05-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - ही पतित दुनिया एक जुने गाव आहे, हे तुमच्या राहण्या लायक नाहीये,
तुम्हाला आता नवीन पावन दुनियेमध्ये जायचे आहे”
प्रश्न:-
बाबा आपल्या
मुलांना उन्नतीची कोणती एक युक्ती सांगतात?
उत्तर:-
मुलांनो, तुम्ही आज्ञाधारक बनून बापदादांच्या मतावर चालत रहा. बापदादा दोघे एकत्र
आहेत, त्यामुळे जर यांच्या सांगण्याने काही नुकसान जरी झाले तरीही जबाबदार बाबा
आहेत, सर्व काही ठीक करतील. तुम्ही स्वतःचे मत चालवू नका, शिवबाबांचे मत समजून चालत
रहा तर खूप उन्नती होईल.
ओम शांती।
सर्वात पहिली मुख्य गोष्ट रुहानी मुलांना रुहानी बाबा समजावून सांगतात की स्वतःला
आत्मा निश्चय करून बसा आणि बाबांची आठवण करा तर तुमची सर्व दुःखे दूर होतील. ते लोक
कृपा करतात ना. हे बाबा देखील म्हणतात - मुलांनो, तुमची सर्व दुःखे दूर होतील. फक्त
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हे तर खूप सोपे आहे. हा आहे भारताचा प्राचीन
सहज राजयोग. प्राचीनचा देखील काळ तर पाहिजे ना. खूप-खूप पूर्वी ते देखील किती? बाबा
समजावून सांगतात पूर्ण ५ हजार वर्षांपूर्वी हा राजयोग शिकवला होता. हे बाबांशिवाय
इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही आणि मुलांशिवाय कोणी समजू देखील शकणार नाहीत.
गायन देखील आहे - ‘आत्मायें बच्चे और परमात्मा बाप अलग रहे बहुकाल…’ बाबाच म्हणतात
- तुम्ही शिडी उतरता-उतरता पतित बनला आहात. आता स्मृती आली आहे. सर्वजण ओरडत आहेत -
‘हे पतित पावन…’ कलियुगामध्ये पतितच असतात. सतयुगामध्ये असतात - पावन. ती आहेच पावन
दुनिया. ही जुनी पतित दुनिया राहण्या लायक नाहीये. परंतु मायेचा देखील प्रभाव काही
कमी नाहीये. इथे बघा तर खरे १००-१२५ (शंभर-सव्वाशे) मजल्यांच्या मोठ-मोठ्या
बिल्डिंगा बनवत असतात. याला मायेचा भपका म्हटले जाते. मायेचा जलवा असा आहे (सौंदर्य
असे आहे) की, जर कोणाला सांगाल की स्वर्गात चला तर म्हणतात, आमच्यासाठी तर इथेच
स्वर्ग आहे, याला मायेचा जलवा म्हटले जाते. परंतु तुम्ही मुले जाणता हे तर जुने गाव
आहे, याला म्हटले जाते नरक, जुनी दुनिया तीही रौरव नरक. सतयुगाला म्हटलेच जाते
स्वर्ग. हा शब्द तर आहे ना. याला विशश वर्ल्ड (विकारी दुनिया) तर सगळेच म्हणतील.
व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया) तर हा स्वर्ग होता. स्वर्गाला म्हटलेच जाते
निर्विकारी दुनिया, नरकाला विकारी दुनिया म्हटले जाते. एवढ्या सोप्या गोष्टी सुद्धा
कोणाच्याच बुद्धीमध्ये का येत नाहीत! मनुष्य किती दुःखी आहेत. किती भांडण-तंटे
इत्यादी होत राहतात. दिवसेंदिवस बॉम्ब्स इत्यादी देखील असे बनवत राहतात, जे पडले आणि
मनुष्यच नष्ट होतील. परंतु तुच्छ-बुद्धि मनुष्य समजत नाहीत की आता काय होणार आहे.
या गोष्टी बाबांशिवाय इतर कोणीही सांगू शकणार नाही की, काय होणार आहे? जुन्या
दुनियेचा विनाश होणार आहे आणि नवीन दुनियेची स्थापना देखील गुप्तपणे होत आहे.
तुम्हा मुलांना
म्हटलेच जाते - गुप्त वॉरियर्स (गुप्त योद्धे). कोणाला समजते का की तुम्ही युद्ध
करत आहात. तुमचे युद्ध आहेच ५ विकारांसोबत. सर्वांना म्हणता - पवित्र बना. एका
पित्याची मुले आहात ना. प्रजापिता ब्रह्माची मुले तर सर्व भाऊ-बहीणी झाले ना.
समजावून सांगण्यासाठी चांगल्या युक्त्या केल्या पाहिजेत. प्रजापिता ब्रह्माची तर
असंख्य मुले आहेत, एक तर नाहीये. नावच आहे प्रजापिता. लौकिक पित्याला कधी प्रजापिता
म्हणणार नाही. प्रजापिता ब्रह्मा आहे तर त्यांची सर्व मुले आपसामध्ये भाऊ-बहीणी,
ब्रह्माकुमार-कुमारी झाले ना. परंतु समजत नाहीत. जणू पत्थर-बुद्धी आहेत, समजून
घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ-बहीणी झाले.
विकारामध्ये तर जाऊ शकत नाहीत. तुमच्या बोर्डवर देखील ‘प्रजापिता’ शब्द खूप जरुरी
आहे. हा शब्द तर जरूर लिहिला पाहिजे. फक्त ‘ब्रह्मा’ लिहिल्याने इतके प्रभावशाली
वाटत नाही. तर बोर्डामध्ये देखील करेक्ट शब्द लिहून सुधारणा करावी लागेल.
‘प्रजापिता’ हा अत्यावश्यक शब्द आहे. ब्रह्मा नाव तर स्त्रीचे सुद्धा आहे. नावेच
संपली आहेत तर मुलांची नावे मुलींना ठेवतात. इतकी नावे आणणार कुठून? आहे तर सर्व
ड्रामा प्लॅन अनुसार. बाबांचे वफादार, आज्ञाकारी बनणे काही मावशीचे घर नाहीये. बाबा
आणि दादा दोघे एकत्र आहेत ना. समजू शकत नाही की हे कोण आहेत? तेव्हा शिवबाबा
म्हणतात - माझ्या आज्ञेला सुद्धा समजू शकत नाहीत. उलटे म्हणा किंवा सुलटे, तुम्ही
असेच समजा की, शिवबाबा सांगत आहेत, तर तेच जबाबदार असतील. यांच्या (ब्रह्मा
बाबांच्या) म्हणण्याने काही नुकसान झाले तरी देखील ते जबाबदार असल्याने, ते सर्व
ठीक करतील. शिवबाबांचेच समजत रहा तर तुमची खूप उन्नती होईल. परंतु अवघड समजतात. कोणी
मग आपल्याच मतावर चालत राहतात. बाबा किती दुरून येतात तुम्हा मुलांना डायरेक्शन
देण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी. अजून कोणाकडेच हे स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक
ज्ञान) तर नाही आहे. संपूर्ण दिवस हे चिंतन चालले पाहिजे - असे काय लिहावे जेणेकरून
मनुष्य समजेल. एवढ्या मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले पाहिजे जेणेकरून लोकांची नजर जाईल.
तुम्ही असे समजावून सांगा ज्यामुळे कोणताही प्रश्न विचारण्याची गरजच भासणार नाही.
बोला, बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर सर्व दुःख दूर होतील.
जे चांगल्या रीतीने आठवणीमध्ये राहतील तेच उच्च पद मिळवतील. ही तर सेकंदाची गोष्ट
आहे. लोक काय-काय विचारत राहतात - तुम्ही काहीही सांगू नका. बोला, जास्ती विचारू नका.
अगोदर त्यांचा एका गोष्टीवर निश्चय पक्का करा, प्रश्नांच्या जास्ती जंगलामध्ये पडाल
तर मग बाहेर पडण्याचा रस्ता मिळणार नाही. जसे धुक्यामध्ये मनुष्य गोंधळून जातात आणि
मग बाहेर पडू शकत नाहीत, हे देखील असेच आहे माणूस कुठून कुठे मायेकडे निघून जातात;
त्यामुळे पहिले सर्वांना एकच गोष्ट सांगा - तुम्ही आत्मा तर अविनाशी आहात. बाबा
देखील अविनाशी आहेत, पतित-पावन आहेत. तुम्ही आहात पतित. आता एक तर घरी जायचे आहे
किंवा नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. जुन्या दुनियेमध्ये शेवटपर्यंत येत राहतात. जे
पूर्ण शिकणार नाहीत ते जरूर मागून येतील. किती हिशोब आहे आणि मग अभ्यासावरूनही
समजून येते की, पहिला कोण जाईल? शाळेतही शर्यतीच्या वेळी निशाणी लावून ठेवतात ना.
धावत जाऊन हात लावून या. पहिला नंबर घेणाऱ्याला बक्षीस मिळते. ही आहे बेहदची गोष्ट.
बेहदचे बक्षीस मिळते. बाबा म्हणतात - आठवणीच्या यात्रेवर रहा. दैवी गुण धारण करायचे
आहेत. सर्वगुणसंपन्न इथे बनायचे आहे म्हणून बाबा म्हणतात - चार्ट ठेवा. आठवणीच्या
यात्रेचा देखील चार्ट ठेवा तर माहीत होईल की आपण फायद्यात आहोत की तोट्यात? परंतु
मुले ठेवत नाहीत. बाबा सांगतात परंतु मुले करत नाहीत. फार थोडेजण करतात म्हणून माळा
देखील थोड्यांजणांचीच आहे. आठजण मोठी स्कॉलरशिप घेतील आणि १०८ प्लसमध्ये असतात ना.
प्लसमध्ये कोण जाणार? बादशहा आणि राणी. खूप थोडा फरक असतो.
तर बाबा म्हणतात -
पहिले स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा - हीच आहे आठवणीची यात्रा. बस्स हाच
बाबांचा मेसेज द्यायचा आहे. जास्त बडबड करण्याची गरज नाही, मनमनाभव. देहाची सर्व
नाती सोडून, जुन्या दुनियेमधील सर्वांचा बुद्धीने त्याग करायचा आहे कारण आता परत
जायचे आहे, अशरीरी बनायचे आहे. इथे बाबा आठवण करून देतात आणि पुन्हा दिवसभर अजिबात
आठवण सुद्धा करत नाहीत, श्रीमतावर चालत नाहीत. बुद्धीमध्ये राहत नाही. बाबा म्हणतात
- नवीन दुनियेमध्ये जायचे असेल तर तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. बाबांनी
आम्हाला राज्य-भाग्य दिले, आम्ही मग असे गमावले, ८४ जन्म घेतले. लाखो वर्षांची
गोष्टच नाही, बरीच मुले ‘अल्फ’ला न जाणल्याने मग खूप प्रश्न विचारत राहतात. बाबा
म्हणतात - आधी मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पापे नष्ट होतील आणि दैवी गुण धारण
करा तर देवता बनाल अजून काही विचारायची गरज नाही. ‘अल्फ’ला (बाबांना) समजून न घेता
बे (बादशाही) विषयी बडबड केल्याने आपणही गोंधळून जातात आणि मग कंटाळून जातात. बाबा
म्हणतात - पहिले ‘अल्फ’ला समजून घेतल्याने सर्वकाही समजून जाल. माझ्या द्वारे मला
जाणल्याने तुम्ही सर्व काही जाणाल. आणखी जाणण्याचे काहीच बाकी राहणार नाही म्हणून ७
दिवस दिले जातात. ७ दिवसांमध्ये भरपूर गोष्टी समजू शकतात. परंतु नंबरवार समजणारे
असतात. काहीजण तर काहीच समजत नाहीत. ते काय राजा-राणी बनणार. एकावर राज्य करतील का?
प्रत्येकाला आपली प्रजा बनवायची आहे. वेळ खूप वाया घालवतात. बाबा तर म्हणतात -
बिचारे आहेत. भले कितीही मोठ-मोठे पदाधिकारी आहेत, परंतु बाबा जाणतात हे तर सर्व
काही मातीमध्ये मिसळून जाणार आहे. फार थोडा वेळ बाकी आहे. विनाशकाले विपरीत
बुद्धिवाल्यांचा तर विनाश होणार आहे. आम्हा आत्म्यांची प्रीत-बुद्धी किती आहे, ते
तर समजू शकता. कोणी म्हणतात - एक-दोन तास आठवण राहते! लौकिक पित्यावर तुम्ही एक-दोन
तासच प्रेम करता काय? पूर्ण दिवसभर ‘बाबा-बाबा’, करत राहता. इथे जरी ‘बाबा-बाबा’
म्हणता परंतु जिगरी प्रेम थोडेच आहे. वारंवार सांगतात - शिवबाबांची आठवण करत रहा.
खरी-खरी आठवण करायची आहे. हुशारी चालू शकणार नाही. असे पुष्कळ आहेत जे म्हणतात -
आम्ही तर शिवबाबांची खूप आठवण करतो मग ते तर उडायला लागतील. म्हणतील - ‘बाबा, बस्स
आम्ही तर अनेकांचे कल्याण करण्यासाठी सेवेवर जातो’. जितका अनेकांना संदेश द्याल
तितके आठवणीमध्ये रहाल. अनेक मुली म्हणतात बंधन आहे. अरे, बंधन तर संपूर्ण दुनियेला
आहे, बंधनाला युक्तीने तोडायचे आहे. युक्त्या अनेक आहेत, समजा उद्या मेलो तर मग
मुलांना कोण सांभाळेल? जरूर कोणी न कोणी सांभाळणारे निघतील. अज्ञान काळामध्ये तर
दुसरे लग्न करतात. यावेळी तर लग्न सुद्धा त्रास आहे. कोणाला थोडे पैसे देऊन सांगा
मुलांना सांभाळा. तुमचा हा मरजीवा जन्म आहे ना. जिवंतपणी मेलात मग मागे कोण
सांभाळेल? तर जरूर नर्स ठेवावी लागेल. पैशाने काय होऊ शकत नाही. बंधनमुक्त जरूर
बनायचे आहे. सेवेची हौस असणारे आपणच पळत येतील. दुनियेतून मेले ना. इथे तर बाबा
म्हणतात - मित्र-नातेवाईक इत्यादींचा सुद्धा उद्धार करा. सर्वांना संदेश द्यायचा आहे
- मनमनाभवचा; तेव्हाच तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. हे बाबाच म्हणतात; बाकीचे (धर्मस्थापक)
तर वरून येतात. त्यांची प्रजा देखील त्यांच्या मागुन येत राहील. जसे क्राईस्ट
सर्वांना खाली घेऊन येतात. खाली पार्ट बजावता-बजावता जेव्हा अशांत होतात तेव्हा मग
म्हणतात - आम्हाला शांती पाहिजे. बसले तर होते शांतीमध्ये (शांतीधाम मध्ये). मग
प्रिसेप्टरच्या मागे (धर्मस्थापकाच्या मागुन) यावे लागते. मग म्हणतात - पतित-पावन
या. कसा खेळ बनलेला आहे. ते शेवटी येऊन त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी येतील.
मुलांना साक्षात्कार झालेला आहे. येऊन ‘मनमनाभव’चे ध्येय साध्य करतील. आता तुम्ही
गरीबा पासून प्रिन्स बनता. यावेळी जे श्रीमंत आहेत, ते गरीब बनतील. वंडर आहे. या
खेळाला जरा देखील कोणी जाणत नाही. पूर्ण राजधानी स्थापन होत आहे. कोणी तर गरीब
देखील बनतील ना. या खूप दूरदर्शी बुद्धीने समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मागाहून
सर्व साक्षात्कार होतील आपण कसे ट्रान्सफर होतो. तुम्ही शिकता नवीन दुनियेकरिता. आता
आहात संगमावर. शिकून पास व्हाल तर दैवी कुळामध्ये जाल. आता ब्राह्मण कुळामध्ये आहात.
या गोष्टी कोणी समजू शकणार नाही. भगवान शिकवतात, हे जरासुद्धा कोणाच्या बुद्धीमध्ये
बसत नाही. निराकार भगवान जरूर येतील ना. हा ड्रामा मोठा वंडरफुल (अतिशय अद्भुत)
बनलेला आहे, त्याला तुम्ही जाणता आणि पार्ट बजावत आहात. त्रिमूर्तीच्या चित्रावर
देखील समजावून सांगावे लागेल - ब्रह्मा द्वारे स्थापना. विनाश तर ऑटोमॅटिकली होणारच
आहे. फक्त नाव ठेवले आहे. हा देखील ड्रामा पूर्वनियोजित आहे. मुख्य गोष्ट आहे -
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर गंज उतरेल. शाळेमध्ये जितके चांगल्या
रीतीने शिकाल, तेवढी चांगली कमाई होईल. तुम्हाला २१ जन्मांसाठी हेल्थ-वेल्थ मिळते (आरोग्य-संपदा
लाभते), काही छोटी गोष्ट आहे का. इथे भले वेल्थ (संपत्ती) आहे परंतु वेळ नाही आहे
जे मुले-नातवंडे खाऊ शकतील. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) सर्वकाही या सेवेमध्ये लावले
तर किती जमा झाले. सर्वांचे थोडेच जमा होते. इतके लखपती आहेत, पैसा कामी येणार नाही.
बाबा घेणारच नाहीत जो मग द्यावा लागेल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बंधन
तोडण्याची युक्ती रचायची आहे. बाबांवर जिगरी प्रेम करायचे आहे. सर्वांना बाबांचा
संदेश देऊन सर्वांचे कल्याण करायचे आहे.
२) दूरदर्शी-बुद्धीने
या बेहदच्या खेळाला समजून घ्यायचे आहे. गरिबा पासून प्रिन्स बनण्याच्या अभ्यासावर
पूर्ण लक्ष द्यायचे आहे. आठवणीचा खरा-खरा चार्ट ठेवायचा आहे.
वरदान:-
संकल्प रुपी
बीजाला कल्याणाच्या शुभ भावनेने भरपूर ठेवणारे विश्वकल्याणकारी भव
जसे संपूर्ण वृक्षाचे
सार बीजामध्ये असते तसे संकल्प रुपी बीज प्रत्येक आत्म्या प्रती, प्रकृती प्रती शुभ
भावनावाले असावे. सर्वांना बाप समान बनविण्याची भावना, दुर्बलांना बलवान बनविण्याची,
दुःखी-अशांत आत्म्याला सदा सुखी-शांत बनविण्याच्या भावनेचा रस अथवा सार प्रत्येक
संकल्पामध्ये भरलेले असावे, कोणतेही संकल्प रूपी बीज या सारा विना अर्थात व्यर्थ असू
नये, कल्याणाच्या भावनेने भरलेले असावे तेव्हा म्हणणार बाप समान विश्वकल्याणकारी
आत्मा.
बोधवाक्य:-
मायेच्या
गोंधळाला घाबरण्या ऐवजी परमात्मा भेटीचा आनंद साजरा करत रहा.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
कर्मातीत बनण्यासाठी
अशरीरी बनण्याचा अभ्यास वाढवा. शरीराचे बंधन, कर्माचे बंधन, व्यक्तींचे बंधन,
वैभवाचे बंधन, स्वभाव संस्कारांचे बंधन… कोणतेही बंधन स्वतःकडे आकर्षित करू नये. हे
बंधनच आत्म्याला टाईट करते (घट्ट धरून ठेवते), त्यामुळे कायम निर्लिप्त अर्थात
न्यारे आणि अति प्यारे बनण्याचा अभ्यास करा.