06-09-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
19.10.2011 ओम शान्ति
मधुबन
“व्यर्थ वेळ, व्यर्थ
संकल्पाचे विजयी बनून आपसामध्ये संस्कार मिलनाची रास करण्याचा संकल्प करा”
आज बापदादा आपल्या
चोहो बाजूंच्या गोड-गोड, प्रिय-अतिप्रिय मुलांना पाहत आहेत. सर्वजण अतिशय प्रेमाने
आपली आठवण देत आहेत. इतके प्रेम फक्त बाबांवरच करतात. हे परमात्म प्रेम केवळ आता
प्राप्त होते. प्रत्येक बच्चा प्रेमामध्ये लवलीन आहे. बाबा देखील प्रत्येक मुलाला
प्रेमाचा रिस्पॉन्स देत आहेत. वाह मुलांनो वाह! भले ते सन्मुख आहेत अथवा दूर आहेत,
परंतु प्रत्येक बच्चा बाबांच्या हृदयामध्ये सामावलेला आहे. सर्वांच्या मनामध्ये हे
गाणे वाजत आहे - ‘इतना प्यार करेगा कौन!’ हे बाबांचे आणि मुलांचे आत्मिक प्रेम
प्रत्येक मुलाला देहापासून न्यारे आणि बाबांचे प्रिय बनविणारे आहे आणि हे प्रेम
आत्ताच मुलांना प्राप्त होते. हे प्रेम मुलांना कोणापासून कोण बनविणारे आहे. हे
प्रेम फक्त या एका जन्मामध्येच प्राप्त होते. बाबा देखील मुलांचा स्नेह पाहून
मुलांच्या स्नेहामध्ये सामावून जातात.
आज बापदादा प्रत्येकाच्या मस्तकामध्ये तीन प्रकारचे भाग्य पाहत आहेत. एक आहे -
बाबांच्या स्वरूपामध्ये प्राप्त वारशाचे भाग्य, दुसरे - शिक्षकाच्या रूपामध्ये
श्रेष्ठ शिक्षणाचे भाग्य, आणि तिसरे - सद्गुरूच्या रूपामध्ये वरदानांचे भाग्य.
प्रत्येकाचे मस्तक या तिन्ही भाग्याने चमकत आहे. बापदादा देखील आपल्या भाग्यवान
मुलांना पाहून हर्षित होत आहेत. भले मग सन्मुख बसलेले आहेत अथवा दूर बसलेले आहेत
परंतु हृदयामध्ये समीप आहेत. असे मुलांचे आणि बाबांचे प्रेम संपूर्ण कल्पामध्ये याच
वेळी प्राप्त होते. असा प्रेमाचा अनुभव इतरांनाही करवत आहात. आता काही-काही लोक
समजत आहेत की या ब्राह्मण आत्म्यांना काहीतरी मिळाले आहे. काय मिळाले आहे, ते
त्यांना स्पष्ट होत चालले आहे. बाबांनी पाहिले की, आता या प्लॅटिनम ज्युबिलीचा चोहो
बाजूला प्रभाव आहे आणि मुलांनी देखील मनापासून सेवा केली आहे आणि पुढील काळासाठी
देखील प्लॅन बनवला आहे. तर बापदादा देखील चोहो बाजूंच्या मुलांना मुबारक देत आहेत,
वाह मुलांनो वाह! ही ७५ वर्षे आपापल्या पुरुषार्थानुसार पार करून, निर्विघ्न बनून
आणि बनवून पोहोचला आहात. आता बाबा मुलांकडून काय इच्छित आहेत? बाबांना सदैव
प्रत्येक मुलाकडून हीच अपेक्षा आहे की, प्रत्येक बच्चा पित्या समान बनावा. जसे
ब्रह्मा बाबा विजयी बनले, तसे प्रत्येक बच्चा सदैव विजयी बनावा. यासाठी जसे ब्रह्मा
बाबांनी काय केले? फॉलो फादर. तर तुम्ही सर्वजण देखील प्रत्येक पाऊल उचलताना आधी
चेक करा की असे पाऊल ब्रह्मा बाबांनी उचलले होते? ब्रह्मा बाबांनी प्रत्येक मुला
प्रती, भले हे जाणून होते की हा बच्चा कमजोर आहे, पुरुषार्थामध्ये देखील आणि
सेवेमध्ये देखील, तरीही कमजोर असलेल्याच्या बाबतीत अजूनच दयेची आणि कल्याणाची भावना
राहिली. तसेच बापदादा सर्व मुलांनाही हेच म्हणतात आपल्या परिवारातील प्रत्येक भाऊ
अथवा बहिणीप्रती शुभ भावना, शुभकामना, दया आणि कल्याणाच्या दृष्टीने त्यांचे सुद्धा
सहयोगी बना. बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की प्रेमाच्या सब्जेक्टमध्ये
प्रत्येक बच्चा यथाशक्ती पास आहे. प्रेमामुळेच पुढे जात आहेत. आता बापदादा मुलांचे
प्रेम पाहून खूश आहेत. प्रेमाच्या सब्जेक्ट मुळे प्रत्येक बच्चा नंबरवार चालत आहे.
आता बापदादांची इच्छा आहे की, प्रेमामध्ये काहीतरी कुर्बान सुद्धा केले जाते (त्याग
सुद्धा केला जातो). बाबांवर प्रेम आहे त्यामुळे कोणता त्याग करायचा आहे? जे
बापदादांना हवे आहे, ते समजून तर गेला आहात, समजता ना बाबांना काय हवे आहे? समजता
का? मान हलवा. समजता? तर करायचे आहे यासाठी देखील हिंमत आहे ना! हिंमत आहे तर हात
वर करा. हिंमत आहे? अच्छा. तर हिंमत मुलांची, मदत बाबांची आहेच.
आता बापदादांची इच्छा आहे, रिझल्टमध्ये पाहिले तर आतापर्यंत संपूर्ण पवित्रतेच्या
हिशोबाने व्यर्थ संकल्प देखील अपवित्रतेचे बीज आहे. तर बापदादांनी पाहिले की, हे
व्यर्थ संकल्प चालणे, हा संस्कार मेजॉरिटी मुलांमध्ये अजूनही राहिलेला आहे. एक आहे
- व्यर्थ संकल्प आणि दुसरा आहे - व्यर्थ वेळ, हे मेजॉरिटी मुलांमध्ये अजून ही दिसून
येते. आणि व्यर्थ संकल्पाचा आधार आहे - मन, जे मनमनाभव होऊ देत नाही कारण बापदादांनी
बऱ्याच वेळापासून इशारा दिला आहे की जे काही होणार आहे ते अचानक होणार आहे. तर
अचानकच्या हिशोबाने बापदादांनी चेक केले मेजॉरिटी मुलांमध्ये हा व्यर्थ संकल्पाचा
संस्कार आहे. तर जर ब्रह्मा बाबा व्यर्थ वेळ, व्यर्थ संकल्पांवर विजयी बनून
कर्मातीत झाले तर फॉलो फादर.
बापदादांनी पाहिले की, मन आहे तर तुमची रचना, तुम्ही मनाचे रचयिता आहात म्हणजे मनाला
चालविणारे आहात. मनाची कंट्रोलिंग पॉवर, रूलिंग पॉवरचे मालक आहात परंतु तरीही मन
कुठे ना कुठे धोका देते. आहे तुमची रचना, ‘माझे’ आहे ना! परंतु कंट्रोलिंग पॉवर कमी
असल्याकारणाने धोका देते. मनाला घोडा देखील म्हटले जाते परंतु तुमच्याकडे श्रीमताचा
लगाम आहे. आहे ना लगाम! जर मन कधीही वेस्ट संकल्पाच्या दिशेने घेऊन जात असेल तेव्हा
लगाम टाइट केल्याने व्यर्थ संकल्पांची थोडीफार अपवित्रता संपवू शकता. मनाचे मालक
बनून, जसे ब्रह्मा बाबांनी दररोज मनाची चेकिंग केली, तसे दररोज चेक करा आणि व्यर्थ
संकल्पांना समाप्त करा. तर आज बापदादा हेच इच्छित आहेत की, या व्यर्थ संकल्पांना
समाप्त करा. वाईट संकल्प कमी आहेत, व्यर्थ जास्त आहेत परंतु यामध्ये वेळ खूप जातो.
मनाचे मालक बनून मनाला असे बिझी करा जेणेकरून ते इतरत्र आकर्षित होऊन तुमचा लगाम
सैल करणार नाही. होऊ शकते असे? आज बापदादा व्यर्थ संकल्पाच्या समाप्तीचा सर्वांना
संकल्प देत आहेत. होऊ शकते? हात वर करा जे समजतात व्यर्थ संकल्प देखील समाप्त,
सेरेमनी साजरी करू. व्यर्थ वेळ देखील वाचवायची आहे. वेळ आणि संकल्प दोन्ही वाचवायचे
आहेत कारण बापदादा सर्वांचा चार्ट पाहतात. तर मेजॉरिटींच्या चार्टमध्ये ही कमतरता
दिसून आली. मनाचे मालकच विश्वाचे मालक बनणार आहेत. जसे ब्रह्मा बाबा मनजीत बनून
विश्वाचे मालक बनले, आता तर तुमच्यासाठी, मुलांसाठी आवाहन करत आहेत, तुमची
एडव्हान्स पार्टी देखील आवाहन करत आहे. सांगितले होते चार वाजता एडव्हान्स
पार्टीवाले देखील वतनमध्ये येतात तेव्हा विचारतात की मुक्तीचे गेट कधी उघडणार?
कोणाला उघडायचे आहे? तुम्ही सर्वजण मुक्तीचे गेट उघडणारे आहात ना! तुमचे संपूर्ण
बनणे अर्थात मुक्तीचे गेट उघडणे. तर बापदादांशी एडव्हान्स पार्टी रूहरिहान करत असते,
कधीपर्यंत? तर बाबा तुम्हाला विचारत आहेत की, कधीपर्यंत? तर काय उत्तर देणार? पहिली
लाईन वाले बोला, कधीपर्यंत? प्रत्येक कार्यासाठी डेट फिक्स करता ना! तर या कार्याची
डेट कधीपर्यंत? ब्रह्मा बाबा तर फरिश्ता रूपामध्ये आवाहन करत आहेत. सांगू शकता डेट?
बोला, डेट फिक्स करू शकता? आता डेट फिक्स आहे? पांडव हात वर करा, डेट फिक्स आहे?
नाहीये का? दीदी म्हणतात - ‘बाबा, आम्हा लोकांना ध्यास लागला होता की, घरी जायचे आहे,
घरी जायचे आहे, घरी जायचे आहे’. दादी म्हणतात - ‘आम्हाला ध्यास लागला होता की,
कर्मातीत व्हायचे आहे, कर्मातीत व्हायचे आहे…’ तर तुम्हा सर्वांचे तर दीदी-दादीवर
प्रेम आहे ना! आहे तर सर्वांवर कारण जे पण एडव्हान्स पार्टीमध्ये गेले आहेत त्या
सर्वांवर तुमचे प्रेम तर आहे. आता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या. तर आपापसात
रूहरिहान करून आता काहीतरी उत्तर तयार करा. करणार?
आज तर डबल फॉरेनर्सच्या मिलनाचा दिवस आहे ना! तर डबल फॉरेनर्स देखील आपापसात चर्चा
करून डेट सांगा आणि भारतवाले देखील यावर चर्चा करून सांगा. आहे उत्तर? हा बोला, बोला...
जो बोलेल त्यांनी हात वर करा. (मोहिनी बहेन, न्यूयार्क - बाबा, डेट तुम्ही फिक्स करा,
आम्ही लोक एव्हररेडी आहोत.) नाही, तुम्ही फिक्स करा ना! तयार तुम्हाला व्हायचे आहे
ना. बाबा तर म्हणतील की या दीपावलीला दिवाळी करा, एव्हररेडी. एव्हररेडी? की लवकर आहे
म्हणाल? म्हणून म्हणत आहे तुम्ही सांगा. (डॉ. निर्मला बहेन म्हणाल्या - बाबा, एक
वर्ष द्या.) अच्छा, यामध्ये सामील आहात, या म्हणत आहेत एक वर्ष. जे समजतात एक वर्ष
त्यांनी हात वर करा. मोठा हात वर करा. अच्छा. एक वर्ष वाल्यांची नावे नोट करा.
चांगले आहे. बाकीचे सगळे हसत आहेत. बोला. (निर्वैर भाई म्हणाले - नाऊ ऑर नेव्हर, आज
आणि आत्ता होणार आहे) तर टाळ्या वाजवा. छान, खूप छान. तर आता लगेच सर्वजण आपल्या
मनामध्ये हे प्रॉमिस करा की कधीही व्यर्थ संकल्प येऊ देणार नाही. हे होऊ शकते?
आतापासून म्हणत आहेत - नाऊ ऑर नेव्हर (आत्ता किंवा कधीच नाही), तर कमीत कमी सर्वजण
हे प्रॉमिस करत आहात की आतापासून ना व्यर्थ संकल्प करणार, ना वेळ व्यर्थ घालावणार?
यामध्ये जे तयार आहेत त्यांनी हात वर करा. मेजॉरिटींनी हात वर केला आहे. जे समजतात
की वेळ लागेल, त्यांनी हात वर करा. कोणीही नाही. थोडे-थोडे आहेत जे हात वर करत आहेत.
अच्छा, तर या दिपावलीनिमित्त हा एक दृढ संकल्प करा, ज्या मेजॉरिटींनी हात वर केला
आहे, त्यांनी स्वाहा करावे म्हणून तुम्हा सर्वांच्या वतीने दृढ संकल्पासाठी आज केक
कापणार. पसंत आहे ना! आजचा केक या दृढ संकल्पाचा सूचक आहे कारण सर्वांना वाटत आहे,
अज्ञानींना देखील वाटत आहे की, ‘आता काहीतरी झाले पाहिजे, आता काहीतरी झाले पाहिजे’;
परंतु तेवढी ताकद नाहीये. तुम्हा मुलांमध्ये तर संकल्पाला पूर्ण करण्याची ताकद आहे.
फॉलो फादर आहे ना! ब्रह्मा बाबांचा जन्मच दृढ संकल्पातून झाला आहे. करायचे आहे.
विचार करत राहिले नाहीत, ‘काय करू, काय नाही करू’; करायचे आहे. त्या एका दृढ
संकल्पाने एवढ्या मुलांचे भविष्य बनवले. एका ब्रह्मा बाबांनी किती हिंमत ठेवली.
अर्धा हिस्सा मिळाला आणि यज्ञ रचला. यज्ञाचे ब्राह्मण रचले आणि आता देश-विदेशातील
आत्मे पोहोचले आहेत, एका ब्रह्मा बाबांच्या दृढ संकल्पामुळे. तर दृढ संकल्प काय नाही
करू शकत. हे तर तुमच्यासमोर उदाहरण आहे. संकल्प करता, खूप छान-छान संकल्प
बाबांपर्यंत पोहोचतात परंतु त्यामध्ये दृढता कमी असते. एखादी गोष्ट समोर आली ना की
मग दृढता कमी होऊन जाते. दृढता सफलतेची चावी आहे.
पहा, दिल्लीवाल्यांनी दृढ संकल्प केला, करायचेच आहे. झाले ना! ‘विचार करू, पाहू’,
असे केले नाही. सर्वांचा दृढ संकल्प; निमित्त बनलेल्या मुलांचा सहयोग आणि दृढ
संकल्प याने प्रॅक्टिकल सफलता आणली. यामध्ये सर्वांनी साथ दिली आणि एकमत झाले.
हा-ना, हा-ना असे नाही, एक दृढ मत झाले, तर दृढतेमध्ये एवढी शक्ती आहे. जे कार्य
आरंभ करता त्यामध्ये पहिले दृढ संकल्पाचे बीज टाका, त्याला फळ येणारच आहे. ही इतकी
७५ वर्षे कशी पूर्ण झाली, ब्रह्मा बाबा आणि मुलांच्या साथीने दृढ संकल्पाने ७५ वर्षे
पूर्ण केली. उमंग-उत्साहाने पुढे जात राहिले, वाढवत राहिले, तेव्हा ही ७५ वर्षे
पूर्ण केली. आता हा संकल्प करा आज व्यर्थ वेळ, व्यर्थ संकल्प समाप्त करायचाच आहे.
जेव्हा व्यर्थ समाप्त होईल तेव्हा सदैव श्रेष्ठ संकल्पाचा खजिना चमत्कार दाखवेल.
तर बापदादा डबल विदेशींना पाहून खूश आहेत, वृद्धी देखील करत आहेत आणि डबल सेवेकडे
चांगले अटेंशन आहे. फक्त बापदादा तरीही हा इशारा देत आहेत की, आपापसात संस्कार
मिलनाची रास करा. असा विचार करू नका की, सेंटर तर चांगले चालत आहे, सेवा तर चांगली
होत आहे, परंतु जर एक परिवार आहे, प्रभू परिवार आहे, लौकिक परिवार नाही, प्रभू
परिवार आहे. प्रभू परिवाराचा अर्थच आहे एकमेकांप्रती शुभ भावना, कल्याणाची भावना.
एकमेकांमध्ये हाच संकल्प राहावा की आम्हा सर्वांना एकत्र एकमेकांना पुढे नेत
मुक्तीचे गेट उघडून सोबत जायचेच आहे; म्हणून प्रत्येक सेंटरमध्ये असे वायूमंडळ असावे
ज्यावरून समजून यावे की, हे ८ नाहीत, १० नाहीत परंतु दहाच एक आहेत. तर दीपावली
निमित्त प्रत्येकाने आपल्यामध्ये हा संकल्प करा की, आता संस्कार मिलनाची रास
करायचीच आहे. एकही आत्मा एकमेकापासून दूर नसावा, सगळे एक असावेत. तर या दिवाळीला
संस्कार मिलनाची रास करा. मनामध्ये दृढ संकल्प करा की एकही कोणी माझ्यामुळे भारी
होऊ नये, सर्व हलके. संस्कार जुळत नाहीत तेव्हा भारी होतात. तर बाबा समजतात की, या
संकल्पाद्वारे मुक्तीचा दरवाजा उघडण्यासाठी लवकर तयार होतील. चेक करा की, कोणीही
आमच्याकडून नाराज नाही, परंतु भारी सुद्धा होता कामा नये. असे होऊ शकते? होऊ शकते
का? मान हलवा होऊ शकते. होऊ शकत असेल तर हात वर करा. तर या दिवाळीला छान रौनक होईल.
बापदादा डबल फॉरेनर्सना दररोज मनामध्ये इमर्ज करतात; कशाकरिता? का इमर्ज करतात?
कारण डबल फॉरेनर्स संपूर्ण विश्वामध्ये बाबांचे नाव प्रसिद्ध करण्यासाठी निमित्त
बनले आहेत. कोणत्या गोष्टीवर? जर हे भारतवासी नाहीत, फॉरेनर्स आहेत यांनी आपले
भाग्य बनवले तर आपण का मागे राहावे! ही प्रेरणा या दिल्लीच्या प्रोग्राम मधून
भारतामध्ये खूप चांगली पसरली आहे म्हणून बापदादा सेवेच्या निमित्त तुम्हा सर्वांना
इमर्ज करतात. भारताला जागे करतील, जागे करत आहेत आणि पुढेही असे व्ही.आय.पी. तयार
करतील, जे भारताला जागे करतील. त्यांचा अनुभव भारतवासीयांना जागे करेल. बापदादांना
लक्षात आहे की, अगदी सुरुवातीला खूप व्ही.आय.पी. ना घेऊन येत होते. प्रोग्राम्स
करायचे. आता ही सेवा नाहीये. आता असे व्ही.आय.पी. तयार करा जे स्टेजवर आपले अनुभव
ऐकवतील. आता जास्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, अनुभव देखील ऐकवले परंतु थोडा
वेळ होते; आता असे व्ही.आय.पी. आणा जे भारतवासीयांचे नशीब जागे करतील. आता देखील जी
फॉरेनर्सची आणि भारताची एकत्र सेवा केली त्याचा देखील प्रभाव चांगला पडला आहे. आता
एकत्रित होऊन अशा सेवेला वाढवत न्या. आणि मुख्य गोष्ट प्रत्येकाने भले भारतवासी असो
अथवा फॉरेनर्स लवकरात लवकर स्वतःला असे संपन्न बनवा, जेणेकरून तुमच्या सर्वांची
संपन्नता मुक्तीचे गेट उघडेल. अच्छा.
चोहो बाजूंचे भले समोर बसलेले आहेत अथवा कुठेही बसले आहेत, परंतु सर्वांचे लक्ष
मधुबनमध्ये आहे. बापदादांना बघत आहेत, मेजॉरिटी तर बघतच आहेत. बापदादा देखील सर्व
मुलांना, चोहो बाजूंच्या मुलांना सदैव हर्षित राहणाऱ्या, सदैव डबल पुरुषार्थी, डबल
पुरुषार्थी अर्थात स्वतःच्या पुरुषार्थामध्ये देखील आणि सेवेच्या पुरुषार्थामध्ये,
असे डबल पुरुषार्थी आणि डबल निश्चय व नशेमध्ये राहणाऱ्या, सदैव बाबांच्या सोबत
राहणाऱ्या, सदैव आपसातही कल्याण आणि दयेच्या शुभ भावनेमध्ये राहणाऱ्या, एका-एका
मुलाला नावासहित बापदादा हृदयाची प्रेमपूर्वक आठवण देत आहेत.
परंतु आजची गोष्ट ‘व्यर्थ संकल्पाची समाप्ती’, हे विसरून जाऊ नका. बापदादांपाशी
रेकॉर्ड तर पोहोचत असतेच. बापदादा पाहतील किती तीव्र पुरुषार्थी मुले आहेत आणि
एकमेकांना देखील उमंग-उत्साह देऊन पुढे घेऊन जाणारे आहेत. जर कोणी चुकीचे सुद्धा
करत असेल तर त्याच्याप्रती ‘तो चुकीचे करत आहे’, आणि तुम्ही त्याने केलेल्या चुकीवर
मनात संकल्प करत आहात - ‘असे करतो, असे करतो, असे करतो…’ हे देखील संपवून टाका.
त्यांना सहयोग द्या, श्रेष्ठ भावना द्या, अशी सेवा करत संपूर्ण संघटनला श्रेष्ठ
संकल्प करणारे बनवायचेच आहे. कोणत्याही सेंटरवर कधीही एकमेकांप्रती इतर कोणतीही
भावना नसावी, शुभ भावना, शुभ कामना, ठीक आहे ना! खूप छान. आता सर्व मुलांना बापदादा
मुबारक सोबत हृदयापासूनची प्रेमपूर्वक आठवण देखील सोबत देत आहेत. अच्छा.
वरदान:-
निष्काम
सेवेद्वारे विश्वाचे राज्य प्राप्त करणारे विश्व कल्याणी, दयाळू भव
जे निष्काम सेवाधारी
आहेत त्यांना कधीही असा संकल्प येऊ शकत नाही की, ‘मी एवढे केले, मला यापासून काही
मान-सन्मान मिळाला पाहिजे अथवा महिमा झाली पाहिजे…’ हे देखील घेणे झाले. दात्याची
मुले घेण्याचा संकल्प जरी करत असतील तर ते दाता नाहीत. हे घेणे देखील देणाऱ्याच्या
पुढे शोभत नाही. जेव्हा हा संकल्प समाप्त होईल तेव्हा विश्व महाराजनचे स्टेटस
प्राप्त होईल. असा निष्काम सेवाधारी, बेहदचा वैरागीच विश्व कल्याणी, दयाळू बनतो.
सुविचार:-
आपली चूक दुसऱ्यावर
लादणे - हे देखील परचिंतन आहे.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
सर्वात मोठ्यात मोठी
देणगी आहे - दात्याची मुले बनून सर्वांना सहयोग देणे. बिघडलेल्या कार्याला,
बिघडलेल्या संस्कारांना, बिघडलेल्या मूडला शुभ भावनेने ठीक करण्यामध्ये सदैव
सर्वांचे सहयोगी बना. ‘याने असे म्हटले, हे केले’; हे सर्व बघत असून, ऐकत असून,
समजत असून देखील आपल्या सहयोगाच्या स्टॉकद्वारे परिवर्तन करून त्याला भरपूर करणे -
हेच सर्वात मोठे दान आहे.