07-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बुद्धीमध्ये निरंतर एका बाबांचीच आठवण राहिली तर हे देखील अहो सौभाग्य
आहे”
प्रश्न:-
ज्या मुलांना
सेवेची आवड असेल त्यांची लक्षणं काय असतील?
उत्तर:-
ते मुखाने ज्ञान सांगितल्याशिवाय राहू शकत नाहीत. ते रुहानी सेवेमध्ये आपले
हाड्नहाड स्वाहा करतील. त्यांना रुहानी ज्ञान ऐकवण्यामध्ये खूप आनंद होईल.
आनंदामध्ये नाचतच राहतील. ते आपल्यापेक्षा मोठ्यांचा खूप आदर ठेवतील, त्यांच्याकडून
शिकत राहतील.
गीत:-
बदल जाए दुनिया...
ओम शांती।
गोड-गोड
मुलांनी गाण्याच्या दोन ओळी ऐकल्या. हे वचनाचे गाणे आहे, ज्याप्रमाणे कोणाचा
साखरपुडा होतो तेव्हा हे वचन देतात की पती-पत्नी कधीही एकमेकांना सोडणार नाहीत.
काहींचे आपापसात पटत नाही तेव्हा सोडूनही देतात. इथे तुम्ही मुले कोणासोबत प्रतिज्ञा
करत आहात? ईश्वरा सोबत. ज्याच्या सोबत तुम्हा मुलांचा किंवा सजणींचा साखरपुडा झाला
आहे. परंतु असा जो आपल्याला विश्वाचा मालक बनवतो, त्यालाही सोडून देतात. इथे तुम्ही
मुले बसला आहात तुम्ही जाणता - आता बेहदचे बापदादा आले की आले. ही जी तुमची अवस्था
इथे असते, ती बाहेर सेंटरवर काही राहू शकत नाही. इथे तुम्ही समजाल बापदादा आले की
आले. बाहेर सेंटरवर समजाल बाबांनी ऐकवलेली मुरली आली की आली. इथे (मधुबनमध्ये) आणि
तिथे (सेंटरवर) खूप फरक असतो; कारण इथे तुम्ही बेहदच्या बापदादांच्या सन्मुख बसला
आहात. तिथे काही तुम्ही सन्मुख नाही आहात. असे वाटते सन्मुख जाऊन मुरली ऐकावी. इथे
मुलांच्या बुद्धीमध्ये येते - बाबा आले की आले. जसे इतर सत्संग असतात, तिथे ते
समजतील अमका स्वामी येणार आहे. परंतु हे विचारही सर्वांचे एकरस असू शकत नाहीत.
बऱ्याच जणांचा बुद्धियोग तर इतर ठिकाणी भटकत राहतो. कोणाला पतीची आठवण येईल, कोणाला
नातलग आठवतील. बुद्धियोग एका गुरु सोबतही टिकत नाही. एखादा विरळाच असेल जो
स्वामीच्या आठवणीमध्ये बसला असेल. इथे देखील असेच आहे. असे नाही की सगळेच
शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहतात. बुद्धी कुठे ना कुठे धावत राहते. मित्र-नातलग
इत्यादींची आठवण येईल. संपूर्ण वेळ एका शिवबाबांच्याच आठवणीमध्ये राहिले मग तर अहो
सौभाग्य. निरंतर आठवणीमध्ये कोणी विरळेच राहतात. इथे बाबांच्या सन्मुख राहिल्यामुळे
तर खूप आनंद झाला पाहिजे. अतिंद्रिय सुख गोपी वल्लभच्या गोप-गोपींना विचारा, हे इथले
गायन आहे. इथे तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये बसले आहात, जाणता आपण आता ईश्वराच्या
गोदमध्ये (मांडीवर) आहोत नंतर दैवी मांडीवर असणार. भले काहींच्या बुद्धीमध्ये सेवेचे
विचारही चालतात. या चित्रामध्ये हा बदल करावा, असे लिहावे. परंतु चांगली मुले जी
असतील ती समजतील - आता तर बाबांकडून ऐकायचे आहे. दुसरा कोणताही संकल्प येऊ देणार
नाहीत. बाबा ज्ञान रत्नांनी झोळी भरण्यासाठी आले आहेत, तर बाबांसोबतच बुद्धीचा योग
लावायचा आहे. धारणा करणारे क्रमवार तर असतातच. काही चांगल्या प्रकारे ऐकून धारण
करतात. काही कमी धारण करतात. बुद्धीयोग इतर ठिकाणी धावत राहिला तर धारणा होणार नाही.
कच्चे राहतील. एक-दोन वेळा मुरली ऐकली, धारणा झाली नाही तर नंतर ती सवय पक्की होत
जाईल. मग कितीही ऐकत राहिला, धारणा होणार नाही. कोणाला सांगू शकणार नाहीत. ज्यांना
धारणा होईल त्यांना मग सेवा करण्याची आवड असेल. खूप उत्साहाने सेवा करेल, विचार
करेल की जाऊन धन दान करू. कारण हे धन तर एका बाबांशिवाय इतर कोणाकडेच नाहीये. बाबा
हे देखील जाणतात, सर्वांनाच धारणा होऊ शकणार नाही. सर्वजण एकरस उच्च पद प्राप्त करू
शकत नाहीत म्हणूनच बुद्धी इतर ठिकाणी भटकत राहते. भविष्यकालीन भाग्य एवढे उच्च बनत
नाही. कोणी मग स्थूल सेवेमध्ये आपले हाड्नहाड देतात. सर्वांना संतुष्ट करतात. जसे
भोजन बनवून खाऊ घालतात. हा देखील विषय आहे ना. ज्याला सेवेची आवड असेल तो मुखाने
ज्ञान सांगितल्याशिवाय राहणार नाही. मग बाबा बघतात देखील, देह-अभिमान तर नाही आहे
ना? मोठ्यांचा आदर ठेवतात की नाही? मोठ्या महारथींचा आदर तर ठेवावाच लागतो. हो,
काही-काही छोटे देखील हुशार होतात तर असे होऊ शकते मोठ्यांना त्यांचा आदर ठेवावा
लागेल कारण त्यांच्या बुद्धीने ते अंतर भरून काढून प्रगती केली आहे. सेवेची आवड
पाहून बाबा तर खुश होतील ना, हे चांगली सेवा करतील. संपूर्ण दिवस प्रदर्शनीवर
समजावून सांगण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रजा तर पुष्कळ बनते ना, दुसरा तर कोणता
उपाय सुद्धा नाही. सूर्यवंशी, चंद्रवंशी, राजा, राणी, प्रजा सर्व इथेच बनतात. किती
सेवा केली पाहिजे. मुलांच्या बुद्धीमध्ये हे तर आहे - आता आपण ब्राह्मण बनलो आहोत.
घर गृहस्थीमध्ये राहिल्यामुळे प्रत्येकाची अवस्था आपापली असते ना. घर-दार तर सोडायचे
नाहीये. बाबा म्हणतात - भले घरी राहा परंतु बुद्धीमध्ये हा निश्चय ठेवायचा आहे की,
जुनी दुनिया तर नष्ट झाल्यातच जमा आहे. आमचे आता बाबांशी काम आहे. हे देखील जाणतात
- कल्पापूर्वी ज्यांनी ज्ञान घेतले होते तेच घेतील. सेकंद प्रति सेकंद हुबेहूब
रिपीट होत आहे. आत्म्यामध्ये ज्ञान असते ना. बाबांकडेच ज्ञान असते. तुम्हा मुलांना
देखील बाबांसारखे बनायचे आहे. पॉईंट्स धारण करायचे आहेत. सर्व पॉईंट्स एकाच वेळेला
समजावून सांगितले जात नाहीत. विनाश देखील समोर उभा आहे. हा तोच विनाश आहे,
सतयुग-त्रेतामध्ये तर कोणतेही युद्ध होत नाही. ते तर नंतर जेव्हा खूप धर्म होतात,
लष्कर इत्यादी तयार होते तेव्हा युद्ध सुरू होते. सर्वप्रथम आत्मे सतोप्रधानतेमधून
खाली उतरतात नंतर सतो, रजो, तमोची स्टेज येते. तर हे देखील सर्व बुद्धीमध्ये ठेवायचे
आहे. कशाप्रकारे राजधानी स्थापन होत आहे. इथे बसला आहात तर बुद्धीमध्ये ठेवायचे आहे
की शिवबाबा येऊन आम्हाला खजिना देत आहेत, ज्याला बुद्धीमध्ये धारण करायचा आहे.
चांगली-चांगली मुले नोट्स लिहून घेतात. लिहिणे चांगले आहे. त्यामुळे बुद्धीमध्ये
टॉपिक्स (विषय) येतील. आज या विषयावर समजावून सांगू. बाबा म्हणतात - मी तुम्हाला
किती खजिना दिला होता. सतयुग-त्रेतामध्ये तुमच्याजवळ अथाह धन होते. आणि मग
वाममार्गामध्ये गेल्यामुळे ते कमी होत गेले. आनंद सुद्धा कमी होत गेला. काही ना काही
विकर्म होऊ लागतात. उतरता-उतरता कला कमी होत जातात. सतोप्रधान, सतो, रजो, तमोच्या
स्टेजेस मधून जाता. सतोपासून रजोमध्ये येतात तर असे नाही की लगेचच त्या अवस्थेमध्ये
येतात. हळू-हळू उतरतील. तमोप्रधानतेमध्ये देखील हळू-हळू शिडी उतरत जाता, कला कमी
होत जातात. दिवसेंदिवस कमी होत जातात. आता झेप घ्यायची आहे. तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनायचे आहे, त्यासाठी वेळ सुद्धा पाहिजे. गायले गेले आहे - ‘चढे तो चाखे
वैकुंठ रस…’ काम विकाराची थप्पड बसते तेव्हा मग एकदम चक्काचूर होऊन जातात. हाड्नहाड
तुटून जाते. काही माणसे आपला जीवघात करतात, आत्मघात नाही, ‘जीवघात’ म्हटले जाते. इथे
तर बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबांची आठवण करायची आहे कारण बाबांकडून बादशाही
मिळत आहे. स्वतःला विचारायचे आहे - मी बाबांची आठवण करून भविष्यासाठी किती कमाई केली
आहे? आंधळ्यांची काठी बनलो आहे? घराघरामध्ये संदेश द्यायचा आहे की, ही जुनी दुनिया
बदलत आहे. बाबा नवीन दुनियेसाठी राजयोग शिकवत आहेत. शिडीच्या चित्रामध्ये सर्व
दाखवले आहे. हे बनविण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. संपूर्ण दिवस विचार चालत राहतो
की, चित्र असे सोपे बनवावे जेणेकरून कोणालाही समजेल. इथे सारी दुनिया काही येणार
नाही, देवी-देवता धर्माचेच येतील. तुमची सेवा तर खूप चालणार आहे. तुम्ही तर जाणता
आपला हा क्लास केव्हा पर्यंत चालेल. ते तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्षे समजतात.
त्यामुळे शास्त्र इत्यादी ऐकवतच राहतात. समजतात की, जेव्हा अंत होईल तेव्हा सर्वांचे
सद्गती दाता येतील आणि आमचे जे शिष्य असतील त्यांची गती होईल आणि मग आम्ही देखील
जाऊन ज्योतीमध्ये सामावून जाऊ. परंतु असे तर काहीच नाहीये. तुम्ही आता जाणता - आपण
अमर बाबांद्वारे खरी-खरी अमरकथा ऐकत आहोत. तर अमर बाबा जे सांगतात, ते मानले देखील
पाहिजे, फक्त म्हणतात - ‘माझी आठवण करा, पवित्र बना’. नाहीतर सजा देखील खूप खावी
लागेल, पदही कमी दर्जाचे मिळेल. सेवेमध्ये मेहनत करायची आहे, दधीचि ऋषीचे उदाहरण आहे.
हाडे सुद्धा सेवेमध्ये देऊन टाकली. आपल्या शरीराचा सुद्धा विचार न करता पूर्ण दिवस
सेवेमध्ये राहणे, याला म्हटले जाते सेवेमध्ये हाडे देणे. एक आहे शारीरिक हड्डी सेवा,
दुसरी आहे रुहानी हड्डी सेवा. रुहानी सेवा करणारे रुहानी नॉलेजच ऐकवत राहतील. धन
दान करताना आनंदाने नाचत राहतील. दुनियेमध्ये मनुष्य जी सेवा करतात ती सर्व आहे
शारीरिक. शास्त्र ऐकवतात, ती काही रुहानी सेवा तर नाहीये. रुहानी सेवा तर फक्त
बाबाच येऊन शिकवतात. स्पिरिच्युअल बाबाच येऊन स्पिरिच्युअल मुलांना (आत्म्यांना)
शिकवतात.
तुम्ही मुले आता सतयुगी दुनियेमध्ये जाण्यासाठी तयारी करत आहात. तिथे तुमच्याकडून
कोणतेही विकर्म होणार नाही. ते आहेच रामराज्य. तिथे असतातच मुळी फार थोडे. आता तर
रावण राज्यामध्ये सर्व दु:खी आहेत ना. हे सारे नॉलेज सुद्धा तुमच्या बुद्धीमध्ये
नंबरवार पुरुषार्थानुसार आहे. या शिडीच्या चित्रामध्येच सर्व नॉलेज येते. बाबा
म्हणतात - हा शेवटचा जन्म पवित्र बना तर पवित्र दुनियेचे मालक बनाल. तुम्हाला अशा
प्रकारे समजावून सांगायचे आहे जेणेकरून लोकांना माहित होईल की आम्ही
सतोप्रधानापासून तमोप्रधान बनलो आहोत, आता पुन्हा आठवणीच्या यात्रेनेच सतोप्रधान
बनणार आहोत. पाहिल्यानंतर बुद्धी चालेल, हे नॉलेज कोणाकडेच नाहीये. म्हणतील -
यामध्ये (शिडीच्या चित्रामध्ये) बाकीच्या धर्मांचा समाचार कुठे आहे. तो मग या
गोळ्याच्या चित्रामध्ये (सृष्टिचक्राच्या चित्रामध्ये) लिहिला आहे. ते नवीन
दुनियेमध्ये तर येत नाहीत. त्यांना शांती मिळते. भारतवासीच स्वर्गामध्ये होते ना.
बाबाच भारतामध्ये येऊन राजयोग शिकवतात, म्हणूनच भारताचा प्राचीन योग सर्वांना
शिकावासा वाटतो. या चित्रांवरून ते स्वतः देखील समजतील. बरोबर नवीन दुनियेमध्ये
फक्त भारतच होता. आपल्या धर्माला देखील समजतील. भले क्राइस्ट धर्म स्थापन करण्यासाठी
आला. यावेळी तो सुद्धा तमोप्रधान आहे. हे रचता आणि रचनेचे किती मोठे ज्ञान आहे.
तुम्ही सांगू शकता आम्हाला कोणाच्याही पैशाची गरज नाही. आम्ही पैशांचे काय करणार.
तुम्ही देखील ऐका, इतरांनाही ऐकवा. ही चित्रे इत्यादी छापून घ्या. या चित्रांचा
उपयोग करायचा आहे. असा हॉल बनवा जिथे हे ज्ञान ऐकवले जाईल. बाकी पैसे घेऊन आम्ही
काय करणार. तुमच्याच घराचे कल्याण होते. तुम्ही फक्त प्रबंध करा. बरेचजण येऊन
म्हणतील - रचता आणि रचनेचे नॉलेज तर खूप चांगले आहे. हे सर्व मनुष्यांनीच समजून
घ्यायचे आहे. परदेशातील हे नॉलेज ऐकून खूप पसंत करतील. खूप खुश होतील. समजतील -
आम्ही देखील बाबांसोबत योग लावणार म्हणजे मग विकर्म विनाश होतील. सर्वांना बाबांचा
परिचय द्यायचा आहे. समजतील हे नॉलेज तर ईश्वरा शिवाय कोणीही देऊ शकणार नाही.
म्हणतात - खुदाने बहिश्त स्थापन केला; परंतु ते कसे येतात, हे कोणालाच ठाऊक नाहीये.
तुमच्या गोष्टी ऐकून खुश होतील आणि मग पुरुषार्थ करून योग शिकतील. तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनण्यासाठी पुरुषार्थ करतील. सेवेसाठी तर खूप विचार करायला पाहिजे.
भारतामध्ये हुनर (कला) दाखवाल तर मग बाबा बाहेर सुद्धा पाठवतील. हे मिशन जाईल. अजून
तर वेळ बाकी आहे ना. नवीन दुनिया बनण्यासाठी वेळ थोडाच लागणार आहे. कुठेही भूकंप
इत्यादी होतात तर २-३ वर्षांमध्ये एकदम नवीन घरे इत्यादी बनवतात. भरपूर कारागीर
असतील, सर्व सामान तयार असेल तर मग बनण्यासाठी थोडाच वेळ लागेल. परदेशामध्ये घरे कशी
बनतात - मिनट मोटर (एका मिनिटाला एक मोटार). तर स्वर्गामध्ये किती लवकर बनत असतील.
सोने-चांदी इत्यादी तुम्हाला भरपूर उपलब्ध असते. खाणींमधून तुम्ही सोने, चांदी, हिरे
घेऊन येता. कला तर सर्व शिकत आहेत. विज्ञानाचा अहंकार किती चालू आहे. हे विज्ञान
नंतर तिथे उपयोगाला येईल. इथे शिकणारे नंतर दुसरा जन्म तिथे घेऊन हे काम करतील.
त्यावेळी तर सर्व दुनिया नवीन होऊन जाते, रावण राज्य नष्ट होते. ५ तत्वे देखील
कायद्यानुसार सेवा करतात, स्वर्ग बनतो. तिथे असा कोणताही उपद्रव होत नाही, रावण
राज्यच नाहीये, सर्व सतोप्रधान आहेत.
सर्वात चांगली गोष्ट
आहे की तुम्हा मुलांचे बाबांवर खूप प्रेम असायला पाहिजे. बाबा खजिना देतात. त्याला
धारण करून दुसऱ्यांना दान द्यायचे आहे. जेवढे दान द्याल तेवढे जमा होत जाईल. सेवा
केली नाहीत तर धारणा कशी होणार? सेवेमध्ये बुद्धी चालली पाहिजे. सेवा तर भरपूर होऊ
शकते. दिवसेंदिवस उन्नती करायची आहे. आपली सुद्धा प्रगती करायची आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सदैव रुहानी
सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे. ज्ञान धन दान करून आनंदामध्ये नाचायचे आहे. स्वतः
धारण करून इतरांकडूनही धारणा करवून घ्यायची आहे.
२) बाबा जो ज्ञानाचा
खजिना देत आहेत, त्याने आपली झोळी भरायची आहे. पॉईंट्स लिहून ठेवायचे आहेत. आणि मग
टॉपिकवर समजावून सांगायचे आहे. ज्ञान धनाचे दान करण्यासाठी उत्साहित राहायचे आहे.
वरदान:-
सत्यतेच्या
महानतेद्वारे नेहमी आनंदाच्या झुल्यामध्ये झोके घेणारे ऑथॉरिटी स्वरूप भव
सत्यतेच्या ऑथॉरिटी
स्वरूप मुलांचे गायन आहे - ‘सच तो बिठो नच’. सत्याची नाव हलेल परंतु बुडू शकणार नाही.
तुम्हाला देखील कोणी कितीही हलविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्ही सत्यतेच्या
महानतेद्वारे आणखीन जास्तच आनंदाच्या झोपाळ्यामध्ये झोके घेत रहा. ते तुम्हाला हलवत
नाहीत परंतु झोपाळ्याला हलवत आहेत. हे हलवणे नाही परंतु झोके देणे आहे त्यामुळे
तुम्ही त्यांना धन्यवाद द्या की, तुम्ही झोके द्या आणि आम्ही बाबांसोबत झोके घेणार.
बोधवाक्य:-
सर्व शक्तींची
लाईट नेहमी सोबत असेल तर माया जवळ येऊ शकणार नाही.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. एकता, स्वच्छता, महीनता,
मधुरता आणि मन, वाणी, कर्मामध्ये महानता - या ५ गोष्टी प्रत्येकाच्या पावलातून
दिसून याव्यात तेव्हा बाबांची प्रत्यक्षता सहज होईल. अजूनपर्यंत संस्कारांमध्ये जी
काही भिन्नता दिसून येत आहे, त्याला एकतेमध्ये आणायचे आहे. एकतेकरिता एकमेकांच्या
मताला आदर द्या, हां जी, हां जी करून आपला विचार अवश्य समोर मांडा आणि मग एकतेच्या
बंधनामध्ये एकजूट होऊन रहा. हीच एकता सफलतेचे साधन आहे.