात बनू शकते. बाबा कोणालाही समजावून सांगण्याची खूप सोपी युक्ती सांगतात. तुम्ही भारतवासी आदि सनातन देवी-देवता धर्माचे होता, स्वर्गवासी होता. आता नरकवासी आहात मग परत स्वर्गवासी बनायचे आहे तर मग हे विकार सोडा. फक्त बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. किती सोपे आहे. परंतु कोणी अजिबातच समजत नाहीत. स्वतःच समजत नाहीत तर मग इतरांना काय समजावून सांगणार. वानप्रस्थ अवस्थेमध्ये देखील मोहाने आसक्ती जातच राहते. आजकाल वानप्रस्थ अवस्थेमध्ये इतके जात नाहीत. तमोप्रधान आहेत ना. इथेच अडकून राहतात. पूर्वी वानप्रस्थींचे मोठ-मोठे आश्रम होते. आजकाल इतके नाही आहेत. ८०-९० वर्षांचे झाले तरी देखील घर सोडत नाहीत. समजतच नाहीत की वाणीपासून पार दूर जायचे आहे. आता ईश्वराची आठवण करायची आहे. ईश्वर कोण आहे, हे सगळेच काही जाणत नाहीत. सर्वव्यापी म्हणतात तर आठवण कोणाची करावी. हे देखील समजत नाहीत की आपण पुजारी आहोत. बाबा तर तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनवतात ते देखील २१ जन्मांसाठी. यासाठी पुरुषार्थ तर करावा लागेल.

बाबांनी समजावून सांगितले आहे ही जुनी दुनिया तर नष्ट होणार आहे. आता आपल्याला जायचे आहे घरी - बस हीच चिंता असावी. तिथे क्रिमिनल (अपवित्र) गोष्ट असतच नाही. बाबा येऊन त्या पवित्र दुनियेसाठी तयारी करवून घेतात. सेवाभावी लाडक्या मुलांना तर डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून घेऊन जातात. तर अधमांचा उद्धार करण्यासाठी बहादुरी हवी, त्या गव्हर्मेंटमध्ये तर खूप मोठ्या संख्येने माणसे असतात. सुशिक्षित लोक टिपटॉप उच्च दर्जाचे बनतात. इथे तर कित्येक गरीब साधारण आहेत. बाबा बसून त्यांची इतकी उन्नती करतात. वर्तन देखील अतिशय रॉयल हवे. भगवान शिकवतात. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये कोणती मोठी परीक्षा पास करतात तर किती टिपटॉप राहू लागतात. इथे तर बाबा गरीब निवाज आहेत. गरीबच काही ना काही पाठवून देतात. एक-दोन रुपयांची देखील मनिऑर्डर पाठवून देतात. बाबा म्हणतात - तुम्ही तर महान भाग्यशाली आहात. रिटर्न मध्ये पुष्कळ मिळते. ही देखील काही नवीन गोष्ट नाहीये. साक्षी होऊन ड्रामा बघतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, व्यवस्थित शिका. हा ईश्वरीय यज्ञ आहे जे हवे ते घ्या. परंतु इथे घ्याल तर तिथे कमी होईल. स्वर्गामध्ये तर सर्व काही मिळणार आहे. बाबांना तर सेवेमध्ये अतिशय फुर्त (उत्स्फूर्तपणे सेवा करणारी) मुले हवीत. सुदेश सारखी, मोहिनी सारखी, ज्यांना सेवेचा उमंग असेल. तुमचे नाव खूप प्रसिद्ध होईल. मग तुम्हाला खूप मान देतील. बाबा सर्व डायरेक्शन देत राहतात. बाबा तर म्हणतात - इथे मुलांनी जितका वेळ मिळेल तितके आठवणीमध्ये रहा. परीक्षेचे दिवस जवळ येतात तर एकांतामध्ये जाऊन अभ्यास करतात. प्रायव्हेट टीचर सुद्धा ठेवतात. आपल्याकडे टीचर तर भरपूर आहेत फक्त शिकण्याची हौस पाहिजे. बाबा तर खूप सोपे करून समजावून सांगतात. फक्त स्वतःला आत्मा निश्चय करा. हे शरीर तर विनाशी आहे. तुम्ही आत्मा अविनाशी आहात. हे ज्ञान एकदाच मिळते मग सतयुगापासून कलियुग अंतापर्यंत कोणाला मिळतही नाही. तुम्हालाच मिळते. आपण आत्मा आहोत हा तर पक्का निश्चय करा. बाबांकडून आपल्याला वारसा मिळतो. बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. बस्स. हे आतमध्ये घोटत रहा तरी देखील खूप कल्याण होऊ शकते. परंतु चार्ट ठेवतच नाहीत. लिहिता-लिहिता मग थकून जातात. बाबा खूप सोपे करून सांगतात - ‘मी आत्मा सतोप्रधान होते, आता तमोप्रधान बनले आहे. आता बाबा म्हणतात माझी आठवण कर तर सतोप्रधान बनशील’. किती सोपे आहे तरीही विसरून जातात. जितका वेळ बसाल स्वतःला आत्मा समजा. मी आत्मा बाबांचा मुलगा आहे. बाबांची आठवण केल्याने स्वर्गाची बादशाही मिळेल. बाबांची आठवण केल्याने अर्ध्याकल्पाची पापे भस्म होतील. किती सोपी युक्ती सांगतात. सर्व मुले ऐकत आहेत. हे बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतः देखील प्रॅक्टिस करतात तेव्हाच तर शिकवतात ना. ‘मी बाबांचा रथ आहे, बाबा मला जेवू घालतात’. तुम्ही मुले देखील असेच समजा. शिवबाबांची आठवण करत राहा तर किती फायदा होईल. परंतु विसरून जातात. खूप सोपे आहे. धंद्यावर असताना कोणी ग्राहक नसेल तर आठवणीमध्ये बसा. मी आत्मा आहे, बाबांची आठवण करायची आहे. आजारपणात देखील आठवण करू शकता. बंधनात आहेस तर तिथे बसून तू आठवण करत रहा तर १०-२० वर्षे झालेल्यांपेक्षाही उच्च पद मिळवू शकतेस. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सेवेमध्ये अतिशय उत्स्फूर्त बनायचे आहे. जितका वेळ मिळेल तितकी एकांतामध्ये बसून बाबांची आठवण करायची आहे. अभ्यासाची आवड ठेवायची आहे. अभ्यासावर रागवायचे नाही.

२) आपले वर्तन अतिशय रॉयल ठेवायचे आहे, बस आता घरी जायचे आहे, जुनी दुनिया नष्ट होणार आहे त्यामुळे मोहाची रग तोडून टाकायची आहे. वानप्रस्थ (वाणीपासून परे) अवस्थेमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे. अधमांचा देखील उद्धार करण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
श्रेष्ठ वृत्तीद्वारे वृत्तींचे परिवर्तन करणारे सदा सिद्धी स्वरूप भव

सिद्धी स्वरूप बनण्यासाठी वृत्ती द्वारे वृत्तींना, संकल्पाद्वारे संकल्पांना परिवर्तन करण्याचे कार्य करा, यावर संशोधन करा. जेव्हा या सेवेमध्ये बिझी व्हाल तर ही सूक्ष्म सेवा स्वतः कित्येक कमजोरींपासून तुम्हाला पार करेल. आता याचा प्लॅन बनवा तर जिज्ञासू सुद्धा अजून वाढतील, आवक सुद्धा खूप वाढेल, घरे सुद्धा मिळतील - सर्व सिद्धी सहज उपलब्ध होतील. ही वृद्धी-सिद्धी स्वरूप बनवेल.

बोधवाक्य:-
वेळेला सफल करत राहा तर वेळेच्या धोक्यापासून वाचाल.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.

बाबांचे मुलांवर इतके प्रेम आहे जे रोज प्रेमाचा रिस्पॉन्ड देण्यासाठी इतके मोठे पत्र लिहितात. प्रेमपूर्वक आठवण देतात आणि साथी बनून कायम साथ निभावतात, तर या प्रेमात आपल्या सर्व कमजोरी न्योछावर करा. परमात्म प्रेमामध्ये असे सामावून रहा जेणेकरून हद चा प्रभाव स्वतःकडे कधीही आकर्षित करू शकणार नाही. सदैव बेहदच्या प्राप्तींमध्ये मग्न रहा ज्यामुळे रुहानियतचा सुगंध वातावरणामध्ये दरवळेल.