06-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - जितका वेळ मिळेल तितके एकांतामध्ये जाऊन आठवणीची यात्रा करा, जेव्हा
तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल तेव्हा ही यात्रा पूर्ण होईल”
प्रश्न:-
संगमावर बाबा
आपल्या मुलांमध्ये असा कोणता गुण भरतात, जो अर्ध्या कल्पापर्यंत चालतो?
उत्तर:-
बाबा म्हणतात - जसा मी अतिशय स्वीट आहे, असेच मुलांना देखील स्वीट बनवितो. देवता
खूप स्वीट आहेत. तुम्ही मुले आता स्वीट बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. जे अनेकांचे
कल्याण करतात, ज्यांच्यामध्ये कोणते आसुरी विचार नाहीत, तेच स्वीट आहेत. त्यांनाच
उच्च पद प्राप्त होते. त्यांचीच मग पूजा होते.
ओम शांती।
बाबा बसून समजावून सांगत आहेत की, या शरीराचा मालक आहे - आत्मा. हे पहिले समजून
घेतले पाहिजे कारण आता मुलांना ज्ञान मिळाले आहे. सर्व प्रथम तर हे समजायचे आहे की
मी आत्मा आहे. शरीराद्वारे आत्मा कार्य करते, पार्ट बजावते. अशा प्रकारचे विचार इतर
कोणत्या मनुष्याला येत नाहीत कारण देह-अभिमानामध्ये आहेत. इथे या विचारांमध्ये
बसविले जाते - ‘मी आत्मा आहे’. हे माझे शरीर आहे. मी आत्मा परमपिता परमात्म्याची
संतान आहे. ही आठवणच वारंवार विसरायला होते. आधी हे नीट लक्षात ठेवले पाहिजे.
यात्रेवर जेव्हा जातात तर म्हणतात चालत रहा. तुम्हाला देखील आठवणीच्या यात्रेवर
चालत रहायचे आहे, अर्थात आठवण करायची आहे. आठवण करत नाही, अर्थात यात्रेवर चालत
नाहीत. देह-अभिमान येतो. देह-अभिमानामुळे काही ना काही विकर्म बनते. असे देखील नाही
मनुष्य नेहमी विकर्मच करतात. तरी देखील कमाई तर बंद होते ना म्हणूनच जितके होऊ शकेल
आठवणीच्या यात्रेमध्ये ढिले व्हायचे नाही. एकांतामध्ये बसून स्वतःशी विचार सागर
मंथन करून पॉईंट्स काढायचे आहेत. किती वेळ बाबांची आठवण राहते, गोड पदार्थाची आठवण
येते ना.
मुलांना समजावून
सांगितले गेले आहे, यावेळी सर्व मनुष्यमात्र एकमेकांना नुकसानच पोहचवितात. बाबा
फक्त टीचर्सची महिमा करतात, त्यांच्यामध्ये काही-काही टीचर खराब असतात, नाहीतर टीचर
अर्थात ‘टिच’ करणारा, मॅनर्स शिकविणारा. जे रिलीजस माइंडेड, चांगल्या स्वभावाचे
असतात, त्यांची वागणूक देखील चांगली असते. वडील जर दारू इत्यादी पित असतील तर
मुलांना देखील तोच संग लागतो. याला म्हटले जाते खराब संग कारण रावण राज्य आहे ना.
रामराज्य होते जरूर, परंतु ते कसे होते, कसे स्थापन झाले, या वंडरफुल सुंदर गोष्टी
तुम्ही मुलेच जाणता. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट म्हटले जाते ना. बाबांच्या आठवणीमध्ये
राहूनच तुम्ही पवित्र बनता आणि पवित्र बनविता. बाबा नवीन सृष्टीमध्ये येत नाहीत.
सृष्टीमध्ये मनुष्य, पशु-पक्षी, शेती-वाडी इत्यादी सर्व असते. मनुष्यासाठी सर्व काही
पाहिजे ना. शास्त्रांमध्ये प्रलयाचा वृत्तांत देखील चुकीचा लिहिला आहे. प्रलय होतच
नाही. हे सृष्टीचे चक्र फिरतच राहते. मुलांना आदि पासून अंतापर्यंत लक्षात ठेवायचे
आहे. मनुष्यांना तर अनेक प्रकारची चित्रे आठवतात. यात्रा, मेळावे-उत्सव आठवतात. ते
सर्व आहेत हदचे, तुमची आहे बेहदची आठवण, बेहदचा आनंद, बेहदचे धन, बेहदचे बाबा आहेत
ना. हदच्या पित्याकडून सर्व हदचे मिळते. बेहदच्या पित्याकडून बेहदचे सुख मिळते. सुख
मिळतेच मुळी धनाने. धन तर तिथे अपार आहे. तिथे सर्वकाही सतोप्रधान आहे. तुमच्या
बुद्धीमध्ये आहे, आपण सतोप्रधान होतो, पुन्हा बनायचे आहे. हे देखील तुम्ही आता जाणता,
तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत - स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट आहेत ना. बाबांपेक्षाही
स्वीटेस्ट बनणारे असतील तेच उच्च पद प्राप्त करतील. स्वीटेस्ट ते जे अनेकांचे
कल्याण करतात. बाबा देखील स्वीटेस्ट आहेत ना, तेव्हाच तर सर्वजण त्यांची आठवण करतात.
मध किंवा साखरेलाच काही स्वीटेस्ट म्हटले जात नाही. हे मनुष्यांच्या वागणुकीसाठी
म्हटले जाते. म्हणतात ना - हा गोड मुलगा आहे. सतयुगामध्ये कोणतीही दुष्टपणाची गोष्ट
असत नाही. इतके उच्च पद जे प्राप्त करतात तर जरूर इथेच पुरुषार्थ केला असेल.
तुम्ही आता नवीन
दुनियेला जाणता. तुमच्यासाठी तर जशी उद्या नवीन दुनिया सुखधाम असेल. मनुष्यांना तर
माहीतच नाहीये - शांती कधी होती. म्हणतात विश्वामध्ये शांती व्हावी. तुम्ही मुले
जाणता - विश्वामध्ये शांती होती जी आता पुन्हा स्थापन करत आहात. आता हे सर्वांना कसे
समजावून सांगायचे? असे-असे पॉईंट्स काढले पाहिजेत, ज्याची लोकांना खूप इच्छा आहे.
विश्वामध्ये शांती व्हावी, यासाठी ओरडत राहतात कारण अशांती खूप आहे. हे
लक्ष्मी-नारायणाचे चित्र समोर दाखवायचे आहे. यांचे (लक्ष्मी-नारायणाचे) जेव्हा
राज्य होते तेव्हा विश्वामध्ये शांती होती, त्यालाच हेवनली डीटी वर्ल्ड (स्वर्गीय
दैवी दुनिया) म्हटले जाते. तिथे विश्वामध्ये शांती होती. आजपासून ५ हजार
वर्षांपूर्वीच्या गोष्टी इतर कोणीही जाणत नाहीत. ही आहे मुख्य गोष्ट. सर्व आत्मे
मिळून म्हणतात - विश्वामध्ये शांती कशी स्थापित होऊ शकते? सर्व आत्मे बोलावत आहेत
आणि इथे तुम्ही विश्वामध्ये शांती स्थापन करण्याचा पुरुषार्थ करत आहात. ज्यांना
विश्वामध्ये शांती हवी आहे त्यांना तुम्ही सांगा की भारतामध्येच शांती होती. जेव्हा
भारत स्वर्ग होता तेव्हा शांती होती, आता नरक आहे. नरकामध्ये (कलियुगामध्ये) अशांती
आहे कारण अनेक धर्म आहेत, मायेचे राज्य आहे. भक्तीचे देखील केवढे अवडंबर आहे.
दिवसें-दिवस वृद्धी होत जाते. मनुष्य देखील यात्रा, मेळावे इत्यादी ठिकाणी जातात,
समजतात काहीतरी सत्य नक्कीच असेल. आता तुम्ही समजता त्याद्वारे कोणीही पावन बनू शकत
नाही. पावन बनण्याचा मार्ग कोणताही मनुष्य सांगू शकत नाही. पतित-पावन एक बाबाच आहेत.
दुनिया एकच आहे, फक्त नवीन आणि जुनी म्हटले जाते. नवीन दुनियेमध्ये नवा भारत, नवी
दिल्ली म्हटले जाते. नवीन होणार आहे, ज्यामध्ये मग नवीन राज्य असेल. इथे जुन्या
दुनियेमध्ये जुने राज्य आहे. जुनी दुनिया आणि नवीन दुनिया कोणाला म्हटले जाते, हे
देखील तुम्हीच जाणता. भक्तीचा किती मोठा विस्तार आहे. यालाच म्हटले जाते अज्ञान.
ज्ञान सागर एक बाबा आहेत. बाबा तुम्हाला असे म्हणत नाहीत की राम-राम म्हणा किंवा
काही तपस्या करा, नाही. मुलांना समजावून सांगितले जाते की, वर्ल्डचा इतिहास-भूगोल
कसा रिपीट होतो. हे एज्युकेशन तुम्ही शिकत आहात. याचे नावच आहे रूहानी एज्युकेशन.
स्पिरीच्युअल नॉलेज. याचा अर्थ देखील कोणीही जाणत नाही. ज्ञान सागर तर एक बाबांनाच
म्हटले जाते. ते आहेत - स्पिरीच्युअल नॉलेजफुल फादर. बाबा आत्म्यांशी बोलतात. तुम्ही
मुले समजता रुहानी बाबा शिकवत आहेत. हे आहे स्पिरीच्युअल नॉलेज. रूहानी नॉलेजलाच
स्पिरीच्युअल नॉलेज म्हटले जाते.
तुम्ही मुले जाणता
परमपिता परमात्मा बिंदू आहेत, ते आम्हाला शिकवतात. आपण आत्मे शिकत आहोत. हे विसरायचे
नाही. आम्हा आत्म्यांना जे नॉलेज मिळते, ते मग आम्ही दुसऱ्या आत्म्यांना देतो. ही
आठवण तेव्हा टिकेल जेव्हा स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये रहाल.
आठवणीमध्ये खूप कच्चे आहेत, लगेच देह-अभिमान येतो. देही-अभिमानी बनण्याची प्रॅक्टिस
करायची आहे. आपण आत्मे त्यांना सौद्यामध्ये देतो. आपण आत्मे व्यापार करतो. स्वतःला
आत्मा समजून बाबांना आठवण करण्यामध्येच फायदा आहे. आत्म्याला ज्ञान आहे आपण
यात्रेवर आहोत. कर्म तर करायचेच आहे. मुले इत्यादींना देखील सांभाळायचे आहे. कामधंदा
सुद्धा करायचा आहे. धंदा इत्यादी करत असताना आपण आत्मा आहोत हे लक्षात रहाणे, हे
खूप अवघड आहे. बाबा म्हणतात कोणतेही उलटे काम करू नका. सर्वात मोठे पाप आहे काम
विकाराचे. तेच खूप त्रास देणारे आहे. आता तुम्ही मुले पावन बनण्याची प्रतिज्ञा करता.
त्याचेच यादगार हे रक्षा बंधन आहे. पूर्वी तर पै-पैशाची राखी मिळत होती. ब्राह्मण
लोक जाऊन राखी बांधत होते. आज काल तर राखी देखील किती फॅशनेबल बनवतात. वास्तविक आहे
ही आताची गोष्ट. तुम्ही बाबांसोबत प्रतिज्ञा करता - ‘आम्ही कधीही विकारामध्ये जाणार
नाही. तुमच्याकडून विश्वाचा मालक बनण्याचा वारसा घेणार’. बाबा म्हणतील - ६३ जन्म तर
विषय वैतरणी नदीमध्ये गटांगळ्या खाल्ल्यात, आता तुम्हाला क्षीरसागरामध्ये घेऊन जातो.
समुद्र असा काही नाहीये. प्रतिकात्मक म्हणून असे म्हटले जाते. तुम्हाला शिवालयामध्ये
घेऊन जातो. तिथे अथाह सुख आहे. आता हा शेवटचा जन्म आहे. हे आत्म्यांनो, पवित्र बना.
बाबांचे म्हणणे ऐकणार नाही काय. ईश्वर तुमचे पिता म्हणतात - ‘गोड मुलांनो,
विकारामध्ये जाऊ नका. जन्म-जन्मांतरीची पापे डोक्यावर आहेत, ती माझी आठवण केल्यानेच
भस्म होतील. कल्पापूर्वी देखील तुम्हाला शिकवण दिली होती’. बाबा गॅरेंटी तेव्हा
करतात जेव्हा तुम्ही ही गॅरेंटी करता की, ‘बाबा आम्ही तुमची आठवण करत राहणार’. इतकी
आठवण करत राहा की शरीराचे भानही राहू नये. संन्याशांमध्ये देखील कोणी-कोणी खूप
हुशार आणि पक्के ब्रह्मज्ञानी असतात, ते देखील असे बसल्या-बसल्या शरीर सोडतात. इथे
तुम्हाला तर बाबा सांगतात, पावन बनून जायचे आहे. ते तर आपल्या मतावर चालतात. असे
नाही की ते काही शरीर सोडून मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये जातात. नाही. येतात तरी देखील
इथेच परंतु त्यांचे फॉलोअर्स समजतात की ते निर्वाणमध्ये गेले. बाबा समजावून सांगतात
- एकही कोणी परत जाऊ शकत नाही, कायदाच नाही. झाडाची वृद्धी जरूर होणार आहे.
आता तुम्ही
संगमयुगावर बसले आहात, बाकी सर्व मनुष्य आहेत कलियुगामध्ये. तुम्ही दैवी संप्रदाय
बनत आहात. जे तुमच्या धर्माचे असतील ते येत जातील. देवी-देवतांचा देखील तिथे सिजरा
(कुळ) आहे ना. इथे बदलून इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत, आता परत निघून येतील.
नाही तर तिथे जागा कोण भरेल. जरूर ते आपली जागा भरण्यासाठी पुन्हा येतील. या खूप
सूक्ष्म गोष्टी आहेत. खूप चांगले-चांगले देखील येतील जे दुसऱ्या धर्मामध्ये
कन्व्हर्ट झाले आहेत ते मग आपल्या जागेवर येतील. तुमच्याकडे मुसलमान इत्यादी देखील
येतात ना. खूप खबरदारी ठेवावी लागते. लगेच तपासणी करतील, इथे दुसऱ्या धर्माचे कसे
जातात? इमर्जन्सी मध्ये तर अनेकांना पकडतात मग पैसे मिळाले तर सोडून देखील देतात.
जे कल्पा पूर्वी झाले आहे, तुम्ही आता बघत आहात. कल्पा पूर्वी देखील असे झाले होते.
तुम्ही आता मनुष्यापासून देवता उत्तम पुरुष बनता. हे आहे सर्वोत्तम ब्राह्मणांचे
कुळ. यावेळी बाबा आणि मुले रुहानी सेवेवर आहेत. एखाद्या गरिबाला श्रीमंत बनविणे ही
रूहानी सेवा आहे. बाबा कल्याण करतात तर मुलांनी देखील मदत केली पाहिजे. जे अनेकांना
रस्ता सांगतात ते खूप वर जाऊ शकतात. तुम्हा मुलांना पुरुषार्थ करायचा आहे परंतु
काळजीचे कारण नाही, कारण तुमची जबाबदारी बाबांवर आहे. पुरुषार्थ जोरदारपणे करवून
घेतला जातो आणि मग जे फळ निघेल, समजले जाते कल्पापूर्वी प्रमाणे. बाबा मुलांना
म्हणतात - मुलांनो काळजी करू नका. सेवेमध्ये मेहनत करा. नाही बनत तर काय करणार! या
कुळाचा नसेल तर तुम्ही भले कितीही डोकेफोड करा, कोणी तुमचे कमी डोके खातील, कोणी
जास्त. बाबांनी सांगितले आहे - जेव्हा खूप दुःख येत जाईल तेव्हा मग येतील. तुमचे
काहीही व्यर्थ जाणार नाही. तुमचे कार्य आहे राईट सांगणे. शिवबाबा म्हणतात - माझी
आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. असे खूपजण म्हणतात की, भगवान आहे नक्की.
महाभारत लढाईच्या वेळी भगवान होते. फक्त कोणते भगवान होते, त्यामध्ये गोंधळलेले
आहेत. श्रीकृष्ण तर असू शकत नाही. श्रीकृष्ण त्याच फीचर्समध्ये पुन्हा सतयुगामध्येच
असणार. प्रत्येक जन्मामध्ये फीचर्स बदलत जातात. सृष्टी आता बदलत आहे. भगवान आता
जुन्याला नवीन कसे बनवतात, ते देखील कोणीही जाणत नाही. शेवटी तुमचे नाव सर्वांना
माहित होईल. स्थापना होत आहे मग हे राज्य करतील, विनाश देखील होईल. एकीकडे नवीन
दुनिया, एकीकडे जुनी दुनिया - हे चित्र खूप सुंदर आहे. म्हणतात देखील - ब्रह्मा
द्वारे स्थापना, शंकरा द्वारे विनाश… परंतु समजत काहीच नाहीत. मुख्य चित्र आहे
त्रिमूर्तीचे. उच्च ते उच्च आहेत शिवबाबा. तुम्ही जाणता - शिवबाबा ब्रह्माद्वारे
आम्हाला आठवणीची यात्रा शिकवत आहेत. बाबांची आठवण करा, ‘योग’ शब्द डिफिकल्ट वाटतो.
‘आठवण’ शब्द खूप सोपा आहे. ‘बाबा’ शब्द खूप गोड आहे. तुम्हाला स्वतःच लाज वाटेल,
आपण आत्मे बाबांची आठवण करू शकत नाही, ज्यांच्याकडून विश्वाची बादशाही मिळते! आपणच
लाज वाटू लागेल. बाबा देखील म्हणतील - तुम्ही तर बेसमज आहात, बाबांची आठवण करू शकत
नाही तर वारसा कसा घेणार! विकर्म विनाश कशी होतील! तुम्ही आत्मा आहात, मी तुमचा
परमपिता परमात्मा अविनाशी आहे ना. तुम्हाला वाटते आपण पावन बनून सुखधामला जावे तर
मग श्रीमतावर चाला. मज पित्याची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. आठवण केली नाहीत
तर विकर्म विनाश कशी होतील! अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सर्वतोपरी
पुरुषार्थ करायचा आहे, चिंता करण्याची गरज नाही कारण आपले रिस्पॉन्सिबल स्वयं बाबा
आहेत. आपले काहीही व्यर्थ जाऊ शकत नाही.
२) बाप समान खूप-खूप
स्वीट बनायचे आहे. अनेकांचे कल्याण करायचे आहे. या अंतिम जन्मामध्ये पवित्र जरूर
बनायचे आहे. धंदा इत्यादी करत असताना अभ्यास करायचा आहे की, ‘मी आत्मा आहे’.
वरदान:-
प्रवृत्तीच्या
विस्तारामध्ये राहत असताना फरिश्तेपणाचा साक्षात्कार घडविणारे साक्षात्कार मुर्त भव
प्रवृत्तीचा विस्तार
असताना देखील विस्ताराला समेटण्याचा आणि उपराम राहण्याचा अभ्यास करा. आता-आता स्थूल
कार्य करत आहे, आता-आता अशरीरी झालो - हा अभ्यास फरिश्तेपणाचा साक्षात्कार घडवेल.
उच्च स्थितीमध्ये राहिल्याने छोट्या-छोट्या गोष्टी व्यक्त भावामध्ये अनुभव होतील.
उच्च स्थितीमध्ये राहिल्याने साधारण स्थिती आपोआप नाहीशी होईल. मेहनत करण्यापासून
वाचाल. वेळ देखील वाचेल, सेवा देखील फास्ट होईल. बुद्धी इतकी विशाल होईल की ती एकाच
वेळी अनेक कार्य करू शकेल.
बोधवाक्य:-
आनंदाला कायम
ठेवण्यासाठी आत्मा रूपी दिव्यामध्ये ज्ञानाचे घृत रोज टाकत राहा.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.
मुलांवर बाबांचे
प्रेम आहे म्हणून नेहमी म्हणतात - मुलांनो, जे आहात, जसे आहात - माझे आहात. असे
तुम्ही देखील नेहमी प्रेमामध्ये लवलीन रहा, अंत:करणापासून म्हणा बाबा जे आहात ते
सर्व काही तुम्हीच आहात. कधीही खोट्या राज्याच्या प्रभावामध्ये येऊ नका. श्रेष्ठ
भाग्याची रेषा ओढण्याचे कलम बाबांनी तुम्हा मुलांच्या हातामध्ये दिलेली आहे, तुम्ही
जेवढे पाहिजे तेवढे भाग्य बनवू शकता.