07-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो,
तुम्हाला नशा असायला पाहिजे की, आम्हाला विश्वाचा मालक बनविण्याकरिता आमचे बाबा
आलेले आहेत, आम्ही त्यांच्या सन्मुख बसलो आहोत”
प्रश्न:-
कर्मांच्या
गुह्य गतीला जाणणारे कोणता पुरुषार्थ अवश्य करतील?
उत्तर:-
आठवणीमध्ये
राहण्याचा, कारण त्यांना ठाऊक आहे की आठवणी द्वारेच जुने हिशोब चुकते होणार आहेत.
ते जाणतात की आत्म्याने जर जुने हिशोब, कर्मभोग चुकते केले नाहीत तर तिला सजा
भोगाव्या लागतील आणि पद देखील भ्रष्ट होईल. पुनर्जन्म देखील तसाच असेल.
ओम शांती।
मुलांना अपार
आनंदाचा पारा चढतो जेव्हा हे बघतात की, बापदादा सन्मुख आले आहेत; आणि मुले हे देखील
जाणतात की, ५ हजार वर्षानंतर पुन्हा शिवबाबा ब्रह्मा तनामध्ये आले आहेत. काय
करण्यासाठी? मुलांना हा शुद्ध नशा चढलेला आहे. सर्व मुले जाणतात की स्वर्गाचा मालक
बनविण्यासाठी बाबा आलेले आहेत. आम्हाला लायक बनवत आहेत. आम्हाला तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनण्याच्या युक्त्या वारंवार सांगत आहेत. युक्ती आहे खूप सोपी. अगदी सोपी
आठवण मुलांना शिकवत आहेत. अज्ञान काळामध्ये पित्याला मूल होते तेव्हा ते समजतात की
आपला वारसदार जन्माला आला. तुम्ही जाणता, यावेळी बाबा येऊन आम्हा मुलांना ॲडॉप्ट
करतात. तसे तर तुम्ही सर्व शिवबाबांची मुले आहात. परंतु बाबा आम्हाला ‘आपले’ कसे
बनवतात, जेणेकरून ते आमच्याशी बोलू शकतील आणि आम्ही त्यांच्याकडून ऐकू शकू? शिवबाबा
या ब्रह्मा तना द्वारे म्हणतात - ‘मी तुमचा पिता आहे’. तुम्हाला स्वर्गाचा मालक
बनवतो. फक्त तुमची आत्मा जी पतित आहे ती ना मुक्तीमध्ये, ना जीवनमुक्ती धाममध्ये
जाऊ शकत. तुम्ही सर्व एका पित्याची मुले आहात. सर्वांना बाबांची संपत्ती घ्यायची आहे.
असंख्य मुले आहेत, वृद्धी होत जाते. ॲडॉप्ट करत जातात. ‘हे आत्म्यांनो, आता तुम्ही
माझी संतान आहात. स्वतःला रूह (आत्मा) समजा’. आपल्याला बाबा भेटले आहेत, ज्यांची
अर्धा कल्प आठवण करत होतो. हे कधीही विसरू नका. अर्धा कल्प आत्मा या शरीरा द्वारे
आठवण करत आली आहे - ‘हे पतित-पावन, हे दुःख हर्ता, सुख कर्ता’; कारण रावण राज्य आहे
ना. भले जे आता समजतात की आम्ही खूप सुखी आहोत, आमच्याकडे इतके करोडो आहेत, इतक्या
मिल्स आहेत, कारखाने इत्यादी आहेत; हे तर सर्व अल्प काळासाठी आहे. शेवटी तर खूप
त्राहि-त्राहि करू लागतील. दुःखाचे डोंगर कोसळतील. इतकी सारी धन-संपत्ती सेकंदामध्ये
नष्ट होईल. बाबांकडून तुम्हाला सेकंदामध्ये वारसा मिळतो. म्हणतात, तुम्हाला
सेकंदामध्ये स्वर्गाची बादशाही देतो. ही जुनी दुनिया नष्ट होईल. युद्ध सुरु होतील,
नैसर्गिक आपत्ती येतील. सफाई तर झाली पाहिजे ना. तुमची आत्मा देखील आता पवित्र बनत
आहे.
बापदादा दोघेही समजू
शकतात, मुले किती मेहनत करतात. बाबांकडून वारसा प्राप्त करण्यासाठी अगदी थोडीशी
मेहनत करायला सांगतात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. ते रुहानी बाबा
निराकार आहेत, आपण आत्मे त्यांना बोलावतो ना. बाबा म्हणतात, तुमची आत्मा जी पतित आहे
ती पावन कशी बनेल? पतित-पावन तर एक बाबाच आहेत ना. पाण्याची नदी जर पतित-पावनी आहे
तर मग लगेच जाऊन डुबकी मारून परत आले पाहिजे. गंगा स्नान खूप करतात तरीही पतित का
आहेत? रात्रं-दिवस हाच सूर लावत राहतात - ‘पतित-पावन सीताराम’, अर्थात सर्व जे भक्त
आहेत किंवा सीता आहेत, त्या सर्वांचे रक्षक एक राम परमपिता परमात्मा आहेत.
पतित-पावन, पतींचेही पती तेच आहेत. ते जेव्हा येतील तेव्हा येऊन पावन बनवतील. तर आता
बाबा सांगत आहेत, तुम्हाला माझ्या श्रीमतावर चालायचे आहे इतर कोणाच्याही मतावर चालू
नका. ते तर समजतात भक्ती केल्याने भगवान भेटेल, जर का भक्ती केल्याने भगवान भेटतात,
तर मग असे का म्हणतात की, भक्तांची रक्षा करण्यासाठी येईल. भक्तांवर कोणते संकट आले
आहे ज्यासाठी रक्षण करतील? रक्षण तेव्हा केले जाते जेव्हा काही संकट आलेले असते.
बाबा म्हणतात, तुम्ही किती दुर्गतीला प्राप्त झाले आहात. हा आहे रौरव नरक, सर्वजण
दुःखी, रोगी आहेत. घरा-घरामध्ये पहा काय चालले आहे. दुःखच दुःख, म्हणून हाका मारत
आहेत - बाबा, आमची दुःख हरण करा, सुख द्या. भारतामध्येच कायमचे सुख होते, आता दुःख
आहे. भारताचीच गोष्ट आहे, बाकीचे इतर खंड तर आहेतच वेगळे, ते तर येतातच मागाहून.
कोणी ६० जन्म, कोणी यांच्यापेक्षाही कमी जन्म घेतात. देवता धर्माचे ८४ जन्म घेतात.
तर या हिशेबाने अर्ध्या कल्पानंतर जे येतील त्यांना ८४ पेक्षा अर्धे जन्म घ्यावे
लागतील. असे नाही की सर्वच ८४ चे चक्र फिरतात. लोकांना तर जे येते ते बोलून टाकतात.
आता तुम्ही मुले बाबांकडून अविनाशी ज्ञान रत्नांनी झोळी भरत आहात. रत्ने तर खूप
मौल्यवान आहेत. बाबा देखील खूप सोपे करून समजावून सांगतात. बाबा म्हणतात - तुम्ही
मला बोलावत आला आहात - ‘हे पतित-पावन, येऊन आम्हाला पावन बनवा’, तर बाबा आले आहेत.
आता तुम्ही समजता, आपण जर पावन बनलो तर स्वर्गाचे मालक बनणार. शिवबाबा आम्हाला
पत्थर-बुद्धी पासून पारस-बुद्धी, पत्थरनाथ पासून पारसनाथ बनविण्यासाठी आले आहेत.
भक्ती मार्गातील सर्व चित्रे दगडांची बनलेली आहेत. दगडांवर माथा टेकवतात. बाबा
म्हणतात - तुम्ही भले कितीही मेहनत करा, फायदा काहीही होणार नाही. पूर्वी तर तुम्ही
बळी चढत होता. तरीही काही फायदा झाला का? फार-फार तर देवीचा साक्षात्कार होईल,
पुन्हा मग जसे होते तसे. पतित-पावन बाबा, संगमावर एकदाच येतात. सतयुगामध्ये तर
भक्तिमार्गाच्या गोष्टी असतच नाहीत. बाबा काही सांगत नाहीत की गळा कापा, असे करा.
भक्तिमार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काय-काय करत असतात. पूर्वी देवतांवर मनुष्याचा
बळी चढवत होते. बाबा म्हणतात, तुम्ही सुधारलेले होता तेव्हा देवता होता. आता किती
पत्थर-बुद्धी बनले आहात. तुम्हाला स्वर्गाची बादशाही दिली होती. किती सोने,
हिरे-माणकांचे महाल होते, अथाह धन होते. ते सर्व तुम्ही काय केले? आता तुम्ही किती
दुःखी झाले आहात. तुम्ही मूळचे देवी-देवता धर्माचे होता ना. आता तुम्ही फक्त रजो-तमो
मध्ये आला आहात. तुम्ही तर देवता धर्माचे होता, तर मग स्वतःला हिंदू का म्हणवून घेता?
बाकीच्या सर्व धर्मांचे लोक आपल्या-आपल्या धर्मालाच मानतात. धर्म तर एकच असतो ना.
मुसलमानांचा मुस्लिम धर्म, ख्रिश्चनांचा ख्रिश्चन धर्म चालत आला आहे. मग तुम्हाला
काय झाले आहे? तुम्ही तर खूप सुखी, पवित्र, संपूर्ण निर्विकारी होता. आता किती
विकारी बनले आहात. कोणालाच ठाऊक सुद्धा नाहीये की, खरोखर आपण संपूर्ण निर्विकारी
होतो, तर मग संपूर्ण विकारी कसे बनलो? ८४ जन्म घेत-घेत सतो पासून तमो बनलो, आता
एकदमच तमोप्रधान, पतित आहोत. सतयुगा पासून कलियुगा पर्यंत जरूर यायचेच आहे. सर्व
धर्मांना सतो-रजो-तमोमध्ये यायचेच आहे; वृद्धीला प्राप्त व्हायचेच आहे. तुम्ही
देखील मनुष्य सृष्टी रुपी झाडामध्ये आहात ना. झाडामध्ये पहा - झाडाच्या शेवटी
ब्रह्मा उभे आहेत; झाडाच्या वर टोकाला ब्रह्माच ८४ जन्म घेऊन शेवटी उभे आहेत. तुम्ही
देखील खाली जे ब्राह्मण बसला आहात तेच मग शेवटी पतित शूद्र बनला आहेत. त्यानंतर मग
खाली राजयोग शिकत आहात. तुम्ही देखील शूद्र होता, आता ब्राह्मण बनला आहात. या नीट
समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आता या मनुष्य सृष्टी रुपी झाडामध्ये व्यवस्थित
स्पष्ट करून दाखवले आहे. आता तुम्ही राजयोगाची तपस्या करत आहात, तुमचेच यादगार उभे
आहे. हे चैतन्य दिलवाडा मंदिर, ते आहे जड. सतयुगामध्ये हे मंदिर नव्हते. यावेळी
तुम्ही आपले यादगार बघत आहात. तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये खऱ्या-खऱ्या दिलवाडा
मंदिरामध्ये चैतन्य रूपात बसले आहात. स्वर्गाची स्थापना होत आहे. मग स्वर्गामध्ये
याल तेव्हा ही मंदिरे इत्यादी काहीही असणार नाहीत. हे मम्मा, बाबा आणि आपण मुले बसलो
आहोत. हुबेहूब हे तुमचे मंदिर आहे. नावच ठेवले आहे - मधुबन, चैतन्य दिलवाडा मंदिर.
आणि नंतर मग जेव्हा भक्तिमार्ग सुरू होईल तेव्हा पुन्हा हे मंदिर बनवतील. बाबांनी
तुम्हाला अतिशय श्रीमंत बनवले होते, तर तुम्हीच मग त्यांचे मंदिर बनवता. शिवाचे
मंदिर काही एकच बनवत नाहीत, सर्वजण आपापल्या योग्यतेनुसार, कुवतीनुसार शिवाची मंदिरे
बनवतात.
तुम्ही जाणता आपण
पूज्य होतो, मग द्वापर मध्ये पुजारी बनलो आहोत. शिवबाबा जे इतके श्रीमंत बनवतात,
भक्तीमध्ये मग तुम्हीच त्यांचे मंदिर बनवाल. या गोष्टी आता तुम्हीच जाणता. तर आता
पुरुषार्थ करून पुन्हा राजांचाही राजा बनले पाहिजे. सतयुगामध्ये म्हटले जाते - ‘महाराजा’.
त्रेतामध्ये म्हटले जाते - ‘राजा’. आणि मग दुनिया जेव्हा पतित बनते तेव्हा सर्व
महाराजा देखील पतित, सर्व राजा देखील पतित असतात. ते निर्विकारी महाराजांची मंदिरे
बनवून त्यांची पूजा करतात. सर्वप्रथम शिवाचे मंदिर बनवतात, नंतर मग देवतांची बनवतात,
स्वतःच मंदिर बनवून पूजा करतात. ८४ जन्म तर उपभोगतात ना. अर्धे कल्प तुम्ही पूज्य,
मग अर्धे कल्प पुजारी बनता. मनुष्य मग समजतात भगवान आपेही पूज्य, आपेही पुजारी आहेत.
सर्व काही आपणच देतात, आणि आपणच हिरावून घेतात. अच्छा, जर त्यांनी दिले आणि घेतले,
तर मग तुम्हाला चिंता का वाटते? तुम्ही तर ट्रस्टी झालात. मग रडण्याची काय गरज आहे!
बाबा बसून आत्म्यांना समजावून सांगत आहेत. आता तुम्ही नंबरवार आत्म-अभिमानी बनत
आहात. काही जण तर बाबांची अजिबातच आठवण करत नाहीत. देही-अभिमानी होऊन राहतच नाहीत.
इथे किती समजावून सांगितले जाते - ‘अरे, तुम्ही आत्मा आहात, परमात्मा तुम्हाला
शिकवत आहेत’. आत्म्यामध्येच संस्कार असतात. आत्माच बॅरिस्टर इत्यादी बनते, आत्माच
मॅजिस्ट्रेट बनते. उद्या काय बनतील? आत्मा जर बाबांची चांगल्या रीतीने आठवण करत
राहिली तर मग अमरलोकमध्ये जाऊन जन्म घेईल. दुसरा जन्म मग मृत्युलोक मध्ये घेणार नाही.
जर काही हिशोब राहिलेला असेल तर सजा भोगावी लागेल. कर्मभोग, भोगून चुकता करावा
लागेल, आणि मग उच्च पदही मिळणार नाही. ही कर्मांची गुह्य गती बाबा, मुलांनाच बसून
समजावून सांगतात. हे देखील मुले जाणतात - सतयुग आहे सतोप्रधान. तिथे प्रत्येक वस्तू
सतोप्रधान असते. म्हणतात - कृष्ण गायी चरायला नेत असे. राजे काय गायींची देखभाल
करतील का? अशी गोष्ट तर असू शकत नाही. असे दाखवतात की, सतयुगामध्ये गायी देखील खूप
फर्स्टक्लास असतात, त्यांना कामधेनू म्हटले जाते. जगत-अंबा सरस्वती देखील कामधेनू
आहे. २१ जन्मांसाठी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते. तुम्ही देखील कामधेनू आहात.
तेच नाव मग गायीला दिले आहे, जी खूप दूध देते. राजांच्या घरी अतिशय फर्स्टक्लास गायी
असतात. जेव्हा की इथे देखील राजांकडे अशा चांगल्या-चांगल्या गायी आहेत तर मग
स्वर्गामध्ये किती सुंदर असतील! तिथे कुठलीही दुर्गंधी इत्यादी अजिबात नसते. आता
बाबा मुलांना सांगत आहेत की, मी आलो आहे, तुम्हाला गुल-गुल (फूल) बनवून सोबत घेऊन
जाणार. मला बोलावताच मुळी - ‘हे पतित-पावन, या. पतित दुनिया, पतित शरीरामध्ये या’.
हे (साकार ब्रह्मा बाबा) आहेत पतित, ते (सूक्ष्म वतनमधील ब्रह्मा बाबा) आहेत पावन
फरिश्ता. तुलना दाखवतात. तुम्ही देखील पतितापासून असे पावन फरिश्ता बनाल.
सतयुगी देवतांना
‘डीटी’ (दैवी) म्हणतात. सूक्ष्मवतनवासी आहेत - फरिश्ते. आता तुम्ही फरिश्ते पवित्र
बनत आहात. बाबा किती सहज ज्ञान देतात. इथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा बाहेरचे
मित्र-संबंधी, घरदार, कामधंदा इत्यादी कशाचीही आठवण येता कामा नये. बाबांच्या
सन्मुख आला आहात ना. इथे आलाच आहात - योगाची कमाई करण्यासाठी, तर यामध्येच व्यस्त
राहिले पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सजेपासून
सुटका होण्यासाठी सर्व जुने हिशोब योगबलाद्वारे चुकते करायचे आहेत. ट्रस्टी होऊन
सर्व काही सांभाळायचे आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. आत्म-अभिमानी
बनायचे आहे.
२) ही कमाई करण्याची
वेळ आहे, यावेळेत घरदार, कामधंदा इत्यादीची आठवण करायची नाही. फरिश्ता बनण्यासाठी
एका बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
आठवणीच्या
सर्च लाईट द्वारे वायुमंडळ बनविणारे विजयी रत्न भव
सेवाभावी आत्म्यांच्या
मस्तकावर विजयाचा तिलक लागलेलाच आहे; परंतु ज्या स्थानाची सेवा करायची आहे, त्या
स्थानावर आधीपासूनच सर्च लाईटचा प्रकाश टाकला पाहिजे. आठवणीच्या सर्च लाईट द्वारे
असे वायुमंडळ बनेल की अनेक आत्मे सहजच जवळ येतील. आणि मग कमी वेळामध्ये हजार पटीने
सफलता मिळेल; यासाठी दृढ संकल्प करा की, ‘आम्ही विजयी रत्न आहोत’, म्हणजे मग
प्रत्येक कर्मामध्ये विजय सामावलेलाच आहे.
बोधवाक्य:-
जी सेवा
स्वतःला अथवा दुसऱ्याला डिस्टर्ब करते ती सेवा, सेवा नाही तर ओझे आहे.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
ज्वाळा रूप बनण्यासाठी
सदैव हीच धून राहावी की आता परत घरी जायचे आहे. जायचे आहे अर्थात उपराम. जेव्हा
आपल्या निराकारी घरी जायचे आहे, तर तसा आपला वेष बनवायचा आहे. तर जायचे आहे आणि
सर्वांना परत घेऊन जायचे आहे - या स्मृतीद्वारे आपोआप सर्व नाती, सर्व प्रकारच्या
प्रकृतीच्या आकर्षणापासून उपराम अर्थात साक्षी बनाल. साक्षी बनल्याने सहजच बाबांचे
साथीदार आणि पित्या समान बनाल.