07-12-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
02.02.2008 ओम शान्ति
मधुबन
संपूर्ण
पवित्रतेद्वारे रुहानी रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीचा अनुभव करत, आपल्या मास्टर ज्ञान -
सूर्य
स्वरूपाला इमर्ज करा
आज बापदादा चारही
बाजूंच्या आपल्या रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीच्या परिवाराला बघत आहेत. या रॉयल्टी आणि
रुहानी पर्सनॅलिटीचे फाउंडेशन आहे - संपूर्ण प्युरिटी. प्युरिटीची निशाणी सर्वांच्या
मस्तकावर, सर्वांच्या डोक्यावर लाइटचा ताज चमकत आहे. असे चमकत असलेले ताजधारी रुहानी
रॉयल्टी, रुहानी पर्सनॅलिटी वाले फक्त तुम्ही ब्राह्मण परिवाराचेच आहात कारण
प्युरिटीला (पवित्रतेला) स्वीकारले आहे. तुम्हा ब्राह्मण आत्म्यांच्या प्युरिटीचा
प्रभाव आदि काळापासून प्रसिद्ध आहे. आठवतो आहे का आपला अनादि आणि आदि काळ! आठवण करा
अनादि काळामध्ये देखील तुम्ही प्युअर आत्मे आत्मा रूपामध्ये देखील विशेष चमकत असलेले
तारे, चमकत राहता; बाकीचे देखील आत्मे आहेत परंतु तुम्हा ताऱ्यांची चमक सर्वांसोबत
असताना सुद्धा विशेष चमकत असते. जसे आकाशामध्ये तारे अनेक असतात परंतु काही काही
विशेष तारे स्पेशल चमकणारे असतात. बघत आहात सर्व जण स्वतःला? आणि मग आदि काळामध्ये
तुमच्या प्युरिटीची रॉयल्टी आणि पर्सनॅलिटी किती महान होती! सर्वजण पोहोचलात आदि
काळामध्ये? पोहोचा. चेक करा - माझी चमकती रेषा किती परसेंट आहे? आदि काळापासून
अंतिम काळापर्यंत तुमच्या प्युरिटीची रॉयल्टी, पर्सनॅलिटी सदैव राहते. अनादि
काळातील चमकत असलेला तारा, चमकत असलेल्या बाबांसोबत निवास करणारा. आता लगेचच आपल्या
विशेषतेचा अनुभव करा. पोहोचलात का सर्वजण अनादि काळामध्ये? नंतर साऱ्या कल्पामध्ये
तुम्हा पवित्र आत्म्यांची रॉयल्टी भिन्न-भिन्न रूपामध्ये असते कारण तुम्हा
आत्म्यांसारखे संपूर्ण पवित्र कोणी बनलेच नाहीत. पवित्रतेचा जन्म-सिद्ध अधिकार
तुम्हा विशेष आत्म्यांना बाबांद्वारे प्राप्त झाला आहे. आता आदि काळामध्ये या. अनादि
काळ सुद्धा बघितलात, आता आदि काळामध्ये तुमच्या पवित्रतेच्या रॉयल्टीचे स्वरूप किती
महान आहे! सर्व जण पोहोचलात सतयुगामध्ये? पोहोचलात! आलात? किती सुंदर स्वरूप देवता
रूप आहे. देवतांसारखी रॉयल्टी आणि पर्सनॅलिटी साऱ्या कल्पामध्ये कोणत्याही आत्म्याची
नाही. देवता रूपाची चमक अनुभव करत आहात ना! इतकी रुहानी पर्सनॅलिटी, ही सर्व
पवित्रतेची प्राप्ती आहे. आता देवता रूपाचा अनुभव करत मध्य काळामध्ये या. आलात? येणे,
अनुभव करणे सोपे आहे ना. तर मध्य काळामध्ये देखील बघा, तुमचे भक्त तुम्हा पूज्य
आत्म्यांची पूजा करतात, चित्र (मुर्त्या) बनवतात. किती रॉयल्टी असणारी चित्रे
बनवतात आणि रॉयल्टीने पूजा करतात. आपले पूज्य चित्र समोर आले आहे ना! चित्रे तर
धर्मात्म्यांची देखील बनतात. धर्म-पित्यांची देखील बनतात, अभिनेत्यांची देखील बनतात
परंतु तुमच्या चित्रांची रुहानियत आणि विधीपूर्वक पूजा यामध्ये फरक असतो. तर आपले
पूज्य स्वरूप समोर आले! अच्छा, तर आता या अंतकाळ संगमावर, ही रुहानी ड्रिल करत आहात
ना! फेरी मारा आणि आपल्या प्युरीटीचा, आपल्या विशेष प्राप्तीचा अनुभव करा. अंतिम
काळ संगमावर तुम्हा ब्राह्मण आत्म्यांना परमात्म पालनेचे , परमात्म प्रेमाचे,
परमात्म शिक्षणाचे भाग्य तुम्हा कोटींमध्ये कोणा आत्म्यांनाच मिळते. परमात्म्याची
डायरेक्ट रचना, पहिली रचना तुम्हा पवित्र आत्म्यांनाच प्राप्त होते. ज्यामुळे तुम्ही
ब्राह्मणच विश्वातील आत्म्यांना देखील मुक्तीचा वारसा बाबांकडून देता. तर या पूर्ण
चक्रामध्ये अनादि काळ, आदि काळ, मध्य काळ आणि अंतिम काळाच्या पूर्ण चक्रामध्ये
इतक्या श्रेष्ठ प्राप्तीचा आधार आहे - पवित्रता. पूर्ण फेरी मारलीत आता चेक करा,
स्वतःला बघा, बघण्याचा आरसा आहे ना! स्वतःला बघण्याचा आरसा आहे ना? ज्यांच्याकडे आहे
त्यांनी हात वर करा. आरसा आहे, आरसा स्वच्छ आहे ना? तर आरशामध्ये बघा माझ्या
पवित्रतेची टक्केवारी किती आहे? पवित्रता केवळ ब्रह्मचर्यच नाही परंतु ‘ब्रह्माचारी’.
मन-वचन-कर्म, संबंध-संपर्क सर्व बाबतीत पवित्रता आहे? किती पर्सेंट मध्ये आहे?
पर्सेंटेज काढता येते ना ? टिचर्सना येते? पांडवांना येते का? अच्छा हुशार आहात.
मातांना येते? मातांना येते का? अच्छा.
पवित्रतेची पारख -
वृत्ती, दृष्टी आणि कृती तिन्हीमध्ये चेक करा, संपूर्ण पवित्रतेची जी वृत्ती असते,
ती लक्षात आली ना. विचार करा, संपूर्ण पवित्रतेची वृत्ती अर्थात प्रत्येक
आत्म्याप्रति शुभ भावना, शुभ कामना. अनुभवी आहात ना! आणि दृष्टी कशी असेल? प्रत्येक
आत्म्याला आत्मा रूपामध्ये बघणे. आत्मिक स्मृतीने बोलणे, चालणे. शॉर्ट मध्ये ऐकवत
आहे. डिटेलमध्ये तर तुम्ही भाषण करू शकता आणि कृती अर्थात कर्मामध्ये सुख घेणे, सुख
देणे. हे चेक करा - माझी वृत्ती, दृष्टी, कृती या प्रमाणे आहे? सुख घ्यायचे, दुःख
घ्यायचे नाही. तर चेक करा कधी दुःख तर घेत नाही ना! कधी-कधी, थोडे-थोडे? दुःख देणारे
सुद्धा असतात ना. समजा तो दुःख देत असेल तर तुम्ही त्याला फॉलो करणार आहात काय! फॉलो
करायचे आहे का नाही? फॉलो कोणाला करायचे आहे? दुःख देणाऱ्याला की बाबांना? बाबांनी,
ब्रह्मा बाबांनी निराकाराची तर गोष्ट आहेच, परंतु ब्रह्मा बाबांनी कोणत्याही मुलाचे
दुःख घेतले? सुख दिले आणि सुख घेतले. फॉलो फादर आहे का कधी-कधी घ्यावेच लागते? नावच
आहे दुःख, जेव्हा दुःख देतात, अपमान करतात, तर जाणता की ही खराब गोष्ट आहे, कोणी
तुमचा अपमान करतो तर तुम्ही त्याला चांगले समजता का? खराब समजता ना! तर तो तुम्हाला
दुःख देतो किंवा अपमान करतो, तर खराब गोष्ट जर तुम्हाला कोणी देतो आणि तुम्ही घेता?
घेता ना? थोड्या वेळासाठी, जास्त वेळ नाही थोड्या वेळासाठी? खराब गोष्ट घ्यायची असते
का? तर मग दुःख किंवा अपमान घेता कशाला? अर्थात मनामध्ये फिलिंग च्या रूपामध्ये
ठेवता कशाला? तर स्वतःला विचारा आपण दुःख घेतो? की दुःखाला परिवर्तनाच्या रूपामध्ये
बघता? काय समजता - दुःख घेणे बरोबर आहे? बरोबर आहे का? मधुबनवाले हे बरोबर आहे?
थोडे-थोडे घेतले पाहिजे असे आहे का? दुःख घेतले पाहिजे ना! घेता कामा नये परंतु घेता.
चुकून घेता. जर दुःखाची फिलिंग आली तर कोणाला त्रास होईल? मनामध्ये कचरा साठून ठेवला
तर कोणाला त्रास होईल? जिथे कचरा असेल तिथेच त्रास होईल ना! तर त्यावेळी आपल्या
रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीला समोर आणा आणि स्वतःला कोणत्या स्वरूपामध्ये बघाल? जाणता
ना तुमचे टायटल कोणते आहे? तुमचे टायटल आहे - सहनशीलतेची देवी, सहनशीलतेचा देव. तर
तुम्ही कोण आहात? सहनशीलतेच्या देवी आहात, सहनशीलतेचे देव आहात का नाही? कधी-कधी
असतो. आपल्या पोझिशनची आठवण करा, स्वमानाची आठवण करा. मी कोण! हे स्मृतीमध्ये आणा.
साऱ्या कल्पाच्या विशेष स्वरूपाची आठवण करा. आठवण तर येते ना!
बापदादांनी बघितले की
जसे ‘माझे’ शब्दाला सहज आठवणीमध्ये परिवर्तन केले आहे. तर ‘माझे’पणाच्या विस्ताराला
समेटून घेण्यासाठी काय म्हणता? माझे बाबा. जेव्हा पण ‘माझे-माझे’ येते तेव्हा ‘माझे
बाबा’ मध्ये समेटून घेता. आणि सारखे-सारखे ‘माझे बाबा’ म्हटल्यामुळे आठवण देखील सहज
येते आणि प्राप्ती देखील जास्त होते. असेच पूर्ण दिवसामध्ये जर कोणत्याही प्रकारचे
कारण अथवा समस्या येते, तर त्याचे हे दोन शब्द विशेष आहेत - ‘मी’ आणि ‘माझे’. तर जसे
‘बाबा’ शब्द म्हणताच ‘माझे’ शब्द पक्का लक्षात राहिला आहे. पक्का झाला आहे ना? आता
सगळे ‘बाबा-बाबा’ म्हणत नाहीत, ‘माझे बाबा’ म्हणतात. असेच हा जो ‘मी’ शब्द आहे, याला
देखील परिवर्तन करण्यासाठी जेव्हा पण मी शब्द बोलाल तर आपल्या स्वमानाची लिस्ट समोर
आणा. मी कोण? कारण ‘मी’ शब्द खाली आणण्यासाठी देखील निमित्त बनतो आणि ‘मी’ शब्द
स्वमानाच्या स्मृतीने वर देखील घेऊन जातो. तर जसा ‘माझे बाबा’चा अभ्यास झाला आहे,
असाच ‘मी’ शब्दाला देह-भानाच्या स्मृती ऐवजी आपल्या श्रेष्ठ स्वमानाला समोर आणा. मी
श्रेष्ठ आत्मा आहे, तख्तनशीन आत्मा आहे, विश्व कल्याणी आत्मा आहे, असा कोणता ना
कोणता स्वमान ‘मी’ सोबत जोडा. म्हणजे मग ‘मी’ हा शब्द उन्नतीचे साधन बनेल. जसे
‘माझे’ हा शब्द मेजॉरिटी ‘बाबा’ शब्दाची आठवण करून देतो तसे ‘मी’ शब्द स्वमानाची
आठवण करून द्यावा; कारण काळ आता तुम्हाला प्रकृतीद्वारे आव्हान देत आहे.
काळाच्या समीपतेला
सामान्य गोष्ट समजू नका. अचानक आणि एव्हररेडी शब्दाला आपल्या कर्मयोगी जीवनामध्ये
प्रत्येक वेळी लक्षात ठेवा. आपल्या शांतीच्या शक्तीचा स्वयंप्रति भिन्न-भिन्न
रूपामध्ये प्रयोग करा. जसे विज्ञान आपले नवीन-नवीन प्रयोग करत असते. जितके स्व प्रति
प्रयोग करण्याची प्रॅक्टिस करत राहाल तितकेच इतरांप्रती देखील शांतीच्या शक्तीचा
प्रयोग होत राहील.
आता विशेष करून आपल्या
शक्तींची सकाश चारही बाजूंना पसरवा. जेव्हा तुमची प्रकृती सूर्याची शक्ती, सूर्याची
किरणे आपले कार्य कितीतरी प्रकारे करत आहे. पाण्याचा पाऊस देखील पाडतात आणि पाण्याला
सुकवून देखील टाकतात. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून दाखवतो. तर मग तुम्ही
आपल्या शक्तींची सकाश वायुमंडळामध्ये पसरवू शकत नाही काय? आपल्या शक्तींच्या सकाश
द्वारे आत्म्यांना दुःख-अशांती मधून सोडवू शकत नाही काय! ज्ञान सूर्य स्वरूपाला
इमर्ज करा. किरणे पसरवा, सकाश पसरवा. जसे स्थापनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये
बाप-दादांकडून अनेक आत्म्यांना घरबसल्या सुख-शांतीची सकाश मिळाल्याचा अनुभव झाला.
संकल्प मिळाला की, ‘जा’. असे आता तुम्हा मास्टर ज्ञानसूर्य मुलांद्वारे सुख-शांतीची
लाट पसरविण्याची अनुभूती झाली पाहिजे. परंतु ती तेव्हा होईल, याचे साधन आहे - मनाची
एकाग्रता. आठवणीची एकाग्रता. स्वतःमध्ये एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा. जेव्हा पाहिजे,
जसे पाहिजे, जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत मनाला एकाग्र करता आले पाहिजे. आता मास्टर
ज्ञान सूर्याच्या स्वरूपाला इमर्ज करा आणि शक्तींची किरणे, सकाश पसरवा.
बापदादांनी ऐकले आहे
आणि खुश आहेत की मुले सेवेच्या उमंग-उत्साहामध्ये ठिकठिकाणी जाऊन चांगली सेवा करत
आहेत, बापदादांकडे सर्व बाजूंचे सेवेचे चांगले-चांगले समाचार पोहोचले आहेत, भले
प्रदर्शनी करत आहेत किंवा समाचार पत्रांद्वारे, टि. व्ही. द्वारे संदेश देण्याचे
कार्य वाढवत जात आहेत. संदेश देखील पोहोचत आहे, चांगल्या रीतीने संदेश पोहोचवत आहात.
गावांमध्ये देखील जिथे सेवा राहून गेली आहे, प्रत्येक झोन चांगल्या प्रकारे आपापल्या
एरियाला वाढवत आहेत. वर्तमानपत्रांद्वारे, टि. व्ही. द्वारे, भिन्न-भिन्न
साधनांद्वारे उमंग-उत्साहाने करत आहात. त्याच्यासाठी सेवा करणाऱ्या सर्व मुलांना
बापदादा खूप स्नेहयुक्त आशीर्वादांनी भरलेली मुबारक देत आहेत. परंतु आता संदेश
देण्यामध्ये तर चांगला उमंग-उत्साह आहे आणि चोहो बाजूला - ‘ब्रह्माकुमारीज् काय करत
आहेत’, ‘खूप चांगले शक्तिशाली कार्य करत आहेत’, हा आवाज देखील चांगला पसरत आहे आणि
वाढत जात आहे. परंतु…, ‘परंतु’, ऐकवू का? ऐकवू ‘परंतु…’, परंतु ब्रह्माकुमारींचे
बाबा किती चांगले आहेत, हा आवाज आता वाढला पाहिजे. ब्रह्माकुमारी आता चांगले काम
करत आहेत परंतु करवून घेणारे कोण आहेत, आता ही प्रत्यक्षता झाली पाहिजे. बाबा आलेले
आहेत, हा समाचार मनापर्यंत पोहोचला पाहिजे. याचा प्लॅन बनवा.
बापदादांना मुलांनी
प्रश्न विचारला की, ‘वारसदार अथवा माईक (चांगले भाषण करणारे) कोणाला म्हणावे?’ माईक
निघाले देखील आहेत, परंतु बापदादा आताच्या समयानुसार असे माईक इच्छितात किंवा
आवश्यक आहेत ज्यांच्या आवाजामध्ये दिव्यता असेल. आता सामान्यपणे ‘बाबा’ शब्द बोलतात
सुद्धा, ‘चांगले करत आहेत’, इथपर्यंत सुद्धा आणले आहे, त्यासाठी तर बापदादा मुबारक
देतात; परंतु आता असे माईक पाहिजेत ज्यांच्या आवाजाची देखील लोकांना किंमत वाटेल.
असे प्रसिद्ध असावेत, प्रसिद्ध याचा अर्थ असा नाही की, मोठा पदाधिकारी असावा, परंतु
त्याचा आवाज ऐकून असे वाटावे की, हा बोलणारा जे काही सांगत आहे, त्याच्या बोलण्याला
किंमत आहे. जर हे ज्ञान अनुभवाने सांगेल, तर त्याची किंमत वाटेल. जसे माईक (भाषण
करणारे) तर खूप असतात परंतु माईक देखील कोणी किती पॉवरवाला असतो, कोणी किती असतो,
असेच असा माईक शोधा, ज्याच्या आवाजामध्ये शक्ती असेल. त्याच्या आवाजाला ऐकून असे
वाटावे की हा अनुभव करून आला आहे, तर अवश्य कोणतीतरी गोष्ट आहे; परंतु तरीही
वर्तमान समयी प्रत्येक झोन, प्रत्येक विंग्ज मधून माईक जरूर निघावेत. बापदादा असे
म्हणत नाहीत की सेवेचा प्रत्यक्ष रिझल्ट आलेला नाही, रिझल्ट मिळाला आहे. परंतु आता
वेळ कमी आहे आणि सेवेचे महत्व असणाऱ्या आत्म्यांना आता निमित्त बनवावे लागेल.
ज्यांच्या आवाजाला किंमत असेल. पद भले नसेल परंतु त्यांचे प्रॅक्टिकल जीवन आणि
प्रॅक्टिकल अनुभवाची ऑथॉरिटी असावी. त्यांच्या वाणीमध्ये अनुभवाची ऑथॉरिटी असावी.
समजले कशा प्रकारचा माईक पाहिजे? वारसदाराला तर जाणताच. ज्याच्या प्रत्येक
श्वासामध्ये, प्रत्येक पावलामध्ये बाबा आणि कर्तव्य आणि त्याच सोबत मन-वचन-कर्म,
तन-मन-धन सर्वामध्ये बाबा आणि यज्ञ सामावलेला असेल. बेहदची सेवा सामावलेली असेल.
सकाश देण्याची समर्थी (शक्ती) असावी. अच्छा!
आता एका सेकंदा मध्ये,
एक सेकंद झाला, एका सेकंदामध्ये सर्व सभेतील जे पण जिथे आहेत तिथे मनाला एकाच
संकल्पामध्ये स्थित करा - बाबा आणि मी परमधाममध्ये अनादि ज्योतीबिंदू स्वरूप आहोत,
परमधाममध्ये बाबांसोबत बसा. अच्छा. आता साकारमध्ये या.
आता वर्तमान काळाच्या
हिशोबाने मन-बुद्धीला एकाग्र करण्याचा अभ्यास, जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये
एकाग्र करा, कंट्रोलिंग पॉवरला जास्त वाढवा. मन-बुद्धी संस्कार तिन्हीवर कंट्रोलिंग
पॉवर. हा अभ्यास येणाऱ्या काळामध्ये खूप सहयोग देईल. वायुमंडळा नुसार एका
सेकंदामध्ये कंट्रोल करावे लागेल. जे हवे तेच व्हावे. तर हा अभ्यास खूप आवश्यक आहे,
याला साधे समजू नका, कारण वेळ आल्यावर हाच अभ्यास शेवट आनंदाचा करेल. अच्छा!
चारही बाजूंच्या डबल
तख्तनशीन, बापदादांच्या दिलतख्तनशीन, त्याच सोबत विश्वराज्यतख्त अधिकारी, सदा आपल्या
अनादि स्वरूप, आदि स्वरूप, मध्य स्वरुप, अंतिम स्वरूपामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा
स्थित राहणाऱ्या, सदैव सर्व खजिन्यांना स्वतः कार्यामध्ये लावणाऱ्या आणि इतरांना
देखील खजिन्यांनी संपन्न बनविणाऱ्या, सर्व आत्म्यांना बाबांकडून मुक्तीचा वारसा
देणाऱ्या अशा परमात्म प्रेमाच्या पात्र आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण,
हृदयापासून आशीर्वाद आणि नमस्ते.
वरदान:-
‘साथी’ आणि
‘साक्षी’पणाच्या अनुभवाद्वारे सदा सफलता मूर्त भव
जी मुले सदैव
बाबांच्या सोबत राहतात ते स्वतः साक्षी बनतात कारण बाबा स्वयं साक्षी होऊन पार्ट
बजावतात तर त्यांच्या सोबत राहणारे देखील साक्षी होऊन पार्ट बजावतील; आणि ज्यांचे
साथी स्वयं सर्वशक्तिमान बाबा आहेत ते सफलता मूर्त देखील आपोआप बनतातच.
भक्तीमार्गामध्ये तर बोलावतात की, ‘थोड्या वेळासाठी तरी सहवासाचा अनुभव करवा, झलक
दाखवा’ परंतु तुम्ही सर्व नात्यांनी साथीदार झालात - तर याच आनंदामध्ये आणि नशेमध्ये
रहा की, ‘पाना था सो पा लिया’.
सुविचार:-
व्यर्थ संकल्पांची
निशाणी आहे - मन उदास आणि आनंद गायब.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
जास्तीतजास्त वेळ
अचल-अडोल, निर्विघ्न, निर्बंधन, निर्विकल्प, निर-विकर्म अर्थात निराकारी, निर्विकारी
आणि निरहंकारी स्थितीमध्ये रहा तेव्हा कर्मातीत बनू शकाल. सेवेचा विस्तार भले कितीही
वाढवा परंतु विस्तारामध्ये जात असताना सार स्थितीचा अभ्यास कमी होऊ नये,
विस्तारामध्ये सार विसरू नये. खा-प्या, सेवा करा परंतु न्यारेपणाला विसरू नका.