05-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबांचे सहयोगी बनण्यासाठी सर्वांकडून मनमनाभवचा मंत्र पक्का करून घ्या, सदैव एका बाबांनाच फॉलो करा”

प्रश्न:-
पुरुषोत्तम बनण्याचा सहज आणि श्रेष्ठ पुरुषार्थ कोणता आहे?

उत्तर:-
हे पुरुषोत्तम बनणाऱ्या मुलांनो, तुम्ही सदैव श्रीमतावर चालत रहा. एका बाबांची आठवण करा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नका. खा-प्या, सर्व काही करा, परंतु बाबांची आठवण करत रहा, तर पुरुषोत्तम बनाल. पुरुषोत्तम तेच बनतात, ज्यांच्यावर बृहस्पतीची दशा आहे. ते कधीही श्रीमताची अवज्ञा करत नाहीत. त्यांच्याकडून कोणतेही चुकीचे कर्म होत नाही.

गीत:-
ओम् नमो शिवाय...

ओम शांती।
ही महिमा कोणाची आहे? एका परमपिता परमात्म्याची. जे चांगले कार्य करतात त्यांची महिमा जरूर होते, जे वाईट कर्म करतात, त्यांची निंदा होते. जसे अकबर होता तर त्याची महिमा होती, औरंगजेबाची निंदा होती. रामाची महिमा करतील, रावणाची निंदा करतील. भारतामध्येच राम राज्य, रावण राज्य प्रसिद्ध आहे. राम राज्याला पुरुषोत्तम राज्य म्हटले जाईल आणि रावण राज्याला आसुरी राज्य म्हटले जाईल. तुम्हा मुलांना तर आता संगमयुगाविषयी माहीत झाले आहे. हे आहेच पुरुषोत्तम युग. या भारताला पुरुषोत्तम बनवूनच सोडायचे आहे. इथे राहणाऱ्यांना देखील पुरुषोत्तम बनवायचे आहे आणि राहण्याच्या ठिकाणाला (भारताला) देखील पुरुषोत्तम बनवायचे आहे. भारतालाच स्वर्ग म्हटले जाते, तिथे राहणाऱ्यांना देवी-देवता, स्वर्गवासी म्हटले जाते. तर दोन्ही उत्तम बनतात. सर्वांना माहीत आहे की, नवीन दुनिया उत्तम असते आणि जुनी दुनिया कनिष्ठ असते. जशी दुनिया, तसे तिथे राहणारे. गायले देखील जाते - नवा भारत आणि जुना भारत, दुसऱ्या कोणत्याही खंडाला नवीन खंड म्हणणार नाहीत. असे नाही की नवीन दुनियेमध्ये नवीन अमेरिका, नवीन चीन असतो, नाही. नवीन दुनियेमध्ये तर नवीन भारत म्हणूनच गायला जातो, म्हणून ‘न्यू इंडिया’ म्हटले जाते. नवा भारत असे नाव तर ठेवतात, परंतु हे सर्व अर्थ न समजता आहे. मग या वेळी न्यू इंडिया कुठून आला! न्यू इंडियामध्ये तर दिल्ली परिस्तान आहे. आता परिस्तान कुठे आहे. तुम्ही मुले इथे येता पुरुषोत्तम बनण्यासाठी. उच्च ते उच्च दशा आहे - बृहस्पतीची. पुरुषोत्तम बनल्याने बृहस्पतीची दशा बसते. तुम्ही जाणता की, नवीन दुनियेची स्थापना करणाऱ्या बेहदच्या बाबांद्वारे आपण बेहदचे सुख घेण्याचा पुरुषार्थ करत आहोत. सतयुगामध्ये पुरुषोत्तम असतात. नंतर खाली येतात (पतन होते), तेव्हा मध्यम आणि मग कनिष्ठ बनतात. तुम्ही मुले जाणता की, आता बाबा आपल्याला सतोप्रधान, सतयुगी स्वर्गवासी, पुरुषोत्तम बनवत आहेत. हे आहे खूपच सोपे. ना कोणते औषध खायचे आहे, ना अजून कुठली गोष्ट करायची आहे. फक्त आठवण करायची आहे, म्हणून याला म्हटले जाते - सहज आठवण. आठवणी द्वारेच पाप-आत्म्या पासून पुण्य-आत्मा बनायचे आहे. हे तर निश्चित आहे की, सर्वांना मुक्ती मिळायची आहे.

बाबा म्हणतात - मी सर्वांचा सद्गति दाता आहे, तर जरूर मनुष्यांची शरीरे नष्ट होतील. बाकी आत्म्यांना पवित्र बनवून मी घेऊन जाईन. परत जाण्यासाठी तयारी करावी लागेल. बाबा तयारी करवून घेत आहेत, कारण आत्म्याचे पंख तुटले आहेत अर्थात आत्मा तमोप्रधान झाली आहे. तुम्ही योगबला द्वारे पवित्र बनण्याची मेहनत करता. जे करत नाहीत, त्यांना आपल्या कर्मांचा हिशोब द्यावा लागेल. यामध्ये विचार करण्याचा प्रश्नच नाही. मुलांचे काम आहे बाबांकडून संपूर्ण वारसा घेणे, बाबांचे मदतगार बनून सहयोग द्यावा लागतो. बाबांचा देखील सहयोग आणि मुलांचाही सहयोग. सहयोग कसा द्यायचा, यासाठी बाबांना (ब्रह्मा बाबांना) फॉलो करा. पुरुषोत्तम बनण्यासाठी सर्वांना माझा मंत्र देत जा. बाबा कल्प-कल्प येऊन सांगतात - माझी आठवण केल्या शिवाय पतितापासून पावन बनू शकणार नाही. मी काही गंगा-स्नान करवतो काय? फक्त महामंत्र आठवायचा आहे - “मनमनाभव”. याचा अर्थ आहे - माझी आठवण करा, तर तुम्ही पावन बनून, पुरुषोत्तम बनून स्वर्गाचे मालक बनाल. पती-पत्नी दोघेही पवित्र प्रवृत्तीचे मालक बनतील. बाबा या सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजावून सांगत आहेत. तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये तसे बनत आहात. तुम्ही जाणता की, भगवंताने येऊन मुलांना पुरुषोत्तम बनवले आहे, तेव्हाच तर म्हणतात की, ‘पतितांना पावन बनविणारे पतित-पावन या’. पुरुषोत्तम मासाची खूप महिमा सांगतात ना. तर या पुरुषोत्तम युगाची खूप महिमा आहे. कलियुग अर्थात रात्री नंतर दिवस जरूर येणार आहे. दुःखा नंतर सुख येते. हे शब्द देखील अगदी क्लिअर आहेत. पती-पत्नी दोघेही उत्तम ते उत्तम, श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनतात, कारण प्रवृत्ती मार्ग आहे. सतयुग तर प्रसिद्ध आहे, त्यालाच सुखधाम म्हटले जाते. नंतर जेव्हा द्वापर युग येते, तेव्हा मनुष्य संन्यास धारण करून उत्तम बनतात. म्हणून पतित मनुष्य जाऊन त्यांच्या समोर डोके टेकवतात. पवित्र असणाऱ्या समोर अपवित्र डोके टेकवतात, ही तर कॉमन गोष्ट आहे. पतित-पावन बाबांना न जाणल्याकारणाने पतित-पावनी गंगेला पावन समजून जाऊन डोके टेकवतात. गंगा आणि सागर यांचा देखील मेळावा भरतो. तुम्हा मुलांना बाबा सर्व सविस्तरपणे स्पष्ट करून समजावून सांगतात. तरी देखील बाबा म्हणतात - कोटींमध्ये कोणी, कोणी मध्ये देखील कोणी समजतात. त्यामध्ये देखील आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती, फारकती देवन्ती आणि भागन्ती, डिस-सर्व्हिस करणारे बनतात. सर्व्हिस आणि डिस-सर्व्हिस दोन्ही होत राहतात. पळून जाणारे देखील खूप असतात, जे बाबांना जाणत नाहीत.

तुम्ही पाप-आत्म्यापासून पुण्य-आत्मा बनता. नंतर मुलेच बसून विघ्न आणतात, डिस-सर्व्हिस करतात तर हे किती मोठे पाप आहे. रावण सर्वांना महापापी बनवतो परंतु जी मुले बाबांची बनून मग डिस-सर्व्हिस करतात त्यांच्या साठी ट्रिब्युनल बसते. भक्तिमार्गा मध्ये इतकी कठोर शिक्षा मिळत नाही, परंतु इथे बाबांचे बनून जर डिस-सर्व्हिस करता तर बाबांचा राइट हॅण्ड धर्मराज आहे; म्हणून बाबा सांगतात - मुलांनो, माझ्या सेवेमध्ये मदतगार बनून मग अजूनच उलटे काम करू नका. डिस-सर्व्हिस कराल तर मग अबलांवर विघ्न येईल. मातांवर बाबांना दया येते. द्रौपदीचे देखील भगवंताने पाय दाबले आहेत ना. द्रौपदीने बोलावले की, आम्हाला विवस्त्र करत आहेत. बाबा मातांच्या डोक्यावर कलश ठेवतात. पहिल्या आहेत माता, नंतर आहेत पुरुष. परंतु आजकाल पुरुषांमध्ये मगरुरी (अहंकार) खूप आहे की मी पत्नीचा गुरू आहे, पती ईश्वर आहे, पत्नी माझी दासी आहे. इथे बाबा निरहंकारी बनून मातांचे पाय देखील दाबतात. तुम्ही थकल्या आहात. मी तुमचा थकवा दूर करण्यासाठी आलो आहे. तुम्हा मातांचा सर्वांनी तिरस्कार केला. संन्यासी पत्नीला सोडून निघून जातात. कोणाला ५-७ मुले असतात, त्यांचा सांभाळ करू शकत नाहीत तर वैतागून पळून जातात. रचना करून मग त्यांना निराधार अवस्थेमध्ये भटकायला सोडून निघून जातात. बाबा म्हणतात - मी कोणालाही भटकत सोडत नाही. मी तर सर्वांचा दुःख हर्ता, सुखकर्ता आहे. माया येऊन दुःखी करते. हा देखील खेळ आहे. अज्ञान काळामध्ये मनुष्य समजतात की भगवानच सुख-दुःख देतात; परंतु ईश्वर बाबा हा धंदा करत नाहीत. हा तर कर्मानुसार बनलेला पूर्व-नियोजित ड्रामा आहे, जो जसे कर्म करतो तसे फळ प्राप्त करतो. या वेळी श्रेष्ठ कर्म करण्याची गोष्ट आहे, कर्म कुटण्याची नाही (पश्चाताप करण्याची नाही). कोणी आजारी पडतात, दिवाळखोर होतात तर कर्म कुटतात. तुम्ही मुले किती सौभाग्यशाली बनता, जे २१ जन्म कधीही कर्म कुटावे लागणार नाही. किती जबरदस्त फळ आहे. तर मग बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे. बाबा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. खा-प्या, काहीही करा फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करा. तुम्ही म्हणता की, आम्ही पतित आहोत; तर बाबा पावन बनण्याची जी युक्ती सांगत आहेत, त्यानुसार चाला. फक्त आठवणीची मेहनत आहे. मायेच्या वादळांना घाबरायचे नाही. ही गुप्त मेहनत आहे. ज्ञान देखील गुप्त आहे, मुरली चालवणे तर प्रत्यक्ष आहे. परंतु या वाणीमुळे तुम्ही पावन बनणार नाही. पावन फक्त आठवणीद्वारेच बनाल. तर बेहदच्या बाबांची आठवण करा आणि मदतगार देखील बनले पाहिजे. रुहानी हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी उघडण्याचाही पुरुषार्थ करा. एखादी चांगली जागा असेल, तर तिथे जाऊन भाषण करा. तुम्हाला हातामध्ये पुस्तक घेण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे, बाकी समजावून सांगण्यासाठी झाड, त्रिमूर्ती, सृष्टीचक्र यांचे रहस्य सर्वांना समजावून सांगायचे आहे. बाबा म्हणतात - मी ब्रह्मा द्वारे ब्राह्मण रचतो. ब्राह्मणांचे एम-ऑब्जेक्ट, विष्णू समोर उभे आहेत. बनविणारे टीचर ते आहेत निराकार. गायले गेले आहे - ब्रह्मा द्वारे स्थापना, विष्णू द्वारे पालना... कल्पापूर्वी देखील अशीच चित्रे बनवून घेतली होती. पहा, विज्ञान तंत्रज्ञानाद्वारे किती मिसाइल्स बनवत आहेत. तुम्हा मुलांना पुरुषोत्तम बनण्यासाठी देखील मेहनत करावी लागते, कारण जन्म-जन्मांतरीचे ओझे डोक्यावर आहे. सेकंदामध्ये साखरपुडा झाला, मग आत्म्यांनी बाबांची आठवण करायची आहे, ज्यामुळे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल.

बाबा सांगतात - मनमनाभव. तुम्ही कर्मयोगी आहात. आठवणीचा चार्ट ठेवला पाहिजे. तुमचे युद्ध, माये सोबत आहे. खूप मोठे युद्ध आहे. तुम्ही प्रयत्न कराल आठवणीमध्ये राहण्याचा, आणि माया उडवून लावेल. ज्ञानामध्ये काहीच अडचण नाहीये. आत्म्यामध्ये ८४ जन्मांचे संस्कार भरलेले आहेत. हा अनादि पूर्व-नियोजित ड्रामा आहे. हे चक्र फिरतच राहते. बंद होणार नाही. सृष्टी रचलीच का, हा प्रश्नच उद्भवत नाही. आत्मा कशी बदलेल? नवीन आत्मा काही कुठून येत नाही. जितके आत्मे आहेत, तितकेच आहेत, कमी-जास्त होऊ शकत नाहीत. सर्व ॲक्टर्स पूर्ण आहेत. तुम्ही बेहदचे ॲक्टर्स आहात. तुम्ही जे काही पाहता तेवढे ॲक्टर्स ड्रामामध्ये आहेत आणि पुन्हा तेवढेच असतील. कोणालाही मोक्ष मिळत नाही. मनुष्य आवागमनाच्या चक्रातून सुटू इच्छितात, परंतु सुटू शकत नाहीत. जे पार्ट बजावण्यासाठी येतात, त्यांना पुन्हा यायचेच आहे. बाबा म्हणतात - मला देखील या पतित दुनियेमध्ये यावे आणि जावे लागते. कल्प-कल्प मी येतो. मलाच जिथे यावे लागते, तिथे मुलांचे येणे-जाणे कसे बरे बंद होऊ शकते? तुम्ही ८४ वेळा शरीरामध्ये येता, मी एकदाच येतो. माझे येणे-जाणे खूप वंडरफुल आहे. तेव्हाच तर गातात - ‘तुम्हरी गत-मत तुम ही जानो…’ सद्गती करण्यासाठी जी मत आहे, ती तुम्हीच जाणता, इतर कोणीही जाणत नाही. ते फक्त वर्णन करतात, तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये आहात. मूळ गोष्ट आहे आठवणीची, आणि मग आंधळ्यांची काठी बनायचे आहे. हे आहे पुरुषोत्तम युग. हे ५ हजार वर्षांनंतर येते. पुरुषोत्तम महिना तीन वर्षानंतर येतो. तो सर्व आहे भक्तिमार्ग. त्यांच्या मंत्र-तंत्रांची असंख्य पुस्तके आहेत. इथे तशी कोणतीही गोष्ट नाही. भक्ती न करणाऱ्यांना इरिलीजस (अधार्मिक) म्हणतात. त्यामुळे त्यांना संतुष्ट करण्यासाठी निमित्त म्हणून काहीतरी करावे देखील लागते. बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, कधीही डिस-सर्व्हिस करण्याचा पुरुषार्थ करू नका. जेव्हा कोणी ट्रेटर बनतात, तर त्यांना अजामिल म्हटले जाते. अजामिल, सूरदास इत्यादींच्या किती कथा आहेत. हा सर्व आहे भक्तिमार्ग. त्यांच्यापेक्षाही जास्त पाप-आत्मा ते आहेत, जे इथे येऊन, माझे बनून मला सोडचिठ्ठी देतात, माझी निंदा करतात. त्यांच्यासाठी मग ट्रिब्युनल बसते. प्रतिज्ञा करून मग डिस-सर्व्हिस कराल, तर कठोर शिक्षा मिळेल. पद उच्च आहे, तर चुकीसाठी देखील कठोर सजा आहे; त्यामुळे कोणतीही अवज्ञा करता कामा नये. गायले गेले आहे - ‘सद्गुरुका निंदक ठौर न पाये’, अर्थात नरा पासून नारायण बनण्याचे एम-ऑब्जेक्ट प्राप्त करू शकत नाही. गुरूंना तुम्ही विचारू शकता की, तुम्ही म्हणता - ‘गुरूचा निंदक…’ तर तो कोणता ठौर आहे (कोणते उच्च पद आहे)? परंतु ते ठौर सांगू शकणार नाहीत. बाबांची पगडी त्यांनी स्वतःच्या डोक्यावर ठेवली आहे. टीचर म्हणतात - जर व्यवस्थित शिकला नाहीत, तर उच्च पद देखील मिळणार नाही. पावन सो देवी-देवता बनायचे आहे. इथे कोणीही पावन असत नाहीत. आता सर्वांना पावन बनायचे आहे. २१ जन्मां करिता राज्य-भाग्य मिळत आहे, आणि फक्त हा एक अंतिम जन्म पावन बनायचे आहे, किती मोठी प्राप्ती आहे. प्राप्ती नसती, तर असा पुरुषार्थ केला असता काय? परंतु माया अशी आहे जी इतक्या उच्च प्राप्तीमध्ये देखील विघ्न आणते आणि खाली पाडते. अहो मम् माया… अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणतेही डिस-सर्व्हिसचे कार्य करायचे नाही. असे कोणतेही कर्म होऊ नये, ज्यामुळे बाबांची निंदा होईल. अवज्ञांपासून वाचायचे आहे, पुरुषोत्तम बनायचे आहे.

२) मायेच्या वादळांना घाबरायचे नाही. पावन बनण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
थकलेल्या अथवा तळमळणाऱ्या आत्म्यांना सिद्धी देणारे खुदाई खिदमतगार भव

आत्म्यांची खूप काळा पासून निर्वाणधाम अथवा मुक्तिधाममध्ये जाण्याची इच्छा किंवा आकांक्षा आहे. यासाठीच अनेक जन्मांपासून अनेक प्रकारची साधना करता-करता आत्मा थकली आहे. आता प्रत्येकाला साधना नव्हे, तर सिद्धी हवी आहे. सिद्धी अर्थात सद्गती. तर अशा तळमळणाऱ्या, थकलेल्या, तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविण्यासाठी तुम्ही श्रेष्ठ आत्मे आपल्या सायलेन्सच्या शक्तीद्वारे अथवा सर्वशक्तीं द्वारे एका सेकंदामध्ये सिद्धी द्या, तेव्हा म्हणणार खुदाई खिदमतगार.

बोधवाक्य:-
कमजोर संस्कारच मायेच्या येण्याचा चोर-दरवाजा आहे, आता हा दरवाजा बंद करा.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

तुम्ही भाग्याची रेषा आखणाऱ्या ब्रह्माची मुले-ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी आहात; म्हणून तुमचे भंडारे सदैव भरपूर राहोत. कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. सदैव दात्याची मुले बनून देत रहा आणि सर्वांच्या भावना, सर्वांच्या आशा पूर्ण करत राहा. महादानी, वरदानी बना - हेच तुमचे स्वरूप आहे.