06-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो,
जिवंतपणीच या शरीरापासून वेगळे व्हा, अशरीरी बनून बाबांची आठवण करा, यालाच म्हटले
जाते - डेड सायलेन्स (निरव शांतता)”
प्रश्न:-
तुम्ही मुले
आता आपले फाउंडेशन मजबूत करत आहात, मजबुती कोणत्या आधारे येते?
उत्तर:-
पवित्रतेच्या
आधारे. जितकी-जितकी आत्मा पवित्र अर्थात खरे सोने बनत जाते, तितकी मजबुती येते. बाबा
आता स्वराज्याचे फाउंडेशन इतके मजबूत घालतात की अर्धाकल्प त्या फाउंडेशनला कोणीही
हलवू शकत नाही. तुमचे राज्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
गीत:-
ओम् नमो शिवाय…
ओम शांती।
बाबा म्हणतात
- माझी आठवण करा अर्थात अशरीरी बना अर्थात डेड सायलेन्स. जसे मनुष्याचा मृत्यू होतो
तेव्हा डेड सायलेन्स होतो (निरव शांतता पसरते). म्हणतात - यांचे शरीर शांत झाले.
शरीर आणि आत्मा वेगळे झाले, संपला. इथे देखील तुम्ही मुले जेव्हा बसता तेव्हा याला
डेड सायलेन्स म्हटले जाते. जिवंतपणीच अशरीरी बना. स्वतःला आत्मा समजा, बाबांची आठवण
करा. तुम्ही जाणता हीच खरी शांती आहे. ते लोक शांतीला जाणत नाहीत. डेड सायलेन्सचा
अर्थ तर अजिबातच जाणत नाहीत. डेड सायलेन्स का म्हटले जाते? आठवण करून देतात - तो
मेला, शांत झाला. तुम्ही देखील मरा, तुम्ही देखील शांत व्हा. मोठ-मोठे लोक
गांधीजींच्या समाधीकडे जातात. तिथे जाऊन म्हणतील - डेड सायलेन्स अर्थात शांतीमध्ये
बसा. तुम्हाला देखील माहीत आहे की, आपण आत्मा शांत स्वरूप आहोत, दुनियेला ठाऊक
सुद्धा नाहीये. आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो, आपला स्वधर्म आहे - शांत. आपली
आत्मा शांत स्वरूप आहे. त्यांना हे माहीतच नाहीये म्हणून शांती मागतात. आत्मा म्हणते
- शांती पाहिजे. आत्मा आपल्या स्वधर्माला विसरलेली आहे. वास्तविक आत्म्याचा धर्मच
शांत आहे. मग आत्मा असे का म्हणते की, अशांती आहे? अशरीरी होऊन बसा. ते (हठयोगी) तर
हट्टाने प्राणायामाद्वारे श्वास रोखून धरतात तर जशी मृत्यू सदृश्य अवस्था होते,
त्याला म्हटले जाते - कृत्रिम शांती. तुम्हा मुलांना तर माहीत आहे की आपला स्वधर्म
शांत आहे. तुम्ही आत्मे स्वराज्य घेत आहात. आत्माच सर्व काही बनते. आत्मा बॅरिस्टर
बनते. आत्मा म्हणते - मला राज्य पाहिजे. यापूर्वी देखील बाबांकडून राज्य घेतले होते,
आता पुन्हा घेण्याकरिता आलो आहोत. मनुष्य देह-अभिमानामध्ये आहेत त्यामुळे दुःखी
आहेत.
आता तुम्ही समजता की
आपण आत्मा आहोत, आपल्या परमपिता परमात्म्याकडून स्वराज्य घेण्याकरिता आलो आहोत.
तुम्हा आत्म्यांना राज्य हवे आहे. यावेळी आत्मा स्वराज्य मागत आहे - बेहदच्या
बाबांकडून. श्रीकृष्णाला तर स्वराज्य मिळाले होते, मग ते गमावले. आता बाबा येऊन
तुम्हा आत्म्यांना राज्य देतात, याला ‘राजयोग’ म्हटले जाते. परमपिता परमात्मा
राजयोग शिकवत आहेत. मनुष्य देह-अभिमानी असल्याकारणाने म्हणतात - मी अमका आहे.
देहालाच ‘मी’ समजतात. वास्तविक ‘मी’, ‘मी’ हे आत्मा म्हणते. आत्मा म्हणते - मी ही
वस्तू उचलतो. स्त्री म्हणेल, मी उचलते. वास्तविक आत्मा तर मेल (पुरुष) आहे. मी आत्मा
बाबांचा मुलगा आहे. आत्मा म्हणते - बाबा, आम्ही तुमच्याकडून स्वराज्य घेत आहोत.
परमात्मा आत्म्याला स्वराज्य देतात. भक्ती आणि ज्ञानामध्ये पहा किती अंतर आहे.
शिवाचे मंदिर देखील असते. सर्वात जास्त घंटा देखील शिवाच्या मंदिरामध्ये वाजतात.
त्यांना जागे करतात. जागे तर सर्वांनाच करतात. पहाटे लवकर ढोल-ताशे वाजतात. इथे बाबा
मुलांना जागे करून देवता बनवतात. घंटा इत्यादी वाजविण्याची काही गोष्टच नाही. बाबा
म्हणतात - ‘तुम्हाला स्वराज्य हवे असेल तर पहिले पवित्र बना’. एम ऑब्जेक्ट
बुद्धीमध्ये असते. स्टुडंट म्हणतील - ‘आम्ही ही मॅट्रिक पास करू, आणि मग हे करू’.
संन्यासींना वाटते - आम्हाला शांती मिळावी. एक कथा देखील आहे ना - हार राणीच्या
गळ्यातच होता, तरी ती बाहेर शोधत होती. तर ते देखील शांतीला बाहेर शोधतात. परंतु
आत्मा तर स्वतः शांत स्वरूप आहे. आत्मा आपल्या स्वधर्माला विसरून स्वतःला शरीर
समजून बसली आहे. बाबा पुन्हा आठवण करून देतात की तुम्ही आत्मा आहात. तुम्ही
आत्म्यांनी ८४ जन्म भोगले आहेत. या गोष्टी इतर कोणीही सांगू शकणार नाही. बाबा
म्हणतात - तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही
ब्रह्माकुमार-कुमारी आहात. बाबांनी समजावून सांगितले आहे - पवित्रतेशिवाय ज्ञानाची
धारणा होऊ शकणार नाही. म्हणतात ना - वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे पात्रच हवे. तर
या ज्ञानासाठी देखील सोन्याचे पात्र पाहिजे. आत्मा बाबांची आठवण केल्याने सोने बनते.
बाबा देखील खरे सोने आहेत. आत्मा बाबांची आठवण करते तेव्हा ज्ञान बुद्धीमध्ये टिकू
लागते. तुम्ही खरे सोने होता, पवित्र होता - या ज्ञानाचा कोणावरही काहीच परिणाम होत
नाही. बाबा म्हणतात - मी तुम्हा आत्म्यांना स्वराज्य देतो. हे स्वराज्य तेव्हा
मिळेल जेव्हा जुन्या सृष्टीचा अंत आणि नवीन सृष्टीची आदि (सुरुवात) होईल. मनुष्यांचे
हदचे राज्य आहे. बेहदची राजाई मनुष्यांना कधीही मिळत नाही. विश्वाचे मालक बनू शकत
नाहीत. बाबांद्वारे तुम्ही बनता. भगवान बाबांनाच तुमच्या ८४ जन्मांविषयी माहिती आहे.
देवता आपल्या जन्मांना जाणू शकत नाहीत. जर जाणले तर दुःखी होतील - शिडी उतरतच जाणार
काय! राजाईचे सुखच नाहीसे होईल. इथे तुम्हाला माहीत आहे. जाणता की आपण आत्मा आहोत,
यामध्ये संशयाचा
प्रश्नच नाही. एकमेकांकडून ऐकून वृद्धी होत जाते. हे दैवी धर्माचे झाड स्थापन होत
आहे. तुम्ही इथे येणाऱ्या विषयी समजू शकता की - हा आपल्या ब्राह्मण कुळाचा आलेला आहे.
याने पूर्ण भक्ती केली आहे, आता पुन्हा बाबांकडून वारसा घेण्यासाठी आला आहे. ज्ञान
पूर्ण होते नंतर मग भक्ती सुरू होते. हे कोणालाच ठाऊक सुद्धा नाहीये. घर देखील नवीन
आणि जुने असते ना. कच्च्या घराचे आयुष्य जरूर कमी असेल. आजकाल घरे खूप पक्की बनवतात.
भले भूकंप इत्यादी झाला तरी देखील घर कोसळू नये, नुकसान होऊ नये, असे खूप मजबूत
बनवतात. फाउंडेशन जास्त पक्के बनवतात. आता फाउंडेशन घातले जात आहे - स्वराज्याचे.
आत्म्याला २१ जन्मांसाठी राज्य मिळते. इथली राजाई तर काहीच नाही. आज राज्य आहे,
उद्या कोणी आक्रमण केले आणि खलास. कोणाचेही फाउंडेशन नाही आहे. मनुष्याचे देखील
फाउंडेशन नाहीये, आज आहे, उद्या मृत्यू होईल. आता बाबा तुमचे फाउंडेशन पक्के घालत
आहेत, ज्यामुळे २१ जन्म तुम्ही राज्य-भाग्य प्राप्त करता. तुमच्या राजाईचे पक्के
फाउंडेशन घातले जाते. तुम्हाला धरतीचे कोणतेही वादळ हलवू शकत नाही. गीतेमध्ये देखील
म्हटले आहे - ‘बाबा, आम्हाला स्वराज्य देतात, ज्याला कोणीही काढून घेऊ शकत नाही, ना
कोणी कोसळून घालू शकत’. अशी बादशाही देतात ज्यामध्ये जरासुद्धा दुःखाची गोष्ट राहत
नाही. आत्म्याला किती आनंद झाला पाहिजे. निश्चय तर आहे ना. निश्चय नसेल तर मग ते
स्वर्गामध्ये जाण्याच्या लायक नाहीत. इतक्या असंख्य ब्रह्माकुमार-कुमारींची वृद्धी
होत जाते.
तुम्ही जाणता,
ज्ञानसागर, पतित-पावन आपल्याला शिकवून राजयोग शिकवत आहेत. ते (दुनियावाले) मग
म्हणतात - श्रीकृष्णाने शिकवले. हे कसे समजणार की शिवबाबांनी मनुष्य तनामध्ये येऊन
शिकवले. भारतच पवित्र होता, आता अपवित्र, पतित आहे. देवतांसमोर जाऊन त्यांची महिमा
गातात. शिवासमोर कधी असे गाणार नाहीत की, तुम्ही सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण
आहात. शिवाची महिमा वेगळी आहे. ते ज्ञानाचे सागर, पतित-पावन, सर्वांची सद्गती करणारे,
सर्वांची झोळी भरणारे भोलानाथ आहेत. अशा बाबांना सर्वजण विसरून गेले आहेत. परमपिता
परमात्म्याला बोलावतात की येऊन दुःख दूर करा, सुख द्या. सुखकर्ता, दुःखहर्ता तर एकच
आहेत. त्यांचेच श्रेष्ठ मत आहे. ते आहे श्री श्री भगवंताचे मत, ज्याद्वारे तुम्ही
मुले देखील श्रेष्ठ बनता. गव्हर्मेंट देखील म्हणते की भ्रष्टाचारी दुनिया आहे. आता
श्रेष्ठ कोण बनवेल, समजत सुद्धा नाही. समजतात - साधू लोक बनवतील, परंतु ते काही
कोणाला श्रेष्ठ बनवू शकत नाहीत. हे तर बाबांचेच कार्य आहे ना. पूर्वी एका राजाच्या
आदेशावर चालत होते. सतयुगामध्ये तुम्हाला वजीर (मंत्री) इत्यादी कोणीही नसतात.
बादशहामध्ये देखील ताकद असते. वजीरचे नाव घेतलेच जात नाही. तुम्ही समजता आपण
विश्वाचे मालक बनून राज्य चालवले होते. तसेच जाऊन पुन्हा चालवायचे आहे, जसे चालवले
होते. बरोबर सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. प्रत्येकाला आपापली
राजधानी मिळेल. श्रीकृष्णाची आपली राजधानी असेल. दुसरेही राजे असतात ना. कमीतकमी ८
तर आहेत ना, मग ८ आहेत किंवा १०८ आहेत, पुढे चालून कळेल. असे नाही की जे शेवटी
ज्ञान द्यायचे आहे ते आताच देतील. जे जिवंत राहतील (ज्ञानमध्ये चालत राहतील त्यांना),
बाबा ज्ञान देत राहतील. द्यायचेच आहे. ड्रामामध्ये नोंद आहे. परमात्म्याचा आता
पार्ट आहे. हे ज्ञान देण्याचा पार्ट आता नोंदलेला आहे.
बाबा म्हणतात - पुढे
चालून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजणार आहेत. दिवसेंदिवस समजावून सांगत राहतात. हे
देखील कळेल की आपण तिथे राजधानी कशी चालवतो! स्वयंवर कसे होते! तुम्ही ध्यानामध्ये
जाता, वैकुंठामध्ये जाऊन बघता देखील. तिथे सोन्याचे महाल कसे आहेत. सोनेच सोने आहे.
स्वतःला पारसपुरीमध्ये बघता. सोन्याच्या विटांची घरे बनत आहेत. तुम्हाला वाटते की,
थोड्या विटा घेऊन जाऊ. आणि मग खाली उतरता तेव्हा स्वतःला इथे बघता. मीरा देखील
ध्यानामध्ये स्वतःला श्रीकृष्णासोबत रास करताना बघत होती. तुम्ही सूक्ष्मवतनमध्ये
जाता, तिथे हाड-मांस नसते, फरिश्ता बनता. ब्रह्माचे देखील सूक्ष्म शरीर दिसून येते.
हेच फरिश्ता बनतात. तुम्ही बगीचा इत्यादी बघता. हे बाबा साक्षात्कार घडवतात. तुम्ही
म्हणता - बाबा आम्हाला शूबीरस पाजतात. आता सूक्ष्मवतनमध्ये तर पाजू शकत नाहीत.
वैकुंठामध्ये फळे-फुले खूप फर्स्टक्लास असतात. सूक्ष्मवतनमध्ये तर बगीचा नसणार.
तुम्ही सांगता की बगीच्यामध्ये गेलो, मग तिथे प्रिन्स होता, ते तर वैकुंठ झाले ना!
वैकुंठामधील सुबत्ता इथे मिळू शकणार नाही. तिथे तर उत्तम आणि सर्व प्रकारची सुबत्ता
असते. बाबा म्हणतात - मी तुम्हाला वैकुंठाचा मालक बनवतो. इथे तर दुःखच दुःख आहे, असा
एकही कोणी मनुष्य नाही जो असे म्हणत नसेल की, ‘हे भगवान, दुःखातून सोडवा’.
दुःखामध्येच आठवण करतात. श्रीकृष्णाचे पुजारी म्हणतील - ‘कृष्ण म्हणा’, हनुमानाचे
पुजारी ‘हनुमान की जय’ बोलतील... इथे बाबा सांगतात - निरंतर मज पित्याची आठवण करा.
अशी आठवण करा की अंतिमसमयी कोणाचीही आठवण येऊ नये. काशी कलवट खात होते, त्यामध्ये
केलेल्या पापांची अशी जाणीव होते जणूकाही जन्म-जन्मांतरीच्या शिक्षा भोगत आहेत. खूप
पाप केले आहे. याला म्हटलेच जाते पाप-आत्म्यांची दुनिया. आत्मा पापी आहे. आत्माच
बाबांना बोलावते - ‘हे परमपिता परमात्मा’, ‘हे परमधाममध्ये राहणारे शिवबाबा’;
त्यांचे खरे नाव तर एकच आहे. ते आहेत आत्म्यांचे पिता. रुद्रा सोबत शाळीग्राम शब्द
शोभत नाही. शिव आणि शाळीग्राम शोभते. शिवाचे मातीचे लिंग बनवतात तर शाळीग्राम देखील
बनवतात. पतित-पावन तर तेच आहेत ना. इथे यज्ञ देखील रचतात. भारत सर्वात श्रेष्ठ आहे
परंतु देवता धर्माला विसरले आहेत. तुमचा आदि सनातन देवी-देवता धर्म आहे. तो तर चालत
आला पाहिजे. हिंदू काही धर्म थोडाच आहे. देवता धर्मवालेच सतो-रजो-तमोमध्ये येतात.
जेव्हा तमोमध्ये येतात तेव्हा स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. वास्तविक हिंदू काही
धर्म नाहीये. तर समजावून सांगितले जाते की, तुम्ही देवी-देवता बनू शकता, येऊन समजून
घ्या. तर म्हणतात - फुरसत कुठे आहे! बाबा म्हणतात - मी तुम्हाला आपले बनवतो - शांती
आणि सुखाचा वारसा देण्यासाठी. काही कुटुंबे आपसात एकत्र राहतात, अतिशय प्रेमाने
सर्वांशी वागतात. सर्वांची कमाई एकत्र करतात. कोणताही गोंधळ नसतो, परंतु याला
स्वर्ग तर म्हणता येणार नाही ना. सतयुगामध्ये एकाही घरामध्ये कोणी आजारी, दुःखी नसते.
नावच आहे स्वर्ग. तिथे सर्व सुखात असतात. बाबांकडून तुम्ही कायमचा सुखाचा वारसा
घेण्यासाठी आला आहात. तुम्हाला ज्ञान मिळाले आहे. म्हणतात - बाबा, तुम्ही पतित-पावन
आहात, आम्हाला देखील पावन बनवा. बाबांसोबत तुम्ही मुले देखील खुदाई खिदमतगार (ईश्वरीय
सेवाधारी) आहात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वराज्य
घेण्यासाठी पवित्रतेचे फाउंडेशन आतापासूनच मजबूत करायचे आहे. जसे बाबा पतित-पावन
आहेत, तसे पित्या समान पावन बनायचे आहे.
२) आपल्या शांत
स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे. जितके शक्य होईल तितके देह-अभिमान सोडून
देही-अभिमानी होऊन रहायचे आहे. डेड सायलेन्स अर्थात अशरीरी होऊन राहण्याचा अभ्यास
करायचा आहे.
वरदान:-
इतर
आत्म्यांच्या सेवेसोबतच स्वतःची देखील सेवा करणारे सफलतामूर्त भव
सेवेमध्ये सफलतामूर्त
बनायचे असेल तर दुसऱ्यांच्या सेवेसोबत स्वतःचीही सेवा करा. जेव्हा कोणत्याही
सेवेसाठी जाता, तेव्हा असे समजा की, या सेवेसोबत आपल्या जुन्या संस्कारांचे देखील
अंतिम संस्कार करत आहोत. जितके तुम्ही तुमच्या संस्कारांचे संस्कार कराल, तितका
मान-सन्मान मिळेल. सर्व आत्मे तुमच्या समोर मनापासून नमन करतील. केवळ बाहेरून वरकरणी
नमस्कार करणारे बनवू नका, तर मनापासून नमन करणारे बनवा.
बोधवाक्य:-
बेहदच्या
सेवेचे लक्ष्य ठेवा तर हदची सर्व बंधने तुटून जातील.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
जोपर्यंत तुमची आठवण
ज्वाला-स्वरूप बनत नाही, तोपर्यंत ही विनाशाची ज्वाळा देखील संपूर्ण ज्वाला-स्वरूप
धारण करणार नाही. ती भडकते आणि पुन्हा शांत होते; कारण ज्वालामूर्त आणि प्रेरक
आधारमूर्त आत्मे स्वतःच अजून कायमस्वरूपी ज्वाला-स्वरूप बनलेले नाहीत. आता
ज्वाला-स्वरूप बनण्याचा दृढ संकल्प करा आणि संघटित रूपामध्ये मन-बुद्धीच्या
एकाग्रतेद्वारे पॉवरफुल योगाची व्हायब्रेशन्स चोहो बाजूंना पसरवा.