07-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही इथे श्रीकृष्णासारखे प्रिन्स बनण्यासाठी शिक्षण घेत आहात, तुम्हाला शिकविणारे स्वयं भगवान आहेत”

प्रश्न:-
बाबा जेव्हा ‘भगवानुवाच’ शब्द बोलतात तेव्हा कितीतरी मुले गोंधळून जातात, असे का?

उत्तर:-
कारण भगवान तर गुप्त आहेत. ते समजतात की, कदाचित या दादाने (ब्रह्मा बाबांनी) ‘भगवानुवाच’ बोलले आहेत. परंतु निराकार भगवंताला बोलण्याकरिता मुख जरूर पाहिजे ना. बाबा म्हणतात - ही अतिशय आश्चर्यजनक समजून घेण्याची गोष्ट आहे की, मी यांच्यामध्ये कसा प्रवेश करून तुम्हाला शिकवतो.

ओम शांती।
भगवानुवाच. भगवान काय म्हणत आहेत? हे भगवानुवाच कोणी म्हटले? दिसत तर कोणीच नाही. मनुष्याला काही भगवान म्हटले जात नाही. कोणी समजतील की बोलणारेच ‘भगवानुवाच’ असे म्हणत आहेत. परंतु निराकार भगवान बोलत आहेत, हे फक्त तुम्ही मुलेच जाणता. हे कोण बसले आहेत! भगवान कुठे आहेत! या नवीन गोष्टी आहेत ना, त्यामुळे मनुष्य गोंधळून जातात. परंतु भगवानुवाच आहे जरूर. म्हणतात की, मी मुलांना राजयोग शिकवत आहे. नरापासून नारायण अथवा कृष्ण बनविण्याकरिता, नारीला लक्ष्मी अथवा राधे बनविण्याकरिता योग आणि ज्ञान शिकवत आहे, यांच्याकडून अजून काय पाहिजे! तुम्हाला मी राजांचाही राजा, प्रिन्सचा देखील प्रिन्स बनवतो. प्रिन्स-प्रिन्सेस देखील मंदिरामध्ये तर जात असतील ना. विकारी प्रिन्स, निर्विकारी प्रिन्स श्रीकृष्णाला नमस्कार करतात. तर मी तुम्हाला प्रिन्सचा देखील प्रिन्स बनवतो. श्रीकृष्णासारखे स्वर्गाचा प्रिन्स बना. या ज्ञानाचा अभ्यास केल्यानेच तर असे बनाल ना. डॉक्टर अथवा बॅरिस्टर स्टुडंटला म्हणतील ना की, मी तुम्हाला डॉक्टर अथवा बॅरिस्टर बनवतो. परंतु अभ्यास करतील तेव्हाच तर बनतील ना. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही चांगल्या रीतीने समजत आहात की, राजयोग शिकविणारे एक भगवानच आहेत, श्रीकृष्ण नाही. राधे-कृष्ण तर वेगवेगळ्या राज्यातील मुले आहेत. त्यांचे एकमेकांशी लग्न होते, आणि लग्ना नंतर नाव बदलते म्हणूनच चित्रामध्ये देखील लक्ष्मी-नारायणाच्या खाली राधे-कृष्णाला दाखवले आहे.

आता बाबा चांगल्या रितीने समजावून सांगत आहेत की, हे ब्रह्मा देखील एक नंबरचे भगत होते, पूर्वी नारायणाची पूजा करत होते. श्रीकृष्णाची भक्ती केली अथवा श्री नारायणाची भक्ती केली, गोष्ट एकच आहे. श्रीकृष्णच मोठा झाल्यावर मग नारायण बनतो. आता तुम्हाला नरापासून नारायण नारायण बनण्याकरिता राजयोग शिकवत आहेत. आता तुमचे ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. आता यांची आत्मा (ब्रह्मा बाबांची आत्मा) देखील शिकत आहे, नंतर मग भविष्यामध्ये श्रीकृष्ण बनते. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही ज्ञान-चितेवर बसून गोरे बनता आणि मग काम-चितेवर बसून सावळे बनला आहात. ही आहे कंसपुरी, मी तुम्हाला कृष्णपुरीमध्ये घेऊन जाण्याकरिता आलो आहे. श्रीकृष्णच सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण आहे… इथे कोणातही सर्व गुण नाही आहेत. मी आलो आहे मुलांना संपूर्ण निर्विकारी बनविण्याकरिता. बनायचे आहे - योगबलाद्वारे. बाहुबळ आहे हिंसक लढाई, जी धनुष्य-बाणाद्वारे केली जात असे. त्यानंतर बंदुका, तलवारींद्वारे युद्ध झाले. आता तर बॉम्ब्स द्वारे युद्ध होते. स्वतः म्हणतात की, ‘आम्ही असे बॉम्ब्स बनवतो जे घर बसल्या सगळेच्या सगळे नष्ट होतील. मग लष्कर तरी काय करू शकणार! बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो, ही पाठशाळा आहे. मी तुम्हाला प्रिन्स श्रीकृष्णासारखे बनवतो. जो सतयुगाचा पहिला प्रिन्स होता, तो आता ८४ जन्म घेऊन कलियुगामध्ये गरीब बनला आहे. भारतामध्येच त्यांचे राज्य होते. मग पुनर्जन्म घ्यावा लागेल ना. श्रीकृष्णाला भगवान म्हणता तर भगवान मग पुनर्जन्मामध्ये कसा बरे येईल? भगवान तर निराकार आहेत. ते आहेतच एक रचयिता, बाकी सर्व आहे रचना. तेव्हाच तर म्हणतात की, आपण सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहोत. बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आपसामध्ये भाऊ-बहिणी झालात. तर मग क्रिमिनल एसॉल्ट (अनैतिक कृत्य) कसे होऊ शकते. तुम्ही वारसा एका बाबांकडून घेता - भविष्याकरिता. जर पवित्र राहिला नाहीत तर शांतीधाम, सुखधाममध्ये कसे जाल. बोलावतात देखील - ‘आम्ही पतित बनलो आहोत, पावन बनविण्याकरिता या’. तर बाबा म्हणतात - माझी आठवण करा. हा तुमचा अंतिम जन्म आहे. तुम्ही सर्व आत्मे आता परत वानप्रस्थमध्ये जाऊ शकता त्यामुळे वानप्रस्थी आहात. कोणीही गुरु असा मार्ग सांगू शकणार नाही. हे ज्ञान आहेच एका बाबांकडे. तेच पतित-पावन निराकार आहेत. बाबा म्हणतात की, माझी आठवण करा; थोड्या वेळाकरिता मी या तनाचा आधार घेतला आहे. शरीराशिवाय आत्मा बोलू कशी शकेल? भगवानुवाच आहे की, ‘मी वृद्ध साधारण तनामध्ये प्रवेश करून तुम्हा मुलांना शिकवतो’. मी गर्भामध्ये येत नाही. गर्भामध्ये येणाऱ्याला तर पुनर्जन्मामध्ये यावे लागेल. मी एकदाच येतो. मला प्रकृतीचा आधार अवश्य पाहिजे. मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बसून तुम्हाला शिकवतो. हे तर अगोदर आपला हिऱ्यांचा धंदा करत होते. कोणत्या गुरुने शिकवलेले नाहीये, अचानकच बाबांनी प्रवेश केला. करनकरावनहार असल्याकारणाने यांच्याकडून कर्तव्य करवून घेत राहतात. हे देखील शिकत जातात. तुम्ही देखील सोबत शिकत जाता. ब्रह्मा बाबा म्हणतात - ‘बोलतात तुमच्याशी, परंतु सर्वात आधी मी ऐकतो’. शिवबाबा म्हणतात - तुम्हा मुलांना शिकविण्यासाठी येतो परंतु यांची आत्मा देखील शिकत राहते. मुलांना राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे. असे कधी कोणी शिकवत नाही. ही आहे पावन बनण्याची गोष्ट. हे संगमयुग आहेच पुरुषोत्तम बनण्याचे युग. श्रीकृष्ण पुरुषोत्तम होता. लग्नानंतर काही प्रमाणात त्याची डिग्री कमी होते म्हणून श्रीकृष्णाची महिमा जास्त आहे. नावच आहे - श्रीकृष्णपुरी, याला म्हटले जाते - कंसपुरी. बाकी श्रीकृष्ण आणि कंसाची कहाणी बनवली आहे.

मुलांना समजावून सांगितले आहे की, परिपक्व अवस्था झाली की भक्ती आपोआप सुटेल. तुम्ही कधी कोणाला असे सांगायचे नाही की भक्ती करू नका. त्यांना ज्ञान द्यायचे आहे. बाबा तुम्हाला ज्ञान देऊन स्वर्गाचा प्रिन्स बनविण्याकरिता आले आहेत. श्रीकृष्ण देखील स्वर्गाचा मालक होता, आत्ता नाहीये. आता पुन्हा तो देखील राजयोगाद्वारे बनत आहे. तुम्हाला देखील पुरुषार्थ करून बाबांची आठवण करायची आहे. हेवनची स्थापना करणारे आहेत - हेवनली गॉडफादर. तेच येऊन नवीन सृष्टी रचतात. ते करतील तेव्हा, जेव्हा कलियुगाचा काळ पूर्ण होईल. सतयुग-त्रेतामध्ये येत नाहीत. म्हणतात - मी कल्प-कल्प संगमयुगे येतो. त्यांनी (दुनियावाल्यांनी) ‘कल्प’ शब्द काढून फक्त ‘युगे-युगे’ लिहून ठेवले आहे.

तरी देखील ४ युगे आहेत. पाचवे आहे हे संगमयुग. अच्छा, तर मग पाच अवतार माना. परंतु कच्छ-मच्छ, परशुराम अवतार इतके सारे अवतार असतात काय! या सर्व आहेत शास्त्रांमधल्या गोष्टी. धर्माचे नाव आणि भारताचे नावच बदलून टाकले आहे. हिंदू धर्म आणि हिंदुस्तान म्हणतात. ‘भारत’ हे नाव कशाला बदलले पाहिजे! ‘यदा यदाही धर्मस्य… भारत’. त्यामध्ये देखील ‘भारत’ हा शब्द येतो. बाबा म्हणतात की, तुम्ही काही एक जन्म थोडीच भक्ती केली आहे, द्वापर पासून केली आहे. भक्ती देखील सुरुवातीला अव्यभिचारी होती, फक्त ‘शिव’ची भक्ती करत होते. ज्या शिवबाबांनीच भारताला स्वर्ग बनवला होता आणि आता पुन्हा आम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता आले आहेत. तर पतित शरीरामध्ये बसून सांगत आहेत की, मी येतोच मुळी पतित शरीरामध्ये, पतित दुनियेमध्ये पतितांना पावन बनविण्याकरिता. भक्तिमार्गामध्ये तर तरी देखील माझ्यासाठी खूप भारदस्त मंदिर बनवतात. किती क्लिअर गोष्ट आहे. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बाबांची प्रवेशता झाली आणि गीता इत्यादी वाचणे सोडून दिले. भक्ती सुटली. अनायासेच तर सोडली. तुम्हाला कोणी सांगितले नाही की, भक्ति करू नका म्हणून.

आता तुम्हा मुलांना बाबा समजावून सांगत आहेत की, पुन्हा मी तुम्हाला कृष्णपुरीचा मालक बनवतो. श्रीकृष्णाची मग आठ घराणी चालतात. पहिले म्हणणार - प्रिन्स ऑफ सतयुग त्यानंतर मग बनते किंग ऑफ सतयुग. त्यांच्या आठ पिढ्या चालतात. त्यावेळी तर दुसऱ्या कोणाचेही राज्य नसते. आता बाबा म्हणतात - तुम्ही मुलांनी देखील सतयुगाचे प्रिन्स बना. भक्तीमध्ये अजिबात सुख नाहीये. ज्ञानाद्वारे तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. एखाद्याच्या वडिलांचा मृत्यू जर झाला आणि त्यांना विचारले की तुमचे वडील कुठे गेले! तर म्हणतील - स्वर्गवासी झाले. समजतात की आत्मा आणि शरीर दोन्ही गेले. परंतु शरीर तर इथेच सोडून गेले, बाकी गेली ती तर आत्मा गेली. याचा अर्थ या अगोदर नरकात होते. आत्मा शरीर सोडून स्वर्गामध्ये गेली तर त्यामध्ये रडण्याची काय गरज आहे? स्वर्ग आता इथे आहे काय? परंतु समजत नाहीत. म्हणतात - सर्व ईश्वराची मर्जी आहे. सुख-दुःख सर्व काही ईश्वर देतो, सगळेच ईश्वराची रूपे आहेत. परंतु बाबा म्हणतात की, मी मुलांना दुःख कसे देऊ शकतो. मुले कधी वडिलांकडे दुःख मागतात का? वडील तर मुलांना लायक बनवून प्रॉपर्टी देऊन जातात. बाकी दुःख तर प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसारच मिळते. बाबा म्हणतात की, आता मुले इत्यादी काहीही मागू नका. आता ही प्रॉपर्टी इत्यादी सर्व नष्ट होणार आहे. मग तुमच्या मुलांना काय मिळणार! इतका वेळच नाही आहे जे तुमचा मुलगा तुमच्या प्रॉपर्टीचा मालक बनू शकेल. मुलगा मोठा होईल तेव्हाच तर मालक बनेल, परंतु इतका वेळ नाही आहे. विनाश समोर उभा आहे. मनुष्य तर म्हणतात की, कलियुगाला अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. हे ब्रह्माकुमार-कुमारी तर विनाश-विनाश असे म्हणत राहतात. एक गोष्ट आहे ना - ‘वाघ आला रे वाघ आला…’ अखेरीला आला आणि खाऊन गेला. सर्वांना समजत आहे की, काळ थोडा-थोडा करत येणार. हे तर होतच राहते परंतु तुम्ही म्हणता की महाकाळ आलेला आहे. शिवबाबा काळांचेही काळ आलेले आहेत, जे सर्व आत्म्यांना परत घेऊन जातील. मग शरीर तर जरूर सोडावे लागेल, म्हणून बाबा म्हणतात - ‘योग’द्वारे पवित्र बना. आत्म्यांना पवित्र बनवून मग परत घेऊन जातील. जर पवित्र बनला नाहीत तर शेवटी खूप सजा खावी लागेल आणि उच्च पद सुद्धा प्राप्त करू शकणार नाही. श्रीकृष्ण नंबर वन पास विद् ऑनर आहे, त्याला स्कॉलरशिप मिळते. २१ जन्म राज्य प्राप्त करतात. किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. ज्ञान बुद्धीला पटते देखील आणि मग नाहीसे होते. कोणाचीही भक्ती सोडवायची नाही. बाबा आले आहेत - भक्तांना भक्तीचे फळ देण्याकरिता. म्हणतात - मी कल्पापूर्वीप्रमाणे पुन्हा त्याच साधारण तनामध्ये आलो आहे. कल्प-कल्प येऊन तुम्हाला शिकवतो. हे आहे उच्च ते उच्च शिक्षण.

तुम्ही जाणता आपण सतोप्रधान होतो, आता तमोप्रधान आहोत, आता पुन्हा भारतच सतोप्रधान बनतो. इतर धर्मांच्या लोकांनी इतके सुख बघितलेले नाहीये, तर दुःख सुद्धा बघितलेले नाहीये. परकीयांकडे पैसा तर खूप आहे तर ते गरीब देशाला कर्ज देतात. त्या बिचाऱ्यांना हेच ठाऊक नाहीये की हे तर रिटर्न केले जात आहे. अगदीच घोर अंधारामध्ये कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपी गेले आहेत. शेवटी हाय-हाय करत उठतील. मग तुम्ही म्हणाल - ‘टू लेट’, कारण युद्ध सुरू होईल. मग काय करतील! भंभोरला (दुनियेला) आग लागते तेव्हा मग ‘टू लेट’ होतो, म्हणून बाबा म्हणतात - मुलांनो, आता लवकर-लवकर पुरुषार्थ करत जा. बाबा काही जास्त त्रास देत नाहीत. काही मग बाबांना येऊन म्हणतात की, ‘बाबा, आम्ही जर पूजा केली नाही तर घरातील म्हणतात की, हा तर नास्तिक बनला आहे.’ तर बाबा सल्ला देतात की, साक्षी होऊन, बाबांच्या आठवणीमध्ये राहा. थोडी-थोडी पूजा वर-वर करा. एक असते मनापासून करणे आणि दुसरे असते खुश करण्यासाठी करणे. मनामध्ये तुम्हाला शिवबाबांची आठवण करायची आहे. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर पूजा केल्यासारखे दाखवा, म्हणजे मग ते खूप खुश होतील. हे काही पापाचे काम नाही आहे.’ बाबा तर बऱ्याच जणांना सांगतात की लग्न इत्यादीला भले जा. दोन्ही बाजूने तोड निभावायची आहे. तिथे देखील हे ज्ञान ऐकवता-ऐकवता कोणालातरी तीर लागेल. युक्तीने चालायचे आहे. बाबांचा आदेश आहे की, आता पतित बनायचे नाही. पवित्र बनल्यानेच तुम्ही श्रीकृष्णपुरीचे मालक बनाल. शिवबाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि विश्वाचे मालक बनाल. मुलांनो, अशाप्रकारे युक्तीने आपल्या मित्र-परिवाराला समजावून सांगायचे आहे. ती आहे भौतिक यात्रा, ही आहे रुहानी यात्रा. ही रूहानी यात्रा बाबा शिकवतात. म्हणतात की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा म्हणजे मग पतितापासून पावन बनाल आणि सर्व दुःख दूर होतील. कोणी विरळा व्यापाऱ्याने व्यापार करावा अर्थात वैकुंठाची बादशाही घ्यावी. श्रीमतावर चालत राहा. असे देखील होऊ नये की पैसा इत्यादी कुठे फुकट जाईल, काहीच फळ निघणार नाही. घरदार सुद्धा सांभाळायचे आहे, मुलांचे संगोपन देखील करायचे आहे. फक्त श्रीमतावर चालायचे आहे. सल्ला घ्यायचा आहे की ‘बाबा, या परिस्थितीमध्ये मी काय करू! बाबा, मुलगी म्हणते की मी लग्न करू?’ तर बाबा म्हणतात की, लग्न तर करून द्यावेच लागेल कारण त्यांचा हिस्सा आहे, त्यांना द्या. बाबा फक्त म्हणतात की तरीही काही विचारायचे असेल तर विचारून श्रीमतानुसार चाला. मुलांनी बाबांच्या आज्ञेप्रमाणे चालायचे आहे, यामध्येच कल्याण आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) प्रत्येक कर्म साक्षी होऊन शिवबाबांच्या आठवणीमध्ये करायचे आहे. लौकिक, अलौकिक दोन्हीकडे तोड निभावायची आहे. लौकिकवाल्यांसोबत युक्तीने चालायचे आहे.

२) यावेळी अंतिम जन्मामध्ये देखील ही वानप्रस्थ अवस्था आहे. घरी परत जायचे आहे त्यामुळे पावन जरूर बनायचे आहे. कोणतीही बंधने (नाती) बनवायची नाहीत.

वरदान:-
आदेशाच्या पालने द्वारे सर्व इच्छांना नष्ट करणारे मायाप्रूफ भव

अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत दिनचर्येमध्ये जे काही आदेश मिळालेले आहेत, त्यानुसारच आपली वृत्ती, दृष्टी, संकल्प, स्मृती, सेवा आणि नात्यांना चेक करा. जे प्रत्येक संकल्पामध्ये, प्रत्येक पावलाला आदेशाचे पालन करतात त्यांच्या सर्व इच्छा नष्ट होतात. आतमध्ये जर पुरुषार्थाची अथवा सफलतेची इच्छा जरी राहिली असेल तरी देखील जरूर कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या आदेशाचे पालन केले जात नाही आहे. तर जेव्हा पण एखादी अडचण आली तर चारही बाजूने चेक करा - यामुळे आपोआप माया प्रूफ बनाल.

बोधवाक्य:-
आपल्या सूक्ष्म कमजोरींचे चिंतन करून त्यांना नष्ट करणे - हेच स्व-चिंतन आहे.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

जसे एखादे स्थान रिकामे असते तर ऑलराऊंड सेवाधारी समयानुसार ती जागा भरून काढतात. तसेच जर एखाद्यामध्ये विशिष्ट शक्तीची उणीव जाणवत असेल तरी देखील आपल्या सहयोगाद्वारे ती जागा भरून काढा, जेणेकरून दुसऱ्यामधील उणिवेची देखील इतर कोणालाही जाणीव होऊ नये, याला म्हटले जाते - दात्याची मुले बनून समयानुसार त्याला सहयोगाची भेट देणे.