07-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - अविनाशी ज्ञान रत्न धारण करून आता तुम्हाला गरिबापासून श्रीमंत बनायचे आहे, तुम्ही आत्मा रूप-बसंत आहात”

प्रश्न:-
कोणती शुभ-भावना ठेवून पुरुषार्थामध्ये नेहमी तत्पर रहायचे आहे?

उत्तर:-
नेहमी हीच शुभ-भावना ठेवायची आहे की, आपण आत्मे सतोप्रधान होतो, आपणच बाबांकडून शक्तीचा वारसा घेतला होता आता पुन्हा घेत आहोत. याच शुभ-भावनेने पुरुषार्थ करून सतोप्रधान बनायचे आहे. हा विचार करायचा नाही की, सर्व थोडेच सतोप्रधान बनतील. नाही, आठवणीच्या यात्रेवर राहण्याचा पुरुषार्थ करत रहायचा आहे, सेवेने शक्ती भरायची आहे.

गीत:-
इस पाप की दुनिया से…

ओम शांती।
हे आहे शिक्षण. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे; बाकीचे जे पण सत्संग इत्यादी आहेत, ते सर्व आहेत भक्तीसाठी. भक्ती करत-करत भिकारी बनले आहेत. ते (या दुनियेतील) भिकारी, गरीब वेगळे आहेत, तुम्ही वेगळ्या प्रकारचे भिकारी आहात. तुम्ही श्रीमंत होता, आता गरीब बनले आहात. हे कोणालाच माहित नाही की आपण श्रीमंत होतो, तुम्ही ब्राह्मण जाणता - आपण विश्वाचे मालक श्रीमंत होतो. अमीरचंद पासून फकीरचंद बनलो आहोत. आता हे आहे शिक्षण, जे चांगल्या रीतीने शिकायचे आहे, धारण करायचे आहे आणि धारण करविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अविनाशी ज्ञान रत्न धारण करायची आहेत. आत्मा ‘रूप-बसंत’ आहे ना. आत्माच धारण करते, शरीर तर विनाशी आहे. जी वस्तू उपयोगाची नसते, त्याला जाळून टाकले जाते. शरीर देखील काही उपयोगाचे राहत नाही तर त्याला अग्नीमध्ये जाळतात. आत्म्याला तर जाळत नाहीत. आपण आत्मा आहोत, जेव्हापासून रावणराज्य सुरू झाले आहे तेव्हापासून मनुष्य देह-अभिमानामध्ये आले आहेत. मी शरीर आहे, हे पक्के होते. आत्मा तर अमर आहे, अमरनाथ बाबा येऊन आत्म्यांना अमर बनवितात. तिथे तर आपल्या वेळेवर स्वेच्छेने एक शरीर सोडून दुसरे घेतात कारण आत्मा मालक आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा शरीर सोडेल. तिथे शरीराचे आयुष्य जास्त असते. सापाचे उदाहरण आहे. आता तुम्ही जाणता ही तुमची अनेक जन्मांच्या अंतीम जन्मातील जुनी खाल (शरीर) आहे. ८४ जन्म पूर्ण घेतले आहेत. कोणाचे ६०-७० जन्म देखील आहेत, कोणाचे ५० आहेत, त्रेतामध्ये जरूर थोडेफार आयुष्य कमी होते. सतयुगामध्ये पूर्ण आयुष्य असते. आता पुरुषार्थ करायचा आहे की आपण सर्वात पहिले सतयुगामध्ये यावे. तिथे ताकद असते तर अकाली मृत्यू होत नाही. ताकद कमी होते तर मग आयुष्य देखील कमी होते. आता जसे बाबा सर्वशक्तिमान आहेत, तुमच्या आत्म्याला देखील शक्तिवान बनवतात. एक तर पवित्र बनायचे आहे आणि आठवणीमध्ये रहायचे आहे तेव्हा शक्ती मिळते. बाबांकडून शक्तीचा वारसा घेता. पाप आत्मा काही शक्ती घेऊ शकत नाही. पुण्य-आत्मा बनते तर शक्ती मिळते. हा विचार करा - आपली आत्मा सतोप्रधान होती. नेहमी शुभ-भावना ठेवली पाहिजे. असे नाही की सगळे थोडेच सतोप्रधान असतील. कोणी तर सतो देखील असतील ना. नाही, स्वतःला समजले पाहिजे आपण सर्वात पहिले सतोप्रधान होतो. निश्चयानेच सतोप्रधान बनाल. असे नाही की, आम्ही कसे सतोप्रधान बनू शकणार. मग बाजूला होतात. आठवणीच्या यात्रेवर राहत नाहीत. जितके शक्य होईल पुरुषार्थ केला पाहिजे. स्वतःला आत्मा समजून सतोप्रधान बनायचे आहे. यावेळी सर्व मनुष्य मात्र तमोप्रधान आहेत. तुमची आत्मा देखील तमोप्रधान आहे. आत्म्याला आता सतोप्रधान बनायचे आहे बाबांच्या आठवणीने. आठवणी सोबत सेवा देखील कराल तर ताकद मिळेल. समजा कोणी सेंटर उघडतात तर अनेकांचे आशीर्वाद त्यांच्याकडे जमा होतील. मनुष्य धर्मशाळा बनवतात की कोणीही आले तर विश्रांती मिळावी. आत्मा खुश होईल ना. राहणाऱ्यांना आराम मिळतो तर त्यांचा आशीर्वाद बनवणाऱ्याला मिळतो. मग परिणाम काय होईल? दुसऱ्या जन्मामध्ये तो सुखी होईल. चांगले घर मिळेल. घराचे सुख मिळेल. असे होणार नाही की कधीही आजारी पडणार नाही. फक्त घर चांगले मिळेल. हॉस्पिटल उघडले असेल तर आरोग्य चांगले राहील. युनिव्हर्सिटी उघडली असेल तर शिक्षण चांगले मिळेल. स्वर्गामध्ये तर ही हॉस्पिटल्स इत्यादी असत नाहीत. इथे तुम्ही पुरुषार्थाद्वारे २१ जन्मांसाठी प्रारब्ध बनवता. बाकी तिथे हॉस्पिटल, कोर्ट, पोलीस इत्यादी काहीच नसेल. आता तुम्ही येता सुखधाम मध्ये. तिथे वजीर (मंत्री) सुद्धा नसतो. उच्च ते उच्च स्वतः महाराजा-महाराणी, ते वजीराचे मत थोडेच घेतील. मत तेव्हा मिळते जेव्हा बेअक्कल बनतात, जेव्हा विकारामध्ये जातात. रावण राज्यामध्ये एकदम बेअक्कल, तुच्छ-बुद्धि बनतात म्हणून विनाशाचा मार्ग शोधत राहतात. स्वतः समजतात आम्ही विश्वाला खूप उच्च बनवितो परंतु हे तर अजूनच खाली घसरत जातात (अधोगती होते). आता विनाश समोर उभा आहे.

तुम्ही मुले जाणता आपल्याला घरी जायचे आहे. आपण भारताची सेवा करून दैवी राज्य स्थापन करतो. मग आम्ही राज्य करणार. गायले देखील जाते - फॉलो फादर. फादर शोज सन, सन शोज फादर. मुले जाणतात - यावेळी शिवबाबा ब्रह्माच्या तना मध्ये येऊन आपल्याला शिकवत आहेत. समजावून सांगायचे देखील असे आहे - ‘आम्ही ब्रह्माला भगवान किंवा देवता इत्यादी मानत नाही. हे तर पतित होते, बाबांनी पतित शरीरामध्ये प्रवेश केला आहे’. झाडाच्या चित्रामध्ये पहा वर शेंड्याला उभे आहेत ना. पतित आहेत मग खाली पावन बनण्यासाठी तपस्या करून पुन्हा देवता बनतात. तपस्या करणारे आहेत ब्राह्मण. तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी सर्व राजयोग शिकत आहात. किती क्लिअर आहे. यामध्ये योग खूप चांगला पाहिजे. आठवणीमध्ये राहिला नाहीत तर मुरलीमध्ये देखील ती ताकद राहणार नाही. ताकद मिळते शिवबाबांच्या आठवणीने. आठवणीनेच सतोप्रधान बनाल, नाहीतर सजा भोगून मग कमी पद घ्याल. मूळ गोष्ट आहे आठवणीची, ज्यालाच ‘भारताचा प्राचीन योग’ म्हटले जाते. नॉलेज विषयी कोणालाच माहित नाही आहे. पूर्वीचे ऋषी-मुनी म्हणत होते - ‘रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला आम्ही जाणत नाही’. तुम्ही देखील अगोदर काहीच जाणत नव्हता. या ५ विकारांनीच तुम्हाला एकदम वर्थ नॉट ए पेनी बनविले आहे. आता ही जुनी दुनिया जळून एकदम नष्ट होणार आहे. काहीच राहणार नाही. तुम्ही सर्व नंबरवार पुरुषार्थानुसार भारताला स्वर्ग बनविण्यासाठी तन-मन-धनाने सेवा करता. प्रदर्शनीमध्ये देखील तुम्हाला विचारले तर बोला - ‘आम्ही बी.के. आमच्याच तन-मन-धनाने श्रीमतावर सेवा करून राम-राज्य स्थापन करत आहोत’. गांधीजी तर असे म्हणत नव्हते की श्रीमतावर आम्ही राम-राज्य स्थापन करत आहोत. इथे तर यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) श्री श्री १०८, बाबा बसले आहेत. १०८ ची माळा देखील बनवतात. माळा तर खूप मोठी बनते. त्यामध्ये ८-१०८ चांगली मेहनत करतात. नंबरवार तर खूप आहेत, जे चांगली मेहनत करतात. रुद्र यज्ञ असतो तर शाळीग्रामांची देखील पूजा होते. जरूर काही सेवा केली आहे तेव्हाच तर पूजा होते. तुम्ही ब्राह्मण रुहानी सेवाधारी आहात. सर्वांच्या आत्म्यांना जागृत करणारे आहात. मी आत्मा आहे, हे विसरल्याने देह-अभिमान येतो. असेच समजतात की ‘मी अमका आहे’. कोणालाही हे माहीत थोडेच आहे की ‘मी आत्मा आहे, अमके नाव तर या शरीराचे आहे’. आपण आत्मे कोठून येतो - याची कोणालाही जरा सुद्धा कल्पना नाही. इथे पार्ट बजावता-बजावता शरीराचे भान पक्के झाले आहे. बाबा म्हणतात - मुलांनो, आता चुका करणे सोडा. माया खूप जबरदस्त आहे, तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहात. तुम्ही आत्म-अभिमानी बना. आत्म्यांचा आणि परमात्म्याचा हा मेळा आहे. गायन आहे आत्मा-परमात्मा अलग रहे बहुकाल. याचा देखील अर्थ ते जाणत नाहीत. तुम्ही आता जाणता - आपण आत्मे बाबांसोबत राहणारे आहोत. ते आत्म्यांचे घर आहे ना. बाबा देखील तिथेच आहेत, त्यांचे नाव आहे - शिव. शिव जयंती देखील गायली जाते, दुसरे कोणते नाव देऊ सुद्धा नये. बाबा म्हणतात - माझे खरे नाव आहे - ‘कल्याणकारी शिव’. कल्याणकारी रुद्र म्हटले जाणार नाही. ‘कल्याणकारी शिव’ म्हटले जाते. काशीमध्ये देखील शिवाचे मंदिर आहे ना. तिथे जाऊन साधू लोक मंत्र जपतात. शिव काशी विश्वनाथ गंगा. आता बाबा म्हणतात - शिव जे काशीच्या मंदिरामध्ये बसवले आहेत, त्यांना म्हटले जाते - विश्वनाथ. आता मी काही विश्वनाथ तर नाहीये. विश्वाचे नाथ तर तुम्ही बनता. मी बनतच नाही. ब्रह्म तत्त्वाचे नाथ देखील तुम्हीच बनता. तुमचे ते घर आहे. ती राजधानी आहे. माझे घर तर एकच ब्रह्म तत्व आहे. मी स्वर्गामध्ये येत नाही. ना मी नाथ बनतो. मला म्हटलेच जाते - शिवबाबा. माझा पार्टच आहे पतितांना पावन बनविण्याचा. शीख लोक देखील म्हणतात - ‘मूत पलीती कपड धोए…’ परंतु अर्थ समजत नाहीत. महिमा देखील गातात - ‘एकोअंकार…’ अजोनि अर्थात जन्म-मरण रहित. मी काही ८४ जन्म घेत नाही. मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतो. मनुष्य ८४ जन्म घेतात. यांची आत्मा जाणते - बाबा माझ्या सोबत एकत्र बसले आहेत तरी देखील वारंवार आठवण विसरायला होते. या दादांची आत्मा म्हणते - ‘मला खूप मेहनत करावी लागते. असे नाही की माझ्या सोबत बसले आहेत तर चांगली आठवण राहते, नाही. अगदी एकत्र आहेत. जाणतो ते माझ्याजवळ आहेत. या शरीराचे जसे ते मालक आहेत. तरी देखील विसरतो. बाबांना हे घर (शरीर) दिले आहे राहण्यासाठी. बाकी एका कोपऱ्यात मी बसतो. मोठी आसामी झाली ना. विचार करतो, बाजूला मालक बसले आहेत. हा रथ त्यांचा आहे. ते याची संभाळ करतात. शिवबाबा मला जेवू देखील घालतात. मी त्यांचा रथ आहे. काही तरी खातिरी करतील. या आनंदामध्ये खातो आणि दोन-चार मिनिटा नंतर विसरून जातो, तेव्हा समजते मुलांना किती मेहनत करावी लागत असेल म्हणून बाबा समजावून सांगत राहतात - जितके शक्य होईल बाबांची आठवण करा. खूप-खूप फायदा आहे. इथे तर थोड्याशा गोष्टीवरून नाराज होतात मग शिक्षणालाच सोडून देतात. बाबा-बाबा म्हणत फारकती देतात (सोडचिठ्ठी देतात). बाबांना आपले बनावन्ती, ज्ञान सुनावन्ती, पशन्ती, दिव्य दृष्टीने स्वर्ग देखन्ती, रास करन्ती, अहो मम् माया मला फारकती देवन्ती, भागन्ती. जे विश्वाचा मालक बनवतात त्यांनाच सोडचिठ्ठी देता. मोठमोठे नामीग्रामी देखील सोडचिठ्ठी देतात.

आता तुम्हाला रस्ता सांगितला जातो. असे नाही की हाताला पकडून घेऊन जातील. या डोळ्यांनी आंधळे तर नाही आहात. हा ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हाला मिळतो. तुम्ही सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणता. हे ८४ चे चक्र बुद्धीमध्ये फिरले पाहिजे. तुमचे नाव आहे स्वदर्शन चक्रधारी. एका बाबांचीच आठवण करायची आहे. इतर कोणाचीही आठवण राहू नये. अंताला ही अवस्था रहावी. जसे पत्नीचे पतीवर प्रेम असते. त्यांचे आहे जिस्मानी प्रेम, इथे तुमचे आहे रूहानी प्रेम. तुम्ही उठता-बसता, पतींचेही पती, पित्यांच्याही पित्याची आठवण करायची आहे. दुनियेमध्ये अशी खूप घरे आहेत जिथे पती-पत्नी आणि परिवार आपसामध्ये अतिशय प्रेमाने राहतात. घरामध्ये जसा स्वर्ग बनलेला असतो. ५-६ मुले एकत्र राहतात, पहाटे लवकर उठून पूजेसाठी बसतात, घरामध्ये कसलेही भांडण इत्यादी नसते. एकोप्याने राहतात. काही ठिकाणी तर मग एकाच घरामध्ये कोणी राधा-स्वामींचे शिष्य असतील, तर कोणी मग धर्मालाच मानत नाहीत. छोट्याशा गोष्टीवरून नाराज होतात. तर बाबा म्हणतात - या अंतिम जन्मामध्ये पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. आपला पैसा देखील सफल करून आपले कल्याण करा. तर भारताचे देखील कल्याण होईल. तुम्ही जाणता - आपण श्रीमतावर आपली राजधानी पुन्हा स्थापन करत आहोत. आठवणीच्या यात्रेद्वारे आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणल्यानेच आपण चक्रवर्ती राजा बनणार; त्यानंतर मग उतरणे सुरू होईल. मग शेवटाला बाबांकडे येतील. श्रीमतावर चालल्यानेच उच्च पद मिळेल. बाबा काही फाशीवर चढवत नाहीत. एक तर म्हणतात - पवित्र बना आणि बाबांची आठवण करा. सतयुगामध्ये कोणी पतित असत नाही. देवी-देवता देखील फारच थोडे असतात. मग हळू-हळू वृद्धी होते. देवतांचे आहे छोटे झाड. नंतर मग किती वृद्धी होत जाते. सर्व आत्मे येत राहतात, हा पूर्व नियोजित खेळ आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रुहानी सेवाधारी बनून आत्म्यांना जागृत करण्याची सेवा करायची आहे. तन-मन-धनाने सेवा करून श्रीमतावर रामराज्याची स्थापना करण्यासाठी निमित्त बनायचे आहे.

२) स्वदर्शन चक्रधारी बनून ८४ चे चक्र बुद्धीमध्ये फिरवायचे आहे. एका बाबांचीच आठवण करायची आहे. इतर कोणाचीही आठवण येऊ नये. कधीही कोणत्या गोष्टीने नाराज होऊन शिक्षण सोडायचे नाही.

वरदान:-
संघटनमध्ये राहत असताना लक्ष्य आणि लक्षणाला समान बनविणारे सदा शक्तिशाली आत्मा भव

संघटनमध्ये एकमेकांना पाहून उमंग-उत्साह देखील येतो तर आळशीपणा देखील येतो. विचार करतात - हे देखील करतात, मग मी देखील केले तर काय झाले म्हणून संघटनद्वारे श्रेष्ठ बनण्यासाठी सहयोग घ्या. प्रत्येक कर्म करण्यापूर्वी हे विशेष अटेंशन किंवा लक्ष असावे की मला स्वतःला संपन्न बनवून उदाहरण मूर्त बनायचे आहे. मला बनून मग इतरांनाही बनवायचे आहे. मग वारंवार या लक्षात इमर्ज करा. लक्ष्य आणि लक्षणाला समान बनवत चला तर शक्तिशाली बनाल.

बोधवाक्य:-
लास्ट मधून फास्ट जायचे आहे तर साधारण आणि व्यर्थ संकल्पांमध्ये वेळ घालवू नका.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.

जो आवडता असतो, त्याची आठवण केली जात नाही, त्याची आठवण स्वतःच येते. फक्त प्रेम हृदयापासूनचे असावे, खरे आणि नि:स्वार्थ असावे. जेव्हा म्हणता - ‘मेरा बाबा, प्यारा बाबा’ - तर प्रेम असणाऱ्याला कधीही विसरू शकत नाही आणि नि:स्वार्थ प्रेम बाबांव्यतिरिक्त कोणत्याही आत्म्याद्वारे मिळू शकत नाही म्हणून कधीही स्वार्थी हेतूने आठवण करू नका; नि:स्वार्थ प्रेमामध्ये लवलीन रहा (मग्न रहा).